✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट~~~~~~~~~~~~~~~~~~~ 6️⃣ 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 6️⃣ ( फ्रेश शालेय परिपाठ )🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00 ( रविवार आणि सुट्टी वगळून )~~~~~~~~~~~~~~~~~~~🎇 दिनांक :- 06 जुलै 2023💠 वार - गुरुवार••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *✈ 🚀 गुगलयान ✈ 🚀*••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *कथा - नवऱ्याचे मी पण*कुटुंबातील नात्यात असलेला घालमेल, प्रेम, जिव्हाळा आणि तिरस्कार यावर आधारित फेसबुकवर अनेक वाचकांना पसंत पडलेली ही कथा आहे. मला आशा आहे आपणांस ही कथा नक्की आवडेल. तेव्हा चला कथा वाचू या .....!बारावा भाग -------https://www.facebook.com/groups/aamhi.saahityik/permalink/7289700271046325/?mibextid=Nif5ozकथा आवडल्यास आपल्या प्रतिक्रिया अवश्य कळवा.~~~~~~~~~~~~~~~~~~~✍ स्तंभलेखक *नासा येवतीकर, धर्माबाद*9423625769~~~~~~~~~~~~~~~~~~~••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• 🚥 *६ जुलै २०२३* 🚥 🌺 *_दिनविशेष_* 🌺 ••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *_ या वर्षातील १८७ वा दिवस आहे_* •••••••••••••••••••••••••••••••• *_महत्त्वाच्या घटना:_* •••••••••••••••••••••••••••••• *२००६:चीन युद्धापासून बंद असलेली भारत व तिबेट यांना जोडणारी ’नाथू ला’ ही खिंड ४४ वर्षांनंतर व्यापारासाठी खुली झाली.**१९८२:पुणे - मुंबई मार्गावरील खंडाळा ते मंकी हिल दरम्यान रेल्वेचा भारतातील सर्वात जास्त लांबीचा (त्याकाळातील) वाहतुकीस खुला झाला.**१९१०:भांडारकर प्राच्यविद्या संशोधन संस्थेची (Bhandarkar Oriental Research Institute) पुणे येथे स्थापना**१८९२:ब्रिटिश संसदेचे सभासद म्हणून दादाभाई नौरोजी या पहिल्या भारतीय व्यक्तिची निवड झाली.**१८८५:लुई पाश्चर याने रेबीज या रोगावरील लशीची यशस्वी चाचणी केली.**१७८५’डॉलर’ हे अमेरिकेचे अधिकृत चलन बनले. हे चलन पूर्णपणे दशमान पद्धतीवर आधारित होते.**१७३५:मल्हारराव होळकर आणि राणोजी शिंदे राजपुतान्यात विजयी होऊन पुण्यास परतले.* *_जन्मदिवस / जयंती / वाढदिवस_* •••••••••••••••••••••••••••••••••*१९८५:रणवीर सिंग( रणवीर सिंग भवनानी) हिन्दी चित्रपट प्रसिद्ध अभिनेता**१९७८:तन्वी अमित-- कवयित्री लेखिका* *१९७२:प्रा.डॉ विशाखा संजय कांबळे-- कवयित्री, लेखिका, संपादिका, संशोधक* *१९६७:ज्योती वामन बन्सोड (पांगुळ) -- प्रसिद्ध कवयित्री,लेखिका* *१९६१:अशोक शिंदे -- जेष्ठ मराठी अभिनेते* *१९५२:रेखा शिवकुमार बैजल – जेष्ठ मराठी व हिंदी लेखिका**१९४६:जॉर्ज डब्ल्यू. बुश–अमेरिकेचे ४३ वे राष्ट्राध्यक्ष**१९४३:कालिदास गणपतराव चिंचोळकर-- लेखक* *१९४१:अरविंद नारखेडे-- जेष्ठ मराठी साहित्यिक* *१९३९:अरविंद प्रभाकर जामखेडकर --पुरातत्त्वशास्त्रज्ञ व इतिहासकार प्राच्यविद्या पंडित**१९३२: सिंधूताई मांडवकर-- जेष्ठ लेखिका* *१९३०:डॉ. एम. बालमुरलीकृष्णन – दाक्षिणात्य संगीताचे गायक व व्हायोलिनवादक, पद्मश्री (१९७१), पद्मविभूषण (१९९१)**१९२७:व्यंकटेश दिगंबर माडगूळकर – लेखक, चित्रकार, पटकथाकार. (मृत्यू: २८ ऑगस्ट २००१)**१९२०:डॉ.विनायक महादेव तथा ’वि. म.’ दांडेकर – अर्थतज्ञ,’त्यांचे ’पॉव्हर्टी इन इंडिया’ हे पुस्तक गाजले (३० जुलै १९९५)**१९०५:लक्ष्मीबाई केळकर – लेखिका,राष्ट्रसेविका समितीच्या अंस्थापिका (मृत्यू: २७ नोव्हेंबर १९७८)**१९०१:डॉ.श्यामाप्रसाद मुकर्जी –माजी केंद्रीय मंत्री आणि भारतीय जनसंघाचे संस्थापक (मृत्यू: २३ जून १९५३)**१८८१:संत गुलाबराव महाराज--महाराष्ट्रात होऊन गेलेले एक संत व मराठी लेखक (मृत्यू: २० सप्टेंबर १९१५)**१८६२:एल.के.अनंतकृष्ण अय्यर – दक्षिण भारतातील जातिजमातींची सखोल पाहणी करुन माहिती गोळा करणारे मानववंशशास्त्रज (मृत्यू: २६ फेब्रुवारी १९३७)**१८३७:सर रामकृष्ण गोपाळ भांडारकर – संस्कृत पण्डित, प्राच्यविद्या संशोधक, भाषाशास्त्रज्ञ, इतिहास संशोधक व समाजसुधारक (मृत्यू: २४ ऑगस्ट १९२५)**१७८१:सर थॉमस स्टॅम्फोर्ड रॅफल्स – सिंगापूरचे संस्थापक व ब्रिटिश मुत्सद्दी (मृत्यू: ५ जुलै १८२६)**_मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन_* •••••••••••••••••••••••••••••••••*२००२:धीरुभाई अंबानी – उद्योगपती (जन्म: २८ डिसेंबर १९३२)**१९९९:एम. एल. जयसिंहा – कसोटी क्रिकेटपटू, शैलीदार फलंदाज (जन्म: ३ मार्च १९३९)**१९९७:चेतन आनंद – हिन्दी चित्रपट निर्माते, दिग्दर्शक आणि पटकथालेखक (जन्म: ३ जानेवारी १९२१)**१९८६:’बाबू’ जगजीवनराम – स्वातंत्र्यसैनिक, समाजसुधारक, राजकारणी, केंद्रीय मंत्री व भारताचे उपपंतप्रधान (जन्म: ५ एप्रिल १९०८)**१८५४:जॉर्ज ओहम – जर्मन गणितज्ञ व भौतिकशास्त्रज्ञ (जन्म: १६ मार्च १७८९)* ~~~~~~~~~~~~~~~~~~~~~ *_दिनविशेष या सदरातील सर्व मुद्दे हे संग्रहात्मक आहेत तेव्हा त्यात चूका नसतीलच असे सांगता येणार नाही_* *✍ संकलन ✍* *श्रीराम चव्हाण माजी शिक्षणाधिकारी नागपूर*मोबाईल:9822695372 ईमेल: chavhansk65@gmail.com••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• 🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••1⃣ *मुख्यमंत्री शिंदेंचा नागपूर दौरा रद्द, रात्रीच तडकाफडकी मुंबईत; राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण, पुन्हा नवा ट्विस्ट?*•••••••••••••••••••••••••••••••••••••2⃣ *नाशिकची पाणीकपात टळली! पाणीसाठा वाढला, गंगापूर धरण 31 टक्के, नांदूरमध्यमेश्वर 88 टक्क्यांवर*•••••••••••••••••••••••••••••••••••••3⃣ *सेवा विकास बँक गैरव्यवहार प्रकरणी बँकेचे माजी अध्यक्ष अमर मुलचंदानीला ईडीकडून अटक*•••••••••••••••••••••••••••••••••••••4⃣ *मुंबईतील चुनाभट्टी येथे 50 फूट खोलपर्यंत जमीन खचली; जवळपास 40 ते 50 वाहनं खड्ड्यात कोसळली*•••••••••••••••••••••••••••••••••••••5⃣ *पुढील आदेश येईपर्यंत धाराशिवचे नाव उस्मानाबादच असणार; जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश*•••••••••••••••••••••••••••••••••••••6⃣ *संभाजीनगर शहरातील हवेची गुणवत्ता मोजायला मनपा बसवणार 30 यंत्र, भुवनेश्वरस्थित 'ऑराशूअर' कंपनीसोबत केला करार*•••••••••••••••••••••••••••••••••••••7⃣ *SAFF फुटबॉल अजिंक्यपद स्पर्धेत, पेनल्टी शूटआऊटमध्ये भारताचा कुवेतवर 5-4 ने विजय, मैदानात 'चक दे इंडिया'चे नारे*•••••••••••••••••••••••••••••••••••••*📷 वृत्त संकलक - कुणाल पवारे 📹*📱9960358300•••••••••••••••••••••••••••••••••••••ही पोस्ट नियमित मिळविण्यासाठी आणि या समुहात add होण्यासाठी 9423625769 येथे संपर्क करावे.••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• 🌷🍃 *विशेष माहिती* 🌷🍃••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *संकष्टी चतुर्थी*हिंदू पंचांगानुसार कृष्ण पक्षात येणाऱ्या चतुर्थीस संकष्ट चतुर्थी किंवा संकष्टी चतुर्थी म्हणतात. एका वर्षात १२ आणि त्यावर्षी अधिकमास आल्यास १३ संकष्टी चतुर्थी येतात. प्रत्येक गणपतीच्या ठिकाणी हा दिवस विशेष भक्तिभावाने साजरा होतो. गणेशाच्या उपासनेत या दिवसाचे महत्त्व विशेष आहे. चंद्रदर्शन हा या व्रताचा महत्त्वाचा भाग आहे.संकष्टी चतुर्थी, ज्याला संकटहार चतुर्थी असेही म्हणतात, हा गणेशाला समर्पित हिंदू कॅलेंडरमधील प्रत्येक चंद्र महिन्यातील एक दिवस आहे. हा दिवस कृष्ण पक्षाच्या चौथ्या दिवशी येतो (अंधकारमय चंद्र चरण किंवा चंद्राचा अस्त होणारा पंधरवडा). ही चतुर्थी मंगळवारी आली तर तिला अंगारकी संकष्टी चतुर्थी म्हणतात. अंगारकी संकष्टी चतुर्थी सर्व संकष्टी चतुर्थी दिवसांमध्ये अत्यंत महत्त्वाची मानली जाते. संकष्ट चतुर्थी हे एक व्रत आहे. ते पुरुष व स्त्रिया दोघांनी करायचे असते. हे व्रत दोन प्रकारांनी करतात. १. मिठाची संकष्ट चतुर्थी व २. पंचामृती चतुर्थी. दिवसभर उपवास करून चंद्रोदय झाल्यावर चंद्राला व गणपतीला महानैवेद्य दाखवतात. यासाठी मोदक करण्याची पद्धती आहे. त्यानंतर भोजन करतात. या व्रताचा काल आमरण, एकवीस वर्षे किंवा एक वर्ष असा आहे. व्रतराज या ग्रंथात हे व्रत सांगितले आहे.*संकलन*••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• 🌹 *" फ्रेश सुविचार "* 🌹••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••सुंदर मुख हे व्यक्तीचे शिफारस पत्र आहे, तर सुंदर हृदय हे विश्वासपत्र आहे.*संकलन :- प्रमिलाताई सेनकुडे, नांदेड**प्रा.शा. गोजेगाव ता.हदगाव, जि. नांदेड*📱9403046894••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• ❓ *आजची प्रश्नमंजुषा* ❓••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••१) विविधांगी शैक्षणिक उपक्रमावर आधारित *'सृजनशाळा'* या पुस्तकाचे लेखक कोण ?२) हिंदी चित्रपट सृष्टीतील पहिलं गाणं कोणतं ?३) UCC चा full form काय आहे ?४) भारताचे मार्टिन ल्युथर किंग कोणाला संबोधले जाते ?५) एका मानवी किडनीचे वजन किती असते ?*उत्तरे :-* १) गुलाब बिसेन, गोंदिया २) दे दे खुदा के नाम पे प्यारे ( आलमआरा ) ३) Uniform Civil Code ४) स्वामी दयानंद सरस्वती ५) १५० ग्रॅम *संकलन :- जैपाल भै. ठाकूर*जि.प.व.प्राथ.शाळा भोसा, ता. आमगाव, जि. गोंदिया 📱9765943144••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎂 *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *◆|वा|ढ|दि|व|स|अ|भि|ष्ठ|चिं|त|न|◆* 👤 अशोक इमनेलू, सहशिक्षक, धर्माबाद👤 आबासाहेब उस्केलवार, विषय शिक्षक, धर्माबाद👤 शंकर सोनटक्के, माध्यमिक शिक्षक, धर्माबाद👤 मोहन भूमकर, सहशिक्षक, धर्माबाद👤 संतोष मानेलू, सहशिक्षक, धर्माबाद👤 श्रीकांत पुलकंठवार, धर्माबाद👤 रेवती गायकवाड👤 बरकत खान👤 अभय कासराळीकर👤 अर्फत इनामदार👤 नारायण वानोळे👤 मधुकर कांबळे👤 शंकर स्वामी*ઉदंड_आયુષ્યાच्या अનંત_શુभेच्छा,* [ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा एक दिवस अगोदर 9423625769 येथे पोस्ट करावे. ]••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• ••• 💡 ‼ *मनाचे श्लोक*‼ 💡•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••मना राघवेंवीण आशा नको रे। मना मानवाची नको कीर्ति तूं रे॥ जया वर्णिती वेद-शास्त्रे-पुराणें। तया वर्णितां सर्वही श्लाघ्यवाणे ॥१८॥।। जय जय रघुवीर समर्थ ।।••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🕊🌎 ‼ *विचारधारा*‼🕊🌎••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••नि:स्वार्थ भावनेने जे इतरांना द्यायला शिकतात त्यांना कोणाकडूनही घेण्याची अपेक्षा मुळातच नसते कारण अपेक्षा ठेवून ते दु:खाचे कारण बनत नाही. आणि होऊ शकेल तर..आपल्या परीने शेवटच्या क्षणापर्यंत ते देण्यासाठी धडपडतच असतात. आपण ही तशाच व्यक्तीकडून थोडं तरी शिकण्याचा प्रयत्न करायला पाहिजे. जेथे अपेक्षा केली जात नाही तर. .फक्त माणुसकी धर्म निभावून दाखवला जातो.🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷सौ.संगीता संतोष ठलालमु.कुरखेडा जि.गडचिरोली••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎭 *आजची फ्रेश बोधकथा* 🎭••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *सोनेरी स्पर्श* ही गोष्ट एका लोभी श्रीमंत माणसाची आहे. एकदा वाटेत त्याला परी भेटली. परीचे केस झाडाच्या फांद्यांमध्ये अडकले होते. पैसे कमावण्याची ही नामी संधी आहे असा विचार करून, त्याने परीला मदतीच्या बदल्यात एक वर मागितला. तो म्हणाला "मी ज्याला स्पर्श करीन त्याचे सोन्यात रूपांतर झालं पाहिजे”. त्याची ही इच्छा कृतज्ञ परीने मान्य केली. लोभी मनुष्य त्याला मिळालेल्या नवीन वराविषयी, आपल्या मुलीला आणि बायकोला सांगण्यासाठी घराकडे धावला. सगळा वेळ दगड, गोट्यांना स्पर्श करून सोन्यात रूपांतर करीत राहिला. तो घरी आला तेव्हा त्याची मुलगी त्याच्याकडे धावत येऊन त्याला बिलगली. तो तिला कडेवर घेण्यासाठी खाली वाकला, मुलीला त्याचा स्पर्श होताच मुलीचे रूपांतर सोनेरी पुतळ्यात झाले. त्याला त्याची चूक लक्षात आली आणि नंतर तो मनुष्य, परीने दिलेला वर मागे घेण्यासाठी तिला शोधू लागला. तात्पर्य: लोभीपणा अधोगतीला कारणीभूत असतो•••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••या पोस्ट विषयी आपल्या सूचना, निवेदन, अभिप्राय, बातम्या, वाढदिवस, माहिती किंवा शंका 9423625769 येथे कळवावे. •••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••~~~~~~~~~~~~~~~~~~~*🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢*📱 9423625769~~~~~~~~~~~~~~~~~~~*🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏*पुन्हा भेटू या फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार ~~~~~~~~~~~~~~~~~~~
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment