✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट~~~~~~~~~~~~~~~~~~~ 6️⃣ 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 6️⃣ ( फ्रेश शालेय परिपाठ )🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00 ( रविवार आणि सुट्टी वगळून )~~~~~~~~~~~~~~~~~~~🎇 दिनांक :- 15 जुलै 2023💠 वार - शनिवार••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🌷🌐 . *दिनविशेष . 🌐* 🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *_ या वर्षातील १९६ वा दिवस आहे_* •••••••••••••••••••••••••••••••• *_महत्त्वाच्या घटना:_* •••••••••••••••••••••••••••••• *१९९७:पर्यावरणवादी कार्यकर्ते महेशचंद्र मेहता यांची रॅमन मॅगसेसे पुरस्कारासाठी निवड**१९९६:स्वाध्याय परिवाराचे प्रणेते पांडुरंगशास्त्री आठवले यांना 'रॅमन मॅगसेसे' पुरस्कार जाहीर**१९६२:शिक्षणक्षेत्रातील महत्त्वपूर्ण व यशस्वी प्रयोग मानल्या जाणार्या ’ज्ञानप्रबोधिनी’ या संस्थेचा पुणे येथे प्रारंभ**१९५५:पंडित जवाहरलाल नेहरू यांना ’भारतरत्न’ हा सर्वोच्च नागरी सन्मान जाहीर**१९५५:आण्विक अस्त्रांवर बंदी घालणाऱ्या मैनाउ जाहीरनाम्यावर १८ नोबेल पारितोषिक विजेत्या शास्त्रज्ञांनी स्वाक्षऱ्या केल्या. नंतर आणखी ३८ नोबेल पारितोषिक विजेत्यांनी त्याला मान्यता दिली.**१९२७:समाजाला कुटुंबनियोजन आणि लैंगिक समस्यांसंबधी मार्गदर्शन करण्याच्या उद्देशाने र. धों. कर्वे यांनी अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत सुरु केलेल्या 'समाजस्वास्थ्य' या मासिकाचा पहिला अंक प्रकाशित झाला.**१९२६:मुंबईत कुलाबा ते क्रॉफर्ड मार्केट अशी उपनगरी बस सेवा सुरू झाली.**१६६२:इंग्लंडमधे प्रतिष्ठित असलेल्या ’रॉयल सोसायटी’ची स्थापना**_जन्मदिवस / जयंती / वाढदिवस:_* •••••••••••••••••••••••••••••••••*१९८६:सुभाष आ.मंडले -- लेखक* *१९८१:प्रा.नंदकुमार शिवाजी शेडगे-- लेखक,कवी* *१९८०:राहुल धर्मसिंग चव्हाण (पालत्या)-- कवी लेखक* *१९७५:आबा गोविंदा महाजन-- महाराष्ट्र सरकारच्या महसूल खात्यातील अधिकारी, मराठी भाषेतील साहित्य अकादमी पुरस्कारप्राप्त प्रसिद्ध लेखक* *१९६८:सुरज थापर -- छोट्या पडद्यावरील लोकप्रिय अभिनेते* *१९६०:प्रा.दिलीप नामदेवराव तितरमारे-- कवी**१९५६:डॉ.प्रभा दत्तात्रय वासाडे -- लेखिका* *१९५१:अनुराधा मराठे-- शास्त्रीय आणि सुगम संगीत गाणाऱ्या एक मराठी गायिका**१९५०: धनराज लहानुजी डाहाट-- कवी, लेखक, विचारवंत* *१९४९:प्रा.डॉ.अरुण चिंतामणराव प्रभुणे-- प्रसिद्ध लेखक,संपादक* *१९४३:दत्तात्रय सदाशिव (द.स.) काकडे-- सुप्रसिद्ध कादंबरीकार* *१९४१:माधव गुणाजी कोंडविलकर--ज्येष्ठ साहित्यिक,कवी, कादंबरीकार (मृत्यू:१२ सप्टेंबर २०२०)* *१९३७:विश्वनाथ शंकर मोरे-- संगीतकार(मृत्यू:३१ जानेवारी १९८६)**१९३७:प्रल्हाद नामदेव चेंदवणकर-- कवी (मृत्यू:१६ जुलै २००३)**१९३२: प्राचार्य नरहर कुरुंदकर – प्रसिद्ध साहित्यिक,विद्वान,टीकाकार,संपादक (मृत्यू: १० फेब्रुवारी १९८२)**१९३१:विठ्ठल उमप-- मराठी शाहीर व लोककलाकार( मृत्यू:२६ नोव्हेंबर, २०१०)**१९२७:प्रा.शिवाजीराव भोसले – विचारवंत, वक्ते व डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे कुलगुरू (मृत्यू: २९ जून २०१०)**१९१९:बापू चंद्रसेन कांबळे-- भारतीय राजकारणी,लेखक,संपादक,न्यायशास्त्रज्ञ आणि सामाजिक कार्यकर्ते(मृत्यू:६ नोव्हेंबर २००६)**१९१८:चित्रा जयंत नाईक--भारतीय शिक्षणतज्ज्ञ, विचारवंत आणि समाजसेविका(मृत्यू: १४डिसेंबर २०१०)**१९०५:चौधरी मुहम्मद अली – पाकिस्तानचे ४ थे पंतप्रधान (मृत्यू: २ डिसेंबर १९८०)**१९०४:गानतपस्विनी मोगुबाई कुर्डीकर – जयपूर - अत्रौली घराण्याच्या शास्त्रीय गायिका (मृत्यू: १० फेब्रुवारी २००१)**१९०३:के.कामराज – स्वातंत्र्यसैनिक, खासदार व तामिळनाडुचे मुख्यमंत्री (मृत्यू: २ आक्टोबर १९७५)**१८९९:दत्तात्रय लक्ष्मण गोखले-- मराठी कवी**१६११:मिर्झा राजे जयसिंग (मृत्यू: २८ ऑगस्ट १६६७)**_मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन:_* •••••••••••••••••••••••••••••••••*२००४:डॉ. बानू कोयाजी – कुटुंबनियोजनाच्या क्षेत्रात सलग साठ वर्षे कार्य करणार्या सामाजिक कार्यकर्त्या. त्यांना पद्मभूषण, रॅमन मॅगसेसे पुरस्कार, रामेश्वरदास बिर्ला राष्ट्रीय पुरस्कार, पुण्यभूषण पुरस्कारांनी गौरविण्यात आले. (जन्म: २२ ऑगस्ट १९१८)**१९९१:जगन्नाथराव जोशी – गोवा मुक्तिसंग्रामातील स्वातंत्र्यसैनिक, संसदपटू, वक्ते (जन्म:१९२०)**१९८०:गजानन विश्वनाथ केतकर--निबंधकार, विचारवंत, गीतेचे अभ्यासक,(जन्म:८ ऑगस्ट १८९७)**१९६७:नारायण श्रीपाद राजहंस तथा ’बालगंधर्व’ –गायक व नट(जन्म:२६ जून १८८८)**१९१९:एमिल फिशर – रासायनिक प्रक्रियेद्वारे शर्करा रेणूंच्या निर्मितीसाठी १९०२ मध्ये नोबेल पुरस्कार मिळालेले जर्मन रसायनशास्त्रज्ञ (जन्म: ९ आक्टोबर १८५२)**१९०४:अंतॉन चेकॉव्ह – रशियन कथाकार व नाटककार. याने मॉस्को विद्यापीठातून वैद्यकीय पदवी घेतली होती मात्र वैद्यकीय व्यवसाय कधी केला नाही.(जन्म: २९ जानेवारी १८६०)*~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~ *_दिनविशेष या सदरातील सर्व मुद्दे हे संग्रहात्मक आहेत तेव्हा त्यात चूका नसतीलच असे सांगता येणार नाही_* *✍ संकलन ✍* *श्रीराम चव्हाण माजी शिक्षणाधिकारी नागपूर*मोबाईल:9822695372 ईमेल: chavhansk65@gmail.com••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *✈ 🚀 गुगलयान ✈ 🚀*••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *कथा - आत्मनिर्भर*स्त्री अबला नसून सबला आहे. ती स्वतःच्या बळावर आपले स्वतःचे विश्व निर्माण करू शकते. अश्याच एका महिलेची कथा ज्यास फेसबुकवर अनेक वाचकांनी पसंती दर्शविलेली आहे. मला आशा आहे आपणांस ही कथा नक्की आवडेल. तेव्हा चला कथा वाचू या .....!पहिला भाग -------https://www.facebook.com/groups/aamhi.saahityik/permalink/7313550268661325/?mibextid=Nif5ozकथा आवडल्यास आपल्या प्रतिक्रिया अवश्य कळवा.~~~~~~~~~~~~~~~~~~~✍ स्तंभलेखक *नासा येवतीकर, धर्माबाद*9423625769~~~~~~~~~~~~~~~~~~~ 🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••1⃣ *चांद्रयान-3 यशस्वीरित्या अवकाशात झेपावले, उड्डाणानंतर इस्रोच्या शास्त्रज्ञांचा विजयी जल्लोष*•••••••••••••••••••••••••••••••••••••2⃣ *पुढील पाच दिवस राज्यात मुसळधार पावसाची शक्यता, हवामान विभागाचा अंदाज*•••••••••••••••••••••••••••••••••••••3⃣ *राज्यात गायीच्या दुधाला किमान 34 रुपये दर मिळणार, दूध दर निश्चिती समितीचा अहवाल सादर*•••••••••••••••••••••••••••••••••••••4⃣ *राज्यात शिक्षक भरतीचा जीआर आजच, पहिल्या टप्प्यात 30 हजार शिक्षकांची भरती: शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांची घोषणा*•••••••••••••••••••••••••••••••••••••5⃣ *अजित पवार यांच्यासह राष्ट्रवादीच्या आमदारांचं खातेवाटप जाहीर.. शिंदे मंत्रिमंडळातील शिवसेना-भाजप मंत्र्यांच्या खात्यातही बदल, भाजपची सहा तर शिंदे गटाकडून तीन खाती राष्ट्रवादीच्या वाट्याला; *•••••••••••••••••••••••••••••••••••••6⃣ *शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कारांची घोषणा, गेल्या तीन वर्षांचे पुरस्कार जाहीर*•••••••••••••••••••••••••••••••••••••7⃣ *पहिल्याच कसोटी सामन्यात यशस्वी जयस्वालच्या 171 धावा, टीम इंडिया तीन बाद 350 धावा*•••••••••••••••••••••••••••••••••••••*📷 वृत्त संकलक - कुणाल पवारे 📹*📱9960358300•••••••••••••••••••••••••••••••••••••ही पोस्ट नियमित मिळविण्यासाठी आणि या समुहात add होण्यासाठी 9423625769 येथे संपर्क करावे.••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• 🌷🍃 *विशेष माहिती* 🌷🍃••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••📙 किरणोपचार म्हणजे काय ? 📙 अनेक पदार्थ किरणोत्सर्गी असतात. यात नैसर्गिक व कृत्रिम पदार्थांचा समावेश होतो. क्ष-किरण, गॅमा किरण, अल्फा, बीटा व प्रोटॉन असे अनेक किरणोत्सर्ग आपल्याला ज्ञात आहेत. अणुबॉम्बसारख्या विध्वंसक अस्त्रामुळे होणाऱ्या दुष्परिणामांमध्ये किरणोत्सर्गाचे दुष्परिणाम खूप महत्त्वाचे असतात. किरणोत्सर्गाच्या प्रभावामुळे रक्ताचा कर्करोग इतर इंद्रियांचे कर्करोग तसेच आयुष्यमान कमी होणे हे तीन महत्त्वाचे दुष्परिणाम होतात. उपरोक्त किरणोत्सर्गांपैकी क्ष-किरण व गॅमा किरण हे शरीरात खोलवर जाऊ शकतात.क्ष-किरणांच्या शरीरातून आरपार जाऊ शकणाऱ्या गुणधर्माचा वापर क्ष-किरण फोटो काढण्यासाठी करतात. हाडे, स्नायू, हवा यांच्या वेगवेगळ्या घनतेमुळे कमी अधिक प्रमाणात क्ष-किरण त्यातून आरपार जाऊ शकतात व क्ष-किरण प्लेटवर पडतात. याचे दृश्य स्वरूप म्हणजे क्ष-किरण फोटो होय. किरणोत्सर्गी आयोडीनचा वापर थायरॉईड ग्रंथीचे कार्य व्यवस्थित चालू आहे वा नाही हे बघण्यासाठी होतो.गॅमा किरणांमुळे शरीरातील पेशी मरतात. या गुणधर्माचा वापर किरणोपचारात केला जातो. एका यंत्राच्या सहाय्याने किरणोत्सर्गी कोबाल्ट धातूपासून निघणारे किरण विशेष नियंत्रणाखाली कर्करोग झालेल्या इंद्रियावर सोडले जातात. हा उपचार गरजेनुसार अनेक वेळा केला जातो. किरणोत्सर्गामुळे कर्करोगाच्या पेशी मरतात. सामान्यत: शस्त्रक्रियेने अथवा औषधी चिकित्सेने कर्करोग बरा होण्यासारखा नसल्यास किरणोपचाराचा वापर करतात. अशा प्रकारे किरणोपचाराने हजारो कर्करोगग्रस्त रुग्णांचे आयुष्य वाढवता येते.डॉ. अंजली दिक्षित व डॉ. जगन्नाथ दिक्षित यांच्या पुस्तकातुन*संकलन*••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• 🌹 *" फ्रेश सुविचार "* 🌹••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••तुमचे ध्येय सतत तुमच्या नजरेसमोर ठेवणे, हेच ध्येय सफलतेचे रहस्य आहे.*संकलन :- प्रमिलाताई सेनकुडे, नांदेड**प्रा.शा. गोजेगाव ता.हदगाव, जि. नांदेड*📱9403046894••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• ❓ *आजची प्रश्नमंजुषा* ❓••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••१) 'बटाट्याची चाळ' हे विनोदी पुस्तक कुणी लिहिले ?२) LCD चे Full Form काय आहे ?३) अंजिठा येथे एकूण किती लेण्या आहेत ?४) जगातील सर्वात मोठा असणारा अर्था पृथ्वीगोल अमेरिकेतील कोणत्या ठिकाणी आहे ?५) मेलेल्या प्राण्यांचे मांस खाणारे प्राणी कोणते ?*उत्तरे :-* १) पु. ल. देशपांडे २) Liquid Crystal Display ३) २९ लेण्या ४) यारमथ ५) गिधाडे, कोल्हे*संकलन :- जैपाल भै. ठाकूर*जि.प.व.प्राथ.शाळा भोसा, ता. आमगाव, जि. गोंदिया 📱9765943144••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎂 *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *◆|वा|ढ|दि|व|स|अ|भि|ष्ठ|चिं|त|न|◆* 👤 राजेश्वर डोमशेर, पदोन्नत मुख्याध्यापक, कोलंबी👤 श्रीकांत जोशी, सहशिक्षक, धर्माबाद👤 बंडोपंत लोखंडे, पदवीधर शिक्षक, नांदेड👤 बालाजी हिवराळे, पत्रकार, बिलोली👤 विठ्ठल हिमगिरे, सहशिक्षक, धर्माबाद👤 गंगाधर बीजेवार, सेवानिवृत्त शिक्षक, नांदेड👤 शंकर हांड्रे, सहशिक्षक, बिलोली👤 संतोष ईबीतवार, येवती👤 पांडुरंग चंदेवाड, येवती👤 शुभम बतुलवार, धर्माबाद👤 उत्तम पाटील चोळाखेकर👤 राजू कदम👤 वसंत सिरसाट👤 नवाज शेख👤 सचिन खांडगावे👤 वसंत बोनगिरे👤 एस के सागर👤 विष्णूराज कदम, पांगरी👤 विजयकुमार पाटील घुलेकर*ઉदंड_आયુષ્યાच्या अનંત_શુभेच्छा,* [ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा एक दिवस अगोदर 9423625769 येथे पोस्ट करावे. ]••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• ••• 💡 ‼ *मनाचे श्लोक*‼ 💡•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••भवाच्या भये काय भीतोस लंडी। धरीं रे मना धीर धाकासि सांडी॥ रघूनायकासारिखा स्वामि शीरीं। नुपेक्षी कदा कोपल्या दंडधारी ॥२७॥।। जय जय रघुवीर समर्थ ।।••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🕊🌎 ‼ *विचारधारा*‼🕊🌎••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••असे अनेकजण म्हणतात की,झोपलेल्या माणसाला उठवता येते पण,झोपेचे सोंग घेऊन झोपला असेल तर त्याला कधीच उठवता येत नाही. म्हणजेच ते, झोपेचे सोंग सुध्दा कदाचित भयानक असू शकते. म्हणून त्या झोपलेल्यांपासून जरा आपणही स्वत: थोडे सावध रहावे.🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷सौ.संगीता संतोष ठलाल मु. कुरखेडा जि. गडचिरोली••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎭 *आजची फ्रेश बोधकथा* 🎭••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *संधीचा फायदा*एकदा, एका मंदिराच्या पुजार्याच्या गावात पूर येतो. लोक गाव सोडून जायला सुरुवात करतात. जेव्हा ते पुजार्याला आपल्याबरोबर यायला सांगतात, तेव्हा तो नाकारतो. तो त्यांना सांगतो, की त्याचा देवावर विश्वास आहे आणि देव त्याच नक्की रक्षण करेल. पाणी वाढतं आणि अख्खा गाव त्यात वाहून जातो. एक पट्टीचा पोहोणारा माणूस पुजार्याच्या घरा जवळून पोहत जात असतो. तो पुजार्याला पाठीवरून वाहून न्यायची तयारी दाखवतो; पण पुजारी ते नाकारतो. थोड्या वेळाने एक होडी येते; पण तो त्यातही बसत नाही. शेवटी एक हेलिकॉप्टर येत आणि पुजार्याकडे शिडी टाकतात, पण तो तेही नाकारतो. शेवटी पुराचं पाणी वाढतं आणि त्याचं घर बुडतं व तो मरतो. तो पुण्यवान गृहस्थ असल्यामुळे सरळ स्वर्गात जातो. देव भेटल्या भेटल्या तो त्यांचाकडे तक्रार करतो, की त्याचा एवढा भक्त असूनही त्याने त्याला वाचवलं नाही. तेव्हा देव हसून म्हणाला, मी तुझ्याकडे एक माणूस, एक होडी आणि एक हेलिकॉप्टर पाठवलं होतं. तू दिलेल्या संधीचा फायदा घेतला नाहीस. पुजार्याने आपल्या हट्टीपणामुळे सर्व संधी गमावल्या होत्या. तात्पर्य : आयुष्यात अशा असंख्य संधी येऊन जात असतात, पण ती संधी ओळखून त्याचा योग्य तो फायदा घेतला पाहिजे.•••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••या पोस्ट विषयी आपल्या सूचना, निवेदन, अभिप्राय, बातम्या, वाढदिवस, माहिती किंवा शंका 9423625769 येथे कळवावे. •••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••~~~~~~~~~~~~~~~~~~~*🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢*📱 9423625769~~~~~~~~~~~~~~~~~~~*🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏*पुन्हा भेटू या फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार ~~~~~~~~~~~~~~~~~~~
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment