✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट~~~~~~~~~~~~~~~~~~~ 6️⃣ 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 6️⃣ ( फ्रेश शालेय परिपाठ )🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00 ( रविवार आणि सुट्टी वगळून )~~~~~~~~~~~~~~~~~~~🎇 दिनांक :- 14 जुलै 2023💠 वार - शुक्रवार••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🌷🌐 . *दिनविशेष . 🌐* 🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *_ या वर्षातील १९५ वा दिवस आहे_* •••••••••••••••••••••••••••••••• *_महत्त्वाच्या घटना:_* •••••••••••••••••••••••••••••• *२०१३:डाक व तार विभागाची १६० वर्षांपासुन सुरू असलेली तार (Telegram) सेवा बंद झाली.**१९७६:कॅनडात मृत्यूदंडाच्या शिक्षेवर बंदी घालण्यात आली.**१९६०:चिंपांझींचा अभ्यास करण्यासाठी जेन गुडॉल या टांझानियातील अभयारण्यात दाखल झाल्या. पुढील ४५ वर्षे त्यांनी चिंपांझींमधील कौटुंबिक व सामाजिक संबंध समजून घेण्यासाठी संशोधन केले.**१८६७:आल्फ्रेड नोबेल यांनी ’डायनामाईट’ या स्फोटकाचे यशस्वी परीक्षण केले.**१७९०:फ्रेन्च राज्यक्रांती – पॅरिसमध्ये नागरिकांनी फ्रेंच राज्यसत्तेचे व दडपशाहीचे चिन्ह असलेल्या बॅस्टिल तुरुंगावर हल्ला केला व आतील सात बंद्यांची मुक्तता केली. या घटनेने फ्रेन्च राज्यक्रांतीची मुहूर्तमेढ रोवली गेली.* *_जन्मदिवस / जयंती / वाढदिवस:_* •••••••••••••••••••••••••••••••••*१९७५:जयश्री राजगोंडा पाटील -- लेखिका, कवयित्री**१९७५: प्रा.रुपाली अवचरे -- प्रत्रकार, लेखिका,संपादक* *१९६८:डॉ.विजयकुमार स.माने-- कवी* *१९६७:हशन तिलकरत्ने – श्रीलंकेचा क्रिकेटपटू व राजकारणी**१९६४:अतुल सदाशिव पेठे-- मराठी नाट्यलेखक,नाट्यअभिनेते,नाट्यप्रशिक्षक, आरोग्यसंवादक व नाट्यदिग्दर्शक**१९५६: रोहिणी अशोक गंधेवार -- कवयित्री**१९५५:अरुण फडके-- प्रसिद्ध मराठी व्याकरणतज्ज्ञ(मृत्यू:१४ मे २०२०)**१९५४:प्रा.डॉ.भगवान लक्ष्मणराव अंजनीकर-- सुप्रसिद्ध साहित्यिक,विविध साहित्य पुरस्काराने सन्मानित* *१९५१:मिलिंद सखाराम मालशे--समीक्षक, भाषावैज्ञानिक**१९४७:नवीन रामगुलाम – मॉरिशसचे ३ रे व ६ वे पंतप्रधान**१९४३:जयराम विठ्ठल पवार(ज.वि.)-- मराठी साहित्यिक,आंबेडकरी चळवळीचे अभ्यासक, भाष्यकार व विचारवंत* *१९२९:कैलाश चंद्र जोशी-- मध्य प्रदेशचे माजी मुख्यमंत्री(मृत्यू:२४ नोव्हेंबर २०१९)**१९२०:शंकरराव चव्हाण – केंद्रीय अर्थमंत्री, गृहमंत्री आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री (मृत्यू: २६ फेब्रुवारी २००४)**१९१७:रोशनलाल नागरथ ऊर्फ ‘रोशन‘ – संगीतकार (मृत्यू: १६ नोव्हेंबर १९६७)**१८९९: श्रीकृष्ण लक्ष्मण(भैयाजी)पांढरीपांडे -- थोर शिक्षणतज्ज्ञ, विचारवंत, लेखक (मृत्यू:८ एप्रिल १९९७)* *१८८४:यशवंत खुशाल देशपांडे – महानुभाव वाङमयाचे नामवंत संशोधक, १९३९ मधे झुरिच येथे झालेल्या जागतिक इतिहास परिषदेतील भारताचे प्रतिनिधीत्व (मृत्यू: २० नोव्हेंबर १९७०)**१८५६:गोपाळ गणेश आगरकर – लोकमान्य टिळकांचे सहकारी व ’केसरी’चे पहिले संपादक, समाजसुधारक, विचारवंत व शिक्षणतज्ञ(मृत्यू: १७ जून १८९५)* *_मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन:_* •••••••••••••••••••••••••••••••••*२००८:यशवंत विष्णू चंद्रचूड – सर्वोच्च न्यायालयाचे १६ वे सरन्यायाधीश (जन्म: १२ जुलै १९२०)**२००३:प्रो.राजेंद्र सिंग ऊर्फ ’रज्जू भैय्या’ – राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे ४ थे सरसंघचालक (जन्म: २९ जानेवारी १९२२)**२००३:लीला चिटणीस – अभिनेत्री (जन्म: ९ सप्टेंबर १९०९)**१९९३:श्रीमंत विजयमाला राणीसाहेब – करवीर संस्थानच्या महाराणी, खासदार* *१९७५:मदनमोहन – संगीतकार (जन्म: २५ जून १९२४)**१९६३:स्वामी शिवानंद सरस्वती – योगी व आध्यात्मिक गुरू (जन्म:८ सप्टेंबर १८८७)* ~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~ *_दिनविशेष या सदरातील सर्व मुद्दे हे संग्रहात्मक आहेत तेव्हा त्यात चूका नसतीलच असे सांगता येणार नाही_* *✍ संकलन ✍* *श्रीराम चव्हाण माजी शिक्षणाधिकारी नागपूर*मोबाईल:9822695372 ईमेल: chavhansk65@gmail.com••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *✈ 🚀 गुगलयान ✈ 🚀*••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *कथा - नवऱ्याचे मी पण*कुटुंबातील नात्यात असलेला घालमेल, प्रेम, जिव्हाळा आणि तिरस्कार यावर आधारित फेसबुकवर अनेक वाचकांना पसंत पडलेली ही कथा आहे. मला आशा आहे आपणांस ही कथा नक्की आवडेल. तेव्हा चला कथा वाचू या .....!एकोणिसावा शेवटचा भाग -------https://www.facebook.com/groups/aamhi.saahityik/permalink/7309356719080680/?mibextid=Nif5ozकथा आवडल्यास आपल्या प्रतिक्रिया अवश्य कळवा.~~~~~~~~~~~~~~~~~~~✍ स्तंभलेखक *नासा येवतीकर, धर्माबाद*9423625769~~~~~~~~~~~~~~~~~~~ 🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••1⃣ *जर शिक्षकांनी योग्य पद्धतीने काम नाही केलं तर त्यांच्यावर कठोर कारवाई करण्यात येणार असल्याचं वक्तव्य शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनी केलं आहे.*•••••••••••••••••••••••••••••••••••••2⃣ *पंतप्रधान नरेंद्र मोदींचे पॅरिसमध्ये जल्लोषात स्वागत, फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन यांची घेणार भेट*•••••••••••••••••••••••••••••••••••••3⃣ *नवाब मलिकांचा जामीन अर्ज हायकोर्टाने फेटाळला, ईडीच्या तीव्र विरोधानंतर मनी लाँड्रिगंच्या प्रकरणात वैद्यकीय जामीन नाकारला*•••••••••••••••••••••••••••••••••••••4⃣ *दिल्लीत तब्बल 45 वर्षांनंतर यमुनेच्या पाण्याची पातळी 208 मीटरच्याही पुढे; पूरस्थिती पाहता सरकार सतर्क*•••••••••••••••••••••••••••••••••••••5⃣ *धनगर आरक्षणाचा मुद्दा पुन्हा लांबणीवर, 'धनगड' हेच 'धनगर' असल्याच्या मुद्यावर पुरावे सादर करा; हायकोर्टाचे निर्देश*•••••••••••••••••••••••••••••••••••••6⃣ *युवा धावपटू ज्योती याराजी हिची सुवर्ण कामगिरी, अवघ्या 13.09 सेकंदात पार केले 100 मीटर अंतर*•••••••••••••••••••••••••••••••••••••7⃣ *रोहित शर्मा आणि यशस्वी जायस्वाल यांनी बिनबाद 146 धावांची भागिदारी केली आहे. भारतीय संघ अद्याप 4 धावांनी पिछाडीवर आहे.*•••••••••••••••••••••••••••••••••••••*📷 वृत्त संकलक - कुणाल पवारे 📹*📱9960358300•••••••••••••••••••••••••••••••••••••ही पोस्ट नियमित मिळविण्यासाठी आणि या समुहात add होण्यासाठी 9423625769 येथे संपर्क करावे.••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• 🌷🍃 *विशेष माहिती* 🌷🍃••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••📙 *इसीजी म्हणजे काय ?* 📙 **************************ईसीजी म्हणजे इलेक्ट्रोकार्डिओग्राम, याला आपण 'हृदयस्पंदनालेख' असेही म्हणू शकू. आजकाल एखाद्या व्यक्तीला अचानक चक्कर आली, डोळ्यासमोर अंधारी आली वा छातीत धडधडले, तर इसीजी काढून घेण्याचा सल्ला दिला जातो. चाळीशी ओलांडल्यानंतर दर दोन वर्षांनी इसीजी काढून घेणे श्रेयस्कर, असेही म्हणतात. इसीजी काढण्याच्या या वाढत्या प्रमाणामुळे, हृदयाबद्दलच्या जिज्ञासेमुळे, हृदयविकाराच्या भीतीमुळे आपल्याला इसीजी म्हणजे नेमके काय प्रकरण आहे, हे जाणून घेण्याची जिज्ञासा असेल. इसीजी म्हणजे काय हे आता पाहू. हृदयाच्या स्नायूंच्या आकुंचन प्रसारणात विद्युतलाटा व विद्युत प्रवाह तयार होतात. याची नोंद शरीराच्या विविध भागांवर (छाती, पाय इ.) संवेदनशील असे इलेक्ट्रोड ठेवून करता येते. कारण हे विद्युतप्रवाह हृदयापासून सर्व ठिकाणी पसरवले जातात. या विद्युतप्रवाहाच्या शक्तीनुसार एका यांत्रिक उपकरणांच्या सहाय्याने हृदयाच्या स्पंदनाचा आलेख काढता येतो. इसीजी हे डॉक्टरांसाठी वरदानच ठरले आहे. सर्वसामान्यपणे व्यक्तीच्या हृदयस्पंदनालेखात P,Q,R,S व T या विद्युतलाटा (Waves) असतात. त्यांचे निरोगी लोकांसाठीचे आकार (उंची, रुंदी इ.) तसेच एकमेकांतील (त्या लाटांचे) अंतर ठरलेले असते. हृदयाच्या वेगवेगळ्या विकारांवरून या आलेखात बदल घडून येतात व त्यावरून रोगाचे निदान करता येते. हृदयाचा आकार, हृदयाची गती, जास्तीचे ठोके वा न पडणारे ठोके, हृदयातील जवनिका, कर्णिका या कप्प्यांमधील सुसंवाद, हृदयाच्या स्नायूंचा रक्तपुरवठा इत्यादी अनेक गोष्टींची माहिती यामुळे मिळू शकते. हृदयविकाराचा झटका येण्यापूर्वी काही बदल इसीजीमध्ये सापडू शकतात. अशा व्यक्तींनी वेळीच आहार, विहार यावर नियंत्रण ठेवले; तर पुढील अनर्थ टाळता येऊ शकेल. यावरून इसीजीचे महत्त्व आपल्या लक्षात येईल. इसीजी काढण्यासाठी येणारा खर्च लक्षात घेता तो काढण्यापूर्वी खरेच तो काढण्याची गरज आहे काय, याचा साधकबाधक विचार तज्ज्ञांच्या सल्ल्याने करणे श्रेयस्कर ठरते.*डॉ. जगन्नाथ दीक्षित**डाॅ. अंजली दीक्षित*यांच्या 'मेडिकल जनरल नॉलेज' या पुस्तकातूनमनोविकास प्रकाशन*संकलन*••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• 🌹 *" फ्रेश सुविचार "* 🌹••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••आनंदी वृत्ती आणि समाधान ही फार मोठी सौंदर्यवर्धक साधने आहेत.*संकलन :- प्रमिलाताई सेनकुडे, नांदेड**प्रा.शा. गोजेगाव ता.हदगाव, जि. नांदेड*📱9403046894••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• ❓ *आजची प्रश्नमंजुषा* ❓••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••१) *'जगाचा पोशिंदा'* असे कोणाला म्हटले जाते ?२) संविधान सभेची शेवटची बैठक कधी पार पडली ?३) चंद्रावर अंतराळयान उतरविणारा भारत हा जगातील कितवा देश ठरणार आहे ?४) फेकरी हा औष्णिक विद्युत प्रकल्प कोणत्या जिल्हयात आहे ?५) सर्वात लहान विषम संख्या कोणती ?*उत्तरे :-* १) शेतकरी /बळीराजा २) २४ जानेवारी १९५० ३) चौथा ४) जळगाव ५) एक*संकलन :- जैपाल भै. ठाकूर*जि.प.व.प्राथ.शाळा भोसा, ता. आमगाव, जि. गोंदिया 📱9765943144••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎂 *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *◆|वा|ढ|दि|व|स|अ|भि|ष्ठ|चिं|त|न|◆* 👤 मिलिंद व्यवहारे, जि. प. नांदेड👤 भागवान अंजनीकर, साहित्यिक, नांदेड👤 धनंजय गुम्मलवार, जि. प. नांदेड👤 नंदकिशोर मोरे👤 नागेश स्वामी👤 डॉ. अमान खान, धर्माबाद👤 नितीन काळे👤 इरवंत जामनोर👤 शंकर कंदेवाड, येवती👤 आकाश यडपलवार, जारीकोट👤 चंद्रकांत वाडगे👤 दीपक बोरगावे*ઉदंड_आયુષ્યાच्या अનંત_શુभेच्छा,* [ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा एक दिवस अगोदर 9423625769 येथे पोस्ट करावे. ]••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• ••• 💡 ‼ *मनाचे श्लोक*‼ 💡•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••देहेरक्षणाकारणें यत्न केला। परी शेवटीं काळ घेउन गेला॥ करीं रे मना भक्ति या राघवाची। पुढें अंतरीं सोडिं चिंता भवाची॥२६॥।। जय जय रघुवीर समर्थ ।।••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🕊🌎 ‼ *विचारधारा*‼🕊🌎••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••मोठे लोक मोठ्या लोकांचे वैरी असतात असं कदाचित कुठेतरी ऐकण्यात आले असेल. पण,त्यात एक गोष्ट मात्र खरी आहे ती म्हणजेच योग्यता बघूनही नाते जोडले जातात व साथ दिल्या जाते.पण,कधी, कधी असं होतं की वेळ, प्रसंगी कोणी,कोणाचे होतांना दिसत नाही म्हणून कोणालाही तुच्छ लेखू नये. कारण ऐनवेळी जेव्हा परिस्थिती आपले रूप धारण करते त्यावेळी तिच्याजवळ लहान ,मोठा कोणीही नसते तर..ती सर्वाना एकाच तुतारीने हानत असते.🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷सौ.संगीता संतोष ठलाल मु. कुरखेडा जि. गडचिरोली••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎭 *आजची फ्रेश बोधकथा* 🎭••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *प्रेमळ बोल*एका शेतकऱ्याने एकदा आपल्या कोंबड्याला हाका मारायला सुरुवात केली असता तो कोंबडा पळून जाऊ लागला. त्याच शेतकऱ्याने पिंजऱ्यात एक ससाणा पाळला होता. तो त्या कोंबड्याला म्हणाला, 'अरे वेड्या, मालक एवढ्या प्रेमाने तुला हाका मारत आहे, आणि तू असा पळून का जातोस? एवढ्या प्रेमाने जर त्याने मला हाक मारल्या असत्या, तर मी मोठ्या आनंदाने त्याच्याकडे गेलो असतो.' यावर तो कोंबडा म्हणाला, 'अरे ससाण्या, आजवर माझ्या अनेक नातेवाइकांना या मालकाने अशाच प्रेमाने जवळ बोलावून, त्यांच्या माना कापताना मी पाहिले आहे. त्याची प्रेमळ हाक ऐकताच मी त्याच्यापासून पळून जाण्याचा प्रयत्न करीत आहे. तुझी गोष्ट अगदी निराळी आहे. त्याच्या दृष्टीने तुझे मांस रुचकर नसल्याने, तुला त्याच्याकडून कापले जाण्याचे भय नाही.' तात्पर्य : प्रेमळ बोलणाऱ्यांच्या मनात प्रेम असतेच असे नाही.•••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••या पोस्ट विषयी आपल्या सूचना, निवेदन, अभिप्राय, बातम्या, वाढदिवस, माहिती किंवा शंका 9423625769 येथे कळवावे. •••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••~~~~~~~~~~~~~~~~~~~*🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢*📱 9423625769~~~~~~~~~~~~~~~~~~~*🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏*पुन्हा भेटू या फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार ~~~~~~~~~~~~~~~~~~~
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment