✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट~~~~~~~~~~~~~~~~~~~ 6️⃣ 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 6️⃣ ( फ्रेश शालेय परिपाठ )🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00 ( रविवार आणि सुट्टी वगळून )~~~~~~~~~~~~~~~~~~~🎇 दिनांक :- 11 जुलै 2023💠 वार - मंगळवार••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🌷🌐 . *दिनविशेष . 🌐* 🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *_ या वर्षातील १९२ वा दिवस आहे_* •••••••••••••••••••••••••••••••• *_झपाट्याने वाढणार्या लोकसंख्येमुळे अन्न, वस्त्र, निवारा, दारिद्र्य, बेकारी, रोगराई असे अनेक प्रश्न निर्माण होणार आहेत. अशा प्रश्नांकडे लोकांचे लक्ष वेधण्यासाठी हा दिवस ’जागतिक लोकसंख्या दिन’ (World Population Day) म्हणून साजरा केला जातो._**_महत्त्वाच्या घटना:_* ••••••••••••••••••••••••••••••••• *२००६:मुंबईत उपनगरी गाड्यांमध्ये झालेल्या स्फोटांत २०९ लोक ठार तर ७१४ लोक जखमी झाले.**२००१:आगरताळा ते ढाका या शहरांदरम्यान बससेवा सु,रू झाली.**१९९४:दिल्लीच्या पोलिस महानिरीक्षक (तुरुंग) किरण बेदी यांना ’रॅमन मॅगसेसे पुरस्कार’ जाहीर**१९७९:अमेरिकेची 'स्कायलॅब' ही अंतराळातील प्रयोगशाळा रात्री दहाच्या सुमारास हिंदी महासागरात कोसळली.**१९७१:चिलितील तांब्याच्या खाणींचे राष्ट्रीयीकरण करण्यात आले.**१९५०:पाकिस्तान आंतरराष्ट्रीय नाणेनिधिचा (IMF) सदस्य बनला.**१९३०:ऑस्ट्रेलियाचे सर डोनाल्ड ब्रॅडमन यांनी इंग्लंडविरुद्धच्या कसोटी सामन्यात एकाच दिवसात विक्रमी नाबाद ३०९ धावा केल्या.**१९०८:लोकमान्य टिळकांना मंडालेची ६ वर्षाची शिक्षा झाली.**१८०१:फ्रेन्च खगोलविद जॉन लुई पॉन याने ’पॉन’ धूमकेतूचा शोध लावला.* *_जन्मदिवस / जयंती / वाढदिवस:_* •••••••••••••••••••••••••••••••••*१९८३:विकास वसंतराव गुजर-- लेखक* *१९६९:प्रणव हळबे -- कवी* *१९६५:अनुपमा अजय मुंजे -- कवयित्री* *१९५९:डॉ.अचला दि.तांबोळी -- कवयित्री लेखिका* *१९५५:प्रा.सुहास बारटक्के-- लेखक,पत्रकार* *१९५३:सुरेश प्रभू – माजी केंद्रीय मंत्री.**१९५०:सुप्रिया अनंत अय्यर -- कादंबरीकार, कथाकार**१९४७:शरद उर्फ गोविंद गणेश अत्रे -- कवी* *१९२१: शंकरराव रामचंद्र खरात – प्रसिद्ध मराठी लेखक,कादंबरीकार व इतिहासकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे कुलगुरू (मृत्यू: ९ एप्रिल २००१)**१८९१:परशुराम कृष्णा गोडे – प्राच्यविद्या संशोधक. त्यांनी ४०० विषयांवर संशोधन करुन लिहीलेले निबंध ८ खंडात प्रसिद्ध झाले आहेत. (मृत्यू: २८ मे १९६१)**१८८९:नारायण हरी आपटे – प्रसिद्ध कादंबरीकार, चित्रपट कथालेखक.(मृत्यू: १४ नोव्हेंबर १९७१)**१८८७:शंकरराव रामचंद्र कानिटकर-- लेखक,प्राध्यापक आणि समाजसेवक(२५ जानेवारी १९६४)* *_मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन:_* •••••••••••••••••••••••••••••••••*२०२१:मधुसूदन नानिवडेकर--प्रसिद्ध गझलकार व पत्रकार(जन्म: १८ मे १९६०)**२००९:शांताराम नांदगावकर –मराठी गीतकार,कवी त्यांनी अनेक भावगीते आणि काही मराठी चित्रपटांसाठी गाणी लिहिली. (जन्म:१९ आक्टोबर १९३६)**२००३:सुहास शिरवळकर – कादंबरीकार आणि रहस्यकथालेखक(जन्म:१५ नोव्हेंबर १९४८)**१९९४:रामा राघोबा राणे--- भारतीय लष्करातील एक परमवीर चक्र प्राप्त अधिकारी(जन्म:२६ जून, १९१८)* *१९८९:सर लॉरेन्स ऑलिव्हिये – ब्रिटिश अभिनेता, दिग्दर्शक व निर्माता (जन्म: २२ मे १९०७)*~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~ *_दिनविशेष या सदरातील सर्व मुद्दे हे संग्रहात्मक आहेत तेव्हा त्यात चूका नसतीलच असे सांगता येणार नाही_* *✍ संकलन ✍* *श्रीराम चव्हाण माजी शिक्षणाधिकारी नागपूर*मोबाईल:9822695372 ईमेल: chavhansk65@gmail.com••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *✈ 🚀 गुगलयान ✈ 🚀*••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *कथा - नवऱ्याचे मी पण*कुटुंबातील नात्यात असलेला घालमेल, प्रेम, जिव्हाळा आणि तिरस्कार यावर आधारित फेसबुकवर अनेक वाचकांना पसंत पडलेली ही कथा आहे. मला आशा आहे आपणांस ही कथा नक्की आवडेल. तेव्हा चला कथा वाचू या .....!सोळावा भाग -------https://www.facebook.com/groups/aamhi.saahityik/permalink/7302400636442955/?mibextid=Nif5ozकथा आवडल्यास आपल्या प्रतिक्रिया अवश्य कळवा.~~~~~~~~~~~~~~~~~~~✍ स्तंभलेखक *नासा येवतीकर, धर्माबाद*9423625769~~~~~~~~~~~~~~~~~~~ 🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••1⃣ *यंदाचा लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्कार पंतप्रधान नरेंद्र मोदींना जाहीर ; 1 ऑगस्टला मोदी पुणे दौऱ्यावर*•••••••••••••••••••••••••••••••••••••2⃣ *राज्याचा शालेय शिक्षण दर्जा घसरला? केंद्रीय शिक्षण मंत्रालयाकडून 'परफॉर्मन्स ग्रेडिंग इंडेक्स 2.0' जारी*•••••••••••••••••••••••••••••••••••••3⃣ *रिपाई आठवले गट आणि वंचित बहुजन आघाडी एकत्र येणार? रामदास आठवले यांचे महत्त्वाचं वक्तव्य*•••••••••••••••••••••••••••••••••••••4⃣ *राज्यपाल नियुक्त 12 आमदारांच्या स्थगितीवर मंगळवारी सुनावणी, स्थगिती उठणार की कायम राहणार याकडे लक्ष*•••••••••••••••••••••••••••••••••••••5⃣ *दिल्ली-एनसीआरसह देशातील अनेक शहरांमध्ये मुसळधार पावसामुळे शाळा बंद; जिल्ह्यांत रेड अलर्ट जारी*•••••••••••••••••••••••••••••••••••••6⃣ *मध्य भारतातील व्याघ्र प्रकल्प शिकाऱ्यांच्या निशाण्यावर; प्रशासनाकडून रेड अलर्टचा इशारा*•••••••••••••••••••••••••••••••••••••7⃣ *मिशन वेस्ट इंडिज ! 12 जुलैपासून कॅरेबिअनसोबत भिडणार रोहित अँड कंपनी*•••••••••••••••••••••••••••••••••••••*📷 वृत्त संकलक - कुणाल पवारे 📹*📱9960358300•••••••••••••••••••••••••••••••••••••ही पोस्ट नियमित मिळविण्यासाठी आणि या समुहात add होण्यासाठी 9423625769 येथे संपर्क करावे.••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• 🌷🍃 *विशेष माहिती* 🌷🍃••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *भारताची लोकसंख्या*एप्रिल 2023 मध्ये भारताने चीनला मागे टाकत लोकसंख्येत पहिल्या स्थानी उडी मारलीय.2023 च्या मध्यापर्यंत भारताची लोकसंख्या 142 कोटी 86 लाखांवर जाईल. तर चीनची लोकसंख्या ही 142 कोटी 57 लाख असू शकते.2011 नंतर भारतात जनगणना झालेली नाही. त्यामुळे भारताची लोकसंख्या नेमकी किती आहे, याबाबत ठोस माहिती उपलब्ध नाही.पण 2020 मध्ये नॅशनल कमिशन ऑन पॉप्युलेशनने लोकसंख्येच्या अंदाजानुसार, एक अहवाल प्रकाशित प्रसिद्ध केला होता. त्यानुसार, 2011 ते 2036 दरम्यान 25 वर्षांमध्ये भारताची लोकसंख्या वाढून 152 कोटी 20 लाखांपर्यंत जाईल, असं सांगण्यात आलं आहे.त्यामुळे भारताच्या लोकसंख्येची घनता ही 368 वरून वाढून 463 प्रति वर्ग किलोमीटर इतकी होईल.पण तज्ज्ञांच्या मते, भारतात पूर्वीपेक्षा आयुर्मान वाढलं आहे. शिवाय, जन्मदरही घटलेला आहे. त्यामुळे लोकसंख्या वाढीचा दर खाली आला आहे.*संकलन*••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• 🌹 *" फ्रेश सुविचार "* 🌹••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••ज्ञानाचे पहिले काम असत्य जाणून घेणे व दुसरे काम सत्याला जाणणे हे आहे.*संकलन :- प्रमिलाताई सेनकुडे, नांदेड**प्रा.शा. गोजेगाव ता.हदगाव, जि. नांदेड*📱9403046894••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• ❓ *आजची प्रश्नमंजुषा* ❓••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••१) भारताचा सर्वोच्च राष्ट्रीय पुरस्कार कोणता ?२) भारतातील 'अंतरिक्षनगर' म्हणून कोणते शहर ओळखले जाते ?३) 'रसायनाचा राजा' म्हणून कोणाला संबोधतात ?४) धाराशिव जिल्ह्याचे 'उस्मानाबाद' हे नाव कोणाच्या नावावरून ठेवण्यात आले होते ?५) 'युनिव्हर्सल डोनर' ( सर्वयोग्य दाता ) असे कोणत्या रक्तगटास म्हणतात ?*उत्तरे :-* १) भारतरत्न २) श्रीहरिकोटा ३) सल्फ्युरीक अँसिड ४) मीर उस्मान अली खान असफ जाह, हैदराबाद संस्थानचा सातवा निजाम ५) o रक्तगट*संकलन :- जैपाल भै. ठाकूर*जि.प.व.प्राथ.शाळा भोसा, ता. आमगाव, जि. गोंदिया 📱9765943144••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎂 *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *◆|वा|ढ|दि|व|स|अ|भि|ष्ठ|चिं|त|न|◆* 👤 श्री प्रकाश नाईक, गटविकास अधिकारी👤 प्रभाकर देशमुख, सहशिक्षक, बिलोली👤 शिवाजी सूर्यवंशी, सहशिक्षक, देगलूर👤 स्वप्नील शिंदे👤 नरेश गौतम👤 अनुपमा अजय मुंजे👤 संतोष चव्हाण, सहशिक्षक, नांदेड👤 अवधूतवार साई किरण, बोधन👤 प्रमोद मंगनाळे, सहशिक्षक, नांदेड*ઉदंड_आયુષ્યાच्या अનંત_શુभेच्छा,* [ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा एक दिवस अगोदर 9423625769 येथे पोस्ट करावे. ]••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• ••• 💡 ‼ *मनाचे श्लोक*‼ 💡•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••मना सज्जना हीत माझें करावें। रघुनायका दृढ चित्ती धरावें॥ महाराज तो स्वामि वायुसुताचा। जना उद्धरी नाथ लोकत्रयाचा ॥२२॥।। जय जय रघुवीर समर्थ ।।••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🕊🌎 ‼ *विचारधारा*‼🕊🌎••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••शंभर लोकांमध्ये जर.. आपण उपस्थित असाल..व स्वतः आपला कोणालाही परीचय न देता एका माणसाने जर...आपल्याला ओळखले असेल तर..हि सर्वात मोठी गोष्ट आहे. कारण, ते सर्व लोक आपले असतील असेही नाही त्यातील एक माणूस सुद्धा आपला मार्गदर्शक, मित्र,गुरु व प्रेरणास्थान असू शकतो. त्या माणसाचा सन्मान करावे व तिथे उपस्थित असलेल्या सर्व लोकांचाही आदर करावे.आणि त्याच क्षणी वेळ वाया न घालवता स्वतः लाही ओळखावे आपली ओळख आपल्यालाच होईल. .🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷सौ.संगीता संतोष ठलाल मु.कुरखेडा जि.गडचिरोली••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎭 *आजची फ्रेश बोधकथा* 🎭••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *चोरावर मोर*रानात बोरं आणण्यासाठी चाललेल्या एका बारा तेरा वर्षाच्या मुलाला तहान लागली, म्हणून तो वाटेत लागलेल्या विहिरीत पाणी आहे किंवा काय, हे पाहण्यासाठी त्या विहिरापाशी गेला. त्या विहिरीत तो डोकावून पाहू लागला असता, त्याला समोरुन एक उग्र व खुनशी चर्येचा चोर पाठीवर गाठोडं घेऊन, आपल्याच दिशेने येत असलेला दिसला. 'हा चोर एकतर आपल्याला मारील, किंवा पळवून नेऊन चोऱ्या करायला लावील,' असं वाटल्यावरुन तो मुलगा त्या विहिरात पाहून मुद्दाम हमसाहमशी रडू लागला. त्या रडणाऱ्या मुलाजवळ येऊन त्या चोरानं विचारलं, 'काय रे? तुला रडायला काय झालं?' तो मुलगा आपल्या रडण्यात खंड पडू न देता त्याला खोटच म्हणाला, 'मी या विहिरीत किती पाणि आहे हे पाहण्य़ासाठी वाकून पाहू लागलो असता, माझ्या गळ्यातली सोन्याची कंठी या विहिरीत पडली. आता कंठीशिवाय जर मी घरी गेलो तर आई-बाबा मला बेदम चोप देतील.' तुझी कंठी तुला काढून देतो, असं त्या मुलाला खोटचं सांगून, आणि चोरीचे पैसे व दागिने यांनी भरलेलं आपलं बोचक त्याला विहिरीबाहेर उभे राहून सांभाळायला सांगून आपण विहिरीत उडी मारावी व कंठी हाती लागताच, आपले बोचके व याची कंठी घेऊन आपण पसार व्हावं, असा बेत त्या चोरानं मनाशी केला. त्याप्रमाणे तो त्या मुलाला म्हणाला, 'बाळा ! तू हे माझं बोचक सांभाळ; मी तुला तुझी कंठी तुला विहिरीतून काढून देतो.' त्या हुशार मुलाला चोराच्या मनातलं कळून आलं, तरीही त्याने मुद्दाम त्या चोराला होकार दिला. त्याबरोबर त्या चोरानं विहिरीत उडी मारुन, विहिरीच्या तळाशी त्या कंठीचा शोध सुरु केला. ही संधी साधून तो मुलगा त्या बोचक्यासह तिथून पसार झाला. गावात जाताच त्या मुलाने ते बोचके पोलीसांकडे नेऊन दिले. पोलीसांनी घोड्यावर स्वार होऊन त्या चोराचा पाठलाग केला व त्याला पकडले. नंतर त्या मुलाच्या प्रामाणिकपणाबद्दल व चातुर्याबद्दल त्यांनी त्याला बक्षिस दिले.•••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••या पोस्ट विषयी आपल्या सूचना, निवेदन, अभिप्राय, बातम्या, वाढदिवस, माहिती किंवा शंका 9423625769 येथे कळवावे. •••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••~~~~~~~~~~~~~~~~~~~*🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢*📱 9423625769~~~~~~~~~~~~~~~~~~~*🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏*पुन्हा भेटू या फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार ~~~~~~~~~~~~~~~~~~~
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment