✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट~~~~~~~~~~~~~~~~~~~ 6️⃣ 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 6️⃣ ( फ्रेश शालेय परिपाठ )🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00 ( रविवार आणि सुट्टी वगळून )~~~~~~~~~~~~~~~~~~~🎇 दिनांक :- 20 जुलै 2023💠 वार - गुरुवार••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🌷 *जागर श्यामच्या कथांचा* 🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••शालेय मुलांसाठी संस्करक्षम मालिका भाग - चौथा पुण्यात्मा यशवंतAudio Link ........https://drive.google.com/file/d/16FnXL-lMSiaFUe9r8FAM38ItKzTUKTs4/view?usp=drivesdkअभिवाचन निर्मिती :- श्री राजेंद्र जोशी, छ. संभाजीनगरअभिवाचन :- सौ. अंजली धानोरकर, उपविभागीय अधिकारी, छ. संभाजीनगर••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🌷🌐 . *दिनविशेष . 🌐* 🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••*_आंतरराष्ट्रीय बुद्धीबळ दिन_* ••••••••••••••••••••••••••••••••••• *_ या वर्षातील २०१ वा दिवस आहे_* •••••••••••••••••••••••••••••••• *_महत्त्वाच्या घटना:_* •••••••••••••••••••••••••••••• *२०००:अभिनेते दिलीपकुमार यांना ’राजीव गांधी राष्ट्रीय सद्भावना पुरस्कार’ जाहीर**१९७६:मंगळाच्या पृष्ठभागावर प्रथमच व्हायकिंग -१ हे मानवरहित अंतराळयान उतरले.**१९७३:केनियाचे अर्थमंत्री ज्युलियस कियानो यांनी जाहीर केले की देशातील आशियाई लोकांचे उद्योग-धंदे वर्षअखेरीस सक्तीने बंद करण्यात येतील.**१९६९:अपोलो-११ या अंतराळयानातुन गेलेला नील आर्मस्ट्राँग हा चंद्रावर पाऊल ठेवलेला पहिला मानव ठरला. त्यानंतर लगेच एडविन ऑल्ड्रिन चंद्रावर उतरला.**१९६०:सिरिमावो भंडारनायके श्रीलंकेच्या पंतप्रधानपदी. भंडारनायके या अर्वाचीन जगातील प्रथम निर्वाचित स्त्री राष्ट्रप्रमुख बनल्या.**१९५२:फिनलंडची राजधानी हेलसिंकी येथे १५ व्या ऑलिम्पिक खेळांना सुरूवात झाली.**१९४९:इस्त्रायल व सीरीयाने शांतता करार केल्यामुळे १९ महिने सुरू असलेले युद्ध संपले.**१९४४:दुसरे महायुद्ध – क्लाऊस व्हॉन स्टाऊफेनबर्गने केलेल्या प्राणघातक हल्ल्यातुन अॅडॉल्फ हिटलर बचावला.**१९२६:मेथॉडिस्ट चर्चने स्त्रियांना धर्मगुरू होण्याची परवानगी दिली.**१९०८:बडोद्याचे महाराज सर सयाजीराव गायकवाड (तिसरे) यांच्या पुढाकाराने ’बँक ऑफ बडोदा’ ची स्थापना झाली.**१९०३:फोर्ड मोटर कंपनीतुन पहिली मोटारगाडी बाहेर पडली.**१८७१:ब्रिटिश कोलंबिया हा प्रांत कॅनडात विलीन झाला.**१८२८:'मुंबापूर वर्तमान’ हे मराठी वृत्तपत्र मुंबईत सुरू झाले.* *_जन्मदिवस / जयंती / वाढदिवस:_* •••••••••••••••••••••••••••••••••*१९८१:प्रा.इंद्रकला प्रीतमलाल बोपचे-- कवयित्री,लेखिका**१९८०:ग्रेसी सिंग-- भारतीय अभिनेत्री* *१९७९:रत्नकुमार निंबाजी गोरे -- कवी* *१९६७:मानसी किरण देशमुख-- कवयित्री, लेखिका* *१९५३:प्रा.श्रीरंग चोखोबा तलवारे -- लेखक**१९५२:प्रा.गणेश निवृत्ती आवटे-- कादंबरी, कथा लेखन करणारे लेखक* *१९५०:नसिरुद्दिन शाह – चित्रपट अभिनेता आणि दिग्दर्शक**१९५०:रंगनाथ गबाजी पठारे-- कथालेखक, कादंबरीकार आणि समीक्षक**१९४७:प्रा.मुरलीधर महादेव सायनेकर-- लेखक* *१९३८:कर्नल डॉ.नारायण जयरामराव देशमुख -- कादंबरी, कथा लेखन करणारे लेखक* *१९२९:राजेंद्रकुमार – हिन्दी चित्रपट अभिनेता (मृत्यू: १२ जुलै १९९९)**१९२३:विठ्ठल गोपाळ खोबरेकर-- भारत इतिहास संशोधन मंडळाचे सदस्य असलेले एक मराठी इतिहासकार(मृत्यू:२००७)**१९१९:सर एडमंड हिलरी – माउंट एव्हरेस्टवर सर्वप्रथम चढाई करणारे न्यूझीलंडचे गिर्यारोहक (मृत्यू: ११ जानेवारी २००८)**१९२१:पंडित सामताप्रसाद – बनारस घराण्याचे नामवंत तबलावादक.(मृत्यू: ३१ मे १९९४)**१९१९:सुरेंद्र शिवदास बारलिंगे--कथाकार, कादंबरीकार, तत्त्वचिंतक, ललितलेखक(मृत्यू:१९ डिसेंबर १९९७)**१८३६:सर थॉमस क्लिफोर्ड ऑलबट – ज्वरमापीचा (Clinical thermometer) शोध लावणारे इंग्लिश डॉक्टर (मृत्यू: २२ फेब्रुवारी १९२५)**१८२२:ग्रेगोर मेंडेल – जनुकांची (genes) संकल्पना मांडणारा जर्मन जीवशास्त्रज्ञ (मृत्यू: ६ जानेवारी १८८४)* *_मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन:_* •••••••••••••••••••••••••••••••••*१९९५:शंकर काशिनाथ बोडस – पंडित विष्णू दिगंबर पलुसकर यांच्या परंपरेतील गायक (जन्म: ४ डिसेंबर १९३५)**१९७३:ब्रूस ली – अमेरिकन अभिनेता आणि मार्शल आर्ट तज्ञ (जन्म: २७ नोव्हेंबर १९४०)**१९७२:गीता दत्त – अभिनेत्री आणि गायिका (जन्म: २३ नोव्हेंबर १९३०)**१९६५:बटुकेश्वर दत्त – क्रांतिकारक (जन्म: १८ नोव्हेंबर १९१०)**१९५१:अब्दूल्ला (पहिला) – जॉर्डनचा राजा (जन्म: फेब्रुवारी १८८२)**१९४३:वामन मल्हार जोशी – कादंबरीकार, साहित्य समीक्षक आणि तत्त्वचिंतक (जन्म: २१ जानेवारी १८८२)**१९३७:गुग्लिएल्मो मार्कोनी – रेडिओचे संशोधक (जन्म: २५ एप्रिल १८७४)*~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~ *_दिनविशेष या सदरातील सर्व मुद्दे हे संग्रहात्मक आहेत तेव्हा त्यात चूका नसतीलच असे सांगता येणार नाही_* *✍ संकलन ✍* *श्रीराम चव्हाण माजी शिक्षणाधिकारी नागपूर*मोबाईल:9822695372 ईमेल: chavhansk65@gmail.com••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *✈ 🚀 गुगलयान ✈ 🚀*••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *कथा - आत्मनिर्भर*स्त्री अबला नसून सबला आहे. ती स्वतःच्या बळावर आपले स्वतःचे विश्व निर्माण करू शकते. अश्याच एका महिलेची कथा ज्यास फेसबुकवर अनेक वाचकांनी पसंती दर्शविलेली आहे. मला आशा आहे आपणांस ही कथा नक्की आवडेल. तेव्हा चला कथा वाचू या .....!पाचवा भाग -------https://www.facebook.com/groups/aamhi.saahityik/permalink/7327232550626430/?mibextid=Nif5ozकथा आवडल्यास आपल्या प्रतिक्रिया अवश्य कळवा.~~~~~~~~~~~~~~~~~~~✍ स्तंभलेखक *नासा येवतीकर, धर्माबाद*9423625769~~~~~~~~~~~~~~~~~~~ 🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••1⃣ *मराठवाड्याला ‘मागासलेला’ या शब्दापासूनच मुक्ती मिळवून देण्यासाठी शासन प्रयत्न करीत असून मराठवाड्याच्या विकासाच्या वाटा खुल्या झाल्या आहेत, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे विधानसभेत म्हणाले.*•••••••••••••••••••••••••••••••••••••2⃣ *मुंबई, ठाणे, पालघर आणि रायगडमधील शाळांना गुरुवारी सुट्टी जाहीर, मुसळधार पावसामुळे मुख्यमंत्र्यांचा आदेश*•••••••••••••••••••••••••••••••••••••3⃣ *नांदेड जिल्ह्यात सर्वदूर जोरदार पावसाची हजेरी, 'एसडीआरएफचे' जवान तळ ठोकून*•••••••••••••••••••••••••••••••••••••4⃣ *नाशिकच्या भाजप शहराध्यक्षपदी प्रशांत जाधव, प्रदेशाध्यक्ष बावनकुळेंकडून नवी टीम जाहीर*•••••••••••••••••••••••••••••••••••••5⃣ *आशिया चषक स्पर्धेचं वेळापत्रक जाहीर ; भारत-पाकिस्तान 02 सप्टेंबर रोजी येणार समोरासमोर*•••••••••••••••••••••••••••••••••••••6⃣ *टाटा मेमोरियल हॉस्पिटलच्या 11 कर्मचाऱ्यांना अटक, रुग्णांना चाचणीसाठी खासगी डायग्नोसिस सेंटरमध्ये पाठवल्याचा आरोप*•••••••••••••••••••••••••••••••••••••7⃣ *Asia Cup 2023 : भारता ए संघाचा पाकिस्तान ए संघावर 8 विकेटने विजय; हंगरगेकरचा भेदक मारा, साई सुदर्शनचे दमदार शतक*•••••••••••••••••••••••••••••••••••••*📷 वृत्त संकलक - कुणाल पवारे 📹*📱9960358300•••••••••••••••••••••••••••••••••••••ही पोस्ट नियमित मिळविण्यासाठी आणि या समुहात add होण्यासाठी 9423625769 येथे संपर्क करावे.••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• 🌷🍃 *विशेष माहिती* 🌷🍃••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••📕 *केस का गळतात ?* 📕केस निरोगी, चमकदार, दाट असण्यासाठी त्यांचे पोषण होणे आवश्यक असते. हे पोषण आहारातील स्निग्धांश, प्रथिने यांद्वारे होत असते. प्रथिनांचा उपयोग केसातील केरॅटीन, मेलॅनिन या प्रथिनांची झालेली झीज भरून काढण्यासाठी होतो. जीवनसत्त्व अ, इ, प्रथिने, स्निग्धांश यांमुळे तेथील त्वचेचे पोषण होऊन मुळे मजबूत राहण्यास मदत होते.तसे दररोजच आपले केस थोड्या प्रमाणात गळत असतात. ते नैसर्गिक असते; परंतु समतोल आहार न घेतल्यास, त्वचेचे काही आजार झाल्यास, केसात कोंडा झाल्यास, विंचरताना ओढाताण झाल्यास केस गळतात. वर सांगितल्याप्रमाणे आजारानंतर केस गळण्याचे कारण पोषण न होणे हे असते. आजारात आहार योग्य प्रकारे घेतला जात नाही. त्यासोबतच आजाराच्या प्रतिकारासाठी शरीरातील पोषक घटक वापरले जाऊन त्यांची कमतरता निर्माण होऊन केसांचे पोषणही खालावते व त्यांची मुळे सैल होऊन ते गळावयास लागतात. लहान मुलांमध्ये प्रथिनांच्या कमतरतेमुळे होणाऱ्या क्वाशिओस्कार या आजारात केस भुरकट होतात आणि थोडे ओढले तरी पटकन उपटले जातात.डॉ. अंजली दिक्षित व डॉ. जगन्नाथ दिक्षित यांच्या पुस्तकातुन*संकलन*••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• 🌹 *" फ्रेश सुविचार "* 🌹••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••अपयशाच्या कठीण खडकाखालीच यशाच्या पाण्याचा झरा असतो.*संकलन :- प्रमिलाताई सेनकुडे, नांदेड**प्रा.शा. गोजेगाव ता.हदगाव, जि. नांदेड*📱9403046894••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• ❓ *आजची प्रश्नमंजुषा* ❓••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••१) सर्वाधिक लोकप्रिय *इमोजी* कोणता ?२) इमोजी पेडियाचे संस्थापक कोण आहेत ?३) 'इमोजी' या शब्दाचा अर्थ काय आहे ?४) 'इमोजी' शब्दाचे मूळ कोणत्या भाषेत आहे ?५) ऑक्सफर्ड डिक्शनरीत इमोजीचा अर्थ काय आहे ?*उत्तरे :-* १) डोळ्यांतून अश्रू काढत हसणारा चेहरा २) जेरेमी बर्ज ३) चित्र वर्ण अक्षर ४) जपानी ५) इलेक्ट्रॉनिक संवादात वापरण्यात येणारे, भावना दर्शविणारे छोटे डिजिटल चित्र*संकलन :- जैपाल भै. ठाकूर*जि.प.व.प्राथ.शाळा भोसा, ता. आमगाव, जि. गोंदिया 📱9765943144••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎂 *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *◆|वा|ढ|दि|व|स|अ|भि|ष्ठ|चिं|त|न|◆* 👤 व्यंकट चिलवरवार, सहशिक्षक, नांदेड👤 साईनाथ माळगे, सहशिक्षक, धर्माबाद👤 गंगाधर पालकृतवार, सहशिक्षक, धर्माबाद👤 श्रीराम भंडारे, परभणी👤 दत्तात्रय तोटावाड, सामाजिक कार्यकर्ते, धर्माबाद👤 लक्ष्मण दावणकर, सहशिक्षक, लातूर👤 सचिन राजेंद्र पिसाळ, सहशिक्षक, बीड👤 दिनेश राठोड, जिजाईसुत👤 बजरंग अरगेलू, धर्माबाद👤 ज्ञानेश्वर कोकरे, करखेली👤 करुणा खंडेलोटे, नांदेड👤 साईनाथ ईबीतवार, येवती👤 मोहन कुलकर्णी, हदगाव*ઉदंड_आયુષ્યાच्या अનંત_શુभेच्छा,* [ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा एक दिवस अगोदर 9423625769 येथे पोस्ट करावे. ]••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• ••• 💡 ‼ *मनाचे श्लोक*‼ 💡•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••महासंकटी सोडिले देव जेणें।प्रतापे बळे आगळा सर्वगूणे॥जयाते स्मरे शैलजा शूलपाणी।नुपेक्षी कदा राम दासाभिमानी॥३१॥।। जय जय रघुवीर समर्थ ।।••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🕊🌎 ‼ *विचारधारा*‼🕊🌎••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••माणसाचा जन्म संकटातून होतो, संपूर्ण आयुष्य संकटाचा सामना करत जगावे लागते व मृत्यू सुद्धा असंख्य संकटाचा सामना करुनच येतो.आपण ऐकले असणार. . माणसाचा जीवन हा, वेगळा असतो. सोबत सुख आणि दु:ख येतच असतात. म्हणून जगणे सोडायचं का. .? माणसाचा जीवन एकदाच येतो. प्रत्येक संकटाचा सामना करुन जगण्याचा प्रयत्न केला पाहिजे .व इतरांच्या जीवनात संकटे बणून न जाता त्यांच्या जीवनातील दु:ख कमी करण्यासाठी एकदातरी प्रयत्न करून बघायला पाहिजे. 🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷सौ.संगीता संतोष ठलाल मु. कुरखेडा जि. गडचिरोली••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎭 *आजची फ्रेश बोधकथा* 🎭••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *उंदराची टोपी*एक उंदीर होता. तो एकदा रस्त्यावरून चालत होता. चालता चालता त्याला एक कापडाचा 'तुकडा' सापडला. तर तो तुकडा बघून उंदराला वाटलं अरे व्वा ! आता आपण याची टोपी शिवून घेऊया. मग तो एका शिंप्याकडे गेला. शिंप्याला म्हणाला, ""शिंपीदादा, शिंपीदादा, मला या कापडाच्या तुकडयाची टोपी शिवून द्या"". तर शिंपी म्हणाला, ""चल हट, मी नाही देत जा"". तसा उंदराला आला राग. तो म्हणाला ""राजाकडे जाईल, चार शिपायांना बोलवेल, ते तुला मारतील व मग मी तुझी मजा बघेल"". शिंपी घाबरला. म्हणाला, ""नको रे बाबा, नको नको नको. आण तो तुकडा, मी टोपी शिवून देतो"". म्हणत शिंप्यानं टोपी शिवून दिली. तसा तो उंदीर गेला, कुणाकडं? परटाकडं ! परटाला म्हणाला , ""परीटदादा, परीटदादा, माझी एवढी टोपी धुवून द्या"". परीट खूप कामात होता. तो म्हणाला, ""नाही रे उंदरा, मला वेळ नाही आता. जा"". तसा तो उंदीर म्हणाला, ""राजाकडे जाईल, चार शिपायांना बोलवेल, ते तुला मारतील व मग मी तुझी मजा बघेल"". परीट घाबरला. म्हणाला, ""नको रे बाबा, नको नको नको. आण मी टोपी धुवून देतो"". म्हणत त्याने टोपी धुवून दिली. तसा उंदीर गेला रंगार्याकडे व म्हणला, ""रंगारीदादा रंगारीदादा, माझी टोपी छान लाल रंगवून द्या"". रंगारी म्हटला, ""जा जा, मी नाही देत जा."" तसा उंदीर काय म्हटला? बरोब्बर! ""राजाकडे जाईल, चार शिपायांना बोलवेल, ते तुला मारतील व मग मी तुझी मजा बघेल"". रंगारी घाबरला आणि त्यानं टोपी छान लाल लाल रंगवून दिली. मग उंदीर गेला गोंडेवाल्याकडे व म्हणला, ""गोंडेवाले, गोंडेवाले, माझ्या टोपीला चार गोंडे लावून देता का?"" गोंडेवाला बोलला, ""मी नाही देत. ज्जा"" तसा उंदीर त्याला पण म्हणाला, काय?, ""राजाकडे जाईल, चार शिपायांना बोलवेल, ते तुला मारतील व मग मी तुझी मजा बघेल"". तसा गोंडेवाला घाबरला. म्हणाला, ""नको रे बाबा, नको नको नको. आण मी टोपीला गोंडे लावून देतो"". मग त्याने गोंडे लावून दिले. उंदीर झाला खूष. त्यानं टोपी घातली डोक्यावर आणि मजेत गाणी म्हणत चालला. तिकडून राजा चालला होता. राजाबरोबर होते शिपाई. राजाने उंदराला बघितले आणि शिपायांना म्हणाला, ""घ्या रे त्याची टोपी हिसकावून"". तशी शिपायांनी उंदराची टोपी हिस्कावली आणि राजाच्या डोक्यावर ठेवली. उंदीर पळाला आणि पळता पळता म्हणायला लागला, ""राजा भिकारी, राजा भिकारी! माझी टोपी घेतली, घेतली"". आता राजाला आला राग. त्यानं डोक्यावरची टोपी काढली आणि उंदराकडे भिरकावली. तशी ती टोपी उंदराने उचलली, झटकली आणि पुन्हा डोक्यात घातली आणि म्हणायला लागला , ""राजा मला भ्याला, माझी टोपी दिली, राजा मला भ्याला, माझी टोपी दिली, ढुमढुम ढुमाक, ढुमढुम ढुमाक, ढुम!•••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••या पोस्ट विषयी आपल्या सूचना, निवेदन, अभिप्राय, बातम्या, वाढदिवस, माहिती किंवा शंका 9423625769 येथे कळवावे. •••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••~~~~~~~~~~~~~~~~~~~*🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢*📱 9423625769~~~~~~~~~~~~~~~~~~~*🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏*पुन्हा भेटू या फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार ~~~~~~~~~~~~~~~~~~~
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment