✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट~~~~~~~~~~~~~~~~~~~ 6️⃣ 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 6️⃣ ( फ्रेश शालेय परिपाठ )🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00 ( रविवार आणि सुट्टी वगळून )~~~~~~~~~~~~~~~~~~~🎇 दिनांक :- 13 जुलै 2023💠 वार - गुरुवार••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🌷🌐 . *दिनविशेष . 🌐* 🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *_ या वर्षातील १९४ वा दिवस आहे_* •••••••••••••••••••••••••••••••• *_महत्त्वाच्या घटना:_* •••••••••••••••••••••••••••••• *२०११:मुंबई शहरात झालेल्या ३ बॉम्बस्फोटात २६ जण ठार तर १३० जण जखमी झाले.**१९७७:रोहित्रावर (transformer) वीज पडल्यामुळे. न्यूयॉर्क शहरातील वीजपुरवठा दीर्घकाळ खंडित झाला.**१९२९:जतिंद्रनाथ दास यांनी लाहोर तुरुंगात आपले आमरण उपोषण सुरु केले.या उपोषणातच ६३ दिवसांनी (१३ सप्टेंबर १९२९) त्यांचा मृत्यू झाला.**१९०८:लोकमान्य टिळकांवर दुसर्या राजद्रोहाच्या खटल्याचे काम सुरु झाले.**१८६३:सक्तीच्या सैन्यभरती विरोधात न्यूयॉर्क शहरात दंगा झाला.**_जन्मदिवस / जयंती / वाढदिवस:_*•••••••••••••••••••••••••••••••••*१९८४:उर्वशी शर्मा-- भारतीय मॉडेल आणि चित्रपट अभिनेत्री**१९८२:सुनील कालिदास जवंजाळ -- कवी, लेखक* *१९६१:गणेश निळकंठराव पांडे -- प्रसिद्ध कवी* *१९५८:प्रा.डॉ.नमिता अशोक शेंदरे-- लेखिका* *१९५२:प्रा.माधुरी शानभाग-- प्रसिद्ध मराठी लेखिका,अनुवादक* *१९५२:डॉ निर्मल सिन्नरकर-- कवयित्री, गीत लेखन**१९४७:डॉ.वासुदेव नारायण विष्णुपुरीकर -- प्रसिद्ध नाटयलेखक* *१९४२:हॅरिसन फोर्ड – अमेरिकन अभिनेता**१९२७:सावळाराम धागोजी म्हात्रे(सावळाराम महाराज)-- कीर्तनकार, समाजप्रबोधक (मृत्यू:१८ फेब्रुवारी १९९२)**१९१६:रामकृष्ण धोंडो बाक्रे-- ज्येष्ठ संगीत समीक्षक आणि पत्रकार(मृत्यू:२२ डिसेंबर १९९६)**१९०३:विमलाबाई देशपांडे-- कवयित्री लेखिका* *१८९२:केसरबाई केरकर – जयपूर-अत्रौली घराण्याच्या शास्त्रीय गायिका (मृत्यू: १६ सप्टेंबर १९७७)* *_मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन:_* •••••••••••••••••••••••••••••••••*२०१०:मनोहारी सिंग – पट्टीचे सॅक्सोफोन वादक (जन्म: ८ मार्च १९३१)**२००९:निळू फुले – प्रसिद्ध अभिनेते (जन्म:४ एप्रिल १९३०)**२०००:इंदिरा संत – साहित्य अकादमी पुरस्कार विजेत्या कवयित्री व लेखिका (जन्म: ४ जानेवारी १९१४)**१९९४:पं.कृष्णा गुंडोपंत तथा ’के. जी.’ गिंडे – शास्त्रीय (धृपद) गायक, संगीतकार व शिक्षक (जन्म: २६ डिसेंबर १९२५)**१९९०:अर्देशिर फुर्दोरजी सोहराबजी ऊर्फ ’बॉबी’ तल्यारखान – क्रीडा समीक्षक व समालोचक (जन्म: १८९७)**१९६९:महर्षी न्यायरत्न धुंडिराजशास्त्री विनोद – तत्त्वज्ञ, विचारवंत, योगी, स्वातंत्र्य सैनिक आणि लेखक.(जन्म:१२ जानेवारी १९०२)*~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~ *_दिनविशेष या सदरातील सर्व मुद्दे हे संग्रहात्मक आहेत तेव्हा त्यात चूका नसतीलच असे सांगता येणार नाही_* *✍ संकलन ✍* *श्रीराम चव्हाण माजी शिक्षणाधिकारी नागपूर*मोबाईल:9822695372 ईमेल: chavhansk65@gmail.com••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *✈ 🚀 गुगलयान ✈ 🚀*••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *कथा - नवऱ्याचे मी पण*कुटुंबातील नात्यात असलेला घालमेल, प्रेम, जिव्हाळा आणि तिरस्कार यावर आधारित फेसबुकवर अनेक वाचकांना पसंत पडलेली ही कथा आहे. मला आशा आहे आपणांस ही कथा नक्की आवडेल. तेव्हा चला कथा वाचू या .....!आठरावा भाग -------https://www.facebook.com/groups/aamhi.saahityik/permalink/7308987079117644/?mibextid=Nif5ozकथा आवडल्यास आपल्या प्रतिक्रिया अवश्य कळवा.~~~~~~~~~~~~~~~~~~~✍ स्तंभलेखक *नासा येवतीकर, धर्माबाद*9423625769~~~~~~~~~~~~~~~~~~~ 🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••1⃣ *पंतप्रधान नरेंद्र मोदी 13 ते15 जुलै 2023 दरम्यान फ्रान्स आणि संयुक्त अरब अमिरातीच्या (यूएई ) दौऱ्यावर जाणार आहेत.*•••••••••••••••••••••••••••••••••••••2⃣ *१० दिवसात विदर्भात मुसळधार पाऊस, हवामान खात्याकडून अलर्ट जारी*•••••••••••••••••••••••••••••••••••••3⃣ *कृष्णा भीमा स्थिरीकरण प्रकल्पाला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा हिरवा कंदील, दुष्काळी भागाला पाणी मिळणार*•••••••••••••••••••••••••••••••••••••4⃣ *प्रवाशांचा उदंड प्रतिसादमुळे लवकरच विनावाहक 'जन-शिवनेरी' राज्यातील इतर मार्गावर धावणार*•••••••••••••••••••••••••••••••••••••5⃣ *केंद्राकडून राज्यातील आपत्ती व्यवस्थापनासाठी महाराष्ट्राला सर्वाधिक निधी*•••••••••••••••••••••••••••••••••••••6⃣ *मुंबईतील रखडलेले झोपडपट्टी पुनर्विकास प्रकल्प लवकरच मार्गी लागणार*•••••••••••••••••••••••••••••••••••••7⃣ *यशस्वी जायस्वाल -ईशान किशन यांचं कसोटी पदार्पण, वेस्ट इंडिजची प्रथम फलंदाजी*•••••••••••••••••••••••••••••••••••••*📷 वृत्त संकलक - कुणाल पवारे 📹*📱9960358300•••••••••••••••••••••••••••••••••••••ही पोस्ट नियमित मिळविण्यासाठी आणि या समुहात add होण्यासाठी 9423625769 येथे संपर्क करावे.••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• 🌷🍃 *विशेष माहिती* 🌷🍃••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••📕 अँटीबायोटीक्स म्हणजे काय ? 📕अँटीबायेटीक्स अर्थात प्रतिजैविकांचे आजकालच्या औषधोपचारांत अत्यंत महत्त्वाचे स्थान आहे. कोणताही डॉक्टर प्रतिजैविकांचा उपयोग केल्याखेरीज वैद्यक व्यवसाय करूच शकणार नाही, अशी आजची परिस्थिती आहे.अलेक्झांडर फ्लेमिंगने अपघाताने पेनिसिलीनचा शोध लावला व तेव्हापासून आजतागायत अनेक प्रतिजैविके विकसित करण्यात आली आहेत. बुरशीपासून ही प्रतिजैविके मिळतात. काही प्रतिजैविकांचे कृत्रिमरित्या तयार होणारे पर्यायही उपलब्ध झाले आहेत. प्रतिजैविके विविध मार्गांनी जंतूंचा नायनाट करतात. काही वेळा ती जिवाणूंचे पोषण त्याला मिळू देत नाहीत. कधी त्याच्या पेशीतील केंद्रकावर हल्ला चढवतात, तर कधी त्याला हानीकारक ठरणारे पदार्थ निर्माण करतात.जिवाणूही हुशार असतात. प्रतिजैविक योग्य प्रमाणात दिले नाही वा कमी दिवस दिले, तर जिवाणूंमध्ये त्या प्रतिजैविकाविरुद्ध प्रतिकार शक्ती तयार होते. ही प्रतिकार शक्ती त्यांच्या पुढील पिढ्यांनाही आपोआप मिळू शकते. त्यामुळे त्या प्रतिजैविकांचा उपयोग त्या जिवाणूला मारण्यासाठी करता येत नाही. असे होऊ नये यासाठी प्रतिजैविके पुरेशा डोसमध्ये निदान ५ दिवस तरी द्यायला हवी. पेनिसिलीन, अँपीसिलीन, स्ट्रेप्टोमायसीन, निओमावसीन, सेफलोस्पोरीन अशी प्रतिजैविके आजकाल औषधोपचारांत वापरली जातात. रोगी अत्यवस्थ असेल तर वा पचनसंस्थेतून प्रतिजैविकाचे शोषण होत नसेल तर ही प्रतिजैविके शिरेतून वा स्नायूमध्येही देता येतात. अशावेळी बावडे वा अंतर्जीची विशेष काळजी घ्यावी लागते.प्रतिजैविके म्हणजे रुग्णांसाठी जणू वरदानच होय. क्षयरोग, कुष्ठरोग यांसारख्या असाध्य समजल्याजाणाऱ्या रोगांपासून कॉलरा, विषमज्वर, घटसर्प, डांग्या खोकला अशा सर्वच रोगांवर प्रतिजैविकांमुळे हुकुमी उपचार करता येतात.डॉ. अंजली दिक्षित व डॉ. जगन्नाथ दिक्षित यांच्या पुस्तकातुन*संकलन*••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• 🌹 *" फ्रेश सुविचार "* 🌹••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••*ज्ञानाचे पहिले काम असत्य जाणून घेणे व दुसरे काम सत्याला जाणणे हे आहे**संकलन :- प्रमिलाताई सेनकुडे, नांदेड**प्रा.शा. गोजेगाव ता.हदगाव, जि. नांदेड*📱9403046894••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• ❓ *आजची प्रश्नमंजुषा* ❓••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••१) संत नामदेव महाराजांचे पूर्ण नाव काय आहे ?२) माऊंट अबू कोणत्या पर्वत रांगेत आहे ?३) धावणे शर्यतीच्या मैदानास काय म्हणतात ?४) कोणार्क येथील सूर्यमंदिराला अजून कोणत्या नावाने ओळखले जाते ?५) संगणकाला नियंत्रित करणाऱ्या भागाला काय म्हणतात ?*उत्तरे :-* १) नामदेव दामाशेटी रेळेकर २) अरवली ३) ट्रॅक ४) ब्लॅक पँगोडा ५) सीपीयू*संकलन :- जैपाल भै. ठाकूर*जि.प.व.प्राथ.शाळा भोसा, ता. आमगाव, जि. गोंदिया 📱9765943144••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎂 *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *◆|वा|ढ|दि|व|स|अ|भि|ष्ठ|चिं|त|न|◆* 👤 अनुराधा पहाडे राजूरकर👤 सुनील जंवजाळ👤 अहमद शेख👤 रवी येलमोड*ઉदंड_आયુષ્યાच्या अનંત_શુभेच्छा,* [ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा एक दिवस अगोदर 9423625769 येथे पोस्ट करावे. ]••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• ••• 💡 ‼ *मनाचे श्लोक*‼ 💡•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••मना वीट मानूं नको बोलण्याचा। पुढें मागुता राम जोडेल कैंचा॥ सुखाची घडी लोटतां सूख आहे। पुढें सर्व जाईल कांही न राहे ॥२५॥।। जय जय रघुवीर समर्थ ।।••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🕊🌎 ‼ *विचारधारा*‼🕊🌎••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••एखाद्या व्यक्तीला दिलेला शब्द जर .. वेळ,प्रसंगी किंवा अडचण आल्याने वेळेवर पाळला गेला नाही तर...त्याला खोटे व्हावे लागते. त्या प्रकारचा खोटेपणा सर्वसाधारण व्यक्तीला एक प्रकारची सजाच असते. पण,जो व्यक्ती व्यर्थ गोष्टींसाठी वारंवार खोटे बोलत असते त्याच्यावर मात्र डोळे झाकून विश्वास केला जातो. फरक एवढाच की, माणसं तर..एकसारखे दिसतात पण, त्यांना ओळखणे मात्र फार कठीण जाते.म्हणून खरं कोण बोलत आहे व खोटे बोलून कोण संधी साधत आहे ओळखणे फार आवश्यक आहे. 🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷सौ.संगीता संतोष ठलाल मु. कुरखेडा जि. गडचिरोली••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎭 *आजची फ्रेश बोधकथा* 🎭••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *प्रेमळ बोल*एका शेतकऱ्याने एकदा आपल्या कोंबड्याला हाका मारायला सुरुवात केली असता तो कोंबडा पळून जाऊ लागला. त्याच शेतकऱ्याने पिंजऱ्यात एक ससाणा पाळला होता. तो त्या कोंबड्याला म्हणाला, 'अरे वेड्या, मालक एवढ्या प्रेमाने तुला हाका मारत आहे, आणि तू असा पळून का जातोस? एवढ्या प्रेमाने जर त्याने मला हाक मारल्या असत्या, तर मी मोठ्या आनंदाने त्याच्याकडे गेलो असतो.' यावर तो कोंबडा म्हणाला, 'अरे ससाण्या, आजवर माझ्या अनेक नातेवाइकांना या मालकाने अशाच प्रेमाने जवळ बोलावून, त्यांच्या माना कापताना मी पाहिले आहे. त्याची प्रेमळ हाक ऐकताच मी त्याच्यापासून पळून जाण्याचा प्रयत्न करीत आहे. तुझी गोष्ट अगदी निराळी आहे. त्याच्या दृष्टीने तुझे मांस रुचकर नसल्याने, तुला त्याच्याकडून कापले जाण्याचे भय नाही.' तात्पर्य : प्रेमळ बोलणाऱ्यांच्या मनात प्रेम असतेच असे नाही.•••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••या पोस्ट विषयी आपल्या सूचना, निवेदन, अभिप्राय, बातम्या, वाढदिवस, माहिती किंवा शंका 9423625769 येथे कळवावे. •••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••~~~~~~~~~~~~~~~~~~~*🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢*📱 9423625769~~~~~~~~~~~~~~~~~~~*🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏*पुन्हा भेटू या फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार ~~~~~~~~~~~~~~~~~~~
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment