✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट~~~~~~~~~~~~~~~~~~~ 6️⃣ 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 6️⃣ ( फ्रेश शालेय परिपाठ )🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00 ( रविवार आणि सुट्टी वगळून )~~~~~~~~~~~~~~~~~~~🎇 दिनांक :- 26 जुलै 2023💠 वार - बुधवार🌷🌐 . *दिनविशेष . 🌐* 🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *_कारगिल विजय दिवस_* *_ या वर्षातील २०७ वा दिवस आहे_* *_महत्त्वाच्या घटना:_* •••••••••••••••••••••••••••••• *२००८:अहमदाबादमधे झालेल्या २१ बॉम्बस्फोटांमधे ५६ जण ठार तर २०० जण जखमी झाले.**२००५:मुंबई परिसरात २४ तासात सुमारे ९९५ मिमी पाऊस झाल्याने शहरात ठिकठिकाणी पूर येऊन शेकडो लोक मृत्यूमुखी पडले.**१९९९:भारतीय क्रिकेटसाठी उल्लेखनीय कामगिरी केल्याबद्दल दिल्या जाणार्या सी. के. नायडू पुरस्कारासाठी माजी कर्णधार पॉली उम्रीगर यांची निवड**१९९९: भारताचा कारगिल युद्धात विजय झाला.**१९९८:१९९७ मधील सर्वोत्कृष्ट कामगिरीबद्दल विश्वनाथन आनंद याला प्रतिष्टेचा ’चेस ऑस्कर’ पुरस्कार प्रदान**१९९४:सनईवादक उस्ताद बिस्मिला खाँ यांना ’राजीव गांधी सद्भावना पुरस्कार’ जाहीर**१९६५:मालदीवला (इंग्लंडपासुन) स्वातंत्र्य मिळाले.**१९५६:जागतिक बॅंकेने आस्वान धरण बांधण्यासाठी अर्थसाहाय्य करण्यास नकार दिल्यावर ईजिप्तचे राष्ट्राध्यक्ष गमाल नासर यांनी सुएझ कालव्याचे राष्ट्रीयीकरण केले.**१८९१:फ्रान्सने ताहिती बेटे ताब्यात घेतली.**१८४७:लायबेरिया स्वतंत्र झाला.**१७४५:इंग्लंडमधील गिल्डफोर्ड येथे महिलांचा पहिला क्रिकेट सामना झाला.**१७८८:न्यूयॉर्क अमेरिकेचे ११ वे राज्य बनले.* *_जन्मदिवस / जयंती / वाढदिवस:_* *१९८५:मुग्धा गोडसे – अभिनेत्री व मॉडेल**१९७२:जुगल हंसराज--भारतीय अभिनेता, लेखक आणि चित्रपट निर्माता**१९७२:प्रा.मिलिंद गोविंदराव जोशी -- प्रसिद्ध लेखक संपादक,वक्ते* *१९६७:संजय अप्पाराव घाटगे-- कवी* *१९५५:असिफ अली झरदारी – पाकिस्तानचे ११ वे राष्ट्राध्यक्ष**१९५४:व्हिटास गेरुलायटिस – अमेरिकन लॉन टेनिसपटू (मृत्यू: १७ सप्टेंबर १९९४)**१९४८:सुमन लाघवे-- लेखिका* *१९४३:डॉ.शंतनू चिंधडे -- नेत्रतज्ज्ञ, सुप्रसिद्ध कवी,लेखक* *१९४३:डॉ.नीला चंदकांत पांढरे-- प्रसिद्ध लेखिका(मृत्यू:२६सप्टेंबर २०२१)**१९४०:प्रा.डॉ.प्रकाश केजकर देशपांडे-- कादंबरीकार,कवी,समीक्षक,प्रभावी वक्ते* *१९३४:दत्तात्रय पंढरीनाथ जोशी-- संपादक* *१९११:यशवंत दत्तात्रय भावे-- कवी (मृत्यू:७ नोव्हेंबर १९८७)**१९०२:यशवंत बाळकृष्ण मोकाशी-- कादंबरीकार (मृत्यू:१९८८)**१८९४:वासुदेव गोविंद मायदेव – कवी व समाजसेवक (मृत्यू:३० मार्च १९६९)**१८९४:अल्डस हक्सले – इंग्लिश लेखक (मृत्यू: २२ नोव्हेंबर १९६३)**१८९३:पं.कृष्णराव शंकर पंडित – ग्वाल्हेर घराण्याचे शास्त्रीय गायक.राष्ट्रपती डॉ. राजेन्द्रप्रसाद यांनी त्यांचा ’राष्ट्रीय गायक’ म्हणून गौरव केला होता.(मृत्यू:२२ ऑगस्ट १९८९)**१८८९: बाळकृष्ण लक्ष्मीदास मेहता-- सर्वोदय विचाराचे प्रचारक, लेखक (मृत्यू:२१ जानेवारी १९८२)**१८७५:कार्ल युंग – मानसशास्त्रज्ञ व मानसोपचारतज्ञ (मृत्यू:६ जून १९६१)**१८७०:गोविंद सदाशिव आपटे-- ज्योतिर्गणितज्ज्ञ(मृत्यू:२९ नोव्हेंबर १९३६)**१८६५:रजनीकांत सेन-- भारतीय कवी आणि संगीतकार(मृत्यू:१३ सप्टेंबर १९१०)**१८५६:जॉर्ज बर्नार्ड शॉ – नोबेल पारितोषिक विजेते आयरिश लेखक आणि लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्सचे (LSE) सहसंस्थापक (मृत्यू:२ नोव्हेंबर १९५०)* *_मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन:_* *२०१५:बिजॉय कृष्णा हांडिक--भारतीय वकील आणि राजकारणी (जन्म:१ डिसेंबर १९३४)**२००९:भास्कर चंदावरकर – संगीतकार (जन्म: १६ मार्च १९३६)**१९७२:उमाकान्त केशव आपटे उपाख्य बाबासाहेब आपटे--प्राचीन भारताच्या इतिहासावरील संशोधक (जन्म:२८ आगस्ट १९०३)**१९४४:प्रभाकर वासुदेव बापट-- वाड:मय इतिहासकार (जन्म:१७ फेब्रुवारी १९०२)**१८९१:राजेन्द्रलाल तथा राजा मित्रा – बंगालमधील प्राच्यविद्या संशोधक,भारतीय चित्रकला, शिल्पकला, राजकीय आणि सामाजिक विषयांवरील भाष्यकार (जन्म: १५ फेब्रुवारी १८२४)* *✍ संकलन :- श्रीराम चव्हाण माजी शिक्षणाधिकारी नागपूर*मोबाईल:9822695372 ईमेल: chavhansk65@gmail.com••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *✈ 🚀 गुगलयान ✈ 🚀*••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *दीर्घकथा - लक्ष्मी*मुलींच्या शिक्षणाचे महत्त्व सांगणारी कथा ज्यास फेसबुकवर अनेक वाचकांनी पसंती दर्शविलेली आहे. मला आशा आहे आपणांस ही कथा नक्की आवडेल. तेव्हा चला कथा वाचू या .....!दुसरा भाग -------https://m.facebook.com/story.php?story_fbid=2858875857572503&id=100003503492582&mibextid=Nif5ozकथा आवडल्यास आपल्या प्रतिक्रिया अवश्य कळवा.~~~~~~~~~~~~~~~~~~~✍ स्तंभलेखक *नासा येवतीकर, धर्माबाद*9423625769~~~~~~~~~~~~~~~~~~~ 🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••1⃣ *कोल्हापूर : जिल्ह्यात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे पूरसदृश्य परिस्थिती जिल्ह्यात निर्माण होत आहे. यामुळे जिल्ह्यातील पूर प्रवर्तन क्षेत्रातील २८गावांमधील शाळांना सुट्टी जाहीर करण्यात आली असल्याची माहिती निवासी उपजिल्हाधिकारी भगवान कांबळे यांनी दिली.*•••••••••••••••••••••••••••••••••••••2⃣ *मुंबईतील अंधेरी पूर्व भागात दरड कोसळली, चकाला परिसरात रामबाग सोसायटीमध्ये चार ते पाच फ्लॅटवर डोंगराचा ढिगारा; सुदैवाने जीवितहानी नाही*•••••••••••••••••••••••••••••••••••••3⃣ *मराठा आरक्षणासाठी दिल्लीत आंदोलन; सुदर्शन नच्चिअप्पन समितीच्या शिफारशींनुसार आरक्षण देण्याची मागणी*•••••••••••••••••••••••••••••••••••••4⃣ *विदर्भातील अनेक जिल्ह्यांना पुराचा फटका, चंद्रपूरमध्ये गावांना पुराचा विळखा, तर वाशिममध्ये शेतकऱ्यांचं मोठं नुकसान*•••••••••••••••••••••••••••••••••••••5⃣ *जगातला सर्वात मोठा रामाचा पुतळा आंध्र प्रदेशात ; केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी केली पायाभरणी*•••••••••••••••••••••••••••••••••••••6⃣ *ज्येष्ठ पत्रकार व लेखक शिरीष कणेकर यांचे निधन; वयाच्या 80 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास*•••••••••••••••••••••••••••••••••••••7⃣ *पाचव्या दिवशी पावसाचा ख्वाडा, दुसरा कसोटी सामना अनिर्णित, भारतीय संघाने 1-0 ने मालिका जिंकली*•••••••••••••••••••••••••••••••••••••*📷 वृत्त संकलक - कुणाल पवारे 📹*📱9960358300•••••••••••••••••••••••••••••••••••••ही पोस्ट नियमित मिळविण्यासाठी आणि या समुहात add होण्यासाठी 9423625769 येथे संपर्क करावे.••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• 🌷🍃 *विशेष माहिती* 🌷🍃••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🧠 वेड्या माणसाच्या मेंदूत काय बिघाड होतो ? 🧠 वेडा म्हटले की आपल्या डोळ्यांसमोर कपडे फाडणारी, दगड मारणारी, असंबद्ध बडबड करणारी व्यक्ती उभी राहते. एक तर आपल्याला तिची भीती वाटते किंवा किळस वाटते. आपण पाहिलेल्या अशा व्यक्ती म्हणजे वेडातील एक प्रकार आहे.मनोविकाराचे अनेक प्रकार आहेत. त्यापैकी काही व्यक्तींनाच वरील लक्षणे असतात. इतर प्रकारांमध्ये भ्रमिष्टपणा, उन्माद, अतिनैराश्य हे गंभीर आजार; तर तणावग्रस्त मानसिकता, नैराश्य, हिस्टेरिया हे कमी गंभीर आजार यांचा समावेश होतो. याशिवाय सदोष व्यक्तिमत्त्व - जसे संशयी स्वभाव, घुमेपणा, आत्मकेंद्रीपणा, हट्टीपणा, परावलंबित्व, तसेच समाजविघातक कृत्य करण्याची प्रवृत्ती; हे देखील सौम्य प्रकारचे मनोविकार समजले जातात. काही व्यक्ती घराला कुलूप लावल्यानंतर तीन तीनदा ओढून तर पाहतातच, पण थोडे अंतर गेल्यावर परत येऊन पाहतात. हा सुद्धा एक प्रकारचा मनोविकारच आहे. अंगात येणे, लैंगिक विकृती व व्यसनाधीनता; हे देखील मनोविकारच आहेत.वरील मनोविकार पाहिल्यावर आपल्याला साहजिकच असा प्रश्न पडतो की, या व्यक्तींच्या मेंदूत काही बदल होत असतील का ?आपल्या मेंदूमध्ये कोट्यवधी पेशी असतात. त्या पेशी अनेक धाग्यांसारख्या तंतूंनी एक दुसऱ्याशी जोडलेल्या असतात. एका पेशीतील संदेश दुसऱ्या पेशीपर्यंत जाण्यासाठी तर तंतूत असणारे रासायनिक द्रव्य व त्यातून जाणारा विद्युतसंदेश यांचा महत्त्वाचा वाटा असतो. या रासायनिक पदार्थांचे प्रमाण कमी जास्त झाले किंवा विद्युतसंदेशात बिघाड झाला, तर मेंदूचे कामकाज बिघडते. अर्थात मेंदूच्या रचनेत काही बदल होत नाही.मानसिक विकारांची कारणे बघितल्यास त्यात अनुवांशिकता (विशेषत: गंभीर मानसिक विकार), मातापित्याचे प्रेम व वागणूक, घरातील वातावरण, सामाजिक आर्थिक परिस्थिती, व्यसने व शारीरिक आजार, मेंदूच्या आवरणाचा दाह, गुप्तरोग, अपघातात मेंदूला इजा होणे; यांचा समावेश होतो.डॉ. अंजली दिक्षित व डॉ. जगन्नाथ दिक्षित यांच्या पुस्तकातुन यांच्या 'मेडिकल जनरल नॉलेज' या पुस्तकातून*संकलन*••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• 🌹 *" फ्रेश सुविचार "* 🌹••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••जीवनरूपी समुद्रात पुस्तके दीपगृहाचे काम करतात.*संकलन :- प्रमिलाताई सेनकुडे, नांदेड**प्रा.शा. गोजेगाव ता.हदगाव, जि. नांदेड*📱9403046894••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• ❓ *आजची प्रश्नमंजुषा* ❓••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••१) *'संपूर्ण भूमी ईश्वराची आहे'* ही घोषणा कोणी केली ?२) 'मून मॅन ऑफ इंडिया' ही पदवी कोणाला देण्यात आली ?३) मानवी डोळ्याचा कोणता भाग आत येणाऱ्या किरणांना नियंत्रित करतो ?४) 'आता उठवू सारे रान, आता पेटवू सारे रान' हे प्रेरणादायी गीत कोणी लिहिले ?५) चांद्रयान - ३ कोणत्या ठिकाणाहून प्रक्षेपित करण्यात आले ?*उत्तरे :-* १) आचार्य विनोबा भावे २) मायलसामी अण्णादुराई ३) इरिस ४) साने गुरूजी ५) सतीश धवन अंतराळ केंद्र*संकलन :- जैपाल भै. ठाकूर*जि.प.व.प्राथ.शाळा भोसा, ता. आमगाव, जि. गोंदिया 📱9765943144••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎂 *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *◆|वा|ढ|दि|व|स|अ|भि|ष्ठ|चिं|त|न|◆* 👤 अमोल मदनुरकर👤 वैभव भोसले👤 रमेश मस्के*ઉदंड_आયુષ્યાच्या अનંત_શુभेच्छा,* [ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा एक दिवस अगोदर 9423625769 येथे पोस्ट करावे. ]••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• ••• 💡 ‼ *मनाचे श्लोक*‼ 💡•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••सदा सर्वदा देव सन्नीध आहे। कृपाळुपणे अल्प धारीष्ट पाहे॥ सुखानंद आनंद कैवल्यदानी। नुपेक्षी कदा राम दासाभिमानी॥३६॥।। जय जय रघुवीर समर्थ ।।••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🕊🌎 ‼ *विचारधारा*‼🕊🌎••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••थोर संतांनी तसेच महापुरुषांनी आपल्या संदेशातून समानतेचा व जीवन जगण्याची शिकवण दिली. त्यांच्या शिकवणुकीतून जीवन जगण्याचा खरा अर्थ कळत असतो. पण, खरंच आपण त्यांनी दाखविलेल्या मार्गावर चालतो का..? हा एक मोठा प्रश्न आहे. म्हणून जीवन जगत असतांना निदान एकदातरी त्यांनी दाखविलेल्या मार्गावर चालत रहावे तरच जीवनाचे सार्थक होईल..त्यासाठी आधी त्यांना वाचणे गरजेचे आहे तेव्हाच ते कळत असतात नुसते फोटोला वंदन केल्याने ते,महाविभूती कळत नाही. 🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷सौ.संगीता संतोष ठलाल मु. कुरखेडा जि. गडचिरोली••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎭 *आजची फ्रेश बोधकथा* 🎭••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••*चल रे भोपळया टुणुक टुणुक*एक होती म्हातारी. एकदा ती आपल्या लेकीकडे जायला निघाली. तिची लेक दुसर्या गावाला रहात होती. रस्त्यांत मोठे जंगल होते. म्हातारी काठी टेकत, टेकत रस्त्याने निघाली. वाटेत तिला भेटला कोल्हा. तो म्हणाला 'म्हातारे, म्हातारे, मी तुला खातो'. पण म्हातारी होती हुशार. ती म्हणाली, 'मला खाऊन तुझे पोट भरणार नाही. त्यापेक्षा थोडे दिवस थांब. लेकीकडे जाते , तूपरोटी खाते, लठ्ठ मुठ्ठ होते, मग तू मला खा.' कोल्ह्याला म्हातारीचे म्हणणे पटले. म्हातारी पुढे निघाली. तिला भेटला वाघ. तो म्हणाला, 'म्हातारे, म्हातारे, मी तुला खातो'. त्याने डरकाळी फोडली. म्हातारी त्याला म्हणाली 'मला खाऊन तुझे पोट भरणार नाही. त्यापेक्षा थोडे दिवस थांब. लेकीकडे जाते , तूपरोटी खाते, लठ्ठमुठ्ठ होते, मग तू मला खा. ' वाघाची अशी समजूत काढून म्हातारी पुढे निघाली. लेकीकडे ती खूप दिवस मजेत राहिली. खाऊन पिऊन लठ्ठमुठ्ठ झाली. आपल्या घरी परत येताना तिने एक मोठा लाल भोपळा घेतला. त्यात बसून ती भोपळयाला म्हणाली, 'चल रे भोपळया टुणुक टुणुक'. भोपळा रस्त्याने निघाला. वाटेत वाघाने भोपळा पाहिला. तो म्हणाला 'म्हातारे, म्हातारे थांब!' आतून म्हातारी म्हणाली 'कशाची म्हातारी आणि कशाची कोतारी. चल रे भोपळया टुणुक टुणुक'. त्याबरोबर भोपळा जोरात पळू लागला. पुढे गेल्यावर भेटला कोल्हा. कोल्ह्यानेही भोपळयाला थांबवण्याचा प्रयत्न केला. पण म्हातारी आतून म्हणाली 'चल रे भोपळया टुणुक टुणुक!'. पुन्हा भोपळा जोरात पळू लागला. अशी होती म्हातारी हुशार. कोल्हा आणि वाघाच्या तावडीत ती काही सापडली नाही. भोपळयात बसून ती सुखरूप आपल्या घरी पोचली.तात्पर्य :- शक्ती पेक्षा युक्ती श्रेष्ठ•••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••या पोस्ट विषयी आपल्या सूचना, निवेदन, अभिप्राय, बातम्या, वाढदिवस, माहिती किंवा शंका 9423625769 येथे कळवावे. •••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••~~~~~~~~~~~~~~~~~~~*🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢*📱 9423625769~~~~~~~~~~~~~~~~~~~*🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏*पुन्हा भेटू या फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार ~~~~~~~~~~~~~~~~~~~
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment