✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट~~~~~~~~~~~~~~~~~~~ 6️⃣ 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 6️⃣ ( फ्रेश शालेय परिपाठ )🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00 ( रविवार आणि सुट्टी वगळून )~~~~~~~~~~~~~~~~~~~🎇 दिनांक :- 27 जुलै 2023💠 वार - गुरुवार🌷🌐 . *दिनविशेष . 🌐* 🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *_ या वर्षातील २०८ वा दिवस आहे_* •••••••••••••••••••••••••••••••• *_महत्त्वाच्या घटना:_* •••••••••••••••••••••••••••••• *२०१२:लंडन येथे ३० व्या येथे ऑलिम्पिक स्पर्धांना सुरुवात झाली.**२००१:सार्वजनिक ठिकाणे, शासकीय इमारती, सार्वजनिक वाहने या ठिकाणी सिगारेट, तंबाखू, गुटखा सेवनावर व थुंकण्यावर तसेच या वस्तूंची सार्वजनिक ठिकाणी जाहिरात करण्यावर बंदी घालण्याचा महाराष्ट्र मंत्रीमंडळाचा निर्णय**१९९९:द्रवखनिज तेलवायूचा (LPG) वाहनांसाठी इंधन म्हणून वापर करण्याचा प्रस्ताव पेट्रोलिअम मंत्रालयाने मंजूर केला.**१९८३:कोलंबो येथील वेलिकाडा तुरुंगात सिंहली कैद्यांनी १८ तामिळ राजकीय कैद्यांची हत्या केली.**१९५५:दोस्त राष्ट्रांनी ऑस्ट्रियातुन आपले सैन्य काढुन घेतले.**१९२१:रक्तातील साखरेवर ’इन्सुलिन’ या संप्रेरकाचे नियंत्रण असते असे टोरांटो विद्यापीठातील सर फ्रेड्रिक बँटिंग आणि चार्ल्स बेस्ट यांनी सिद्ध केले. तसेच त्यांनी ’इन्सुलिन’ शुद्ध स्वरुपात विभक्त करण्यात यश मिळवले.**१८९०:डच चित्रकार व्हिन्सेंट व्हॅन गॉगने स्वत:वर गोळी झाडुन घेतली. दोन दिवसांनी त्याचे निधन झाले.**१७६१:माधवराव बल्लाळ भट ऊर्फ ’थोरले’ माधवराव हे मराठा साम्राज्यातील ४ थे पेशवे बनले.* *_जन्मदिवस / जयंती / वाढदिवस:_*••••••••••••••••••••••••••••••••• *१९९०:प्रा.गंगाधर चेपूरवार -- कवी लेखक**१९७९:प्रसाद पुरुषोत्तम कुमठेकर -- लेखक, निर्माता,दिग्दर्शक**१९७३:गौरी एकनाथ शिरसाठ-- कवयित्री* *१९७२:संतोष श्रीधर महाडेश्वर-- कवी लेखक* *१९७२:छाया अजबराव वाढेकर-- लेखिका* *१९६९:जॉनाथन नील "जॉंटी" ऱ्होड्स- निवृत्त दक्षिण आफ्रिकन क्रिकेटपटू ,सर्वोत्कृष्ट क्षेत्ररक्षक व कोच* *१९६९:हणमंत पडवळ -- कवी* *१९६२:सुनीलकुमार वसंतराव सरनाईक-- प्रसिद्ध लेखक,संपादक* *१९६०: श्री उद्धव बाळासाहेब ठाकरे - महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री**१९५६:प्रा.राज यावलीकर -- सुप्रसिद्ध साहित्यिक,'खडू शिल्प' कलेकरिता राष्ट्रीय पुरस्कार* *१९५५:अॅलन बॉर्डर – ऑस्ट्रेलियन क्रिकेटपटू**१९५३:डॉ.अक्षयकुमार मल्हारराव काळे-- सुप्रसिद्ध साहित्यिक,फेब्रुवारी २०१७ मध्ये डोंबिवली येथे झालेल्या अखिल भारतीय साहित्य संमेलनाचे अध्यक्ष* *१९५०:विश्व मोहन भट्ट-- हिंदुस्थानी शास्त्रीय संगीत वादक* *१९३९:आशा अरविंद बगे-- मराठीतील जेष्ठ सुप्रसिद्ध लेखिका* *१९३०:चंद्रकांत रामचंद्र वर्तक--कथाकार, समीक्षक, प्रवासवर्णनकार(मृत्यू:११ जुलै २०१०)**१९२८:कृष्ण राघव घरोटे -- कवी, कथाकार**१९२८:उत्तमराव बळीराम राठोड-- माजी खासदार,संस्थापक(मृत्यू:७ मार्च १९९७)**१९११:डॉ.पांडुरंग वासुदेव तथा पां. वा. सुखात्मे – आंतरराष्ट्रीय कीर्तीचे संख्याशास्त्रज्ञ व आहारतज्ञ, पद्मभूषण (१९७१) (मृत्यू: २८ जानेवारी १९९७)**१९०७:वामनराव हरी देशपांडे-- महाराष्ट्रातील ख्यातनाम संगीतज्ञ, संगीतसमीक्षक व लेखक(मृत्यू:७ फेब्रुवारी १९९०)**१८९२:नारायण विनायक कुलकर्णी-- मराठी नाटककार(मृत्यू:१८जानेवारी १९४८)* *१६६७:योहान बर्नोली – स्विस गणितज्ञ (मृत्यू:१ जानेवारी १७४८)* *_मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन:_* ••••••••••••••••••••••••••••••••• *-२०१५: डॉ.अबुल पाकीर जैनुलाबदिन अब्दुल कलाम तथा ए. पी. जे. अब्दुल कलाम-- भारतीय शास्त्रज्ञ आणि भारताचे अकरावे राष्ट्रपती (कार्यकाळ २५ जुलै, इ.स. २००२ ते २५ जुलै, इ.स. २००७)'लोकांचे राष्ट्रपती' म्हणून लोकप्रियता.(जन्म:१५ऑक्टोबर १९३१)-**२०१०:रवी बसवानी-- भारतीय चित्रपट अभिनेता(जन्म:२९ सप्टेंबर १९४६)**२००७:वामन दत्तात्रय पटवर्धन – स्फोटके व शस्त्रास्त्र तज्ञ (जन्म: ३० जानेवारी १९१७)**२००२:कृष्णकांत – भारताचे १० वे उपराष्ट्रपती (जन्म: २८ फेब्रुवारी १९२७)**१९९२:अमजद खान–हिन्दी चित्रपटसृष्टीतील नावाजलेले खलनायक (जन्म:१२ नोव्हेंबर १९४०)**१९८०:मोहम्मद रझा पेहलवी – शाह ऑफ इराण (जन्म: २६ आक्टोबर १९१९)**१९७५:त्र्यं.र.ऊर्फ मामासाहेब देवगिरीकर – गांधीवादी नेते, खासदार. भारतीय राज्यघटनेचे मराठीत भाषांतर करुन २६ जानेवारी १९५० रोजीच ते वाचकांच्या हातात देण्याचे काम त्यांनी केले.* *१८४४:जॉन डाल्टन – इंग्लिश भौतिक व रसायनशास्त्रज्ञ (जन्म: ६ सप्टेंबर १७६६)*~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~ *_दिनविशेष या सदरातील सर्व मुद्दे हे संग्रहात्मक आहेत तेव्हा त्यात चूका नसतीलच असे सांगता येणार नाही_* *✍ संकलन :- श्रीराम चव्हाण माजी शिक्षणाधिकारी नागपूर*मोबाईल:9822695372 ईमेल: chavhansk65@gmail.com••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *✈ 🚀 गुगलयान ✈ 🚀*••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *दीर्घकथा - लक्ष्मी*मुलींच्या शिक्षणाचे महत्त्व सांगणारी कथा ज्यास फेसबुकवर अनेक वाचकांनी पसंती दर्शविलेली आहे. मला आशा आहे आपणांस ही कथा नक्की आवडेल. तेव्हा चला कथा वाचू या .....!तिसरा भाग -------https://m.facebook.com/story.php?story_fbid=2864596340333788&id=100003503492582&mibextid=Nif5ozकथा आवडल्यास आपल्या प्रतिक्रिया अवश्य कळवा.~~~~~~~~~~~~~~~~~~~✍ स्तंभलेखक *नासा येवतीकर, धर्माबाद*9423625769~~~~~~~~~~~~~~~~~~~ 🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••1⃣ *दिल्लीतील प्रगती मैदानावर देशातील सर्वात मोठं कन्व्हेन्शन सेंटरचं पंतप्रधान मोदींच्या हस्ते झालं उद्घाटन*•••••••••••••••••••••••••••••••••••••2⃣ *लडाखच्या त्रिशूल युद्ध स्मारकाच्या दर्जोन्नतीसाठी महाराष्ट्र शासनाकडून तीन कोटी रुपये*•••••••••••••••••••••••••••••••••••••3⃣ *PM Kisan Yojana: प्रतीक्षा संपली ! 27 तारखेला 14व्या हप्त्याची रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात होणार जमा*•••••••••••••••••••••••••••••••••••••4⃣ *कोयना धरणाची पाणीपातळी वाढली; कोयना, कृष्णा नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा*•••••••••••••••••••••••••••••••••••••5⃣ *कोळसा घोटाळा प्रकरणी माजी खासदार विजय दर्डा आणि त्यांचा मुलगा देवेंद्र दर्डा यांना चार वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा*•••••••••••••••••••••••••••••••••••••6⃣ *पोलीसभरतीमध्ये कंत्राटीकरण होणार नाही, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ह्यांची माहिती*•••••••••••••••••••••••••••••••••••••7⃣ *मलेशिया विरुद्ध चीन यांच्यादरम्यान झालेल्या T-20 सामन्यात सयाजरुल इद्रसने घेतले सात बळी*•••••••••••••••••••••••••••••••••••••*📷 वृत्त संकलक - कुणाल पवारे 📹*📱9960358300•••••••••••••••••••••••••••••••••••••ही पोस्ट नियमित मिळविण्यासाठी आणि या समुहात add होण्यासाठी 9423625769 येथे संपर्क करावे.••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• 🌷🍃 *विशेष माहिती* 🌷🍃••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••एकदा गौतम बुद्धांनी त्यांच्या शिष्यांना विचारले, "आपण रागात असताना जोरात ओरडतो किंवा कोणाशी भांडण झाले असल्यास आपोआप आपला आवाज वाढतो, असे का?"सर्व शिष्य विचार करु लागले. एका शिष्याने उत्तर दिले, "रागावलेले असताना आपण स्वतःवरचे नियंत्रण हरवुन बसतो, आणि म्हणुनच कदाचित ओरडून बोलतो."यावर गौतम बुद्ध म्हणाले, "पण ज्या व्यक्तीवर आपण रागावलेले असतो ती समोरच असते तरीसुध्दा आपण ओरडतो... जरी सौम्य आणि मृदु आवाजात बोलणे शक्य असले तरी देखील रागात आपण चढ्या आवाजातच बोलतो". यावर सर्व शिष्यांनी विचार केला आणि आपापल्या परीने उत्तर देण्याचा प्रयत्न केला. मात्र कोणत्याच उत्तराने बुद्धांचे समाधान झाले नाही.शेवटी बुद्धांनी स्वतःच उत्तर दिले.ते म्हणाले, "जेव्हा दोन व्यक्ती एकमेकांवर रागावलेल्या असतात तेव्हा त्यांच्या मनांमध्ये अंतर वाढलेले असते आणि हेच अंतर भरुन काढण्याकरीता ते चढ्या आवाजात बोलतात.""आता मला सांगा की जेव्हा दोन व्यक्ती परस्परांच्या प्रेमात असतात तेव्हा अतिशय हळू आणि शांतपणे बोलतात, असे का?"असा प्रश्न विचारुन मग स्वतःच उत्तर देत ते म्हणाले...."कारण त्यांची मनं जवळ आलेली असतात. दोन मनांतील अंतर कमी झालेले असते. आणि जसजसे दोन्ही मनात प्रेम वाढु लागते तसतसे त्यांच्यातील संवाद इतका सुलभ होउन जातो की सर्वच गोष्टी बोलण्याची देखील आवश्यकताच भासत नाही. फक्त नजरेतूनच किंवा देहबोलीतूनच ते आपल्या साथीदाराला काय म्हणायचे आहे ते ओळखतात.*शिकवण* - परस्परांत वादविवाद आणि भांडणतंटे होतंच राहतात मात्र कितीही वादविवाद असला तरी मनामनातील अंतर वाढू देऊ नका... तसे होऊ दिल्यास दोन व्यक्तिंमधील दरी इतकी मोठी होईल की पुन्हा ती मिटवणे कधीच शक्य होणार नाही.*संकलन*••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• 🌹 *" फ्रेश सुविचार "* 🌹••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••जीवनातील अंधकार नाहीसा करणारी ज्योत म्हणजे हास्य.*संकलन :- प्रमिलाताई सेनकुडे, नांदेड**प्रा.शा. गोजेगाव ता.हदगाव, जि. नांदेड*📱9403046894••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• ❓ *आजची प्रश्नमंजुषा* ❓••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••१) महाराष्ट्र राज्याचा सर्वोच्च क्रीडा पुरस्कार कोणता ?२) भाषेच्या आधारावर सर्वात प्रथम कोणत्या राज्याची निर्मिती झाली ?३) जगात सर्वाधिक विश्वासार्ह कोण ?४) पहिला जागतिक इमोजी दिवस केव्हा साजरा केला गेला ?५) 'जहाँ डाल डाल पर सोने की चिडिया करती है बसेरा, वो भारत देश है मेरा' हे प्रसिद्ध गाणे कोणी लिहिले ?*उत्तरे :-* १) शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कार २) आंध्रप्रदेश ३) डॉक्टर ४) १७ जुलै २०१४ ५) गीतकार राजेन्द्र कृष्ण*संकलन :- जैपाल भै. ठाकूर*जि.प.व.प्राथ.शाळा भोसा, ता. आमगाव, जि. गोंदिया 📱9765943144••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎂 *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *◆|वा|ढ|दि|व|स|अ|भि|ष्ठ|चिं|त|न|◆* 👤 हणमंत पडवळ, साहित्यिक, लातूर👤 शशिकला बनकर, साहित्यिक, पुणे👤 स्वाती राधाकिशन बोधगमवार👤 कु. जयश्री विठ्ठल कोंदापुरे, भोसी👤 उत्कर्ष मादसवार, हिमायतनगर👤 श्रीकांत क्यादरवाड, धर्माबाद*ઉदंड_आયુષ્યાच्या अનંત_શુभेच्छा,* [ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा एक दिवस अगोदर 9423625769 येथे पोस्ट करावे. ]••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• ••• 💡 ‼ *मनाचे श्लोक*‼ 💡•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••सदा चक्रवाकासि मार्तंड जैसा। उडी घालितो संकटी स्वामि तैसा॥ हरीभक्तिचा घाव गाजे निशाणी। नुपेक्षी कदा राम दासाभिमानी॥३७॥।। जय जय रघुवीर समर्थ ।।••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🕊🌎 ‼ *विचारधारा*‼🕊🌎••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••जे,कोणी आपल्याला काही सांगत असतील तर त्यांचे बोलणे किंवा त्यांचे विचार आपण शांतपणे ऐकून घ्यावे.पण, आपल्या मनाला काय वाटते ते, आपणच ठरवावे कारण बरेचदा असं होतं की,आपल्या मनाचे ऐकून,न घेता जेव्हा आपण दुसऱ्यांवर पूर्ण विश्वास ठेवतो तेव्हा जे, चांगले करायचे राहते तेही राहून जाते अन् बऱ्याच अडचणींचा सामना सुद्धा आपल्यालाच करावा लागतो.🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷सौ.संगीता संतोष ठलाल मु. कुरखेडा जि. गडचिरोली••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎭 *आजची फ्रेश बोधकथा* 🎭••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••*टोपीवाला आणि माकडे*एक टोपीवाला होता. तो रोज टोप्या विकायला शेजारच्या गावात जात असे. जाताना जंगल लागत असे. एकदा तो दुपारी जंगलातून जात असताना तो थांबतो व झाडाच्या खाली जरा वेळ विश्रांती घेतो. तेव्हा तेथे झाडावर असलेली माकडे खाली उतरतात आणि त्याची पेटी उघडून त्यातल्या टोप्या घेऊन झाडाचे टोक गाठतात. थोडया वेळाने, त्या टोपीवाल्याला जाग येते. पाहतो तर काय. पेटीतील सगळ्या टोप्या गायब. तो इकडे तिकडे बघतो. काहीच दिसत नाहीत. मग वर बघतो, तर सगळ्या माकडांच्या डोक्यावर टोप्या. तो काळजीत पडतो. काय करावे हे त्याला सुचत नाही. तो त्यांना दगडे मारतो. पण ते झाडावरची फळे फेकून त्याला मारतात. शेवटी वैतागून तो आपल्या डोक्यावरची टोपी खाली फेकतो. हे पाहून ती माकडेही आपल्या डोक्यावरच्या टोप्या खाली फेकतात. तो पटापट आपल्या टोप्या गोळा करतो आणि तेथून निघून जातो. तात्पर्य : शक्तीपेक्षा युक्ती श्रेष्ठ.•••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••या पोस्ट विषयी आपल्या सूचना, निवेदन, अभिप्राय, बातम्या, वाढदिवस, माहिती किंवा शंका 9423625769 येथे कळवावे. •••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••~~~~~~~~~~~~~~~~~~~*🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢*📱 9423625769~~~~~~~~~~~~~~~~~~~*🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏*पुन्हा भेटू या फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार ~~~~~~~~~~~~~~~~~~~
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment