✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट~~~~~~~~~~~~~~~~~~~ 6️⃣ 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 6️⃣ ( फ्रेश शालेय परिपाठ )🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00 ( रविवार आणि सुट्टी वगळून )~~~~~~~~~~~~~~~~~~~🎇 दिनांक :- 03 जुलै 2023💠 वार - सोमवार••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *✈ 🚀 गुगलयान ✈ 🚀*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••गुरुपौर्णिमा निमित्ताने सर्व गुरुवर्य मंडळींना साष्टांग दंडवत *कथा - नवऱ्याचे मी पण*माणसाचे नशीब कसे असते ? क्षणात काय घडणार आहे ? याची जराशी देखील कल्पना नसते. क्षणात होत्याचे नव्हते होऊन जाते. दैव, नशीब, प्रारब्ध, ललाटरेषा आधारित फेसबुकच्या आम्ही साहित्यिक समुहात प्रचंड गाजलेली ही कथा आहे. मला आशा आहे आपणांस ही कथा नक्की आवडेल. तेव्हा चला कथा वाचू या .....!नववा भाग -------https://www.facebook.com/groups/aamhi.saahityik/permalink/7283425418340477/?mibextid=Nif5ozकथा आवडल्यास आपल्या प्रतिक्रिया अवश्य कळवा.~~~~~~~~~~~~~~~~~~~✍ स्तंभलेखक *नासा येवतीकर, धर्माबाद*9423625769~~~~~~~~~~~~~~~~~~~••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• 🚥 *३ जुलै २०२३* 🚥 🌺 *_दिनविशेष_* 🌺 ••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *_ या वर्षातील १८४ वा दिवस आहे_* •••••••••••••••••••••••••••••••• *_महत्त्वाच्या घटना:_* •••••••••••••••••••••••••••••• *२००६:एक्स. पी. १४ हा लघुग्रह पृथ्वीच्या अगदी जवळुन (साधारण चंद्राइतक्या अंतरावरुन) गेला.**२००१:सुधीर फडके यांना राज्य सरकारचा ’गानसम्राज्ञी लता मंगेशकर पुरस्कार’ जाहीर**२०००:विक्रांत या विमानवाहू युद्धनौकेचे मुंबईच्या समुद्रात ऑयस्टर रॉकजवळ सागरी संग्रहालयात रुपांतर करण्यास नौदल, राज्यसरकार, मुंबई पोर्ट ट्रस्ट आणि मच्छिमार प्रतिनिधींनी मान्यता दिली.**१९९८:’ए मेरे वतन के लोगो ...’ या प्रसिद्ध गाण्याचे कवी प्रदीप यांना दादासाहेब फाळके पुरस्कार जाहीर**१९३८:'मॅलार्ड' हे वाफेचे इंजिन ताशी १२६ मैल (२०२ कि. मी.) वेगाने न्यू कॅसलहून लंडनला पोहोचले. वाफेच्या इंजिनाचा हा वेगाचा विक्रम अजूनही अबाधित आहे.**१८९०:आयडाहो हे अमेरिकेचे ४३ वे राज्य बनले.**१८८६:जर्मनीच्या कार्ल बेन्झ याने जगातील पहिली मोटारगाडी बनवली.**१८८४:डाऊ जोन्स (DJIA) हा निर्देशांक सुरू झाला.**१८५५:भारतात कायदे शिक्षणाचा प्रारंभ झाला.**१८५२:महात्मा फुले यांनी गरीब मुलांसाठी पहिली शाळा काढली.**१६०८:सॅम्यूअल बी. चॅम्पलेन यांनी कॅनडातील क्वेबेक शहराची स्थापना केली.**_जन्मदिवस / जयंती / वाढदिवस_* •••••••••••••••••••••••••••••••••*१९८३: तान्हाजी भगवान खोडे -- कवी* *१९८०:हरभजनसिंग – भारतीय क्रिकेटपटू**१९७६:हेन्री ओलोंगा – झिम्बाब्वेचे क्रिकेटपटू**१९७१:सपना अशोक बन्सोड -- कवयित्री* *१९६७:तिग्मांशु धुलिया-- भारतीय चित्रपट संवाद लेखक, दिग्दर्शक, अभिनेता, पटकथा लेखक, निर्माता**१९६४: शमसाद मुजावर -- कवयित्री* *१९६३:श्रीकांत साहेबराव देशमुख-- मराठीतील साहित्य अकादमी पुरस्कार प्राप्त लेखक,सनदी अधिकारी* *१९५७:अनिल दाभाडे -- कवी,लेखक* *१९५६: विशाखा बागडे -- लेखिका, शिक्षणतज्ज्ञ* *१९५१:सर रिचर्ड हॅडली – न्यूझीलंडचे क्रिकेटपटू**१९४६:प्रा.फ.म. शहाजिंदे (फकीरपाशा महेबूब शहाजिंदे)-- साहित्यिक,कवी,समीक्षक, समाजसेवक* *१९४२:प्रा.अ.वि.विश्वरूपे _ लेखक संस्कृत,इतिहास विषयाचे अभ्यासक* *१९२६:सुनीता देशपांडे – लेखिका व स्वातंत्र्यसैनिक (मृत्यू: ७ नोव्हेंबर २००९)**१९२१:प्रा.त्र्यंबक हरी लागू-- लेखक* *१९१४:दत्तात्रय गणेश गोडसे – इतिहासकार, नाटककार, कलादिग्दर्शक, वेशभूषाकार आणि नेपथ्यकार (मृत्यू: ५ जानेवारी १९९२)**१९१२:श्रीपाद गोविंद नेवरेकर – मराठी रंगभूमीवरील लोकप्रिय गायक व नट (मृत्यू: १६ जून १९७७)**१९०९:बॅरिस्टर व्ही. एम. तथा ’भाऊसाहेब’ तारकुंडे – कायदेपंडित, स्वातंत्र्यसैनिक, मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश व सर्वोच्च न्यायालयात सामाजिक समस्यांसाठी लढा देणारे झुंजार कायदेतज्ञ (मृत्यू: २२ मार्च २००४)**१९०२:द. ह.अग्निहोत्री -- कोशकार,भाषाशास्त्राचे अभ्यासक, समीक्षक(मृत्यू:२२ नोव्हेंबर १९९० )**१८८६:रामचंद्र दत्तात्रय तथा ’गुरूदेव’ रानडे – आधुनिक विद्याविभूषित तत्त्वज्ञ व संत, फर्ग्युसन व विलींग्डन महाविद्यालयातील तत्त्वज्ञानाचे प्राध्यापक (मृत्यू: ६ जून १९५७)**१८३८:मामा परमानंद – पत्रकार व विचारवंत, प्रार्थना समाजाचे एक संस्थापक (मृत्यू: १३ सप्टेंबर १८९३)**_मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन:_* •••••••••••••••••••••••••••••••••*२०२०:सरोज खान-- हिंदी चित्रपटसृष्टीतील भारतीय नृत्यदिग्दर्शिका(जन्म:२२ नोव्हेंबर १९४८)**२००३:स्नेहलता दसनूरकर -- मराठी लेखिका, शिक्षणतज्ज्ञ(जन्म:७ मार्च १९१८)**१९९६:कुलभूषण पंडित तथा ’राजकुमार’ ऊर्फ ’जानी’ – जबरदस्त आवाजाने संवादफेक करून प्रेक्षकांना खूष करणारा सुप्रसिद्ध हिन्दी चित्रपट अभिनेता (जन्म: ८ आक्टोबर १९२६)**१९६९:ब्रायन जोन्स – ‘द रोलिंग स्टोन्स‘चे संस्थापक, गिटार, हार्मोनिका आणि पियानो वादक (जन्म: २८ फेब्रुवारी १९४२) ~~~~~~~~~~~~~~~~~~~~~ *_दिनविशेष या सदरातील सर्व मुद्दे हे संग्रहात्मक आहेत तेव्हा त्यात चूका नसतीलच असे सांगता येणार नाही_* *✍ संकलन :- श्रीराम चव्हाण माजी शिक्षणाधिकारी नागपूर*मोबाईल:9822695372 ईमेल: chavhansk65@gmail.com••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• 🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••1⃣ *महाराष्ट्राच्या राजकारणात महाभूंकप; राष्ट्रवादीच्या आमदारांसह अजित पवारांनी घेतली उपमुख्यमंत्रिपदाची शपथ, अजितदादांना 35 आमदारांचा पाठिंबा*•••••••••••••••••••••••••••••••••••••2⃣ *मुंबईसह ठाण्याला ऑरेंज अलर्ट, जुलै महिन्यात महाराष्ट्रात सरासरीहून अधिक पावसाची शक्यता, हवामान विभागाचा अंदाज, पेरण्या खोळंबल्यानं बळीराजा चिंतेत*•••••••••••••••••••••••••••••••••••••3⃣ *बम बम भोले... अमरनाथ यात्रेला उत्साहात सुरुवात, पहिल्याच दिवशी 7,900 भाविक बाबा बर्फानींच्या चरणी लीन*•••••••••••••••••••••••••••••••••••••4⃣ *पुणे :- भुशी धरणावर पर्यटकांची गर्दी; पावसामुळे वातावरण बहरले*•••••••••••••••••••••••••••••••••••••5⃣ *कर्नाटकहून दिल्लीला जाणाऱ्या केके एक्सप्रेस इंजिनला आग; सुदैवाने जीवितहानी नाही*•••••••••••••••••••••••••••••••••••••6⃣ *भारतीय फुटबॉल संघाने (Team India) शानदार विजयासह सॅफ चॅम्पियनशिपच्या अंतिम फेरीत प्रवेश केला आहे.*•••••••••••••••••••••••••••••••••••••7⃣ *क्रिकेट जगतावर अधिराज्य गाजवणाऱ्या वेस्ट इंडिजवर विश्वचषकातून बाहेर पडण्याची नामुष्की*•••••••••••••••••••••••••••••••••••••*📷 वृत्त संकलक - कुणाल पवारे 📹*📱9960358300•••••••••••••••••••••••••••••••••••••ही पोस्ट नियमित मिळविण्यासाठी आणि या समुहात add होण्यासाठी 9423625769 येथे संपर्क करावे.••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• 🌷🍃 *विशेष माहिती* 🌷🍃••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••*गुरुपौर्णिमा विशेष*गुरुपौर्णिमा म्हणजे एक प्राचीन काळापासून चालत असलेली परंपरा आहे. गुरूंबद्दल पुढील श्लोकात वर्णन केले आहे :गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णुः, गुरुर्देवो महेश्वरः।गुरुसाक्षात परंब्रह्म, तस्मै श्रीगुरवे नमः।।वैदिक परंपरेत व्यक्तीपूजन, ग्रंथपूजन नाही तर तत्वांचे पूजन आणि तत्वांचे पालन यांना महत्त्व दिले आहे. गुरू म्हणजे एखाद्या व्यक्तीपेक्षा अधिक ज्ञानी, तापसी, आदरणीय अवस्था असते. गुरू ही कदाचित एखादी व्यक्ती, प्रतिमा, पुतळा असे काहीही असू शकते.महर्षि व्यास हे भारतीय संस्कृतीचे शिल्पकार आणि मूलाधार होत. भारतीय संस्कृतीची मूळ संकल्पना आणि पुढची जोपासना व्यासांनीच केली आहे. व्यासांनी वेदांचे नीटपणे विभाजन आणि संपादन केले. पूर्वी वेद एकच होता, त्याचे चार भाग व्यासांनी केले. व्यासांनी महाभारत लिहिले महाभारत हा जगातील सर्वश्रेष्ठ व अलौकिक ग्रंथ! महाभारतात धर्मशास्त्र आहे, नीतिशास्त्र आहे, व्यवहारशास्त्र आहे आणि मानसशास्त्रही आहे. महाभारताची रचना करणारे व्यास त्या कथेशी फार जवळून संबंधित होते. महान ऋषि पराशर यांच्या सहवासात मत्सगंधा नावाच्या कुमारिकेला पुत्रप्राप्ती झाली. त्यांनाच आपण वेदव्यास या नावाने ओळखतो. मत्सगंधा नावाची कुमारिका पुढे हस्तिनापुर राज्याचे राजा शंतनु यांची पत्नी झाली, त्यांनाच आपण देवी सत्यवती या नावाने ओळखतो. देवी सत्यवतीला कौमार्यावस्थेत झालेला पुत्र म्हणजे व्यास! पुढे सत्यवती हस्तिनापूरची राणी झाली. हा पुत्र व्दैपायन नावाच्या बेटावर राहत त्यामुळे त्यांचे नाव कृष्ण व्दैपायन असे पडले. ऋषि पराशर यांचे पुत्र असल्यामुळे त्यांना पाराशर या नावाने सुद्धा ओळखले जाते.*संकलन*••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• 🌹 *" फ्रेश सुविचार "* 🌹••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••जे सत्य असते ते काळाच्या ओघात टिकते, असत्य असते ते अदृश्य होते.➖साने गुरुजी*संकलन :- प्रमिलाताई सेनकुडे, नांदेड**प्रा.शा. गोजेगाव ता.हदगाव, जि. नांदेड*📱9403046894••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• ❓ *आजची प्रश्नमंजुषा* ❓••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••१) महात्मा फुले यांनी अस्पृश्यांच्या मुलांसाठी पहिली शाळा केव्हा उघडली ?२) 'कॉम्प्युटरचा पितामह' कोणाला म्हटले जाते ?३) नळदुर्ग हा भुईकोट किल्ला कोणत्या जिल्हयात आहे ?४) जगातील सर्वात क्षारयुक्त समुद्र कोणता ?५) टाकसाळ म्हणजे काय ?*उत्तरे :-* १) ३ जुलै १८८६ २) चार्ल्स बॅबेज ३) धाराशिव ( जुने नाव उस्मानाबाद ) ४) मृत समुद्र ५) नाणी बनवण्याचा कारखाना*संकलन :- जैपाल भै. ठाकूर*जि.प.व.प्राथ.शाळा भोसा, ता. आमगाव, जि. गोंदिया 📱9765943144••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎂 *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *◆|वा|ढ|दि|व|स|अ|भि|ष्ठ|चिं|त|न|◆* 👤 विजय लक्ष्मणराव लंके👤 साहेबराव कांबळे👤 सविता सावंत👤 दिगंबर माने👤 बालाजी मुंडलोड👤 संतोष नलबलवार👤 श्रीराम पाटील👤 उत्तम पाटील नरवाडे, सहशिक्षक*ઉदंड_आયુષ્યાच्या अનંત_શુभेच्छा,* [ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा एक दिवस अगोदर 9423625769 येथे पोस्ट करावे. ]••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• ••• 💡 ‼ *मनाचे श्लोक*‼ 💡•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••मना पाहतां सत्य हे मृत्युभूमी। जितां बोलती सर्वही जीव मी मी॥ चिरंजीव हे सर्वही मानिताती। अकस्मात सांडूनिया सर्व जाती ॥१५॥।। जय जय रघुवीर समर्थ ।।••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🕊🌎 ‼ *विचारधारा*‼🕊🌎••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••आपल्यावर आलेल्या परिस्थितीवर जर कोणी खळखळून हसत असेल तर.. त्याचा तो मूळ स्वभाव असू शकतो. त्या प्रकारचा स्वभाव कधीच बदलत नाही. पण, आपला स्वभाव मात्र त्या प्रकारचा नसायला पाहिजे. तर..एकाद्याची अडचण,परिस्थिती जाणून आपुलकीच्या नात्याने दोन शब्द बोलण्याची तसेच समजून घेण्याची आपल्यात थोडीतरी माणुसकी जिवंत असायला पाहिजे. कारण, आजच्या घडीला या प्रकारची माणुसकी जिवंत ठेवणे काळाची गरज आहे. 🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷सौ.संगीता संतोष ठलाल मु.कुरखेडा जि.गडचिरोली••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎭 *आजची फ्रेश बोधकथा* 🎭••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *समाधान*एक श्रीमंत सावकार होते , अलोट संपत्ती होती , पुढील सातपिढ्या जरी बसून खाल्या तरी संपणार नाही एवढी संपत्ती मिळवली होती, तरी पण हा श्रीमंत सुखी नव्हता . मनात काहीतरी विवंचना होती त्यामुळे रात्रभर झोप यायची नाही त्यामुळे खऱ्या सुखाला तो वंचित झाला होता.त्याने प्रत्येकाला विचारावे मी काय करू म्हणजे या विवंचनेतून मी सुटेन आणि मला सुखाची झोप लागेल ! त्याला कोणीतरी सांगितले तू संताना शरण जा म्हणजे संतचं यातून तुला सोडवतील .श्रीमंत संतांच्या शोधार्थ निघाला वाटेत एका झाडाखाली एक साधु महाराज बसले होते त्याना नमस्कार करून श्रीमंत म्हणाला महाराज मला काहीही कमी नाही पुढील सात पिढ्या बसुन खातील एवढं मिळवलं आहे तरी मी सुखी नाही, एक विवंचना मला झोप येवु देत नाही त्यामुळे मी सुखी नाही.साधु महाराज म्हणाले आधि विवंचना काय आहे ते सांग म्हणजे त्यातून कसे सुटायचे ते सांगतो , श्रीमंत म्हणाला महाराज तसं म्हणाल तर मला काहीही विवंचना नाही पण एकच विवंना आहे आणि ती म्हणजे माझ्या आठव्या पिढीचे काय होईल ? कारण सात पिढ्याचे कमवून ठेवले आहे चिंता आहे ती आठव्या पिढिची !साधु महाराज हसले आणि म्हणाले काळजी करु नकोस मी तुला यातून सोडवतो .साधुनी त्याला एक किलोभर तांदळाची पिशवी दिली आणि सांगितले की त्या डोंगरावर एक म्हातारी एका झोपडीत राहते तिला हे तांदूळ देवून ये म्हणजे मी तुला तुझ्या विवंचनेतून मुक्त करतो .तांदूळ घेऊन श्रीमंत म्हातारीच्या झोपडीत आला ज्या झोपडीला दार सुद्धा नव्हते. ती भगवंताच्या भजनात दंग होती, तिची भावसमाधी लागली होती, श्रीमंताच्या पायाच्या आवाजाने आजीची भावसमाधी भंग पावली , तिने वर बघितले आणि म्हणाली का आलास बाबा ईथे ? तो म्हणाला म्हातारे तुला तांदूळ द्यायला आलो आहे हे घे मग मी जातो . ती म्हणाली कारे तुला मागीतले होते का ? तुझ्या समोर हात पसरला होता का ? नाही ना ? मग का आणलेस तांदूळ ? ही पिशवी उचल आणि चालायला लाग तो म्हणाला मला त्या झाडाखाली बसलेल्या साधुने पाठवले आहे म्हणून मी आलोय, ती म्हणाली त्या साधुला जाऊन सांग की अजून दोन दिवस पुरतील एवढे तांदूळ माझ्या झोपडीत आहेत .श्रीमंताने आपली अक्कल चालवली तो म्हणाला म्हातारे तिसर्या दिवसाला होतील राहू दे.ती म्हणाली माझ्या तिसऱ्या दिवसाची चिंता तुलाही नको आणि त्या साधुलाही नको त्याला सांग माझ्या तिसर्या दिवसाच्या तांदळाची चिंता मी ज्याच्यावर सर्वस्वाचा भार टाकून या निर्जन स्थळी भजन करत बसलेय त्याला आहे.हे ऐकून श्रीमंत पिशवी घेऊन परत आला आणि साधु समोर पिशवी ठेवून निघाला. साधुने त्याला हाक मारली अरे ! विवंचना घेऊन आला होतास ना ? मी तुला त्यातुन सोडवणार आहे. श्रीमंत खाली मान घालून म्हणाला महाराज मला उत्तर मिळाले तिसऱ्या दिवसाच्या तांदळाची चिंता न करणारी म्हातारी जेवढी सुखी आहे तेवढा मी महामूर्ख दुःखी आहे.•••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••या पोस्ट विषयी आपल्या सूचना, निवेदन, अभिप्राय, बातम्या, वाढदिवस, माहिती किंवा शंका 9423625769 येथे कळवावे. •••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••~~~~~~~~~~~~~~~~~~~*🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢*📱 9423625769~~~~~~~~~~~~~~~~~~~*🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏*पुन्हा भेटू या फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार ~~~~~~~~~~~~~~~~~~~
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment