✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट~~~~~~~~~~~~~~~~~~~ 6️⃣ 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 6️⃣ ( फ्रेश शालेय परिपाठ )🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00 ( रविवार आणि सुट्टी वगळून )~~~~~~~~~~~~~~~~~~~🎇 दिनांक :- 01 जुलै 2023💠 वार - शनिवार••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *✈ 🚀 गुगलयान ✈ 🚀*••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *कथा - नवऱ्याचे मी पण*कुटुंबातील नात्यात असलेला घालमेल, प्रेम, जिव्हाळा आणि तिरस्कार यावर आधारित फेसबुकवर अनेक वाचकांना पसंत पडलेली ही कथा आहे. मला आशा आहे आपणांस ही कथा नक्की आवडेल. तेव्हा चला कथा वाचू या .....!आठवा भाग -------https://www.facebook.com/groups/aamhi.saahityik/permalink/7281828088500210/?mibextid=Nif5ozकथा आवडल्यास आपल्या प्रतिक्रिया अवश्य कळवा.~~~~~~~~~~~~~~~~~~~✍ स्तंभलेखक *नासा येवतीकर, धर्माबाद*9423625769~~~~~~~~~~~~~~~~~~~••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• 🚥 *१ जुलै २०२३* 🚥 🌺 *_दिनविशेष_* 🌺 ••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••*_महाराष्ट्र कृषी दिन_**_राष्ट्रीय डॉक्टर दिन_* ••••••••••••••••••••••••••••••••••• *_ या वर्षातील १८२ वा दिवस आहे_* •••••••••••••••••••••••••••••••• *_महत्त्वाच्या घटना:_* •••••••••••••••••••••••••••••• *१९९७:शतकातील सर्वोत्कृष्ट वेटलिफ्टर्सच्या यादीत भारताच्या कुंजरानी देवीचा समावेश करण्यात आला.**१९६४:न. वि. गाडगीळ पुणे विद्यापीठाचे पाचवे कुलगुरू झाले.**१९६२:सोमालिया व घाना हे देश स्वतंत्र झाले.**१९६०:रवांडा व बुरुंडी हे देश स्वतंत्र झाले.**१९५५:’स्टेट बँक ऑफ इंडिया अॅक्ट १९५५’ अन्वये स्टेट बँक ऑफ इंडिया अस्तित्त्वात आली.**१९४९:त्रावणकोर व कोचीन ही दोन संस्थाने एकत्र करुन ’थिरुकोची’ संस्थान निर्माण करण्यात आले. याचेच पुढे केरळ राज्य बनले.**१९४८:बाजारपेठेतील व्यापार्यांचे नेतृत्त्व करणार्या ’पूना मर्चंट्स चेंबर’ या संस्थेची स्थापना**१९४७:फिलिपाइन्सच्या वायूदलाची स्थापना झाली.**१९०९:क्रांतिकारक मदनलाल धिंग्राने भारतमंत्र्यांचे स्वीय सहाय्यक कर्नल विल्यम कर्झन वायली यांची इंपिरिअल इन्स्टिट्युटच्या ’जहांगिर हाऊस’मधे इंडियन नॅशनल असोसिएशनच्या सभेच्या वेळी गोळ्या झाडून हत्या केली.**१८८१:कॅनडातुन अमेरिकेत जगातील पहिला आंतरराष्ट्रीय टेलिफोन कॉल करण्यात आला.**१८३७:जन्म, मृत्यू व विवाह यांच्या सरकारी नोंदणीस इंग्लंडमधे सुरूवात झाली.**_जन्मदिवस / जयंती / वाढदिवस:_* •••••••••••••••••••••••••••••••••*१९८६:बाळासाहेब साहेबराव चन्ने -- लेखक कवी**१९७९:लीना भुसारी - खैरकर-- कवयित्री* *१९७८:रवींद्र उद्धवराव भयवाळ-- लेखक,समीक्षक, संपादक* *१९७८:लीलाधर रामेश्वरजी दवंडे--कवी, लेखक**१९७५:प्रा.डॉ.अनंता सूर-- प्रसिद्ध कवी लेखक,समीक्षक, संपादक* *१९७५:दादाराव डोल्हारकर-- कवी लेखक तथा मुख्याधिकारी* *१९७४:प्रा.डॉ.शिवाजी भिकाजीराव हुसे-- कवी,लेखक,संपादक* *१९७२:काशिनाथ (का.रा.) चव्हाण -- प्रसिद्ध कवी* *१९७२:अशोक पवार -- लेखक* *१९७१:श्रीकांत बापूराव पेठकर-- लेखक कवी**१९७०:परसराम रामा आंबी-- लेखक**१९६९: सुरेश महादेवराव देशमुख -- लेखक**१९६९:ग्रामगीताचार्य बंडोपंत बोढेकर-- प्रसिद्ध कवी लेखक* *१९६७:विठ्ठल नागेश गावडे परवाडकर -- नाटककार,लेखक कवी* *१९६६:उस्ताद राशिद खान – रामपूर-साहसवान घराण्याचे शास्त्रीय गायक**१९६३: रेखा अशोक ढोले-- कवयित्री* *१९६३:परमेश्वर श्रीराम व्यवहारे-- कवी, लेखक* *१९६३: अनिल मनोहर खोब्रागडे- प्रसिद्ध लेखक, कवी* *१९६३:डॉ सतीश पावडे-- लेखक, समीक्षक, नाट्यलेखक**१९६२:जयकुमार चर्जन-- लेखक* *१९६२: गजानन श्रीराम निमकर्डे-- लेखक* *१९६१:कल्पना चावला–भारतीय वंशाच्या अमेरिकन अंतराळवीर(मृत्यू:१ फेब्रुवारी २००३)**१९६०:डॉ.किरण कृष्णराव नागतोडे-- प्रसिद्ध लेखिका* *१९६०:सुदेश भोसले-- भारतीय पार्श्वगायक**१९६०:चुडाराम हिरामण बल्हारपुरे -- लेखक**१९६०: युवराज गंगाराम-- समीक्षक,लेखक, कवी* *१९५८:रामचंद्र गोविंद कुलकर्णी- प्रसिद्ध कवी लेखक तथा निवृत्त सनदी अधिकारी**१९५८:प्रा.डॉ.अविनाश आवलगावकर-- सुप्रसिद्ध साहित्यिक, समीक्षक* *१९५७: प्रा डॉ. दिलीप व्यंकटेश अलोणे -- प्रसिद्ध लेखक,निवेदक* *१९५७:प्रा.यशवंत माळी -- प्रसिद्ध लेखक कवी* *१९५४: सुधीर जाधव -- लेखक* *१९५४:प्रा.डॉ.राम बोडेवार -- लेखक* *१९५२:विठ्ठल पांडुरंग पाटील-- लेखक, कवी तथा निवृत्त शिक्षणाधिकारी* *१९५०:प्रा.डॉ.सुभाष जगन्नाथ गढीकर -- लेखक,समीक्षक* *१९५०: डॉ श्रीपाल सबनीस-- सुप्रसिद्ध साहित्यिक ८९व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष* *१९४९:वेंकय्या नायडू – मा.उपराष्ट्रपती, भारतीय जनता पक्षाचे माजी अध्यक्ष**१९४८:अनंत प्रभाकर देशमुख--समीक्षक**१९४६: हिरामण लांजे-- प्रसिद्ध कवी, लेखक,झाडी बोली साहित्याचे गाढे अभ्यासक* *१९४५:विजय पुरूषोत्तम नाईक-- प्रसिद्ध लेखक,अनुवादक,सकाळ वृत्त समूहाचे दिल्लीस्थित सल्लागार संपादक**१९३९:दौलतभाई आयुब खा पठाण-- कवी, लेखक* *१९३८:पंडित हरिप्रसाद चौरसिया – बासरीवादक, पद्मविभूषण**१९३७:शामराव गोविंदराव लाघवे-- लेखक* *_१९१३:वसंतराव नाईक – महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री, रोजगार हमी योजनेचे जनक हरित क्रांतीचे प्रणेते राज्यात १९७२ साली पडलेल्या भीषण दुष्काळाला त्यांनी समर्थपणे तोंड दिले. राज्याला स्थैर्य दिले. रोजगार हमी योजना महाराष्ट्रात सुरू केली आणि आता ती देशपातळीवरही सुरू करण्यात आली (मृत्यू:१८ऑगस्ट १९७९)_**१९०७:प्रा.पा.कृ.सावळापूरकर -- लेखक,जुन्या पिढीतील संशोधक (मृत्यू:२७ फेब्रुवारी १९९५)**१८८७:कविवर्य एकनाथ पांडुरंग रेंदाळकर (मृत्यू: १९२०)**_मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन:_* •••••••••••••••••••••••••••••••••*१९९४:राजाभाऊ नातू – दिग्दर्शक, नेपथ्यकार, प्रकाशयोजक व नाट्य संघटक* *१९८९:प्राचार्य गणेश हरी पाटील – कवी, शिक्षणतज्ञ,बालगीतकार(जन्म:१९ आगस्ट १९०६)**१९६९:मुरलीधरबुवा निजामपूरकर – कीर्तनकार**१९६२:पुरुषोत्तम दास टंडन – स्वातंत्र्यसेनानी, भारतरत्न (१९६१), राष्ट्रभाषा हिन्दीचे समर्थक, (जन्म: १ ऑगस्ट १८८२)**१९३८:गणेश श्रीकृष्ण तथा 'दादासाहेब’ खापर्डे – प्रख्यात कायदेपंडित, विद्वान आणि राजकीय नेते,’वर्हाडचे नबाब’ (जन्म: २७ ऑगस्ट १८५४) ~~~~~~~~~~~~~~~~~~~~~ *_दिनविशेष या सदरातील सर्व मुद्दे हे संग्रहात्मक आहेत तेव्हा त्यात चूका नसतीलच असे सांगता येणार नाही_* *✍ संकलन :- श्रीराम चव्हाण माजी शिक्षणाधिकारी नागपूर*मोबाईल:9822695372 ईमेल: chavhansk65@gmail.com••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• 🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••1⃣ *शिंदे-फडणवीस सरकारला एक वर्ष पूर्ण*•••••••••••••••••••••••••••••••••••••2⃣ *शिंदे आणि फडणवीसांच्या बैठकीत मंत्रिमंडळ विस्ताराचा फॉर्म्युला ठरला, शिंदेंच्या शिवसेनेला केंद्रात दोन मंत्रिपदं मिळणार*•••••••••••••••••••••••••••••••••••••3⃣ *एलॉन मस्क यांच्यानंतर आता व्लादिमीर पुतीन पंतप्रधान नरेंद्र मोदींचे फॅन, मेक इन इंडियाचे केले कौतुक*•••••••••••••••••••••••••••••••••••••4⃣ *लातूर जिल्हाधिकारी कार्यालयातील 26 कोटीच्या भ्रष्टाचारात लिपिक अटकेत*•••••••••••••••••••••••••••••••••••••5⃣ *मायानगरीत मुसळधार, तर ठाणे पालघरमध्येही दमदार बॅटिंग, मुसळधार पावसामुळे कांदिवलीत स्लॅब घरावर कोसळला, 35 वर्षीय तरुणाचा मृत्यू*•••••••••••••••••••••••••••••••••••••6⃣ *भारताची इराणवर मात; आठव्यांदा आशियाई कबड्डी अजिंक्यपद पटकावले*•••••••••••••••••••••••••••••••••••••7⃣ *रत्नागिरी जेट्स संघाची MPL मध्ये बाजी; केदार जाधवच्या कोल्हापूर संघाला पराभवाचा धक्का*•••••••••••••••••••••••••••••••••••••*📷 वृत्त संकलक - कुणाल पवारे 📹*📱9960358300•••••••••••••••••••••••••••••••••••••ही पोस्ट नियमित मिळविण्यासाठी आणि या समुहात add होण्यासाठी 9423625769 येथे संपर्क करावे.••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• 🌷🍃 *विशेष माहिती* 🌷🍃••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••*डॉक्टर्स डे कधी साजरा केला जातो ?*दरवर्षी 1 जुलै हा दिवस डॉक्टर्स डे म्हणजेच राष्ट्रीय डॉक्टर दिन म्हणून साजरा केला जातो. या दिवशी सर्व लोक, ज्यांचे आयुष्य एका किंवा दुसर्या डॉक्टरांशी जोडलेले आहे, ते डॉक्टरांचे आभार मानतात. त्याला या जगात आणण्यासाठी आणि त्याला निरोगी ठेवण्यासाठी डॉक्टरांनी केलेल्या प्रयत्नांबद्दल त्याचे आभार मानले जातात.इतिहास आणि महत्व - 1882 मध्ये पटना बंगाल प्रेसीडेंट, ब्रिटिश भारतात जन्मलेल्या डॉ. बिधान चंद्र रॉय चिकित्सक, एक स्वातंत्र्य सेनानी, एक शिक्षण विद्ववते आणि एक राजनीतिज्ञ होते. देशाच्या प्रति त्यांचे समर्पण आणि सेवाभाव पाहता 1991 मध्ये डॉक्टर्स डे साजरा करण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यानुसार, भारतात प्रथमच 1991 साली राष्ट्रीय डॉक्टर्स डे साजरा करण्यास सुरुवात झाली. यावर्षी केंद्र सरकारने प्रथमच डॉक्टर्स डे साजरा केला. डॉक्टरांच्या स्मरणार्थ हा दिवस साजरा करण्याची सुरुवात झाली. या दिवशी देशातील डॉक्टरांच्या कार्याचे आभार मानले जातात.कोण होते डॉ बिधान चंद्र रॉय?डॉ. बिधानचंद्र रॉय हे बंगालचे माजी मुख्यमंत्री होते. ते एक वैद्य देखील होते, ज्यांचे वैद्यकीय क्षेत्रात मोठे योगदान होते. जाधवपूर टीबी मेडिकल इन्स्टिट्यूटच्या स्थापनेत डॉ. बिधानचंद्र रॉय यांचा मोलाचा वाटा होता. ते भारताच्या उपखंडातील पहिले वैद्यकीय सल्लागार म्हणून प्रसिद्ध झाले. 4 फेब्रुवारी 1961 रोजी डॉ. बिधानचंद्र रॉय यांनाही भारतरत्न प्रदान करण्यात आला होता. मानवतेच्या सेवेतील अभूतपूर्व योगदानाची दखल घेण्यासाठी केंद्र सरकारने राष्ट्रीय डॉक्टर दिन साजरा करण्यास सुरुवात केली.*1 जुलैलाच डॉक्टर्स डे का साजरा करतात ?*1 जुलैला डॉक्टर्स डे साजरा करण्यामागे एक खास कारणही आहे. थोर वैद्य डॉ. बिधानचंद्र रॉय यांचा जन्म 1 जुलै 1882 रोजी झाला. एवढेच नाही तर 1 जुलै 1962 रोजी डॉ. बिधानचंद्र यांचे निधन झाले. या कारणास्तव त्यांच्या जयंती आणि पुण्यतिथीच्या दिवशी त्यांच्या स्मरणार्थ प्रत्येक डॉक्टरांचा सन्मान करण्यासाठी 1 जुलै रोजी राष्ट्रीय डॉक्टर दिन साजरा करण्याची घोषणा करण्यात आली.*संकलन*••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• 🌹 *" फ्रेश सुविचार "* 🌹••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••कर्तृत्वाला कल्पकतेची जोड मिळाली म्हणजे अद्भुत कार्य घडतात.➖डॉ. हेडगेवार*संकलन :- प्रमिलाताई सेनकुडे, नांदेड**प्रा.शा. गोजेगाव ता.हदगाव, जि. नांदेड*📱9403046894••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• ❓ *आजची प्रश्नमंजुषा* ❓••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••१) पुरी ( ओरिसा ) येथे कोणाचे मंदिर आहे ?२) पुरी येथील जगन्नाथ मंदिराची उभारणी कोणी केली ?३) प्रसिद्ध नंदनकानन पार्क कोणत्या राज्यात आहे ?४) ओरिसामध्ये लिंगराज मंदिर कोठे आहे ?५) पुरी येथील बीचची ( समुद्रकिनारा ) नावे सांगा.*उत्तरे :-* १) भगवान जगन्नाथ २) कलिंग राजा अनंतवर्मन चोडगंग देव ३) ओरिसा ४) भुवनेश्वर ५) पुरी, चंद्रभागा, बालगई, गोल्डन, स्वर्गद्वार, अस्तरांगा बीच*संकलन :- जैपाल भै. ठाकूर*जि.प.व.प्राथ.शाळा भोसा, ता. आमगाव, जि. गोंदिया 📱9765943144••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎂 *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *◆|वा|ढ|दि|व|स|अ|भि|ष्ठ|चिं|त|न|◆* 👤 प्रमिलाताई सेनकुडे, उपक्रमशील शिक्षिका, नांदेड👤 साक्षी बळीराम वारकड👤 मारोती भुसेवार👤 व्यंकटेश बतूलवार, सहशिक्षक, धर्माबाद👤 श्रीकांत चरलेवार, पदोन्नत मुख्याध्यापक, धर्माबाद👤 मधुसूदन पांचाळ, सहशिक्षक, नांदेड👤 हनुमंत भोपाळे, साहित्यिक, नांदेड👤 गणेश शेलेकर👤 गुंडप्पा डावरे👤 रघुनाथ नोरलावार, धर्माबाद👤 नागोराव रायकोड👤 पंढरी गड्डपवार👤 बालाजी भाऊराव डाके👤 गजानन कवळे, सहशिक्षक, उमरी👤 मारोती कांडले, मुख्याध्यापक, करखेली👤 त्रिरत्नकुमार भवरे👤 विशाल कन्हेरकर, साहित्यिक👤 निळकंठ पाटील👤 शेषेराव पाटील आवरे👤 बाबासाहेब डोले👤 शहादेव पा. सुरासे👤 विलास नंदूरकर👤 बालाजी भगनूरे, सहशिक्षक, देगलूर👤 भूमन्ना अबुलकोड, LIC प्रतिनिधी, धर्माबाद👤 चंद्रकांत कदम, साहित्यिक, नांदेड👤 लक्ष्मणराव मुपडे, सहशिक्षक, धर्माबाद👤 विजय निलंगेकर, पत्रकार, नांदेड👤 पंढरीनाथ खांडरे, करखेली👤 सय्यद इलियास जुक्कलकर👤 तुकाराम मुंगरे👤 अशोक तुळशीराम कांबळे, सेवानिवृत्त, माध्यमिक शिक्षक👤 हणमंतू देसाई, संपादक, धर्माबाद👤 मोरेश्वर गायधने, सहशिक्षक, भंडारा👤 दिगंबर नागलवाड*ઉदंड_आયુષ્યાच्या अનંત_શુभेच्छा,* [ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा एक दिवस अगोदर 9423625769 येथे पोस्ट करावे. ]••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• ••• 💡 ‼ *मनाचे श्लोक*‼ 💡•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••जिवा कर्मयोगे जनीं जन्म जाला। परी शेवटीं काळमूखीं निमाला॥ महाथोर ते मृत्युपंथेचि गेले। कितीएक ते जन्मले आणि मेले ॥१४॥।। जय जय रघुवीर समर्थ ।।••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🕊🌎 ‼ *विचारधारा*‼🕊🌎••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••अनेकदा आपल्या मनात नव, नवीन कल्पना येत असतात. आणि चांगल्या कल्पना सुचने चांगलेच आहे पण, कल्पना सुचल्याने काही फायदा होणार नाही. कल्पनेने कल्पनिकरण झालं पाहिजे. त्यासाठी प्रयत्नांची गरज आहे. सोबत चांगले विचार असणे गरजेचे आहे. कधी काळी सांगता येत नाही आपल्याला सुचलेल्या कल्पनांमुळे कदाचित इतरांनाही फायदा होऊ शकतो. यासारखे दुसरे पुन्हा काय मोठे होऊ शकते...? म्हणून सदैव चांगल्याच गोष्टींवर विचार करावे.🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷सौ.संगीता संतोष ठलाल मु.कुरखेडा जि. गडचिरोली••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎭 *आजची फ्रेश बोधकथा* 🎭••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *बळी तो कान पिळी*एकदा प्राण्यांमध्ये रोगाची साथ सुरू होऊन हजारो प्राणी मरू लागले. आपण फार पाप केल्यामुळे देवाने हा कोप केला आहे असे सर्व प्राण्यांना वाटून त्यांनी आपली वाईट कृत्ये कबूल करायचे ठरविले व जो सर्वात मोठा अपराधी ठरेल त्याने देवाच्या कोपाला शांत करण्यासाठी बळी जावे असे ठरले. ठरल्या वेळी सगळेजण हजर झाले व न्यायाधीशाच्या जागी एकमताने कोल्ह्याची निवड केली गेली. प्रथम सिंहाने पुढे होऊन कबुली दिली, ‘मी फार गरीब कोकरांना ठार मारलं, एवढंच नव्हे तर फार भूक लागल्याने एका धनगरालाही ठार मारून खाल्लं.’ त्यावर न्यायाधीश म्हाराज मोठ्या गंभीरतेने म्हणाले, ‘एखाद्या सामान्य प्राण्याने अशा गोष्टी केल्या असत्या तर नक्कीच मोठा अपराध ठरला असता. पण महाराजांना इतरांपेक्षा जास्त सवलती असतात. मूर्ख बकर्या नि एकच धनगर खाणं हा काही मोठा अपराध नाही.’ या निकालामुळे हिंस्त्र प्राण्यांनी कोल्ह्याची तारीफ केली. यानंतर वाघ, चित्ता, अस्वल वगैरे प्राण्यांनी आपापल्या कबूली दिल्या व कोल्ह्याने वरीलप्रमाणेच निकाल दिला. शेवटी एक गरीब गाढव पुढे येऊन म्हणाले, ‘एका शेतकर्याच्या इनाम जमिनीतलं मूठभर हिरवं गवत मी खाल्लं. आणि त्याबद्दल मला पश्चात्ताप’ काय पश्चात्ताप ?’ न्यायाधीश झालेले कोल्होबा ओरडले. ‘अरे पाप्या नक्कीच तुझ्या पापामुळे सध्या हा देवाचा कोप झालेला आहे. यालाच मरणाची शिक्षा योग्य आहे !’ असा निकाल कोल्होबांनी देताच सगळ्यांनी मिळून त्या बिचार्या गाढवाला ठार मारले.तात्पर्य - बळी तो कान पिळी.•••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••या पोस्ट विषयी आपल्या सूचना, निवेदन, अभिप्राय, बातम्या, वाढदिवस, माहिती किंवा शंका 9423625769 येथे कळवावे. •••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••~~~~~~~~~~~~~~~~~~~*🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢*📱 9423625769~~~~~~~~~~~~~~~~~~~*🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏*पुन्हा भेटू या फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार ~~~~~~~~~~~~~~~~~~~
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment