✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट~~~~~~~~~~~~~~~~~~~ 6️⃣ 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 6️⃣ ( फ्रेश शालेय परिपाठ )🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00 ( रविवार आणि सुट्टी वगळून )~~~~~~~~~~~~~~~~~~~🎇 दिनांक :- 19 जून 2023💠 वार - सोमवार••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🌷🌐 . *दिनविशेष . 🌐* 🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *_ या वर्षातील १७० वा दिवस आहे_* •••••••••••••••••••••••••••••••• *_महत्त्वाच्या घटना:_* •••••••••••••••••••••••••••••• *१९९९:’मैत्रेयी एक्सप्रेस’ या कोलकाता ते ढाका बससेवेचे पंतप्रधान अटलबिहारी बाजपेयी यांनी उद्घाटन केले.**१९८९:इ. एस. वेंकटरामय्या यांनी भारताचे १९ वे सरन्यायाधीश म्हणुन कार्यभार सांभाळला.**१९७७:ट्रान्स अलास्कन पाइपलाइन मधुन आर्क्टिक प्रदेशातुन तेलवाहतुक सुरू झाली.**१९६६:’शिव सेना’ या राजकीय पक्षाची स्थापना झाली.**१९६१:कुवेतला (इंग्लंडकडून) स्वातंत्र्य मिळाले.**१९१२:अमेरिकेत कामगारांसाठी ८ तासांचा दिवस निश्चित करण्यात आला.**१८६२:अमेरिकेत गुलामगिरीची प्रथा बंद करण्यात आली.*••••••••••••••••••••••••••••••••• *_जन्मदिवस / जयंती / वाढदिवस:_* ••••••••••••••••••••••••••••••••*१९७४:किशोरकुमार बन्सोड -- कवी* *१९७०:राहुल गांधी –भारतीय राजकारणी, खासदार**१९५९:अशोक कुबडे--कवी,लेखक,संपादक* *१९५७:प्रा.डॉ.रविकिरण वसंतराव पंडित -- लेखक* *१९५६:शेख शब्बीर-- नगर जिल्ह्यातील लेखकांनी लिहिलेल्या विविध पुस्तकांचे संकलन* *१९४७:सलमान रश्दी – बहुचर्चित लेखक**१९४१:रमेश गजानन पानसे--शिक्षणतज्ज्ञ, विचारवंत**१९४०:शंकर भीमराव ऊफ समुद्रगुप्त पाटील -- मराठवाड्यातील एक ज्येष्ठ इतिहास संशोधक**१९३१:मधुकर रामदास जोशी-- हस्तलिखितशास्त्र तज्ज्ञ, प्राचीन मराठी साहित्य संशोधक,संत साहित्यामधील ज्येष्ठ लेखक**१८९८:पुरुषोत्तम बाळकृष्ण साठे--कथाकार अनुवादक (मृत्यू:१७ फेब्रुवारी १९७८)**१८७७:डॉ.पांडुरंग चिमाजी पाटील-थोरात – शतायुषी कृषीशास्त्रज्ञ* *१६२३:ब्लेझ पास्कल – फ्रेन्च गणितज्ञ आणि तत्त्वज्ञ (मृत्यू: १९ ऑगस्ट १६६२)*••••••••••••••••••••••••••••••••• *_मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन:_* •••••••••••••••••••••••••••••••••*२०००:माणिक मुदलियार तथा माणिक कदम तथा कामिनी कदम तथा स्मिता – मराठी व हिन्दी रंगभूमीवरील चित्रपट अभिनेत्री (जन्म: ऑगस्ट १९३३)**१९९८:रमेश मंत्री – प्रवासवर्णनकार, कथाकार, विनोदी लेखक (जन्म: ६ जानेवारी १९२५)**१९९६:कमलाबाई पाध्ये – समाजसेविका(जन्म:८ आक्टोबर १९२०)* *१९९३:विल्यम गोल्डींग – नोबेल पारितोषिक विजेते इंग्लिश लेखक (जन्म: १९ सप्टेंबर १९११)**१९५६:थॉमस वॉटसन – अमेरिकन उद्योगपती, आय. बी. एम. (IBM) चे अध्यक्ष (जन्म: १७ फेब्रुवारी १८७४)**१७४७:नादिर शहा – पर्शियाचा सम्राट (जन्म: २२ आक्टोबर १६९८) ~~~~~~~~~~~~~~~~~~~~~ *_दिनविशेष या सदरातील सर्व मुद्दे हे संग्रहात्मक आहेत तेव्हा त्यात चूका नसतीलच असे सांगता येणार नाही_* *✍ संकलन :- श्रीराम चव्हाण माजी शिक्षणाधिकारी,नागपूर*मोबाईल : 9822695372 ईमेल: chavhansk65@gmail.com••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• 🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••1⃣ *'शासन आपल्या दारी' अभियानाच्या धर्तीवर राज्यात लवकरच 'रेशन आपल्या दारी उपक्रम सुरु होणार आहे. अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री रविंद्र चव्हाण यांनी याबाबतचा निर्णय घेतला आहे.*•••••••••••••••••••••••••••••••••••••2⃣ *पुढील पाच दिवस मुंबईसह तळकोकणात मध्यम पावसाची शक्यता, तर 23 ते 29 जूनदरम्यान देशात चांगल्या पावसाचा अंदाज*•••••••••••••••••••••••••••••••••••••3⃣ *जेईई ॲडवान्सचा निकाल जाहीर; व्हीसी रेड्डी देशात अव्वल*•••••••••••••••••••••••••••••••••••••4⃣ *मराठवाड्यात पाच महिन्यात 391 शेतकऱ्यांची आत्महत्या, मदत केवळ 10 कुटुंबांना; मार्चपासून निधीच नाही*•••••••••••••••••••••••••••••••••••••5⃣ *भारताला 2025 पर्यंत क्षयरोगमुक्त भारत बनवण्याचा संकल्प', मन की बात मधून पंतप्रधानांचे देशाला संबोधन*•••••••••••••••••••••••••••••••••••••6⃣ *महाविकास आघाडी सरकार पाडण्यात अजित पवार यांची मोठी मदत, गिरीश महाजन यांचा मोठा गौप्यस्फोट*•••••••••••••••••••••••••••••••••••••7⃣ *सात्विक-चिराग जोडीनं बॅडमिंटन मध्ये इतिहास रचला, वर्ल्ड चॅम्पियन जोडीचा पराभव करत फडकवला तिरंगा, असा पराक्रम करणारी भारताची पहिलीच जोडी*•••••••••••••••••••••••••••••••••••••*📷 वृत्त संकलक - कुणाल पवारे 📹*📱9960358300•••••••••••••••••••••••••••••••••••••ही पोस्ट नियमित मिळविण्यासाठी आणि या समुहात add होण्यासाठी 9423625769 येथे संपर्क करावे.••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *✈ 🚀 गुगलयान ✈ 🚀*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••फादर्स डे निमित्ताने प्रासंगिक लेखhttps://nasayeotikar.blogspot.com/2020/06/fathers-day.htmlलेख वाचून आपल्या प्रतिक्रिया जरूर द्याव्यात~~~~~~~~~~~~~~~~~~~✍ स्तंभलेखक *नासा येवतीकर, धर्माबाद*9423625769~~~~~~~~~~~~~~~~~~~••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• 🌷🍃 *विशेष माहिती* 🌷🍃••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••सिकल सेल हा आजार 'सिकल पेशी रक्तक्षय' किंवा 'ड्रेपॅनोसायटोसिस' (ग्रीकःdrepane- विळा, kytos-पेशी) या नावाने ओळखला जातो. अलिंगी गुणसूत्रावरील अप्रभावी जनुकामुळे हा आजार होतो. या आजारात लाल रक्तपेशींचा आकार विळ्यासारखा होत असल्याने पेशींची लवचिकता कमी होते. यामुळे गुंतागुंत निर्माण होते. लाल रक्तपेशीतील हीमोग्लोबिन जनुकाच्या उत्परिवर्तनामुळे तांबड्या पेशीचा आकार बदलतो. असे रुग्ण अल्पायुषी असतात. 1994च्या संयुक्त संस्थानामध्ये झालेल्या पहाणीत हा आजार झालेल्या पुरुषांचे सरासरी वय 42 वर्षे आणि स्त्री रुग्णांचे वय 48 वर्षे आढळून आले. ब्रिटनमधील नुकत्याच केलेल्या पाहणीमध्ये सिकल पेशी रुग्णांचे सरासरी वय 53-60 वर्षे आढळले आहे.सिकल पेशी आजार झाल्याचे लहानपणी दिसून येते. उष्ण प्रदेशातील सहाराच्या दक्षिणेस रहाणा-या आफ्रिकेमध्ये याचा प्रादुर्भाव अधिक आहे. सिकल पेशी आजाराच्या भौगोलिक प्रसारामधील आणखी एक महत्त्वाची बाब म्हणजे मलेरियाचा प्रादुर्भाव जेथे अधिक आहे अशा ठिकाणी सिकल पेशी आजार प्रामुख्याने आढळला आहे.*संकलन*••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• 🌹 *" फ्रेश सुविचार "* 🌹••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••आनंदी वृत्ती हे आरोग्याचा आधार आहे, तर औदासिन्य हे रोगाचे घर आहे.➖हेली बर्टन*संकलन :- प्रमिलाताई सेनकुडे, नांदेड**प्रा.शा. गोजेगाव ता.हदगाव, जि. नांदेड*📱9403046894••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• ❓ *आजची प्रश्नमंजुषा* ❓••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••१) सागरतळाशी होणाऱ्या भूकंप व ज्वालामुखीमुळे निर्माण होणाऱ्या लाटांना काय म्हणतात ?२) हडप्पा संस्कृतीमधील लोक कोणती मुख्ये पिके घेत ?३) हवेतील जास्तीच्या बाष्पाचे पाण्याच्या थेंबातील रूपांतर म्हणजे काय होय ?४) संख्यारेषेवर शून्याच्या डावीकडे कोणत्या संख्या असतात ?५) वनस्पतींची वाढ कशाच्या दिशेने होते ?*उत्तरे :-* १) त्सुनामी लाटा २) गहू, सातू ( बार्ली ) ३) दवबिंदू ४) ऋण संख्या ५) प्रकाशाच्या दिशेने *संकलन :- जैपाल भै. ठाकूर*जि.प.व.प्राथ.शाळा भोसा, ता. आमगाव, जि. गोंदिया 📱9765943144••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎂 *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *◆|वा|ढ|दि|व|स|अ|भि|ष्ठ|चिं|त|न|◆* 👤 प्रताप भिसे, सहशिक्षक👤 शंकर बेल्लूरवाड👤 नागेश कोसकेवार👤 खुशाल बोकडे👤 नारायण शिंगारे*ઉदंड_आયુષ્યાच्या अનંત_શુभेच्छा,* [ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा एक दिवस अगोदर 9423625769 येथे पोस्ट करावे. ]••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• ••• 💡 ‼ *मनाचे श्लोक*‼ 💡•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••मना वासना दुष्ट कामा न ये रे। मना सर्वथा पापबुद्धी नको रे॥ मना धर्मता नीति सोडूं नको हो। मना अंतरीं सार वीचार राहो॥४॥।। जय जय रघुवीर समर्थ ।।••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🕊🌎 ‼ *विचार धन*‼🕊🌎••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••आयुष्य दर दिवशी आपल्याला नवे कोरे २४ तास देते. आपण त्यात भुतकाळाशी झगडत बसायचे, भविष्याचा विचार करत बसायचे कि, आलेला क्षण आनंदाने जगायचे हे आपण ठरवायचे.••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎭 *आजची फ्रेश बोधकथा* 🎭••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *कोल्ह्याची फजिती*एकदा एक कोल्हा आणि मांजर शिकारी कुत्र्या बद्दल बोलत होते.कोल्हा म्हणाला, "मला शिकारी कुत्र्यांच्या खूप राग येतो.""मलाही येतो." मांजर म्हणाली.कोल्हा म्हणाला, "ते खूप वेगाने धावतात. पण ते मला पकडू शकत नाहीत. मला त्यांच्यापासून दूर पळण्याच्या अनेक युक्त्या माहित आहेत.""तू कोण कोणत्या युक्त्या करतोस?" मांजरीने विचारले."अनेक युक्त्या!" कोल्हा फुशारकी मारत म्हणाला, "कधी मी काटेरी झुडपातून धावतो. कधीकधी जंगलातल्या दाठ झुडपात जाऊन बसतो. तर कधी मोठ्या बिळात लपून बसतो. अशा अनेक युक्त्या माझ्याकडे आहेत."मांजर म्हणाली,"मला तर फक्त एक चांगली युक्ती माहित आहे.""अरेरे! फक्त एकच युक्ती? ती कोणती आहे?" कोल्हाने विचारले."बघच आता! आता मी तीच युक्ती करणारच आहे. ते पहा, शिकारी कुत्रे इकडेच येत आहेत. " असे म्हणत मांजर जवळच्याच एका झाडावर चढून बसली. तिथे ती शिकारी कुत्र्यापासून अगदी सुरक्षित राहिली. शिकारी कुत्र्यांनी कोल्ह्याचा पाठलाग सुरू केला. कोल्हा एकामागून एक युक्त्या वापरत होता. पण त्याचा काहीही उपयोग झाला नाही. अखेरीस शिकारी कुत्र्यांनी त्या कोल्ह्याला पकडले आणि ठार मारले.मांजर मनात म्हणाली,. "बिचारा कोल्हा! त्याच्या अनेक युक्त्या पेक्षा माझी एकच युक्ती चांगली होती."तात्पर्य: कोणत्याही एकाच विषयात प्रवीण व्हा, नाहीतर एक ना धड भाराभर चिंध्या•••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••या पोस्ट विषयी आपल्या सूचना, निवेदन, अभिप्राय, बातम्या, वाढदिवस, माहिती किंवा शंका 9423625769 येथे कळवावे. •••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••~~~~~~~~~~~~~~~~~~~*🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢*📱 9423625769~~~~~~~~~~~~~~~~~~~*🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏*पुन्हा भेटू या फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार ~~~~~~~~~~~~~~~~~~~
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment