✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट~~~~~~~~~~~~~~~~~~~ 6️⃣ 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 6️⃣ ( फ्रेश शालेय परिपाठ )🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00 ( रविवार आणि सुट्टी वगळून )~~~~~~~~~~~~~~~~~~~🎇 दिनांक :- 17 जून 2023💠 वार - शनिवार••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🌷🌐 . *दिनविशेष . 🌐* 🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••*_जागतिक वाळवंटीकरण व दुष्काळविरोधी दिन_*••••••••••••••••••••••••••••••••••• *_ या वर्षातील १६८ वा दिवस आहे_* •••••••••••••••••••••••••••••••• *_महत्त्वाच्या घटना:_* ••••••••••••••••••••••••••••••• *१९९१:भारताचे पोलादी पुरुष सरदार वल्लभभाई पटेल आणि पंतप्रधान राजीव गांधी यांना मरणोत्तर 'भारतरत्न’ हा सर्वोच्च नागरी सन्मान जाहीर**१९६७:चीनने पहिल्या हायड्रोजन बॉम्बचा स्फोट केला.**१९४४:आइसलँडने (डेन्मार्कपासुन) स्वातंत्र्य घोषित केले आणि ते प्रजासत्ताक बनले.**१९४०:दुसरे महायुद्ध - दोस्त राष्ट्रांनी फ्रान्समधुन माघार घेण्यास सुरूवात केली.*•••••••••••••••••••••••••••••••••••••• *_जन्मदिवस / जयंती / वाढदिवस:_* ••••••••••••••••••••••••••••••••••••••*१९८१:शेन वॉटसन – ऑस्ट्रेलियन क्रिकेटपटू**१९७९:अरविंद सगर-- मराठी गझलकार, कवी,गीतकार**१९७५: द.ल.वारे--- कवी, कथाकार**१९७३:लिअँडर पेस – भारतीय टेनिसपटू**१९७१: हरिश्चंद्र बबन खेंदाड-- कवी,लेखक**१९६१:प्रा.डॉ. विनायक त्रिपत्तीवार -- प्रसिद्ध कवी, लेखक* *१९५९: स्वाती देशपांडे -- कवयित्री,लेखिका**१९५६: किसन अमृत वराडे-- प्रसिद्ध कवी लेखक* *१९५३:प्रा.डॉ.जगदीश माधवराव कदम-- प्रसिद्ध मराठी साहित्यिक* *१९५१:विनय आपटे-- भारतीय चित्रपट आणि दूरदर्शन अभिनेता(मृत्यू:७ डिसेंबर २०१३)**१९४५:प्रा.शारदा तुंगार -- मराठी, हिन्दी मासिकाच्या संपादिका**१९४२:भगतसिंग कोश्यारी महाराष्ट्र व गोवा राज्याचे माजी राज्यपाल, माजी मुख्यमंत्री उत्तरांचल**१९४१:अरूण मार्तण्डराव साधू -- लेखक, पत्रकार तसेच आंतरराष्ट्रीय सामाजिक निरीक्षक व समीक्षक,ऐंशीव्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे ते अध्यक्ष (मृत्यू:२५ सप्टेंबर २०१७)**१९४०:डाॅ.विनय वाईकर -- भूलतज्ज्ञ,लेखक,प्रभावी वक्ता, कथाकथनकार व कवी (मृत्यू:२ जानेवारी २०१३)**१९०३:बाबूराव विजापुरे – संगीतशिक्षक (मृत्यू: ७ डिसेंबर १९८२)*•••••••••••••••••••••••••••••••••••••• *_मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन:_* ••••••••••••••••••••••••••••••••••••••*२००४:इंदुमती पारीख -- व्यवसायाने डॉक्टर व सामाजिक कार्यकर्त्या(जन्म:८मार्च १९१८)**१९९६:मधुकर दत्तात्रय तथा ’बाळासाहेब’ देवरस – रा. स्व. संघाचे तिसरे सरसंघचालक (जन्म: ११ डिसेंबर १९१५)**१९९१: प्रभाकर बलवंत माचवे-- हिंदी भाषकांना मराठी भाषेतील पुस्तकांचा परिचय अनुवादकातून करून देणारे भाषांतरकार (जन्म:२६ डिसेंबर १९१७)**१९८३:शरद पिळगावकर – चित्रपट निर्माते, दिग्दर्शक व वितरक* *१९६५:मोतीलाल राजवंश ऊर्फ ‘मोतीलाल‘ – अभिनेते (जन्म: ४ डिसेंबर १९१०)**१९२८:पण्डित गोपबंधूदास तथा ’उत्कलमणी’ – ओरिसातील समाजसुधारक, सामाजिक कार्यकर्ते, स्वातंत्र्यसेनानी, कवी व लेखक (जन्म: ९ आक्टोबर १८७७)**१८९५:गोपाळ गणेश आगरकर – लोकमान्य टिळकांचे सहकारी व ’केसरी’चे पहिले संपादक, डेक्कन एज्युकेशन सोसायटीचे एक संस्थापक, प्राचार्य, समाजसुधारक, विचारवंत व शिक्षणतज्ञ, ’सुधारक’ या वृत्तपत्राचे संस्थापक व संपादक (जन्म: १४ जुलै १८५६)**१६७४:राजमाता जिजाबाई-- मराठा साम्राज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराजांच्या आई होत्या. त्यांना राजमाता, राष्ट्रमाता, जिजाबाई किंवा जिजाऊ म्हणून संबोधले जाते(जन्म:१२ जानेवारी १५९८)* ~~~~~~~~~~~~~~~~~~~~~ *_दिनविशेष या सदरातील सर्व मुद्दे हे संग्रहात्मक आहेत तेव्हा त्यात चूका नसतीलच असे सांगता येणार नाही_* *✍ संकलन :- श्रीराम चव्हाण, माजी शिक्षणाधिकारी नागपूर*मोबाईल : 9822695372 ईमेल: chavhansk65@gmail.com••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• 🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••1⃣ *शाळेने एकाच दुकानातून गणवेश खरेदीची सक्ती केल्यास कारवाई होणार असल्याचे पत्र छत्रपती संभाजीनगरच्या जिल्हाधिकाऱ्यांनी काढले आहे*•••••••••••••••••••••••••••••••••••••2⃣ *5 स्टार हॉटेलप्रमाणे दिसणारा देशातील पहिलं खाजगी रेल्वे स्टेशन मध्य प्रदेशात बनवण्यात आलं आहे.*•••••••••••••••••••••••••••••••••••••3⃣ *सोन्याच्या जेजुरीत माऊलींची पालखी दाखल, यळकोट यळकोट जय मल्हारचा जयघोष*•••••••••••••••••••••••••••••••••••••4⃣ *शासकीय वसतिगृहातील मृत विद्यार्थिनीच्या कुटुंबीयांना पाच लाखाची मदत, चंद्रकांत पाटलांनी घेतली कुटुंबियांची भेट*•••••••••••••••••••••••••••••••••••••5⃣ *मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणांमध्ये फक्त 48 दिवसांचा पाणी साठा; जूनअखेरीस पाणी कपातीचा निर्णय घेण्याची शक्यता*•••••••••••••••••••••••••••••••••••••6⃣ *भारताच्या ज्युनिअर महिला हॉकी संघाने आशिया चषकावर नाव कोरत इतिहास रचला*•••••••••••••••••••••••••••••••••••••7⃣ *2 टेस्ट, 3 वनडे आणि 5 टी20, टीम इंडियाच्या वेस्ट इंडिज दौऱ्याचे वेळापत्रक जाहीर*•••••••••••••••••••••••••••••••••••••*📷 वृत्त संकलक - कुणाल पवारे 📹*📱9960358300•••••••••••••••••••••••••••••••••••••ही पोस्ट नियमित मिळविण्यासाठी आणि या समुहात add होण्यासाठी 9423625769 येथे संपर्क करावे.••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *✈ 🚀 गुगलयान ✈ 🚀*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••*ये तो बस ट्रेलर है*https://nasayeotikar.blogspot.com/2020/06/blog-post_29.htmlलेख वाचून आपल्या प्रतिक्रिया जरूर द्याव्यात~~~~~~~~~~~~~~~~~~~✍ स्तंभलेखक *नासा येवतीकर, धर्माबाद*9423625769~~~~~~~~~~~~~~~~~~~••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• 🌷🍃 *विशेष माहिती* 🌷🍃••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••*1839 : लॉर्ड विल्यम बेंटिकचे निधन*लॉर्ड विल्यम बेंटिक यांची भारतातील कारकीर्द 1828 - 1835 अशी होती. त्याने भारतात अनेक पुरोगामी आणि महत्त्वाचे निर्णय घेतले. बेंटिक यांने 1829 चा सती प्रतिबंधक कायदा राजा राममोहन रॉय यांच्या सहकार्याने पास केला. प्रारंभी हा कायदा बंगालमध्ये लागू करण्यात आला. बेंटिकने लॉर्ड मेकॉलेचा शिक्षणाचा 1835 चा शिक्षणाचा झिरपता सिद्धांत संमत केला. निर्दोष आणि दुर्बल लोकांना लुटणाऱ्या डाकूंचा व हत्यारांचा समूह 'ठगांचा' बंदोबस्त केला. म्हैसूरचा कारभार हाती घेऊन कुर्ग राज्य खालसा केले. बालहत्त्या आणि नरबळीवर बंदी आणली. लॉर्ड विल्यम बेंटिक ची कारकीर्द म्हणून ओळखली जाते. भारतीयांना इंग्रजी शिक्षण देण्याचा कायदा पास केला. 1835 मध्ये बेंटिक ने 'कलकत्ता मेडिकल कॉलेजची' स्थापना केली.*संकलन*••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• 🌹 *" फ्रेश सुविचार "* 🌹••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••स्वर्गापेक्षा चांगल्या पुस्तकांचे मी अधिक स्वागत करीन. कारण पुस्तके जिथे असतील तिथे स्वर्ग निर्माण होतो. 📚 लोकमान्य टिळक*संकलन :- प्रमिलाताई सेनकुडे, नांदेड**प्रा.शा. गोजेगाव ता.हदगाव, जि. नांदेड*📱9403046894••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• ❓ *आजची प्रश्नमंजुषा* ❓••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••१) विलायती चिंच अजून कोणत्या नावाने ओळखली जाते ?२) महात्मा फुले यांनी अवतारवादाची संकल्पना कोणत्या ग्रंथात मांडली ? ३) तांबे व पितळ या भांड्यांना कलई करण्यासाठी कोणता धातू वापरतात ? ४) मुंबई काँग्रेस अध्यक्षपदी कोणाची निवड झाली आहे ?५) जगातील सर्वात खोल दरी कोणती ?*उत्तरे :-* १) इंग्रजी चिंच, फिरंगी चिंच, गोरटी इमली, चीचबिलाई २) गुलामगिरी ३) कथिल ४) वर्षा गायकवाड ५) मरियाना गर्ता, प्रशांत महासागर *संकलन :- जैपाल भै. ठाकूर*जि.प.व.प्राथ.शाळा भोसा, ता. आमगाव, जि. गोंदिया 📱9765943144••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎂 *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *◆|वा|ढ|दि|व|स|अ|भि|ष्ठ|चिं|त|न|◆* 👤 आकाश रेड्डी, युवा नेता, धर्माबाद👤 धनंजय गुडसुरकर, साहित्यिक तथा शिक्षक, उदगीर👤 गणेश गुंडेवार👤 प्रवीण जावळे👤 भास्कर भेदेकर चिटमोगरेकर👤 लालू शंकरोड, धर्माबाद👤 जयराम मोरे, साहित्यिक जळगाव👤 दिग्विजय पाटील चव्हाण, चिरली👤 राजा यलकटवार👤 गजानन पाटील, माध्यमिक शिक्षक, नांदेड*ઉदंड_आયુષ્યાच्या अનંત_શુभेच्छा,* [ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा एक दिवस अगोदर 9423625769 येथे पोस्ट करावे. ]••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• ••• 💡 ‼ *मनाचे श्लोक*‼ 💡•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••प्रभाते मनी राम चिंतीत जावा। पुढे वैखरी राम आधी वदावा ।। सदाचार हा थोर सांडूं नये तो। जनीं तोचि तो मानवी धन्य होतो॥३॥।। जय जय रघुवीर समर्थ ।।••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🕊🌎 ‼ *विचार धन*‼🕊🌎••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••*सत्य को कहने के लिए,**किसी शपथ की जरूरत नहीं होती।**नदियों को बहने के लिए,**किसी पथ की जरूरत नहीं होती।**जो बढ़ते हैं जमाने में, अपने मजबूत इरादों पर,**उन्हें अपनी मंजिल पाने के लिए,**किसी रथ की जरूरत नहीं होती।*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎭 *आजची फ्रेश बोधकथा* 🎭••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••*घोड्याला चांगलीच अद्दल घडली**एका व्यापाऱ्याकडे एक घोडा आणि एक गाढव होते. एके दिवशी तो त्या दोघांना घेऊन बाजाराला निघाला. त्याने गाढवाच्या पाठीवर खूप ओझे लादले होते. घोड्याच्या पाठीवर मात्र काहीच ओझे नव्हते. वाटेत गाढव घोड्याला म्हणाला, "मित्रा माझ्या पाठीवर चे थोडे ओझे तू घे. मला ते फारच जड होत आहे."घोडा म्हणाला, "जड होवो की हलके. मला त्याची पर्वा नाही. ओझी वाहून नेणे हे तुझे काम आहे. व तू ते केलेच पाहिजे. तुझ्या पाठीवरचे ओझे मला घ्यायला सांगू नकोस."घोड्याचे हे शब्द एकूण गाढव काहीच बोलला नाही. तसेच निमूटपणे दोघी चालू लागले. थोड्यावेळाने ओझ्या मुळे गाढवाचे पाय लटपटू लागले, त्याच्या तोंडातून फेस येऊ लागला.व्यापाऱ्याने जेव्हा हे पाहिले तेव्हा त्याने गाढवाच्या पाठीवरचे सर्व ओझे उतरवले. आणि ते सर्व ओझे घोड्याच्या पाठीवर लादले. यानंतर मग ते पुढे चालू लागले. चालता चालता घोडा मनात म्हणाला, "मी मघाशी गाढवाचे ऐकले नाही. जर त्याच्या पाठीवर चे थोडे ओझे मी घेतले असते, तर मला ही शिक्षा झाली नसती. आता हे सर्व ओझे मलाच बाजारापर्यंत वाहून न्यावे लागेल. तात्पर्य: इतरांना सहाय्य करा.•••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••या पोस्ट विषयी आपल्या सूचना, निवेदन, अभिप्राय, बातम्या, वाढदिवस, माहिती किंवा शंका 9423625769 येथे कळवावे. •••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••~~~~~~~~~~~~~~~~~~~*🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢*📱 9423625769~~~~~~~~~~~~~~~~~~~*🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏*पुन्हा भेटू या फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार ~~~~~~~~~~~~~~~~~~~
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment