✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट~~~~~~~~~~~~~~~~~~~ 6️⃣ 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 6️⃣ ( फ्रेश शालेय परिपाठ )🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00 ( रविवार आणि सुट्टी वगळून )~~~~~~~~~~~~~~~~~~~🎇 दिनांक :- 21 जून 2023💠 वार - बुधवार••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🌷🌐 . *दिनविशेष . 🌐* 🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••*_जागतिक संगीत दिन_**_आंतरराष्ट्रीय योग दिन_* •••••••••••••••••••••••••••••••••• *_ या वर्षातील १७२ वा दिवस आहे_* •••••••••••••••••••••••••••••••• *_महत्त्वाच्या घटना:_* •••••••••••••••••••••••••••••• *२००६:नवीनच शोध लागलेल्या प्लूटोच्या उपग्रहांचे 'निक्स’ व ’हायड्रा’ असे नामकरण करण्यात आले.**१९९९:विश्वकरंडक स्पर्धेत १००० धावा पूर्ण करणारा मार्क वॉ (ऑस्ट्रेलिया) हा चौथा खेळाडू ठरला.**१९९८:फ्रॅंकफर्ट बुद्धीबळ महोत्सवात विश्वनाथन आनंदने ’फ्रिट्झ-५’ या संगणकाचा सहज पराभव केला.**१९९५:पर्यावरणक्षेत्रात विशेष कार्य केल्याबद्दल पर्यावरणतज्ञ रश्मी मयूर यांना अमेरिकेतील ’द युनिटी इन योग इंटरनॅशनल’ या संस्थेने विशेष सन्मान जाहीर केला.**१९९२:विज्ञान, तंत्रज्ञान आणि समाजविज्ञानाच्या क्षेत्रात विशेष कार्य करणार्या डॉ. रघुनाथ माशेलकर यांना मध्यप्रदेश सरकारतर्फे जवाहरलाल नेहरु राष्ट्रीय पारितोषिक जाहीर**१९९१:भारताचे ९ वे पंतप्रधान म्हणून पी. व्ही. नरसिंह राव यांनी सूत्रे हाती घेतली.**१९६१:अमेरिकेतील शास्त्रज्ञांनी समुद्राच्या खार्या पाण्याचे गोड्या पाण्यात रुपांतर करणारे यंत्र विकसित केले.**१९४९:राजस्थान उच्च न्यायालयाची स्थापना**१९४८:पहिले भारतीय गव्हर्नर जनरल म्हणून चक्रवर्ती राजगोपालाचारी यांच्याकडे सूत्रे**१८९८:अमेरिकेने स्पेनकडून ’ग्वाम’ हा प्रांत ताब्यात घेतला.**१७८८:न्यू हॅम्पशायर अमेरिकेचे ९ वे राज्य बनले.* *_जन्मदिवस / जयंती / वाढदिवस:_* ••••••••••••••••••••••••••••••••• *१९९३: डॉ.सुजाता बेलखेडे-- लेखिका* *१९८८:शीतल शांताराम पाटील-- कवयित्री* *१९८७:मुक्ती मोहन-- भारतीय हिंदी अभिनेत्री**१९७८:अॅड. देवेंद्र घनश्याम चौधरी- मराठी हिंदी व पोवारी बोलीचे प्रसिद्ध कवी, गझलकार,लेखक* *१९७४:प्रा.सध्या महाजन-- कवयित्री,लेखिका* *१९७१: मृणाल देव-कुलकर्णी-- ख्यातनाम अभिनेत्री, दिग्दर्शक* *१९७०: संजय धनगव्हाळ-- कवी लेखक व कलावंत* *१९६८:प्रा.वर्षा गगने-- कवयित्री, लेखिका**१९६६:मृण्मयी(मधू) शिरगांवकर- कादंबरी,कथा, विनोदी लेख संग्रह लेखन* *१९६१:स्वाती चांदोरकर -- सुप्रसिद्ध लेखिका* *१९५९:रवींद्र इंगळे चावरेकर -- कवी,लेखक, संशोधक* *१९५४:वसंत मार्तंड गायकवाड-- लेखक तथा निवृत्त शिक्षण उपसंचालक* *१९५३:बेनझीर भूट्टो – पाकिस्तानच्या माजी पंतप्रधान (मृत्यू: २७ डिसेंबर २००७)**१९४९:सुरेश विठ्ठलराव जाधव-- लेखक* *१९३३: वामन गणपतराव इंगळे-- कवी, कथाकार**१९३३: वसंत गुलाबराव गिरटकर-- कथाकार, कवी, लेखक**१९३१: सुधा दत्तात्रेय सोमण-- कथालेखिका, ललितगद्यलेखिका**१९२३:सदानंद रेगे – मराठी कवी, कथाकार आणि अनुवादक (मृत्यू: २१ सप्टेंबर १९८२)**१९१६:सुरेन्द्रनाथ कोहली – भारताचे ९ वे नौदल प्रमुख (मृत्यू:२१ जानेवारी १९९८)**१९११: परशुराम लक्ष्मण वैद्य-- अनुवादक, संशोधक (२७ फेब्रुवारी १९७८)**१९०५:जेआँ-पॉल सार्त्र – फ्रेन्च लेखक, कवी, तत्त्वज्ञ आणि नोबेल पारितोषिक विजेते (मृत्यू: १५ एप्रिल १९८०)**१८९६:देविदास लक्ष्मण महाजन- भाषातज्ज्ञ, लेखक, अनुवादक(मृत्यू:३ एप्रिल १९६७)**१८५६:रामचंद्र भिकाजी जोशी-- संस्कृत व मराठी भाषा आणि व्याकरणाचे अभ्यासक व लेखक(मृत्यू:७ सप्टेंबर १९२७)* *_मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन:_*••••••••••••••••••••••••••••••••• *२०२२:कृष्णाबाई नारायण सुर्वे-- लेखिका (जन्म:१९३०)**२०१२:भालचंद्र दत्तात्रय खेर – लेखक व पत्रकार (जन्म: १२ जून १९१७)**२००३:लिऑन युरिस – अमेरिकन कादंबरीकार (जन्म: ३ ऑगस्ट १९२४)**१९८४:मराठी चित्रपट व नाट्य अभिनेते अरुण सरनाईक यांचे पत्नी व मुलासह कोल्हापुरजवळ मोटार अपघातात निधन. ते तबलावादक, गायक आणि हार्मोनियमवादकही होते. (जन्म: ४ आक्टोबर १९३५)**१९४०:डॉ. केशव बळीराम हेडगेवार – राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे संस्थापक व पहिले अध्यक्ष (जन्म: १ एप्रिल १८८९)**१९२८:द्वारकानाथ माधव पितळे उर्फ ’नाथमाधव’ – सामाजिक व ऐतिहासिक कादंबरीकार.(जन्म: ३ एप्रिल १८८२)* *_ आंतरराष्ट्रीय योग दिवसाच्या हार्दिक शुभेच्छा_* ~~~~~~~~~~~~~~~~~~~~~ *_दिनविशेष या सदरातील सर्व मुद्दे हे संग्रहात्मक आहेत तेव्हा त्यात चूका नसतीलच असे सांगता येणार नाही_* *✍ संकलन :- श्रीराम चव्हाण माजी शिक्षणाधिकारी,नागपूर*मोबाईल:9822695372 ईमेल: chavhansk65@gmail.com••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• 🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••1⃣ *चिकनगुनियावर लस मिळाली, लसीच्या तिसऱ्या चाचणीचं सकारात्मक परिणाम*•••••••••••••••••••••••••••••••••••••2⃣ *राम मंदिरातील प्राणप्रतिष्ठेची तारीख जाहीर, 15 ते 24 जानेवारी 2024 दरम्यान रामलल्लाच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा, 24 जानेवारी नंतर सर्वसामान्य भाविकांसाठी दर्शन*•••••••••••••••••••••••••••••••••••••3⃣ *वारकरी भक्तांसाठी आनंदवार्ता! विठुरायाच्या दर्शनाचा वेळ 7 ते 8 तासांनी कमी होणार, जिल्हाधिकाऱ्यांचा दावा*•••••••••••••••••••••••••••••••••••••4⃣ *आयआयटी मुंबईला नंदन नीलकेणी यांच्याकडून 315 कोटींची देणगी*•••••••••••••••••••••••••••••••••••••5⃣ *दहावी, बारावी पुरवणी परीक्षेचे वेळापत्रक जाहीर ; 18 जुलै पासून होणार परीक्षेला सुरुवात*•••••••••••••••••••••••••••••••••••••6⃣ *अमेरिकन काँग्रेसच्या जॉईंट सेशनला (US Congress) म्हणजे तिथल्या संसदेच्या संयुक्त सभेला पंतप्रधान नरेंद्र मोदी हे 22 जून रोजी संबोधित करणार आहेत.*•••••••••••••••••••••••••••••••••••••7⃣ *MPL 2023 : केदार जाधव-अंकित बावणे यांची वादळी अर्धशतके, कोल्हापूरचा सोलापूरवर विजय*•••••••••••••••••••••••••••••••••••••*📷 वृत्त संकलक - कुणाल पवारे 📹*📱9960358300•••••••••••••••••••••••••••••••••••••ही पोस्ट नियमित मिळविण्यासाठी आणि या समुहात add होण्यासाठी 9423625769 येथे संपर्क करावे.••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *✈ 🚀 गुगलयान ✈ 🚀*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••*आंतरराष्ट्रीय योग दिवस*https://nasayeotikar.blogspot.com/2021/06/yoga-day.htmlलेख वाचून आपल्या प्रतिक्रिया जरूर द्याव्यात~~~~~~~~~~~~~~~~~~~✍ स्तंभलेखक *नासा येवतीकर, धर्माबाद*9423625769~~~~~~~~~~~~~~~~~~~••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• 🌷🍃 *विशेष माहिती* 🌷🍃••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सप्टेंबर २०१४ मध्ये २१ जून हा दिवस ‘जागतिक योग दिन’ म्हणून साजरा करण्यात यावा असा प्रस्ताव संयुक्त राष्ट्रांच्या महासभेत मांडला. एकूण १९३ देशांपैकी १७५ देशांनी या प्रस्तावाला होकार दिला. सविस्तर चर्चेनंतर या प्रस्तावाला डिसेंबर २०१४ मध्ये संपूर्णपणे मान्यता प्राप्त झाली.२१ जून २०१५ रोजी पहिला ‘जागतिक योग दिन’ संपूर्ण जगभरात साजरा करण्यात आला. तेव्हापासून प्रत्येक वर्षी २१ जून या दिवशी योग दिन अत्यंत उत्साहात साजरा केला जातो. तसेच योगासने, योगजीवन, योगदृष्टी, योग साधना अशा योगाविषयीच्या विविध संकल्पना या दिवशी प्रसारित केल्या जातात.*संकलन*••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• 🌹 *" फ्रेश सुविचार "* 🌹••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••आत्मविश्वास हे वीरत्वाचे सार आहे.➖एमर्सन*संकलन :- प्रमिलाताई सेनकुडे, नांदेड**प्रा.शा. गोजेगाव ता.हदगाव, जि. नांदेड*📱9403046894••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• ❓ *आजची प्रश्नमंजुषा* ❓••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••१) जागतिक योग दिवस केव्हा साजरा केला जातो ?२) योगाची उत्पत्ती कोणत्या देशातून झाली आहे ?३) पहिला जागतिक योग दिवस केव्हा साजरा केला गेला ?४) जागतिक योग दिवस - २०२३ ची संकल्पना/थीम काय आहे ?५) योगसूत्रे ( योगावरील सूत्र ) हा योगाचा प्राचीन, मूलभूत ग्रंथ कोणी लिहिला ?*उत्तरे :-* १) २१ जून २) भारत ३) २१ जून २०१५ ४) मानवता ( Humanity ) ५) पतंजली*संकलन :- जैपाल भै. ठाकूर*जि.प.व.प्राथ.शाळा भोसा, ता. आमगाव, जि. गोंदिया 📱9765943144••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎂 *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *◆|वा|ढ|दि|व|स|अ|भि|ष्ठ|चिं|त|न|◆* 👤 कृष्णा फटाले, शिक्षण विस्तार अधिकारी, नांदेड👤 वीरभद्र बसापुरे, शिक्षक नेते, धर्माबाद👤 आनंद पाटील जाधव👤 शुभम साखरे👤 राहुल पाटील👤 हणमंत जमदाडे👤 संजयकुमार मांजरमकर👤 माधव धोंडापुरे*ઉदंड_आયુષ્યાच्या अનંત_શુभेच्छा,* [ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा एक दिवस अगोदर 9423625769 येथे पोस्ट करावे. ]••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• ••• 💡 ‼ *मनाचे श्लोक*‼ 💡•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••नको रे मना क्रोध हा खेदकारी। नको रे मना काम नाना विकारी॥ नको रे मना लोभ हा अंगिकारू। नको रे मना मत्सरु दंभ भारु॥६॥।। जय जय रघुवीर समर्थ ।।••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🕊🌎 ‼ *विचारधारा*‼🕊🌎••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••ज्यांना जसे बोलावे वाटते तसेच ते, बोलत असतात. बोलणाऱ्याला आपण रोखू शकत नाही कारण, कोणाच्याही तोडांवर झाकण नसते. म्हणून त्या प्रसंगी जरा आपणच एकदाचे शांत बसावे. एखादे वेळी शांत बसल्याने व प्रसन्न मनाने राहण्याचा फायदा सुद्धा होत असतो .🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷सो.संगीता संतोष ठलाल मु.कुरखेडा जि.गडचिरोली••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎭 *आजची फ्रेश बोधकथा* 🎭••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *श्रीमंत व्यापारी**एका मोठ्या शहरात एक श्रीमंत व्यक्ती राहत होता. त्यांच्याकडे भरपूर पैसा होता आणि नुकतेच त्याने शहरात एक मोठे घर घेतले होते. त्याच्याकडे धनसंपत्ती तर भरपूर होती. परंतु शरीराने तो अतिशय दुबळा व अस्वस्थ होता. तो दिवस-रात्र मेहनत करून पैसे कमावित असे. परंतु आपल्या शरीराकडे लक्ष द्यायला त्याच्याकडे वेळ नव्हता. हळू हळू तो खूप श्रीमंत झाला परंतु त्याला आहेत रोगांनी विळखा घातला. तो व्यक्ती स्वार्थी नव्हता, परंतु त्याच्याकडे आपला पैसा खर्च करण्यासाठी वेळ नव्हता त्याला जणू पैसे कमावण्याची सवयच लागली होती. त्याला डॉक्टराकडे जाण्याची वेळच मिळत नसे. शरीराकडे लक्ष न दिल्याने हळूहळू त्याचे शरीर कमजोर व्हायला लागले. एक दिवस कामावरून थकून तो घरी आला. आज त्याचे डोके खूप दुखत होते, म्हणून तो सरळ आपल्या रूम मध्ये जावून झोपून गेला. जेव्हा त्याच्या नौकराने त्याला जेवायला विचारले तेव्हा भूक नाही म्हणून, त्याने जेवायला नाही म्हटले. अर्ध्या रात्री त्याचे डोक्यात अतिशय वेदना व्ह्यायाला लागल्या. त्याला काहीही लक्षात येत नव्हते. अचानक त्याच्या समोर त्याच्याच आकाराएवढी एक आकृती उभी राहिली. ती आकृती म्हणाली, "मी तुझी आत्मा आहे आणि आज मी तुझे शरीर सोडून जाणार आहे."तेव्हा तो माणूस भित भित म्हणाला, "तू माझ्या शरीराला का सोडत आहे? माझ्याकडे भरपूर पैसा आहे व मी माझे संपूर्ण आयुष्य मेहनत केली आहे. मी एवढ्या विशाल घरात राहतो, की या घरात राहण्याची आणि अनेक जण फक्त स्वप्नेच पाहतात.आत्मा म्हणाली, "माझी गोष्ट ऐक, तुझे हे मोठे घर माझ्या काहीही कामाचे नाही. माझे घर तर तुझे शरीर आहे. जे दिवसेंदिवस कमजोर होऊन, अनेक रोगांनी ग्रसित झाले आहे.""तू कल्पना कर अनेक वर्षे तुटलेल्या झोपडीत राहण्याची. बस त्याच पद्धतीने तू माझी हालत केली आहे. आणि आता मी या घरात अधिक काळ राहू शकत नाही." एवढे बोलून आत्मा त्या शरीराला सोडून निघून गेली. तात्पर्य: शरीर व चांगले स्वास्थ ही सर्वात मोठी संपत्ती आहे.•••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••या पोस्ट विषयी आपल्या सूचना, निवेदन, अभिप्राय, बातम्या, वाढदिवस, माहिती किंवा शंका 9423625769 येथे कळवावे. •••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••~~~~~~~~~~~~~~~~~~~*🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢*📱 9423625769~~~~~~~~~~~~~~~~~~~*🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏*पुन्हा भेटू या फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार ~~~~~~~~~~~~~~~~~~~
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment