✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट~~~~~~~~~~~~~~~~~~~ 6️⃣ 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 6️⃣ ( फ्रेश शालेय परिपाठ )🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00 ( रविवार आणि सुट्टी वगळून )~~~~~~~~~~~~~~~~~~~🎇 दिनांक :- 20 जून 2023💠 वार - मंगळवार••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🌷🌐 . *दिनविशेष . 🌐* 🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *_जागतिक शरणार्थी दिन _*••••••••••••••••••••••••••••••••••• *_ या वर्षातील १७१ वा दिवस आहे_* •••••••••••••••••••••••••••••••• *_महत्त्वाच्या घटना:_* •••••••••••••••••••••••••••••• *१९९७:’महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटी’तर्फे राज्यातील पहिली मुलींची सैनिकी शाळा पुण्याजवळ सुरू झाली.**१९६०:महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळाची स्थापना**१९२१:टिळक महाराष्ट्र विद्यापीठाची स्थापना**१८९९:केंब्रिज विद्यापीठाच्या ’ट्रायपॉस’ या गणिताच्या अंतिम परीक्षेत रघुनाथ पुरुषोत्तम परांजपे पहिल्या वर्गात पहिले आल्यामुळे त्यांना सिनिअर रॅंग्लर होण्याचा बहुमान मिळाला.**१८८७:देशातील सर्वाधिक गर्दीचे स्टेशन व्हिक्टोरिया टर्मिनस (सध्याचे नाव सी.एस. टी.) सुरू झाले.**१८६३:वेस्ट व्हर्जिनिया अमेरिकेचे ३५ वे राज्य बनले.**१८३७:व्हिक्टोरिया इंग्लंडच्या राणीपदी**_जन्मदिवस / जयंती / वाढदिवस:_* •••••••••••••••••••••••••••••••••*१९८२:विनायक येवले- समकालीन कवी व समीक्षक* *१९७८:शिल्पा प्रसन्न जैन-- कवयित्री,लेखिका* *१९७२:पारस म्हांब्रे – क्रिकेटपटू**१९६९:महेश नागोराव कुडलीकर -- कवी,लेखक* *१९६८:प्रा.शंकर किसनराव येरडे -- समीक्षक, संपादक* *१९६१:वासुदेव महादेवराव खोपडे-- कवी**१९५६:डॉ दिलीप माधवराव धोंडगे-- संत साहित्याचे गाढे अभ्यासक, संपादक, लेखक**१९५५:प्रा.डॉ.शोभा भगवान नाफडे-- लेखिका* *१९५४:अॅलन लॅम्ब – इंग्लिश क्रिकेटपटू**१९५३:भालचंद्र गंभीरराव वाघ-- प्रसिद्ध लेखक,कादंबरीकार तथा पूर्व सनदी अधिकारी**१९५२:श्रीधर लक्ष्मणराव सरपे -- कवी,लेखक* *१९५१:निंबाजीराव बागुल-- कवी,लेखक* *१९३९:रमाकांत देसाई – जलदगती गोलंदाज व राष्ट्रीय निवड समितीचे माजी अध्यक्ष (मृत्यू:२८ एप्रिल १९९८)**१९३६:प्रा.अमृत संभाजीराव देशमुख -- कवी, लेखक* *१९३६:सुषमा सेठ -- भारतीय रंगमंच, चित्रपट आणि दूरदर्शन अभिनेत्री* *१९३०:श्रीकृष्ण शंकर(बाळासाहेब) सराफ-- लेखक, संपादक**१९२४: डॉ.प्रभाकर लक्ष्मण गावडे-- जेष्ठ शिक्षणतज्ज्ञ (मृत्यू:२ आगस्ट २०२१)**१९२०:मनमोहन अधिकारी – लोकशाही पद्धतीने निवडण्यात आलेले नेपाळचे पहिले पंतप्रधान, कम्युनिस्ट नेते (मृत्यू: २६ एप्रिल १९९९)**१९२०:पंडित वसंतराव चांदोरकर --आग्रा, ग्वाल्हेर, जयपूर घराण्याचे गायक(मृत्यू:८ जुलै २००१)**१९१५:टेरेन्स यंग – चिनी-इंग्लिश दिग्दर्शक आणि पटकथाकार (मृत्यू: ७ सप्टेंबर १९९४)**१८८५:विष्णू महादेव भट-- वैद्यकीय ग्रंथाचे लेखक (मृत्यू:३० एप्रिल १९६१)**१८६९:लक्ष्मणराव किर्लोस्कर – किर्लोस्कर उद्योगसमुहाचे संस्थापक (मृत्यू:२६ सप्टेंबर १९५६)**_मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन:_* •••••••••••••••••••••••••••••••••*२००८:चंद्रकांत गोखले – अभिनेते (जन्म: ७ जानेवारी १९२१)**१९९७:वासुदेव वामन तथा ’भाऊसाहेब’ पाटणकर ऊर्फ ’जिंदादिल’ – मराठीतले पहिले शायर (जन्म:२९ डिसेंबर १९०८)**१९९७:बासू भट्टाचार्य – चित्रफट दिग्दर्शनाच्या पदार्पणातच राष्ट्रपती पुरस्कार मिळवणारे निर्माते व दिग्दर्शक (जन्म: १९३४)**१९८७:डॉ.सलीम अली हे भारतातील आद्य पक्षिशास्त्रज्ञ आणि पर्यावरणवादी(जन्म:१२ नोव्हेंबर १८९६)**१८३७:विल्यम (चौथा) – इंग्लंडचा राजा (जन्म: २१ ऑगस्ट १७६५)**१६६८:हेन्रिच रॉथ – जर्मनीतील संस्कृत विद्वान आणि धर्मप्रसारक (जन्म:१८ डिसेंबर १६२०)**_दिनविशेष या सदरातील सर्व मुद्दे हे संग्रहात्मक आहेत तेव्हा त्यात चूका नसतीलच असे सांगता येणार नाही_* *✍ संकलन :- श्रीराम चव्हाण माजी शिक्षणाधिकारी,नागपूर*मोबाईल:9822695372 ईमेल: chavhansk65@gmail.com••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• 🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••1⃣ *यूपी-बिहारमध्ये जीवघेणी उष्णता; तीन राज्यांमध्ये आतापर्यंत 200 जणांचा मृत्यू !*•••••••••••••••••••••••••••••••••••••2⃣ *जूनचा शेवटचा आठवडा हा धुवाँधार पावसाचा असेल, असा अंदाज हवामानतज्ज्ञ श्रीनिवास औंधकर यांनी व्यक्त केला आहे.*•••••••••••••••••••••••••••••••••••••3⃣ *बृहन्मुंबई महानगरपालिकेमध्ये विविध विभागांमध्ये झालेल्या अनियमिततेबाबत मुंबई पोलीस आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली विशेष चौकशी समिती स्थापन करण्यास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली मंजुरी*•••••••••••••••••••••••••••••••••••••4⃣ *अखेर मनिषा कायंदे यांचा शिवसेना शिंदे गटात प्रवेश, CM शिंदे यांनी सोपवली महत्त्वाची जबाबदारी*•••••••••••••••••••••••••••••••••••••5⃣ *गोरखपूरच्या गीता प्रेसला गांधी शांतता पुरस्कार, पंतप्रधान नरेंद्र मोदींनी ट्विट करत केलं अभिनंदन*•••••••••••••••••••••••••••••••••••••6⃣ *सोन्याच्या दरात आठवडाभरात दोन हजार रुपयांची घसरण, सुवर्णनगरीत सोन्याचे प्रतितोळा दर जीएसटीसह 61 हजारांवर*•••••••••••••••••••••••••••••••••••••7⃣ *भवानी देवीने इतिहास रचला, आशियाई चॅम्पियन्सशिपमध्ये तलवारबाजीत पदक जिंकणारी पहिली भारतीय !*•••••••••••••••••••••••••••••••••••••*📷 वृत्त संकलक - कुणाल पवारे 📹*📱9960358300•••••••••••••••••••••••••••••••••••••ही पोस्ट नियमित मिळविण्यासाठी आणि या समुहात add होण्यासाठी 9423625769 येथे संपर्क करावे.••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *✈ 🚀 गुगलयान ✈ 🚀*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••*वेळेचे नियोजन केलात का ?* प्रत्येकाच्या जीवनात वेळ अत्यंत महत्वाची आहे. वेळेवर काम करणारी माणसे थकत नाहीत म्हणूनच ते अयशस्वी होत नाहीत..........https://nasayeotikar.blogspot.com/2019/08/blog-post.htmlलेख वाचून आपल्या प्रतिक्रिया जरूर द्याव्यात~~~~~~~~~~~~~~~~~~~✍ स्तंभलेखक *नासा येवतीकर, धर्माबाद*9423625769~~~~~~~~~~~~~~~~~~~••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• 🌷🍃 *विशेष माहिती* 🌷🍃••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••जांभूळ मधुमेह या रोगावर गुणकारी आहे, जांभूळ रसाच्या, तसेच बीच्या भुकटीला औषधी गुणधर्म आहे. जांभळाच्या बियांचे चूर्ण हे मधुमेहावर औषध आहे, परंतु ते तज्ज्ञांचे सल्ल्यानेच घ्यावे. जांभूळ रक्त शुद्ध करते. चेहऱ्यावरच्या मुरूम व पुटकुळ्या जांभळीच्या बिया उगाळून लेप केल्याने जातात. जांभूळ हे पाचक आहे असेही मानले जाते. जांभळाचे आसव बनवता येते. वर्षभर टिकवून ठेवण्यासाठी जांभळाच्या पिकलेल्या फळापासून जेली, सिरप, स्क्वॅश असे उपयुक्त पदार्थ तयार करता येतात.याच्या नियमित सेवनाने केस लांबसडक व मजबूत होतात. यात पोटॅशियमचे प्रमाण जास्त असल्याने शरिरास आवश्यक ते पोटॅशियम याचे सेवनाने मिळते.सुगंधी पाने असलेला, लोंबकळणाऱ्या वेलीसदृश फांद्या, तकतकीत सदाहरित पर्णसंभार असलेल्या वृक्षाचे पूर्वापार चालत असलेले नाव म्हणजे 'जंम्बू उर्फ राजजम्बू'. वृक्षाच्या नावातही रुबाब आहे. साहजिकच या वृक्षाची ओळख, इतर अनेक नावांनी करून दिली जाते. सुगंधी पानांचा हा वृक्ष सुरभिपत्र या नावासही पात्र आहे. लवंगाची व निलगिरीची झाडे याची कुलबंधू असल्याने हे कूल 'लवंगकुल' म्हणूनही ओळखले जाते.*संकलन*••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• 🌹 *" फ्रेश सुविचार "* 🌹••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••अन्याय आणि अनीतीने ध्येयसिद्धी होत नाही; परंतु सत्य आणि धर्माची कास धरल्याने ध्येय सिद्धी होत असते.➖रामकृष्ण परमहंस.*संकलन :- प्रमिलाताई सेनकुडे, नांदेड**प्रा.शा. गोजेगाव ता.हदगाव, जि. नांदेड*📱9403046894••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• ❓ *आजची प्रश्नमंजुषा* ❓••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••१) जांभूळमध्ये कोणते जीवनसत्त्व असते ?२) जांभूळ खाण्याचे फायदे सांगा.३) जांभूळ या फळाला इंग्रजीत काय म्हणतात ?४) आजाराने अपारदर्शक झालेले बुबुळ पांढरे होऊन काय होते ?५) राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्याध्यक्षपदी कोणाची निवड झाली आहे ?*उत्तरे :-* १) व्हिटॅमिन 'सी' २) रक्त शुद्धीकरण, पाचकरस, पचनक्रिया, साखरेचे प्रमाण नियंत्रित etc ३) Java Plum/ Black Berry ४) अंधत्व येते ५) सुप्रिया सुळे व प्रफुल्ल पटेल*संकलन :- जैपाल भै. ठाकूर*जि.प.व.प्राथ.शाळा भोसा, ता. आमगाव, जि. गोंदिया 📱9765943144••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎂 *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *◆|वा|ढ|दि|व|स|अ|भि|ष्ठ|चिं|त|न|◆* 👤 किरण पाटील बेंद्रे, धर्माबाद👤 लक्ष्मण तुरेराव, लोकमत प्रतिनिधी, धर्माबाद👤 शंकर पाटील कदम, धर्माबाद👤 गणेश यमेवार, धर्माबाद👤 रामचंद्र विश्वब्रम्ह,बिलोली👤 टेककम साईराम, तेलंगणा👤 रमेश मुनेश्वर, साहित्यिक, किनवट👤 विनोद गुम्मलवार, नांदेड👤 निमेश गावीत👤 राजेंद्र पाटील👤 लक्ष्मण चन्नावार, नायगाव👤 गंगाधर गटूवार, कुंडलवाडी👤 दौलतराव वारले, सहशिक्षक, धर्माबाद👤 शादूल चौधरी, बिलोली👤 साईबाबा बनसोडे, धर्माबाद👤 मन्मथ मोकलीकर, धर्माबाद👤 अजित पिंगळे👤 संभाजी आटोळकर👤 अनिल राठोड👤 शिवा बोधने👤 गणेश अंगरोड, धर्माबाद👤 मैनोद्दीन पटेल*ઉदंड_आયુષ્યાच्या अનંત_શુभेच्छा,* [ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा एक दिवस अगोदर 9423625769 येथे पोस्ट करावे. ]••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• ••• 💡 ‼ *मनाचे श्लोक*‼ 💡•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••मना पापसंकल्प सोडूनि द्यावा। मना सत्यसंकल्प जीवीं धरावा॥ मना कल्पना ते नको वीषयांची। विकारे घडे हो जनी सर्व ची ची॥५॥।। जय जय रघुवीर समर्थ ।।••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🕊🌎 ‼ *विचार धन*‼🕊🌎••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••जेव्हा आपण ठेच लागून पडतो तिथूनच सुरुवात होते सांभाळून चालायची. मग ती ठेच पायाला लागलेली असो किंवा मनाला. पायाची ठेच शरीर जपायला शिकवते आणि मनाची ठेच माणसं ओळखायला शिकवते.••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎭 *आजची फ्रेश बोधकथा* 🎭••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *पर्वत आणि उंदीर**एकदा एक पर्वत आणि उंदीर यांच्यात वाद सुरू होता. 'श्रेष्ठ कोण?' यावर ते भांडत होते.पर्वत म्हणाला, "तू किती छोटा प्राणी आहेस, तू माझ्याहून अजिबात श्रेष्ठ नाहीस."उंदीर पटकन म्हणाला, "मला माहित आहे की, मी तुझ्या एवढा मोठा नाही. पण तू तरी कुठे माझ्या एवढा लहान आहेस!"पर्वत म्हणाला, "मोठ्या आकाराचे अनेक फायदे असतात. मी मोठा असल्याने आकाशात वाहणाऱ्या ढगांना अडकवू शकतो."उंदीर म्हणाला, "तू त्या ढगांना अडवू शकतोस. पण तुझ्या पायथ्याशी मी मोठी बिळे करतो. तेव्हा तू मला अडवू शकतोस का?"छोट्या उंदराने आपल्या चतुराईने पर्वतावर मात केली व तो आपल्या बिळात घुसला. तात्पर्य: छोटा असो की मोठा, प्रत्येकाला स्वतःचे महत्त्व असतेच.•••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••या पोस्ट विषयी आपल्या सूचना, निवेदन, अभिप्राय, बातम्या, वाढदिवस, माहिती किंवा शंका 9423625769 येथे कळवावे. •••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••~~~~~~~~~~~~~~~~~~~*🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢*📱 9423625769~~~~~~~~~~~~~~~~~~~*🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏*पुन्हा भेटू या फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार ~~~~~~~~~~~~~~~~~~~
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment