✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट~~~~~~~~~~~~~~~~~~~ 6️⃣ 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 6️⃣ ( फ्रेश शालेय परिपाठ )🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00 ( रविवार आणि सुट्टी वगळून )~~~~~~~~~~~~~~~~~~~🎇 दिनांक :- 27 जून 2023💠 वार - मंगळवार••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *✈ 🚀 गुगलयान ✈ 🚀*••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *कथा - नवऱ्याचे मी पण*कुटुंबातील नात्यात असलेला घालमेल, प्रेम, जिव्हाळा आणि तिरस्कार यावर आधारित फेसबुकवर अनेक वाचकांना पसंत पडलेली ही कथा आहे. मला आशा आहे आपणांस ही कथा नक्की आवडेल. तेव्हा चला कथा वाचू या .....!पाचवा भाग -------https://m.facebook.com/groups/aamhi.saahityik/permalink/7276558762360476/?mibextid=Nif5ozकथा आवडल्यास आपल्या प्रतिक्रिया अवश्य कळवा.~~~~~~~~~~~~~~~~~~~✍ स्तंभलेखक *नासा येवतीकर, धर्माबाद*9423625769~~~~~~~~~~~~~~~~~~~••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• 🚥 *२७ जून २०२३* 🚥 🌷🌐 . *दिनविशेष . 🌐* 🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••• *_ या वर्षातील १७८ वा दिवस आहे_* •••••••••••••••••••••••••••••••• *_महत्त्वाच्या घटना:_* •••••••••••••••••••••••••••••• *१९९६:अर्थतज्ञ द. रा. पेंडसे यांना ’महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीज’चा ’चिंतामणराव देशमुख पुरस्कार’ जाहीर**१९९१:युगोस्लाव्हियाने स्लोव्हेनियावर आक्रमण केले.**१९७७:जिबुटी (Dijbouti) ला (फ्रान्सपासुन) स्वातंत्र्य मिळाले.**१९५४:अणुशक्तीवर चालणारे जगातील पहिले विद्युतकेंद्र (क्षमता: ५००० किलो वॅट) रशियातील मॉस्कोजवळ ओबनिन्स्क येथे सुरू झाले.**१९५०:अमेरिकेने कोरियन युद्धात आपले सैन्य पाठवण्याचा निर्णय घेतला.**_जन्मदिवस / जयंती / वाढदिवस:_* •••••••••••••••••••••••••••••••••*१९७१:डॉ. विजयालक्ष्मी रवि वानखेडे -- कवयित्री, कथाकार,कादंबरीकार* *१९६९: अनुपमा रामेश्वर जाधव -- कवयित्री लेखिका* *१९६८:डॉ.रमाकांत विठ्ठलराव कराड-- लेखक**१९६७:बाबुराव चौरपगार -- कवी* *१९६४:अभय भंडारी --लेखक, वक्ते* *१९६३:डॉ.विजयकुमार पंढरीनाथ फड-- संत साहित्याचे अभ्यासक,लेखक तथा सनदी अधिकारी* *१९५५:डॉ.प्रमोद हरी महाजन-- आरोग्य शिक्षण विषयावर विपुल प्रमाणात लेखन* *१९५३:रवींद्र पांढरे -- कवी, कादंबरीकार कथाकार**१९५०:नितीन मुकेश माथूर-- भारतीय पार्श्वगायक* *१९३९:राहूलदेव बर्मन तथा ’पंचमदा’ – संगीतकार (मृत्यू: ४ जानेवारी १९९४)**१९२८: राम प्रधान-- माजी केंद्रीय गृह सचिव व महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्य सचिव, लेखक (मृत्यू:३१ जुलै २०२०)* *१९१७:खंडेराव मोरेश्वर ऊर्फ ’खंडू’ रांगणेकर – आक्रमक डावखुरे फलंदाज (मृत्यू: ११ आक्टोबर १९८४)**१८८०:हेलन केलर – अंध व मूकबधीर असुनही कला शाखेची पदवी मिळवलेल्या, समाजसेविका, राजकीय कार्यकर्त्या व शिक्षिका (मृत्यू: १ जून १९६८)**१८७५:दत्तात्रेय कोंडो घाटे ऊर्फ ’कवी दत्त’ (मृत्यू: १३ मार्च १८९९)**१८६४:शिवराम महादेव परांजपे – ’काळ’ कर्ते,वक्ते, लेखक, स्वातंत्र्यसैनिक व पत्रकार (मृत्यू: २७ सप्टेंबर १९२९)**१८३८:बंकिमचंद्र चट्टोपाध्याय – बंगाली कादंबरीकार, कवी, लेखक आणि पत्रकार. (मृत्यू: ८ एप्रिल १८९४)* *_मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन:_* •••••••••••••••••••••••••••••••••*२०१४:माधव नारायण आचार्य-- मराठी लेखक(जन्म:१९३०)* *२००८:फील्ड मार्शल सॅम माणेकशा (जन्म: ३ एप्रिल १९१४)**२०००: दत्तात्रेय नरसिंह गोखले – शिक्षणतज्ञ व चरित्रकार(जन्म:२० सप्टेंबर १९२२)**१९९८:होमी जे. एच. तल्यारखान – गांधीवादी नेते, सिक्कीमचे पहिले राज्यपाल, मंत्री व आमदार (जन्म: ९ फेब्रुवारी १९१७)**१९९६:अल्बर्ट आर. ब्रोकोली – ’जेम्स बाँड’ पटांचे निर्माते (जन्म: ५ एप्रिल १९०९)**१८३९:महाराजा रणजितसिंग – शिख साम्राज्याचे संस्थापक (जन्म: १३ नोव्हेंबर १७८०)**१७०८:धनाजी जाधव – मराठा साम्राज्यातील सेनापती (जन्म: १६५०)* ~~~~~~~~~~~~~~~~~~~~~ *_दिनविशेष या सदरातील सर्व मुद्दे हे संग्रहात्मक आहेत तेव्हा त्यात चूका नसतीलच असे सांगता येणार नाही_* *✍ संकलन :- श्रीराम चव्हाण माजी शिक्षणाधिकारी नागपूर*मोबाईल:9822695372 ईमेल: chavhansk65@gmail.com••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• 🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••1⃣ *राज्यात लवकरच 50 हजार शिक्षकांची भरती केली जाणार शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांची मोठी घोषणा*•••••••••••••••••••••••••••••••••••••2⃣ *मुंबई: कृषी उत्पन्न बाजार समितीतून निवृत्त झालेल्या कर्मचाऱ्यांना निवृत्तीवेतन देण्याबाबत शासनस्तरावर हालचालींना वेग आला आहे.*•••••••••••••••••••••••••••••••••••••3⃣ *स्टेट ट्रान्सपोर्ट को-ऑप बॅंकेच्या निवडणुकीत ॲड. गुणरत्न सदावर्ते यांच्या एसटी कष्टकरी जनसंघाच्या पॅनलने एकतर्फी विजय मिळवला.*•••••••••••••••••••••••••••••••••••••4⃣ *600 वाहनांचा ताफा, सोबत अख्खं मंत्रिमंडळ; तेलंगणाचे मुख्यमंत्री KCR यांची सोलापुरात होणार सिंघम स्टाईल एन्ट्री*•••••••••••••••••••••••••••••••••••••5⃣ *तुळजाभवानीला भक्तांचे भरभरून दान; 207 किलो सोने, 2586 किलो चांदी आणि 254 हिरे*•••••••••••••••••••••••••••••••••••••6⃣ *नागपूर जिल्ह्यात मँगनीज खाणीसाठीच्या वृक्षतोडीला विरोध, पर्यावरण वाद्यांचं चिपको आंदोलन*•••••••••••••••••••••••••••••••••••••7⃣ *अखेर कुस्तीपटूंचे आंदोलन मागे पण न्यायालयात संघर्ष सुरुच राहणार, कुस्तीपटूंचा महत्त्वपूर्ण निर्णय*•••••••••••••••••••••••••••••••••••••*📷 वृत्त संकलक - कुणाल पवारे 📹*📱9960358300•••••••••••••••••••••••••••••••••••••ही पोस्ट नियमित मिळविण्यासाठी आणि या समुहात add होण्यासाठी 9423625769 येथे संपर्क करावे.••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• 🌷🍃 *विशेष माहिती* 🌷🍃••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••डॉ. हेलन ॲडम्स केलर या अमेरिकन लेखिका, सुधारक व प्राध्यापिका होत्या. महाविद्यालयातून पदवीदार होणाऱ्या त्या पहिल्या मूकबधिर व्यक्ती होत्या. हेलन केलरचा जन्म २७ जून १८८० मध्ये टस्कंबिया, अलाबामा येथे झाला. हेलनच्या आईचे नाव केट ॲडम्स होते. हेलनची आजी ही रॉबर्ट ई ली यांची बहीण होती. हेलनची आई केट ही चार्लस ॲडम्स यांची मुलगी होती. हेलनच्या पूर्वजांपैकी एक जण हे झूरिचमध्ये मूक बधिरांसाठीचे पहिले शिक्षक होते.हेलन या जन्मजात मूक बधीर नव्हत्या. लोहितांग ज्वर (स्कार्लेट फीव्हर) किंवा मस्तिष्कावरण ज्वरामुळे (मेनिंजायटिस) नंतर ती अंध आणि बधिर झाली. मे, इ.स. १८८८ मध्ये केलर यांनी अंधांसांठीच्या पर्किनस संस्थेत प्रवेश घेतला. इ.स. १८९४ मध्ये त्यांनी आणि ॲन सॅलिव्हन यांनी न्यू यॉर्कमधल्या बधिरांसाठीच्या राइट ह्यूमसन शाळेत प्रवेश घेतला आणि सारा फुलर यांच्याकडून शिक्षण घेतले. इ.स. १८९६ मध्ये त्या मॅसेच्युसेट्सला परतल्या. केलर यांनी महिलांसाठीच्या केंब्रिज शाळेत प्रवेश घेतला आणि १९०० मध्ये त्या रॅडक्लिफ कॉलेजला गेल्या व तेथे त्या ब्रिग्स हॉल, साऊथ हाऊसमध्ये राहिल्या. त्यांचे प्रशंसक, मार्क ट्वेन यांनी त्यांची ओळख हेन्री हटलस्टन यांच्याशी करून दिली, त्यांनी व त्यांच्या पत्नी एबी यांनी केलर यांच्या शिक्षणाचे पैसे भरले.*संकलन*••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• 🌹 *" फ्रेश सुविचार "* 🌹••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••ज्याच्याजवळ धैर्य आहे व जो मेहनत करायला घाबरत नाही, अशा हिम्मतवानाची सफलता दासी असते.➖ दयानंद सरस्वती*संकलन :- प्रमिलाताई सेनकुडे, नांदेड**प्रा.शा. गोजेगाव ता.हदगाव, जि. नांदेड*📱9403046894••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• ❓ *आजची प्रश्नमंजुषा* ❓••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••१) साहित्य अकादमी पुरस्कार एकूण किती भाषेतील लेखकांना दिला जातो ?२) राज्यघटनेच्या कितव्या कलमानुसार देशातील सर्व सार्वजनिक स्थळे सर्व नागरिकांना खुली आहेत ?३) एक सजीव त्याच्यासारख्याच दुसऱ्या सजीवास जन्म देतो त्यास काय म्हणतात ?४) रिसर्च अँड अनालीसिस विंग ( रॉ ) चे नवे प्रमुख म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली ?५) महात्मा गांधी आंतरराष्ट्रीय हिंदी विद्यापीठ कोठे आहे ?*उत्तरे :-* १) २४ भाषा २) कलम १५ ३) पुनरुत्पादन / प्रजनन ४) रवी सिन्हा ५) वर्धा*संकलन :- जैपाल भै. ठाकूर*जि.प.व.प्राथ.शाळा भोसा, ता. आमगाव, जि. गोंदिया 📱9765943144••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎂 *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *◆|वा|ढ|दि|व|स|अ|भि|ष्ठ|चिं|त|न|◆* 👤 शंकर देशमुख👤 सुशील कापसे, सहशिक्षक👤 पोषट्टी चिपेवार*ઉदंड_आયુષ્યાच्या अનંત_શુभेच्छा,* [ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा एक दिवस अगोदर 9423625769 येथे पोस्ट करावे. ]••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• ••• 💡 ‼ *मनाचे श्लोक*‼ 💡•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••जनीं सर्वसूखी असा कोण आहे। विचारें मना तुंचि शोधुनि पाहे॥ मना त्वांचि रे पूर्वसंचीत केले। तयासारिखे भोगणें प्राप्त जाले ॥११॥।। जय जय रघुवीर समर्थ ।।••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🕊🌎 ‼ *विचारधारा*‼🕊🌎••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••स्वतः हसत रहाणे व सदैव हसतच जगणे हे प्रत्येकांसाठी भल्याचेच आहे कारण हसणे एक प्रकारचे जीवन आहे आपण कुठेतरी ऐकले असणार. . पण,कोणाला रडवून आपण खळखळून हसत जगणे ही माणुसकी नव्हे. तर...रडणाऱ्याचे अश्रू पुसून त्याला पुन्हा एकदा नव्याने जगायला लावणे हा खरा माणुसकी धर्म आहे आणि तोच माणुसकी धर्म एक चांगला माणूस बनून प्रत्येकांसाठी निभावून दाखवणे आजच्या घडीला अत्यंत काळाची गरज आहे. 🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷सौ.संगीता संतोष ठलाल मु.कुरखेडा जि.गडचिरोली••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎭 *आजची फ्रेश बोधकथा* 🎭••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••*अरण्य व लाकूडतोड्या*एकदा एक लाकूडतोड्या रानात गेला असता इकडे तिकडे पाहात रडू लागला. तेव्हा रानातल्या झाडांनी त्याला विचारले, ‘तू का रडतोस ? तुला काय हवं आहे ?’ तो म्हणाला, ‘माझ्या कुर्हाडीला दांडा नाही, त्यासाठी लाकडाचा एक लहानसा तुकडा मला द्याल तर बरं होईल.’ ते ऐकून झाडांना त्याची दया आली व त्याला चिंचेच्या चिवट लाकडाचा एक तुकडा दिला. लाकूडतोड्याने तो आपल्या कुर्हाडीला घातला व सगळी झाडे तोडण्याचा सपाटा लावला. तेव्हा एक झाड इतर झाडांना म्हणाले, ‘मित्रहो, आपण आपल्याच हाताने आपला नाश करून घेतला आहे. तेथे दुसर्याला नावं ठेवायला जागा नाही.’तात्पर्य – शत्रूची कीव करून त्याला साहित्य पुरविले तर शेवटी पश्चात्ताप करण्याची वेळ येते. •••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••या पोस्ट विषयी आपल्या सूचना, निवेदन, अभिप्राय, बातम्या, वाढदिवस, माहिती किंवा शंका 9423625769 येथे कळवावे. •••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••~~~~~~~~~~~~~~~~~~~*🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢*📱 9423625769~~~~~~~~~~~~~~~~~~~*🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏*पुन्हा भेटू या फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार ~~~~~~~~~~~~~~~~~~~
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment