✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट~~~~~~~~~~~~~~~~~~~ 6️⃣ 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 6️⃣            ( फ्रेश शालेय परिपाठ )🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00         ( रविवार आणि सुट्टी वगळून )~~~~~~~~~~~~~~~~~~~🎇 दिनांक :- 15 जून 2023💠 वार - गुरुवार••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••      *✈  🚀  गुगलयान ✈ 🚀*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••लेख - *शाळेला चाललो आम्ही*आज शाळेचा पहिला दिवस त्यानिमित्ताने .........https://nasayeotikar.blogspot.com/2016/06/school-chale-hum.htmlवरील लिंकवर क्लीक करून लेख वाचून आपल्या प्रतिक्रिया जरूर द्याव्यात~~~~~~~~~~~~~~~~~~~✍ स्तंभलेखक *नासा येवतीकर, धर्माबाद*9423625769~~~~~~~~~~~~~~~~~~~••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🚥🌐 .  *दिनविशेष .*  🌐🚥••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••*_जागतिक हवा दिन_* ••••••••••••••••••••••••••••••••••• *_ या वर्षातील १६६ वा दिवस आहे_* •••••••••••••••••••••••••••••••• 💥 *_महत्त्वाच्या घटना:_* ••••••••••••••••••••••••••••••• *२००८:’लेहमन ब्रदर्स’ या वित्तसंस्थेने दिवाळखोरी जाहीर केली.**२००१:ग्रँडमास्टर विजयालक्ष्मी सुब्रह्मण्यमने राष्ट्रीय ’अ’ बुद्धिबळ स्पर्धा विक्रमी पाचव्यांदा जिंकली.**१९९४:इस्त्रायल व व्हॅटिकन सिटी यांमधे पूर्ण राजनैतिक संबंध प्रस्थापित झाले.**१९९३:संपूर्ण देशी बनावटीच्या सहा ’अर्जुन’ रणगाड्यांची पहिली तुकडी लष्कराकडे सुपूर्त**१९७०:बा.पां.आपटे पुणे विद्यापीठाचे आठवे कुलगुरू झाले.**१९१९:कॅप्टन जॉन अलकॉक व लेफ्टनंट आर्थर ब्राऊन यांनी विमानातुन सर्वप्रथम अटलांटिक महासागर पार केला.**१८६९:महाराष्ट्रातील पहिला विधवा विवाह साजरा झाला. श्री. पांडूरंग विनायक करमरकर यांनी वेणुताईच्या गळयात माळ घातली.**१८४४:चार्ल्स गुडइयरने रबराच्या व्हल्कनायझेशनचे पेटंट घेतले.*•••••••••••••••••••••••••••••••••••••• 💥 *_जन्मदिवस / जयंती / वाढदिवस:_* ••••••••••••••••••••••••••••••••••••••*१९८८:बापू सोपान भोंग-- कथा, कादंबरी लेखन करणारे लेखक* *१९८०:अनिल दादासाहेब साबळे-- कवी, लेखक* *१९७८: संतोष दिगंबर आळंजकर -- कवी* *१९७५: प्रा.डॉ.सुशिलप्रकाश यादवराव चिमोरे-- कवी,समीक्षक,संपादक* *१९७४:डॉ.सोपान माणिकराव सुरवसे-- लेखक,समीक्षक* *१९७४:डॉ.विनोद पांडुरंग सिनकर-- कवी* *१९७४: कादर राजूमिया शेख-- कवी(पंकज) शिक्षणाधिकारी (गोंदिया)**१९७२:चेतन हंसराज -- भारतीय चित्रपट आणि दूरदर्शन अभिनेता**१९७१:सतीश माणिकराव जामोदकर-- कवी,लेखक,संपादक* *१९७०: डॉ.प्रकाश राठोड -- लेखक**१९६६: मनोहर आंधळे-- कवी* *१९६४:मीलन सुरेश येवले- कवयित्री, लेखिका**१९५९:डॉ.सुहास भास्कर जोशी- प्रसिद्ध लेखक**१९५६:हेमंत जगन्नाथ रत्नपारखी-- कवी, लेखक* *१९५५:आनंद वामन उगले-- कथाकार, निवृत्त गटशिक्षणाधिकारी**१९४८:प्रकाश एदलाबादकर- प्रसिद्ध स्तंभलेखक**१९४७:प्रेमानंद गज्वी – मराठी साहित्यिक व जेष्ठ नाटककार**१९४५:अर्जुन उमाजी डांगळे-- कवी, कथाकार**१९४२:प्रा.भाऊ लोखंडे-- आंबेडकरी चळवळीचे भाष्यकार, पाली साहित्याचे गाढे अभ्यासक,साहित्यिक (मृत्यू:२२ सप्टेंबर २०२०)**१९३७:रामचंद्र बाळकृष्ण कोलारकर -- संशोधक, संपादक, अनुवादक, कथासमीक्षक, कथासंकलक**१९३७:किसन बाबूराव तथा ‘अण्णा‘ हजारे – आदर्श ग्रामपरिवर्तन करुन देशाला व जगालाही समाजपरिवर्तनाची नवी दिशा दाखवणारे समाजवेवक**१९३३:सरोजिनी शंकर वैद्य –ललितलेखिका, चरित्रकार, समीक्षक (मृत्यू:३ऑगस्ट २००७)**१९२९:सुरैय्या जमाल शेख ऊर्फ ’सुरैय्या’ – गायिका व अभिनेत्री (मृत्यू: ३१ जानेवारी २००४)**१९२८:शंकर विनायक वैद्य –कवी, समीक्षक वक्ते कथाकार (मृत्यू:२३ सप्टेंबर २०१४)**१९२३:केशव जगन्नाथ पुरोहित ऊर्फ ’शांताराम’ – कथाकार, कादंबरीकार,१९८९ साली अमरावती येथे भरलेल्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष (मृत्यू:१७ ऑक्टोबर २०१८)**१९१७:सज्जाद हुसेन – संगीतकार (मृत्यू: २१ जुलै १९९५)**१९०७:ना.ग.गोरे – स्वातंत्र्यसैनिक, संयुक्त महाराष्ट्र चळवळीतील नेते आणि समाजवादी विचारवंत (मृत्यू: १ मे १९९३)**१९०६:गंगाधर भाऊराव निरंतर-कादंबरीकार, ललित लेखक(मृत्यू:१३ मार्च १९५९)**१८९८:गजानन श्रीपत तथा ’अण्णासाहेब’ खेर – पुणे विद्यार्थी गृहाचे एक संस्थापक (मृत्यू: २९ ऑगस्ट १९८६)* •••••••••••••••••••••••••••••••••••••• 💥 *_मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन:_* ••••••••••••••••••••••••••••••••••••••*१९८३:श्रीरंगम श्रीनिवास राव ऊर्फ ’श्री श्री’ – साहित्य अकादमी पुरस्कार विजेते तेलगु कवी व गीतकार (जन्म: ३० एप्रिल१९१०)**१९७९:सूर्यकांत रामचंद्र खांडेकर – कवी व गीतकार (जन्म: २ एप्रिल १९२६)**१९३१:अच्युत बळवंत कोल्हटकर – अर्वाचीन मराठीतील सुलभ लेखनशैलीचे प्रवर्तक, ’संदेश’कार (जन्म: १८७९)* ~~~~~~~~~~~~~~~~~~~~~ *_दिनविशेष या सदरातील सर्व मुद्दे हे संग्रहात्मक आहेत तेव्हा त्यात चूका नसतीलच असे सांगता येणार नाही_* *✍ संकलन :- श्रीराम चव्हाण नागपूर*📱 9822695372 chavhansk65@gmail.com••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••   🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••1⃣ *विदर्भ वगळता संपूर्ण महाराष्ट्रात शैक्षणिक वर्ष 2023-24 वर्षातील शाळांना आजपासून प्रारंभ*•••••••••••••••••••••••••••••••••••••2⃣ *प्रतिष्ठेचा शाहू पुरस्कार यंदा डॉ. अभय बंग आणि डॉ. राणी बंग यांना जाहीर, कोल्हापूरचे जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांची पत्रकार परिषदेत माहिती*•••••••••••••••••••••••••••••••••••••3⃣ *नीट परीक्षेत मुंबईचा श्रीनिकेत रवी राज्यात पहिला तर देशात सातव्या क्रमांकावर*•••••••••••••••••••••••••••••••••••••4⃣ *प्रशासकीय दिरंगाईमुळे MPSC च्या संयुक्त पूर्व परीक्षा गट ब चा निकाल 9 महिन्यांपासून रखडला, विद्यार्थी चिंतेत*•••••••••••••••••••••••••••••••••••••5⃣ *ST कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी, शासकीय कर्मचाऱ्यांप्रमाणे मिळणार महागाई भत्ता, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची मोठी घोषणा*•••••••••••••••••••••••••••••••••••••6⃣ *अक्षय भालेराव हत्याकांड प्रकरणाची आंबेडकर इंटरनॅशनल मिशन संस्थेकडून दखल, कायदेशीर मदत देण्याची ग्वाही*•••••••••••••••••••••••••••••••••••••7⃣ *भारताचा इंग्लंड दौरा जाहीर, या दौऱ्यात पाच कसोटी सामने खेळण्यात येणार आहेत.*•••••••••••••••••••••••••••••••••••••*📷 वृत्त संकलक -  कुणाल पवारे 📹*📱9960358300•••••••••••••••••••••••••••••••••••••ही पोस्ट नियमित मिळविण्यासाठी आणि या समुहात add होण्यासाठी खालील मोबाईल क्रमांकावर संपर्क करावे••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••      🌷🍃  *विशेष माहिती* 🌷🍃••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••पवन ऊर्जा आणि त्याच्या वापराविषयी जनजागृती करण्यासाठी दरवर्षी 15 जून रोजी जागतिक पवन दिवस साजरा केला जातो. वायू दिवस पाळण्याची सुरुवात 2007 पासून झाली. 2009 साली त्याचे नामकरण जागतिक पवन दिवस असे झाले. विंडयुरोप आणि जागतिक पवन ऊर्जा परिषदे (GWEC) द्वारा हा दिवस पाळला जातो.*संकलन*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••   🌹 *" फ्रेश सुविचार "* 🌹••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••केळीच्या पानात पान असते, तसेच ज्ञानी माणसाच्या शब्दा शब्दात ज्ञान असते.*संकलन :- प्रमिलाताई सेनकुडे, नांदेड**प्रा.शा. गोजेगाव ता.हदगाव, जि. नांदेड*📱9403046894••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••       ❓ *आजची प्रश्नमंजुषा* ❓••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••१) भारतात चिनीमातीचे उत्पादन कोठे होते ?२) ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान कोण आहेत ?३) चंद्रगुप्त मौर्यचा गुरू चाणक्य यांना अजून कोणत्या नावाने ओळखले जाते ?४) 'ग्राम गणराज्य'ची संकल्पना कोणाची होती ?५) स्वयंचलित वाहनातून कोणता विषारी वायू बाहेर पडतो ?*उत्तरे :-* १) केरळ, सिंगभुम ( झारखंड ) २) अँथनी अल्बानिज ३) कौटिल्य, विष्णुगुप्त ४) महात्मा गांधी ५) कॉर्बन मोनोऑक्साईड*संकलन :- जैपाल भै. ठाकूर*जि.प.व.प्राथ.शाळा भोसा, ता. आमगाव, जि. गोंदिया  📱9765943144••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎂  *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••  *◆|वा|ढ|दि|व|स|अ|भि|ष्ठ|चिं|त|न|◆*     👤 संजय नोमुलवार, सहशिक्षक, धर्माबाद👤 हनमंलू शंकरोड, येवती👤 चंद्रकांत जोशी, धर्माबाद👤 गणेश पाटील जगदंबे👤 चंद्रकांत दुडकावार, सहशिक्षक, देगलूर👤 दत्तात्रय राऊतवाड👤 काशिनाथ राऊत👤 साईनाथ शिलेवाड👤 असद बेग👤 जयदीप गावंडे👤 नागेश रासनगीर👤 ज्ञानेश्वर शिरगिरे👤 संतोष गंगूलवार कासराळी👤 आनंद यशवंतराव पाटील, सहशिक्षक, धर्माबाद👤 अनिल कांबळे, सहशिक्षक, नांदेड👤 संजय गैनवार, सहशिक्षक, धर्माबाद👤 मारोती पाटील👤 दिगंबर मरकंटे, सहशिक्षक, बिलोली👤 शंकर गोसकेवार👤 अनिल बापकर👤 गणपतराव कात्रे, धर्माबाद👤 सत्यनारायण पांचाळ जुनीकर👤 साईनाथ शिलेवाड, येवती👤 संगीता संगेवार-दरबस्तेवार👤 शिलवंत डुमणे👤 गिरीधर जाधव👤 माधव उरेकर, सहशिक्षक, धर्माबाद👤 सचिन पाटील शिंदे👤 सय्यद अक्रम सय्यद जाकीर👤 बालाजी पाटील कदम👤 शेषराव पाटील हिवराळे👤 गंगाधर मावले, शिक्षक नेते, नायगाव👤 नरसिंग गुर्रम, नांदेड👤 धनाजी देशमुख👤 गिरीश जाधव👤 राम मोरे👤 राम लगड*ઉदंड_आયુષ્યાच्या अનંત_શુभेच्छा,*     [ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा एक दिवस अगोदर 9423625769 येथे पोस्ट करावे. ]••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••   ••• 💡 ‼ *मनाचे श्लोक*‼ 💡•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••गणाधीश जो ईश सर्वां गुणांचा। मुळारंभ आरंभ तो निर्गुणाचा॥ नमूं शारदा मूळ चत्वार वाचा। गमूं पंथ आनंत या राघवाचा ॥१॥।। जय जय रघुवीर समर्थ ।।••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🕊🌎 ‼ *विचार धन*‼🕊🌎••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *माणसाचा स्वभाव*"पिण्डे-पिण्डे मतिर्भिन्न: कुण्डे-कुण्डे नवं पयःजातो जातो नवाचारा: नवा वाणी मुखे-मुखे।" या नियमाप्रमाणे व्यक्ती तितक्या प्रकृती, तितकेच भिन्न-भिन्न स्वभाव, वेगवेगळ्या आवडी-निवडी, चित्र-विचित्र सवयी या असणारच. अगदी सख्खे चार भाऊ असले तरी प्रत्येकाच्या स्वभावाची वेगवेगळी वैशिष्ट्ये असतात.स्वभाव वैशिष्ट्यांमुळे माणसांचे सज्जन-दुर्जन, सुष्ट-दुष्ट, रागीट-शांत, दयाळू-क्रूर, उदारकंजूष, स्वार्थी-निस्वार्थी, कष्टाळू-आळशी, धाडसी-भित्रे व नम्र-उद्धट असे अनेक प्रकार पडतात.एखाद्या माणसामध्ये एखाद्या गुणाचा अथवा दोषाचा अतिरेक झाला तर त्याची गणना विक्षिप्त अथवा लहरी माणसात केली जाते. एखाद्या व्यक्तीला स्वत:च्या योग्यतेपेक्षा जास्त मानाचे, उच्च स्थान प्राप्त झाले तर त्याला त्या सत्तेचा उन्माद चढतो. समोर येणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला तो मनुष्य तुच्छ समजू लागतो. समोरच्या माणसाचे ज्ञान, बुद्धी, वय, त्याचे विचार, समाजातील स्थान याचा विचार न करता पदोपदी त्यांचा अपमान केला जातो. वादासाठी वाद घालण्यात आणि शेवटी आपलेच म्हणणे खरे करण्यात त्यांना धन्यता वाटते. उच्चासनावर बसणे म्हणजे इतरांच्यावर हुकूमत गाजविणे, जमेल तेवढा त्रास देणे, मुद्दाम गैरसोय करणे व स्वत:च्या मनाविरुद्ध एखादी घटना घडल्यास आकांड-तांडव करणे. त्यांच्या मते, सौजन्य आणि विनम्रता या गोष्टी वरिष्ठांसाठी नसतातच. समाजात असे मदांध सत्ताधारी काही कमी नसतात.याउलट काही काही अतिशय उदारमतवादी, विद्वान व तरीही विनम्र असतात.नेटवरून संकलन••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎭 *आजची फ्रेश बोधकथा*  🎭••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *गर्विष्ठ मोर*एक मोर होता. तो फार बढाईखोर होता. स्वतःच्या रूपाचा त्याला फार गर्व होता. तो दररोज नदीकिनारी जायचा. पाण्यात स्वतःचे प्रतिबिंब पाहून, स्वतःच्या सौंदर्याची स्तुती करायचा.मोर म्हणायचा, "माझा डोलदार पिसारा पहा! त्या पिसाऱ्यावरील मोहक रंग पहा!! माझ्याकडे पहा! जगातील सर्वात सुंदर पक्षी मीच आहे.एके दिवशी मोराला नदी किनाऱ्यावर एक करकोचा दिसला. मोराने त्याच्याकडे पाहून आपले तोंड फिरवले. आणि तुच्छतेने करकोच्याला म्हणाला, "किती रंगहीन आहेस तू! तुझे पंख पांढरे फटक आणि निस्तेज आहेत."करकोचा म्हणाला, "मित्रा, तुझा पिसारा नक्कीच सुंदर आहे. माझे पंख तुझ्यासारखी सुंदर नाहीत. पण म्हणून काय झालं ? तुझ्या पंखांनी तू उंच उडू शकत नाहीस. मी मात्र माझ्या पंखांनी आकाशात उंच उडू शकतो. "एवढे बोलून करकोचा ने आकाशात झेप घेतली. मोर मात्र खजील होऊन त्याच्याकडे पाहत राहिला. *तात्पर्य : दिखाऊ सौंदर्यापेक्षा उपयुक्तता महत्त्वाची असते.*•••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••या पोस्ट विषयी आपल्या सूचना, निवेदन, अभिप्राय, बातम्या, वाढदिवस, माहिती किंवा शंका 9423625769 येथे कळवावे. •••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••~~~~~~~~~~~~~~~~~~~*🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢*📱 9423625769~~~~~~~~~~~~~~~~~~~*🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏*पुन्हा भेटू या फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार ~~~~~~~~~~~~~~~~~~~

No comments:

Post a Comment