✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट~~~~~~~~~~~~~~~~~~~ 6️⃣ 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 6️⃣ ( फ्रेश शालेय परिपाठ )🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00 ( रविवार आणि सुट्टी वगळून )~~~~~~~~~~~~~~~~~~~🎇 दिनांक :- 16 जून 2023💠 वार - शुक्रवार••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🌷🌐 . *दिनविशेष . 🌐* 🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *_ या वर्षातील १६७ वा दिवस आहे_* •••••••••••••••••••••••••••••••• *_महत्त्वाच्या घटना:_* ••••••••••••••••••••••••••••••• *१९९०:मुंबई व उपनगरात दिवसभरातील सर्वाधिक वृष्टी झाली. गेल्या १०४ वर्षातील जूनमधे एका दिवसात पडलेल्या पावसाचा (६००.४२ मि.मि.) उच्चांक गाठला गेला.**१९६३:व्हॅलेन्तिना तेरेश्कोवा या रशियन महिलेने ‘वोस्तोक-६‘ या यानातून अंतराळप्रवास केला. अंतराळप्रवास करणारी ही पहिली महिला अंतराळयात्री बनली.**१९४७:नव्या, कल्पक उद्योजकांना प्रोत्साहन देण्याच्या दृष्टीने म. स. तथा ‘बाबुराव‘ पारखे यांनी मराठा चेंबरच्या वतीने कै. गो. स. पारखे औद्योगिक पारितोषिक देण्यास सुरुवात केली.**१९१४:सहा वर्षाच्या तुरुंगवासातून लोकमान्य टिळक यांची सुटका**१९११:एन्डिकोट, न्यूयॉर्क येथे द कॉम्प्युटिंग टॅब्युलेटिंग अँड रेकॉर्डिंग कंपनीची स्थापना झाली. याच कंपनीचे पुढे आय. बी. एम. या बलाढ्य कंपनीत रुपांतर झाले.**१९०३:फोर्ड मोटर कंपनीची स्थापना*•••••••••••••••••••••••••••••••••••••• *_जन्मदिवस / जयंती / वाढदिवस:_*••••••••••••••••••••••••••••••••••••••*१९९४:आर्या आंबेकर – गायिका**१९६७: प्रा.अंजली बर्वे-- लेखिका**१९६३:डॉ.गीता श्रीकांत लाटकर-- कवयित्री, लेखिका**१९५७: सुरेश गोपाळ काळे-- कवी* *१९५२:प्रा.नागोराव कुंभार--लेखक,संपादक**१९५१: संजीवनी बोकील-- कवयित्री**१९५०:मिथुन चक्रवर्ती-- भारतीय चित्रपट अभिनेता, सामाजिक कार्यकर्ता , उद्योजक* *१९४८:डॉ.तुषार श्रीधरराव झाडे: कथाकार, कवी**१९४५:रजनी परुळेकर-- मराठी साहित्यातील महत्त्वाच्या कवयित्री(मृत्यू:५ मे २०२२)* *१९४५:मधुकर यादवराव अंबरकर-- कवी लेखक (मृत्यू:२३ नोव्हेंबर २०१५)**१९३७:प्रकाश नारायण संत-- मराठीतील नामवंत कथाकार(मृत्यू:१५ जुलै २००३)* *१९३६:उषा माधव देशमुख-- प्राचीन व अर्वाचीन वाड्:मय आणि संतसाहित्याच्या अभ्यासक**१९३६:अखलाक मुहम्मद खान उर्फ कवी शहरयार – ज्ञानपीठ पुरस्कार विजेते ऊर्दू कवी (मृत्यू: १३ फेब्रुवारी २०१२)**१९३५:पंडित यशवंत महाले -- आग्रा घराण्याचे ज्येष्ठ गायक**१९३४: सुरेश दत्तात्रय नाडकर्णी-- वैधकविश्वावर लेखन करणारे लेखक (मृत्यू:२८ सप्टेंबर २००३)**१९२०:हेमंतकुमार – गायक, संगीतकार आणि निर्माता (मृत्यू: २६ सप्टेंबर १९८९)**१८९८:दिनकर वासुदेव दिवेकर-- ललित लेखक (मृत्यू:२३ जुलै २९५७)**१८९५: देविदास लक्ष्मण महाजन-- कवी अनुवादक (मृत्यू:३ एप्रिल १९६७)*•••••••••••••••••••••••••••••••••••••• *_मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन:_* ••••••••••••••••••••••••••••••••••••••*२००२:जयंत भानुदास परांजपे--समीक्षक, संशोधक, कादंबरीकार, कवी(जन्म:३१ मे १९४५)**१९७७:श्रीपाद गोविंद नेवरेकर – मराठी रंगभूमीवरील लोकप्रिय गायक व नट (जन्म: ३ जुलै १९१२)**१९४४:आचार्य प्रफुल्लचंद्र रे – भारतीय रसायनशास्त्रज्ञ, देशातील वैज्ञानिक चळवळीचे प्रणेते, त्यांनी ’बेंगॉल केमिकल्स अँड फार्मास्युटिकल्स’ ही कंपनी काढली. (जन्म: २ ऑगस्ट १८६१)**१९२५:देशबंधू चित्तरंजन दास – बंगालमधील विख्यात कायदेपंडित आणि स्वातंत्र्यसेनानी, साहित्यिक व वृत्तपत्रकार, विधवा विवाह व आंतरजातीय विवाह यांचा त्यांनी प्रचार व प्रसार केला. त्यांच्या स्मरणार्थ ’चित्तरंजन’ हे शहर वसवण्यात आले.(जन्म:५ नोव्हेंबर १८७०)* ~~~~~~~~~~~~~~~~~~~~~ *_दिनविशेष या सदरातील सर्व मुद्दे हे संग्रहात्मक आहेत तेव्हा त्यात चूका नसतीलच असे सांगता येणार नाही_* *✍ संकलन :- श्रीराम चव्हाण माजी शिक्षणाधिकारी, नागपूर*मोबाईल:9822695372 ईमेल: chavhansk65@gmail.com~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• 🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••1⃣ *MPSC परीक्षेमध्ये प्रमोद बाळासाहेब चौगुले याने सर्वसाधारण उमेदवारांमधून राज्यात पहिला क्रमांक, सोनाली अर्जुनराव म्हात्रे हिने मुलींमधून पहिला क्रमांक तसेच विशाल महादेव यादव हा मागासवर्ग उमेदवारांमधून राज्यात प्रथम आला आहे.*•••••••••••••••••••••••••••••••••••••2⃣ *'आरे'चे अतिरिक्त कर्मचारी एफडीएकडे वर्ग करणार - राधाकृष्ण विखे पाटील*•••••••••••••••••••••••••••••••••••••3⃣ *सर्व माध्यमांच्या शाळांमध्ये लवकरच 'ज्युनिअर आणि सीनियर केजी'चे वर्ग; शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांची माहिती*•••••••••••••••••••••••••••••••••••••4⃣ *एसटी सुस्साट! महामंडळाचा मागील वर्षभरातील 4000 कोटींचा तोटा आला 10 कोटींवर*•••••••••••••••••••••••••••••••••••••5⃣ *बिपरजॉय चक्रीवादळ आज गुजरातच्या किनारपट्टीला धडकणार, NDRFची 33 पथकं तैनात, बिपरजॉय चक्रीवादळाचा मुंबईतील वातावरणावर परिणाम, समुद्र खवळला; पर्यटकांना दूर राहण्याचं आवाहन*•••••••••••••••••••••••••••••••••••••6⃣ *चांदोली राष्ट्रीय उद्यान आजपासून पर्यटनासाठी बंद राहणार; 15 ऑक्टोबरपासून पुन्हा पर्यटनासाठी खुले होणार*•••••••••••••••••••••••••••••••••••••7⃣ *MPL 2023 स्पर्धेचे दिमाखात उद्घाटन, मराठी अभिनेत्री अमृता खानविलकरच्या नृत्य अदावर प्रेक्षक मंत्रमुग्ध झाले.*•••••••••••••••••••••••••••••••••••••*📷 वृत्त संकलक - कुणाल पवारे 📹*📱9960358300•••••••••••••••••••••••••••••••••••••ही पोस्ट नियमित मिळविण्यासाठी आणि या समुहात add होण्यासाठी 9423625769 येथे संपर्क करावे.••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *✈ 🚀 गुगलयान ✈ 🚀*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••*पालक नव्हे ; मित्र बना*https://nasayeotikar.blogspot.com/2019/11/blog-post_29.htmlलेख वाचून आपल्या प्रतिक्रिया जरूर द्याव्यात~~~~~~~~~~~~~~~~~~~✍ स्तंभलेखक *नासा येवतीकर, धर्माबाद*9423625769~~~~~~~~~~~~~~~~~~~••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• 🌷🍃 *विशेष माहिती* 🌷🍃••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *डिस्को डान्सर मिथुन चक्रवर्ती*.बॉलिवूडचे डिस्को डान्सर म्हणून ज्यांना ओळखलं जातं त्या मिथून चक्रवर्ती यांचा आज जन्मदिवस आहे. बॉलिवूडच्या 'दादां'चा जन्म 16 जून 1952 साली झाला होता. आपल्या आयुष्यामध्ये अनेक प्रकारचे चढउतार पाहणाऱ्या दादांचा आजवरचा प्रवास खडतर होता.मिथून दादांना अनेक प्रकारचे अवॉर्ड्स मिळाले आहेत. यामध्ये अनेक नॅशनल अवॉर्ड्स देखील सामील आहेत. मिथून चक्रवर्तींना दोन चित्रपटांसाठी नॅशनल अवॉर्ड मिळाले आहेत. त्यापैकी एक 1992 मधील बंगाली फिल्म Tahader Katha साठी मिळाला होता.तर दुसरा अवॉर्ड त्यांना 1998 मध्ये आलेला चित्रपट 'स्वामी विवेकानंद'साठी मिळाला होता. तृणमूल काँग्रेस पक्षाकडून ते राज्य सभेवर सदस्य देखील होते. मृग्या (१९७६) हा त्यांचा पहिला चित्रपट होय. या चित्रपटातील अभिनयासाठी त्यांना सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा राष्ट्रीय पुरस्कार मिळाला होतात्यांच्या करियरमधील फक्त एवढ्याच बाबी उल्लेखनिय नाहीयेत. तर तुम्हाला आश्चर्य वाटेल मात्र, मिथून दादांनी आपल्या संपूर्ण करियरमध्ये तब्बल आठ भाषांमध्ये काम केलं आहे. त्यांनी पंजाबी, बंगाली, हिंदी, उडिया, भोजपुरी, तमिळ, तेलुगू आणि कन्नड भाषांमधील चित्रपटांमध्ये अभिनय केला आहे. यानंतर देखील त्यांच्या अनेक अशा बाबी शिल्लक राहतात, ज्या उल्लेखनिय आहेत. मिथून दादांचा अभिनय इतका सुपरफास्ट आहे की, त्यांचं नाव लिम्का बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्येही नोंद झालं आहे. दादांना उगाच दादा म्हटलं जात नाही. मिथून खऱ्या अर्थाने बॉलिवूडचे दादा ठरतात ते या रेकॉर्डमुळेच. एका वर्षामध्ये लीड ऍक्टर म्हणून तब्बल 19 चित्रपटांमध्ये काम करण्याचा वर्ल्ड रेकॉर्ड मिथून चक्रवर्ती यांनी केला होता. हे वर्ष होतं 1989 चं... याच वर्षी मिथून दादांचे एकामागोमाग एक असे तब्बल 19 चित्रपट रिलीज झाले होते. विशेष म्हणजे हा रेकॉर्ड अद्यापही कुणी तोडू शकलेलं नाहीये. मिथून दादा आता फार मोजक्याच चित्रपटांमध्ये काम करतात. ते सध्या हॉटेल देखील चालवतात. खासकरुन उटीमध्ये त्यांचे अनेक हॉटेल्स आहेत. *संकलन*••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• 🌹 *" फ्रेश सुविचार "* 🌹••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••पुस्तके म्हणजे समयरुपी सागरात उभे केलेले दीपस्तंभ होत.➖ इ.पी. विपिल.*संकलन :- प्रमिलाताई सेनकुडे, नांदेड**प्रा.शा. गोजेगाव ता.हदगाव, जि. नांदेड*📱9403046894••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• ❓ *आजची प्रश्नमंजुषा* ❓••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••१) महात्मा गांधीजी यांना महात्मा ही उपाधी कोणी दिली ? २) भारतातील पहिली महिला अंतराळवीर कोण ?३) संत ज्ञानेश्वरांची समाधी कोठे आहे ?४) चिखलदरा हे थंड हवेचे ठिकाण कोणत्या जिल्ह्यात आहे ?५) सर्वात मोठा दिवस कोणता ?उत्तरे :- १) सुभाषचंद्र बोस २) कल्पना चावला ३) आळंदी ४) अमरावती ५) २१ जून*संकलन :- जैपाल भै. ठाकूर*जि.प.व.प्राथ.शाळा भोसा, ता. आमगाव, जि. गोंदिया 📱9765943144••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎂 *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *◆|वा|ढ|दि|व|स|अ|भि|ष्ठ|चिं|त|न|◆* 👤 बालाजी पापनवार , सहशिक्षक, नांदेड👤 सोहेल शेख👤 गोविंद नल्लावाड, सहशिक्षक👤 माधव गैनवार👤 दत्ता रेड्डी सुरकूटवार👤 डॉ. मंगेशकुमार अंबिलवादे, औरंगाबाद👤 अनिल हिस्सल, सहशिक्षक, जळगाव👤 शानिल पाटील👤 तेजिंदर कौर सभेरवाल👤 अब्दुल नासिर शेख👤 हन्मंलू गड्डपवार👤 अशोक चेपटे👤 नामदेव दळवे👤 दीपक ढगे👤 ज्ञानेश्वर चिखले👤 विजयकुमार भोळे👤 कार्तिक स्वामी👤 ज्योती पाटील👤 ऋषिकेश भंडारे👤 बालाजी शिंदे उंद्रीकर👤 सुदर्शन दरगू👤 गजानन गडपवार*ઉदंड_आયુષ્યાच्या अનંત_શુभेच्छा,* [ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा एक दिवस अगोदर 9423625769 येथे पोस्ट करावे. ]••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• ••• 💡 ‼ *मनाचे श्लोक*‼ 💡•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••मना सज्जना भक्तिपंथेचि जावें। तरी श्रीहरी पाविजेतो स्वभावें॥ जनीं निंद्य तें सर्व सोडूनि द्यावें। जनीं वंद्य ते सर्व भावे करावे॥२॥।। जय जय रघुवीर समर्थ ।।••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🕊🌎 ‼ *विचार धन*‼🕊🌎••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••*चेहऱ्यावरचं तेज हे तुमच्या अंतःकरणातल्या विचारावर अवलंबून असतं, मनात आत्मविश्वास असला की चेहरा तेजस्वी दिसतो, मनात इतरांविषयी प्रेम असलं की चेहरा सात्विक दिसतो, मनात इतरांविषयी आदर असला की चेहरा नम्र दिसतो, मनातले हे भावच तर माणसाला सुंदर बनवत असतात, चेहराच खरा आरसा असतो तो जो ओळखू शकतो तोच मस्त जीवन जगू शकतो…!*संकलन :- मंगेश कोळी••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎭 *आजची फ्रेश बोधकथा* 🎭••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *वाईट संगतीचे परिणाम*एक शेतकरी होता. त्या शेतकऱ्याच्या शेतात कावळ्यांचा एक मोठा थवा रोज यायचा. ते कावळे शेतातील पिकांची नासाडी करायचे. त्यामुळे शेतकऱ्याला खूप त्रास व्हायचा. शेतकऱ्यांने एकदा त्यांना धडा शिकवायचे ठरवले.एक दिवशी शेतकर्याने शेतात जाळे पसरून ठेवले. त्यावर थोडे धान्य टाकले. कावळ्यांनी धान्य पाहिले व ते धान्य खाण्यासाठी शेतात उतरले अन् जाळ्यात अडकले. सगळे कावळे जाण्यात अडकलेले पाहून शेतकरी खुश झाला. तो म्हणाला, "अरे चोरांनो, आता तुम्हाला चांगली शिक्षा मिळेल." एवढ्यात त्याला एक केविलवाणा आवाज ऐकू आला. त्याला आश्चर्य वाटले.त्याने काळजीपूर्वक पाहिले तर त्या जळ्यामध्ये कावळ्या बरोबर एक कबूतर अडकलेले त्याला दिसले. शेतकरी कबुतराला म्हणाला, "तु कसा काय या टोळीत सामील झालास? पण आता काहीही झाले तरी मी तुला सोडणार नाही. तू वाईट संगत धरलीस त्याचा परिणाम तुला भोगावाच लागेल." असे म्हणून शेतकऱ्यांने आपल्या शिकारी कुत्र्यांना बोलावले. धावत आलेल्या कुत्र्यांनी एकामागून एक सगळ्या पक्षांना ठार मारले. *तात्पर्य: वाईट संगतीत राहू नये.*•••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••या पोस्ट विषयी आपल्या सूचना, निवेदन, अभिप्राय, बातम्या, वाढदिवस, माहिती किंवा शंका 9423625769 येथे कळवावे. •••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••~~~~~~~~~~~~~~~~~~~*🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢*📱 9423625769~~~~~~~~~~~~~~~~~~~*🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏*पुन्हा भेटू या फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार ~~~~~~~~~~~~~~~~~~~
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment