✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट~~~~~~~~~~~~~~~~~~~ 6️⃣ 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 6️⃣ ( फ्रेश शालेय परिपाठ )🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00 ( रविवार आणि सुट्टी वगळून )~~~~~~~~~~~~~~~~~~~🎇 दिनांक :- 24 जून 2023💠 वार - शनिवार••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *✈ 🚀 गुगलयान ✈ 🚀*••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *कथा - नवऱ्याचे मी पण*कुटुंबातील नात्यात असलेला घालमेल, प्रेम, जिव्हाळा आणि तिरस्कार यावर आधारित फेसबुकवर अनेक वाचकांना पसंत पडलेली ही कथा आहे. मला आशा आहे आपणांस ही कथा नक्की आवडेल. तेव्हा चला कथा वाचू या .....!तिसरा भाग -------https://www.facebook.com/groups/aamhi.saahityik/permalink/7268695053146847/?mibextid=Nif5ozकथा आवडल्यास आपल्या प्रतिक्रिया अवश्य कळवा.~~~~~~~~~~~~~~~~~~~✍ स्तंभलेखक *नासा येवतीकर, धर्माबाद*9423625769~~~~~~~~~~~~~~~~~~~••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🌷🌐 . *दिनविशेष . 🌐* 🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *_ या वर्षातील १७५ वा दिवस आहे_* •••••••••••••••••••••••••••••••• *_महत्त्वाच्या घटना:_* •••••••••••••••••••••••••••••• *२००१:’आय. एन. एस. विराट’ ही भारतीय नौदलाची एकमेव विमानवाहू नौका आधुनिकीकरणानंतर पुन्हा नौदलात दाखल झाली.**१९९८:अभिनेते चंद्रकांत मांडरे यांना अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाचा 'चित्रभूषण पुरस्कार' जाहीर**१९८२:कर्नाटकातील सर्व शाळांत कन्नड भाषा शिकविण्याची सक्ती करण्यात आली.**१९४०:दुसरे महायुद्ध – फ्रान्स व इटलीमधे शस्त्रसंधी झाली.**१९३९:सयामचे थायलँड असे नामकरण करण्यात आले.**_जन्मदिवस / जयंती / वाढदिवस:_* ••••••••••••••••••••••••••••••••*१९७९:प्रा.डॉ.वृंदा देशपांडे-जोशी-- कवयित्री, लेखिका* *१९७४:संदीप गायकवाड-- कवी, लेखक**१९६९:प्रशांत विजय दांडेकर-- लेखक* *१९६७:योगीनी राऊळ -- कवयित्री,लेखिका* *१९६५:पांडुरंग शंकरराव आडबलवाड -- कवी* *१९६४:नागनाथ विठ्ठलराव कलवले-- कवी, लेखक* *१९६२:गौतम शांतीलाल अदानी-- एक भारतीय उद्योजक,अदानी समूहाचे अध्यक्ष**१९६१:डॉ.महेंद्र मारोतराव भवरे-- कवी, समीक्षक, संशोधक**१९४९:विनय हर्डीकर -- लेखक* *१९३९:दिगंबर विठ्ठल पाध्ये-- समीक्षक(मृत्यु:१९ ऑगस्ट २०१६)* *१९३७:अनिता देसाई-- प्रख्यात लेखिका, जगातील इंग्रजी साहित्यातील एक प्रसिद्ध नाव* *१९२८:मृणाल गोरे – समाजवादी नेत्या आणि ६ व्या लोकसभेच्या सदस्य(मृत्यू:१७ जुलै २०१२)**१९०८:गुरू गोपीनाथ – कथकली नर्तक (मृत्यू: ९ आक्टोबर १९८७)**१८९९:नटवर्य गोपाळ गोविंद ऊर्फ नानासाहेब फाटक-- केंद्राने सर्व श्रेष्ठ नट म्हणून गौरविण्यात आले.(मृत्यू: ८ एप्रिल १९७४)**१८९७:पण्डित ओंकारनाथ ठाकूर ऊर्फ ’प्रणव रंग’ – गायक व संगीत अभ्यासक, १९५५ मधे पद्मश्री पुरस्काराने सन्मानित (मृत्यू: २९ डिसेंबर १९६७)**१८९२:श्रीधर बाळकृष्ण रानडे -- मराठी कवी,रविकिरण मंडळाचे ते सदस्य होते(मृत्यू:२१ मार्च १९८४)* *१८६९:दामोदर हरी चाफेकर – चार्ल्स रँड याची हत्या करणारे (मृत्यू: १८ एप्रिल १८९८)**१८६२:श्रीधर बाळकृष्ण रानडे – रविकिरण मंडळाचे संस्थापक (मृत्यू: २१ मार्च १९७४)**_मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन:_* •••••••••••••••••••••••••••••••• *२०१४:वसंत विठ्ठल गाडे(गाडेगरुजी)-- लेखक,विनोबा विचार केंद्राचे विचारवंत,संघटक (जन्म:२७ जानेवारी १९२७)* *२०१३:एमिलियो कोलंबो--इटलीचे ४०वे पंतप्रधान (जन्म: ११ एप्रिल १९२०)**१९९७:संजुक्ता पाणिग्रही-- भारतातील एक नृत्यांगना(जन्म:२४ ऑगस्ट १९४४)**१९७१:डॉ माधव गोपाळ देशमुख-- प्रसिद्ध समीक्षक,साहित्यशास्त्रज्ञ( जन्म:१० मार्च १९१३)* *१९१४:वासुदेव गणेश टेंबे उर्फ टेंबे स्वामी किंवा वासुदेवानंद सरस्वती यांचा गरुडेश्वर, बडोदा, गुजरात येथे निधन. (तारखेप्रमाणे)**१९०८:ग्रोव्हर क्लीव्हलँड--अमेरिकेचे २२वे आणि २४वे अध्यक्ष(जन्म: १८ मार्च १८३७)* ~~~~~~~~~~~~~~~~~~~~~ *_दिनविशेष या सदरातील सर्व मुद्दे हे संग्रहात्मक आहेत तेव्हा त्यात चूका नसतीलच असे सांगता येणार नाही_* *✍ संकलन :- श्रीराम चव्हाण माजी शिक्षणाधिकारी नागपूर*मोबाईल:9822695372 ईमेल: chavhansk65@gmail.com••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• 🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••1⃣ *सरकारचा मोठा निर्णय ! आता पाचवी, आठवीच्या वार्षिक परीक्षेत विद्यार्थ्यांना उत्तीर्ण होणे बंधनकारक*•••••••••••••••••••••••••••••••••••••2⃣ *पुण्यात आणि मुंबईत मान्सूनचं आगमन पुन्हा लांबलं, 25 जून नंतर पावसाची शक्यता*•••••••••••••••••••••••••••••••••••••3⃣ *मुंबई महापालिकेतील 12 हजार कोटींच्या कथित घोटाळ्याच्या चौकशीसाठी SIT; मुंबई पोलीस आयुक्तांकडे नेतृत्त्व*•••••••••••••••••••••••••••••••••••••4⃣ *'म्हाडा' मुंबई मंडळ सोडत 2023 साठी अर्ज करण्याची मुदत वाढली; थेट 10 जुलैपर्यंत मुदतवाढ*•••••••••••••••••••••••••••••••••••••5⃣ *इंडो-पॅसिफिक क्षेत्रात कुणीही आक्रमकपणा दाखवू नये, नाव न घेता पंतप्रधान मोदींनी चीनला ठणकावलं*•••••••••••••••••••••••••••••••••••••6⃣ *लोकसभा-विधानसभा निवडणुकीपूर्वी समान नागरी कायदा लागू करावा - चंद्रशेखर बावनकुळे*•••••••••••••••••••••••••••••••••••••7⃣ *वेस्ट इंडीज दौऱ्यासाठी टीम इंडियाची घोषणा; कसोटीतून पुजारा आऊट, तर वनडे संघात मोठे फेरबदल*•••••••••••••••••••••••••••••••••••••*📷 वृत्त संकलक - कुणाल पवारे 📹*📱9960358300•••••••••••••••••••••••••••••••••••••ही पोस्ट नियमित मिळविण्यासाठी आणि या समुहात add होण्यासाठी 9423625769 येथे संपर्क करावे.••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• 🌷🍃 *विशेष माहिती* 🌷🍃••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *बहुगुणी आवळा*आवळा हे असे अन्न आहे ज्यामध्ये पोषक तत्वांचा साठा आहे. व्हिटॅमिन सी, अँटीऑक्सिडंट्स, कॅल्शियम, लोह, पोटॅशियम, फ्लेव्होनॉइड्स आणि फायबर यांसारखे अनेक आवश्यक पोषक घटक त्यात मुबलक प्रमाणात आढळतात.आवळा खाल्ल्याने तुमची प्रतिकारशक्ती मजबूत होते. कारण त्यात व्हिटॅमिन सी आणि अँटीऑक्सिडंट भरपूर प्रमाणात असतात. या दोन्ही गोष्टी रोगप्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी उपयुक्त ठरू शकतात. जर तुम्ही दररोज सकाळी रिकाम्या पोटी भिजवलेला आवळा खाल्ले तर तुम्ही अनेक प्रकारच्या संसर्गापासून बचाव करू शकता.आवळा खाल्ल्याने तुमचे वजन कमी होऊ शकते. कारण आवळ्यामध्ये फायबरचे प्रमाण असते ज्यामुळे तुम्हाला दीर्घकाळ पोट भरल्यासारखे वाटते. याशिवाय त्यात इतरही अनेक पोषक घटक असतात जे चयापचय वाढवतात. यामुळे शरीरात साठलेली चरबी जाळण्यास मदत होते.आवळ्यामध्ये भरपूर फायबर असते, जे पचन सुधारण्यास मदत करते. भिजवलेला आवळा रोज सकाळी रिकाम्या पोटी खाल्ल्यास गॅस, अपचन, बद्धकोष्ठता आणि गोळा येणे यासारख्या समस्या दूर होण्यास मदत होते.आवळा खाणे तुमच्या डोळ्यांसाठीही फायदेशीर ठरू शकते. कारण त्यात व्हिटॅमिन ए असते. व्हिटॅमिन बी, व्हिटॅमिन सी आणि व्हिटॅमिन ई आढळतात जे तुमचे डोळे निरोगी ठेवण्यास मदत करतात.आवळा हा क्रोमियमचा उत्तम स्रोत आहे. यामुळे रक्तातील साखरेचे प्रमाण नियंत्रित राहण्यास मदत होते. आणि मधुमेहावर नियंत्रण ठेवता येते. याशिवाय, उच्च रक्तदाब कमी करण्यास देखील मदत करते.*संकलन*••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• 🌹 *" फ्रेश सुविचार "* 🌹••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• "मौन आणि एकांत हे माणसाचे सर्वात चांगले मित्र आहे."*संकलन :- प्रमिलाताई सेनकुडे, नांदेड**प्रा.शा. गोजेगाव ता.हदगाव, जि. नांदेड*📱9403046894••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• ❓ *आजची प्रश्नमंजुषा* ❓••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••१) मुंबई शेअर बाजार जगातला कितव्या क्रमांकाचा शेअर बाजार आहे ?२) जगातला प्रथम क्रमांकाचा शेअर बाजार कोणत्या देशाचा आहे ?३) पहिल्यांदाच ज्युनिअर महिला हॉकी आशियाई चषक - २०२३ कोणत्या देशाने जिंकले ?४) जगात सर्वाधिक अणुबॉम्ब असणारे प्रथम तीन देश कोणते ?५) कोल्हापूर येथील राजश्री शाहू छत्रपती मेमोरियल ट्रस्ट कडून देण्यात येणारा प्रतिष्ठेचा 'राजश्री शाहू पुरस्कार' कोणाला जाहीर झाला ?*उत्तरे :-* १) ५ व्या २) अमेरिका ३) भारत ४) रशिया ( ४४८९ ), अमेरिका ( ३७०८ ), चीन ( ४१० ) ५) डॉ. अभय बंग व डॉ. राणी बंग*संकलन :- जैपाल भै. ठाकूर*जि.प.व.प्राथ.शाळा भोसा, ता. आमगाव, जि. गोंदिया 📱9765943144••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎂 *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *◆|वा|ढ|दि|व|स|अ|भि|ष्ठ|चिं|त|न|◆* 👤 कल्पना डेव्हिड बनसोड, साहित्यिका तथा सहशिक्षिका, चंद्रपूर 👤 पांडुरंग आडबलवाड, साहित्यिक तथा माध्यमिक शिक्षक, धर्माबाद👤 लक्ष्मीकांत गोपाळराव कुलकर्णी👤 संदिप शंभरकर👤 रवी गंगाधर भोरे👤 अनिल रेड्डी, लातूर👤 सदानंद कोदळगे👤 लक्ष्मण सुरकार, सहशिक्षक, भोकर👤 सचिन रेनगुंटवार, धर्माबाद*ઉदंड_आયુષ્યાच्या अનંત_શુभेच्छा,* [ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा एक दिवस अगोदर 9423625769 येथे पोस्ट करावे. ]••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• ••• 💡 ‼ *मनाचे श्लोक*‼ 💡•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••नको रे मना द्रव्य ते पूढिलांचे। अति स्वार्थबुद्धी नुरे पाप सांचे॥ घडे भोगणे पाप ते कर्म खोटे। न होतां मनासारिखें दु:ख मोठे ॥९॥।। जय जय रघुवीर समर्थ ।।••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🕊🌎 ‼ *विचारधारा*‼🕊🌎••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••बरेचदा असं होतं की,दुसऱ्यांच्या विषयी कोणताही विचार न करता एकाचे दोन अन् पायलीचे तीन करून मोठ्या आनंदाने आपण हसून सांगत असतो. तसच आपल्याही विषयी थोडं सांगण्याची हिंमत करावी. पण तसं सांगणं कोणालाही जमत नाही. कारण आपल्या घरात जरी कितीही विजेचा उजेड असेल तरी एक तरी कोपऱ्यात अंधार असतोच. म्हणून दुसऱ्यांचे सांगून नको ते, पाप करण्यापेक्षा आपल्यामागे किती अंधार आहे त्याकडे बघावे.🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷सौ.संगीता संतोष ठलाल मु.कुरखेडा जि.गडचिरोली••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎭 *आजची फ्रेश बोधकथा* 🎭••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *सुयांचे झाड**एकदा दोन भाऊ जंगलकिनारी रहात होते. मोठा भाऊ त्याच्या लहान भावासोबत खूप स्वार्थी वृत्तीने वागत असे. लहान भावाचे सगळे जेवण खाऊन टाकत असे आणि त्याच्या सगळ्या चांगल्या वस्तू, कपडे घेत असे. एकदा मोठा भाऊ जंगलात लाकूड गोळा करण्यासाठी गेला. एकामागून एक अशा झाडांच्या फांद्या तोडत असताना तो एका जादुई झाडाजवळ पोहोचला. झाड त्याला म्हणाले,"महोदय, कृपा करून माझ्या फांद्या तोडू नका, जर तुम्ही मला सोडून दिले तर मी तुम्हाला सोन्याची सफरचंदे देईन" मोठा भाऊ तयार झाला, पण सफरचंदाची संख्या पाहून निराश झाला. लोभाने त्याचा ताबा घेतला आणि त्याने झाडाला धमकी दिली की, "जर मला जास्त सफरचंद मिळाली नाहीत तर खोड कापून टाकीन.” झाडाने सफरचंदे तर दिली नाहीतच पण त्याच्यावर शेकडो सुयांचा वर्षाव केला. मोठा भाऊ वेदनेने विव्हळत होता. सूर्य अस्तास निघाला होता. लहान भावाला काळजी वाटली, तो मोठ्या भावाच्या शोधात निघाला. शेकडो सुया शरीरात घुसलेल्या तो अवस्थेत सापडला. लहान भाऊ त्याच्या मोठया भावाकडे धावत गेला, आणि दुःखद अंतःकरणाने त्याने प्रत्येक सुई काढली. सुया काढून झाल्यावर मोठ्या भावाने वाईट वर्तणुकीबद्दल बद्दल त्याची माफी मागितली. आणि इथून पुढे चांगला वागीन असे वचनही दिले. झाडाने मोठ्या भावात झालेला बदल पाहून त्यांना भरपूर सोनेरी सफरचंदे दिली. तात्पर्य : दयाळू आणि कृपाळू असणे महत्वाचे आहे कारण ते नेहमीच बक्षिसपात्र ठरते.•••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••या पोस्ट विषयी आपल्या सूचना, निवेदन, अभिप्राय, बातम्या, वाढदिवस, माहिती किंवा शंका 9423625769 येथे कळवावे. •••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••~~~~~~~~~~~~~~~~~~~*🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢*📱 9423625769~~~~~~~~~~~~~~~~~~~*🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏*पुन्हा भेटू या फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार ~~~~~~~~~~~~~~~~~~~
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment