✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट~~~~~~~~~~~~~~~~~~~ 6️⃣ 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 6️⃣ ( फ्रेश शालेय परिपाठ )🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00 ( रविवार आणि सुट्टी वगळून )~~~~~~~~~~~~~~~~~~~🎇 दिनांक :- 22 जून 2023💠 वार - गुरुवार••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *✈ 🚀 गुगलयान ✈ 🚀*••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *कथा - नवऱ्याचे मी पण*कुटुंबातील नात्यात असलेला घालमेल, प्रेम, जिव्हाळा आणि तिरस्कार यावर आधारित फेसबुकवर अनेक वाचकांना पसंत पडलेली ही कथा आहे. मला आशा आहे आपणांस ही कथा नक्की आवडेल. तेव्हा चला कथा वाचू या .....!पहिला भाग -------http://nasayeotikar.blogspot.com/2023/06/story-navryache-mi-pan.htmlकथा आवडल्यास आपल्या प्रतिक्रिया अवश्य कळवा.~~~~~~~~~~~~~~~~~~~✍ स्तंभलेखक *नासा येवतीकर, धर्माबाद*9423625769~~~~~~~~~~~~~~~~~~~••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🌷🌐 . *दिनविशेष . 🌐* 🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *_ या वर्षातील १७३ वा दिवस आहे_* •••••••••••••••••••••••••••••••• *_महत्त्वाच्या घटना:_* •••••••••••••••••••••••••••••• *१९९४:महाराष्ट्र सरकारचे महिलाविषयक धोरण जाहीर झाले. त्याद्वारे सरकारी व निमसरकारी नोकर्यात महिलांना ३० टक्के आरक्षण**१९७८:जेम्स ख्रिस्ती या खगोलशास्त्रज्ञाने अॅरिझोना येथील वेधशाळेतून शेरॉन या प्लूटोच्या चंद्राचा शोध लावला.**१९७६:कॅनडाने मृत्यूदंडावर बंदी घातली.**१९४१:नेताजी सुभाषचंद्र बोस यांनी सावरकर सदन येथे स्वातंत्र्यवीर सावरकर यांची भेट घेतली.**१९४०:दुसरे महायुद्ध – फ्रान्सने जर्मनीसमोर शरणागती पत्करली.**१९४०:नेताजी सुभाषचंद्र बोस यांनी काँग्रेसमधुन बाहेर पडुन ’ऑल इंडिया फॉरवर्ड ब्लॉक’ या पक्षाची स्थापना केली.**१९०८:इंग्लंडचा राजा जॉर्ज (पाचवा) याचे राज्यारोहण**१८९७:पुणे शहरात पसरलेल्या प्लेगच्या साथीच्या काळात झालेल्या जुलुमाचा प्रतिशोध म्हणून चार्ल्स रँड या मुलकी अधिकार्याला दामोदर हरी चाफेकर यांनी गोळ्या घालून ठार केले.**१७५७:प्लासीची लढाई सुरू झाली.**१६३३:गॅलेलिओ गॅलिली याने पोपच्या दबावाखाली पृथ्वी हाच सूर्यमालेचा केंद्रबिंदू आहे असे कबूल केले.**_जन्मदिवस / जयंती / वाढदिवस:_* •••••••••••••••••••••••••••••••••*१९९३:आदित्य दवणे-- नवोदित कवी* *१९८२: प्रा.विजय हरिभाऊ लोंढे -- कवी, लेखक* *१९७९:जयश्री दाणी-- कवयित्री,लेखिका* *१९७३:मकरंद मधुकर अनासपुरे-- मराठी चित्रपट, नाटक व दूरचित्रवाणी माध्यमांतील अभिनेते* *१९६९: कविता राजन क्षीरसागर -- कवयित्री* *१९६९:डॉ.कमलाकरराव देविदासराव चव्हाण कवी,लेखक,संपादक* *१९६८:स्वाती किशोर पाचपांडे-- लेखिका**१९६७: प्रा.डॉ.सुनंदा बोरकर -जुमले-- कवयित्री लेखिका* *१९६४:भारती बाळ गोसावी-- मराठी नाट्यअभिनेत्री* *१९५८:प्रा.डॉ.अर्जुन व्हटकर -- जेष्ठ साहित्यिक**१९५५:आशाताई पैठणे-- जेष्ठ साहित्यिका, कवयित्री* *१९४६:अनुपमा अशोक आंबर्डेकर-- प्रसिद्ध कवयित्री,लेखिका* *१९३९:महादेव मोरे-- कादंबरीकार, कथाकार**१९३२:अमरीश पुरी – आंतरराष्ट्रीय किर्ती प्राप्त केलेले चित्रपट व रंगमंच कलाकार (मृत्यू: १२ जानेवारी २००५)**_१९०८:डॉ.विष्णू भिकाजी तथा वि. भि. कोलते – महानुभाव पंथाचे अभ्यासक, विचारवंत व तत्त्वज्ञ, नागपूर विद्यापीठाचे कुलगुरू (मृत्यू:९ एप्रिल १९९८)_**१८९६:नटश्रेष्ठ बाबुराव पेंढारकर – पौराणिक, ऐतिहासिक, सामाजिक, संतपट, कौटुंबिक आणि ग्रामीण अशा ७५ हुन अधिक चित्रपटांत भूमिका केल्या.(मृत्यू:०९ नोव्हेंबर १९६७)* *१८८७:ज्यूलियन हक्सले – ब्रिटिश जीवशास्त्रज्ञ (मृत्यू: १४ फेब्रुवारी १९७५)**१८०५:जोसेफ मॅझिनी – इटालियन स्वातंत्र्यवीर (मृत्यू: १० मार्च१८७२)**_मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन:_*•••••••••••••••••••••••••••••••••*२०१३:शोभना लक्ष्मण गोखले -- महाराष्ट्रातील एक प्रसिद्ध पुराभिलेखतज्ज्ञा आणि नाणकशास्त्रज्ञा.(जन्म:२६ फेब्रुवारी १९२८)**१९९४:अक्किनेरी लक्ष्मीवर प्रसाद राव ऊर्फ ’एल. व्ही. प्रसाद’ – चित्रपट निर्माते व दिग्दर्शक (जन्म: १७ जानेवारी १९०८)**१९९३:विष्णूपंत जोग – चित्रपट अभिनेते, रंगभूमीवरील अभिनेते(जन्म:१८ सप्टेंबर १९०५)**१९५५:सदाशिव ऊर्फ ’सदू’ शिंदे – लेगस्पिनर व गुगली गोलंदाज (जन्म: १८ ऑगस्ट १९२३)* ~~~~~~~~~~~~~~~~~~~~~ *_दिनविशेष या सदरातील सर्व मुद्दे हे संग्रहात्मक आहेत तेव्हा त्यात चूका नसतीलच असे सांगता येणार नाही_* *✍ संकलन :- श्रीराम चव्हाण माजी शिक्षणाधिकारी,नागपूर*मोबाईल:9822695372 ईमेल: chavhansk65@gmail.com••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• 🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••1⃣ *पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या उपस्थित योग दिनानिमित्त अमेरिकेत विशेष कार्यक्रम संपन्न*•••••••••••••••••••••••••••••••••••••2⃣ *वारकऱ्यांना राज्य सरकारचा दिलासा, वारकऱ्यांना आता सरकारतर्फे विमा संरक्षण*•••••••••••••••••••••••••••••••••••••3⃣ *महाराष्ट्रात 23 जूननंतर पावसाची शक्यता तर विदर्भात उष्णतेची लाट येण्याचा इशारा हवामान विभागाचा अंदाज*•••••••••••••••••••••••••••••••••••••4⃣ *पुरीमध्ये जगन्नाथ रथयात्रेला सुरुवात, यात्रेनिमित्त लाखो भाविकांची गर्दी*•••••••••••••••••••••••••••••••••••••5⃣ *नाशिक :- अंजनेरी ते ब्रह्मगिरी पर्वत 'रोप-वे'चीसाठी निविदा निघाली, 376 कोटींचा प्रकल्प, पर्यावरण प्रेमींचा विरोध कायम*•••••••••••••••••••••••••••••••••••••6⃣ *ज्ञानोबा-तुकारामांचा अखंड नामघोष! गजानन महाराजांच्या पालखीचे सोलापूरात आगमन*•••••••••••••••••••••••••••••••••••••7⃣ *थरारक सामन्यात कमिन्सने विजयी चौकार लगावला, पहिल्या कसोटी सामन्यात ऑस्ट्रेलियाचा इंग्लंडवर विजय*•••••••••••••••••••••••••••••••••••••*📷 वृत्त संकलक - कुणाल पवारे 📹*📱9960358300•••••••••••••••••••••••••••••••••••••ही पोस्ट नियमित मिळविण्यासाठी आणि या समुहात add होण्यासाठी 9423625769 येथे संपर्क करावे.••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• 🌷🍃 *विशेष माहिती* 🌷🍃••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••मकरंद अनासपुरे हे मराठी सिनेसॄष्टीतील आघाडीचा विनोदी अभिनेता आहेत. चित्रपटसृष्टीत येण्यासाठी त्यांनी खूप धडपड केली आहे.. त्यांनी सुरुवातीला मिळतील त्या भूमिका केल्या. मात्र त्याही भूमिका प्रेक्षकांच्या खास लक्षात राहिल्या. शेवटी त्यांना अभिनेता म्हणून चित्रपट मिळत गेले आणि ते प्रसिद्ध होत गेले. चित्रपट जरी चालला नाही तरी त्यांचा अभिनय मात्र नक्कीच लोकांना आवडायला लागला. आज मराठी चित्रपटसृष्टीत सर्वात जास्त मागणी असलेले अभिनेता मकरंद म्हणून अनासपुरेंकडे पाहिले जाते. त्यांनी वेगवेगळ्या चित्रपटांमध्ये विनोदी भूमिकांसह अन्य बहुरंगी भूमिका केल्या आहेत. दे धक्का नावाच्या चित्रपटाने त्यांना खूप लोकप्रियता मिळाली.मकरंद अनासपुरे यांनी सप्टेंबर २०१५ मध्ये अभिनेते नाना पाटेकर याच्या बरोबर नाम फाउंडेशन या धर्मादाय संस्थेची स्थापना केली. या संस्थे अंतर्गत ते महाराष्ट्रातील दुष्काळी भागातील शेतकऱ्यांना मदत करतात.*संकलन*••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• 🌹 *" फ्रेश सुविचार "* 🌹••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••जीवनाचे नंदनवन करण्याचा एकच मार्ग आहे, तो म्हणजे परिश्रम.*संकलन :- प्रमिलाताई सेनकुडे, नांदेड**प्रा.शा. गोजेगाव ता.हदगाव, जि. नांदेड*📱9403046894••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• ❓ *आजची प्रश्नमंजुषा* ❓••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••१) २१ जून २०२३ ला कितवा 'जागतिक योग दिवस' साजरा करण्यात आला ?२) प्रथम योगगुरू कोणाला मानले जाते ?३) 'योगाचे आधुनिक पिता' असे कोणाला संबोधले जाते ?४) 'योग' या शब्दाचा अर्थ काय आहे ?५) 'योग' या शब्दाची उत्पत्ती कोणत्या शब्दापासून झाली आहे ?*उत्तरे :-* १) ९ वा २) शिव ३) पतंजली ऋषी ४) जोडणे, संयोग ५) 'युज्' या संस्कृत शब्दापासून *संकलन :- जैपाल भै. ठाकूर*जि.प.व.प्राथ.शाळा भोसा, ता. आमगाव, जि. गोंदिया 📱9765943144••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎂 *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *◆|वा|ढ|दि|व|स|अ|भि|ष्ठ|चिं|त|न|◆* 👤 गंगाधर तोटलोड, माजी जि.प. सदस्य, नांदेड👤 प्रा. विनोद बोटलावार, नांदेड👤 माधव बोडके👤 साईनाथ लोसरे, तेलंगणा👤 बालाजी राजापूरकर👤 सुधीर वाघमारे मरवळीकर👤 नंदेश्वर कोरे👤 साईनाथ डिब्बेवाड👤 दिनेश भंगारे👤 अभिषेक बकवाड👤 उमाकांत मोकलीकर👤 गंगाधर बोमलवाड, सहशिक्षक, धर्माबाद👤 आशा मंकावार👤 भीमराव तायडे👤 श्याम गाढे👤 स्वप्नील पाटील*ઉदंड_आયુષ્યાच्या अનંત_શુभेच्छा,* [ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा एक दिवस अगोदर 9423625769 येथे पोस्ट करावे. ]••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• ••• 💡 ‼ *मनाचे श्लोक*‼ 💡•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••मना श्रेष्ठ धारिष्ट जीवीं धरावे । मना बोलणे नीच सोशीत जावें ॥ स्वयें सर्वदा नम्र वाचे वदावे । मना सर्व लोकांसि रे नीववावें ॥७॥।। जय जय रघुवीर समर्थ ।।••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🕊🌎 ‼ *विचारधारा*‼🕊🌎••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••भांडण केल्याने किंवा गैरसमज करून वणवा पेटविल्याने आजपर्यंत कोणाचे भलं झाले का. ..? ह्या विषयी आपल्याला माहीत असताना सुद्धा उगाचच आपण त्यात वेळ वाया घालवत असतो. त्या पेक्षा एकदा त्यातून कशाप्रकारे बाहेर पडता येईल त्यावर शांतपणे विचार करून बघण्याचा प्रयत्न केले तर.. अनेक मार्ग निघू शकतात. व कुठेतरी जीवन जगायला आधार होत असतात. म्हणून नको त्या भानगडीत पडण्यापेक्षा तिथून कशाप्रकारचे बाहेर पडता येईल त्याकडेच लक्ष देणे गरजेचे आहे.🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷सौ.संगीता संतोष ठलाल मु.कुरखेडा जि.गडचिरोली••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎭 *आजची फ्रेश बोधकथा* 🎭••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *गरुड आणि घुबड*एक गरुड आणि एक घुबड, फार दिवस एकमेकांशी भांडत असत. शेवटी त्यांनी परस्परांशी मित्रत्वाने वागण्याची शपथ घेतली व एकमेकांच्या पिल्लांस खाऊ नये असे ठरविले.घुबड गरुडास म्हणाले, ‘गडया ! पण माझी पिल्ले कशी असतात, हे तुला ठाऊक आहे ना? ठाऊक नसेल, तर ती दुसऱ्या एखादया पक्ष्याची आहेत असे समजून तू त्यांना गट्ट करशील, अशी मला भीति वाटते,’ गरुड म्हणाला, खरेच, तुझी पिल्ले कशी असतात, हे मला मुळीच ठाऊक नाही.’घुबड म्हणाले, ‘ऐक तर. माझी पिल्ले फार सुंदर असतात. त्यांचे डोळे सुंदर, पिसे सुंदर, सगळेच काही सुंदर असते. या वर्णनावरून माझी पिल्ले कोणती हे तुला सहज समजेल.’ पुढे एके दिवशी, एका झाडाच्या ढोलीत, गरुडास घुबडाची पिल्ले सापडली. त्यांजकडे पाहून तो म्हणाला, ‘किती घाणेरडी, कंडाळवाणी आणि कुरूप पिल्ले ही ! आपली पिल्ले फार सुंदर असतात, म्हणून घुबडाने सांगितले आहे. तेव्हा, ही घुबडाची पिल्ले खास नव्हते. यास मारून खाण्यास काही हरकत नाही.’ असे म्हणून त्याने त्या पिलांचा फडशा उडविला !आपली पिल्ले नाहीशी झालेली पाहून घुबड गरुडाला म्हणाले, ‘गडया ! माझी पिल्ले तूच मारून खाल्लीस, असे मला वाटते.’ गरुड म्हणाला, ‘मी खाल्ली खरी, पण तो माझा दोष नव्हे.तू आपल्या पिल्लाचे जे खोटेचे वर्णन केलेस, त्यामुळे ती मला ओळखिता आली नाहीत. इतकी कुरूप पिल्ले घुबडाची नसतील, दुसऱ्या एखादया पक्ष्याची असतील, असे समजून मी ती मारून खाल्ली, यात माझा काय अपराध आहे बरे?’तात्पर्य – स्वतःसंबंधाची खरी हकीकत लपवून ठेवून, भलतीच हकीकत सांगणारा मनुष्य शेवटी आपणास संकटात पाडून घेतो.•••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••या पोस्ट विषयी आपल्या सूचना, निवेदन, अभिप्राय, बातम्या, वाढदिवस, माहिती किंवा शंका 9423625769 येथे कळवावे. •••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••~~~~~~~~~~~~~~~~~~~*🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢*📱 9423625769~~~~~~~~~~~~~~~~~~~*🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏*पुन्हा भेटू या फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार ~~~~~~~~~~~~~~~~~~~
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment