✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट~~~~~~~~~~~~~~~~~~~ 6️⃣ 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 6️⃣            ( फ्रेश शालेय परिपाठ )🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00         ( रविवार आणि सुट्टी वगळून )~~~~~~~~~~~~~~~~~~~🎇 दिनांक :- 23 जून 2023💠 वार - शुक्रवार••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••      *✈  🚀  गुगलयान ✈ 🚀*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••   *कथा - नवऱ्याचे मी पण*कुटुंबातील नात्यात असलेला घालमेल, प्रेम, जिव्हाळा आणि तिरस्कार यावर आधारित फेसबुकवर अनेक वाचकांना पसंत पडलेली ही कथा आहे. मला आशा आहे आपणांस ही कथा नक्की आवडेल. तेव्हा चला कथा  वाचू या .....!दुसरा भाग -------https://www.facebook.com/groups/aamhi.saahityik/permalink/7264610470221972/?mibextid=Nif5ozकथा आवडल्यास आपल्या प्रतिक्रिया अवश्य कळवा.~~~~~~~~~~~~~~~~~~~✍ स्तंभलेखक *नासा येवतीकर, धर्माबाद*9423625769~~~~~~~~~~~~~~~~~~~••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🌷🌐 .  *दिनविशेष .  🌐* 🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••*आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक दिवस*••••••••••••••••••••••••••••••••• *_ या वर्षातील १७४ वा दिवस आहे_* •••••••••••••••••••••••••••••••• *_महत्त्वाच्या घटना:_* •••••••••••••••••••••••••••••• *१९९८:दुसर्‍या महायुद्धात जपानच्या शरणागतीची साक्षीदार असलेली ’यू. एस. एस. मिसुरी’ ही युद्धनौका निवृत्तीनंतर पर्ल हार्बर बंदरात दाखल झाली.**१९९६:आवामी लीगच्या शेख हसीना वाजेद यांचा बांगलादेशच्या पंतप्रधान म्हणून शपथविधी झाला. या बांगलादेशच्या दुसर्‍या महिला पंतप्रधान होत.**१९७९:इंग्लंडला ९२ धावांनी हरवून वेस्ट इंडिजने दुसरा क्रिकेट विश्वकरंडक जिंकला.**१८९४:पॅरिस येथे आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितिची स्थापना झाली.**१७५७:प्लासीची लढाई : ’पलाशी’ येथे रॉबर्ट क्लाईवच्या ३,००० सैन्याने सिराज उद्दौलाच्या ५०,००० सैन्याचा फितुरी करवून पराभव केला.* *_जन्मदिवस / जयंती / वाढदिवस:_* ••••••••••••••••••••••••••••••••• *१९८४:संदीप हरी नाझरे -- कवी* *१९८१:परशुराम गहिनीनाथ नागरगोजे-- लेखक* *१९७८:नेहा राजपाल -- भारतीय संगीत उद्योग,हिंदी चित्रपट आणि विशेषतः मराठी प्रादेशिक संगीत उद्योगातील एक निर्माता, गायिका आणि अँकर**१९७३:डॉ.प्रशांत गायकवाड -- कवी, समीक्षक,संपादक* *१९६५:डॉ.संगीता राजीव बर्वे-- सुप्रसिद्ध कवयित्री,लेखिका,बालसाहित्यिक,अनुवादक व अनेक चित्रपटांसाठी गीत लेखन* *१९६४:प्रा.डॉ.अल्का बाबुराव झाडे-- लेखिका* *१९६३:डॉ.मीना राजेंद्र शेंडगे - कवयित्री लेखिका* *१९६२:प्रा.बी.एन.चौधरी-- कवी,समीक्षक**१९५८:मुकेश खन्ना-- भारतीय अभिनेता आणि निर्माता**१९५२:राज बब्बर-- प्रसिद्ध भारतीय हिंदी आणि पंजाबी चित्रपट अभिनेता आणि राजकारणी**१९५२:अशोक शिवदास कुळकर्णी-- कवी, लेखक* *१९१६:सर लिओनार्ड तथा ’लेन’ हटन – इंग्लिश क्रिकेटपटू (मृत्यू: ६ सप्टेंबर १९९०)**१९१२:अ‍ॅलन ट्युरिंग – इंग्लिश गणितज्ञ आणि संगणकतज्ञ (मृत्यू: ७ जुन १९५४)**१९०६:वीर विक्रम शाह ’त्रिभुवन’ – नेपाळचे राजे (मृत्यू: १३ मार्च १९५५)**१९०१:राजेन्द्र नाथ लाहिरी – क्रांतिकारक (मृत्यू: १७ डिसेंबर १९२७)**१८७३: बाळकृष्ण रामचंद्र कुळकर्णी-- कथालेखक, कादंबरीकार (मृत्यू:१९०७)* *_मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन:_* ••••••••••••••••••••••••••••••••• *२००५:हेमंत विष्णू इनामदार--संतसाहित्याचे अभ्यासक(जन्म:३नोव्हेंबर १९२५)**२००४:प्रल्हाद शिंदे-- मराठी लोकसंगीत गायक, त्यांनी भीमगीते, भक्तिगीते आणि काही हिंदी कवाल्या गायल्या आहेत(जन्म १९३३)**१९९६:रे लिंडवॉल – ऑस्ट्रेलियन क्रिकेटपटू (जन्म: ३ आक्टोबर १९२१)**१९९४:वसंत शांतारम देसाई – नाटककार, साहित्यिक, साक्षेपी समीक्षक आणि बालगंधर्वांचे चरित्रकार(जन्म २७ डिसेंबर१९०४)* *१९९०:हरिन्द्रनाथ चट्टोपाध्याय – हिन्दी चित्रपटांतील प्रसिद्ध चरित्र अभिनेते.(जन्म: २ एप्रिल १८९८)**१९८२: हरिभाऊ देशपांडे -- बालगंधर्व आणि मास्टर कृष्णराव यांना ऑर्गनची साथ करणारे गंधर्व नाटकमंडळीतील नामवंत कलाकार**१९८०:व्ही. व्ही. गिरी – भारताचे चौथे राष्ट्रपती, लोकसभा सदस्य आणि केंद्रीय मंत्री (जन्म: १० ऑगस्ट १८९४)**१९८०: इंदिरा गांधी यांचे पुत्र संजय गांधी यांचे विमान अपघातात निधन (जन्म: १४ डिसेंबर १९४६)**१९५३:डॉ.श्यामाप्रसाद मुकर्जी – माजी केंद्रीय मंत्री आणि भारतीय जनसंघाचे संस्थापक (जन्म: ६ जुलै १९०१)**१९३९:गिजुभाई बधेका – आधुनिक बालशिक्षणाच्या क्षेत्रातील आद्य कार्यकर्ते (जन्म: १५ नोव्हेंबर १८८५)**१९२०:काशिनाथ रघुनाथ मित्र--मनोरंजन मासिकाचे संपादक, बंगाली-गुजराती कादंबऱ्यांचे अनुवादक.(जन्म:२ नोव्हेंबर १८७१)**१८३६:जेम्स मिल – स्कॉटिश तत्त्ववेत्ते, इतिहासकार व अर्थशास्त्रज्ञ (जन्म: ६ एप्रिल १७७३)**१७६१:बाळाजी बाजीराव तथा ’नानासाहेब पेशवा’ (जन्म: ८ डिसेंबर १७२१)* ~~~~~~~~~~~~~~~~~~~~~ *_दिनविशेष या सदरातील सर्व मुद्दे हे संग्रहात्मक आहेत तेव्हा त्यात चूका नसतीलच असे सांगता येणार नाही_* *✍ संकलन :- श्रीराम चव्हाण माजी शिक्षणाधिकारी नागपूर*मोबाईल : 9822695372 ईमेल: chavhansk65@gmail.com••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••   🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••1⃣ *जिल्हा परिषदांच्या शाळांमध्ये शिक्षकांची आंतरजिल्हा बदली बंद होणार, शालेय शिक्षण विभागाचा महत्त्वाचा निर्णय*•••••••••••••••••••••••••••••••••••••2⃣ *तुळजाभवानीला भक्तांचे भरभरून दान; 207 किलो सोने, 2586 किलो चांदी आणि 254 हिरे दानपेटीत जमा*•••••••••••••••••••••••••••••••••••••3⃣ *यंदा बकरी ईदला कुर्बानी देणार नाही, नाशिकमधील चांदोरी गावातील मुस्लिम बांधवांचा आदर्श निर्णय*•••••••••••••••••••••••••••••••••••••4⃣ *कोविड सेंटर कथित गैरव्यवहात प्रकरणी ईडीकडून तब्बल 13 तास छापेमारी*•••••••••••••••••••••••••••••••••••••5⃣ *तुकोबांच्या पालखीचं इंदापूरात दुसरं अश्व रिंगण, ज्ञानोबांचं बरडमध्ये जल्लोषात स्वागत*•••••••••••••••••••••••••••••••••••••6⃣ *विठुरायाच्या दर्शनासाठी तेलंगणाचं संपूर्ण मंत्रिमंडळ येणार, हेलिकॉप्टरमधून वारकऱ्यांवर होणार पुष्पवृष्टी*•••••••••••••••••••••••••••••••••••••7⃣ *भारतीय महिला संघाची कौतुकास्पद कामगिरी, बांगलादेशला हरवून आशिया चषकावर कोरले नाव*•••••••••••••••••••••••••••••••••••••*📷 वृत्त संकलक -  कुणाल पवारे 📹*📱9960358300•••••••••••••••••••••••••••••••••••••ही पोस्ट नियमित मिळविण्यासाठी आणि या समुहात add होण्यासाठी 9423625769 येथे संपर्क करावे.••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••      🌷🍃  *विशेष माहिती* 🌷🍃••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••📙 *अवयव दान कोण करू शकतो ?* 📙 ************************************अवयव दान कोण करू शकतो ?*खरं तर या प्रश्नाचं उत्तर देण्यापूर्वी दुसराच एक प्रश्न विचारायला हवा. हे दान केव्हा करायचं आहे ? जिवंतपणी की मृत्यूनंतर ? मृत्यूनंतर करायचं असेल तर कोणीही असं दान करू शकतो. तसंच कोणताही अवयव दान करू शकतो. तो जर योग्य त्या अवस्थेत असेल आणि कोणा गरजूला त्याचा उपयोग होणार असेल तर डॉक्टर अशा दानाचा स्वीकार करू शकतात. एवढेच काय विंदा करंदीकरसारख्या ज्ञानपीठ विजेत्या कवीनं तर मरणोत्तर आपल्या देहाचं मेडिकल कॉलेजला दान केलं होतं. तेव्हा अशा प्रकारच्या दानाची कोणालाही मुभा असते. मात्र ते स्वेच्छेने केलं जायला हवं. त्यासाठी कोणाचंही किंवा कशाचंही दडपण असत कामा नये. शिवाय अशा दानाची इच्छा व्यक्तीनं जिवंतपणी धडधाकट असताना नोंदवलेली असणं आवश्यक आहे. आपल्या शरीरातले कित्येक अवयव एकांडे आहेत. आपल्याला एकच हृदय असतं, यकृत, स्वादूपिंड, प्लीहा हेही अवयव एकेकच असतात. त्यामुळे त्यांचं दान करणं कोणालाही शक्य नसतं. नाही म्हणायला यकृताचा एक तुकडा दान करता येतो. कारण त्यामुळे झालेली झीज भरून येण्याची शक्यता असते. अर्थात घेता आणि दाता दोघांनाही त्याचा फायदा होतो. तरीही या दोघांच्या शरीरातील पेशी वर असलेले, त्यांची निर्विवाद ओळख पटवणारे आणि रेणूंचे गट व्यवस्थित जुळणे आवश्यक असतं. अशी जुळणी सहसा आई वडील, मुलं, भावंडं किंवा त्यांच्यासारख्या जवळच्या नातेवाईकांमध्ये शक्य असते. इतरांच्या बाबतीत अशी जुळणी होण्याची शक्यता फार कमी असते. पण काही अवयवांच्या जोड्या शरीरात वास करून असतात. दोन मूत्रपिंड असतात, फुफ्फुसंही दोन असतात. स्त्रियांच्या शरीरात बीजकोशही दोन दोन असतात. त्यांच्यापैकी एकाचं दान केलं तरी उरलेल्या एकाच अवयवाला साऱ्या शरीराचा भार पेलणं अशक्य नसतं. अशा वेळी जिवंतपणीच जोडीपैकी एकाचं दान करणं शक्य असतं. त्यासाठीही पेशीगटांची तंतोतंत जुळणी होणं गरजेचं असतंच. तसं पाहिलं तर कान, डोळे, हात, पाय या बाह्यांगावरच्या अवयवांच्याही जोड्या असतात; पण यापैकी एकाचं दान आपण करू शकत नाही. अपघातामुळे एक डोळा गमवावा लागल्यावर एकाच डोळ्यावर व्यक्ती आपला कारभार चालवू शकते. पण काही बाबतीत तिला अडचणींचा सामना करावा लागतोच. कारण दोन डोळ्यांमुळे आपल्याला समोरच्या दृश्यातल्या खोलीची जाणीव होते. एकच डोळा असेल तर त्यात काही प्रमाणात तरी अडचण उद्भवते. तीच बाब इतर अवयवांनाही लागू पडते. शिवाय यामुळे जी विद्रुपता येते तिचा सामना करणंही सोपं नसतं.परंतु एक अवयव असा आहे की ज्याचं दान आपण निःशंक करू शकतो. तो अवयव आहे रक्त. रक्तदान आज आपण जिवंतपणी करू शकतो. एकदा नाही तर अनेकदा. अर्थात त्याचेही काही निकष आहेत; आणि त्यांचं काटेकोर पालन करणं आवश्यक असतं. म्हणूनच रक्तदानापुर्वी डॉक्टर आपली तपासणी करून, आपण ते निकष पूर्ण करू शकतो की नाही, याचा अंदाज घेतात. त्यानंतरच आपल्या रक्ताचं दान स्वीकारलं जातं.*बाळ फोंडके यांच्या 'कोण ?' या पुस्तकातून**संकलन :- श्याम ठाणेदार*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••   🌹 *" फ्रेश सुविचार "* 🌹••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••हक्क आणि कर्तव्य एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत. *संकलन :- प्रमिलाताई सेनकुडे, नांदेड**प्रा.शा. गोजेगाव ता.हदगाव, जि. नांदेड*📱9403046894••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••       ❓ *आजची प्रश्नमंजुषा* ❓••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••१) समुद्रात सर्वाधिक प्लास्टिक कोणता देश सोडतो ?२) 'थ्रू द ब्रोकन ग्लास' हे आत्मचरित्र कोणाचे आहे ?३) तोंडातून किंवा श्वासातून येणाऱ्या दुर्गंधीला वैद्यकीय भाषेत काय म्हणतात ?४) जगात सर्वाधिक वेतन घेणारा नेता कोण ?५) कोणत्या रक्तगटाला 'दाता रक्तगट' असे म्हणतात ?*उत्तरे :-* १) भारत २) टी. एन. शेषन, माजी मुख्य निवडणूक आयुक्त ३) हेलिटोसिस ४) ली सियन लूंग, सिंगापूरचे पंतप्रधान ( वार्षिक १३ कोटी ) ५) o- रक्तगट*संकलन :- जैपाल भै. ठाकूर*जि.प.व.प्राथ.शाळा भोसा, ता. आमगाव, जि. गोंदिया  📱9765943144••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎂  *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••  *◆|वा|ढ|दि|व|स|अ|भि|ष्ठ|चिं|त|न|◆*   👤 संजय संभाजीराव कदम, सहशिक्षक, भोकर👤 पोषट्टी कोषकेवार, सहशिक्षक, धर्माबाद👤 प्रभाकर माळगे👤 लक्ष्मीकांत इरमलवार👤 महेश अंदस्वार👤 विजय पाटील डांगे, भाजपा तालुकाध्यक्ष धर्माबाद👤 संदीप नजारे👤 राजेश भिसे👤 गोपाळ कौरवार, भूमी अभिलेख अधिकारी, देगलूर👤 देवेंद्र शिरूरकर👤 यश कीर्तीरत्न जाधव, बिलोली👤 गंगाधर सावळे, नांदेड*ઉदंड_आયુષ્યાच्या अનંત_શુभेच्छा,*     [ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा एक दिवस अगोदर 9423625769 येथे पोस्ट करावे. ]••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••   ••• 💡 ‼ *मनाचे श्लोक*‼ 💡•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••नको रे मना द्रव्य ते पूढिलांचे। अति स्वार्थबुद्धी नुरे पाप सांचे॥ घडे भोगणे पाप ते कर्म खोटे। न होतां मनासारिखें दु:ख मोठे ॥९॥।। जय जय रघुवीर समर्थ ।।••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🕊🌎 ‼ *विचारधारा*‼🕊🌎••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••वाटेत पडलेला कचरा जर.. हवेने आपोआप उडून गेला असेल किंवा जात असेल तर. ..ते, आपल्यासाठी चांगलेच आहे. पण,समोर असेच होईल या भ्रमात राहू नका.कारण त्याच वाटेवर कधी, कधी मोठे,मोठे खड्डे सुद्धा असू असतात त्यांना ओलांडून पुढचा प्रवास कशाप्रकारे करता येईल या विषयी एकदातरी विचार करण्याची गरज आहे. 🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷सौ.संगीता संतोष ठलाल मु.कुरखेडा जि.गडचिरोली••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎭 *आजची फ्रेश बोधकथा*  🎭••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *कावळा आणि कोल्हा*एकदा काय झालं एक कावळा रानावना मध्ये फिरत असताना त्याला एक चपाती चा तुकडा मिळाला चपाती चा तुकडा घेऊन येतो काळा जंगलातील एका झाडावर बसला.चपाती खाण्याचा विचार करत असताना काळाच्या मनात कल्पना आली की आता एक चपाती मिळाले उद्या पर्यंत अन्न शोधण्याची गरज भासणार नाही तेवढ्यात झाडाखालून एक कोल्हा जात होता व त्या कुणाची नजर झाडावर बसलेल्या कावळ्याच्या चोचीतील चपाती कडे गेली.आपल्याला देखील कावळ्याच्या चोचीतील चपाती खाण्याची तीव्र इच्छा झाली त्यासाठी एक युक्ती सुचवली. कोल्हा कावळ्याला म्हणाला, ” काय कावळे भाऊ कसे आहात फार दिवसांनी दर्शन झाले तुमचे. फार दिवस झाले तुमचा आवाज ऐकला नाही आणि तुमच्या आवाजातील गाणे देखील ऐकले नाही किती मधुर आहे तुमचा आवाज एकदा मला तुम्ही गाणे म्हणून दाखवा.”कोल्हे यांनी केलेली स्तुती ऐकून कावळा अगदी आनंदित झाला व गाणे म्हणण्यासाठी कावळ्याने आपली चोच उघडतात चोचीतील चपाती खाली पडली को्हा्याने ती चपाती पटकन उचलली आणि पळाला.जात असताना कुर्ल्याला वाटेमध्ये एक नदी लागली कोल्हा पळून खूप दमला होता व त्याने पाणी पिण्यासाठी नदीमध्ये वाकून पाहिले असता त्याला स्वतःचे प्रतिबिंब दिसले.कोल्हा होता मूर्ख त्यांना वाटले की नदीमध्ये आणखीन एक कोणतातरी कोल्हा आहे व त्याच्या तोंडामध्ये एक चपाती आहे मग ही देखील चपाती आपल्याला मिळाल्याने दोन चपात्या मिळतील व आपले पोट भरेल असे विचार करून कोल्हाने‌ ओरडण्यासाठी तोंड उघडताच त्याच्या तोंडातील चपाती नदीमध्ये पडली. अशाप्रकारे कोल्ह्याला चपाती खायला मिळाली नाही व त्याला त्याची चूक करावी.तात्पर्य : या कथेतून आपल्याला दोन गोष्टी शिकायला मिळता.एक म्हणजे कधीही खोटी प्रशंसा वर आनंदित होऊ नये.दुसरी म्हणजे लालच खूप वाईट सवय आहे.•••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••या पोस्ट विषयी आपल्या सूचना, निवेदन, अभिप्राय, बातम्या, वाढदिवस, माहिती किंवा शंका 9423625769 येथे कळवावे. •••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••~~~~~~~~~~~~~~~~~~~*🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢*📱 9423625769~~~~~~~~~~~~~~~~~~~*🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏*पुन्हा भेटू या फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार ~~~~~~~~~~~~~~~~~~~

No comments:

Post a Comment