✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट~~~~~~~~~~~~~~~~~~~ 6️⃣ 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 6️⃣ ( फ्रेश शालेय परिपाठ )🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00 ( रविवार आणि सुट्टी वगळून )~~~~~~~~~~~~~~~~~~~🎇 दिनांक :- 10 जुलै 2023💠 वार - सोमवार••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *✈ 🚀 गुगलयान ✈ 🚀*••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *कथा - नवऱ्याचे मी पण*कुटुंबातील नात्यात असलेला घालमेल, प्रेम, जिव्हाळा आणि तिरस्कार यावर आधारित फेसबुकवर अनेक वाचकांना पसंत पडलेली ही कथा आहे. मला आशा आहे आपणांस ही कथा नक्की आवडेल. तेव्हा चला कथा वाचू या .....!पंधरावा भाग -------https://www.facebook.com/groups/aamhi.saahityik/permalink/7301148706568148/?mibextid=Nif5ozकथा आवडल्यास आपल्या प्रतिक्रिया अवश्य कळवा.~~~~~~~~~~~~~~~~~~~✍ स्तंभलेखक *नासा येवतीकर, धर्माबाद*9423625769~~~~~~~~~~~~~~~~~~~••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• 🚥 *१० जुलै २०२३* 🚥 🌺 *_दिनविशेष_* 🌺 ••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *_मातृसुरक्षा दिन_* ••••••••••••••••••••••••••••••••••• *_ या वर्षातील १९१ वा दिवस आहे_* •••••••••••••••••••••••••••••••• *_महत्त्वाच्या घटना:_* •••••••••••••••••••••••••••••• *२०००:विज्ञानप्रसारासाठीच्या कार्याबद्दल नेहरू तारांगणातर्फे दिला जाणारा ’मनुभाई मेहता पुरस्कार’ शास्त्रज्ञ वि. ग. भिडे यांना जाहीर**२०००:नायजेरियात एका फुटलेल्या तेलवाहिनीत स्फोट होऊन गळणारे तेल गोळा करण्यासाठी आलेले २५० जण जळुन ठार झाले.**१९९५:म्यानमारमधील लोकशाही चळवळीच्या प्रणेत्या आंग सान सू क्यी यांची ६ वर्षांच्या नजरकैदेतून बिनशर्त मुक्तता**१९९२:संपूर्ण स्वदेशी बनावटीच्या 'इन्सॅट २ ए' या उपग्रहाचे फ्रेंच गयानातील कोउरू येथून प्रक्षेपण**१९९२:मादक द्रव्यांच्या तस्करीबद्दल पनामाचे माजी राष्ट्राध्यक्ष मॅन्युएल नोरिएगा यांना फ्लोरिडात ४० वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा झाली. नंतर ही शिक्षा कमी करुन ३० वर्षांची करण्यात आली.**१९७८:मॉरिटानियात लष्करी उठाव झाला.**१९७८:मुंबई येथे महात्मा फुले मागासवर्गीय विकास महामंडळ स्थापन करण्यात आले.**१९७३:पाकिस्तानच्या संसदेने बांगलादेशला मान्यता दिली.**१९७३:बहामाजला (युनायटेड किंग्डमपासुन) स्वातंत्र्य मिळाले.**१९६२:’टेलस्टार-१’ हा पहिला अमेरिकन दळणवळण उपग्रह यशस्वीपणे अंतराळात प्रक्षेपित**१९४७:ब्रिटिश पंतप्रधान क्लेमंट अॅटली यांच्या शिफारशीवरून मुहम्मद अली जिना पाकिस्तानचे पहिले गव्हर्नर जनरल झाले.**१९४०:'बॅटल् ऑफ ब्रिटन' या नावाने ओळखले जाणारे हवाईयुध्द सुरू. नाझी जर्मन विमानदलाने इंग्लंडवर प्रचंड मोठया संख्येने विमाने पाठवून बॉबफेक सुरू केली. इंग्लिश हवाईदलाने जर्मनांचा यशस्वी प्रतिकार केला.**१९२५:’तास’ या सोवियेत संघाच्या वृत्तसंस्थेची स्थापना**१९२३:मुसोलिनीने इटलीतील सर्व राजकीय पक्षांवर बंदी घातली.**१८९०:वायोमिंग अमेरिकेचे ४४ वे राज्य बनले.* *_जन्मदिवस / जयंती / वाढदिवस:_* •••••••••••••••••••••••••••••••••*१९८२:एकनाथ विश्वनाथ पवार-- कवी, लेखक व चित्रपट गीतकार**१९८२:शंकर अभिमान कसबे -- नवोदित कवी,नियतकालिकांतून लेखन**१९८०:युवराज भुजंगराव माने-- लेखक* *१९८०:प्रा.डॉ.सखाराम डाखोरे-- कवी* *१९७८:सचिन वसंत पाटील -- प्रसिद्ध कथाकार* *१९६२: सुभाष प्रभाकर सबनीस-- लेखक, कवी**१९५९:तुकाराम पुंडलिक खिल्लारे-- कवी**१९५४: रविराज गंधे-- माध्यमतज्ज्ञ, लेखक-पत्रकार**१९५१: राजनाथ सिंह केंद्रिय संरक्षणमंत्री उतर प्रदेशचे माजी मुख्यमंत्री**१९५०:’बेगम’ परवीन सुलताना – पतियाळा घराण्याच्या शास्त्रीय गायिका**१९४९:सुनील मनोहर तथा ’सनी’ गावसकर – क्रिकेटपटू व समालोचक तथा लेखक**१९४७:ल.म.कडू-- चित्रकार, बालसाहित्य लिहिणारे लेखक व प्रकाशक* *१९४४:डॉ.भास्कर व्यंकटराव गिरिधारी -- लेखक,वक्ते, प्रवचनकार* *१९४३:आर्थर अॅश – अमेरिकन टेनिस खेळाडू (मृत्यू: ६ फेब्रुवारी १९९३)**१९४१:अनिल दहिवाडकर -- प्रसिद्ध लेखक व प्रकाशक* *१९४०:लॉर्ड मेघनाद देसाई – अर्थशास्त्रज्ञ आणि इंग्लंडच्या ’हाऊस ऑफ लॉर्डस’चे सभासद**१९३९:डॉ.विश्वास मेहेंदळे-- मराठी लेखक, वृत्तनिवेदक, चरित्रकार आणि अभिनेते(मृत्यू:९ जानेवारी २०२३)**१९२३:गुरूनाथ आबाजी तथा जी.ए. कुलकर्णी – साहित्य अकादमी पुरस्कार विजेते गूढकथालेखक (मृत्यू: ११ डिसेंबर १९८७)**१९२१:असद भोपाली -- भारतीय हिंदुस्थानी कवी आणि गीतकार(मृत्यू:९ जून १९९०)**१९१३:पद्मा गोळे – सुप्रसिद्ध कवयित्री (मृत्यू: १२ फेब्रुवारी १९९८)**१९०३:रामचंद्र भिकाजी जोशी-- प्रवासवर्णनकार, समीक्षक(मृत्यू:६ नोव्हेंबर १९९१)**१८८३:दत्तात्रेय लक्ष्मण पटवर्धन-- पहिले भारतीय वैमानिक(मृत्यू:१८ ऑक्टोबर १९४३)* *_मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन:_* •••••••••••••••••••••••••••••••••*२०१७:मंगेश तेंडुलकर -- जेष्ठ व्यंगचित्रकार (जन्म:१५ नोव्हेंबर १९३६)**२००५:जयवंत कुलकर्णी – पार्श्वगायक (जन्म: ३१ ऑगस्ट १९३१)**१९९५:डॉ. रामकृष्ण विष्णू तथा ’दादासाहेब’ केळकर – ’गरिबांचे डॉक्टर’ म्हणून प्रसिद्ध, स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या अभिनव भारत मंदिराचे अध्यक्ष* *१९८९:प्रभाकर ऊर्ध्वरेषे – साम्यवादी विचारवंत व साहित्यिक(जन्म:९ जानेवारी १९१८)* *१९८६:शंकरराव श्रीपाद बोडस-- शास्त्रीय गायक (जन्म:२० एप्रिल १९००)**१९७१ : भिखारी ठाकूर – भोजपुरी भाषेचे ’शेक्सपिअर’ (जन्म: १८ डिसेंबर १८८७)**१९६९:डॉ. पांडुरंग सखाराम पिसुर्लेकर – इतिहासकार (जन्म: ३० मे १८९४)* ~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~ *_दिनविशेष या सदरातील सर्व मुद्दे हे संग्रहात्मक आहेत तेव्हा त्यात चूका नसतीलच असे सांगता येणार नाही_* *✍ संकलन ✍* *श्रीराम चव्हाण माजी शिक्षणाधिकारी नागपूर*मोबाईल:9822695372 ईमेल: chavhansk65@gmail.com••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• 🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••1⃣ *सीएसएमटी स्थानकाचं लवकरच कायापालट होणार, 2400 कोटी खर्च करुन स्थानकाचा चेहरामोहरा बदलणार, रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवेंची माहिती*•••••••••••••••••••••••••••••••••••••2⃣ *विनातिकीट प्रवाशांवर कारवाई करुन 303 कोटींचा दंड वसूल; मध्य रेल्वेचा विक्रमी महसूल जमा*•••••••••••••••••••••••••••••••••••••3⃣ * 'लाचारांचा महाराष्ट्र होऊ देणार नाही', पोहरादेवीतून उद्धव ठाकरे यांचं विरोधकांवर टीकास्त्र*•••••••••••••••••••••••••••••••••••••4⃣ *रासायनिक खतांच्या बेसुमार वापरामुळं आजारांचं प्रमाण वाढलं, कृषी उत्पादकता वाढवण्यासाठी कृषी वैज्ञानिकांनी प्रयत्न करावेत : केंद्रीय रसायने आणि खते मंत्री मांडवीय*•••••••••••••••••••••••••••••••••••••5⃣ *'भारतासारखी मदत आतापर्यंत कोणीही केली नाही'; वाईट आर्थिक संकटातून सावरल्याबद्दल श्रीलंकेने मानले भारताचे आभार*•••••••••••••••••••••••••••••••••••••6⃣ *दिल्ली, हिमाचल, पंजाबसह उत्तर भारतात मोठ्या प्रमाणात पावसाने हजेरी लावली आहे.*•••••••••••••••••••••••••••••••••••••7⃣ *ICC विश्वचषक पात्रता फेरीत श्रीलंकेने नेदरलँडचा केला पराभव*•••••••••••••••••••••••••••••••••••••*📷 वृत्त संकलक - कुणाल पवारे 📹*📱9960358300•••••••••••••••••••••••••••••••••••••ही पोस्ट नियमित मिळविण्यासाठी आणि या समुहात add होण्यासाठी 9423625769 येथे संपर्क करावे.••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• 🌷🍃 *विशेष माहिती* 🌷🍃••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🔬 सूक्ष्मदर्शक यंत्र कसे कार्य करते ?🔬 जीवशास्त्राचे प्रयोग दाखवताना तुम्हाला सरांनी सूक्ष्मदर्शक यंत्र दाखवले असेलच. सूक्ष्मदर्शक यंत्रातून पहिल्यावर पेशी किंवा इतर सूक्ष्म जीव कित्येक पटीने मोठे असलेले आपल्याला दिसतात. हे कसे होते ते आता पाहू. साधे काचेचे भिंग घ्या. त्या भिंगातून वर्तमानपत्रातील अक्षरांकडे पाहा. अक्षरे मोठी झालेली दिसतात. सूक्ष्मदर्शक यंत्र याच तत्त्वावर काम करते. सूक्ष्मदर्शक यंत्रांमध्ये भिंगे अशा प्रकारे बसवलेली असतात की त्यांच्या एकत्रित परिणामांमुळे आपल्याला वस्तू हजारो पट मोठ्या दिसतात.पेशी, सूक्ष्म जीवजंतू आपल्याला नुसत्या डोळ्यांनी दिसू शकत नाहीत. कारण त्यांचे मोजमाप १ मी.मी. च्या हजाराव्या भागाच्या प्रमाणात केले जाते. विषाणू तर याहूनही लहान असतात. त्यामुळे हजारो पट मोठे केल्यानंतरच हे जीव वा पेशी आपल्याला दिसू शकतात. पेशी व सूक्ष्म जीवजंतुच्या परीक्षणामुळे रोगाची अवस्था समजते आणि व्यक्ती रोगी आहे का ते कळते. रोग बरा होतो आहे काय तेही समजते. क्षयरोग, हिवताप, कुष्ठरोग, कॉलरा, हगवण आदी रोगांमध्ये तसेच रक्तक्षय, रक्ताचा कर्करोग, इतर कर्करोग यातदेखील सूक्ष्मदर्शकद्वारे केलेल्या तपासणीमुळे रोगाचे निदान होते व उपचार करण्यास मदत होते.असे हे सूक्ष्मदर्शक यंत्र म्हणजे सूक्ष्म जीवांच्या अजब गुहेत प्रवेश करण्यासाठी मानवाला लाभलेला जादूचा दिवाच बनले आहे.डॉ. अंजली दिक्षित व डॉ. जगन्नाथ दिक्षित यांच्या पुस्तकातुन*संकलन*••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• 🌹 *" फ्रेश सुविचार "* 🌹••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••ऐक्य हेच बळ ते केवळ सुवचन नसून जीवनधर्म आहे.*संकलन :- प्रमिलाताई सेनकुडे, नांदेड**प्रा.शा. गोजेगाव ता.हदगाव, जि. नांदेड*📱9403046894••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• ❓ *आजची प्रश्नमंजुषा* ❓••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••१) लंडनमध्ये 'गव्हर्नर ऑफ द इयर' या पुरस्काराने कोणाला सन्मानित करण्यात आले ?२) स्वदेशी निर्मित असलेल्या 'सेमी हाय स्पीड ट्रेन - १८' चे नामकरण २०१९ मध्ये कोणत्या नावाने करण्यात आले ?३) 'माय रशिया - वॉर ऑर पीस' या पुस्तकाचे लेखक कोण ?४) वनस्पतीचा कोणता अवयव जमिनीत वाढतो ?५) राष्ट्रवादी काँग्रेसची स्थापना केव्हा झाली होती ?*उत्तरे :-* १) शक्तिकांत दास २) वंदे भारत एक्सप्रेस ३) मिखाईल शिष्किन ४) मूळ ५) १० जून १९९९*संकलन :- जैपाल भै. ठाकूर*जि.प.व.प्राथ.शाळा भोसा, ता. आमगाव, जि. गोंदिया 📱9765943144••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎂 *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *◆|वा|ढ|दि|व|स|अ|भि|ष्ठ|चिं|त|न|◆* 👤 ज्ञानेश्वर जगताप, सहशिक्षक, मुखेड👤 भागवत गरकल👤 लक्ष्मण मुंडकर, बिलोली👤 मिलिंद चवरे, नांदेड👤 प्रकाश येलमे, धर्माबाद👤 महेश पांडुरंग लबडे, छ. संभाजीनगर👤 शिवाजी वासरे👤 गणेश अंगरवार👤 संतोषकुमार यशवंतकर👤 बालाजी दुसेवार👤 दत्तात्रय धूळशेट्टे, माजी गटशिक्षणाधिकारी👤 प्रियंका घुमडे👤 मन्सूर शेख👤 पिराजी चन्नावार👤 नागनाथ वाढवणे, सहशिक्षक, बिलोली👤 दगडू गारकर, लातूर👤 युवराज माने, बीड👤 लक्ष्मीकांत पडोळे👤 चरणसिंह चौहान👤 विठ्ठल रामलू चिंचलोड, हैद्राबाद👤 कृष्णा चिंचलोड, येवती👤 अभिजित वऱ्हाडे*ઉदंड_आયુષ્યાच्या अનંત_શુभेच्छा,* [ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा एक दिवस अगोदर 9423625769 येथे पोस्ट करावे. ]••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• ••• 💡 ‼ *मनाचे श्लोक*‼ 💡•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••मना वासना चूकवीं येरझारा। मना कामना सांडी रे द्रव्यदारा॥ मना यातना थोर हे गर्भवासीं। मना सज्जना भेटवीं राघवासीं॥२१॥।। जय जय रघुवीर समर्थ ।।••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🕊🌎 ‼ *विचारधारा*‼🕊🌎••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••सदैव सत्याच्या वाटेवर चालणाऱ्या व्यक्तीला लागलेला कलंक हा कोळशा पेक्षा काळा असतो तसच त्याच व्यक्तीला पुन्हा कलंक लावण्यासाठी दहा लोक नेहमीच सज्ज असतात. हे वास्तव सत्य आहे. तरीही ती व्यक्ती सत्याच्या बाजूने उभे राहून प्रामाणिकपणे जगण्याचा प्रयत्न करते. अशा विचाराची व्यक्ती अभिमानाचे दुसरे नाव असते. म्हणून ती, व्यक्ती कोणाचाही विरोध करत नाही व व्यर्थ गोष्टींना साथ देत नाही. आपणही त्याच व्यक्तीकडून थोडं शिकण्याचा प्रयत्न करावे.🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷सौ.संगीता संतोष ठलाल मु.कुरखेडा जि.गडचिरोली••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎭 *आजची फ्रेश बोधकथा* 🎭••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••*स्वत:ला नियंत्रणात ठेवण्याची कला*एक जिज्ञासूवृत्तीचा मुलगा होता. तो कोणतीही नवी गोष्ट शिकण्यास तयार होत असे. त्याने धनुष्यबाण कसे तयार करतात हे शिकून घेतले. नाव बनवणर्यांकडून नाव, घराचे बांधकाम, बासरी बनविणे इ. प्रकारात तो निपुण झाला. परंतु त्याच्यात अहंकार आला, तो आपल्या मित्रांना सांगत असे. या जगात माझ्याइतका प्रतिभावंत अन्य कोणी नसेल. एकदा या शहरात बुद्धांचे आगमन झाले. त्यांनी जेव्हा या मुलाची कला आणि अहंकाराबाबत ऐकले. तेव्हा त्यांना वाटले, या मुलाकडून आपण अशी कला शिकून घ्यावी जी आतापर्यंतच्या कलांमध्ये श्रेष्ठ असेल. ते भिक्षापात्र घेऊन त्याच्याकडे गेले. मुलाने विचारले, तुम्ही कोण आहात? बुद्ध म्हणाले, मी शरीरावर नियंत्रण ठेवणारा माणूस आहे. मुलाने यावर त्यांना खुलासा विचारला असता बुद्ध म्हणाले, जो धनुष्यबाण वापरतो त्याला त्याचा वापर माहित असतो, जो नाव हाकतो, जो घराचे बांधकाम करतो त्याला ते काम माहित असते. पण जो ज्ञानी आहे तो स्वत:वर नियंत्रण ठेवतो. मुलाने विचारले, ते कसे काय? बुद्ध म्हणाले, त्याची जर कोणी प्रशंसा केली तर अभिमानाने ताठ होत नाही तसेच निंदा केली तरी तो शांत राहतो, अशी व्यक्ती नेहमी आनंदी असते. मुलाला जाणीव झाली की सर्वात मोठे कौशल्य तर स्वत:ला नियंत्रणात ठेवण्याचे असते. त्याला त्याची चूक कळून आली. तात्पर्य : ज्यांना स्वत:ला नियंत्रणात ठेवता येते त्याला समभाव ठेवता येतो. हाच समभाव अनुकूल आणि प्रतिकूल परिस्थितीत आपल्याला आनंदी ठेवतो.•••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••या पोस्ट विषयी आपल्या सूचना, निवेदन, अभिप्राय, बातम्या, वाढदिवस, माहिती किंवा शंका 9423625769 येथे कळवावे. •••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••~~~~~~~~~~~~~~~~~~~*🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢*📱 9423625769~~~~~~~~~~~~~~~~~~~*🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏*पुन्हा भेटू या फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार ~~~~~~~~~~~~~~~~~~~
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment