✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट~~~~~~~~~~~~~~~~~~~9️⃣ 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 9️⃣🇮🇳 ( फ्रेश शालेय परिपाठ ) 🇮🇳🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00 ( रविवार आणि सुट्टी वगळून )~~~~~~~~~~~~~~~~~~~🎇 दिनांक :- 14 ऑगस्ट 2023💠 वार - सोमवार🌷🌐 . *दिनविशेष . 🌐* 🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *_ या वर्षातील २२६ वा दिवस आहे_* •••••••••••••••••••••••••••••••• *_महत्त्वाच्या घटना:_* •••••••••••••••••••••••••••••• *२०१०:पहिल्या ’युवा ऑलिम्पिक स्पर्धा’ सिंगापूरमधे घेण्यात आल्या.**२००६:श्रीलंकेच्या वायुदलाने केलेल्या बॉम्बहल्ल्यात चेन्चोलाई येथे ६१ तामिळ मुली ठार झाल्या.**१९७१:बहारीनला (युनायटेड किंग्डमपासुन) स्वातंत्र्य मिळाले.**१९५८:’एअर इंडिया’ची दिल्ली - मॉस्को विमानसेवा सुरू झाली.**१९४७:भारताच्या घटनासमितीने सत्ता स्वीकारण्याचा ठराव मंजूर केला आणि लॉर्ड माऊंटबॅटन यांची स्वतंत्र भारताचे पहिले गव्हर्नर जनरल म्हणून नेमणूक केली.**१९४७:पाकिस्तानला (युनायटेड किंग्डमपासुन) स्वातंत्र्य मिळाले.**१८९३:मोटर वाहनांची नोंदणी सुरू करणारा फ्रान्स हा पहिला देश बनला.**१८६२:मुंबई उच्च न्यायालयाची स्थापना**१८६२:कलकत्ता उच्च न्यायालयाची स्थापना**१६६०:मुघल फौजांनी संग्रामगड (चाकणचा किल्ला) ताब्यात घेतला.* *_जन्मदिवस / जयंती / वाढदिवस:_* ••••••••••••••••••••••••••••••••• *१९८०: ज्ञानेश्वर अर्जुन सूर्यवंशी(ज्ञानेश)-- कवी* *१९७३:प्रा.डॉ.गिरीश नारायणराव सपाटे-- कवी,समीक्षक* *१९६८:प्रवीण आम्रे – क्रिकेटपटू**१९६४:संजय सोनवणी-- मराठी साहित्यिक, कथा,कादंबरी,कविता,तत्वज्ञान,इतिहास संशोधन असे चौफेर लेखन**१९५७:डॉ.श्याम हिराचंद मोहरकर-- लेखक* *१९५७:जॉन प्रकाश राव जनुमला ऊर्फ ’जॉनी लीवर’– विनोदी अभिनेता**१९५३: डॉ.सर्जु काटकर -- अनुवादक* *१९४८:यशवंत बाबुराव कदम-- लेखक, कवी**१९३९:शांता गोखले-- लेखिका, पत्रकार, अनुवादक आणि नाट्यसमीक्षक,साहित्य अकादमी पुरस्कारांनी सन्मानित**१९३५: वीणा चिटको--- लेखिका,कवयित्री, गीतकार आणि संगीत दिग्दर्शक(मृत्यू:१९ सप्टेंबर २०१५)**१९२५:जयवंत दळवी – साहित्यिक, नाटककार व पत्रकार.कथा,कादंबरी,नाटक, प्रवासवर्णन,विनोदी लेख असे विविध प्रकार त्यांनी हाताळले. (मृत्यू:१६ सप्टेंबर १९९४)**१९१५:सिंधू गाडगीळ-- कादंबरीकार कथाकार* *१९१०:डॉ.गणेश त्र्यंबक देशपांडे-- मराठी व संस्कृत लेखक(मृत्यू:१६ नोव्हेंबर १९८९)* *१९०७:गोदावरी परुळेकर – मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या नेत्या, सामाजिक कार्यकर्त्या व लेखिका.'जेव्हा माणूस जागा होतो’ हे त्यांचे पुस्तक वेगळ्या जगाची ओळख करुन देणारे आहे.(मृत्यू:८ आक्टोबर १९९६)**१७७७:हान्स क्रिस्टियन ओरस्टेड – डॅनिश भौतिकशास्त्रज्ञ (मृत्यू: ९ मार्च १८५१)* *_मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन:_* ••••••••••••••••••••••••••••••••• *२०२२:विनायक तुकाराम मेटे-- पूर्व विधान परिषद सदस्य शिवसंग्राम पक्षाचे प्रमुख(जन्म:३० जून १९६३)**२०२०:पंडित सुधीर माईणकर -- ज्येष्ठ तबलावादक,संशोधक,लेखक,संगीततज्ज्ञ (जन्म:१६ मे १९३७)**२०१२:विलासराव देशमुख – महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आणि माजी केंद्रीय अवजड उद्योग मंत्री (जन्म:२६ मे १९४५)**२०११:शम्मी कपूर – सुप्रसिद्ध हिन्दी चित्रपट अभिनेता व निर्माता (जन्म: २१ आक्टोबर १९३१)**१९८८:एन्झो फेरारी – रेस कार निर्माते आणि ड्रायव्हर (जन्म: १८ फेब्रुवारी १८९८)**१९८४:कुस्तीगीर खाशाबा दादासाहेब जाधव – १९५२ च्या हेलसिंकी ऑलिम्पिकमधे वैयक्तिक पदक मिळवणारे पहिले भारतीय, शिवछत्रपती पुरस्कार [मरणोत्तर] (जन्म:१५ जानेवारी १९२६)**१९५८:जीन फ्रेडरिक जोलिओट – मूलद्रव्याच्या समस्थानिकांच्या (Isotopes) शोधाबद्दल नोबेल पारितोषिक (१९३५) मिळवणारा फ्रेन्च पदार्थवैज्ञानिक (जन्म:१९ मार्च १९००)*~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~ *_दिनविशेष या सदरातील सर्व मुद्दे हे संग्रहात्मक आहेत तेव्हा त्यात चूका नसतीलच असे सांगता येणार नाही_* *✍ संकलन ✍* *श्रीराम चव्हाण माजी शिक्षणाधिकारी नागपूर*मोबाईल:9822695372 ईमेल: chavhansk65@gmail.com••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *✈ 🚀 गुगलयान ✈ 🚀*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••भारतीय स्वातंत्र्यलढ्यात महिलांचे योगदान *कनकलता बरुवा*कनकलता बरुवा या भारतीय स्वातंत्र्यलढ्यातील वीरबाला म्हणून ओळखल्या जातात. संपूर्ण भारतभर त्यावेळेस ब्रिटिशांविरुद्ध आंदोलन सुरू होतं. अगदी ईशान्य कडील राज्य ही त्याबाबत मागे नव्हती.कनकलता बरुवा या आसाममधल्या. आसाममधून त्यांनी १९४२ च्या आंदोलनात भाग घेतला होता. त्या आंदोलनाचे नेतृत्व त्यांनी बारंगबारी येथून केलं. त्यावेळेस त्यांना ‘भारत छोडो’ च्या घोषणा देत गोहपुर पोलीस स्टेशन समोर आंदोलन करायचे होते.आणि तिथे त्यांना तिरंगा फडकवायचा होता. परंतु ब्रिटिशांनी त्यांना मध्येच अडवले. त्या ब्रिटिशांना सांगत होत्या की आमच आंदोलन हिंसक नाही, तरीदेखील ब्रिटिशांनी त्यांचं काहीही ऐकून घेतलं नाही.त्यांच्यावर जोरदार लाठीमार करण्यात आला आणि त्यातच वयाच्या केवळ १८ व्या वर्षी त्यांनी आपल्या प्राणांचे बलिदान केले.संकलन~~~~~~~~~~~~~~~~~~~ 🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••1⃣ *राज्यात स्वातंत्र्यदिनापासून शासकीय रुग्णालयात रूग्णांना मोफत उपचार मिळणार असल्याची माहिती आरोग्य मंत्री तानाजी सावंत यांनी दिली.*•••••••••••••••••••••••••••••••••••••2⃣ *स्वातंत्र्यदिन सोहळ्यासाठी देश सज्ज, देशातील 1 हजार 800 जणांना विशेष अतिथी म्हणून निमंत्रण*•••••••••••••••••••••••••••••••••••••3⃣ *पीक विम्यानंतर आता सरकार मेंढ्यांचा 1 रुपयांत विमा काढणार ? अब्दुल सत्तारांची मोठी घोषणा*•••••••••••••••••••••••••••••••••••••4⃣ *25 ते 31 ऑगस्ट दरम्यान पुन्हा एकदा राज्यातील काही भागात पाऊस पडण्याची शक्यता आहे*•••••••••••••••••••••••••••••••••••••5⃣ *एसटी प्रवाशांसाठी खूशखबर: नवीकोरी रातराणी लवकरच रस्त्यावर धावणार*•••••••••••••••••••••••••••••••••••••6⃣ *भारतच आशियाचा 'किंग'! मलेशियाचा पराभव करत चॅम्पियन्स ट्रॉफीवर कोरलं नाव, भारतीय हॉकी संघाची शानदार कामगिरी*•••••••••••••••••••••••••••••••••••••7⃣ *फुटबॉलप्रमाणे क्रिकेटच्या मैदानावरही आता लाल कार्ड दिसणार, चुका केल्यावर मैदानाबाहेर जावे लागणार*•••••••••••••••••••••••••••••••••••••*📷 वृत्त संकलक - कुणाल पवारे 📹*📱9960358300•••••••••••••••••••••••••••••••••••••ही पोस्ट नियमित मिळविण्यासाठी आणि या समुहात add होण्यासाठी 9423625769 येथे संपर्क करावे.••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• 🌷🍃 *विशेष माहिती* 🌷🍃••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••*तुमच्या जिल्ह्याचं नाव कसं पडलं ?* महाराष्ट्रातील ३६ जिल्ह्याची वेग वेगळी अशी वैशिष्ट्ये आहे. *हिंगोली* महाराष्ट्रातील हिंगोली हा जिल्हा पूर्वी विंगुली, लिंगोली या नावाने ओळखला जात होता. त्यानंतर हिंगोली या नावाने या जिल्ह्याची ओळख निर्माण झाली आहे.*संकलन*••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• 🌹 *" फ्रेश सुविचार "* 🌹••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••स्वातंत्र्य आणि मुक्तता पेक्षा अधिक काहीही मौल्यवान नाही. – हो ची मिन्ह*संकलन :- प्रमिलाताई सेनकुडे, नांदेड**प्रा.शा. गोजेगाव ता.हदगाव, जि. नांदेड*📱9403046894••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• ❓ *आजची प्रश्नमंजुषा* ❓••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••१) "मी इथे तुमच्यासमोर उभा आहे, भले तुम्ही माझ्यावर गोळ्या झाडा, पण माझ्या तिरंग्याचा अपमान होऊ देणार नाही" हे वाक्य कोणाचे आहे ?२) "स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे व तो मी मिळवणारच" ही प्रतिज्ञा लोकमान्य टिळक यांनी कोठे केली ?३) D. N. A. चा शोध कोणी लावला ?४) जागतिक पाणथळ भूमी दिन कधीपासून साजरा केला जातो ?५) मराठी भाषेचे लेखन कोणत्या लिपीत केले जाते ?*उत्तरे :-* १) शहीद शिरीषकुमार ( १५ वर्ष ), नंदूरबार २) बेळगाव, कर्नाटक ३) फ्रेड्रिक मिशर ४) सन १९९७ ५) देवनागरी*संकलन :- जैपाल भै. ठाकूर*जि.प.व.प्राथ.शाळा भोसा, ता. आमगाव, जि. गोंदिया 📱9765943144••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎂 *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *◆|वा|ढ|दि|व|स|अ|भि|ष्ठ|चिं|त|न|◆* 👤 किरण मुधोळकर, फोटोग्राफर, देगलूर👤 पवन लिंगायत वळंकी👤 गजानन पाटील👤 राम दिगंबर होले👤 मुनेश्वर सुतार👤 गणेश शंकर ईबीतवार, येवती👤 गजानन गंगाधरराव रामोड, जारीकोट*ઉदंड_आયુષ્યાच्या अનંત_શુभेच्छा,* [ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा एक दिवस अगोदर 9423625769 येथे पोस्ट करावे. ]••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• ••• 💡 ‼ *मनाचे श्लोक*‼ 💡•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••क्रमी वेळ जो तत्त्वचिंतानुवादे।न लिंपे कदा दंभ वादे विवादे॥ करी सुखसंवाद जो उगमाचा। जगी धन्य तो दास सर्वोत्तमाचा॥५२॥।। जय जय रघुवीर समर्थ ।।••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🕊🌎 ‼ *विचारधारा*‼🕊🌎••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••आपले स्वतःचे दु:ख इतरांना सांगत फिरणे व तेच दु:ख स्वतः सहन करणे यात खूप फरक आहे. कारण कधी, कधी असं होतं की, आपण मनमोकळेपणाने आपले दु:ख एखाद्या व्यक्तीला सांगताना त्या,व्यक्तीला पूर्णपणे वाचत नाही त्यामुळे बऱ्याच अडचणी न सांगता येत असतात. दु:ख कमी होण्या ऐवजी वाढत जातात.शेवटी आपले दु:ख आपल्यालाच सहन करून त्यातून मार्ग काढावे लागते. त्यासाठी इतरांना सांगत फिरण्यापेक्षा जीवनात आलेल्या दु:खाचे स्वागत करावे कारण, दु:खातूनच शेवटी सुखाची प्राप्ती होत असते. 🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷सौ.संगीता संतोष ठलाल मु. कुरखेडा जि. गडचिरोली••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎭 *आजची फ्रेश बोधकथा* 🎭••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••नंदुरबारच्या शिरीष कुमारचे स्वातंत्र्यासाठी बलिदान- लेखक मुकुंद बाविस्कर(लेखक ज्येष्ठ पत्रकार आहेत)मुंबईच्या गवालिया टँक मैदानावर लाखोंचा जनसमुदाय जमला होता. त्याच वेळी महात्मा गांधी यांच्या मुखातून शब्द बाहेर पडले, ‘चलेजाव’, ‘भारत छोडो’ आणि ‘करेंगे या मरेंगे’. तो दिवस होता ८ ऑगस्ट १९४२. महात्मा गांधी यांच्या मुखातून बाहेर पडलेले हे निर्वाणीचे शब्द जणू काही धगधगत्या निखाऱ्यासारखे होते.संपूर्ण देशात स्वातंत्र्य आंदोलनाला वेग आला होता. हजारो तरुण भारतमातेच्या स्वातंत्र्यासाठी आपल्या प्राणांची आहुती द्यायला तयार झाले होते. महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून तरुण कार्यकर्ते स्वातंत्र्य चळवळीत सक्रिय झाले होते. त्यात महाराष्ट्र-गुजरात सीमेवरील नंदुरबारचा पंधरा वर्षांचा, आठवीत शिकणारा एक कुमारवयीन मुलगा शिरीष कुमार मेहता देखील होता. त्याची आई सविता आणि वडील पुष्पेंद्र मेहता हे दोघेही स्वातंत्र्य चळवळीत सक्रिय कार्यकर्ते म्हणून सहभागी झाले होते.शिरीष कुमारला लहानपणापासून स्वातंत्र्य, देशाभिमान आदींचे बाळकडू मिळाले होते. महात्मा गांधी आणि नेताजी सुभाषचंद्र बोस हे त्याचे आदर्श होते. शिरीष कुमारचे घर म्हणजे कार्यकर्ते व क्रांतिकारकांचे मंदिर होते. भारत छोडो आंदोलनात महात्मा गांधी यांना ब्रिटिश सरकारने अटक केली. महात्मा गांधी यांच्या सुटकेसाठी ठिकठिकाणी मोर्चे निघाले. शिरीषकुमार यांनी देखील आपल्या मित्रांसमवेत नंदुरबार शहरात मोर्चा काढण्याचा निश्चय केला. ९ ऑगस्ट १९४२ रोजी नंदुरबार शहरात भव्य प्रभात फेरी निघाली.‘नही नमेगी, नही नमेगी, निशाण भूमी भारत’ अशा घोषणा देत मोर्चा निघाला. पोलीस चौकीसमोर मुलांनी घोषणाबाजी सुरू केल्याने पोलिसांनी अटक केली आणि सायंकाळी सोडून दिले. परंतु त्यानंतर पुन्हा रोजच मोर्चे निघू लागले. कधी मशाल मोर्चा, तर कधी हात फलक घेऊन मोर्चा असा प्रकार महिनाभर सुरू होता. हळूहळू सारा गाव शिरीष कुमार आणि त्याच्या साथीदारांच्या मागे जमू लागला.शिरीष कुमारने शाळेतही घोषणाबाजी सुरू केल्याने मुख्याध्यापकांनी त्याला समज दिली. परंतु मुलांचा जोर आणखीनच वाढला. महिनाभराचा कालावधी उलटला तरी महात्मा गांधी आणि सहकार्यांची सुटका झाली नव्हती, त्यामुळे आंदोलन आणखीनच तीव्र होऊ लागेल. ९ सप्टेंबरचा दिवस उजाडला. नंदुरबार शहरातून प्रभात फेरी निघाली. त्यात शिरीष कुमार आणि त्याचे सवंगडी अग्रभागी होते. त्यांनी शाळेत तिरंगा फडकला आणि मिरवणुक पोलीस कचेरी जवळ आली. शिरीष कुमारच्या हातात तिरंगी झेंडा होता.पोलिसांनी मिरवणूक विसर्जित करण्याचे आवाहन केले. तसेच मोर्चा अडविण्याचा प्रयत्न केला. शिरीष कुमार आणि साथीदार माणिक चौकात शांततेत तिरंगा फडकवून माघारी फिरणार होते. परंतु पोलिस ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हते. त्यामुळे शिरीष कुमार आणि त्याच्या साथीदारांनी ‘वंदे मातरम’ आणि ‘भारत माता की जय’ अशा जोरदार घोषणा देण्यास सुरुवात केली. पोलीस संतप्त झाले. त्यांनी तिरंगा झेंडा जप्त करण्याचा प्रयत्न केला. परंतु शिरीषकुमार याने हातातून झेंडा देण्यास नकार दिला. ‘प्राण घ्या पण झेंडा मिळणार नाही’, असे बाणेदार उत्तर शिरीष कुमार याने दिले.पोलीस अधिकाऱ्यांनी गोळीबार करण्यासाठी नेम धरला. शिरीषकुमार म्हणाला, ‘गोळी मारायची तर मला मारा, हा मी इथे उभा आहे’, पोलीस अधिकाऱ्याच्या बंदुकीतून सुटलेल्या तीन गोळ्या शिरीषकुमारच्या छातीवर बसल्या. तो जागीच कोसळला. या गोळीबारात लालदास शहा, धनसुखलाल वाणी, शशिधर केतकर, घनश्यामदास शहा हे चौघे देखील शहीद झाले. मोठा गोंधळ उडून पंधरा लोक जखमी झाले. पोलिसांनी तेरा कार्यकर्त्यांना अटक केली. शिरीष कुमार आदि हुतात्म्यांचे बलिदान सार्थ ठरले. देश स्वतंत्र झाला. नंदुरबार शहरात बाल क्रांतिकारक शिरीष कुमारचे स्मारक आहे. हे स्मारक नेहमीच बलिदानांची साक्ष देते.संकलन•••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••या पोस्ट विषयी आपल्या सूचना, निवेदन, अभिप्राय, बातम्या, वाढदिवस, माहिती किंवा शंका 9423625769 येथे कळवावे. •••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••~~~~~~~~~~~~~~~~~~~*🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢*📱 9423625769~~~~~~~~~~~~~~~~~~~*🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏*पुन्हा भेटू या फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार ~~~~~~~~~~~~~~~~~~~
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment