✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट~~~~~~~~~~~~~~~~~~~ 6️⃣ 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 6️⃣ ( फ्रेश शालेय परिपाठ )🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00 ( रविवार आणि सुट्टी वगळून )~~~~~~~~~~~~~~~~~~~🎇 दिनांक :- 12 ऑगस्ट 2023💠 वार - शनिवार🌷🌐 . *दिनविशेष . 🌐* 🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *_आंतरराष्ट्रीय युवा दिन_**_आंतरराष्ट्रीय हत्ती दिन_**_भारतीय ग्रंथपाल दिवस_*••••••••••••••••••••••••••••••••• *_ या वर्षातील २२४ वा दिवस आहे_* •••••••••••••••••••••••••••••••• *_महत्त्वाच्या घटना:_* •••••••••••••••••••••••••••••• *२००५:श्रीलंकेचे परराष्ट्रमंत्री लक्ष्मण कादिरमगार यांची तामिळ अतिरेक्यांनी हत्या केली.**२००२:१२ वर्षे ७ महिने वयाचा सर्गेई कार्जाकिन हा युक्रेनचा खेळाडू जगातील सर्वात लहान वयाचा बुद्धीबळातील ग्रँडमास्टर बनला.**२०००:प्रसिद्ध पर्यावरणवादी कार्यकर्त्या मेधा पाटकर यांची गांधी सेवा पुरस्कारासाठी निवड**१९९८:सचिन तेंडुलकर यांना ‘राजीव गांधी खेल रत्न‘ पुरस्कार जाहीर**१९९५:जागतिक मैदानी स्पर्धेत अमेरिकेच्या मायकेल जॉन्सनने २०० मी आणि ४०० मी अशा दोन्ही धावण्यांच्या शर्यतीत सुवर्णपदक मिळवले. अशी कामगिरी करणारा तो पहिलाच पुरुष धावपटू आहे.**१९८९:कुसूमाग्रज यांच्या अध्यक्षतेखाली पहिली 'जागतिक मराठी परिषद’ मुंबई येथे सुरू झाली.**१९८२:परकीय कर्जाचे हप्ते चुकवता येत नसल्यामुळे मेक्सिकोने दिवाळे काढले. त्यामुळे दक्षिण अमेरिका व तिसर्या जगातील देशांमधे आर्थिक आणीबाणीची परिस्थिती निर्माण झाली.**१९८१:आय. बी. एम. कंपनीचा पहिला पर्सनल कॉम्प्युटर बाजारात आला.**१९७७:श्रीलंकेत झालेल्या वांशिक दंगलीत ३०० हुन अधिक तामिळ ठार झाले.**१९६४:वंशभेद केल्याबद्दल दक्षिण अफ्रिकेची ऑलिम्पिक स्पर्धांमधुन हकालपट्टी झाली.**१९५०:अमेरिकन युद्धकैद्यांना उत्तर कोरियन सैन्याने ठार मारले.**१९४८:लंडनमधे झालेल्या ऑलिम्पिक स्पर्धेत भारताने हॉकीमधे सुवर्णपदक मिळवले.**१९४२:चले जाव चळवळ – पुण्यातील अप्पा बळवंत चौकात रणगाडे आणून गोळीबार, २ ठार १६ जखमी**१९२२:राम गणेश गडकरी यांच्या निधनानंतर जवळजवळ ४ वर्षांनी त्यांनी लिहीलेल्या ’राजसंन्यास’ नाटकाचा पहिला प्रयोग झाला.**१९२०:शिवराम महादेव परांजपे यांनी ’स्वराज्य’ नावाचे साप्ताहिक सुरू केले.**१८५१:आयझॅक सिंगरला शिवणाच्या मशीनचे पेटंट मिळाले.* *_जन्मदिवस / जयंती / वाढदिवस_* •••••••••••••••••••••••••••••••••*१९६२:सुरेश वांदिले-- एक बहुआयामी, पथदर्शी,भविष्यवेधी लेखक पूर्व संचालक माहिती व जनसंपर्क विभाग* *१९५९: गुरुनाथ तेंडुलकर-- कथाकार* *१९५९:प्रवीण महादेव ठिपसे-- 'ग्रॅंडमास्टर किताब मिळवणारे पहिले भारतीय बुद्धिबळ खेळाडू**१९५६: चित्रा जगदीश शर्मा-- लेखिका, कथाकार* *१९५३:कांताराम गंगाराम सोनवणे-- कवी, लेखक,पत्रकार* *१९५२:अनंत सामंत-- सुप्रसिद्ध मराठी लेखक**१९४८:फकिरा मुंजाजी तथा ’फ. मुं.’ शिंदे – प्रसिद्ध कवी, समीक्षक व अनुवादक**१९४४:मिलिंद श्रीपती येरमाळकर-- कवी लेखक**१९२६:बी. आर. तथा अप्पासाहेब खेडकर – गणेशमुर्तीकार ते शिल्पकार* *१९२४:मुहम्मद झिया उल हक – पाकिस्तानचे ६ वे राष्ट्राध्यक्ष (मृत्यू: १७ ऑगस्ट १९८८)**१९१९:डॉ.विक्रम साराभाई – भारतीय अवकाश संशोधन कार्यक्रमाचे शिल्पकार (मृत्यू:३१ डिसेंबर १९७१)**१९०६:लेफ्टनंट जनरल शंकरराव पांडुरंगराव (पाटील) तथा एस. पी. पी. थोरात-- संयुक्त राष्ट्रसंघाने शांतता प्रस्थापनेसाठी कोरियात पाठवलेल्या शांतिसेनेचे ते सेनापती होते. कीर्तिचक्र, पद्मश्री, सावरकर पुरस्कार असे अनेक मानसन्मान त्यांना मिळाले होते. (मृत्यू: १० ऑगस्ट १९९२)**१८९२:एस.आर.रंगनाथन – भारतीय गणितज्ञ व ग्रंथालयशास्त्रतज्ञ (मृत्यू: २७ सप्टेंबर १९७२)**१८८७:आयर्विन श्रॉडिंगर – नोबेल पारितोषिक विजेता ऑस्ट्रियन भौतिकशास्त्रज्ञ (मृत्यू: ४ जानेवारी १९६१)**१८८१:सेसिल डी मिल – अमेरिकन चित्रपट अभिनेता, निर्माता व दिग्दर्शक (मृत्यू: २१ जानेवारी १९५९)**१८८०:बाळकृष्ण गणेश खापर्डे – चरित्रकार,वाड्मयविवेचक( मृत्यू:१९६८)**१८०१:जॉन कॅडबरी – ब्रिटिश उद्योगपती व ’कॅडबरी’ चे संस्थापक (मृत्यू: १२ मे १८८९)* *_मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन_* ••••••••••••••••••••••••••••••••• *२०२२:माधव गरड --ज्येष्ठ कवी,ललित लेखक (जन्म:२५ ऑक्टोबर १९६०)* *२००५:लक्ष्मण कादिरमगार – श्रीलंकेचे परराष्ट्रमंत्री, मुत्सद्दी, वकील व तामिळ नेते (जन्म: १२ एप्रिल १९३२)**१९८२:हेन्री फोंडा – अमेरिकन अभिनेते (जन्म: १६ मे १९०५)**१९७३:दयानंद बाळकृष्ण ऊर्फ ’भाऊसाहेब’ बांदोडकर – गोव्याचे पहिले मुख्यमंत्री, महाराष्ट्रवादी गोमांतक पक्षाचे संस्थापक, उद्योगपती आणि दानशूर (जन्म:१२ मार्च १९११)**१९६४:इयान फ्लेमिंग – दुसर्या महायुध्दातील गुप्तहेर, लेखक, पत्रकार आणि ’जेम्स बाँड’चा जनक (जन्म: २८ मे १९०८)*~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~ *_दिनविशेष या सदरातील सर्व मुद्दे हे संग्रहात्मक आहेत तेव्हा त्यात चूका नसतीलच असे सांगता येणार नाही_* *✍ संकलन ✍* *श्रीराम चव्हाण माजी शिक्षणाधिकारी नागपूर*मोबाईल:9822695372 ईमेल: chavhansk65@gmail.com••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *✈ 🚀 गुगलयान ✈ 🚀*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••भारतीय स्वातंत्र्यलढ्यात महिलांचे योगदान *अरुणा असफ अली*भारतीय स्वातंत्र्य लढ्यातील हे देखील एक मोठं नाव. ’द ग्रँड ओल्ड लेडी’ म्हणून त्या ओळखल्या जातात. भारत छोडो आंदोलनाच्या वेळेस त्यांनी मुंबईत झालेल्या आंदोलनात भारताचा ध्वज हातात घेऊन आंदोलनाचे नेतृत्व केले होते.आंदोलनात सहभाग घेतला, ब्रिटिशांविरुद्ध आवाज उठवला म्हणून त्यांना तुरुंगवासही भोगावा लागला. तुरुंगात असतानाही कैद्यांना देण्यात येणाऱ्या वाईट वागणुकीबद्दलही त्यांनी तुरुंगात देखील आंदोलन केले होते.संकलन~~~~~~~~~~~~~~~~~~~ 🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••1⃣ *भारतीय दंड संहितेतील ब्रिटिशकालीन राजद्रोहाचं कलम रद्द करणार; CrPC दुरुस्ती विधेयक सादर करताना गृहमंत्री अमित शाह यांची मोठी घोषणा*•••••••••••••••••••••••••••••••••••••2⃣ *सरकारची तिजोरी भरली, 10 ऑगस्टपर्यंत 6.53 लाख कोटी प्रत्यक्ष कर जमा, 15.7 टक्क्यांची भरघोस वाढ*•••••••••••••••••••••••••••••••••••••3⃣ *सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांना यंदा POP मूर्तीची मुभा, प्रतिज्ञापत्रातून 4 फूट उंचीची अट ही वगळली*•••••••••••••••••••••••••••••••••••••4⃣ *अखेर नवाब मलिकांना वैद्यकीय कारणास्तव जामीन मंजूर, सुप्रीम कोर्टाकडून मोठा दिलासा*•••••••••••••••••••••••••••••••••••••5⃣ *पुढील आठवडाही मान्सूनची विश्रांती, मध्य महाराष्ट्रासह पश्चिम आणि दक्षिण भारतात पावसाची शक्यता कमी*•••••••••••••••••••••••••••••••••••••6⃣ *सरकारकडून 2019 मध्ये जिल्हा परिषदेच्या भरतीसाठी विद्यार्थ्यांनी भरलेले शुल्क त्यांना परत मिळणार आहे.*•••••••••••••••••••••••••••••••••••••7⃣ *भारत आणि वेस्टइंडिज मधील पाच एकदिवसीय सामन्याच्या मालिकेतील चौथा सामना आज खेळला जाणार*•••••••••••••••••••••••••••••••••••••*📷 वृत्त संकलक - कुणाल पवारे 📹*📱9960358300•••••••••••••••••••••••••••••••••••••ही पोस्ट नियमित मिळविण्यासाठी आणि या समुहात add होण्यासाठी 9423625769 येथे संपर्क करावे.••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• 🌷🍃 *विशेष माहिती* 🌷🍃••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••*तुमच्या जिल्ह्याचं नाव कसं पडलं ?* महाराष्ट्रातील ३६ जिल्ह्याची वेग वेगळी अशी वैशिष्ट्ये आहे. *गोंदिया* महाराष्ट्रातील राज्याच्या शेवटच्या टोकावर वसलेल्या गोंदिया शहराला समृध्द असा ऐतिहासिक वारसा लाभलेला आहे. गोंड समाज हे येथील जुने रहिवासी आहेत. त्यांचा उद्योग डिंक (गोंद) आणि लाख आणून गावात विकण्याचा होता. त्यामुळे या जिल्ह्याचे नाव गोंदिया पडले आहे. गोंदिया शहर हे तांदळाचे शहर म्हणूनही ओळखले जाते.*संकलन*••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• 🌹 *" फ्रेश सुविचार "* 🌹••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••मनुष्य कसा मरतो ते महत्त्वाचे नाही; पण तो आपले जीवन कसे जगतो हे महत्त्वाचे आहे.➖ जाॕन्सन*संकलन :- प्रमिलाताई सेनकुडे, नांदेड**प्रा.शा. गोजेगाव ता.हदगाव, जि. नांदेड*📱9403046894••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• ❓ *आजची प्रश्नमंजुषा* ❓••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••१) अविश्वास प्रस्तावाला सर्वाधिक ( १५ वेळा ) सामोरे जाणारे पंतप्रधान कोण ?२) नरेंद्र मोदी सरकारविरोधात अविश्वास प्रस्ताव कोणी दाखल केला ?३) किमान किती खासदारांच्या पाठिंब्याने कोणताही खासदार मंत्रिपरिषदेविरोधात अविश्वास प्रस्ताव दाखल करू शकतो ?४) अविश्वास प्रस्ताव कोणत्या एकाच सभागृहात आणता येतो ?५) जगातील सर्वात मोठा राजकीय पक्ष कोणता ?*उत्तरे :-* १) इंदिरा गांधी २) काँग्रेस खासदार गौरव गोगोई ३) ५० खासदार ४) लोकसभा ५) भारतीय जनता पक्ष ( BJP )*संकलन :- जैपाल भै. ठाकूर*जि.प.व.प्राथ.शाळा भोसा, ता. आमगाव, जि. गोंदिया 📱9765943144••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎂 *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *◆|वा|ढ|दि|व|स|अ|भि|ष्ठ|चिं|त|न|◆* 👤 वसंत हंकारे, प्रसिद्ध वक्ते व प्रबोधनकार👤 पी. टी. लखमावाड, माजी गटशिक्षणाधिकारी, नांदेड👤 दीपक कोकरे👤 भीमा भंडारी👤 आशिष अग्रवाल👤 बालाजी घायाळ👤 पांडुरंग गायकवाड👤 रवीकुमार येळवीकर, नांदेड*ઉदंड_आયુષ્યાच्या अનંત_શુभेच्छा,* [ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा एक दिवस अगोदर 9423625769 येथे पोस्ट करावे. ]••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• ••• 💡 ‼ *मनाचे श्लोक*‼ 💡•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••मदें मत्सरें सांडिली स्वार्थबुद्धी। प्रपंचीक नाहीं जयातें उपाधी॥ सदा बोलणे नम्र वाचा सुवाचा। जगी धन्य तो दास सर्वोत्तमाचा॥५१॥।। जय जय रघुवीर समर्थ ।।••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🕊🌎 ‼ *विचारधारा*‼🕊🌎••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••काट्यांमधून फुले कसे फुलत असतात आणि फुलायचे कसे ते सर्वांना सांगून जातात त्या फुलांकडून शिकावे, खळखळून हसायचे कसे तान्ह्या बाळाकडून शिकावे, स्वतः तिन्ही कडक ऋतूत राहून सर्वांना प्राणवायू कशा प्रकारे दिल्या जाते त्या झाडांकडून शिकावे अशा बऱ्याच गोष्टी असतात त्यांना बोलता येत नाही तरीही जीवन कशाप्रकारे जगले पाहिजे ते प्रत्येक बोलत्या, चालत्या माणसाला सांगून जातात. आपण एकदा तरी त्यांच्याकडून शिकण्याचा प्रयत्न करून बघितले पाहिजे. आपले जीवन देखील त्या काट्यांनी भरलेल्या गुलाबा समान आहे.आपल्याला देखील काटेरी वाटेवरून जीवन जगायचे आहे.पण हे आपल्याला कधी समजणार आहे..?🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷सौ.संगीता संतोष ठलाल मु. कुरखेडा जि. गडचिरोली••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎭 *आजची फ्रेश बोधकथा* 🎭••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *कावळा आणि कोल्हा*एक कावळा, भाकरीचा मोठा तुकडा तोंडात धरून उडाला, तो एका उंच झाडावर जाऊन बसला. ते पाहून एक कोल्हा त्या झाडाखाली गेला आणि कावळ्याचा तोंडातला भाकरीचा तुकडा त्याला मिळावा म्हणून, कपटाने त्यांच्या सौंदर्याची तारीफ करू लगला; तो म्हणतो, ‘रे पक्ष्या, मी मी तुला खरेच सांगतो, तुझ्यासारखा देखणा पक्षी माझ्या पहाण्यात आजपर्यंत कधी आला नाही. तुझी पिसे काय सुंदर ! किती कोमल अहाहा ! तुझ्या शरीराचे तेज किती वर्णू ! तुझ्या अवयवांच्या ठेवणीकडे तर पहातच रहावे ! तुला इतके सर्व अनुकूल आहे, त्यावरून तुझा शब्दही तसाच चांगला असेल, असे मला वाटते. तो जर खरोखरच गोड असेल, तर मग तुझी बरोबरी कोण करणार आहे!’ ही स्तुती ऐकून आपण कोण, हे कावळा विसरला आणि अंमळ नटूनमुरडून मनात म्हणतो, ‘आपल्या स्वराच्या गोडपणाबद्दल यास शंका आहे, तेवढी काढून टाकावी.’ मग त्याने गाण्यास प्रारंभ केला ! तोंड उघडताच त्यात धरलेला भाकरीचा तुकडा खाली पडला, तो घेउन कोल्हा त्याच्या मूर्खपणास हसत हसत चालता झाला !•••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••या पोस्ट विषयी आपल्या सूचना, निवेदन, अभिप्राय, बातम्या, वाढदिवस, माहिती किंवा शंका 9423625769 येथे कळवावे. •••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••~~~~~~~~~~~~~~~~~~~*🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢*📱 9423625769~~~~~~~~~~~~~~~~~~~*🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏*पुन्हा भेटू या फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार ~~~~~~~~~~~~~~~~~~~
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment