✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट~~~~~~~~~~~~~~~~~~~ 6️⃣ 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 6️⃣ ( फ्रेश शालेय परिपाठ )🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00 ( रविवार आणि सुट्टी वगळून )~~~~~~~~~~~~~~~~~~~🎇 दिनांक :- 05 ऑगस्ट 2023💠 वार - शनिवार🌷🌐 . *दिनविशेष . 🌐* 🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••• *_ या वर्षातील २१७ वा दिवस आहे_* •••••••••••••••••••••••••••••••• *_महत्त्वाच्या घटना:_* ••••••••••••••••••••••••••••••*२०१६:ब्राझिलमधे रिओ-डी-जानिरो येथे ३१ व्या ऑलिम्पिक स्पर्धांना सुरुवात होणार आहे.**१९९७:रशियाच्या दोन अंतराळवीरांना घेऊन ’सोयूझ-यू’ हे अंतराळयान ’मीर’ अंतराळस्थानकाकडे रवाना**१९९७:फ्रेन्च खुल्या लॉनटेनिस स्पर्धेत मिश्र दुहेरी गटात विजेतेपद मिळवणार्या महेश भूपतीला क्रीडा खात्यातर्फे २ लाख रुपयांचा पुरस्कार जाहीर**१९९४:इंडियन नॅशनल सायन्स अॅकेडमी (INSA) तर्फे दिला जाणारा ’होमी जहांगीर भाभा पुरस्कार’ राष्ट्रीय पदार्थविज्ञान प्रयोगशाळेले (NPL) संचालक प्रा. इरोड सुब्रमणियन राजगोपाल यांना प्रदान**१९६५:पाकिस्तानी सैन्याने साध्या वेषात घुसखोरी केल्यामुळे भारत पाकिस्तान युद्धाला सुरूवात झाली.**१९६२:नेल्सन मंडेला यांना तुरुंगात टाकण्यात आले. यानंतर १९९० मधे त्यांची सुटका झाली.**१८६१:अमेरिकन सैन्यातील चाबकाचे फटके मारण्याची शिक्षा बंद करण्यात आली.* *_जन्मदिवस / जयंती / वाढदिवस:_* ••••••••••••••••••••••••••••••••• *१९७५:काजोल – प्रसिद्ध अभिनेत्री**१९६९:डी.के.शेख (दिलावर कादर शेख)-- कवी,संपादक* *१९६९:वेंकटेश प्रसाद – जलदगती गोलंदाज**१९५८:राजाराम गो.जाधव-- मंत्रालयातील निवृत्त अधिकारी तथा कवी,लेखक**१९५६:प्रा.डॉ.श्रृतिश्री बडगबाळकर-- प्रसिद्ध कवयित्री,लेखिका* *१९४९:प्रा.ज.रा. गवळीकर -- कवी* *१९३३:विजया राजाध्यक्ष – लेखिका व समीक्षिका, ७४ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षा**१९३०:नील आर्मस्ट्राँग – चंद्रावर पाऊल ठेवलेला पहिला मानव (मृत्यू:२५ ऑगस्ट २०१३)**१९२८:राघोबाजी वामनराव गाणार-- कथाकार* *१९२२:प्रा.भगवंत गोविंदराव देशमुख -- लेखक,संपादक* *१९२२:नरेश भिकाजी कवडी-- भाषातज्ञ, कथाकार, समीक्षक, ज्ञानेश्वरीचे चिकित्सक अभ्यासक आणि अनुवादक(मृत्यू:४ एप्रिल २०००)**१९१०:डॉ. रामचंद्र ज.जोशी-- लेखक* *१८९०:महामहोपाध्याय दत्तो वामन पोतदार – इतिहासकार, लेखक, वक्ते आणि पुणे विद्यापीठाचे कुलगुरू [१९६१-१९६४], टिळक महाराष्ट्र विद्यापीठाचे कुलगुरू [१९४८], पद्मविभूषण, मराठी शुद्धलेखन महामंडळाचे अध्यक्ष, प्राचीन मराठी इतिहास आणि मराठ्यांचा इतिहास यांचे व्यासंगी अभ्यासक (मृत्यू: ६ आक्टोबर १९७९)**१८६९:नारायण गोविंद ऊर्फ नानासाहेब चाफेकर-- ऐतिहासिक विषयावर लिहिणारे एक भाषातज्ज्ञ संशोधक लेखक, समीक्षक व कोशकार(मृत्यू:५ मार्च १९६८)**१८५८:वासुदेव वामन तथा ’वासुदेवशास्त्री’ खरे – इतिहासाचार्य, लेखक, नाटककार व कवी (मृत्यू: ११ जून १९२४)* *_मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन:_* •••••••••••••••••••••••••••••••••*२०२१:शांता दत्तात्रेय गणोरकर-- कवयित्री, लेखिका (जन्म:२४ मे १९२५)**२०२०:शिवाजीराव पाटील निलंगेकर- महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री(जन्म :९ फेब्रुवारी १९३१)* *२०१४: भारतीय-इंग्रजी इतिहासकार चापमॅन पिंचर यांचे निधन. (जन्म: २९ मार्च १९१४)**२००१:ज्योत्स्ना भोळे – संगीत रंगभूमीला नवचैतन्य देणार्या गायिका आणि अभिनेत्री. संगीत नाटक अकादमी पुरस्कार (१९७६), अनेक पुरस्कारांनी त्यांना गौरविण्यात आले.(जन्म:११ मे १९१४)**२०००:लाला अमरनाथ भारद्वाज – भारतीय क्रिकेटचे भीष्माचार्य, स्वतंत्र भारताच्या पहिल्या क्रिकेट संघाचे कर्णधार व स्वतंत्र भारताचे पहिले शतकवीर(मृत्यू:११ सप्टेंबर १९११)**१९९२:अच्युतराव पटवर्धन – स्वातंत्र्यसैनिक, ४२ च्या चळवळीतील अग्रणी नेते, भारतीय समाजवादी पक्षाचे एक संस्थापक, विचारवंत, तत्त्वचिंतक व सामाजिक कार्यकर्ते (जन्म:५ फेब्रुवारी १९०५)**१९८४:रिचर्ड बर्टन – अभिनेता (जन्म: १० नोव्हेंबर १९२५)**१९६२:अमेरिकन अभिनेत्री मेरिलीन मन्रो यांनी गोळी झाडुन घेऊन आत्महत्या केली. (जन्म:१ जून १९२६)* ~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~ *_दिनविशेष या सदरातील सर्व मुद्दे हे संग्रहात्मक आहेत तेव्हा त्यात चूका नसतीलच असे सांगता येणार नाही_* *✍ संकलन ✍* *श्रीराम चव्हाण माजी शिक्षणाधिकारी नागपूर*मोबाईल:9822695372 ईमेल: chavhansk65@gmail.com••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *✈ 🚀 गुगलयान ✈ 🚀*••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *दीर्घकथा - लक्ष्मी*मुलींच्या शिक्षणाचे महत्त्व सांगणारी कथा ज्यास फेसबुकवर अनेक वाचकांनी पसंती दर्शविलेली आहे. मला आशा आहे आपणांस ही कथा नक्की आवडेल. तेव्हा चला कथा वाचू या .....!दहावा भाग -------https://m.facebook.com/story.php?story_fbid=2911033175690104&id=100003503492582&mibextid=Nif5ozकथा आवडल्यास आपल्या प्रतिक्रिया अवश्य कळवा.~~~~~~~~~~~~~~~~~~~✍ स्तंभलेखक *नासा येवतीकर, धर्माबाद*9423625769~~~~~~~~~~~~~~~~~~~ 🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••1⃣ *शेतकऱ्यांना आता कमीत कमी एक हजार रुपये पीकविमा मिळणार, विमा कंपनीची रक्कम कमी असल्यास उर्वरित रक्कम राज्य सरकार देणार!*•••••••••••••••••••••••••••••••••••••2⃣ *बीड : नासाचा अभ्यास दौरा विद्यार्थ्यांसाठी, पण सोबत जाणार अधिकाऱ्यांचे कुटुंब ?; शासकीय पैशांची उधळपट्टी कशासाठी ?*•••••••••••••••••••••••••••••••••••••3⃣ *राहुल गांधींना पुन्हा खासदारकी बहाल केली जाणार, शिक्षेला सर्वोच्च न्यायालयाचा दिलासा*•••••••••••••••••••••••••••••••••••••4⃣ *मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाचे न्यायाधीश रोहित देव यांचा भर कोर्टरूमध्ये राजीनामा.*•••••••••••••••••••••••••••••••••••••5⃣ *नागपुरात भाज्यांपाठोपाठ मसालेही महागले, सर्वसामन्यांच्या खिशाला झळ*•••••••••••••••••••••••••••••••••••••6⃣ *भारताविरुद्धच्या टी-२० मालिकेसाठी आयर्लंडचा संघ जाहीर, जगविख्यात खेळाडूला कर्णधारपद*•••••••••••••••••••••••••••••••••••••7⃣ *भारताचा किशोरवयीन ग्रँडमास्टर डी गुकेश याने विश्वचषक बुद्धिबळ स्पर्धेच्या दुसऱ्या फेरीत अझरबैजानच्या मिसरतदीन इस्कांद्रोव्हला केले पराभूत*•••••••••••••••••••••••••••••••••••••*📷 वृत्त संकलक - कुणाल पवारे 📹*📱9960358300•••••••••••••••••••••••••••••••••••••ही पोस्ट नियमित मिळविण्यासाठी आणि या समुहात add होण्यासाठी 9423625769 येथे संपर्क करावे.••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• 🌷🍃 *विशेष माहिती* 🌷🍃••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••*तुमच्या जिल्ह्याचं नाव कसं पडलं ?* महाराष्ट्रातील ३६ जिल्ह्याची वेग वेगळी अशी वैशिष्ट्ये आहे. *औरंगाबाद* हा जिल्हा खाम नदीच्या काठी वसलेला आहे.आजच्या औरंगा बादचे नाव पूर्वी खडकी होते.व अ.नगरचा निजामशहा मूर्तझा व्दितीय याचा मंत्री मलिक अंबर याने हे शहर वसवले आहे. मलिक अंबरने या शहराचे नाव फतेहपूर असे ठेवले होते. पुढे औरंगजेब या सम्राटाच्या नावावरुन औरंगाबाद हे नाव त्याच्या मृत्यूनंतर ठेवण्यात आले.*संकलन*••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• 🌹 *" फ्रेश सुविचार "* 🌹••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••एकाग्र चित्ताने केलेल्या कोणत्याही कार्याचे फलित म्हणजे यश होय.*संकलन :- प्रमिलाताई सेनकुडे, नांदेड**प्रा.शा. गोजेगाव ता.हदगाव, जि. नांदेड*📱9403046894••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• ❓ *आजची प्रश्नमंजुषा* ❓••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••१) *निसर्गकवी, रानकवी* म्हणून कोणत्या कवीला ओळखले जाते ?२) कवी ना. धो. महानोर यांचे जन्मठिकाण कोणते ?३) कवी ना.धो. महानोर यांना पद्मश्री पुरस्काराने कोणत्या वर्षी गौरविण्यात आले ?४) पहिले जलसाहित्य संमेलन नागपूरचे संमेलनाध्यक्ष कोण होते ?५) अजिंठा, रानातल्या कविता, जगाला प्रेम अर्पावे, वही, पावसाळी कविता, गंगा वाहू दे निर्मळ या कविता संग्रहाचे कवी कोण ?*उत्तरे :-* १) ना. धो. महानोर २) पळसखेड, ता. सोयगाव, जि.छत्रपती संभाजीनगर ३) सन १९९१ ४) कवी ना.धो. महानोर ५) कवी ना. धो. महानोर*संकलन :- जैपाल भै. ठाकूर*जि.प.व.प्राथ.शाळा भोसा, ता. आमगाव, जि. गोंदिया 📱9765943144••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎂 *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *◆|वा|ढ|दि|व|स|अ|भि|ष्ठ|चिं|त|न|◆* 👤 श्रीराम पा. जगदंबे, सामाजिक कार्यकर्ते, धर्माबाद👤 किरण सोनकांबळे, पत्रकार, धर्माबाद👤 अभिनंदन प्रचंड, विषय शिक्षक, धर्माबाद👤 सय्यद जाफर👤 दत्तात्रय सितावार, कराटे टीचर, धर्माबाद👤 मनोज मानधनी, धर्माबाद👤 साईनाथ जायेवाड, येवती👤 विकी दिलीपराव जोंधळे👤 देवराव कोळवाड👤 शेख वाजीद👤 विकास कांबळे👤 साई राजू येळवी, तेलंगणा👤 चिं. प्रणव नागेंद्र येंबरवार👤 सौ. शिवराणी नागेंद्र येंबरवार, नांदेड*ઉदंड_आયુષ્યાच्या अનંત_શુभेच्छा,* [ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा एक दिवस अगोदर 9423625769 येथे पोस्ट करावे. ]••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• ••• 💡 ‼ *मनाचे श्लोक*‼ 💡•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••जयाचेनि संगे समाधान भंगे। अहंता अकस्मात येऊनि लागे॥ तये संगतीची जनीं कोण गोडी। जिये संगतीनें मती राम सोडी॥४५॥।। जय जय रघुवीर समर्थ ।।••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🕊🌎 ‼ *विचारधारा*‼🕊🌎••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••जन्माला येणे व एक दिवस हे, जग सोडून जाणे हा निसर्गाचा नियम आहे.या नैसर्गिक नियमात, कोणीही बदल करू शकत नाही. या नियमांचे प्रत्येकाने पालन करायला पाहिजे. आपण जगलो पाहिजे व इतरांनाही जगू दिले पाहिजे उगाचच कोणालाही बोलून कोणाचेही मन दुखावून त्यांना जिवंतपणी मारू नये.तसच इतरांचे बोलणे ऐकून जिवंतपणी आपणही आत्महत्या नये.🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷सौ.संगीता संतोष ठलाल मु. कुरखेडा जि. गडचिरोली••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎭 *आजची फ्रेश बोधकथा* 🎭••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *कावळा आणि कोल्हा*एका कावळ्याला एक छान चीजचा तुकडा मिळाला. तो आनंदाने झाडावर जाऊन खायला बसला. एका कोल्ह्याने हे पाहिले. कोल्हा उपाशी होता, कावळ्याच्या चोचीत तो चीजचा तुकडा पाहुन त्याच्या तोंडाला पाणी सुटले. तो झाडाखाली गेला आणि कावळ्याशी बोलायचं प्रयत्न करू लागला. त्याचे फार कौतुक करू लागला. तो म्हणाला “लोक उगीच त्या कोकिळेचं फारच कौतुक करतात बाबा. खरं तर तुझा आवाज सुद्धा किती मस्त आहे. पण लोकांना तुझी किंमतच नाही. मला मात्र तुझा आवाज फारच आवडतो. जरा गाऊन दाखव कि.” अशी मखलाशी ऐकुन कावळा खुश झाला आणि त्याने गायला तोंड उघडले. त्याने काव काव करताच तो तुकडा खाली पडला तो कोल्ह्याने पटकन झेलला आणि फस्त करून टाकला. कावळ्याची पुरती फजिती झाली.•••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••या पोस्ट विषयी आपल्या सूचना, निवेदन, अभिप्राय, बातम्या, वाढदिवस, माहिती किंवा शंका 9423625769 येथे कळवावे. •••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••~~~~~~~~~~~~~~~~~~~*🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢*📱 9423625769~~~~~~~~~~~~~~~~~~~*🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏*पुन्हा भेटू या फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार ~~~~~~~~~~~~~~~~~~~
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment