✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट~~~~~~~~~~~~~~~~~~~ 9️⃣ 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 9️⃣ ( फ्रेश शालेय परिपाठ )🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00 ( रविवार आणि सुट्टी वगळून )~~~~~~~~~~~~~~~~~~~🎇 दिनांक :- 17 ऑगस्ट 2023💠 वार - गुरुवार🌷🌐 . *दिनविशेष . 🌐* 🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *_ या वर्षातील २२८ वा दिवस आहे_* •••••••••••••••••••••••••••••••• *_महत्त्वाच्या घटना:_* •••••••••••••••••••••••••••••• *२०१०:जपानला मागे टाकुन चीन ही जगातली दुसर्या क्रमांकाची अर्थव्यवस्था बनली.**१९९४:बांगलादेशातील लेखिका तस्लिमा नसरीन यांना स्वीडीश पेन क्लबतर्फे ’कुर्ट टुचोलस्की साहित्य पुरस्कार’ जाहीर**१९६०:सायप्रसला (युनायटेड किंग्डमपासुन) स्वातंत्र्य मिळाले.**१९४६:कोलकात्यात वांशिक दंगल उसळुन ७२ तासात सुमारे ४,००० जण ठार झाले.**१९१३:स्त्रियांना प्रवेश देणारे तोहोकू विश्वविद्यालय हे जपानमधील पहिले विश्वविद्यालय बनले.* *_जन्मदिवस / जयंती / वाढदिवस:_* ••••••••••••••••••••••••••••••••• *१९८५:प्रा.सुरेश आडके -- कथा व कादंबरीकार लेखक**१९७८:संजय नाना गोरडे-- कवी,लेखक* *१९७२:संदीप बाळासाहेब वाकचौरे-- लेखक* *१९७०:मनीषा कोईराला – नेपाळी-भारतीय अभिनेत्री**१९७०:सैफ अली खान – अभिनेता**१९६७:नरेंद्र भगवंतराव नाईक-- प्रसिद्ध कादंबरीकार,कवी* *१९५९:मंगेश विश्वासराव-- जेष्ठ पत्रकार, मराठी साहित्यिक* *१९५८:मॅडोना – अमेरिकन गायिका, गीतलेखिका, अभिनेत्री, दिग्दर्शिका, निर्माती, नर्तिका आणि उद्योजिका**१९५७:रावसाहेब रामराव पाटील ऊर्फ आर.आर.पाटील- माजी उपमुख्यमंत्री म.रा( मृत्यू: १६ फेबुवारी २०१५)**१९५४:हेमलता – पार्श्वगायिका**१९५२:कीर्ती शिलेदार – गायिका व अभिनेत्री**१९५०:जेफ थॉमसन – ऑस्ट्रेलियन वेगवान गोलंदाज**१९४९:अच्युत वझे-- रंगकर्मी, लेखक* *१९४४:प्रा.तुकाराम पाटील-- प्रसिद्ध मराठी साहित्यिक* *१९३७:प्रा.आर.व्ही.मुदलियार -- लेखक**१९३४:विष्णुपंत गोपाळराव ब्रह्मनाथकर -- लेखक**१९३४:वसंत पेंढारकर-- जीवनाचे प्रतिबिंब असलेल्या कविता करणारे कवी (मृत्यू:३१ जुलै २००८)* *१९३२:नारायण आठवले-- मराठी भाषेतील पत्रकार, साहित्यिक, स्वातंत्र्यसैनिक आणि माजी खासदार(मृत्यू:२८ एप्रिल २०११)**१९२६: वसंत रामराव रत्नपारखी-- लेखक* *१९१३:मेनाकेम बेगीन – इस्त्रायलचे ६ वे पंतप्रधान व नोबेल पारितोषिकविजेते (मृत्यू:९ मार्च १९९२)**१९०४:सुभद्राकुमारी चौहान – हिन्दी कवयित्री (मृत्यू:१५ फेब्रुवारी १९४८)**१८७९:जगन्नाथ रघुनाथ आजगावकर – संतचरित्रकार, १९०७ ते १९३५ या काळात त्यांच्या 'महाराष्ट्र कविचरित्र’ या ग्रंथाचे नऊ खंड प्रकाशित झाले होते.(मृत्यू:२७ ऑगस्ट १९५५)* *_मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन:_* •••••••••••••••••••••••••••••••••*२०२०:चेतन चौहान-- माजी क्रिकेटर(जन्म:२१ जुलै १९४७)* *२०१८:अटलबिहारी वाजपेयी- माजी भारतीय पंतप्रधान आणि प्रसिद्ध हिंदी कवी, भारतरत्न(२०१४) (जन्म:२५ डिसेंबर १९२४)**२०१०:नारायण गंगाराम सुर्वे – प्रसिद्ध कवी पद्मश्री पुरस्काराने सन्मानित (जन्म:१५ आक्टोबर १९२६)**२०००:रेणू सलुजा – ’परिंदा’, ’धारावी, ’सरदार’ आणि ’गॉडमदर’ इ. चित्रपटांच्या संकलनासाठी चार वेळा राष्ट्रीय पुरस्कार विजेत्या चित्रपट संकलक (जन्म:५ जुलै १९५२)**१९९७:अनेक देशांत भारतीय संस्कृती व अध्यात्म यांचा प्रसार करणारे पं. वसंतशास्त्री विष्णुशास्त्री उर्फ आबाजी पणशीकर यांचे निधन**१९९७:नुसरत फतेह अली खान – कव्वालीला जागतिक परिमाण मिळवून देणारे पाकिस्तानी गायक (जन्म:१३ आक्टोबर १९४८)**१९७७:एल्व्हिस प्रिस्टले – अमेरिकन गायक, गिटारवादक, अभिनेता आणि ’किंग ऑफ द रॉक अँड रोल’ (जन्म:८ जानेवारी १९३५)**१७०५:जेकब बर्नोली – स्विस गणितज्ञ (जन्म:२७ डिसेंबर १६५४)*~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~ *_दिनविशेष या सदरातील सर्व मुद्दे हे संग्रहात्मक आहेत तेव्हा त्यात चूका नसतीलच असे सांगता येणार नाही_* *✍ संकलन ✍* *श्रीराम चव्हाण माजी शिक्षणाधिकारी नागपूर*मोबाईल:9822695372 ईमेल: chavhansk65@gmail.com••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *✈ 🚀 गुगलयान ✈ 🚀*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••श्रावणातील कविताश्रावणमासश्रावणमासीं हर्ष मानसीं, हिरवळ दाटे चोंहिकडे;क्षणांत येतें सरसर शिरवें, क्षणांत फिरुनी ऊन पडे.वरतीं बघता इंद्रधनूचा गोफ दुहेरी विणलासे, मंगल तोरण काय बांधिले नभोमंडपीं कुणी भासे!झालासा सूर्यास्त वाटतो, सांज अहाहा! तों उघडे;तरुशिखरांवर, उंच घरांवर पिवळें पिवळें ऊन पडे. उठती वरतीं जलदांवरती अनंत संध्याराग पहा;सर्व नभावर होय रेखिलें सुंदरतेचे रूप महा.बलाकमाला उडतां भासे कल्पसुमांची माळचि ते,उतरुनि येती अवनीवरतीं ग्रहगोलचि कीं एकमतें.फडफड करुनी भिजले अपुले पंख पाखरें सावरिती, सुंदर हरिणी हिरव्या कुरणीं निज बाळांसह बागडती.खिल्लारें हीं चरती रानीं, गोपहि गाणीं गात फिरे,मंजुळ पावा गाय तयाचा श्रावणमहिमा एकसुरें.सुवर्णचंपक फुलला, विपिनी रम्य केवडा दरवळला;पारिजातही बघतां भामा-रोष मनीचा मावळला!सुंदर परडी घेऊनी हाती पुरोपकंठी शुद्धमतीसुंदर बाला या फुलमाला रम्य फुलें-पत्री खुडती. देवदर्शना निघती ललना, हर्ष माइना हृदयांतवदनीं त्यांच्या वाचुनि घ्यावें श्रावण महिन्याचें गीत.- बालकवी (त्र्यंबक बापूजी ठोंबरे)संकलन~~~~~~~~~~~~~~~~~~~ 🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••1⃣ *पंतप्रधान नरेंद्र मोदीं यांनी लाल किल्ल्यावर केलेल्या घोषणाची कॅबिनेटमध्ये शिक्कामोर्तब; विश्वकर्मा योजना 17 सप्टेंबरपासून लागू होणार*•••••••••••••••••••••••••••••••••••••2⃣ *रेल्वेच्या 32 हजार कोटींच्या सात प्रकल्पांना केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजुरी*•••••••••••••••••••••••••••••••••••••3⃣ *मराठवाड्यावर दुष्काळाचे सावट; जायकवाडी धरणात केवळ 34 टक्के पाणीसाठा*•••••••••••••••••••••••••••••••••••••4⃣ *गडचिरोली आणि गोंदिया सारख्या नक्षलग्रस्त भागासाठी केंद्राची अभिनव योजना, 71 हजार कुटुंबीयांना मिळणार मोफत डीटीएच कनेक्शन*•••••••••••••••••••••••••••••••••••••5⃣ *केंद्र सरकारची मोठी भेट, पीएम ई-बस सेवेला मंजुरी; 10,000 बस चालवण्याची योजना*•••••••••••••••••••••••••••••••••••••6⃣ *राष्ट्रपती भवनातील अमृत उद्यान 16 ऑगस्टपासून महिनाभर पर्यटकांसाठी राहणार सुरू*•••••••••••••••••••••••••••••••••••••7⃣ *क्रिकेट चाहत्यांसाठी आनंदाची बातमी, श्रेयस अय्यर तंदुरुस्त, सराव सामन्यात घेतला भाग*•••••••••••••••••••••••••••••••••••••*📷 वृत्त संकलक - कुणाल पवारे 📹*📱9960358300•••••••••••••••••••••••••••••••••••••ही पोस्ट नियमित मिळविण्यासाठी आणि या समुहात add होण्यासाठी 9423625769 येथे संपर्क करावे.••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• 🌷🍃 *विशेष माहिती* 🌷🍃••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••*तुमच्या जिल्ह्याचं नाव कसं पडलं ?* महाराष्ट्रातील ३६ जिल्ह्याची वेग वेगळी अशी वैशिष्ट्ये आहे. *जळगाव* महाराष्ट्रातील जळगाव हा जिल्हा पूर्व खान्देश म्हणूनही ओळखला जातो. पूर्व खानदेश अस्तित्वात असलेला जिल्हा आजचा जळगाव जिल्हा बनला आहे.*संकलन*••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• 🌹 *" फ्रेश सुविचार "* 🌹••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••अहंकार माणसाला फुलवतो; परंतु त्याला कधीही आधार देत नाही.➖ रस्किन*संकलन :- प्रमिलाताई सेनकुडे, नांदेड**प्रा.शा. गोजेगाव ता.हदगाव, जि. नांदेड*📱9403046894••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• ❓ *आजची प्रश्नमंजुषा* ❓••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••१) जगात सर्वात जास्त अण्वस्त्रे कोणत्या देशाकडे आहेत ?२) भारताकडे एकूण किती अण्वस्त्रे आहेत ?३) पाकिस्तानकडे एकूण किती अण्वस्त्रे आहेत ?४) मानवी शरीरातील लाल रक्तकनिकांची निर्मिती कोठे होते ?५) राष्ट्रीय कन्या दिवस केव्हा साजरे केले जाते ?*उत्तरे :-* १) रशिया - ५८८९, अमेरिका - ५२४४, चीन - ४१० २) १६४ अण्वस्त्रे ३) १७० अण्वस्त्रे ४) अस्थिमज्जा ५) २४ जानेवारी*संकलन :- जैपाल भै. ठाकूर*जि.प.व.प्राथ.शाळा भोसा, ता. आमगाव, जि. गोंदिया 📱9765943144••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎂 *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *◆|वा|ढ|दि|व|स|अ|भि|ष्ठ|चिं|त|न|◆* 👤 बालाजी मदन इंगळे, साहित्यिक👤 मीना खोंड, साहित्यिक, हैद्राबाद👤 अरुणा राजीव भोसले, शिक्षिका, कोल्हापूर👤 राजेश कुंटुरकर, संचालक, नां.जि.म.बँक👤 रवींद्र धुप्पे, धर्माबाद👤 बालाजी बरडे, धर्माबाद👤 सचिन येडके, धर्माबाद*ઉदंड_आયુષ્યાच्या अનંત_શુभेच्छा,* [ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा एक दिवस अगोदर 9423625769 येथे पोस्ट करावे. ]••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• ••• 💡 ‼ *मनाचे श्लोक*‼ 💡•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••सदा सेवि आरण्य तारुण्यकाळीं। मिळेना कदा कल्पनेचेनि मेळी॥ चळेना मनीं निश्चयो दृढ ज्याचा। जगीं धन्य तो दास सर्वोत्तमाचा॥५४॥।। जय जय रघुवीर समर्थ ।।••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🕊🌎 ‼ *विचारधारा*‼🕊🌎••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••फायद्याची गोष्ट असेल तर तेथे मात्र अफाट गर्दी बघायला मिळत असते.पण,आपल्या सभोवती अडचणी असून सुद्धा त्यातून मार्ग काढण्यासाठी आपण वेळ काढत नाही व त्यातील एखादी व्यक्ती जेव्हा, पुढाकार घेऊन विचार मांडत असते त्यालाही आपण साथ देत नाही,उलट त्याला विरोध करणारे अनेक हाथ पुढे येतात. हे सत्य आहे सत्य काय यावर मात्र विचार करणारे फार कमी लोक असतात. मग अडचणी कमी होण्याऐवजी वाढत जातात अशा परिस्थितीत अडचणी दूर होतील.का..? म्हणून स्वतःचाच विचार करण्यापेक्षा इतरांच्या अडचणी जाणून त्यातून कशाप्रकारे मार्ग काढता येईल याचा विचार करायला पाहिजे.सकारात्मक कार्यासाठी थोडातरी वेळ काढायला पाहिजे. 🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷सौ.संगीता संतोष ठलाल मु. कुरखेडा जि. गडचिरोली••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎭 *आजची फ्रेश बोधकथा* 🎭••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *अकबर व बिरबल*अकबराने दरबारात एकदा एक प्रश्न विचारून सर्वांना कोड्यात टाकले. जेव्हा सगळे उत्तर शोधण्याचा प्रयत्न करीत होते, तेव्हा बिरबल आला आणि त्याने विचारले "हे काय प्रकरण आहे?" तेव्हा त्यांनी बिरबलाला प्रश्न सांगितला,"शहरात किती कावळे आहेत?" बिरबल हसला आणि अकबराकडे गेला, आणि घोषित केले की त्याच्या प्रश्नाचे उत्तर आहे,"एकवीस हजार पाचशे तेवीस" अकबराने बिरबलाला विचारले,"तुला उत्तर कसे ठाऊक?" बिरबलाने उत्तर दिले, "तुमच्या शिपायांना कावळे मोजण्यास सांगा, जर जास्त असतील तर कावळ्यांचे नातेवाईक शहराबाहेरून त्यांना भेटायला आले असतील आणि जर कमी असतील तर शहरातले कावळे नातेवाईकांना भेटायला शहराबाहेर गेले असतील." बिरबलाच्या उत्तरावर खूष होऊन अकबराने बिरबलाला गळ्यातील मोत्याची माळ भेट दिली. तात्पर्य : आपल्या उत्तरासाठी स्पष्टीकरण असणे हे उत्तराइतकंच महत्वाचे आहे.•••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••या पोस्ट विषयी आपल्या सूचना, निवेदन, अभिप्राय, बातम्या, वाढदिवस, माहिती किंवा शंका 9423625769 येथे कळवावे. •••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••~~~~~~~~~~~~~~~~~~~*🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢*📱 9423625769~~~~~~~~~~~~~~~~~~~*🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏*पुन्हा भेटू या फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार ~~~~~~~~~~~~~~~~~~~
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment