✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट~~~~~~~~~~~~~~~~~~~ 6️⃣ 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 6️⃣ ( फ्रेश शालेय परिपाठ )🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00 ( रविवार आणि सुट्टी वगळून )~~~~~~~~~~~~~~~~~~~🎇 दिनांक :- 11 ऑगस्ट 2023💠 वार - शुक्रवार🌷🌐 . *दिनविशेष . 🌐* 🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *_ या वर्षातील २२३ वा दिवस आहे_* •••••••••••••••••••••••••••••••• *_महत्त्वाच्या घटना:_* •••••••••••••••••••••••••••••• *२०१३:डॉ.सुब्रम्हण्यम स्वामी यांच्या जनता पक्षाचे भारतीय जनता पक्षात विलीनीकरण झाले.**१९९९:बारा वर्षाखालील मुलांच्या राज्यस्तरीय जलद बुद्धीबळ स्पर्धेत नवी दिल्ली येथील सहा वर्षे वयाच्या परिमार्जन नेगी याने विजेतेपद पटकावले. ही स्पर्धा जिंकणारा आजवरचा तो सर्वात छोटा खेळाडू आहे.**१९९९:शतकातील शेवटचे खग्रास सूर्यग्रहण झाले.**१९९४:अफ्रिकन नॅशनल काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्या व डॉ. नेल्सन मंडेला यांच्या निकटवर्ती सहकारी डॉ.फातिमा मीर यांना ’विश्वगुर्जरी पुरस्कार’ जाहीर**१९८७:'युनायटेड स्टेट्स फेडरल रिझर्व्ह’ च्या अध्यक्षपदी अॅलन ग्रीनस्पॅन यांची निवड झाली.**१९७९: गुजरातेतील मोर्वी येथे धरण फुटून हजारो लोक मृत्यूमुखी पडले.**१९६१:दादरा व नगर हवेली हा भाग भारताचा केन्द्रशासित प्रदेश बनला.**१९६०:चाडला (फ्रान्सपासुन) स्वातंत्र्य मिळाले.**१९५२:हुसेन बिन तलाल जॉर्डनचे राजे बनले.**१९४३:सी.डी.देशमुख हे ’रिझर्व्ह बँक ऑफ इंडीया’चे पहिले भारतीय गव्हर्नर झाले.**१८७७:अमेरिकन खगोलशास्त्रज्ञ हॉल यांनी मंगळाच्या फोबॉस व डिमॉस या चंद्रांचा शोध लावला.* *_जन्मदिवस / जयंती / वाढदिवस:_* ••••••••••••••••••••••••••••••••• *१९८२:माणिक उत्तमराव सोनवणे -- कवी* *१९८२:सारंग साठ्ये --अभिनेता,दिग्दर्शक, निर्माता,'भाडिपा'चा संस्थापक**१९८१:शितल कृष्णानंद राऊत-- कवयित्री**१९७४:अंजू जैन --महिला क्रिकेटपटू**१९६७:अशोक लक्ष्मण कुमावत-- कवी* *१९५८:गीता हरिभाऊ गद्रे-- कवयित्री, लेखिका* *१९५४:यशपाल शर्मा – क्रिकेटपटू(मृत्यू:१३ जुलै २०२१)**१९५२:बंडा जोशी-- सुप्रसिद्ध एकपात्री कलाकार,आकाशवाणी निवेदकआणि ख्यातनाम हास्यकवी**१९४८:डॉ.प्रभा देशपांडे --कवयित्री,लेखिका* *१९३५:सदाशिव जनार्धन कोडोलीकर-- लेखक* *१९२८:विनायक सदाशिव तथा वि.स. वाळिंबे –विचारवंत पत्रकार,अभ्यासू संपादक, सुप्रसिद्ध कादंबरीकार(मृत्यू:२२ फेब्रुवारी २०००)**१९२८:मीरJा निमकर-- कादंबरी लेखिका**१९२८:रामाश्रेय झा – संगीतकार, वादक व शास्त्रीय संगीतातील विद्वान(मृत्यू:१ जानेवारी २००९)**१९२२:शंकर विनायक कुलकर्णी-- लेखक* *१९२०:नागेश शिवलिंगआप्पा मोगलाईकर-- कवी,लेखक* *१९११:प्रेम भाटिया – पत्रकार, संपादक, राजकीय विश्लेषक आणि मुत्सद्दी (मृत्यू: ८ मे १९९५)**१९१०:वासुदेव बळवंत गोगटे --लेखक आत्मचरित्रकार (मृत्यू:२४ नोव्हेंबर १९७४)**१८९७:एनिड ब्लायटन – बालसाहित्यासाठी प्रसिद्ध असलेल्या इंग्लिश लेखिका (मृत्यू: २८ नोव्हेंबर १९६८)* *_मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन:_* ••••••••••••••••••••••••••••••••• *२०१५:भालचंद्र व्यंकटेश पेंढारकर ऊर्फ अण्णा पेंढारकर -- मराठी रंगभूमीवरील एक श्रेष्ठ नाट्य-अभिनेते,दिग्दर्शक,नाट्य-निर्माते आणि नेपथ्यकार(जन्म:२५ नोव्हेंबर १९२१)**२०११:विनायक रामचंद्र आठवले-- हिंदुस्तानी संगीतशैलीतील मराठी गायक(जन्म:२० डिसेंबर १९१८)**२००४:आबाजी नारायण पेडणेकर-- मराठी साहित्यातील सुप्रसिद्ध कथाकार,कवी, समीक्षक आणि भाषांतरकार(जन्म:२० फेब्रुवारी १९२८)* *२००३:अर्मांड बोरेल – स्विस गणितज्ञ (जन्म: २१ मे १९२३)**२०००:पी. जयराज – मूकपटांच्या जमान्यापासून हिन्दी चित्रपटसृष्टीचे साक्षीदार असलेले दादासाहेब फाळके पुरस्कार विजेते (१९८०) अभिनेते (जन्म: २८ सप्टेंबर १९०९)**१९९९:रामनाथ पारकर – क्रिकेटपटू (जन्म:३१ आक्टोबर १९४६)**१९७०:इरावती कर्वे – साहित्य अकादमी व महाराष्ट्र शासन पुरस्कार विजेत्या मानववंशशास्त्रज्ञ, समाजशास्त्रज्ञ व शिक्षणतज्ञ (जन्म:१५ डिसेंबर १९०५)**१९६७:म.म.बाळशास्त्री हरदास-- ज्ञानक्षेत्रातील भाष्यकार (जन्म:३०ऑगस्ट१९१८)* *१९०८:खुदिराम बोस – क्रांतिकारक (जन्म: ३ डिसेंबर १८८९)*~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~ *_दिनविशेष या सदरातील सर्व मुद्दे हे संग्रहात्मक आहेत तेव्हा त्यात चूका नसतीलच असे सांगता येणार नाही_* *✍ संकलन ✍* *श्रीराम चव्हाण माजी शिक्षणाधिकारी नागपूर*मोबाईल:9822695372 ईमेल: chavhansk65@gmail.com••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *✈ 🚀 गुगलयान ✈ 🚀*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••भारतीय स्वातंत्र्यलढ्यात महिलांचे योगदान *कॅप्टन लक्ष्मी सहगल*नेताजी सुभाष चंद्र बोस यांनी ज्या आझाद हिंद फौजेची स्थापना केली, त्यातील स्त्रियांच्या तुकडीचे नेतृत्व कॅप्टन लक्ष्मी सहगल यांनी केलं.आझाद हिंद सेनेबरोबर काम करताना लक्ष्मी सहगल यांनी हेच दाखवून दिलं की, अहिंसक मार्गाने होणारे आंदोलन असो किंवा लढाई करण्याची वेळ येवो, महिला कुठेही मागे नाहीत.आझाद हिंद सेनेत जाण्यापूर्वी देखील त्यांनी दुसऱ्या महायुद्धात सहभाग घेतला होता, त्यासाठी त्यांना ब्रह्मदेशात तुरुंगवासही भोगावा लागला होता.संकलन~~~~~~~~~~~~~~~~~~~ 🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••1⃣ *मणिपूरमध्ये लवकरच शांतीचा सूर्य उगवेल, मणिपूरवासियांच्या मागे देश ठामपणे उभा; नरेंद्र मोदींचा विश्वास*•••••••••••••••••••••••••••••••••••••2⃣ *केंद्रीय निवडणूक आयुक्तांच्या निवड समितीत बदल, सरन्यायाधीशांऐवजी ज्येष्ठ कॅबिनेट मंत्र्याचा समावेश, तीन सदस्यांच्या समितीत सत्ताधाऱ्याचं बहुमत*•••••••••••••••••••••••••••••••••••••3⃣ *विद्यार्थ्यांच्या शिष्यवृत्तीच्या संख्येमध्ये मोठी घट, बार्टीकडून 861 ऐवजी 200 तर सारथीच्या 600 ऐवजी 50 मुलांनाच शिष्यवृत्ती*•••••••••••••••••••••••••••••••••••••4⃣ *संसदेत IIM Mumbai बिल पास, या वर्षीच्या NITIE च्या सर्व मुलांना आयआयएम मुंबईचे सर्टिफिकेट*•••••••••••••••••••••••••••••••••••••5⃣ *ऐन गणपतीच्या तोंडावर एसटी कर्मचाऱ्यांचा संपावर जाण्याचा इशारा; प्रलंबित आर्थिक मुद्द्यांवरून एसटी कर्मचारी आक्रमक, 11 सप्टेंबरला उपोषणाचा इशारा*•••••••••••••••••••••••••••••••••••••6⃣ *गृहिणींचे बजेट कोलमडणार! सर्व डाळींच्या उत्पादनांत यंदा मोठी घट, डाळींच्या किमतीत मोठी वाढ होण्याची शक्यता*•••••••••••••••••••••••••••••••••••••7⃣ *आशिया चषक हॉकी स्पर्धेत भारतीय हॉकी संघाचा पाकिस्तानवर दणदणीत विजय, हरमनप्रीत सिंगची चमकदार कामगिरी; पाकिस्तान स्पर्धेतून बाहेर*•••••••••••••••••••••••••••••••••••••*📷 वृत्त संकलक - कुणाल पवारे 📹*📱9960358300•••••••••••••••••••••••••••••••••••••ही पोस्ट नियमित मिळविण्यासाठी आणि या समुहात add होण्यासाठी 9423625769 येथे संपर्क करावे.••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• 🌷🍃 *विशेष माहिती* 🌷🍃••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••*तुमच्या जिल्ह्याचं नाव कसं पडलं ?* महाराष्ट्रातील ३६ जिल्ह्याची वेग वेगळी अशी वैशिष्ट्ये आहे. *धुळे* महाराष्ट्रातील धुळे जिल्हा हा पूर्वी पश्चिम खान्देश जिल्हा म्हणून ओळखला जात होता. तसेच गुजरातचा सुलतान पहिला अहमद यांने फारुकी राजांना खान ही पदवी दिलेली होती व त्यावरुन साजेशे खान्देश असे याचे नाव करण्यात आले. त्यांनतर हा जिल्हा धुळे या नावाने प्रचलित झाला.*संकलन*••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• 🌹 *" फ्रेश सुविचार "* 🌹••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••चारित्र्याचा विकास सुसंगतीने होतो तर, बुद्धीचा विकास एकांतात होतो.*संकलन :- प्रमिलाताई सेनकुडे, नांदेड**प्रा.शा. गोजेगाव ता.हदगाव, जि. नांदेड*📱9403046894••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• ❓ *आजची प्रश्नमंजुषा* ❓••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••१) जगातील सर्वाधिक वजनाचे कुलूप कोठे लावण्यात येणार आहे ?२) जगातील सर्वाधिक वजनाच्या कुलुपाची लांबी, रुंदी, जाडी किती ?३) जगातील सर्वाधिक वजनाचे कुलूप बनविणारे कारागीर कोण ?४) अयोध्या येथील राम मंदिराला किती वजनाचे कुलूप लागणार आहे ?५) ४०० किलो वजनाच्या कुलूपाची चाबीचा वजन किती आहे ?*उत्तरे :-* १) राम मंदिर, अयोध्या २) १० फूट उंच, ४.५ फूट रूंद, ९.५ इंच जाडी ३) प्रकाश शर्मा, अलिगड ४) ४०० किलो ५) अर्धा किलो ( ४ फूट उंच )*संकलन :- जैपाल भै. ठाकूर*जि.प.व.प्राथ.शाळा भोसा, ता. आमगाव, जि. गोंदिया 📱9765943144••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎂 *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *◆|वा|ढ|दि|व|स|अ|भि|ष्ठ|चिं|त|न|◆* 👤 सतीश सोनवणे, संपादक, नांदेड👤 निळकंठ चोंडे, शिक्षक नेते, नांदेड👤 उमेश खोसे, राष्ट्रपती पुरस्कार प्राप्त शिक्षक, उस्मानाबाद👤 दत्ताहरी पाटील पवार👤 ओमप्रकाश कहाळेकर👤 साईप्रसाद मठपती👤 भास्कर कुमारे, पांगरी👤 विशाल ढगे👤 आशिष देशपांडे, पत्रकार, नांदेड👤 लोकडोबा कौठवाड👤 याहीया खान पठाण, संपादक, धर्माबाद👤 शरद सूत्रावे*ઉदंड_आયુષ્યાच्या अનંત_શુभेच्छा,* [ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा एक दिवस अगोदर 9423625769 येथे पोस्ट करावे. ]••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• ••• 💡 ‼ *मनाचे श्लोक*‼ 💡•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••नसे अंतरी काम नानाविकारी। उदासीन जो तापसी ब्रह्मचारी॥ निवाला मनीं लेश नाही तमाचा। जगी धन्य तो दास सर्वोत्तमाचा॥५०॥।। जय जय रघुवीर समर्थ ।।••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🕊🌎 ‼ *विचारधारा*‼🕊🌎••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••प्रत्येक वेळी, प्रत्येक गोष्टी आपल्या मनासारखे घडून येतील असेही नाही. कारण, काही गोष्टी शिकण्यासाठी खूप काही सहन करावा लागतो एवढेच नाही तर..त्याग सुद्धा करावा लागतो. म्हणून जीवन जगत असतांना दु:खी न होता सदैव प्रयत्न करत रहावे व प्रसन्न मनाने रहावे.योग्य वेळ आल्यावर आपोआप सर्व गोष्टी बघायला मिळत असतात. 🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷सौ.संगीता संतोष ठलाल मु. कुरखेडा जि. गडचिरोली••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎭 *आजची फ्रेश बोधकथा* 🎭••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *सुयाचे झाड*एकदा दोन भाऊ जंगलकिनारी रहात होते. मोठा भाऊ त्याच्या लहान भावासोबत खूप स्वार्थी वृत्तीने वागत असे. लहान भावाचे सगळे जेवण खाऊन टाकत असे आणि त्याच्या सगळ्या चांगल्या वस्तू, कपडे घेत असे. एकदा मोठा भाऊ जंगलात लाकूड गोळा करण्यासाठी गेला. एकामागून एक अशा झाडांच्या फांद्या तोडत असताना तो एका जादुई झाडाजवळ पोहोचला. झाड त्याला म्हणाले,"महोदय, कृपा करून माझ्या फांद्या तोडू नका, जर तुम्ही मला सोडून दिले तर मी तुम्हाला सोन्याची सफरचंदे देईन" मोठा भाऊ तयार झाला, पण सफरचंदाची संख्या पाहून निराश झाला. लोभाने त्याचा ताबा घेतला आणि त्याने झाडाला धमकी दिली की, "जर मला जास्त सफरचंद मिळाली नाहीत तर खोड कापून टाकीन.” झाडाने सफरचंदे तर दिली नाहीतच पण त्याच्यावर शेकडो सुयांचा वर्षाव केला. मोठा भाऊ वेदनेने विव्हळत होता. सूर्य अस्तास निघाला होता. लहान भावाला काळजी वाटली, तो मोठ्या भावाच्या शोधात निघाला. शेकडो सुया शरीरात घुसलेल्या तो अवस्थेत सापडला. लहान भाऊ त्याच्या मोठया भावाकडे धावत गेला, आणि दुःखद अंतःकरणाने त्याने प्रत्येक सुई काढली. सुया काढून झाल्यावर मोठ्या भावाने वाईट वर्तणुकीबद्दल बद्दल त्याची माफी मागितली. आणि इथून पुढे चांगला वागीन असे वचनही दिले. झाडाने मोठ्या भावात झालेला बदल पाहून त्यांना भरपूर सोनेरी सफरचंदे दिली. तात्पर्य : दयाळू आणि कृपाळू असणे महत्वाचे आहे कारण ते नेहमीच बक्षिसपात्र ठरते.•••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••या पोस्ट विषयी आपल्या सूचना, निवेदन, अभिप्राय, बातम्या, वाढदिवस, माहिती किंवा शंका 9423625769 येथे कळवावे. •••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••~~~~~~~~~~~~~~~~~~~*🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢*📱 9423625769~~~~~~~~~~~~~~~~~~~*🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏*पुन्हा भेटू या फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार ~~~~~~~~~~~~~~~~~~~
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment