✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट~~~~~~~~~~~~~~~~~~~ 9️⃣ 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 9️⃣ ( फ्रेश शालेय परिपाठ )🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00 ( रविवार आणि सुट्टी वगळून )~~~~~~~~~~~~~~~~~~~🎇 दिनांक :- 02 नोव्हेंबर 2023💠 वार - गुरुवार••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🌷🌐 . *दिनविशेष . 🌐* 🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••*_ या वर्षातील ३०६ वा दिवस आहे_* •••••••••••••••••••••••••••••••• *_महत्त्वाच्या घटना:_* •••••••••••••••••••••••••••••••• *१९९९:दाक्षिणात्य पार्श्वगायक एस.पी. बालसुब्रम्हण्यम यांची मध्यप्रदेश सरकारतर्फे दिल्या जाणार्या लता मंगेशकर पुरस्कारासाठी निवड. सुगम संगीतातील असाधारण कामगिरीसाठी हा पुरस्कार दिला जातो.**१९४०:दुसरे महायुद्ध – ग्रीस व ईटली यांच्यात युद्ध सुरू झाले.**१९१४:रशियाने ओट्टोमान साम्राज्याविरुद्ध युद्ध पुकारले.* *_जन्मदिवस / जयंती / वाढदिवस:_* ••••••••••••••••••••••••••••••••••••••*१९८१:ईशा देओल-- भारतीय अभिनेत्री**१९७८:डॉ.विशाल इंगोले-- प्रसिद्ध कवी* *१९७५:दिपाली मुकुंद दातार-- कवयित्री, लेखिका**१९७४:डॉ.ज्योती कदम-- कवयित्री,लेखिका**१९६५:अरुण कदम-- मराठी अभिनेता**१९६५:शाहरुख खान – प्रसिद्ध अभिनेता व निर्माता**१९६२:मोहन मु. कुलकर्णी -- कवी* *१९६०:अनु मलिक – प्रसिद्ध संगीतकार**१९६०:प्रा.डॉ.अलका अविनाश बडगे -- लेखिका* *१९५८:विद्या भालचंद्र साताळकर-- कवयित्री,लेखिका**१९५८:कविता अरुण भालेराव-- प्रसिद्ध लेखिका**१९५८:डॉ.विद्याधर सीताराम करंदीकर -- कवी,बालनाटककार,मराठी आणि संस्कृत भाषेचे ते जाणकार(मृत्यू:१ आक्टोबर २०१६)**१९५२:प्रा.जैमिनी भाऊराव कडू-- पत्रकार व साहित्यिक (मृत्यू:१७ मार्च २०१८)**१९४६:जयश्री रमेश कुलकर्णी(देशमुख ) -- लेखिका**१९४१:सुभाष भालचंद्र देशपांडे--कथा व नाट्य लेखन**१९४१:अरुण शौरी –माजी केन्द्रीय मंत्री,पत्रकार व लेखक**१९३५:शशिकला चंद्रकांत मेहता-- लेखिका**१९२१:रघूवीर दाते – ध्वनीमुद्रणतज्ञ,हिन्दी, मराठी,गुजराती आणि उडिया भाषांतील सुमारे चाळीस चित्रपटांचे ध्वनीमुद्रण त्यांनी केले.* *१९१९:आशा श्रीराम परचुरे -- कथा,नाटक, एकांकिकेचे लेखन* *१८९७:सोहराब मेहेरबानजी मोदी – चित्रपट निर्माते,दिग्दर्शक व अभिनेते,दादासाहेब फाळके पुरस्काराने सन्मानित (१९७९), (मृत्यू:२८ जानेवारी १९८४)**१८८६:धीरेंद्रनाथ दत्ता – बांगलादेशी राजकारणी (मृत्यू:२९ मार्च १९७१)**१८८२:डॉ.के.बी.लेले – महाराष्ट्रातील जादूगारांचे आचार्य (मृत्यू: २ मे १९६३)**१८७३:अप्पाशास्त्री सदाशिवशास्त्री राशिवडेकर--आद्य संस्कृत वृत्तपत्रकार(मृत्यू:२५ ऑक्टोबर १९१३)**१८७१:काशीनाथ रघुनाथ मित्र (आजगावकर)-- मराठी लेखक,बंगाली साहित्याचे मराठी अनुवादक (मृत्यू: १९२०)**१८३३:महेन्द्र लाल सरकार – होमिओपॅथ, समाजसुधारक व विज्ञानप्रसारक, (मृत्यू:२३ फेब्रुवारी १९०४)* *_मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन:_* ••••••••••••••••••••••••••••••••••••••*२०१५:टॉमी ओव्हरस्ट्रीट-- अमेरिकन गायक-गीतकार आणि गिटार वादक (जन्म:१९३७)**२०१२:येरेन नायडू –तेलगु देसम पक्षाचे लोकसभेतील नेते(जन्म:२३ फेब्रुवारी १९५७)**१९९०:भालचंद्र दिगंबर तथा आबासाहेब गरवारे – प्लॅस्टिक व नायलॉन उद्योगाचे जनक, महाराष्ट्राच्या औद्योगिक विकासातील एक प्रमुख शिल्पकार,पद्मभूषण,डि. लिट.(पुणे विद्यापीठ),उद्योजक(जन्म:२१ डिसेंबर १९०३)* *१९५०:जॉर्ज बर्नार्ड शॉ – नोबेल पारितोषिक विजेते आयरिश लेखक आणि लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्सचे (LSE) सहसंस्थापक (जन्म:२६ जुलै १८५६)**१८८५:बळवंत पांडुरंग तथा ’अण्णासाहेब’ किर्लोस्कर–नाटककार (जन्म:३१ मार्च १८४३)*~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~ *_दिनविशेष या सदरातील सर्व मुद्दे हे संग्रहात्मक आहेत तेव्हा त्यात चूका नसतीलच असे सांगता येणार नाही_* *✍ संकलन ✍* *श्रीराम चव्हाण माजी शिक्षणाधिकारी,नागपूर*मोबाईल:9822695372 ईमेल: chavhansk65@gmail.com••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *✈ 🚀 गुगलयान ✈ 🚀*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••*महाराष्ट्रातील संतांची माहिती*.... संत गोरा कुंभार ....संत गोरा कुंभार हे महाराष्ट्रातील वारकरी संप्रदायातील संत होते. ते संत नामदेव व संत ज्ञानेश्वरांचे समकालीन मानले जातात. संत गोरा कुंभार यांनी अनेक अभंग लिहिले आहेत. गोरा कुंभार हे विठ्ठलाचे मोठे भक्त होते.त्यांनी चैत्र कृष्ण त्रयोदशी, शके १२३९ (२० एप्रिल १३१७) रोजी समाधी घेतली. गोरा कुंभार यांना गोरोबा काका म्हणत. त्यांची समाधी समजले जाणारे संत गोरोबा काका मंदिर उस्मानाबाद जिल्ह्यात तेर नावाच्या गावी आहे. याशिवाय महाराष्ट्रात अनेक ठिकाणी संत गोरोबा काका यांची मंदिरे आहेत.“तेर" नगरीत गोराबा काका यांच्या घराण्याची परंपरा धार्मिक वृत्तीची व सदाचारी वृत्तीची होती. “तेर" येथील 'काळेश्वर’ या ग्रामदैवतांचे त्यांचे घराणे उपासक होते. दोघे नवराबायको कुंभारकाम व काबाडकष्ट करून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करीत होते. सदाचारी, सच्छिल वृत्तीमुळे तेर गावात माधव बुवांना संत म्हणून गावकरी ओळखत होते. माधवबुवांना आठ मुले झाली होती. त्यांना झालेली मुले जगत नव्हती. त्यांनी आपली ८ ही मुले काळेश्वराजवळील स्मशानातील गोरीत पुरली होती. माधवबुवा धार्मिक व सहिष्णु वृत्तीचे होते. काळेश्वरावर त्यांची निस्सीम श्रद्धा व भक्ती होती. सात मुले एका मागोमाग गेली परंतु आठवा मुलगा गोरोबा जिवंत राहिलेसंत गोरा कुंभार हे महाराष्ट्रातील वारकरी संप्रदायातील एक थोर संत होते. पांडुरंगाचे निस्सीम भक्त असलेल्या गोरोबा काकांचे वीस अभंग आज आपल्याला पहायला मिळतात. संत मंडळींमध्ये संत गोरोबा काका हे ‘वडील’ होते, संत महात्म्यांना ते परम वंदनीय आणि आदरणीय होते. त्यामुळे सर्व संतांनी त्यांना “काका” ही उपाधी बहाल केली होती. गोरोबा काका हे विरागी पुरुष म्हणून ओळखले गेले, निर्गुण निराकार परब्रम्हाचे लौकिक रूप म्हणजे संत गोरा कुंभार. स्वतःचा परंपरागत कुंभार व्यवसाय करीत प्रपंच सांभाळून,संतत्व जपत त्यांनी भागवत धर्माचा प्रसार केला. आलेला दिवस परमेश्वराला स्मरून सार्थकी लावणारा खरा वारकरी असल्याची त्यांची धारणा होती.संकलन - नासा येवतीकर~~~~~~~~~~~~~~~~~~~ 🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••1⃣ *मराठा आरक्षण मिळेपर्यंत पाण्याला हात लावणार नाही :जरांगे पाटलांचा एल्गार, म्हणाले, सरकारविरोधात जनतेत रोष*•••••••••••••••••••••••••••••••••••••2⃣ *छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात 48 तासांसाठी इंटरनेट सेवा बंद, जिल्हा प्रशासनाचे आदेश*•••••••••••••••••••••••••••••••••••••3⃣ *1 नोव्हेंबर 2023 पासून अधिकृतपणे 19 किलेग्राम वजनाच्या व्यावसायिक एलपीजीच्या दरांत 101.50 रुपयांची वाढ*•••••••••••••••••••••••••••••••••••••4⃣ *देशाच्या तिजोरीत जीएसटी करातून 1.72 लाख कोटींची भर; महाराष्ट्रातून सर्वाधिक कर*•••••••••••••••••••••••••••••••••••••5⃣ *महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने दहावी आणि बारावीच्या परीक्षांच्या तारखा केल्या जाहीर, बारावीची परीक्षा २१ फेब्रुवारी २०२४ रोजी तर दहावीची परीक्षा १ मार्च २०२४ रोजी सुरू होणार*•••••••••••••••••••••••••••••••••••••6⃣ *मुंबईच्या वानखेडे स्टेडियम मध्ये विक्रमादित्य सचिन तेंडुलकर यांच्या पुतळ्याचं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत अनावरण*•••••••••••••••••••••••••••••••••••••7⃣ *World Cup 2023 - पुण्यात खेळलेल्या सामन्यात दक्षिण आफ्रिकेने न्यूझीलंडला 190 धावानी हरविले*•••••••••••••••••••••••••••••••••••••*📷 वृत्त संकलक - कुणाल पवारे 📹*📱9960358300•••••••••••••••••••••••••••••••••••••ही पोस्ट नियमित मिळविण्यासाठी आणि या समुहात add होण्यासाठी 9423625769 येथे संपर्क करावे.••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• 🌷🍃 *विशेष माहिती* 🌷🍃••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••*बळवंत पांडुरंग किर्लोस्कर* बळवंत पांडुरंग किर्लोस्कर यांचा जन्म 31 मार्च 1843 साली धारवाड जिल्ह्यातील गुलहोसुर या गावी झाला.त्यांचे शिक्षण धारवाड,कोल्हापूर,पुणे येथे झाले.लहानपणापासून त्यांना कविता करण्याचा छंद होता.पुण्यात असतांना त्यांनी एक नाटक कंपनी काढली.पुढे काही काळ त्यांनी नाटक कंपनी चा नाद सोडला. बेळगावात आण्णा साहेबांनी काही दिवस शिक्षक म्हणून काम केले.पोलीस खात्यातही त्यांनी नोकरी केली.1880 साली पुण्यात एक पारशी कंपनी चे नाटक पाहून त्यांचे नाटक प्रेम जागृत झाले.त्यांनी कालिदासाच्या संस्कृत शाकुंतल या नाटकाचे मराठीत भाषांतर केले आणि ते रंगभूमी वर आणले.31 ऑक्टोबर 1880 रोजी संगीत शाकुंतल या नाटकाचा पहिला प्रयोग पुणे येथील आनंद या नाट्यगृहात झाला.ज्याला आधुनिक अर्थांने नाटक म्हणता येईल असा नाट्यप्रयोग मराठी रंगभूमीवर प्रथमच झाला.अण्णासाहेबांनी सर्व पात्रांचे संभाषण व पदानसह संपूर्ण नाटक आधी लिहून काढले.त्याप्रमाणे भाषणे बोलून व अभिनय करून अनेकवेळा तालिमी घेतल्या व परिपूर्ण अवस्थेत नाटक सादर केले.लोकांना हा प्रकार नवीन होता.या नाटकास उत्तम यश व लोकप्रियता मिळाली.पुढे आण्णासाहेबांनी सौभद्र हे पौराणिक नाटक रंगभूमी वर आणले.या नाटकाने साऱ्या महाराष्ट्राला वेड लावले.हे नाटक व त्यातील संगीत हे आजही कालच्या इतकेच लोकप्रिय आहे.राजराज्य वियोग हे त्यांचे शेवटचे नाटक .शीघ्र कवित्व त्यांचे ठायी होते.ते कीर्तने ही उत्तम करीत.शिवाजी महाराजांवर त्यांनी 500 ओव्यांचे एक दीर्घ काव्य त्यांनी रचले आहे.त्यांच्या सर्व लिखाणाचा संग्रह "समग्र किर्लोस्कर" नावाने प्रसिद्ध करण्यात आला आहे. 2 नोव्हेंबर 1885 साली मराठी रंगभूमी वरील संगीत नाटकाचे नवयुग प्रवर्तक,नाटककार,शीघ्र कवी,हौशी नट बळवंत पांडुरंग किर्लोस्कर उर्फ आण्णासाहेब किर्लोस्कर यांचे निधन झाले . अश्या बहू आयामी , बहू पदरी कलावंताचे स्मृतीस विनम्र अभिवादन.*संकलन :- सुरेखा खोत, बुलढाणा*••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• 🌹 *" फ्रेश सुविचार "* 🌹••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••शुन्यालाही देता येते किंमत,फक्त त्याच्यापुढे एक होऊन उभे रहा.*संकलन :- प्रमिलाताई सेनकुडे**ता. हदगाव जि. नांदेड*📱9403046894••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• ❓ *आजची प्रश्नमंजुषा* ❓••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••१) सिताफळमध्ये कोणते व्हिटॅमिन असते ?२) वं. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज कोणत्या कलेमध्ये पारंगत होते ?३) विधानसभा सभापती आपल्या पदाचा राजीनामा कोणाकडे देतात ?४) २०२३ चा जागतिक अन्न पुरस्कार कोणाला प्रदान करण्यात आला ?५) जगातील पहिल्या सिट्रस काँग्रेसच्या आयोजनाचा मान कोणत्या देशाला मिळाला आहे ? *उत्तरे :-* १) व्हिटॅमिन 'सी' २) पोहणे, अश्वरोहन, कुस्त्या इत्यादी ३) उपसभापती ४) हेडी कुहन, अमेरिका ५) भारत *संकलन :- जैपाल भै. ठाकूर*जि.प.व.प्राथ.शाळा भोसा, ता. आमगाव, जि. गोंदिया 📱9765943144••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎂 *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *◆|वा|ढ|दि|व|स|अ|भि|ष्ठ|चिं|त|न|◆* 👤 शंकरराव कामीनवार, सेवानिवृत्त शिक्षक, धर्माबाद👤 मारोती बोईनवाड👤 गोविंद देशमुख👤 छाया पुयड👤 महेश दुधाळकर👤 प्रवीण शिंदे👤 प्रणित जैस्वाल👤 मल्लेश धुलेवार, धर्माबाद*ઉदंड_आયુષ્યાच्या अનંત_શુभेच्छा*[ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा एक दिवस अगोदर 9423625769 येथे पोस्ट करावे. ]••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• ••• 💡 ‼ *मनाचे श्लोक*‼ 💡•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••जनीं सांगतां ऐकता जन्म गेला। परी वादवेवाद तैसाचि ठेला॥ उठे संशयो वाद हा दंभधारी। तुटे वाद संवाद तो हीतकारी॥११२॥।। जय जय रघुवीर समर्थ ।।••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🕊🌎 ‼ *विचारधारा*‼🕊🌎••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••कोणाची जागा घेण्यासाठी नको त्या वाटेने जाऊन स्वतः मधील गुणांना कमी लेखू नये. कारण प्रत्येक व्यक्तीची योग्यता वेगळी असते. ज्या व्यक्तीविषयी आपण कटकारस्थान रचण्याचा प्रयत्न करतो किंवा कमी लेखतो आधी त्या व्यक्तीने आपल्या जीवनात किती वादळ, वारे, आपत्ती,सहन करून किती संघर्ष केला आहे ते,आधी जाणून घेतले पाहिजे. असे झाले तर कोणाची जागा घेण्याची किंवा चुकीच्या मार्गाने जाण्याची आवश्यकता पडणार नाही. 🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷सौ.संगीता संतोष ठलाल मु. कुरखेडा जि. गडचिरोली••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎭 *आजची फ्रेश बोधकथा* 🎭••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• 📗 *माणसातील देव*📗 *एका गावात एक चर्च होते. एक दिवस नदीला पूर आला. पाणी गावात गुडघ्यापर्यंत आले. चर्चच्या फादरना न्यायला एक जीप आली. माणसे म्हणाली, फादर चला. बहुतेक पाण्याने सगळे वाहून जाईल. फादर म्हणाले, 'मला माझा येशूच येऊन वाचवेल.' जीप निघून गेली. नंतर पाणी वाढल्यानंतर एक बोट आली. बोटीतील लोक फादरना न्यायला आले. फादरनी नकार दिला. पाणी इतके वाढले की फादरना चर्चच्या छप्परावर जावे लागले. मग एक हेलिकॉप्टर वरतून घिरट्या घालू लागले. त्यातून एक दोर आला. हेलिकॉप्टरमधले लोक म्हणाले, 'फादर आता तरी दोर पकडा आणि जीव वाचवा.' फादर म्हणाले, 'माझा येशूच मला येऊन वाचवेल.' यानंतर एकच मोठी लाट आली आणि फादर मृत्यमुखी पडले. स्वर्गात गेल्यावर त्यांनी येशूला विचारले, 'मी इतकी प्रार्थना केली, पण तू मला वाचवले नाहीस.' येशू म्हणाले, 'मी प्रथम जीप घेऊन आलो होतो. नंतर बोट आणि नंतर हेलिकॉप्टर. पण तूच मला काही ओळखले नाहीस.'**तात्पर्य :- देव काही प्रत्यक्ष येऊन मदत करत नाही. तो माणसातच शोधावा लागतो.*सौजन्य :- https://dnyaneshwarkapti.blogspot.com/p/blog-page_29.html?m=1•••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••या पोस्ट विषयी आपल्या सूचना, निवेदन, अभिप्राय, बातम्या, वाढदिवस, माहिती किंवा शंका 9423625769 येथे कळवावे. •••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••~~~~~~~~~~~~~~~~~~~*🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢*📱 9423625769~~~~~~~~~~~~~~~~~~~*🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏*पुन्हा भेटू या फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार ~~~~~~~~~~~~~~~~~~~
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment