✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट~~~~~~~~~~~~~~~~~~~ 9️⃣ 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 9️⃣ ( फ्रेश शालेय परिपाठ )🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00 ( रविवार आणि सुट्टी वगळून )~~~~~~~~~~~~~~~~~~~🎇 दिनांक :- 03 नोव्हेंबर 2023💠 वार - शुक्रवार••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🌷🌐 . *दिनविशेष . 🌐* 🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••*_ या वर्षातील ३०७ वा दिवस आहे_* •••••••••••••••••••••••••••••••• *_महत्त्वाच्या घटना:_* •••••••••••••••••••••••••••••••• *१९८८:श्रीलंकेतून आलेल्या भाडोत्री तामिळ सैनिकांनी मालदीववर हल्ला केला. तेथील सरकारच्या विनंतीवरुन भारतीय सैन्याने तो मोडून काढला व सरकार वाचवले**१९५७:रशियाच्या ’स्पुटनिक-२’ या अंतराळयानातून गेलेली 'लायका’ नावाची कुत्री ही अंतराळभ्रमण करणारी पहिली सजीव प्राणी ठरली. मात्र प्रक्षेपणानंतर काही तासांतच ती मृत्यूमुखी पडली.**१९१८:पोलंड (रशियापासुन) स्वतंत्र झाला.**१९१३:अमेरिकेत ’आय कर’ सुरू झाला.**१९०३:पनामा (कोलंबियापासुन) स्वतंत्र झाला.**१८३८:’द टाइम्स ऑफ इंडिया’ हे जगातील सर्वाधिक खपाचे इंग्लिश दैनिक ’द बॉम्बे टाइम्स अँड जर्नल ऑफ कॉमर्स’ या नावाने मुंबईत सुरू झाले.* *_जन्मदिवस / जयंती / वाढदिवस:_* ••••••••••••••••••••••••••••••••••••••*१९९०:सुभाषश्री गांगुली-- भारतीय अभिनेत्री,मॉडेल,पटकथा लेखिका* *१९७७:विद्या रामभाऊ भडके -- कवयित्री* *१९७७:संतोष जयराम वाटपाडे-- कवी* *१९७४:सोनाली कुलकर्णी-- मराठी चित्रपट अभिनेत्री,लेखिका* *१९७२:प्रा.राजेंद्र दशरथ सोनवणे -- कवी,लेखक* *१९६५:संतोष शरदराव हुदलीकर-- कवी,गीतकार**१९५३:अनिल शेंडे -- कवी,लेखक* *१९३७:लक्ष्मीकांत शांताराम कुडाळकर – चित्रपटसृष्टीत चार दशके लोकप्रिय संगीत देणार्या 'लक्ष्मीकांत-प्यारेलाल’ या जोडीतील संगीतकार (मृत्यू:२५ मे १९९८)**१९३६:प्रा.डॉ.लीला नारायण गोविलकर-- लेखिका* *१९३४:नलिनी आनंद साधले--संस्कृत पंडित, लेखक,अनुवादक,कृषितज्ज्ञ (मृत्यू:१ डिसेंबर २०१०)**१९३३:अमर्त्य सेन – कल्याणाभिमुख अर्थशास्त्र व सामाजिक पर्याय सिद्धान्त या विषयांतील कार्यासाठी नोबेल पारितोषिक विजेते (१९९८) अर्थशास्त्रज्ञ**१९३३:प्रा.म.श.वाबगावकर-- प्रसिद्ध लेखक (मृत्यू:१२ मार्च २०२०)**१९२८:बंधुमाधव मोडक-- कथा व कादंबरी लेखक**१९२६:माधव भास्कर आचवल-समीक्षक, ललित लेखक(मृत्यू:२१ जानेवारी १९८०)**१९२५:पंडित विजय राघव राव--भारतीय बासरीवादक,नृत्यदिग्दर्शक,संगीतकार,कवी आणि कथा लेखक(मृत्यू:३० नोव्हेंबर २०११)**१९२५:हेमंत विष्णू इनामदार--संतसाहित्याचे अभ्यासक(मृत्यू:२३ जून २००५)**१९२१:चार्ल्स ब्रॉन्सन – अमेरिकन अभिनेता (मृत्यू:३० ऑगस्ट २००३)**१९०१:पृथ्वीराज कपूर – अभिनेते,निर्माते व दिग्दर्शक (मृत्यू:२९ मे १९७२)**१६८८:सवाई जयसिंग – जयपूर संस्थानचा राजा (मृत्यू:२१ सप्टेंबर १७४३)* *_मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन:_* ••••••••••••••••••••••••••••••••••••••*२०२१:गुरुनाथ विष्णू नाईक -- रहस्यकथा लेखक व पत्रकार (जन्म:२ जून १९३८)**२०१४:नारायण वासुदेव गोखले -- चित्रकार, लेखक (जन्म:३ जून १९११)**२०१४:गणेशकुमार नरवाडे उर्फ सदाशिव अमरापूरकर-- मराठी नाट्य अभिनेते तसेच हिंदी,मराठी,ओरिया,हरियाणी,भोजपुरी, बंगाली व गुजराती भाषांतील चित्रपटांत काम करणारे अभिनेते(जन्म११ मे १९५०)**२०१२:कैलाशपती मिश्रा – गुजरातचे माजी राज्यपाल (जन्म:५ आक्टोबर १९२३)**२०००:प्रा.गिरी देशिंगकर – चीनविषयक तज्ञ आणि पूर्व आशियाई घडामोडींचे अभ्यासक* *१९९८:डॉआरसी.हिरेमठ – कन्नड साहित्यिक,कर्नाटक विद्यापीठाचे कुलगुरू (जन्म:१५ जानेवारी १९२०)**१९९२:प्रेम नाथ – हिन्दी चित्रपटात नायक व खलनायकाच्या भूमिका गाजवणारे अभिनेते (जन्म:२१ नोव्हेंबर १९२६)**१९९०:मनमोहन कृष्ण – चरित्र अभिनेता (जन्म:२६ फेब्रुवारी १९२२)**१८१९:अनंत फंदी – शाहीर, ’फटका’कार, गोंधळी (जन्म:१७४४)*~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~ *_दिनविशेष या सदरातील सर्व मुद्दे हे संग्रहात्मक आहेत तेव्हा त्यात चूका नसतीलच असे सांगता येणार नाही_* *✍ संकलन ✍* *श्रीराम चव्हाण माजी शिक्षणाधिकारी,नागपूर*मोबाईल:9822695372 ईमेल: chavhansk65@gmail.com••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *✈ 🚀 गुगलयान ✈ 🚀*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••*महाराष्ट्रातील संतांची माहिती*.... संत चोखामेळा .....संत चोखामेळा (चोखोबा) हे यादव काळातील नामदेवांच्या संतमेळ्यातील वारकरी संप्रदायातील कवी होते. चोखोबांचा जन्म विदर्भातील बुलढाणाजिल्ह्यात देऊळगाव राजा तालुक्यातील मेहुणा किंवा मेहुणपुरी या गावी झाला. संत चोखामेळांचे कुटुंब हे जातीने महार होते. चोखोबा मूळ वऱ्हाडातील आहेत असेही म्हटले जाते. त्यांची पत्नी सोयरा, बहीण निर्मळा, मेहुणा बंका व मुलगा कर्ममेळा हे सर्व प्रपंचाचे काबाडकष्ट उपसत असतानाच नित्यनेमाने व भक्तिभावाने पांडुरंगाचे नामस्मरण व गुणसंकीर्तन करीत होते. चोखॊबांचा मृत्यू गावकुसाच्या कामात दरड कोसळून झाल्याचे सांगितले जाते. त्यांच्या मृत्यूनंतरही त्यांच्या हाडांतून विठ्ठल नामाचा गजर ऐकू येत होता, यावरून नामदेवांनी चोखोबांची हाडे ओळखून ती गोळा केली व पंढरपूरला विठ्ठल मंदिरासमोर त्यांची समाधी बांधली असे चरित्रकार सांगतात.संत चोखोबा हे एक, संत ज्ञानेश्वरांच्या प्रभावळीतले संत होते. संत नामदेव हे त्यांचे गुरू होत. तत्कालीन सामाजिक विषमतेमुळे चोखोबा होरपळून निघाले. ते शूद्र-अतिशूद्र, गावगाडा, समाज जीवन, भौतिक व्यवहार, उच्चनीचता व वर्णव्यवस्था यांच्या विळख्यात अडकले.संत चोखामेळा हे प्रापंचिक गृहस्थ. ते उदरनिर्वाहासाठी मोलमजुरी करत, पण ते विठ्ठलाच्या नामात सतत दंग असत. गावगाड्यातील शिवाशिवीच्या वातावरणात त्यांचा श्वास कोंडला जात होता. दैन्य, दारिद्रय, वैफल्य यांमुळे ते लौकिक जीवनात अस्वस्थ होते. परंतु प्रत्यक्ष परमेश्वराने त्यांना जवळ केले, त्यांना संतसंग लाभला. त्यांना मंदिरांत प्रवेश नव्हता. श्रीविठ्ठलाला त्यांना इतरांप्रमाणे उराउरी भेटावे असे खूप वाटत होते. परंतु ते सावळे, गोजिरे रूप महाद्वारातूनच पाहावे लागे, ही खंत त्यांच्या मनात होती.चंद्रभागा नदीच्या वाळवंटात आध्यात्मिक लोकशाही संत ज्ञानदेवांमुळे १३व्या शतकात उदयाला आली. म्हणून संत चोखोबा म्हणतात, ‘खटनट यावे, शुद्ध होऊनी जावे। दवंडी पिटीभावे डोळा।।’ ... असा पुकारा करून त्यांनी वारकरी संप्रदायातील अध्यात्मनिष्ठ, अभेद भक्तीचे लोण आपल्या उपेक्षित बांधवांपर्यंत नेऊन पोहोचवले. आत्मविकासाची संधी तत्कालीन समाजरचनेतील अगदी तळातील लोकांनाही मिळावी असे ज्ञानेश्र्वरादी सर्वच संतांना प्रांजळपणे वाटत होते. त्याच वेळी संत चोखोबांनी भक्तिमार्गाचा संदेश आपल्या अभंगांतून समाजबांधवांना दिला.संकलन :- नासा येवतीकर( वरील माहिती इंटरनेटवरून घेण्यात आली आहे. )~~~~~~~~~~~~~~~~~~~ 🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••1⃣ *मराठा आरक्षण : जरांगे पाटलांचं उपोषण मागे, सरकारला दोन महिन्यांची मुदत*•••••••••••••••••••••••••••••••••••••2⃣ *2000 रुपयांच्या नोटा बदलून घेण्यासाठी RBI समोर रांगा, अचानक लोकांची गर्दी झाल्यानं तपास सुरु*•••••••••••••••••••••••••••••••••••••3⃣ *एसटी महामंडळाला दिवाळीपूर्वी वेतनासाठी 378 कोटींची महाराष्ट्र सरकारकडून मदत, एसटी कर्मचाऱ्यांचे वेतन दिवाळीपूर्वी होण्याचा मार्ग मोकळा*•••••••••••••••••••••••••••••••••••••4⃣ *मुंबईत गेल्या 10 महिन्यात एक लाखांहून अधिक घरांची विक्री, राज्य सरकारच्या तिजोरीत 9,221 कोटींचा महसूल जमा*•••••••••••••••••••••••••••••••••••••5⃣ *कांदा उत्पादकांना 35 ते 40 कोटी रुपयांचा फटका, दरात 800 ते 900 रुपयांची घसरण; कांदा उत्पादक शेतकरी चिंतेत*•••••••••••••••••••••••••••••••••••••6⃣ *सिंधुदुर्ग मालवण येथील राजकोट किल्ला परिसरात छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा उभारण्यात येणार पालकमंत्री रविंद्र चव्हाण यांच्या हस्ते भूमिपूजन*•••••••••••••••••••••••••••••••••••••7⃣ *मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर खेळलेल्या सामन्यात भारताने श्रीलंकेचा 302 धावानी केला पराभव, सलग सातवा विजय*•••••••••••••••••••••••••••••••••••••*📷 वृत्त संकलक - कुणाल पवारे 📹*📱9960358300•••••••••••••••••••••••••••••••••••••ही पोस्ट नियमित मिळविण्यासाठी आणि या समुहात add होण्यासाठी 9423625769 येथे संपर्क करावे.••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• 🌷🍃 *विशेष माहिती* 🌷🍃••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••*बळवंत पांडुरंग किर्लोस्कर* बळवंत पांडुरंग किर्लोस्कर यांचा जन्म 31 मार्च 1843 साली धारवाड जिल्ह्यातील गुलहोसुर या गावी झाला.त्यांचे शिक्षण धारवाड,कोल्हापूर,पुणे येथे झाले.लहानपणापासून त्यांना कविता करण्याचा छंद होता.पुण्यात असतांना त्यांनी एक नाटक कंपनी काढली.पुढे काही काळ त्यांनी नाटक कंपनी चा नाद सोडला. बेळगावात आण्णा साहेबांनी काही दिवस शिक्षक म्हणून काम केले.पोलीस खात्यातही त्यांनी नोकरी केली.1880 साली पुण्यात एक पारशी कंपनी चे नाटक पाहून त्यांचे नाटक प्रेम जागृत झाले.त्यांनी कालिदासाच्या संस्कृत शाकुंतल या नाटकाचे मराठीत भाषांतर केले आणि ते रंगभूमी वर आणले. 31 ऑक्टोबर 1880 रोजी संगीत शाकुंतल या नाटकाचा पहिला प्रयोग पुणे येथील आनंद या नाट्यगृहात झाला.ज्याला आधुनिक अर्थांने नाटक म्हणता येईल असा नाट्यप्रयोग मराठी रंगभूमीवर प्रथमच झाला.अण्णासाहेबांनी सर्व पात्रांचे संभाषण व पदानसह संपूर्ण नाटक आधी लिहून काढले.त्याप्रमाणे भाषणे बोलून व अभिनय करून अनेकवेळा तालिमी घेतल्या व परिपूर्ण अवस्थेत नाटक सादर केले.लोकांना हा प्रकार नवीन होता.या नाटकास उत्तम यश व लोकप्रियता मिळाली.पुढे आण्णासाहेबांनी सौभद्र हे पौराणिक नाटक रंगभूमी वर आणले.या नाटकाने साऱ्या महाराष्ट्राला वेड लावले.हे नाटक व त्यातील संगीत हे आजही कालच्या इतकेच लोकप्रिय आहे.राजराज्य वियोग हे त्यांचे शेवटचे नाटक .शीघ्र कवित्व त्यांचे ठायी होते.ते कीर्तने ही उत्तम करीत.शिवाजी महाराजांवर त्यांनी 500 ओव्यांचे एक दीर्घ काव्य त्यांनी रचले आहे.त्यांच्या सर्व लिखाणाचा संग्रह "समग्र किर्लोस्कर" नावाने प्रसिद्ध करण्यात आला आहे. 2 नोव्हेंबर 1885 साली मराठी रंगभूमी वरील संगीत नाटकाचे नवयुग प्रवर्तक,नाटककार,शीघ्र कवी,हौशी नट बळवंत पांडुरंग किर्लोस्कर उर्फ आण्णासाहेब किर्लोस्कर यांचे निधन झाले . अश्या बहू आयामी , बहू पदरी कलावंताचे स्मृतीस विनम्र अभिवादन.*संकलन :- सुरेखा खोत, बुलढाणा*••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• 🌹 *" फ्रेश सुविचार "* 🌹••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••आत्मविश्वासाचा अभावहेच अपयशाचे खरे कारण आहे.*संकलन :- प्रमिलाताई सेनकुडे**ता. हदगाव जि. नांदेड*📱9403046894••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• ❓ *आजची प्रश्नमंजुषा* ❓••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••१) संत्रीमध्ये कोणते व्हिटॅमिन असते ?२) संत गाडगेबाबा यांचे जन्म नाव काय होते ?३) राज्यसभा सदस्याचा कार्यकाल किती असतो ?४) पहिला जागतिक अन्न पुरस्कार कोणाला प्रदान करण्यात आला ?५) विश्वचषक सामन्यात सर्वाधिक बळी घेणारा भारतीय खेळाडू कोण ? *उत्तरे :-* १) व्हिटॅमिन 'सी' २) डेबू ३) सहा ४) मनकोम्बू सांबशिवन उर्फ एम. एस. स्वामीनाथन ५) मोहंमद शम्मी *संकलन :- जैपाल भै. ठाकूर*जि.प.व.प्राथ.शाळा भोसा, ता. आमगाव, जि. गोंदिया 📱9765943144••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎂 *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *◆|वा|ढ|दि|व|स|अ|भि|ष्ठ|चिं|त|न|◆* 👤 संदीप पगारे👤 मयूर मधुकरराव महाजन👤 अंजली देशमुख घंटेवार, साहित्यिक*ઉदंड_आયુષ્યાच्या अનંત_શુभेच्छा*[ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा एक दिवस अगोदर 9423625769 येथे पोस्ट करावे. ]••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• ••• 💡 ‼ *मनाचे श्लोक*‼ 💡•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••जनी हीत पंडीत सांडीत गेले। अहंतागुणे ब्रह्मराक्षस जाले॥ तयाहून व्युत्पन्न तो कोण आहे। मना सर्व जाणीव सांडुनि राहे॥११३॥।। जय जय रघुवीर समर्थ ।।••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🕊🌎 ‼ *विचारधारा*‼🕊🌎••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••म्हणतात ना की, आपली जर..एखाद्या वेळी चूक झाली असेल तर मोठ्या मनाने माफी मागितले पाहिजे. म्हणजेच त्यामध्ये नक्कीच काहीतरी चांगले दडलेले असेल. पण, एका अर्थाने चूक मान्य करण्यासाठी सुद्धा खूप मोठे काळीज असावे लागते व माफ करणारी व्यक्ती सुद्धा तेवढीच अनुभवी व समजदार असायला पाहिजे. कारण, माफी मागणारा तर निघून जातो पण, खूप काही शिकायला भाग पाडत असतो. 🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷सौ.संगीता संतोष ठलाल मु. कुरखेडा जि. गडचिरोली••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎭 *आजची फ्रेश बोधकथा* 🎭••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••📗 *मुर्ख डोमकावळा*📗 *एका गरूडाने कुरणात चरत असलेल्या मेंढ्यांच्या कळपातील एका कोकरावर झडप घातली व त्या कोकराला पळवून नेले. त्याचे हे धाडस आणि सामर्थ्य पाहून रानातले सर्व पशुपक्षी त्या गरूडाकडे भीतीयुक्त आदराने पाहू लागले. 'गरूडाने पळवले त्यापेक्षाही मोठे कोकरू जर आपण पळवले तर गरूडापेक्षाही आपला मानसन्मान वाढेल, त्याच्याइतकीच प्रतिष्ठा आपल्याला लाभेल असे एका डोमकावळ्याला वाटले. त्यासाठी त्याने नजर ठेवून एका मोठ्या थोराड अशा कोकराच्या पाठीवर बसून त्याला उचलण्याचा प्रयत्न केला पण ते कोकरू उचलले जाण्याऐवजी, डोमकावळ्याचेच पाय कोकराच्या पाठीवरील लोकरीमध्ये अडकले व तिथून सुटण्यासाठी त्याने पंखांची केलेली फडफड व आरडाओरड मेंढपाळाच्या कानी गेली. तो तिथे आला व त्याने डोमकावळ्याला सोडविले व पिंज-यात कैद केले व त्याला स्वत:च्या मुलांच्या स्वाधीन केले. मुलांनी मेंढपाळाला विचारले,''बाबा या पक्ष्याचे नाव काय हो'' यावर तो मेंढपाळ हसून म्हणाला,'' या मूर्ख पक्ष्याला जर तुम्ही याचे नाव विचारले तर हा स्वत:ला गरूडापेक्षाही श्रेष्ठ असा पक्षी म्हणून स्वत:ची ओळख करून देईल पण प्रत्यक्षात हा मोठेपणाचा आव आणणारा एक भिकार डोमकावळा आहे.''**तात्पर्य :- काही काही लोकांना मोठेपणाचा आव आणण्याची प्रचंड सवय असते. यामध्ये त्यांनी कितीही जरी मोठेपणाचे सोंग घेतले तरी इतर सूज्ञ लोक हे त्यांची पात्रता जाणून असतात.*सौजन्य :- https://dnyaneshwarkapti.blogspot.com/p/blog-page_29.html?m=1•••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••या पोस्ट विषयी आपल्या सूचना, निवेदन, अभिप्राय, बातम्या, वाढदिवस, माहिती किंवा शंका 9423625769 येथे कळवावे. •••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••~~~~~~~~~~~~~~~~~~~*🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢*📱 9423625769~~~~~~~~~~~~~~~~~~~*🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏*पुन्हा भेटू या फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार ~~~~~~~~~~~~~~~~~~~
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment