✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट~~~~~~~~~~~~~~~~~~~ 9️⃣ 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 9️⃣ ( फ्रेश शालेय परिपाठ )🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00 ( रविवार आणि सुट्टी वगळून )~~~~~~~~~~~~~~~~~~~🎇 दिनांक :- 29 नोव्हेंबर 2023💠 वार - बुधवार••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🌷🌐 . *दिनविशेष* . 🌐🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *_ या वर्षातील ३३३ वा दिवस आहे_* •••••••••••••••••••••••••••••••• *_महत्त्वाच्या घटना:_* •••••••••••••••••••••••••••••••• *२०००:शास्त्रीय गायक गुलाम मुस्तफा खाँ आणि घटमवादक टी. एच. विक्कू विनायक राम यांना ’उस्ताद हफीज अली खाँ स्मृती पुरस्कार’ जाहीर**२०००:दक्षिण अफ्रिकेचे माजी अध्यक्ष डॉ. नेल्सन मंडेला व बांगलादेशच्या ग्रामीण बँकेस ’गांधी शांतता पुरस्कार’ जाहीर**१९९६:नोबेल पारितोषिकविजेत्या समाजसेविका मदर तेरेसा यांना त्यांची मायभूमी अल्बानियाचा सर्वोच्च नागरी पुरस्कार ’गोल्डन ऑनर’ जाहीर**१९६३:अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष लिंडन बी. जॉन्सन यांनी जॉन एफ. केनेडी यांच्या हत्येची चौकशी करण्यासाठी 'वॉरन समिती' नेमली.**१९४५:युगोस्लाव्हिया प्रजासत्ताक बनले.* *_जन्मदिवस / जयंती / वाढदिवस:_* ••••••••••••••••••••••••••••••••••••••*१९८४:नेहा पेंडसे-- मराठी आणि हिंदी चित्रपट आणि दूरचित्रवाणी मालिकांतून अभिनय करणाऱ्या अभिनेत्री**१९७७:युनिस खान – पाकिस्तानी क्रिकेटपटू**१९५२:सुनिती मंगल धारवाडकर-- कवयित्री, लेखिका* *१९५०:रामकृष्ण विनायक अभ्यंकर-- लेखक**१९५०:प्रकाश ज्ञानेश्वर जडे-- प्रसिद्ध कवी, लेखक**१९४५:खुशाल डवरे- प्रसिद्ध लेखक**१९४२:नीला भागवत-- ग्वाल्हेर घराण्याच्या हिंदुस्थानी संगीतकार**१९३८:माला केकतपुरे-- कवयित्री,लेखिका**१९३३:श्रीराम आत्माराम खुणे-- लेखक**१९३१: रामचंद्र बापूजी मुंजवाडकर-- लेखक* *१९२६:प्रभाकर नारायण पाध्ये ऊर्फ भाऊ पाध्ये-- मराठी कादंबरीकार, कामगार चळवळकर्ते (मृत्यू:३० ऑक्टोबर १९९६)**१९१७: भगवंत रंगनाथ अक्कलकोटकर -- कादंबरीकार,बालसाहित्यिक* *१९०७:गोपीनाथ तळवलकर – बालसाहित्यिक,'आनंद’ मासिकाचे संपादक, आकाशवाणीच्या ’बालोद्यान’ कार्यक्रमातील ’नाना’ (मृत्यू:७ जून २०००)**१८९६:विनायक लक्ष्मण बर्वे-- कथाकार, कादंबरीकार,कवी,नाटककार (मृत्यू:२६ जानेवारी १९४८)**१८६९;अमृतलाल विठ्ठलदास ठक्कर ऊर्फ ’ठक्कर बाप्पा’ – समाजसेवक (मृत्यू:२० जानेवारी १९५१)**१८६२:विष्णू गणेश नेने-- लेखक (मृत्यू:२३ जानेवारी १९२४)**१८३५:महादेव मोरेश्वर कुंटे-- मराठी कवी, संस्कृत भाषेतील विद्वान (मृत्यू:८ ऑक्टोबर १८८८)* *_मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन:_* ••••••••••••••••••••••••••••••••••••••*२०१२:आचार्य पार्वती कुमार किंवा पार्वतीकुमार-- भारतीय शास्त्रीय नृत्यांगना,शास्त्रीय नृत्य कोरिओग्राफर आणि विद्वान(जन्म:२७ फेब्रुवारी १९३१)**२०११:इंदिरा गोस्वामी--आसामी लेखिका, कवयित्री व संपादिका(जन्म:१४ नोव्हेंबर १९४३)**२००७: केशव तानाजी मेश्राम-- मराठी भाषेतील लेखक,कवी,नाटककार, समीक्षक(जन्म:२४ नोव्हेंबर १९३७)**२००१:जॉर्ज हॅरिसन – ’बीटल्स’चा गिटारवादक,संगीतकार,गायक आणि गीतलेखक (जन्म:२५ फेब्रुवारी १९४३)**१९९३:जहांगीर रतनजी दादाभॉय तथा ’जे.आर.डी.टाटा’ – भारतरत्न, उद्योगपती व वैमानिक,भारतीय नागरी विमान वाहतुकीचे जनक (जन्म:२९ जुलै १९०४)**१९९४:मृणालिनी प्रभाकर देसाई-- कादंबरीकार(जन्म:७ ऑक्टोबर १९२७)**१९५९:वाजू कोटक-- गुजराती लेखक, प्रकाशक,पत्रकार,भारतीय चित्रपट पटकथा लेखक(जन्म:३० जानेवारी १९१५)**१९५९:’रियासतकार’ गोविंद सखाराम सरदेसाई – मुसलमानी काळापासून ब्रिटिश अमदानीपर्यंतचा महाराष्ट्राचा इतिहास लिहीणारे इतिहासकार (जन्म:१७ मे १८६५)**१९५०: आनंदीबाई धोंडो कर्वे-- सामाजिक-शैक्षणिक कार्यकर्त्या(जन्म:२५ जानेवारी १८६३)**१९३९:माधव त्र्यंबक पटवर्धन उर्फ ’माधव जूलियन’ – कवी,कोशकार,छंदशास्त्राचे व्यासंगी आणि मराठी भाषाशुद्धीचे तत्त्वनिष्ठ पुरस्कर्ते (जन्म:२१ जानेवारी १८९४)**१९२६:कृष्णाजी नारायण आठल्ये – ग्रंथकार, संपादक, टीकाकार, कवी व चित्रकार, ’केरळ कोकिळ’ या मासिकाचे संस्थापक व संपादक (जन्म:३ जानेवारी १८५२)*~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~ *_दिनविशेष या सदरातील सर्व मुद्दे हे संग्रहात्मक आहेत तेव्हा त्यात चूका नसतीलच असे सांगता येणार नाही_* *✍ संकलन ✍* *श्रीराम चव्हाण,नागपूर*मोबाईल:9822695372 ईमेल: chavhansk65@gmail.com••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *✈ 🚀 गुगलयान ✈ 🚀*••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *शिक्षकांना शिकवू द्या ...* राज्यातील बहुउद्देशीय कर्मचारी म्हणजे शिक्षक. कोणत्याही सरकारी कामासाठी सहज उपलब्ध होणारा आणि सांगितलेले काम मुकाट्याने करणारा कर्मचारी म्हणजे शिक्षक. वास्तविक पाहता शिक्षकांचे...........वरील लेख पूर्ण वाचण्यासाठी निळ्या अक्षरावर टिचकी मारा.http://nasayeotikar.blogspot.com/2017/11/blog-post_27.htmlलेख वाचून आपल्या प्रतिक्रिया जरूर द्याव्यात~~~~~~~~~~~~~~~~~~~✍ स्तंभलेखक *नासा येवतीकर, धर्माबाद*9423625769~~~~~~~~~~~~~~~~~~~ 🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••1⃣ *अवकाळी पावसाचा मराठवाड्याला मोठा फटका; 47 हजार 109 हेक्टर क्षेत्रावरील पिकांचे नुकसान*•••••••••••••••••••••••••••••••••••••2⃣ *मुंबईतील दुकानांवर ठळक अक्षरात मराठी फलक लावण्याचे आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिले आहेत. सर्वोच्च न्यायालयाच्या या आदेशानुसार महापालिकेने मंगळवारी १७६ दुकानांवर कारवाई केली.*•••••••••••••••••••••••••••••••••••••3⃣ *संपूर्ण भारतात सिलेंडरचा दर 400 रुपये करा; सुप्रिया सुळेंची मोदी सरकारकडे मोठी मागणी*•••••••••••••••••••••••••••••••••••••4⃣ *उत्तराखंड बचावकार्याला यश! 17 दिवसांनंतर बोगद्यातून 41 कामगारांची सुटका*•••••••••••••••••••••••••••••••••••••5⃣ *राज्यातील अवकाळीग्रस्त 99 हजार 381 हेक्टर क्षेत्राचे पंचनामे तातडीने करा; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे निर्देश*•••••••••••••••••••••••••••••••••••••6⃣ *अजित पवारांनी मंत्रालयात घेतला खेड-आळंदीतील कामांचा आढावा:तीर्थक्षेत्र व बसस्थानकांच्या विकासाबाबत प्रस्ताव सादर करण्याचे निर्देश*•••••••••••••••••••••••••••••••••••••7⃣ *तिसऱ्या T20 सामन्यात भारताचा पाच विकेटने पराभव*•••••••••••••••••••••••••••••••••••••*📷 वृत्त संकलक - कुणाल पवारे 📹*📱9960358300•••••••••••••••••••••••••••••••••••••ही पोस्ट नियमित मिळविण्यासाठी आणि या समुहात add होण्यासाठी 9423625769 येथे संपर्क करावे.••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• 🌷🍃 *विशेष माहिती* 🌷🍃••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••📙 *म्हाताऱ्या लोकांच्या चेहऱ्यावर सुरकुत्या का पडतात ?* 📙वृद्धावस्था आली की माणसात अनेक बदल होतात. डोक्यावरचे केस गळायला लागतात व टक्कल पडते. तोंडातील दात हलायला लागतात व नंतर तोंडाचे बोळके होते. बोटांना कंप सुटतो, दृष्टी अधू होते, उत्साह कमी होतो. अशा या बदलांमुळे व्यक्ती चिडचिडी होते. त्यात भर म्हणजे विस्मरणही व्हायला लागते. त्यामुळे वृद्धत्व म्हणजे एक रोग असे वाटायला लागते.चेहऱ्यावर सुरकुत्या का पडतात, याविषयी माहिती घेऊ. त्वचेखाली स्नायूंच्या आकुंचन व प्रसरणाच्या दिशेने काटकोनात त्वचेची हालचाल होत असल्याने त्वचेच्या वारंवार घड्या पडतात. व तेथे नंतर सुरकुत्या पडतात. चेहऱ्याच्या त्वचेखाली इतर शरीराच्या त्वचेखाली असणारा जाडसर थर (deep fascia) नसतो व स्नायू व त्वचेचे थर एकमेकांत जखडलेले असतात. त्यामुळेही त्वचेवर जास्त ताण येतो व सुरकुत्या पडतात.दुसरे म्हणजे त्वचेखालील मेद पदार्थांचे प्रमाण कमी होते. साहजिकच त्वचा सैल व ढिली होते. तिसरे म्हणजे स्नायूंमधील ताण वयोमानानुसार कमी होतो. त्यामुळे त्वचेमध्ये खोवले जाणारे स्नायू शिथिल होतात व त्वचाही सैल होते. सर्व इंद्रियांवर त्वचेची जीवनशक्ती कमी झालेली असते. त्यामुळे या त्वचेची लवचिकता कमी होऊन ती सैल पडते. या सर्व गोष्टींमुळे सैल पडलेल्या त्वचेवर सुरकुत्या पडतात. तोंडातील दात पडल्याने जबड्याच्या हाडाची झीज झाल्याने चेहऱ्याचा आकारही बदलतो व त्वचा आणखीनच सैल होते. परिणामी वृद्ध व्यक्तींच्या चेहऱ्यावर सुरकुत्या पडतात. सुरकुत्या सर्व शरीरावर पडतात परंतु चेहऱ्यावर ती बाब जास्त प्रकर्षाने जाणवते.*संकलन :- श्याम बसप्पा ठाणेदार, पुणे*••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• 🌹 *" फ्रेश सुविचार "* 🌹••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••"अनेक वेळा चांगले क्षण/ आशीर्वाद हे कठोर प्रसंगांच्या वेशभूषेत येतात."*संकलन :- प्रमिलाताई सेनकुडे**ता. हदगाव जि. नांदेड*📱9403046894••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• ❓ *आजची प्रश्नमंजुषा* ❓••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••१) कोणत्या खेळाचे साहित्य *टोक, दांडी व मूठ* या तीन भागांचे बनलेले असते ?२) ब्लॅकबक राष्ट्रीय उद्यान कोणत्या राज्यात आहे ?३) नुकतेच कोणत्या भारतीय खेळाडूचा 'ICC हॉल ऑफ फेम' मध्ये समावेश करण्यात आला आहे ?४) पाण्याखालील ज्वालामुखीच्या उद्रेकानंतर कोणत्या देशाला अलीकडेच नवीन बेट मिळाले आहे ?५) कलिंगड या फळासाठी कोणते शहर प्रसिद्ध आहे ? *उत्तरे :-* १) भालाफेक ( साहित्य - भाला ) २) गुजरात ३) वीरेंद्र सेहवाग, भारत ४) जपान ५) अलिबाग *संकलन :- जैपाल भै. ठाकूर*जि.प.व.प्राथ.शाळा भोसा, ता. आमगाव, जि. गोंदिया 📱9765943144••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎂 *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *◆|वा|ढ|दि|व|स|अ|भि|ष्ठ|चिं|त|न|◆* 👤 साईनाथ बोईनवाड👤 योगेश खवसे👤 पोतन्ना गुंटोड👤 प्रमोद पाटील बोमले👤 किशोरी चौगुले, सहशिक्षिका*ઉदंड_आયુષ્યાच्या अનંત_શુभेच्छा*[ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा एक दिवस अगोदर 9423625769 येथे पोस्ट करावे. ]••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• ••• 💡 ‼ *मनाचे श्लोक*‼ 💡•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••अजामेळ पापी तया अंत आला।कृपाळूपणे तो जनीं मुक्त केला॥अनाथासि आधार हा चक्रपाणी।नुपेक्षी कदा देव भक्ताभिमानी॥११९॥।। जय जय रघुवीर समर्थ ।।••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••*🎯 विचारवेध..........✍🏻*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••जर तुम्ही भविष्याचे ओझे डोक्यावर घेऊन जगत असाल तर वर्तमानात दुःखाशिवाय काहीच मिळणार नाही.कारण भविष्याच्या सुखासाठी आजच्या वर्तमानातील सुखाला हरवत हातातले सुख दूर करुन जगायला लागले तर दुःख च भोगणार ना ...! म्हणून आजचे सुख भोगत असताना उद्याच्या भविष्याची काळजी करण्याचे कारण नाही.वर्तमान सुखाचा असेल तर भविष्यही सुखात जाणार .आजचे सातत्य उद्याही चालू ठेवले तर काळजी करण्याचे कारणच नाही.व्यंकटेश काटकर, नांदेड🍂🍃🍂🍃🍂🍃🍂🍃🍂••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎭 *आजची फ्रेश बोधकथा* 🎭••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *कासवाची चतुराई*एकदा एक कासव जंगलाकडे जायला निघाला. त्याला कोल्हा दिसला. कोल्हा त्याच्या दिशेनेच येत होता. कासव घाबरला. कासवाने आपली मान व पाय कवचात ओढून घेतले. कोल्ह्याने कवच पाहिले. आपल्या पायाने कवचाला ओरखडले. कोल्ह्याला वाटले," हा तर दगड आहे. “कोल्हा पुढे निघून गेला. कासवाने हळूच मान बाहेर काढली. ते पाण्यात शिरले. कासवाने कोल्ह्याला आवाज दिला.. कोल्ह्याने मागे वळून पाहिले. तो स्वतःशीच म्हणाला अरे! शिकार हातची गेली..*बोध: चतुराईने केलेले काम चांगलेच व उपयोगी असते.*•••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••या पोस्ट विषयी आपल्या सूचना, निवेदन, अभिप्राय, बातम्या, वाढदिवस, माहिती किंवा शंका 9423625769 येथे कळवावे. •••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••~~~~~~~~~~~~~~~~~~~*🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢*📱 9423625769~~~~~~~~~~~~~~~~~~~*🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏*पुन्हा भेटू या फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार ~~~~~~~~~~~~~~~~~~~
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment