✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट~~~~~~~~~~~~~~~~~~~ 9️⃣ 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 9️⃣ ( फ्रेश शालेय परिपाठ )🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00 ( रविवार आणि सुट्टी वगळून )~~~~~~~~~~~~~~~~~~~🎇 दिनांक :- 01 डिसेंबर 2023💠 वार - शुक्रवार______________________Link - https://nasayeotikar.blogspot.com/2020/06/blog-post_60.html••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🌷🌐 . *दिनविशेष* . 🌐🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••*_जागतिक एडस प्रतिबंध दिन_*••••••••••••••••••••••••••••••••• *_ या वर्षातील ३३५ वा दिवस आहे_* •••••••••••••••••••••••••••••••• *_महत्त्वाच्या घटना:_* •••••••••••••••••••••••••••••••• *२००१:ट्रान्स वर्ल्ड एअरलाइन्सचे शेवटचे उड्डाण. यानंतर ही कंपनी अमेरिकन एअरलाइन्समधे विलीन झाली.**१९९९:भारताच्या पहिल्या महिला पंतप्रधान (कै.) इंदिरा गांधी यांना ’वूमन ऑफ द मिलेनियम’ म्हणून मानांकित करण्यात आले.**१९९३:प्राच्यविद्या विशारद डॉ.रा.ना.दांडेकर, वेदविद्या पारंगत डॉ.चिं.ग.काशिकर आणि प्रसिद्ध साहित्यिक पु.ल.देशपांडे यांना टिळक महाराष्ट्र विद्यापीठातर्फे सन्माननीय ’डी.लिट. पदवी’ जाहीर**१९९२:कलाक्षेत्रात केलेल्या प्रदीर्घ व अविस्मरणीय कामगिरीबद्दल गदिमा प्रतिष्ठानच्या वतीने देण्यात येणारा ’गदिमा पुरस्कार’ गायिका आशा भोसले यांना जाहीर**१९८१:AIDS विषाणूची प्रथमच ओळख पटली.**१९७६:अंगोलाचा संयुक्त राष्ट्रांत (United Nations) प्रवेश**१९७३:पापुआ न्यू गिनीला (ऑस्ट्रेलियाकडून) स्वातंत्र्य मिळाले.**१९६५:भारताच्या सीमांच्या संरक्षणासाठी सीमा सुरक्षा दलाची (Border Security Force) स्थापना**१९६४:मालावी, माल्टा आणि झांबियाचा संयुक्त राष्ट्रांत (United Nations) प्रवेश**१९६३:नागालँड भारताचे १६ वे राज्य बनले.**१९४८:एस.एस.आपटे यांनी ’हिन्दुस्तान समाचार’ ही बहुभाषिक वृत्तसंस्था स्थापन केली.**१९१७:कोल्हापूरमधील पॅलेस थिएटरमधे श्रीपतराव काकडे,दामलेमामा,फत्तेलाल, बाबा गजबर,ज्ञानबा मेस्त्री,पंत धर्माधिकारी यांच्या उपस्थितीत बाबूराव पेंटर यांनी ’महाराष्ट्र फिल्म कंपनी’ची स्थापना केली.* *_जन्मदिवस / जयंती / वाढदिवस:_* ••••••••••••••••••••••••••••••••••••••*१९८२:डॉ.गणेश जगन्नाथ मोगल- कवी* *१९८२:डॉ.शिवाजी नारायणराव शिंदे-- प्रसिद्ध कवी,लेखक तथा सहाय्यक कुलसचिव* *१९८०:मोहम्मद कैफ – भारतीय क्रिकेटपटू**१९७९:गणेश रामदास निकम-- लेखक* *१९६९:पद्मा विलासराव ठाकरे-- कवयित्री, लेखिका* *१९६५:संदीप सावंत-- मराठी चित्रपट दिग्दर्शक**१९६४:कल्पना अशोक टेंभुर्णीकर-- कवयित्री**१९६३:अर्जुन रानातुंगा-- श्रीलंकेचा माजी क्रिकेटपटू**१९५७:रविकिरण पराडकर -- निवृत्त सहाय्यक पोलीस आयुक्त,लेखक* *१९५५:नारायण भानुदासराव बोरुळकर-- कवी,लेखक,संपादक* *१९५५:मोहनदास भामरे उर्फ भामरे बापू-- लेखक,कवी* *१९५५:उदित नारायण – प्रसिद्ध पार्श्वगायक**१९५४:राकेश बेदी-- भारतीय चित्रपट,रंगमंच आणि दूरदर्शन अभिनेता* *१९५३:बाजीराव शंकर निकम-- लेखक**१९५२:सूर्यकांत पंडितराव सराफ- प्रसिद्ध बालसाहित्यिक,नाट्यलेखक* *१९४९:प्राचार्य सुरेश प्रल्हाद खेडकर-- कवी, लेखक* *१९४७:विश्वनाथ शिरढोणकर-- सुप्रसिद्ध कवी,लेखक विविध पुरस्काराने सन्मानित* *१९४६:निळकंठ रामदास पाटील- प्रसिद्ध साहित्यिक* *१९४६:डॉ.वसुधा जयंत आठवले-- लेखिका* *१९४५:नरेंद्र सीताराम मारवाडे -- कवी,लेखक,संपादक* *१९४३:डॉ.शेषराव मारुती हराळे-- कवी* *१९४१:शामराव तुळशीराम बहेकर-- लेखक**१९४०:मोरेश्वर श्रीधर पटवर्धन-- लेखक**१९४०:प्रा.यशवंत भिमाले-- लेखक* *१९१७:सीताराम नानाजी कांबळे-- कादंबरीकार* *१९११:अनंत अंतरकर – 'हंस','मोहिनी', 'नवल' आणि 'सत्यकथा' या मासिकांचे संपादक (मृत्यू:४ आक्टोबर १९६६)**१९०९:बा.सी.मर्ढेकर – मराठी नवकाव्याचे प्रणेते (मृत्यू:२० मार्च १९५६)**१८८५:आचार्य दत्तात्रय बाळकृष्ण तथा ’काकासाहेब’ कालेलकर – गांधीवादी देशभक्त,शिक्षणतज्ञ,समाजसुधारक,इतिहासकार,गुजराथ विद्यापीठाचे कुलगुरू (१९२८), राज्यसभा सदस्य(१९५२ - १९५८),अनुसूचित जमातींच्या आयोगाचे अध्यक्ष (१९५३), (मृत्यू:२१ ऑगस्ट १९८१)**१८६२:परशराम गोविंद चिंचाळकर-- वेदांत विद्याविशारद,लेखक(मृत्यू:८ जानेवारी १९३४)**१७६१:मेरी तूसाँ – ’मॅडम तूसाँ वॅक्स म्युझियम’च्या संस्थापिका (मृत्यू:१६ एप्रिल १८५०)* *_मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन:_* ••••••••••••••••••••••••••••••••••••••*२०१५:उस्ताद साबरी खां-- सारंगीवादक (जन्म:२१ मे १९२७)**२०१०:नलिनी आनंद साधले--संस्कृत पंडित, लेखक, अनुवादक, कृषितज्ज्ञ (जन्म:३ नोव्हेंबर १९३४)**१९९०:विजयालक्ष्मी पंडीत – राजदूत, मुत्सद्दी व राजकारणी(जन्म:१८ ऑगस्ट १९००)**१९८८:गंगाधर बाळकृष्ण तथा ‘गं. बा.‘ सरदार – विचारवंत व साहित्यिक,पुरोगामी चळवळीचे भाष्यकार,दलित साहित्य संमेलनाचे अध्यक्ष (१९७८), बार्शी येथील अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष (१९८०) (जन्म:२ आक्टोबर १९०८)**१९८५:शंकर त्रिंबक तथा ’दादा’ धर्माधिकारी – स्वातंत्र्यसेनानी व समाजसुधारक (जन्म:१८ जून १८९९)**१८६६:भारताचे सर्वेक्षण करणारे कर्नल सर जॉर्ज एव्हरेस्ट (जन्म:४ जुलै १७९०)*~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~ *_दिनविशेष या सदरातील सर्व मुद्दे हे संग्रहात्मक आहेत तेव्हा त्यात चूका नसतीलच असे सांगता येणार नाही_* *✍ संकलन ✍* *श्रीराम चव्हाण माजी शिक्षणाधिकारी,नागपूर*मोबाईल:9822695372 ईमेल: chavhansk65@gmail.com••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *✈ 🚀 गुगलयान ✈ 🚀*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••*नगरपालिका हद्दीतील सरकारी शाळा*सरकारी शाळा म्हणजे जिल्हा परिषदेच्या शाळा होय. ग्रामीण भागातल्या शाळांना स्थानिक स्वराज्य संस्था म्हणजे ग्रामपंचायतची थोडीफार मदत मिळू शकते त्यामुळे त्या शाळेचा भौतिक विकास होऊ शकतो. मर्यादित लोकसंख्या आणि मर्यादित क्षेत्र यामुळे ग्रामीण भागातील सरकारी शाळांना सध्या अच्छे दिन दिसत आहेत. बघायला गेलं तर येथे ही अनेक संकटांना तोंड द्यावे लागत आहे. यानंतर मनपाच्या शाळा म्हणजे महानगरपालिका अंतर्गत येणाऱ्या शाळा यांना सुद्धा मनपाचे सहकार्य मिळते. स्वतंत्र शिक्षण विभाग असतो आणि प्रत्येक कार्य स्वतंत्रपणे चालत असल्याने सर्वत्र लक्ष देणे शक्य आहे. मात्र नगरपालिका क्षेत्रात येणाऱ्या सरकारी शाळा यांची स्थिती कोणी ही लक्षात घेत नाही त्यामुळे येथील शाळांची अवस्था धोबी का कुत्ता ना घर का ना घाट का अशी झालेली पाहायला मिळते. नगरपालिका हद्दीतील सरकारी जिल्हा परिषद शाळांना फक्त शासनाची म्हणजे .......पूर्ण लेख वाचण्यासाठी लिंकवर क्लीक करावे.~~~~~~~~~~~~~~~~~~~ 🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••1⃣ *राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी शनिशिंगणापूर येथे घेतले शनैश्वर मूर्तीचे दर्शन; चौथऱ्यावर जाऊन शनैश्वर मूर्तीस केला तैलाभिषेक*•••••••••••••••••••••••••••••••••••••2⃣ *शिक्षकांची भूमिका अत्यंत महत्वाचे आहे, असे मत केंद्र सरकारच्या एचआरडी विभागाचे ऑल इंडिया कौन्सिल फॉर टेक्निकल एज्यूकेशनचे उपाध्यक्ष डॉ. अभय जेरे यांनी व्यक्त केले.*•••••••••••••••••••••••••••••••••••••3⃣ *केंद्र सरकारनं मजुरांसाठी खास ओळखपत्र बनवण्याची केली घोषणा, कामगारांसाठी हे कार्ड गेम चेंजर ठरणार आहे.*•••••••••••••••••••••••••••••••••••••4⃣ *भारतात 20 लाखांहून अधिक नवीन रोजगार निर्माण होणार, आयटी क्षेत्राला मिळणार चालना*•••••••••••••••••••••••••••••••••••••5⃣ *आजपासून नवीन सीम कार्ड खरेदी करण्याबाबत कठोर नियम*•••••••••••••••••••••••••••••••••••••6⃣ *मध्य प्रदेश, राजस्थान, छत्तीसगढ, तेलंगणा आणि मिझोरम या पाच राज्यांसाठीचं मतदान पूर्ण झालं असून 3 डिसेंबरला निकाल हाती येईल.*•••••••••••••••••••••••••••••••••••••7⃣ *साऊथ अफ्रिका दौऱ्यासाठी टीम इंडियाची घोषणा, के. एल. राहुल एकदिवसीय संघाचा नवा कर्णधार !*•••••••••••••••••••••••••••••••••••••*📷 वृत्त संकलक - कुणाल पवारे 📹*📱9960358300•••••••••••••••••••••••••••••••••••••ही पोस्ट नियमित मिळविण्यासाठी आणि या समुहात add होण्यासाठी 9423625769 येथे संपर्क करावे.••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• 🌷🍃 *विशेष माहिती* 🌷🍃••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• 📙 *बायोगॅस* 📙 ******************अनेक प्रकारचे सेंद्रिय पदार्थ टाकाऊ म्हणून आपण फेकून देत असतो. गायीगुरांचे शेण कंपोस्ट खतासाठी अनेक वर्षे वापरले जात होते. पण त्या व्यतिरिक्त त्याचा उपयोग शक्य आहे, याचा विचार मात्र गेली ४० वर्षेच केला गेला. झाडांचा पालापाचोळा, वाया जाणारे अन्नपदार्थ, खरकटे, भाजीची देठे व टरफले या साऱ्यांचा उपयुक्त वापर करण्याची कल्पना सतत मांडली जात आहे. मात्र त्याचा पाठपुरावा करून संपूर्ण वापर केले जाणे मात्र आजही घडत नाही. या साऱ्यापासून बायोगॅसची निर्मिती सहज शक्य असते. हा गॅस घरातील गॅस शेगडीसाठी जसा वापरता येतो, तसाच मोठ्या प्रमाणावर तयार केल्यास छोट्या हॉटेलला पण पूरक म्हणून उपयोगी पडू शकतो. १९७० च्या दशकात गोबरगॅस या नावाने ओळखला जाणारा हा गॅस मुख्यत: गायीगुरांचे शेण व पालापाचोळा यातून निर्माण केला जात असे. घराजवळच गोठ्यालगत विटांच्या बांधकामातून गोल हौदवजा टाकी बांधून त्यात हा कच्चा माल घातला जाई. त्यावर टोपीप्रमाणे बसणारी पण दट्ट्याप्रमाणे खालीवर होऊ शकणारी यंत्रणा बसवून आतील कच्चा माल कुजून दिला जाई. या कुजण्याला मदत म्हणून स्लरी - विशिष्ट प्रकारचे जंतू असलेले पाणी - त्यात सोडल्यावर सुमारे चाळीस दिवसांनी रोजच्या गॅसचा पुरवठा सुरू होत असे. या कुजण्यातून निर्माण झालेला गाळ व पाणी हे खत म्हणून वापरता येई.या प्रकारची गोबरगॅस संयंत्र संपूर्ण भारतात अनेकांनी बसवली. त्यासाठी ग्रामोद्योग मंडळाने प्रशिक्षण व सहाय्यसुद्धा दिले. काही वर्षांनी त्यांच्या डागडुजीची वेळ आली, तेव्हा कुचराई केल्याने अनेक ठिकाणी ही संयंत्रे बंद पडत गेली. हौदाचा गिलावा उडून होणारी गळती व लोखंडी भाग गंजणे हे त्याचे महत्त्वाचे कारण होते. या गॅसमध्ये मुख्यत: मिथेन वायू असतो. ज्वलनासाठी उपयुक्त व प्रदूषणविरहित असे त्याचे स्वरूप आहे. छोट्या गावात, दूरवरच्या वस्तीमध्ये लिक्विड पेट्रोलियम गॅसचा पुरवठा सिलिंडरद्वारे करणे कठीण असल्यास या पद्धतीचा वापर अत्यंत उपयुक्त होता. चीनमध्ये या स्वरूपाची स्थानिक संयंत्रे बसवून वापरली जात आहेत, पण आपल्याकडे मात्र हा प्रयोग मागे पडला आहे.या गोबरगॅसच्या अवाढव्य जागा व्यापणाऱ्या व शेणाची गरज असलेल्या संयंत्रात बरेच सुटसुटीत बदल करून पुणे येथील 'आरती' (अॅप्रोप्रिएट रुरल टेक्नॉलॉजी इन्स्टिट्यूट) या संस्थेचे वैज्ञानिक डॉक्टर आनंद कर्वे यांनी बायोगॅस निर्मितीचे संयंत्र बनवले आहे. प्लास्टिकच्या एकात एक बसणाऱ्या मोठ्या पंपाचा वापर करून हे बनले आहे. गच्चीत, अंगणात कुठेही ठेवून त्याचा वापर शक्य होतो. महत्त्वाची गोष्ट यासाठी खरकटे अन्न व आसपासच्या झाडांचा, बागेचा पालापाचोळा पुरतो. शेणाची गरज लागत नसल्याने हाताळताना नकोसे वाटत नाही. याचा कसलाही वास आसपास पसरत नाही. महत्त्वाची गोष्ट म्हणजे स्लरी घातल्यापासून जेमतेम तीन ते चार दिवसांत गॅसनिर्मिती सुरू होते. याचा खर्चही सहज परवडण्याजोगा आहे. कारण स्वस्त प्लॅस्टिकचा वापर त्यात केला आहे. या संयंत्राला 'अॅश्डेन' हे संशोधनाबद्दलचे मानाचे पारितोषिक दिले गेले आहे. उसाची चिपाडे, उसापासून साखर तयार करताना निर्माण होणारी मळी यांचा वापर करून मोठय़ा प्रमाणावर बायोगॅस तयार करावा व त्यापासून वीजनिर्मिती करावी, अशा स्वरूपाचा विचार सध्या मांडला जात आहे. अर्थातच हे प्रकल्प व्यावसायिक तत्वावरचे व प्रचंड पैसा लागणारे आहेत.स्वस्त, स्वच्छ इंधन व कचर्याचे प्रदूषण टाळणारे इंधन म्हणून बायोगॅसकडे आपण पाहिले तर त्याची उपयुक्तता मोलाची ठरते.*'सृष्टी विज्ञानगाथा' या पुस्तकातून*👆*संकलन :- श्याम ठाणेदार, पुणे*••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• 🌹 *" फ्रेश सुविचार "* 🌹••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••*ज्यांचे डोळे चांगले ते जगाच्या प्रेमात पडतात, पण ज्यांची जीभ गोड असेल तर जग त्यांच्या प्रेमात पडते**संकलन :- प्रमिलाताई सेनकुडे**ता. हदगाव जि. नांदेड*📱9403046894••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• ❓ *आजची प्रश्नमंजुषा* ❓••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••१) *'जागतिक एड्स निर्मूलन दिवस'* केव्हा साजरा केला जातो ?२) लोकशिक्षण दिन केव्हा साजरा केला जातो ?३) भारतातील कोणत्या शहराला युनेस्कोने *'संगीताचे शहर'* म्हणून मान्यता दिली आहे ?४) महाराष्ट्रातील जायकवाडी प्रकल्पाला काय म्हणतात ?५) भारतीय सेनेचे तीन दल कोणते ? *उत्तरे :-* १) १ डिसेंबर २) १ डिसेंबर ३) ग्वाल्हेर ४) नाथसागर ५) भूदल, नौदल, वायुदल*संकलन :- जैपाल भै. ठाकूर*जि.प.व.प्राथ.शाळा भोसा, ता. आमगाव, जि. गोंदिया 📱9765943144••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎂 *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *◆|वा|ढ|दि|व|स|अ|भि|ष्ठ|चिं|त|न|◆* ◆ श्याम दरबस्तेवार, शिक्षक◆ हेमंत भेंडे, शिक्षक◆ राजकुमार दाचावार, शिक्षक◆ श्याम नरवाडे◆ मारुती गिरगावकर, शिक्षक◆ विठ्ठलराव मुजळगे, शिक्षक◆ मारोती दिंडे◆ श्रीकांत लाडे◆ सुभाष सोनटक्के◆ शिवाजी पुरी◆ श्याम पाटील◆ विश्वनाथ पांचाळ◆ बालाजी कलकोटे*ઉदंड_आયુષ્યાच्या अનંત_શુभेच्छा*[ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा एक दिवस अगोदर 9423625769 येथे पोस्ट करावे. ]••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• ••• 💡 ‼ *मनाचे श्लोक*‼ 💡•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••महाभक्त प्रल्हाद हा कष्टवीला। म्हणोनी तयाकारणे सिंह जाला॥ न ये ज्वाळ वीशाळ संनधि कोणी। नुपेक्षी कदा देव भक्ताभिमानी॥१२१॥।। जय जय रघुवीर समर्थ ।।•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *🎯 आजचे विचारवेध......✍🏻*•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• ज्यांच्या मुखावाटे निघणारे शब्द जर अडखळत असतील तर त्या शब्दांमध्ये ठाम विश्वास नसतो किंवा मनातले विचार स्पष्टपणे मांडता येत नाहीत.अशी ज्यांची परिस्थिती झालेली असते तेव्हा एकतर मनातून खचलेला असेल किंवा कुणाच्यातरी दडपणाखाली असेल.अशा परिस्थितीतून बाहेर पडायचे असेल तर पहिल्यांदा आपल्या मनातली जी काही भीती असेल किंवा दडपण असेल ते काढून टाकायला हवे.अशावेळी आपला आत्मविश्वास आपणच वाढवला पाहिजे.माझ्या मनावर कुणाचेही दडपण नाही किंवा जरी असले तरी ते काहीच करु शकत नाही.आपण त्याला खंबीरपणे प्रत्युत्तर देऊ आणि आपण पूवस्थितीत येऊ अशी धारणा मनामध्ये उत्पन्न करुन पूर्वीसारखे जीवन जगू असा विश्वास जागृत करायला हवा तरच मग आपल्या मुखावाटे निघणारे शब्द स्पष्टपणे यायला लागतील आणि आपले जे काही विचार असतील ते समोरच्या व्यक्तीला समजायला लागतील यात काही संशय नाही.जर आपणच घाबरायला लागलो तर समोरची व्यक्तीही आपल्याला जास्तच घाबरून टाकेल आणि आपला जो काही आत्मविश्वास आहे तोही कमी करुन टाकेल.म्हणून परिस्थिती कशीही असो त्या परिस्थितीला घाबरुन न जाता त्याला तोंड द्यायला शिकले पाहिजे.© व्यंकटेश काटकर, नांदेड.संवाद..९४२१८३९५९०/८०८७९१७०६३🍀🌸🍀🌸🍀🌸🍀🌸🍀••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎭 *आजची फ्रेश बोधकथा* 🎭••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••*📿अहंकाराची शिक्षा📿*खूप घनदाट जंगल होतं. त्या जंगलात एक आंबा आणि पिंपळाचे झाड होते. एकदा मधमाशांचा थवा त्या जंगलात राहायला आला, पण मधमाशांच्या थव्याला राहण्यासाठी दाट झाडाची गरज होती. जेव्हा राणी मधमाशीची नजर त्या पिंपळाच्या झाडावर पडली तेव्हा राणी मधमाशी पिंपळाच्या झाडाला म्हणाली - हे पिंपळ भाऊ, मी तुझ्या या घनदाट झाडाच्या फांदीवर माझ्या कुटुंबासाठी पोळे बनवू शकते का ?पिंपळाला कोणी त्रास देणे हे पिंपळाला पसंत नव्हते. अहंकार व उद्धटपणामुळे पिंपळ राणी मधमाशीला रागाने म्हणाला, जा इथून जा आणि तुझे पोळे दुसरीकडे कर. मला त्रास देऊ नकोस. पिंपळाचे बोलणे ऐकून शेजारी उभ्या असलेल्या आंब्याचे झाड म्हणाले, पिंपळ भाऊ, बनवू द्या. पोळे करू द्या. हे तुमच्या शाखांमध्ये सुरक्षित राहतील. पिंपळ आंब्याला म्हणाला, तू तुझं काम कर, तुला एवढी काळजी आहे तर तू तुझ्या फांदीवर मधमाशाचे पोळे करायला का सांगत नाहीस ?यामुळे आंब्याचे झाड राणी मधमाशीला म्हणाले, राणी मधमाशी, तुला हवे असल्यास तू माझ्या फांदीवर तुझे पोळे करू शकतेस. यावर राणी मधमाशीने आंब्याच्या झाडाप्रती कृतज्ञता व्यक्त करत आंब्याच्या झाडावर आपले पोळे बांधले.वेळ निघून गेला आणि काही दिवसांनी काही लाकूडतोडे जंगलात आले. त्या लोकांना एक आंब्याचे झाड दिसले आणि ते आपापसात बोलू लागले की हे आंब्याचे झाड तोडून लाकूड घ्यावे. त्यांनी आपली हत्यारे घेतली आणि आंब्याचे झाड तोडायला सुरुवात केली, तेव्हा एकाने वर बघितले आणि दुसर्याला म्हणाला नाही, ते कापू नका. या झाडावर मधमाशांचे पोळे आहे, जर ते उठले तर आपल्याला वाचणे कठीण होईल. त्याचवेळी एक माणूस म्हणाला, आपण हे पिंपळाचे झाड का तोडत नाही. यामध्ये आम्हाला जास्त लाकूड मिळेल आणि आम्हाला कोणताही धोका होणार नाही.त्या सर्व लाकूडतोड्यानी मिळून पिंपळाचे झाड तोडण्यास सुरुवात केली. पिंपळाचे झाड वेदनेने जोरजोरात ओरडू लागले, वाचवा वाचवा. आंब्याच्या झाडाला पिंपळाच्या ओरडण्याचा आवाज आला, काही लोक मिळून ते पिंपळाला कापत असल्याचे पाहिले. आंब्याचे झाड मधमाशीला म्हणाले, आपण पिंपळाच्या झाडाचे प्राण वाचवले पाहिजे, जेव्हा आंब्याच्या झाडाने मधमाशीला पिंपळाच्या झाडाचे प्राण वाचवण्याची विनंती केली तेव्हा मधमाशांनी लाकूडतोड्यावर हल्ला केला आणि ते आपला जीव वाचवण्यासाठी जंगलातून पळून गेले. पिंपळाच्या झाडाने मधमाशांचे आभार मानले आणि आपल्या उध्दट वर्तनाबद्दल माफी मागितली. मग मधमाश्या म्हणाल्या, आमचे आभार मानू नका, आंब्याच्या झाडाचे आभार मान त्याने तुमचा जीव वाचवला आहे, कारण त्याने आम्हाला सांगितले होते की जर कोणी वाईट केले तर याचा अर्थ असा नाही की आपणही तेच केले पाहिजे. आता पिंपळाला आपल्या कृत्याचा पश्चाताप होत होता आणि त्याचा अहंकारही चक्काचूर झाला होता, पिंपळाच्या झाडालाही त्याच्या अहंकाराची शिक्षा झाली होती.*📍शिक्षण :*आपण कधीही अहंकार बाळगू नये. आपण लोकांना शक्य तितकी मदत केली पाहिजे, जेणे करुन जेव्हा वेळ येईल तेव्हा आपणही मदत मागू शकाल. जेव्हा आपण एखाद्याला मदत करतो तेव्हाच कोणीतरी आपल्याला मदत करेल.•••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••या पोस्ट विषयी आपल्या सूचना, निवेदन, अभिप्राय, बातम्या, वाढदिवस, माहिती किंवा शंका 9423625769 येथे कळवावे. •••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••~~~~~~~~~~~~~~~~~~~*🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢*📱 9423625769~~~~~~~~~~~~~~~~~~~*🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏*पुन्हा भेटू या फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार ~~~~~~~~~~~~~~~~~~~
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment