✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट~~~~~~~~~~~~~~~~~~~ 9️⃣ 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 9️⃣ ( फ्रेश शालेय परिपाठ )🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00 ( रविवार आणि सुट्टी वगळून )~~~~~~~~~~~~~~~~~~~🎇 दिनांक :- 16 डिसेंबर 2023💠 वार - शनिवार~~~~~~~~~~~~~~~~~~~Link - http://nasayeotikar.blogspot.com/2019/12/blog-post_7.html••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🌷🌐 . *दिनविशेष* . 🌐🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *_ विजय दिवस_* •••••••••••••••••••••••••••••••••*_ या वर्षातील ३५० वा दिवस आहे_* •••••••••••••••••••••••••••••••• *_महत्त्वाच्या घटना:_* •••••••••••••••••••••••••••••••• *१९९१:पुर्वीच्या सोविएत संघराज्यातुन (USSR) फुटून कझाकस्तान हा स्वतंत्र देश झाला.**१९८५:कल्पक्कम येथील ’इंदिरा गांधी अणूसंशोधन केंद्रातील (IGCAR) प्रायोगिक ’फास्ट ब्रीडर रिअॅक्टर’ राष्ट्राला समर्पित**१९७१:भारत पाक युद्ध – पाक सैन्याची शरणागती,बांगलादेशची निर्मिती**१९४६:थायलँडचा संयुक्त राष्ट्रांत (United Nations) प्रवेश**१९३२:’प्रभात’चा ’मायामच्छिंद्र’ हा चित्रपट प्रदर्शित झाला.**१९०३:मुंबईतील ताजमहाल पॅलेस हॉटेल ग्राहकांसाठी खुले करण्यात आले.**१७७३:अमेरिकन राज्यक्रांती – बॉस्टन टी पार्टी* *_जन्मदिवस / जयंती / वाढदिवस:_* ••••••••••••••••••••••••••••••••••••••*१९९०:शुभांगी सोमनाथ जाधव-काशीकर-- कवयित्री* *१९८६:हर्षदीप कौर-- भारतीय पार्श्वगायिका* *१९७२:डॉ.अस्मिता संजय हवालदार -- लेखिका**१९६९:वनिता अरुण गावंडे-- ज्येष्ठ लेखिका**१९६९:सुवर्णा गोरख पवार - जेष्ठ लेखिका* *१९५९:प्रा.हेमंत पंढरीनाथ जुन्नरकर-- लेखक* *१९५८:डॉ.लता प्रकाश महाजन -- कवयित्री, लेखिका* *१९४९:डॉ.वसंत काळपांडे -- जेष्ठशिक्षण तज्ज्ञ,लेखक,मुख्य संयोजक,शिक्षण विकास मंच,यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान,मुंबई.तथा निवृत्त शिक्षण संचालक**१९४४:उल्हास भगवान सुतावणे-- लेखक* *१९४२:सुरेश दत्तात्रय साठे-- लेखक**१९४०:दिगंबर गोविंदराव मुंढे -- कादंबरीकार**१९३८:प्रा.डॉ.योगेंद्र लक्ष्मण मेश्राम -- लेखक**१९३७:कल्याण वासुदेव काळे-- मराठी लेखक आणि मराठी भाषा,साहित्य ह्या विषयाचे अभ्यासक(मृत्यू:१७ जानेवारी२०२१)**१९३३:प्रभाकर भानुदास मांडे -- प्रसिद्ध लोकसाहित्य अभ्यासक,लेखक**१९२६:साजाबा विनायक (बबन) प्रभू -- लेखक (मृत्यू:२७ आगस्ट १९८१)* *१९२१:प्रा.कुसुमताई साठे -- लेखिका, कवयित्री,संपादिका (मृत्यू:३ फेब्रुवारी १९९१)**१९१७:सर आर्थर सी.क्लार्क – विज्ञान कथालेखक व संशोधक (मृत्यू:१९ मार्च २००८)**१८८२:जॅक हॉब्ज – इंग्लिश क्रिकेट खेळाडू (मृत्यू:२१ डिसेंबर १९६३)**१७७५:जेन ऑस्टिन – इंग्लिश लेखिका (मृत्यू:१८ जुलै १८१७)**१७७०:लुडविग व्हान बीथोव्हेन या कर्णबधिर संगीतकाराचा जन्म. मी स्वर्गात नक्कीच संगीत ऐकू शकेन,हे त्याचे अखेरचे शब्द होते. (मृत्यू:२६ मार्च १८२७)* *_मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन:_* ••••••••••••••••••••••••••••••••••••••*२००४:लक्ष्मीकांत बेर्डे – अभिनेता (जन्म:३ नोव्हेंबर १९५४)**२०००:सुमारे ४० वर्षे नवनवे चित्तथरारक खेळ व कसरती सादर करुन परदेशातही वाहवा मिळवलेले सर्कस सम्राट काशिनाथ सखाराम तथा बंडोपंत देवल यांचे वयाच्या १०१ व्या वर्षी मिरज येथे निधन झाले. त्यांनी वयाच्या अकराव्या वर्षी सर्कसमधे काम करण्यास सुरूवात केली होती.(जन्म: १८९९)**१९८०:कर्नल सँडर्स – ’केंटुकी फ्राईड चिकन’ (KFC) चे संस्थापक (जन्म:९ सप्टेंबर १८९०)**१९६५:डब्ल्यू. सॉमरसेट मॉम – इंग्लिश लेखक व नाटककार(जन्म:२५ जानेवारी १८७४)**१९६०:चिंतामण गणेश कर्वे – मराठी कोशकार व लेखक,महाराष्ट्र शब्दकोश, महाराष्ट्र वाक्संप्रदाय कोश,शास्त्रीय परिभाषा कोश यांचे संपादक (जन्म:४ फेब्रुवारी १८९३)*~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~ *_दिनविशेष या सदरातील सर्व मुद्दे हे संग्रहात्मक आहेत तेव्हा त्यात चूका नसतीलच असे सांगता येणार नाही_* *✍ संकलन ✍* *श्रीराम चव्हाण माजी शिक्षणाधिकारी,नागपूर*मोबाईल:9822695372 ईमेल: chavhansk65@gmail.com••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *✈ 🚀 गुगलयान ✈ 🚀*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••*एक देश, एक ओळखपत्र*राष्ट्रीय मतदार पडताळणी मोहिमेतून मतदार याद्याचे शुद्धीकरण करण्यात येणार असून बोगस मतदान टाळण्यासाठी देशभर एक व्यक्ती एक मतदान करण्याचा निवडणूक आयोगाने निर्णय घेतला असल्याची बातमी नुकतेच वाचण्यात आले. खरोखरच त्यांच्या या निर्णयाचे स्वागत करायलाच हवे. आजची मतदार यादी जर नजरेखालून घातली तर असे लक्षात येते की ............पूर्ण लेख वाचण्यासाठी वरील निळ्या अक्षरावर क्लीक करावे. ~~~~~~~~~~~~~~~~~~~ 🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••1⃣ *मुख्य कार्यकारी अधिकारी विकास मीना यांचा अनोखा उपक्रम : छत्रपती संभाजीनगरात विद्यार्थ्यांच्या नव्हे जिल्हा परिषदेने आयोजित केल्या चक्क पालकांच्या क्रीडा स्पर्धा*•••••••••••••••••••••••••••••••••••••2⃣ *उत्तर भारत गारठला ! शिमल्यापेक्षा दिल्लीत कमी तापमानाची नोंद*•••••••••••••••••••••••••••••••••••••3⃣ *आमदार अपात्रतेसंबंधी निकालासाठी विधानसभा अध्यक्षांची मुदत वाढवली, 10 जानेवारीपर्यंत निर्णय द्या, सुप्रिम कोर्टाचे निर्देश*•••••••••••••••••••••••••••••••••••••4⃣ *विरोधी पक्षातील मोजक्याच नेत्यांना निधी, बाकींच्यांना काहीच नाही, निधीवाटपावरून जितेंद्र आव्हाडांची नाराजी*•••••••••••••••••••••••••••••••••••••5⃣ *काशी बनतयं पर्यटन केंद्र, वार्षिक उलाढाल 20,000 कोटींच्या पुढे; अर्थव्यवस्था मजबूत होण्यास मदत*•••••••••••••••••••••••••••••••••••••6⃣ *पुणे गारठणार! 18 डिसेंबरपासून तापमानात आणखी घट होण्याची शक्यता हवामान विभागाने व्यक्त केली आहे.*•••••••••••••••••••••••••••••••••••••7⃣ *मुंबई इंडियन्सच्या कर्णधारपदाची धुरा हार्दिक पांड्याच्या खांद्यावर सोपवण्यात आली आहे.*•••••••••••••••••••••••••••••••••••••*📷 वृत्त संकलक - कुणाल पवारे 📹*📱9960358300•••••••••••••••••••••••••••••••••••••ही पोस्ट नियमित मिळविण्यासाठी आणि या समुहात add होण्यासाठी 9423625769 येथे संपर्क करावे.••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• 🌷🍃 *विशेष माहिती* 🌷🍃••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🐝 *मधमाशा* 🐝*****************नैसर्गिकरीत्या माणसाला ज्ञात असलेला गोड पदार्थ म्हणजे मध. साखरेचा वापर सुरू होण्याआधी अनेक ठिकाणी मधाचाच वापर केला जात असे. आजही मध आरोग्यदायी समजला जातो. हा मध मधमाशा गोळ्या करतात. मधमाशा जगभर आढळतात. संख्येने प्रचंड प्रमाणावर आढळणारी ही जात एखाद्या जमातीप्रमाणे वा कुटुंबाप्रमाणे राहते. अर्थातच एका पोळ्यामध्ये आढळणाऱ्या मधमाशा या त्या कुटुंबाच्याच घटक असतात. त्या तेथेच जन्माला येतात व वाढतात.षटकोनी आकाराची, एकात एक गुंतलेली सलग रचना असलेली मधाची पोळी वा स्वतःची वसतिस्थाने बांधण्याचे काम कामकरी माशा करतात, तर या पोळ्यात राहून फक्त अंडी घालून ती वाढविण्याचे काम राणी माशी करत असते. मुंग्या व अन्य किटकांच्या प्रमाणे या बाबतीत खूपच साधर्म्य आढळते. मोजकेच नर या पोळ्यात असू शकतात. नवीन राणीमाशीबरोबर संयोग झाल्यावर हे नर काही काळातच मरूनही जातात व राणीमाशी स्वतःचे घर बांधायला घेते. नवीन पोळे जन्माला येते.ज्या जंगलात ज्या प्रकारची झाडे असतील, फुले असतील, त्यांतील मध गोळा करून तो पोळ्यात साचवण्याचे काम मधमाशा अथकपणे करत असतात. हा मधाचा साठा जसजसा वाढत जातो, तसतसा पोळ्याचा आकार वाढत जातो. पोळे हे मुलत: नैसर्गिक मेणाचे बनलेले असते. मधाची चव फुलांनुसार बदलते.फुलामधील मध स्वतःच्या सोंडेने शोषून घ्यायचा व तो पोळ्यात आणून साठवायचा, ही क्रिया करत असताना मधमाशी आणखीही दोन कामे करते. एका फुलाचे परागकण पंखांना लागतात, ते दुसऱ्या फुलावर नंतर टाकले जाऊन वनस्पतींचे पुंसवन होते. याचवेळी मागील पायांना लागलेले परागकण पोळ्यात आणले जातात व ते नुकत्याच अंड्यांतून बाहेर पडलेल्या अळ्यांना खायला दिले जातात. यांवरच त्यांचे पोषण होते. काही काळातच त्यांचे पूर्ण मधमाशीत रूपांतर होते. मधमाशीचे आयुष्य हे सहसा ऋतूपरतेच मर्यादित असते. त्यातही ती जर कोणाला डसली तर शरीराच्या मागील टोकाला असलेली नांगी काटेदार रचनेमुळे तेथेच रुतून अडकते. नांगी शरीराला जोडणाऱ्या स्नायूंनाही दुखापत होऊन मधमाशी स्वतःचा जीव गमावते. ही वस्तुस्थिती लक्षात घेतली म्हणजे मधमाशी उगाचच हल्ला करून चावणार नाही, याची खात्री पटेल. पोळ्याला धोका आहे, हे कळल्यावर मात्र हजारो माशा आसपासच्या सर्वांवर हल्ला चढवतात.मधमाशांचा मध गोळा करण्याचा गुण लक्षात घेऊनच मधुमक्षिकापालन पेटी तयार केली गेली आहे. यात पोळे तसेच ठेवून सेंट्रीफ्युगल फोर्सने मध फक्त काढून घेतला जातो. रिकाम्या पोळ्यात मधमाशा पुन्हा मध गोळा करू लागतात.मधमाशा व गांधील माशा या दोन जाती तशा पोटजातीच आहेत. फक्त गांधीलमाशा मध गोळा करत नाहीत. त्यांची पोळी लहान असतात. त्या चावल्या तर जास्त त्रास होतो. आकाराने मधमाशीपेक्षा मोठ्या व लालभडक रंगाच्या असतात.मधमाशा एकमेकांना संदेश कसा देतात, हे मोठे विलक्षण आहे. एखादी माशी फुलांचा शोध घेऊन आल्यावर ती एक प्रकारचा नर्तनाचा प्रकार करून तिच्या सहचरींना फुलांची दिशा व अंतर यांची माहिती पुरवते. बघता बघता पोळ्यातील माशा तिकडे जातात. या संदेशव्यवस्थेचे अजूनही नीटसे आकलन झालेले नाही.*'सृष्टी विज्ञानगाथा' या पुस्तकातून**संकलन :- श्याम बसप्पा ठाणेदार, पुणे*•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🌹 *" फ्रेश सुविचार "* 🌹•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••*" चारित्र्यात सूर्याची तेजस्विता अन अंत:करणात चंद्राची शीतलता हवी. "**संकलन :- प्रमिलाताई सेनकुडे**ता. हदगाव जि. नांदेड*📱9403046894••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• ❓ *आजची प्रश्नमंजुषा* ❓••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••१) शिंपी पक्षी कशापासून घरटे बनवतात ?२) राज्यघटनेत कलम ३७० चा समावेश कोणत्या दिवशी झाला होता ?३) भारतात सध्या पेट्रोलमध्ये किती टक्के इथेनॉल मिसळल्या जात आहे ?४) महाराष्ट्रातील पहिले पाण्याचे खासगीकरण करणारे शहर कोणते ?५) 'महाराष्ट्र मेला तर राष्ट्र मेले, मराठ्यांविना राष्ट्र गाडा न चाले, खरा वीर वैरी पराधीनतेचा, महाराष्ट्र आधार या भारताचा' हे उद्गार कोणाचे आहेत ? *उत्तरे :-* १) झाडांच्या पानांना शिवून २) १७ ऑक्टोबर १९४९ ३) १० टक्के ४) चंद्रपूर ५) सेनापती बापट*संकलन :- जैपाल भै. ठाकूर*जि.प.व.प्राथ.शाळा भोसा, ता. आमगाव, जि. गोंदिया 📱9765943144••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎂 *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *◆|वा|ढ|दि|व|स|अ|भि|ष्ठ|चिं|त|न|◆* 👤 मा. खा. हेमंत पाटील, हिंगोली लोकसभा खासदार👤 डॉ. वसंत काळपांडे, मुंबई👤 डॉ. गजानन चौधरी, नांदेड👤 डॉ. शिवशक्ती पवार, नांदेड👤 उमेश कोटलवार, सहशिक्षक, रत्नागिरी👤 योगेश गुजराथी, धर्माबाद👤 शिवकुमार उपलंचवार, देगलूर👤 विजय सोनोने, सहशिक्षक, वाशीम👤 नरेश पांचाळ, धर्माबाद👤 श्याम पेरेवार👤 *ઉदंड_आયુષ્યાच्या अનંત_શુभेच्छा*[ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा एक दिवस अगोदर 9423625769 येथे पोस्ट करावे. ]••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• ••• 💡 ‼ *मनाचे श्लोक*‼ 💡•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••भयें व्यापिले सर्व ब्रह्मांड आहे। भयातीत तें संत आनंत पाहे॥ जया पाहतां द्वैत कांही दिसेना। भयो मानसीं सर्वथाही असेना॥१३६॥।। जय जय रघुवीर समर्थ ।।••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🕊🌎 ‼ *विचारधारा*‼🕊🌎••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• इतरांविषयी नको त्या शब्दात बोलून स्वतः चा समाधान करून घेण्यात स्वतःला धन्य समजणारे. समाजात अनेक दिसतील खऱ्या अर्थाने तेच रिकामे असतात, त्यांच्याकडे खूप वेळ असतो. इतरांचे भले कशाप्रकारे केले जाते याकडे मात्र लक्ष द्यायला त्यांच्याकडे वेळ नसतो. पण, आजही याच समाजात असे काही व्यक्तीमत्व आहेत की, स्वतः साठी जगायला त्यांना वेळ मिळत नाही ते व्यक्तीमत्व अभिमानाचे दुसरे नाव असतात. समाजात माणसं तर भरपूर आहेत पण, विचारसरणी मात्र एकसारखी दिसून येत नाही. जर इतरांसाठी चांगले करता येत नसेल तर चांगले करणाऱ्यांच्या वाटेत काटे पेरू नये.🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷सौ.संगीता संतोष ठलाल मु. कुरखेडा जि. गडचिरोली••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎭 *आजची फ्रेश बोधकथा* 🎭••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *राणीने घेतलेली परीक्षा*एकदा शिबा राज्याच्या राणीने राजा सलोमन या प्रसिद्ध आणि चतुर राजाचा चातुर्याची परीक्षा घ्यायचे ठरवले. एके दिवशी ती फुलांचे दोन हार घेऊन राजाकडे गेली. दोन्ही हार दिसायला अगदी सारखे दिसत होते. पण एक हार खरोखरचा फुलांचा होता; तर दुसरा हार कागदी फुलांचा होता. राणीने दोन हातात दोन हार धरले ती राजाच्या समोर उभी राहिली ती राजाला म्हणाली, " हे चतुर, राजा या दोन हारा पैकी कोणता हार खऱ्या फुलांचा आहे हे मला सांग. जागेवरून न उठता तू मला याचे उत्तर दे."दोन्ही हार बारकाईने पाहिले.दोन्ही हार सारखे दिसत होते.कोणता हार खऱ्या फुलांचा आहे हे त्याला ओळखता येईना. हार फक्त पाहून त्यातील फरक ओळखणे अवघड आहे, हे त्याला कळले. राजा विचार करू लागला. त्याला एक नामी युक्ती सुचली. महालाच्या एका बाजूला फुलबाग होती. राजाने सेवकाला महालाच्या त्या बाजूची खिडकी उघडायला सांगितली. सेवकाने खिडकी उघडली. त्या बरोबर बागेतील मधमाश्या आत आल्या आणि राणीच्या उजव्या हातातील हाराभोवती फिरू लागल्या.राजाने स्मित केले आणि म्हणाला, " माझ्या बागेतील मधमाशांनी मला तुझ्या प्रश्नाचे उत्तर सांगितले आहे. तुझ्या उजव्या हातातील हार खऱ्या फुलांचा आहे." राणीने राजाला आदराने अभिवादन केले आणि म्हणाली," हे राजा, तुझे उत्तर बरोबर आहे. तू खरोखरच हुशार आहेस."*तात्पर्यः माणसाने योग्यवेळी शक्तीचा, बुद्धीचा, व युक्तीचा वापर केला तर जीवनात कोणतीही परीक्षा, गोष्ट अवघड नाही.*•••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••या पोस्ट विषयी आपल्या सूचना, निवेदन, अभिप्राय, बातम्या, वाढदिवस, माहिती किंवा शंका 9423625769 येथे कळवावे. •••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••~~~~~~~~~~~~~~~~~~~*🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢*📱 9423625769~~~~~~~~~~~~~~~~~~~*🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏*पुन्हा भेटू या फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार ~~~~~~~~~~~~~~~~~~~
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment