✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट~~~~~~~~~~~~~~~~~~~ 9️⃣ 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 9️⃣ ( फ्रेश शालेय परिपाठ )🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00 ( रविवार आणि सुट्टी वगळून )~~~~~~~~~~~~~~~~~~~🎇 दिनांक :- 18 डिसेंबर 2023💠 वार - सोमवार~~~~~~~~~~~~~~~~~~~Link - https://nasayeotikar.blogspot.com/2019/01/blog-post_28.html••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🌷🌐 . *दिनविशेष* . 🌐🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••*_अल्पसंख्याक हक्क दिन_**_आंतरराष्ट्रीय स्थलांतरित दिन_*••••••••••••••••••••••••••••••••*_ या वर्षातील ३५२ वा दिवस आहे_* •••••••••••••••••••••••••••••••• *_महत्त्वाच्या घटना:_* •••••••••••••••••••••••••••••••• *२००६:संयुक्त अरब अमिरातींमध्ये (UAE) प्रथमच निवडणूका घेण्यात आल्या.**१९९५:अहिंसक मार्गाने सामाजिक, आर्थिक व राजकीय परिवर्तनासाठी केलेल्या प्रयत्नांबद्दल पहिला आंतरराष्ट्रीय गांधी शांतता पुरस्कार टांझानियाचे माजी अध्यक्ष ज्यूलिअस न्येरेरे यांना जाहीर.**१९८९:सव्यसाची मुकर्जी यांनी भारताचे २० वे सरन्यायाधीश म्हणुन कार्यभार सांभाळला.**१९७८:डॉमिनिकाचा संयुक्त राष्ट्रांत (United Nations) प्रवेश**१९३५:श्रीलंकेत ’लंका सम समाज पार्टी’ची स्थापना* *_जन्मदिवस / जयंती / वाढदिवस:_* ••••••••••••••••••••••••••••••••••••••*१९८८:स्वालिया नजरुद्दीन सिखलगार -- पत्रकार,लेखिका* *१९८६:ऋचा चढ्ढा-- भारतीय अभिनेत्री, निर्माती* *१९७६:राजेश काटोले --वऱ्हाडी स्तंभलेखक, कवी**१९७६:संदीप देशमुख गणोजेकर -- कवी* *१९७५:दादाराव डोल्हारकर -- कवी,लेखक तथा मुख्याधिकारी**१९६९:डॉ.चिंदानंद आप्पासाहेब फाळके-- कवी,लेखक* *१९६३:ब्रॅड पिट – अमेरिकन अभिनेता व निर्माता**१९६२:हेमंत नारायण जोशी-- कवी* *१९६२:संजय नार्वेकर-- भारतीय अभिनेता**१९६१:लालचंद सीताराम राजपूत- भारतीय क्रिकेट प्रशिक्षक आणि माजी क्रिकेटपटू* *१९५९:रमेश पांडुरंग पुंडलिक-- लेखक,कवी**१९५७: संजीवनी जयंत तोफखाने -- कवयित्री,लेखिका* *१९५४:विजय वसंत तरवडे-- लेखक संपादक**१९४०:कृष्णा कल्ले-- मराठी,हिंदी आणि कन्नड चित्रपटांमधील भारतीय पार्श्वगायिका (मृत्यू:१५ मार्च २०१५)**१९३५:प्रा.वामन सदाशिव पात्रीकर-- मराठीतले कथा-कादंबरीकार आणि मुलांसाठी नाटके लिहिणारे नाटककार (मृत्यू: १९ एप्रिल २००३)**१९३१:सदाशिव शिवराम भावे-- समीक्षक(मृत्यु:३ऑक्टोबर १९८६)**१९३०:रमेश अच्युत तेंडुलकर--कवी,लेखक आणि समीक्षक (मृत्यू:१९ मे १९९९)**१९२७:पंडित किसनराव पाडळकर-- लेखक, संपादक(मृत्यू:१६ जुलै १९९८)* *१९२६:सुरेश हळदणकर --भारतीय शास्त्रीय गायक,अभिनेता(मृत्यू:१८ जानेवारी २०००)**१९२६:प्रा.डॉ.वसंत अनंत शहाणे-- लेखक**१९२३:भास्करराव आनंदराव पांढरीपांडे-- कवी (मृत्यू:३ मे १९९३)**१९२२:सदानंद भटकळ -- लेखक,कवी* *१९२०:माधव कृष्ण पारधी -- जेष्ठ पत्रकार, कवी,लेखक,संपादक* *१९१८:वासुदेव यशवंत गाडगीळ-- नाट्य चित्र समीक्षक लेखक (मृत्यू:१७ जुलै २००१)**१८९०:ई.एच.आर्मस्ट्राँग – एफ.एम.रेडिओचे संशोधक (मृत्यू:३१ जानेवारी १९५४)**१८८७:भिखारी ठाकूर – भोजपुरी भाषेचे 'शेक्सपिअर’ (मृत्यू:१० जुलै १९७१)**१८७८:जोसेफ स्टालिन – सोविएत रशियाचे राष्ट्राध्यक्ष (मृत्यू:५ मार्च १९५३)**१८५६:सर जे.जे.थॉमसन – इलेक्ट्रॉनच्या शोधाबद्दल १९०७ चे नोबेल पारितोषिक विजेते इंग्लिश भौतिकशास्त्रज्ञ (मृत्यू:३० ऑगस्ट १९४०)**१६२०:हेन्रिच रॉथ – जर्मनीतील संस्कृत विद्वान आणि धर्मप्रसारक (मृत्यू:२० जून १६६८)* *_मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन:_* ••••••••••••••••••••••••••••••••••••••*२००४:विजय हजारे – क्रिकेटपटू (जन्म:११ मार्च १९१५)**२०००:मुरलीधर गोपाळ तथा मु.गो.गुळवणी – इतिहास संशोधक,वैदिक संस्कृतीचे अभ्यासक(जन्म:६ फेब्रुवारी १९२५)* *१९९५:कमलाकरबुवा औरंगाबादकर – राष्ट्रीय कीर्तनकार**१९९३:राजा बारगीर – चित्रपट दिग्दर्शक. सुमारे नव्वद मराठी व हिन्दी चित्रपटांचे दिग्दर्शन त्यांनी केले.* *१९८०:अलेक्सी कोसिजीन – रशियाचे पंतप्रधान (जन्म:२० फेब्रुवारी १९०४)**१८२९:जीन बाप्टिस्टे लॅमार्क – फ्रेंच शास्त्रज्ञ (जन्म:१ ऑगस्ट १७४४)*~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~ *_दिनविशेष या सदरातील सर्व मुद्दे हे संग्रहात्मक आहेत तेव्हा त्यात चूका नसतीलच असे सांगता येणार नाही_* *✍ संकलन ✍* *श्रीराम चव्हाण माजी शिक्षणाधिकारी,नागपूर*मोबाईल:9822695372 ईमेल: chavhansk65@gmail.com••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *✈ 🚀 गुगलयान ✈ 🚀*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••*ऑफरचा भुलभुलैय्या*कमी श्रमात जास्त संपत्ती मिळावी असे प्रत्येक मनुष्याला वाटणे म्हणजे आपल्या अंगात असलेल्या आळशीपणाला उत्तेजन देणे होय. ज्या ज्या वेळी मनुष्य असे प्रयत्न करत आला आहे त्या त्यावेळी त्याला उदासीनते शिवाय काहीही मिळाले नाही. तरी सुद्धा माणूस अश्या घटनेतून काही बोध न घेता पुन्हा तश्याच काही बाबीच्या शोधात राहतो. मी गोष्ट करतोय ऑफरची .........!पूर्ण लेख वाचण्यासाठी वरील लिंकवर क्लीक करावे. ~~~~~~~~~~~~~~~~~~~ 🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••1⃣ *2024 मध्ये भाजपचा ऐतिहासिक विजय होणार, सूरतमध्ये पंतप्रधान मोदींनी व्यक्त केला विश्वास*•••••••••••••••••••••••••••••••••••••2⃣ *राममंदिराच्या लोकार्पण सोहळ्याला अयोध्येसाठी 19 जानेवारी 2024 पासून 1000 हून अधिक रेल्वेगाड्या धावणार*•••••••••••••••••••••••••••••••••••••3⃣ *या महिनाअखेर नवी मुंबई महापालिकेच्या परिवहन उपक्रमात १० इलेक्ट्रिक वातानुकुलित डबलडेकर बसगाड्या दाखल होणार आहेत.*•••••••••••••••••••••••••••••••••••••4⃣ *विविध मागण्यांसाठी ग्रामसेवक आक्रमक, तीन दिवस कामबंद आंदोलन करणार असल्याची माहिती अहमदनगर जिल्हा संघटनेचे नेते एकनाथ ढाकणे यांनी दिली*•••••••••••••••••••••••••••••••••••••5⃣ *लिबियाच्या समुद्रकिनाऱ्याजवळ बोट बुडून युरोपला जाणाऱ्या 60 स्थलांतरितांचा मृत्यू झाल्याची शक्यता*•••••••••••••••••••••••••••••••••••••6⃣ *नागपूरच्या सोलार कंपनीतील स्फोटात ९ जणांचा मृत्यू, कामगारांची प्रवेशद्वारावर घोषणाबाजी, अखेर पोलिसांकडून सौम्य लाठीचार्ज*•••••••••••••••••••••••••••••••••••••7⃣ *भारताने पहिल्या एकदिवसीय सामन्यात दक्षिण आफ्रिकेचा 8 विकेटनी केला पराभव*•••••••••••••••••••••••••••••••••••••*📷 वृत्त संकलक - कुणाल पवारे 📹*📱9960358300•••••••••••••••••••••••••••••••••••••ही पोस्ट नियमित मिळविण्यासाठी आणि या समुहात add होण्यासाठी 9423625769 येथे संपर्क करावे.••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• 🌷🍃 *विशेष माहिती* 🌷🍃••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••📒 *पोटात कावळे का ओरडतात ?* 📒 'पोटात कावळे ओरडतात' ही अलंकारिक भाषा झाली. खरोखरच पोटात कोणतेही पक्षी वा प्राणी जाऊन बसत नाहीत. पोटात होणाऱ्या आवाजाला उद्देशून ही भाषा वापरली गेली आहे. भूक लागली म्हणजेच पोटात कावळे ओरडतात किंवा हे आवाज होतात हेही खरं नाही. वास्तविक हे आवाज नेहमीच होत असतात.आपली पचनसंस्था म्हणजे तोंडापासून गुदद्वारापर्यंत पसरलेली एक लांबलचक पोकळ नळीच असते. तोंडातल्या घासावर दात आणि लाळ यांचा प्रभाव पडला की त्याचा एक लगदा तयार होतो. हा लगदा मग त्या नळीतून पुढे पुढे सरकू लागतो; पण तसं तो स्वतःच्या जीवावर करू शकत नाही. त्यासाठी त्याला तोंडातून अन्ननलिकेच्या मार्गानं जठरात उतरावं लागतं. तिथं त्याचं पचन होऊन तो आणखी पातळ होतो. तिथून तो मग आतड्यांच्या आणखी अरुंद नळीत उतरतो. या अरुंद नळ्यांमधला त्याचा प्रवास सुकर होतो. कारण त्या नळ्याही त्या प्रवासाला मदत करत असतात. आपल्या पायजम्याच्या नाड्यात एखादी पिन जेव्हा पुढे सरकवायची असते तेव्हा आपण ती पिन जिथे आहे तिथे दाब देऊन तो भाग आकसून घेतो. त्याच्या पुढचा भाग थोडासा पसरत असल्याने ती पुढे सरकते. तशी ती पुढे गेली की आता ती जिथे पोहोचली असेल त्या भागावर दाब देऊन तो आकसून घेतो.पचनसंस्थेच्या नळ्यांमध्येही अशीच हालचाल होत असते. त्यासाठी त्या नळ्यांशी जोडलेले स्नायू आलटून पालटून आकसतात आणि प्रसरण पावतात. स्नायू आकसले की त्या नळीला चिमटा बसतो. तिथे असलेल्या लगद्यावर दाब पडतो. नळीच्या पुढच्या भागाचं त्याचवेळी प्रसरण झालेलं असल्यामुळे सहाजिकच तो लगदा पुढे त्या भागात ढकलला जातो तोवर तो भाग अाकसतो. अशा रीतीने त्या नळीतून एखादी लहर दौडत गेल्यासारखी होते. तो लगदा पुढे पुढे सरकत राहतो.पचनसंस्थेच्या या नळ्यांची ही हालचाल सतत होत असते. हृदयाची जशी सतत होते तशीच. हृदयाच्या या सततच्या आकुंचन प्रसरणापोटी हृदयाची धडधड होते. त्याचा ठोका पडतो. त्या ठोक्याचा आवाज आपण स्टेथोस्कोपमधून ऐकू शकतो. आतड्याच्या या सततच्या आकुंचन प्रसरणापोटीही असाच आवाज होतो. जेव्हा त्या नळ्यांमध्ये अन्नाचा गोळा असतो तेव्हा तो आवाज त्या लगद्यामध्ये जिरतो. तो घुमत नाही; पण जेव्हा त्या नळ्या मोकळ्या असतात तेव्हा तो शोषुन घेणे शक्य होत नाही. उलट तो घुमतो. मोठा होतो. आपल्याला सहज ऐकू येतो. कदाचित आपल्याला पोषणाची गरज आहे, हे सांगण्यासाठी मेंदू त्या नळ्यांशी जोडलेल्या स्नायूंना अधिकच जोरानं आकुंचन प्रसरण करण्याचा आदेश देत असावा. त्यामुळेही तो आवाज मोठा होतो. आपल्याला सहज ऐकू येतो. पोटातल्या कावळ्यांची कावकाव सुरू होते.डॉक्टर बाळ फोंडके यांच्या 'का ?' या पुस्तकातून*संकलन :- श्याम ठाणेदार, पुणे*••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• 🌹 *" फ्रेश सुविचार "* 🌹••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••*" छोटे लोक नसते तर मोठ्या लोकांचे अस्तित्व शून्य असते "**संकलन :- प्रमिलाताई सेनकुडे**ता. हदगाव जि. नांदेड*📱9403046894••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• ❓ *आजची प्रश्नमंजुषा* ❓••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••१) देशात सर्वाधिक लांबीचे महामार्ग कोणत्या राज्यात आहेत ?२) २०२३ चा इंदिरा गांधी पुरस्कार कोणाला जाहीर झाला आहे ?३) डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी किती लोकांसह बौद्ध धर्म स्वीकारला ?४) जगातील कोणत्या विद्यापीठात सर्वाधिक विद्यार्थीसंख्या आहे ?५) मंगळ ग्रहाच्या दोन्ही चंद्राची नावे सांगा ?*उत्तरे :-* १) महाराष्ट्र २) डॅनियल बरेनबोईम - अर्जेंटिना व अली अबू अव्वाद - पॅलेस्टाइन ३) १० लक्ष ४) इंदिरा गांधी मुक्त राष्ट्रीय विद्यापीठ, भारत ५) फोबॉस व डिमॉस*संकलन :- जैपाल भै. ठाकूर*जि.प.व.प्राथ.शाळा भोसा, ता. आमगाव, जि. गोंदिया 📱9765943144••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎂 *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *◆|वा|ढ|दि|व|स|अ|भि|ष्ठ|चिं|त|न|◆* 👤 नितीन वंजे👤 महेश जोगदंड👤 जनार्दन नेउंगरे👤 रवी यमेवार, धर्माबाद👤 उदयराज कोकरे*ઉदंड_आયુષ્યાच्या अનંત_શુभेच्छा*[ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा एक दिवस अगोदर 9423625769 येथे पोस्ट करावे. ]••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• ••• 💡 ‼ *मनाचे श्लोक*‼ 💡•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••भ्रमे नाढळे वित्त तें गुप्त जाले। जिवा जन्मदारिद्र्य ठाकुनि आले॥ देहेबुद्धिचा निश्चयो ज्या टळेना। जुने ठेवणे मीपणे आकळेना॥१३८॥।। जय जय रघुवीर समर्थ ।।••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🕊🌎 ‼ *विचारधारा*‼🕊🌎••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••वेळ प्रसंगी एखादी वस्तू किंवा सामान गहाण ठेवणे वाईट नाही कारण ती, परिस्थिती त्या, प्रकारची असते काही दिवसांनी ते गहाण ठेवलेले सामान सुद्धा सोडवले जाऊ शकते.पण, आपला मेंदू जर गहाण ठेऊन असेल तर मात्र आपल्या स्वभावात किंवा व्यवहारात खूप काही फरक पडू शकतो. म्हणून कितीही काही झाले तरी अशी चूक करू नये ही छोटीशी चूक खुप महागात पडू शकते.म्हणून शक्य तेवढे स्वतंत्र निर्णय घेण्याचा व स्वावलंबी जीवन जगण्याचा प्रयत्न केला पाहिजे.🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷सौ.संगीता संतोष ठलाल मु. कुरखेडा जि. गडचिरोली••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎭 *आजची फ्रेश बोधकथा* 🎭••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *वस्तूची किंमत*एके ठिकाणी एक रेशमाचा किडा होता. तो एके दिवशी आपला रेशमी कोश विणत होता. त्यावेळी शेजारी एक कोळी होता. तो मोठय़ा चपळतेने आपले जाळे विणत होता. तो कोळी त्या किड्याकडे तिरस्काराने पाहून त्याला म्हणाला, 'अरे, माझ्या जाळ्यासंबंधी तुझे काय मत आहे? हे जाळे मी आज सकाळी प्रारंभ केले व आता ते अर्धेअधिक पुरेसुद्धा झाले. एवढे मोठे व इतके सुंदर जाळे मी इतक्या थोड्या वेळात विणले तरी तू आपला रेंगाळतच बसला आहेस.' त्यावर रेशमाचा किडा शांतपणे उत्तरला, 'अरे, तू वाटेल तेवढी बढाई मारलीस तरी तुझ्या व माझ्या जाळ्यातील अंतर सगळ्यांना माहीत आहे. गरीब बिचार्या निरपराधी प्राण्यांना पकडण्यासाठी तू ते जाळे पसरले आहेस, त्याचे आयुष्य किती क्षणिक आहे बरे? एखाद्या मुलाने हे जाळे पाहिले तर तो एका क्षणात याचा नाश करून टाकेल. उलट माझ्या जाळ्यापासून जे रेशीम निघेल, त्याची वस्त्रं पुढे एखाद्या राजाच्याही अंगावर बघावयास मिळतील.तात्पर्यः कोणत्याही वस्तूची किंमत मोठ्या आकारावरून न ठरवता लहानशी वस्तू देखील अतिशय उपयुक्त आणि मौल्यवान असते..•••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••या पोस्ट विषयी आपल्या सूचना, निवेदन, अभिप्राय, बातम्या, वाढदिवस, माहिती किंवा शंका 9423625769 येथे कळवावे. •••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••~~~~~~~~~~~~~~~~~~~*🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢*📱 9423625769~~~~~~~~~~~~~~~~~~~*🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏*पुन्हा भेटू या फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार ~~~~~~~~~~~~~~~~~~~
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment