✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट~~~~~~~~~~~~~~~~~~~ 9️⃣ 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 9️⃣ ( फ्रेश शालेय परिपाठ )🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00 ( रविवार आणि सुट्टी वगळून )~~~~~~~~~~~~~~~~~~~🎇 दिनांक :- 20 डिसेंबर 2023💠 वार - बुधवार~~~~~~~~~~~~~~~~~~~Link - https://nasayeotikar.blogspot.com/2018/12/blog-post_24.html••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🌷🌐 . *दिनविशेष* . 🌐🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••*_ या वर्षातील ३५४ वा दिवस आहे_* •••••••••••••••••••••••••••••••• *_महत्त्वाच्या घटना:_* •••••••••••••••••••••••••••••••• *२०१०:भाषेबाबत मूलगामी अभ्यास करून त्यावर विविधांगी लिखाणे करणारे ज्येष्ठ भाषावैज्ञानिक व समीक्षक अशोक केळकर यांना मानाचा 'साहित्य अकादमी पुरस्कार' जाहीर**१९९९:पोर्तुगालने ’मकाऊ’ हे बेट चीनला परत दिले.**१९९४:राष्ट्रपती डॉ. शंकरदयाळ शर्मा यांच्या हस्ते मलेशियाचे पंतप्रधान डॉ. महाथीर मोहम्मद यांना आंतरराष्ट्रीय सामंजस्यासाठीचा ’जवाहरलाल नेहरू पुरस्कार’ प्रदान**१९७१:झुल्फिकार अली भूट्टो हे पाकिस्तानचे चौथे राष्ट्राध्यक्ष बनले.**१९४५:मुंबई - बंगलोर प्रवासी विमानसेवा सुरू**१९४२:दुसरे महायुद्ध – जपानी फौजांनी कलकत्ता शहरावर बॉम्बवर्षाव केला.**१९२४:हिटलरची लँड्सबर्ग तुरुंगातून सुटका.* *_जन्मदिवस / जयंती / वाढदिवस:_* ••••••••••••••••••••••••••••••••••••••*१९७५:डॉ.माधव सैनाजीराव कुद्रे-कंधारकर-- कवी**१९६९:तानाजी आसबे -- लेखक* *१९६८:प्रतिभा रवींद्र कुलकर्णी-- कवयित्री, लेखिका* *१९६८:प्रा.भारत काळे -- लेखक* *१९६६:प्रा.डॉ.राजेंद्र नाईकवाडे-- प्रसिद्ध लेखक,समीक्षक* *१९६०:रश्मी आनंद देवगडे-- कवयित्री* *१९५७:नंदिनी आत्मसिद्ध-- कवयित्री लेखिका**१९५२:शिरीष गोपाळ देशपांडे-- प्रसिद्ध लेखक,कवी,कादंबरीकार,* *१९५०:श्रीकांत रघुनाथ कोराभे-- लेखक, कवी* *१९४२:राणा भगवानदास – पाकिस्तानातील पहिले ’हिन्दू’ मुख्य न्यायाधीश (Chief Justice)**१९४०:नृसिंह दांडगे -- कवी,लेखक* *१९४०:यामिनी कृष्णमूर्ती – भरतनाट्यम व कथ्थक नर्तिका,पद्मश्री (१९६७)**१९३८:प्रा.मधुकर धोंडबा उपलेंचवार-- लेखक,सामाजिक कार्य**१९२८:मोतीलाल व्होरा-- माजी मुख्यमंत्री, राज्यपाल (मृत्यू:२१ डिसेंबर २०२०)**१९०६:चंदकांत विष्णू बावडेकर-- मराठी मुंबई साहित्य संघाचे १५ वर्ष कार्यवाह असणारे लेखक(मृत्यू:१९ जानेवारी १९७६)**१९०१:रॉबर्ट व्हॅन डी ग्राफ – अमेरिकन पदार्थवैज्ञानिक (मृत्यू:१६ जानेवारी १९६७)**१८९०:जेरोस्लॉव्ह हेरॉव्हस्की – नोबेल पारितोषिक विजेते झेक रसायनशास्त्रज्ञ, ’इलेक्ट्रो केमिकल अॅनॅलेसिस’मधे केलेल्या संशोधनाबद्दल त्यांना नोबेल पारितोषिक देण्यात आले.(मृत्यू:२७ मार्च १९६७)**१८६८:हार्वे फायरस्टोन – अमेरिकन उद्योजक (मृत्यू: ७ फेब्रुवारी १९३८)* *_मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन:_* ••••••••••••••••••••••••••••••••••••••*२०१०:नलिनी जयवंत – अभिनेत्री (जन्म:१८ फेब्रुवारी १९२६)**२०१०:सुभाष भेंडे – प्रसिद्ध लेखक (जन्म:१४ आक्टोबर १९३६)**१९९८:बंगळुरू वेंकट तथा बी. व्ही. रमण – जागतिक कीर्तीचे फलज्योतिषी (जन्म:८ ऑगस्ट १९१२)**१९९६:कार्ल सगन –अमेरिकन अंतराळतज्ञ, लेखक व विज्ञानप्रसारक.(जन्म:९ नोव्हेंबर १९३४)**१९९३:वामन नारायण तथा डब्ल्यू.एन.भट – आंतरराष्ट्रीय कीर्तीचे छायाचित्रकार* *_१९५६ : डेबुजी झिंगराजी जानोरकर ऊर्फ ’संत गाडगे महाराज’ – कमालीचे अज्ञान, अनिष्ट चालीरीती व अंधश्रद्धा पाहून त्यांनी निरपेक्ष सेवेचे व्रत घेतले आणि त्यासाठी कीर्तनाचे माध्यम प्रभावीपणे वापरले.(जन्म: १३ फेब्रुवारी १८७६)_**१९३३:विष्णू वामन बापट – संस्कृत विद्वान, भाषांतरकार व शास्त्रसुधारक,शंकराचार्यांच्या ग्रंथांचे व इतर संस्कृत ग्रंथांचे मराठीत अनुवाद केले.(जन्म:२२ मे १८७१)*~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~ *_दिनविशेष या सदरातील सर्व मुद्दे हे संग्रहात्मक आहेत तेव्हा त्यात चूका नसतीलच असे सांगता येणार नाही_* *✍ संकलन ✍* *श्रीराम चव्हाण माजी शिक्षणाधिकारी,नागपूर*मोबाईल:9822695372 ईमेल: chavhansk65@gmail.com••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *✈ 🚀 गुगलयान ✈ 🚀*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••*नामकरण ते अंतीम संस्कार*माणूस जन्माला येतो तेंव्हा त्याचे नाव नसते. त्याला एक ओळख मिळावी म्हणून जन्मलेल्या बाळाचे सर्वात पहिल्यांदा जे संस्करण केल्या जाते त्यास नामकरण किंवा बारसे असे म्हटले जाते. हा विधी बारा दिवसानी, एकवीस दिवसानी किंवा सव्वा महिन्याच्या नंतर केल्या जाते. काही समाजात परंपरेनुसार हा सोहळा संपन्न केल्या जाते. नाव ठेवण्याची ही पद्धत फार पुरातन काळापासून चालू आहे. फार पूर्वीच्या काळाचा इतिहास पाहिला तर असे लक्षात येते की, घरातील वाडवडिलांचे किंवा आजी - आजोबांचे नाव नातू-नातवाला दिले जात असत. त्यामुळे नाव शोधण्याची .....पूर्ण लेख वाचण्यासाठी वरील निळ्या अक्षरावर क्लीक करावे~~~~~~~~~~~~~~~~~~~ 🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••1⃣ *भारतातील सर्वात श्रीमंतांच्या यादीत एका महिलेचा समावेश, सावित्री जिंदाल या 2023 मध्ये भारतातील सर्वात श्रीमंत महिला ठरल्या*•••••••••••••••••••••••••••••••••••••2⃣ *मराठा आरक्षणासाठी फेब्रुवारीत विशेष अधिवेशन घेणार; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची विधानसभेत घोषणा*•••••••••••••••••••••••••••••••••••••3⃣ *आता प्रत्येक ग्रामपंचायतीत बसवणार पर्जन्यमापन यंत्र, राज्य कृषिमंत्री धनंजय मुंडेंची मोठी घोषणा*•••••••••••••••••••••••••••••••••••••4⃣ *इंडिया आघाडीकडून पंतप्रधानपदासाठी मल्लिकार्जुन खरगे यांचं नाव पुढे, खरगेंनी नाकारली ऑफर*•••••••••••••••••••••••••••••••••••••5⃣ *चीनमध्ये अतिप्रचंड भूकंपानं शहर उध्वस्त, शेकडो निष्पापांचा बळी; मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता*•••••••••••••••••••••••••••••••••••••6⃣ *पुढील २४ तासांत अवकाळी पाऊस धुमाकूळ घालणार; दक्षिणेतील राज्यांना झोडपून काढणार, हवामान खात्याचा अंदाज*•••••••••••••••••••••••••••••••••••••7⃣ *मिचेल स्टार्क आयपीएलचा सर्वात महागडा खेळाडू, क्षणात पॅट कमिन्सला टाकले मागे*•••••••••••••••••••••••••••••••••••••*📷 वृत्त संकलक - कुणाल पवारे 📹*📱9960358300•••••••••••••••••••••••••••••••••••••ही पोस्ट नियमित मिळविण्यासाठी आणि या समुहात add होण्यासाठी 9423625769 येथे संपर्क करावे.••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• 🌷🍃 *विशेष माहिती* 🌷🍃••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••*अश्फाकउल्ला खान*अश्फाकउल्ला खान यांच्यासारखा ध्येयवेडा क्रांतीकारक आपण कल्पना करू शकणार नाही अशा आनंदाने फाशी गेला.फाशीच्या एक दिवस आधी ते छानपैकी हसून हसून गप्पा मारत होते आणि भेटणार्यांना म्हणायचे , मित्रांनो, उद्या माझ लग्न होणार."दुसर्या दिवशी सकाळी त्यांना लवकर उठवण्यात आलं, फाशीच्या शिक्षेची अंमलबजावणी थोड्याच वेळात होणार होती , मरणाच्या उंबरठ्यावर असूनही त्यांच कवीमन नदीच्या पाण्यासारखं निखळ होत. तेवढ्या क्षणातसुद्धा त्यांनी काही शेर लिहून ठेवले होते , त्यापैकी एक असा ,"फनाह है हम सबके लिए, हम पै कुछ नही मौकूफ !वफा है एक फकत जाने की ब्रिया के लिए ॥(अर्थ : नष्ट तर सगळेच होणार आहेत, फक्त आम्ही एकटे थोडेच आहोत.न मरणारा तर केवळ एक परमात्मा आहे.)अश्फाकउल्ला खान यांचे सहकारी आणि आदर्श रामप्रसाद बिस्मिल हे सुद्धा अचाट प्रतिभेचे कवी होते. काकोरी कटाचे प्रमुख म्होरक्या म्हणून त्यांच्यावर खटला चालवला गेला, तसे ते फार शिकलेले नव्हते पण मुख्य कोर्टात आपल अपील त्यांनी स्वतःच लिहिल होतं. ज्यावेळेस त्यांना फाशीच्या तख्तावर उभ करण्यात आलं त्यावेळेस ते म्हणाले -I wish the downfall of the British Empire.(ब्रिटिश साम्राज्याचे पतन हीच माझी सर्वात मोठी ईच्छा आहे)अश्फाक यांचा जन्म २२ ऑक्टोबर १९०० चा...चार भावंडांमध्ये सर्वात लहान त्यामुळे थोडे लाडके... घरची परिस्थिती उत्तम..सुखवस्तू असलेल्यांपैकी...महाविद्यालयीन दिवसांत १९२२ मध्ये त्यांचा संबंधरामप्रसाद बिस्मिल यांच्याशी आला. दोघेही चांगले मित्र होतेच पण बरोबर उत्तम उर्दू शायर देखील होते.राम प्रसाद हे टोपणनाव (तखल्लुस) 'बिस्मिल' तर, अशफाक 'वारसी' आणि नंतर 'हसरत' या उपनावाने लिहायचे... 'काकोरी कटाची' योजना दोघांच्या नेतृत्वाखालीच पार पडली आणि कटात दोषी आढळल्यामुळे दोघांना एकाच तारखेला, दिवशी आणि एकाच वेळी फाशी दिली गेली... केवळ जेल वेगळे (फरिजाबाद आणि गोरखपुर)देशाच्या स्वातंत्र्यासाठी आपल्या कुटुंबकबिल्याचा त्याग करून तेवत असणाऱ्या धगधगत्या अग्निकुंडात सर्वस्व अर्पण करणार्या या सच्च्या क्रांतीकारकांना एक त्रिवार कुर्निसात...!*संकलन :- श्याम बसप्पा ठाणेदार, पुणे*••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• 🌹 *" फ्रेश सुविचार "* 🌹••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••*" घटनांना विचारांचे स्वरुप देणे हे वाङमयाचे कार्य आहे. "**संकलन :- प्रमिलाताई सेनकुडे**ता. हदगाव जि. नांदेड*📱9403046894••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• ❓ *आजची प्रश्नमंजुषा* ❓••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••१) आर्कटिक टर्न हा पक्षी एका वर्षात किती किमीचा प्रवास करतो ?२) 'भवानी मातेचा जिल्हा' असे कोणत्या जिल्ह्याला ओळखले जाते ?३) वैनगंगा व पैनगंगा या कोणत्या नदीच्या उपनद्या आहेत ?४) मानवी शरीराच्या वाढीसाठी किती खनिजे आवश्यक असतात ?५) भारतात टीव्हीवर रंगीत प्रसारणाची सुरूवात कोणत्या महान व्यक्तीच्या भाषणापासून सुरू झाली ? *उत्तरे :-* १) ३० हजार २) उस्मानाबाद ३) गोदावरी ४) २४ खनिजे ५) इंदिरा गांधी*संकलन :- जैपाल भै. ठाकूर*जि.प.व.प्राथ.शाळा भोसा, ता. आमगाव, जि. गोंदिया 📱9765943144••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎂 *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *◆|वा|ढ|दि|व|स|अ|भि|ष्ठ|चिं|त|न|◆* 👤 शंकर हासगुळे, सहशिक्षक, बिलोली👤 पल्लवी टेकाळे, कुपटी, माहूर👤 परमेश्वर नन्नवरे, सहशिक्षक, उस्मानाबाद👤 विठ्ठल नरवाडे, सहशिक्षक, धर्माबाद👤 गजानन मुडेले, देगलूर👤 सोपान हेळंबे, उमरी👤 विलास राऊत, मु.अ. रेणापूर, भोकर👤 देगावे एस टी👤 माधव कुद्रे, साहित्यिक, नांदेड👤 संदीप खंडागळे👤 रामेश्वर आत्राम👤 अश्फाक मोमीन*ઉदंड_आયુષ્યાच्या अનંત_શુभेच्छा*[ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा एक दिवस अगोदर 9423625769 येथे पोस्ट करावे. ]••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• ••• 💡 ‼ *मनाचे श्लोक*‼ 💡•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••जयाचे तया चूकले प्राप्त नाहीं। गुणे गोविले जाहले दुःख देहीं ॥ गुणावेगळी वृत्ति तेहि वळेना। जुने ठेवणे मीपणे आकळेना॥१४०॥।। जय जय रघुवीर समर्थ ।।••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🕊🌎 ‼ *विचारधारा*‼🕊🌎••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••विरोध त्याचाच केला जातो जो नेहमीच सत्य बोलतो.विरोध त्याचाच केला जातो जो, व्यर्थ गोष्टींच्या मोहात पडत नाही व आपला स्वाभिमान कुठेही विकत नाही, स्वतः च्या विषयी विचार न करता इतरांच्या भल्यासाठी कार्य करत असतो. त्यावेळी विरोध करणारे दुरचेच लोक असतात असेही नाही तर घरून तसेच जवळच्याच लोकांपासून सुरूवात होत असते. म्हणून सत्याच्या वाटेवर चालत असताना कितीही विरोध करणारे मिळाले तरी चालेल पण, आपण मात्र कोणाचा विरोध करू नये. जमेल तेवढे कार्य करण्याचा प्रयत्न करावे. कारण चांगले करणाऱ्यांचेच विरोधक वाढत असतात व जो काहीच करत नाही त्याचे जीवन शुन्यासमान असते.🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷सौ.संगीता संतोष ठलाल मु. कुरखेडा जि. गडचिरोली••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎭 *आजची फ्रेश बोधकथा* 🎭••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *पारंगत*खूप वर्षापूर्वी रामपूर गावात एक आंधळा माणूस राहात होता. तो कोणत्याही पक्ष्यांला, प्राण्याला हात लावून तो कोणत्या प्रकारचा प्राणी आहे हे ओळखण्यात तो फार हुशार आणि प्रसिद्ध होता. एकदा एका माणसाने एक लांडग्याचे पिलू त्याच्याकडे परीक्षेसाठी आणले. आंधळ्याने त्याला जवळ घेऊन अंग चाचपून पाहिले, पण त्याची नीट परीक्षा त्याला झाली नाही. मग तो थट्टेने त्या लांडग्याच्या पोराला म्हणाला, 'अरे, तू कुत्र्याचं पिलू आहेस की लांडग्याचं हे मी खात्रीपूर्वक सांगू शकलो नाही, तरी तुला मेंढराच्या कळपात सोडण्याचा सल्ला मी कधीही देणार नाही.!'*तात्पर्य :- सुंदर जरी गाढवाचे पोर दिसले तरी त्याचा गाढवपणा कधीही लपत नाही.*•••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••या पोस्ट विषयी आपल्या सूचना, निवेदन, अभिप्राय, बातम्या, वाढदिवस, माहिती किंवा शंका 9423625769 येथे कळवावे. •••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••~~~~~~~~~~~~~~~~~~~*🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢*📱 9423625769~~~~~~~~~~~~~~~~~~~*🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏*पुन्हा भेटू या फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार ~~~~~~~~~~~~~~~~~~~
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment