✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट~~~~~~~~~~~~~~~~~~~ 9️⃣ 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 9️⃣ ( फ्रेश शालेय परिपाठ )🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00 ( रविवार आणि सुट्टी वगळून )~~~~~~~~~~~~~~~~~~~🎇 दिनांक :- 14 डिसेंबर 2023💠 वार - गुरुवार~~~~~~~~~~~~~~~~~~~Link - http://nasayeotikar.blogspot.com/2017/11/blog-post_59.html••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🌷🌐 . *दिनविशेष* . 🌐🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••*_राष्ट्रीय ऊर्जा संरक्षण दिन_*•••••••••••••••••••••••••••••••••*_ या वर्षातील ३४८ वा दिवस आहे_* •••••••••••••••••••••••••••••••• *_महत्त्वाच्या घटना:_* •••••••••••••••••••••••••••••••• *१९६१:टांझानियाचा संयुक्त राष्ट्रांत (United Nations) प्रवेश.**१९४१:दुसरे महायुद्ध – जपानने थायलँडबरोबर सहकार्याचा करार केला.**१९२९:’प्रभात’चा ’गोपालकृष्ण’ हा चित्रपट मुंबईच्या ’मॅजेस्टिक’ चित्रपटगृहात प्रदर्शित झाला.**१९०३:किटीहॉक, नॉर्थ कॅरोलिना येथे राईट बंधूंनी उड्डाणाचा पहिला प्रयत्न केला.**१८१९:अलाबामा हे अमेरिकेचे २२ वे राज्य बनले.* *_जन्मदिवस / जयंती / वाढदिवस:_* ••••••••••••••••••••••••••••••••••••••*१९९४:कुलदीप यादव-- प्रसिद्ध भारतीय क्रिकेटपटू**१९९०:विनय पाटील-- कवी**१९८६:संवाद सतीश तराळ-- लेखक,कवी* *१९८०:आनंदराव नागनाथराव पाटील-- लेखक**१९७८:समीरा रेड्डी-- भारतीय अभिनेत्री**१९७२:विजय यशवंत सातपुते -- कवी,लेखक संपादक* *१९५७:शीतल श्याम दामले -- कवयित्री* *१९५३:विजय अमृतराज –भारतीय लॉनटेनिसपटू**१९५२:सुषमा रमेशचंद्र म्हैसेकर-इर्लेकर-- कवयित्री* *१९५१:विजय श्री.केळकर-- लेखक**१९५०:प्रल्हाद श्रीराम गावत्रे -- कवी* *१९४९:श्रीकांत शंकर बहुलकर-- संस्कृतचे ज्येष्ठ अभ्यासक,बौद्धविद्या व वेदविद्या अभ्यासक**१९४९:डॉ.अनुपमा निरंजन उजगरे-- जेष्ठ लेखिका आणि प्रसिद्ध कवयित्री, २००५ साली मुबई येथे भरलेल्या विसाव्या मराठी ख्रिस्ती साहित्य संमेलनाच्या अध्यक्षा**१९४६:संजय गांधी – राजकारणी व इंदिरा गांधी यांचे पुत्र (मृत्यू:२३ जून १९८०)**१९४४:अभिमन्यू दोधाजी सूर्यवंशी -- जेष्ठ लेखक तथा निवृत्त सहा.पोलिस आयुक्त* *१९४३:विजय शंकर जोशी-- लेखक**१९४०:लक्ष्मण मोतीराम बांदेकर-- मराठीतील नामवंत नाटककार (मृत्यू:१२ फेब्रुवारी २०१५)**१९३९:सतीश दुभाषी – चित्रपट व रंगभूमीवरील अभिनेते (मृत्यू:१२ सप्टेंबर १९८०)**१९३८:प्रभाकर वामनराव ढगे-- कवी लेखक**१९३४:श्याम बेनेगल – चित्रपट दिग्दर्शक व पटकथालेखक**१९२८:प्रसाद सावकार – गायक व नट**१९२४:राज कपूर – अभिनेता,निर्माता व दिग्दर्शक आणि ’द ग्रेटेस्ट शो मॅन’ (मृत्यू:२ जून १९८८)**१८२२:रेव्ह सॅम्युएल केअरबॅंक -- धर्मगुरू,दूरदर्शी शिक्षक,लेखक,संपादक (मृत्यू:३१ मे१९८८)**१९१८:योगाचार्य बी.के.एस.अय्यंगार – जागतिक कीर्तीचे थोर तत्त्ववेत्ते जे. कृष्णमूर्ती यांना त्यांनी योगविद्येचे पाठ दिले. 'Light on Yoga' हा त्यांचा ग्रंथ जगात ’योगविद्येचे बायबल’ समजला जातो.(मृत्यू:२० ऑगस्ट, २०१४)**१९०५:विश्वनाथ पांडुरंग दांडेकर --मराठी लेखक,कादंबरीकार,लघुनिबंधकार आणि समीक्षक (जन्म:१ जानेवारी १९७४)* *१८९५:जॉर्ज (सहावा) – इंग्लंडचा राजा (मृत्यू:६ फेब्रुवारी १९५२)**१८९२:विठ्ठल कृष्ण नेरूरकर-- मराठी कथाकार,कवी आणि नाटककार(मृत्यू:१९ मार्च १९४९)* *१५४६:टायको ब्राहे – डच खगोलशास्त्रज्ञ, खगोलशास्त्रावर मूलभूत संशोधन केले. (मृत्यू:२४ आक्टोबर १६०१)* *_मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन:_* ••••••••••••••••••••••••••••••••••••••*२०१४:श्रीराम ताम्रकर --चित्रपट विषयक विपुल लेखन (जन्म: ९ नोव्हेंबर १९३८)**२००५:सुधीर जोशी--विनोदी मराठी अभिनेते (जन्म:१९४८)**१९७९:गोविंद घाणेकर-- लेखक (जन्म:१५ जून १९११)**१९७७:गजानन दिगंबर तथा ग.दि. माडगूळकर – गीतकार,कवी,लेखक, पटकथाकार,अभिनेते.गीतरामायणामुळे त्यांना ’महाराष्ट्राचे वाल्मिकी’ म्हणून ओळखले जाते. (जन्म:१ आक्टोबर १९१९)**१९६६:शंकरदास केसरीलाल ऊर्फ 'शैलेन्द्र' – गीतकार (जन्म:३० ऑगस्ट १९२३)**१७९९:जॉर्ज वॉशिंग्टन – अमेरिकेचे पहिले राष्ट्राध्यक्ष (जन्म:२२ फेब्रुवारी १७३२)*~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~ *_दिनविशेष या सदरातील सर्व मुद्दे हे संग्रहात्मक आहेत तेव्हा त्यात चूका नसतीलच असे सांगता येणार नाही_* *✍ संकलन ✍* *श्रीराम चव्हाण माजी शिक्षणाधिकारी,नागपूर*मोबाईल:9822695372 ईमेल: chavhansk65@gmail.com••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *✈ 🚀 गुगलयान ✈ 🚀*••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *आपली कामे आपणच करावीत*एखाद्या वेळी घरात आई किंवा बहीण नसेल तर आपली पंचाईत होते. जेवण करायचे असेल किंवा घरातील साफसफाईचा प्रश्न असेल, आपण सर्वस्वी आई किंवा बहिणीवर अवलंबून असतो. त्यामुळे आपणावर तसा प्रसंग ओढावतो. ज्यावेळी घरात वडील किंवा भाऊ नसतो, त्यावेळी तशीच काहीशी .........लेख पूर्ण वाचण्यासाठी वरील निळ्या अक्षरावर टिचकी मारा. ~~~~~~~~~~~~~~~~~~~ 🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••1⃣ *राज्यातील सर्व रक्तपेढ्यांमध्ये महिनाभरात अॅलिकॉट मशिन उपलब्ध करून देणार, आरोग्य मंत्री तानाजी सावंत यांची घोषणा*•••••••••••••••••••••••••••••••••••••2⃣ *10 ते 12 जानेवारीला एमआयटीमध्ये भारतीय छात्र संसद:10 ते 12 हजार विद्यार्थ्यांचा असणार सहभाग ; राहुल कराड यांची माहिती*•••••••••••••••••••••••••••••••••••••3⃣ *राज्यातील तरुणांसाठी महत्त्वाची बातमी ; 23 हजार 628 पोलिस शिपायांची होणार भरती, गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांची माहिती*•••••••••••••••••••••••••••••••••••••4⃣ *मराठा आरक्षणाचा मुद्दा तापलेला असताना सरकारचं ओबीसी कार्ड, ३३७७ कोटींची विक्रमी तरतूद, नागपूर येथील हिवाळी अधिवेशनात पुरवणी मागण्यांद्वारे हा निधी मंजूर*•••••••••••••••••••••••••••••••••••••5⃣ *पुणे लोकसभेसाठी लवकरात लवकर पोटनिवडणूक घ्या, मुंबई उच्च न्यायालयाचे निर्देश*•••••••••••••••••••••••••••••••••••••6⃣ *लक्ष्मीकांत बेर्डे यांच्या सख्खा भाऊ विनोदी अभिनेते रवींद्र बेर्डे यांचे निधन*•••••••••••••••••••••••••••••••••••••7⃣ *आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पहिले अर्धशतक अन् रिंकू सिंहची टी-20 रँकिंगमध्ये थेट हनुमान उडी !*•••••••••••••••••••••••••••••••••••••*📷 वृत्त संकलक - कुणाल पवारे 📹*📱9960358300•••••••••••••••••••••••••••••••••••••ही पोस्ट नियमित मिळविण्यासाठी आणि या समुहात add होण्यासाठी 9423625769 येथे संपर्क करावे.••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• 🌷🍃 *विशेष माहिती* 🌷🍃••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••📙 *गॅसेस का होतात ?* 📙खूप लोकांना गॅसेसचा त्रास होतो. म्हातारपणात तर बऱ्याच लोकांमध्ये हा त्रास आढळून येतो. लहान मुलांमध्येही गॅसेस होऊ शकतात. गॅसेस किंवा वायूविकाराचे मुख्य कारण म्हणजे आपल्याला माहित नसताना हवा गिळण्याची सवय. खूप बोलणाऱ्या लोकांमध्ये (उदा. शिक्षक, राजकीय नेते) अशा प्रकारे जास्त हवा गिळली जाते आणि गॅसेसचा त्रास होतो. लहान मुलेही दूध पिताना हवा गिळतात आणि त्यामुळे गॅसेस होऊन त्यांचे पोट दुखायला लागते. मोठ्या आतड्यात सुक्ष्म जंतूंची अन्नावर क्रिया होऊनही वायू निर्माण होतो. याखेरीज शौचास साफ न झाल्यास किंवा बद्धकोष्ठाचा त्रास असल्यास मल शरीरात साचून राहतो व या मलाचे विघटन होऊनही वायू तयार होतात. वायू तयार झाल्यावर तो आतड्याच्या भिंतीवर ताण आणतो. त्यामुळे पोट दुखते. डोकेही दुखते.गॅसेसचा त्रास होऊ नये यासाठी जेवणाच्या वेळा नियमित असाव्यात. थोडीशी भूक ठेवूनच जेवावे. हरभऱ्याच्या डाळीचे किंवा तेलकट तुपकट पदार्थ कमी खावेत. बैठे काम करणाऱ्यांनी भरपूर व्यायाम करावा. सर्वांनीच निदान जास्तीत जास्त पायी चालण्याचा प्रयत्न करावा. पवनमुक्तासनसारख्या आसनांमुळे गॅसेस बाहेर पडतात. अनावश्यक बडबड टाळावी. हिंग्वाष्टक चूर्ण घेतल्यास गॅसेसवर चांगला उपचार होतो. बैठे काम करणाऱ्यांनी जेवणानंतर दीड दोन तासांनी ताठ बसून बेबी आत ओढून पाच ते पंधरा सेकंद तशीच ठेवण्याचा प्रयत्न करावा. असा उपाय वारंवार केल्याने गॅसेसचा त्रास नक्कीच कमी होतो. चार चौघे जमल्यावर आपल्याला लाज आणणारा हा वायूविकार आहाराच्या सुयोग्य सवयी आणि व्यायाम यामुळे आपण आटोक्यात आणू शकू.*डॉ. जगन्नाथ दीक्षित व डाॅ. अंजली दीक्षित*यांच्या 'मेडिकल जनरल नॉलेज' या पुस्तकातून*संकलन :- श्याम बसप्पा ठाणेदार, पुणे*•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🌹 *" फ्रेश सुविचार "* 🌹•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••*" ज्यांना जास्त गोष्टींची हाव असते त्यांना प्रत्येक गोष्टीची कमतरता असते. "**संकलन :- प्रमिलाताई सेनकुडे**ता. हदगाव जि. नांदेड*📱9403046894••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• ❓ *आजची प्रश्नमंजुषा* ❓••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••१) *'फॉरेस्ट मॅन ऑफ इंडिया'* असे कोणाला म्हटले जाते ?२) मध्यप्रदेश या राज्याचे नवनियुक्त मुख्यमंत्री म्हणून कोणाची निवड करण्यात आली आहे ?३) भारतीय राज्यघटनेतील कोणत्या कलमानुसार स्त्री व पुरूष यांना समान कामासाठी समान वेतन देण्याची तरतूद करण्यात आली आहे ?४) 'सिटी ऑफ गोल्डन गेट' कोणत्या शहराला म्हणतात ?५) गुणात्मकदृष्ट्या आहाराचे कोणते प्रकार आहेत ? *उत्तरे :-* १) जादव पायेंग २) मोहन यादव ३) कलम ३९ ४) सन फ्रान्सिस्को ५) सात्त्विक, राजस, तामस आहार*संकलन :- जैपाल भै. ठाकूर*जि.प.व.प्राथ.शाळा भोसा, ता. आमगाव, जि. गोंदिया 📱9765943144••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎂 *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *◆|वा|ढ|दि|व|स|अ|भि|ष्ठ|चिं|त|न|◆* 👤 सारंग भंडारे, येवती👤 विजय सातपुते, पुणे👤 राज काकडे,वसमत👤 पवन धावनी, धर्माबाद👤 *ઉदंड_आયુષ્યાच्या अનંત_શુभेच्छा*[ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा एक दिवस अगोदर 9423625769 येथे पोस्ट करावे. ]••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• ••• 💡 ‼ *मनाचे श्लोक*‼ 💡•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••नसे गर्व आंगी सदा वीतरागी। क्षमा शांति भोगी दयादक्ष योगी॥ नसे लोभ ना क्षोम ना दैन्यवाणा। इहीं लक्षणी जाणिजे योगिराणा॥१३४॥।। जय जय रघुवीर समर्थ ।।••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🕊🌎 ‼ *विचारधारा*‼🕊🌎••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••ज्या मातीत आपला जन्म झाला त्या मातीचे ऋण फेडावे, ज्यांच्यामुळे जग बघायला मिळाले मग ते कसेही असोत त्यांची आठवण काढावे,ज्यांनी स्वतः साठी न जगता योगदान दिले त्यांचे विचार अंगिकारावे,ज्या समाजाचे आपण आहोत त्या समाजाला काहीतरी देणं लागतं. जीवनात कितीही कमावले तरी सोबत कोणी काहीच घेऊन जात नाही. देण्याऱ्याचे नाव मोठे आहे घेण्याऱ्याचे नाही असे अनेकजण म्हणतात. घेण्यासाठी तर..संपूर्ण आयुष्य पडले आहे पण,देण्यासाठी वेळ, सोबतच आपले काळीज मोठे असावे लागते त्यासाठी सर्वाप्रती आपल्यात आपुलकी व माणुसकी असणे गरजेचे आहे. 🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷सौ.संगीता संतोष ठलाल मु. कुरखेडा जि. गडचिरोली••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎭 *आजची फ्रेश बोधकथा* 🎭••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••*गरीब आणि श्रीमंत माणूस*एक गरीब माणूस आणि एक श्रीमंत माणूस शेजारी शेजारी राहत होते. गरीब माणसाचे चपला जोडे शिवण्याची दुकान होते. काम करता करता तो अगदी आनंदाने गाणे गात असे.तो अगदी निर्धास्त जीवन जगत असे. आपल्या घराची दारे खिडक्या बंद ठेवाव्यात, त्यांना कुलूप कड्या लावाव्यात असे त्याला कधीच वाटत नसे.रोज रात्री तो देवाची प्रार्थना करून झोपी जात असे.शेजारी राहत असलेला श्रीमंत माणूस या गरिब आनंदी माणसाकडे नेहेमी पाहत असे. श्रीमंत माणसाला अनेक चिंता होत्या; स्वतःच्या पैशाची आणि सुरक्षेततेची त्याला नेहमी काळजी वाटत असे. आपल्या घराची दारे खिडक्या घट्ट बंद करत असे. एवढे करूनही त्याला शांत झोप लागत नसे.एके दिवशी श्रीमंत माणसाने गरीब माणसाला घरी बोलावले त्याने त्याला पाच हजार रुपये दिले आणि म्हणाला , " हे पैसे तुझ्याकडे ठेव मला या पैशांची गरज नाही.ते तुझेच पैसे आहेत असे समज.एवढे पैसे मिळाले म्हणून गरीब माणसाला पहिल्यांदा खूप आनंद झाला.पण त्या पैशांमुळे त्याच्या जीवनातील शांतता पार नाहीशी झाली.त्याने आयुष्यात पहिल्यांदाच आपल्या घराचे दार व सर्व खिडक्या बंद केल्या आणि त्यांना कड्या घातल्या आपले पैसे सुरक्षित आहेत ना, हे पाहण्यासाठी रात्री तो कितीतरी वेळा झोपेतून उठला.दुसऱ्याच दिवशी सकाळी तो गरीब माणूस श्रीमंत माणसाकडे आला. त्याने पाच हजार रुपये श्रीमंत माणसाला परत दिले आणि हात जोडून म्हणाला, " साहेब, हे तुमचे पैसे परत घ्या. आपण हे पैसे घेतलेत तरच माझं हसतं-गातं जीवन आणि शांत झोप मला परत मिळेल."*तात्पर्य :- सर्व सुख समाधान पैशात सामावलेले नसते.*•••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••या पोस्ट विषयी आपल्या सूचना, निवेदन, अभिप्राय, बातम्या, वाढदिवस, माहिती किंवा शंका 9423625769 येथे कळवावे. •••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••~~~~~~~~~~~~~~~~~~~*🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢*📱 9423625769~~~~~~~~~~~~~~~~~~~*🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏*पुन्हा भेटू या फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार ~~~~~~~~~~~~~~~~~~~
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment