✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट~~~~~~~~~~~~~~~~~~~ 9️⃣ 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 9️⃣ ( फ्रेश शालेय परिपाठ )🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00 ( रविवार आणि सुट्टी वगळून )~~~~~~~~~~~~~~~~~~~🎇 दिनांक :- 19 डिसेंबर 2023💠 वार - मंगळवार~~~~~~~~~~~~~~~~~~~Link - http://nasayeotikar.blogspot.com/2019/11/blog-post_81.html••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🌷🌐 . *दिनविशेष* . 🌐🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••*_गोवा मुक्ती दिन_*•••••••••••••••••••••••••••••••••*_ या वर्षातील ३५३ वा दिवस आहे_* •••••••••••••••••••••••••••••••• *_महत्त्वाच्या घटना:_* •••••••••••••••••••••••••••••••• *२००२:व्ही.एन.खरे यांनी भारताचे ३३ वे सरन्यायाधीश म्हणुन कार्यभार सांभाळला.**१९८३:ब्राझिलमधील रिओ डी जानिरो येथुन ’फिफा वर्ल्ड कप’ चोरीस गेला.**१९६३:झांजिबारला (युनायटेड किंगडमकडून) स्वातंत्र्य मिळाले आणि तेथे सुलतान जमशिद बिन अब्दूल्लाह यांची राजसत्ता अस्तित्त्वात आली.**१९६१:पोर्तुगिजांच्या ताब्यात असलेले दमण व दीव हे प्रांत भारतात समाविष्ट करण्यात आले.**१९४१:दुसरे महायुद्ध - अॅडॉल्फ हिटलर हा जर्मन सैन्याचा सरसेनापती बनला.**१९२७:राम प्रसाद बिस्मिल, रोशन सिंग आणि अश्फाकुल्लाह खान या क्रांतिकारकांना ब्रिटिश सरकारने फाशी दिले.* *_जन्मदिवस / जयंती / वाढदिवस:_* ••••••••••••••••••••••••••••••••••••••*१९९२:संस्कृती संजय बालगुडे-- भारतीय अभिनेत्री**१९८४:अंकिता लोखंडे जैन-- भारतीय अभिनेत्री**१९७८:मनीषा कुलकर्णी अपशिंगकर-- कवयित्री**१९७६:मानव कौल-- भारतीय थिएटर दिग्दर्शक,नाटककार,लेखक,अभिनेता आणि चित्रपट निर्माता* *१९७४:रिकी पॉन्टिंग –ऑस्ट्रेलियन क्रिकेट माजी कर्णधार व फलंदाज**१९६९:नयन रामलाल मोंगिया-- माजी भारतीय क्रिकेटपटू आणि क्रिकेट प्रशिक्षक**१९५६:प्रमोद मारुती उर्फ भाऊ मांडे-- इतिहासकार,कादंबरीकार (मृत्यू:१७ ऑक्टोबर २०१७)**१९५५:प्रदीप म्हैसेकर -- प्रसिद्ध साहित्यिक**१९५४:प्रमोद मारुती मांडे-- प्रसिद्धभारतीय इतिहासकार आणि लेखक**१९५२:प्रकाश अकोलकर-- ज्येष्ठ पत्रकार, लेखक* *१९४८:कमल शामराव कुरळे-- लेखिका* *१९४७:गजानन भास्कर मेहेंदळे-- मराठी इतिहास अभ्यासक**१९४३:प्रा.डॉ.लीला पाटील--शिक्षण तज्ञ, लेखिका* *१९४२:प्रा.कुंदबाला खांडेकर -- लेखिका* *१९४०:गोविंद निहलानी-- भारतीय चित्रपट दिग्दर्शक,सिनेमॅटोग्राफर,पटकथा लेखक आणि निर्माता**१९३४:यादवराव गोविंदराव कंदकूर्तीकर-- जेष्ठ इतिहास संशोधक* *१९३४:प्रतिभा पाटील – भारताच्या १२ व्या आणि पहिल्या महिला राष्ट्रपती**१९२८:प्रा.चंपा मधू लिमये-- लेखिका**१९२७:डॉ.वसंत कृष्ण वर्हाडपांडे-- प्रसिद्ध कथाकार,कवी,कादंबरीकार,नाटककार, समीक्षक,संपादक(मृत्यु:२९ जून १९९२)**१९२३:शालिनी अनंत जावडेकर--लेखिका**१९१९:ओमप्रकाश बक्षी ऊर्फ ’ओमप्रकाश’ – चरित्र अभिनेते (मृत्यू:२१ फेब्रुवारी १९१९)**१९०६:लिओनिद ब्रेझनेव्ह – रशियातील कम्युनिस्ट पक्षाचे सरचिटणीस (मृत्यू:१० नोव्हेंबर १९८२)**१८९९:मार्टिन ल्यूथर किंग – मानवाधिकारांसाठी आजीवन संघर्ष करणारे नेते (मृत्यू:११ नोव्हेंबर १९८४)**१८९४:कस्तुरभाई लालभाई – दानशूर व राष्ट्रवादी विचारसरणीचे उद्योगपती, पद्मभूषण,अरविंद मिल्स,अशोक मिल्स,अतुल असे अनेक गिरण्या व कारखाने त्यांनी चालू केले(मृत्यू:२० जानेवारी १९८०)**१८५२:अल्बर्ट मायकेलसन – वर्णपटाद्वारे प्रकाशाच्या मापनासंबंधीच्या शोधासाठी नोबेल पारितोषिक (मृत्यू: ९ मे १९३१)**१८४९:नारायण हरी भागवत--निंबधलेखक, पत्रकार,चरीत्रकार (मृत्यू: एप्रिल १९०१)* *_मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन:_* ••••••••••••••••••••••••••••••••••••••*२०१८:चित्रा बेडेकर-- मराठी लेखिका (जन्म:७ ऑगस्ट १९४६)**१९९९:हेमचंद्र तुकाराम तथा बाळ दाणी – रणजी व कसोटी क्रिकेटपटू,कुशल क्रीडा संघटक (जन्म:२४ मे १९३३)**१९९७:डॉ.सुरेन्द्र शिवदास बारलिंगे – कथाकार,कादंबरीकार,तत्त्वचिंतक,ललितलेखक,स्वातंत्र्यसैनिक,तत्त्वज्ञानाचे अभ्यासक, (जन्म:२० जुलै १९१९)**१९५६:पांडुरंग श्रीधर आपटे-- गांधिवादी लेखक (जन्म:६ एप्रिल १८८७)**१९२७:राम प्रसाद बिस्मिल – क्रांतिकारक (जन्म:११ जून १८९७)**१९१५:अलॉइस अल्झायमर – जर्मन मेंदुविकारतज्ञ (जन्म:१४ जून १८६४)**१८६०:लॉर्ड जेम्स अॅन्ड्र्यू ब्राउन रॅमसे - डलहौसी – भारताचा गव्हर्नर जनरल (जन्म:२२ एप्रिल १८१२)**१८४८:एमिली ब्राँट – इंग्लिश लेखिका (जन्म:३० जुलै १८१८)*~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~ *_दिनविशेष या सदरातील सर्व मुद्दे हे संग्रहात्मक आहेत तेव्हा त्यात चूका नसतीलच असे सांगता येणार नाही_* *✍ संकलन ✍* *श्रीराम चव्हाण माजी शिक्षणाधिकारी,नागपूर*मोबाईल:9822695372 ईमेल: chavhansk65@gmail.com••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *✈ 🚀 गुगलयान ✈ 🚀*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••*शिक्षकांचे स्वातंत्र्य .....?*देशाचे भवितव्य शाळेतून घडत असते कारण येथेच देशाचा भावी आधारस्तंभ बनणारा विद्यार्थी शिक्षण घेत असतो. याच माध्यमातून समाज देखील घडत असतो म्हणून शाळा आणि तेथील सर्व यंत्रणा सक्षम असणे अत्यंत गरजेचे आहे. पन्नास वर्षांपूर्वीची शैक्षणिक स्थिती आणि आजची शैक्षणिक स्थिती यात जमीन-अस्मानचा फरक आहे. मात्र एक गोष्ट प्रकर्षाने जाणवते की, पन्नास वर्षांपूर्वीचे शिक्षक आणि आजचे शिक्षक यात देखील खूप फरक जाणवतो. आजचे शिक्षक पूर्वीच्या शिक्षकांपेक्षा खूप बुद्धिमान असून देखील पूर्वीच्या शिक्षकांप्रमाणे अध्यापन करू शकत नाहीत किंवा पूर्वीच्या शिक्षकांप्रमाणे विद्यार्थी घडवू शकत नाहीत. काय कारण असू शकते ? यावर विचारमंथन होणे आवश्यक आहे. ...........पूर्ण लेख वाचण्यासाठी वरील निळ्या अक्षरावर क्लीक करावे. ~~~~~~~~~~~~~~~~~~~ 🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••1⃣ *घुसखोरीच्या मुद्यावर सोमवारी एका दिवसात राज्यसभेतून ४५ तर लोकसभेतून 33 खासदारांचे अधिवेशन संपेपर्यंत निलंबन*•••••••••••••••••••••••••••••••••••••2⃣ *६ लाख ५६ हजार वंचित शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ देणार; मुख्यमंत्र्यांची विधानसभेत घोषणा*•••••••••••••••••••••••••••••••••••••3⃣ *सरकारने दुसरा अहवाल स्वीकारला, आता मुख्यमंत्र्यांनी प्रामाणिक राहून कारवाई करावी ; मनोज जरांगे पाटील*•••••••••••••••••••••••••••••••••••••4⃣ *उत्तर भारतातील जम्मू-काश्मीर आणि लडाखमध्ये भूकंपाचे धक्के जाणवले. त्याची तीव्रता रिश्टर स्केल ५.५ इतकी होती.*•••••••••••••••••••••••••••••••••••••5⃣ *नाशिक : अन्न व औषध प्रशासनाचा भेसळयुक्त पनीर उत्पादनाच्या कारखान्यावर छापा*•••••••••••••••••••••••••••••••••••••6⃣ *वर्गात शिक्षकांचे फोटो लावण्यास शिक्षक भारती संघटनेचा विरोध, रस्त्यावर उतरणार, राज्य सचिव सुनील गाडगे यांचा इशारा*•••••••••••••••••••••••••••••••••••••7⃣ *भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील दुसऱ्या सामन्याच्या वेळेत बदल, गकेबरहाच्या सेंट जॉर्ज पार्क मैदानावर दुपारी साडे चार वाजता होणार सुरू*•••••••••••••••••••••••••••••••••••••*📷 वृत्त संकलक - कुणाल पवारे 📹*📱9960358300•••••••••••••••••••••••••••••••••••••ही पोस्ट नियमित मिळविण्यासाठी आणि या समुहात add होण्यासाठी 9423625769 येथे संपर्क करावे.••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• 🌷🍃 *विशेष माहिती* 🌷🍃••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••" एकदा एका मोठ्या ऑटोमोबाईल कंपनीचा मालक आपल्या अति महत्वाच्या उच्च अधिकाऱ्यांबरोबर , एका ठिकाणी तातडीच्या मिटिंग ला निघाला होता . . मोठी आलिशान गाडी होती . आणि प्रवास साधारण तीन चार तासाचा होता . सर्वजण सकाळी लवकर निघाले होते.गाडी वाटेत आल्यावर . . गाडीच्या ड्रायव्हर ला लक्षात आले कि मागील एक चाक पंक्चर आहे , त्याने ती गाडी एका बाजूला घेतली . आणि सर्वाना उतरायला सांगितले . सर्वजण तसे खुश झाले कारण सगळे सकाळीच निघाल्याने आणि मध्ये न थांबल्याने ब्रेक हवाच होता . मालक आणि बाकी सर्वजण उतरून इकडे तिकडे गेले . कोणी जवळच्या धाब्यावर सिगारेट ओढू लागले . कोणी झुडुपाआड गेले.अर्ध्यतासाने सर्वजण एका ठिकाणी एकत्र जमले पण सर्व टीम एकत्र आली मात्र मालक नाही दिसले . सगळे जण शोधायला लागले पण कुठे दिसेना . दहा मिनिटानी सर्वजण जिथे गाडी पंक्चर झाली होती तिथे जमले तर , मालक हातात स्पॅनर घेऊन . . शर्टाचे हात कोपरापर्यंत दुमडून . . घामेघूम होऊन . . चेहऱ्यावर मंद स्मित ठेवून ड्रायव्हर ला स्टेपनी चे चाक हातात घेऊन मदत करताना दिसले.आणि तिथेच पहिला धडा सर्व उच्च अधिकार्यांना मिळाला . " थोर व्हायला . . . तुम्हाला जमिनीवर उतरून काम करावे लागते आणि जमिनीवरील प्रॉब्लेम माहित असावे लागतात . नुसते आदेश सोडून अधिकारी बनतात . . . मालक नाही होता येत. "त्या उद्योपतीचे मालकाचे नाव . . " श्री. रतन टाटा " . . नाशिक येथे नेल्को ची टीम घेऊन जाताना प्रत्यक्ष घडलेला प्रसंग .संदर्भ : The Habit of Winning*संकलन :- श्याम बसप्पा ठाणेदार, पुणे*•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🌹 *" फ्रेश सुविचार "* 🌹•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••*" कोणत्याही गोष्टीची उणीव भासल्याखेरीज तिची खरी किंमत कळत नाही. "**संकलन :- प्रमिलाताई सेनकुडे**ता. हदगाव जि. नांदेड*📱9403046894••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• ❓ *आजची प्रश्नमंजुषा* ❓••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••१) ३३ व्या *'व्यास सन्मान'* या पुरस्काराने कोणाला सन्मानित करण्यात आले आहे ?२) महाराष्ट्रातील सर्वात मोठे रेल्वे जंक्शन कोणते ?३) भारतीय राज्यसभेचे पहिले अध्यक्ष कोण ?४) ऑक्सफर्ड डिक्शनरीने २०२३ साठी 'वर्ड ऑफ द इयर' म्हणून कोणत्या शब्दाची निवड केली आहे ?५) जिभेच्या शेंड्यावर आपणास प्रामुख्याने कोणत्या चवीचे ज्ञान होते ? *उत्तरे :-* १) पुष्पा भारती ( यादी, यादें और यादें ) २) भुसावळ ३) डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन ४) Rizz ५) गोड*संकलन :- जैपाल भै. ठाकूर*जि.प.व.प्राथ.शाळा भोसा, ता. आमगाव, जि. गोंदिया 📱9765943144••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎂 *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *◆|वा|ढ|दि|व|स|अ|भि|ष्ठ|चिं|त|न|◆* 👤 संजय हरणे, सहशिक्षक, माहूर👤 शंकर जाजेवार, येताळा👤 सुभाष चिखले पाटील, औरंगाबाद👤 रविकुमार राऊत👤 सूर्यकांत स्वामी👤 पवन कल्याण धर्माबाद*ઉदंड_आયુષ્યાच्या अનંત_શુभेच्छा*[ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा एक दिवस अगोदर 9423625769 येथे पोस्ट करावे. ]••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• ••• 💡 ‼ *मनाचे श्लोक*‼ 💡•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••पुढें पाहता सर्वही कोंदलेसें। अभाग्यास हें दृश्य पाषाण भासे॥ अभावे कदा पुण्य गांठी पडेना। जुने ठेवणे मीपणे आकळेना॥१३९॥।। जय जय रघुवीर समर्थ ।।••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🕊🌎 ‼ *विचारधारा*‼🕊🌎••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••एखाद्या व्यक्तीच्या भल्यासाठी चांगले सांगणे अजिबात वाईट नाही. एखाद्या व्यक्तीत वाईट गुण आढळून आले असतील किंवा वाईट सवयी लागलेल्या दिसून येत असतील तर, त्यावेळी त्या व्यक्तीला योग्य मार्गदर्शन करायलाच पाहिजे.पण, त्यावेळी ती व्यक्ती जर सांगून ऐकत नसेल तर ..तो त्याचा प्रश्न आहे. त्यात आपला काहीही दोष नाही. कदाचित त्यावेळी एक तर त्याचे मेंदू दुसरीकडे गहाण ठेऊन असेल.. नाही तर वेगवेगळ्या प्रकारचे कारणे असू शकतात. म्हणून जास्त मनावर घेऊ नये आपले कार्य चालूच ठेवावे.🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷सौ.संगीता संतोष ठलाल मु. कुरखेडा जि. गडचिरोली••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎭 *आजची फ्रेश बोधकथा* 🎭••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *कर्म पूजा*एकदा एक बाई रामकृष्ण परमहंसाकडे आल्या आणि म्हणाल्या , " मला या संसाराचा विट आला आहे . मुलं मोठी झाली. आता प्रपंच सुटेल असे वाटले . पण नातवंडांच्या प्रेमात पडले . रोज त्याला सांभाळावे लागते . तेव्हा आता घर सोडायचा विचार आहे . "रामकृष्णांनी विचारले , " घर सोडून तुम्ही काय करणार ? "त्या बाई म्हणाल्या , " गंगेच्या तीरावर एक झोपडी बांधणार . त्यात श्रीकृष्णाची मूर्ती बसविणार . रोज त्या मूर्तीची पूजा करणार . कृष्णाला नेवैद्याने जेवू घालणार . कृष्णाला झोपेतून उठविणार, आंघोळ घालणार . "परमहंसांनी विचारले , " श्रीकृष्णाची मूर्ती दगडाची असणार न ? " तेव्हा त्याबाई ' हो ' म्हणाल्या . रामकृष्णांनी विचारले , " आपण दगडाच्या मूर्तीत श्रीकृष्ण पाहणार ? " त्या बाई ' हो ' म्हणाल्या . त्यावर रामकृष्ण म्हणाले . " आपण दगडाच्या मूर्तीत श्रीकृष्ण पाहणार , मग नातवंडामध्ये श्रीकृष्ण का पाहत नाहीत ? श्रीकृष्ण समजून नातवंडाला जेवू घाला. श्रीकृष्ण म्हणून आंघोळ घाला. श्रीकृष्ण म्हणून त्याला झोपवा. " तुम्ही तुमच्या नातवंडानाच तुमचा श्रीकृष्ण समजून वागा. मनातला भाव चांगला ठेवा. म्हणजे तुम्हाला सर्वत्रच भगवंत दिसेल आवश्यक नाही मुर्तीतच देव पाहणे.तुम्ही तुमच्या नित्यकर्मात पण देवाचे दर्शन घेऊ शकता.*तात्पर्य : नित्य कर्मामध्ये भगवतभाव ओतला की ते कर्म नाम साधनेच्या दर्जाचे होते व तेच कर्म पूजा ठरते.**'कर्मे ईशू भजावा.'*•••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••या पोस्ट विषयी आपल्या सूचना, निवेदन, अभिप्राय, बातम्या, वाढदिवस, माहिती किंवा शंका 9423625769 येथे कळवावे. •••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••~~~~~~~~~~~~~~~~~~~*🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢*📱 9423625769~~~~~~~~~~~~~~~~~~~*🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏*पुन्हा भेटू या फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार ~~~~~~~~~~~~~~~~~~~
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment