✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट~~~~~~~~~~~~~~~~~~~ 9️⃣ 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 9️⃣ ( फ्रेश शालेय परिपाठ )🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00 ( रविवार आणि सुट्टी वगळून )~~~~~~~~~~~~~~~~~~~🎇 दिनांक :- 11 डिसेंबर 2023💠 वार - सोमवार~~~~~~~~~~~~~~~~~~~Link - http://nasayeotikar.blogspot.com/2017/12/blog-post_9.html••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🌷🌐 . *दिनविशेष* . 🌐🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••*_अंतरराष्ट्रीय पर्वत दिवस (International Mountain Day)_* •••••••••••••••••••••••••••••••••*_ या वर्षातील ३४५ वा दिवस आहे_* •••••••••••••••••••••••••••••••• *_महत्त्वाच्या घटना:_* •••••••••••••••••••••••••••••••• *२००१:चीनचा वर्ल्ड ट्रेड ऑर्गनायझेशन (WTO) मधे प्रवेश**१९९४:अध्यक्ष बोरिस येल्त्सिन यांच्या आदेशावरुन रशियन फौजांनी चेचेन्यामधे प्रवेश केला.**१९७२:अपोलो मोहिमेतील अपोलो १७ हे सहावे चांद्रयान चंद्रावर उतरले.**१९६७:कोयना येथे ६.५ रिश्टर तीव्रतेचा भूकंप होऊन १८० जण ठार आणि १५०० लोक जखमी झाले व मोठया प्रमाणात वित्तहानी झाली.**१९४६:युनिसेफ (UNICEF) ची स्थापना**१९४१:दुसरे महायुद्ध – जर्मनी व इटली यांनी अमेरिकेविरुद्ध युद्ध पुकारले.**१९३०:सी.व्ही.रमण यांना नोबेल पारितोषिक**१८१६:इंडियाना हे अमेरिकेचे १९ वे राज्य बनले.* *_जन्मदिवस / जयंती / वाढदिवस:_* ••••••••••••••••••••••••••••••••••••••*१९९३:दीपराज दत्ताराम माने-- लेखक**१९६९:संगीता अनंत थोरात -- कवयित्री* *१९६९:विश्वनाथन आनंद –भारतीय बुद्धिबळ ग्रँडमास्टर**१९६९:दयानंद चंद्रशेक शेट्टी-- भारतीय चित्रपट अभिनेता**१९६५:किमी काटकर-- अभिनेत्री आणि मॉडेल**१९६३:प्रा.डॉ.माधव सरकुंडे -- प्रसिद्ध कवी,लेखक विचारवंत* *१९५७:डॉ.विकास हरिभाऊ महात्मे -- नेत्र शल्यचिकित्सक,राज्यसभेचे खासदार**१९५२:वेणू श्रीनिवासन-- भारतीय उद्योगपती, TVS मोटर कंपनीचे अध्यक्ष**१९५०:अविनाश शंकर डोळस-- सुप्रसिद्ध मराठी साहित्यिक(मृत्यू:११ नोव्हेंबर २०१८)**१९३८:प्रा.डॉ.बा.धो.रामपुरे -- कवी,लेखक* *१९३६:डॉ.उमेश अच्युत तेंडुलकर-- लेखक**१९३५:प्रा.जयश्री दिगंबर खिरे -- लेखिका**१९३५:प्रणव मुखर्जी-- भारतीय प्रजासत्ताकाचे १३वे राष्ट्रपती(मृत्यू:३१ ऑगस्ट २०२०)**१९३४:सलीम अझीझ दुरानी-- भारतीय क्रिकेटपटू,अष्टपैलू खेळाडू,(मृत्यू:२ एप्रिल २०२३)**१९३१:त्र्यंबक लक्ष्मण कुलकर्णी-- लेखक**१९२९:सुभाष गुप्ते – लेगस्पिनर क्रिकेटर (मृत्यू:३१ मे २००२)**१९२५:राजा मंगळवेढेकर – प्रसिद्ध बालसाहित्यकार (मृत्यू:१ एप्रिल २००६)**१९२४:मधुसूदन/मधुकर सदाशिव घोलप-- लेखक* *१९२४:दत्ताराम कृष्ण सुकथनकर -- सुप्रसिद्घ गोमंतकीय कोकणी साहित्यिक.(मृत्यू:२९ ऑगस्ट २००५)**१९२२:मोहम्मद युसुफ खान ऊर्फ दिलीपकुमार – चित्रपट अभिनेता,पद्मभूषण (१९९१),दादासाहेब फाळके पुरस्कार (१९९४)(मृत्यू:७ जुलै २०२१)**१९२१:रा.व्य.जोशी -- लेखक* *१९१५:मधुकर दत्तात्रय तथा बाळासाहेब देवरस – राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे तिसरे सरसंघचालक (मृत्यू:१७ जून १९९६)**१९०९:नारायण गोविंद कालेलकर – साहित्य अकादमी पारितोषिक विजेते (१९६८) भाषाशास्त्रज्ञ( मृत्यू:३ मार्च १९८९)* *१९०९: गंगाधर बळवंत ग्रामोपाध्ये--**संतकाव्याचे व भाषाशास्त्राचे अभ्यासक (मृत्यु:१८ ऑक्टोबर २००२)**१८९९:पुरुषोत्तम यशवंत देशपांडे – कादंबरीकार,तत्त्वचिंतक विदर्भ साहित्य संघाचे मुखपत्र असलेल्या युगवाणी या त्रैमासिकाचे संपादक(मृत्यू:२६ जुलै १९८५)* *१८९२:अयोध्या नाथ खोसला – स्थापत्य अभियंते,पाटबंधारे व जलनिस्सारण आयोगाचे अध्यक्ष,पद्मभूषण (१९५४), ओरिसाचे राज्यपाल (१९६२ - १९६६),पद्मविभूषण (१९७७)(मृत्यू:१९८४)**१८८२:सुब्रम्हण्यम भारती – तामिळ साहित्यिक (मृत्यू:११ सप्टेंबर १९२१)**१८६७:’उपन्यास सम्राट’ रजनीकांत बर्दोलोई – आसामी कादंबरीकार,आसामी ऐतिहासिक कादंबरीचे जनक (मृत्यू:२५ मार्च १९४०)**१८४३:रॉबर्ट कोच – क्षयरोगावरील मूलभूत संशोधनासाठी १९०५ मध्ये नोबेल पारितोषिक मिळालेले जर्मन डॉक्टर (मृत्यू:२७ मे १९१०)* *_मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन:_* ••••••••••••••••••••••••••••••••••••••*२०१४:गोविंदराव कुलकर्णी-- मराठी चित्रपट निर्माते आणि दिग्दर्शक(जन्म:१९२९)**२००४:एम.एस.सुब्बुलक्ष्मी – विख्यात शास्त्रीय गायिका (जन्म:१६ सप्टेंबर १९१६)**२००२:नानाभॉय अर्देशीर ऊर्फ ’नानी’ पालखीवाला – कायदेपंडित आणि अर्थतज्ञ (जन्म:१६ जानेवारी १९२०)**२००१:रामचंद्र नारायण दांडेकर – भाषातज्ज्ञ आणि वैदिक संस्कृतीचे अभ्यासक (जन्म:१७ मार्च १९०९)**१९९८:रामचंद्र नारायण द्विवेदी ऊर्फ कवी प्रदीप – ‘ए मेरे वतन के लोगो‘ या गाण्यामुळे प्रत्येक भारतीयाच्या काळजाला भिडणार्या रचनेमुळे आपले वेगळेपण ठसविणारे आधुनिक राष्ट्रकवी (जन्म:६ फेब्रुवारी १९१५)**१९९१:रघुनाथ गोविंद सरदेसाई--पत्रकार, संपादक,नाटय-चित्रपट समीक्षक (जन्म:७ सप्टेंबर १९०५)**१९८७:गुरूनाथ आबाजी तथा जी.ए.कुलकर्णी – साहित्य अकादमी पुरस्कार विजेते सुप्रसिद्ध गूढकथालेखक (जन्म:१० जुलै १९२३)*~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~ *_दिनविशेष या सदरातील सर्व मुद्दे हे संग्रहात्मक आहेत तेव्हा त्यात चूका नसतीलच असे सांगता येणार नाही_* *✍ संकलन ✍* *श्रीराम चव्हाण माजी शिक्षणाधिकारी,नागपूर*मोबाईल:9822695372 ईमेल: chavhansk65@gmail.com••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *✈ 🚀 गुगलयान ✈ 🚀*••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *मानवी हक्क दिन*लहानपणी मला सर्वात जवळची आणि चांगली गोष्ट वाटायची ते म्हणजे माझा हक्क. मला माझी हवी असलेली वस्तू मिळायलाच हवे असे वाटायचे. बालपणीच्या वयात प्रत्येक गोष्ट मिळविण्यासाठी रडणे हा एक चांगला पर्याय असायचा. रडून ती वस्तू मिळविताना...........लेख पूर्ण वाचण्यासाठी वरील निळ्या अक्षरावर टिचकी मारावे.~~~~~~~~~~~~~~~~~~~ 🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••1⃣ *तेलंगणमध्ये महिलांना मोफत बसप्रवास; गरिबांसाठी १० लाख रुपयांचा आरोग्य विमा, सोनिया गांधी यांच्या वाढदिवसानिमित्त खास भेट*•••••••••••••••••••••••••••••••••••••2⃣ *आता यापुढे सरकारच्या पनवानगी शिवाय भंडारा किंवा भोजनदान करता येणार नाही. अन्न औषध प्रशासन मंत्री धर्मरावबाबा आत्राम यांनी यासंदर्भात मोठी घोषणा केली आहे.*•••••••••••••••••••••••••••••••••••••3⃣ *नाशिकच्या निफाडमध्ये शिवशाहीला भीषण आग,छत्रपती संभाजीनगर मार्गावर बस पेटली, चालकाची सतर्कता अन् प्रवासी बचावले*•••••••••••••••••••••••••••••••••••••4⃣ *छगन भुजबळ नांदेडला महामेळावा घेणार, प्रकाश आंबेडकर, सिद्धरामय्या, तेजस्वी यादव यांना निमंत्रण*•••••••••••••••••••••••••••••••••••••5⃣ *नागपुरातील हिवाळी अधिवेशनाच्या दुसऱ्या आठवड्यात विविध मोर्च्यामुळे राजकीय वातावरण तापत असताना सोबतच थंडीसुद्धा तापणार असल्याची चिन्हं दिसून येत आहेत.*•••••••••••••••••••••••••••••••••••••6⃣ *या वर्षी डास चावल्यामुळे दर तासाला सरासरी २ जणांना डेंग्यूची लागण झाल्याचं आढळून आलं आहे.*•••••••••••••••••••••••••••••••••••••7⃣ *भारत व दक्षिण आफ्रिका यांच्यातील पहिल्या T20 सामना पावसामुळे रद्द*•••••••••••••••••••••••••••••••••••••*📷 वृत्त संकलक - कुणाल पवारे 📹*📱9960358300•••••••••••••••••••••••••••••••••••••ही पोस्ट नियमित मिळविण्यासाठी आणि या समुहात add होण्यासाठी 9423625769 येथे संपर्क करावे.••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• 🌷🍃 *विशेष माहिती* 🌷🍃••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• 📙 *भूगर्भशास्त्र* 📙 ********************* पृथ्वीच्या अंतरंगाचा, पृथ्वीच्या अंतर्बाह्य घटकांचा अभ्यास भूगर्भशास्त्रात (जिआॅलाॅजी) येतो. पृथ्वीच्या उगमापासून आजपर्यंत झालेल्या निर्मितीप्रक्रियेचा अभ्यास त्यात केला जातो. हे शास्त्र वरवर पाहता निरुपयोगी वाटते. कारण पृथ्वीचे थर, दगडगोटे व त्यांचा अभ्यास यात गुंतलेल्या शास्त्रज्ञाचा व्यवहाराशी काय संबंध, असे अनेकांना वाटते. पण तहान लागली, तर त्याच शास्त्रज्ञाला गाठायची वेळ येते. विहीर कुठे खोंदावी, पाणी किती खोलीवर लागेल, वेळ किती लागेल, याचा सल्ला हाच शास्त्रज्ञ देणार असतो. हीच गोष्ट कोळसा, खनिज तेल, खनिज वायूच्या साठ्यांच्या बाबतीत आहे. पण सध्याच्या जगात यांचे काम याहीपुढे गेले आहे. धरणाची जागा, इमारतीचा पाया, पुलाची रचना, मनोऱ्याची उंची व व वजन आणि त्याखालील जमीन या प्रत्येक बाबतीत यांचा सल्ला मोलाचा असतो.भूगर्भशास्त्राच्या प्रगतीनुसार सध्या अनेक शाखा कार्यरत आहेत. पेट्रोलॉजिस्ट हा भूगर्भशास्त्रज्ञ जमिनीचा कस, थर, बांधणी यांचा विशेष अभ्यास करतो. स्ट्रॅटीग्राफर जमिनीखालचे थर, त्यांची रचना, त्यांचे आयुष्य, त्यांचा परिसर यांबद्दल मोजक्या ठिकाणी उत्खननानंतर निष्कर्षावर येऊ शकतो. पॅलिअँटालाॅजिस्टला जिवाश्म, त्यांचा काळ, पृथ्वीच्या उत्पत्तीपासूनच्या घडामोडी यात रस असतो. जिओफिजिसिस्ट पृथ्वीचे विद्युतचुंबकीय वातावरण, चुंबकीय क्षेत्र, त्यांचे आजच्या जीवनावर होणारे परिणाम यांवर जास्त लक्ष केंद्रित करतो. जिआॅमाॅरफाॅलाॅजी ही त्यातल्या त्यात नवीन शाखा उदयाला येत आहे. दऱ्याखोऱ्यांतील जीवन, त्यांचा एकमेकांशी संबंध व नैसर्गिक स्रोत म्हणजे झरे, खनिज, झाडे यांवर ही शाखा अधिक अभ्यास करते. वर लिहिलेल्या स्वतंत्र शाखा म्हणून जरी अस्तित्वात असल्या, तरी मूलतः भूगर्भशास्त्राचा सुसंगत अभ्यास करताना प्रत्येक शाखेतील माहिती असावी लागते. फक्त पूर्ण शिक्षणोत्तर आवडीचा, संशोधनाचा वा कामाचा विषय या दृष्टीने त्या शाखेवर लक्ष केंद्रित केले जाते आणि त्या शाखेतील ज्ञानात व माहितीत भर घालायचा प्रयत्न होतो. सध्याच्या भूगर्भशास्त्रज्ञांचा सखोल अभ्यासाचा विषय अगदी वेगळ्याच दिशेने चालू आहे. अंटार्क्टिकावर सतत चाललेले संशोधन व सागराच्या तळाशी असलेल्या खनिज द्रव्यांबद्दल चाललेले संशोधन यांत अनेक मोठे व महत्त्वाचे भूगर्भशास्त्रज्ञ गुंतलेले आहेत. यासाठी अद्ययावत प्रयोगशाळा असलेली प्रचंड अवाढव्य बोट कायम समुद्री वास्तव्याला असून ती जगातील अनेक समुद्र सतत हिंदीतच आहे. गरम पाणी भूगर्भात आहे. ज्वालामुखीमुळे तर भूगर्भातील अंतर्भाग गरमच असतो, हेही माहीत आहे. जसजसे खोल जावे, तसतसे तापमान एकेक डिग्री सेंटीग्रेडने वाढत जाते, याचीही नोंद गेली अनेक वर्षे खाणशास्त्रज्ञांनी घेतलेली आहे. या सर्व माहितीचा वापर करून मग भूगर्भातील उष्णतेचा वीजनिर्मितीला का उपयोग करू नये, या दिशेने अनेकांचे प्रयत्न सुरू झाले. जमिनीला खोलवर भोके पाडून तप्त दगडांवर पाणी सोडावयाचे. या पाण्याची वाफ दुसऱ्या पाईपमधून वर घ्यावयाची व तिच्या शक्तीवर जनित्रे चालवून वीज निर्माण करायची, असे या विद्युतनिर्मितीचे स्वरूप आहे. आजमितीला सुमारे वीस देश या पद्धतीने वीजनिर्मिती करत आहेत. अमेरिका, इटली, न्यूझीलंड येथे तर एकापेक्षा जास्त 'जिओथर्मल पॉवर स्टेशन्स' उभारली गेली आहेत. यापुढील प्रगतीची दिशा म्हणजे खोलवरचे बोअरिंगचे पाणी अधिक खोल असलेल्या गरम खडकापर्यंत पोहोचवायची व्यवस्था करायची. जमिनीखाली उभारलेल्या वीजनिर्मिती केंद्रातच वीज निर्माण करावयाची व वर फक्त विजेच्या ताराच आणून विजेचे वाटप करायचे, अशी कल्पना शास्रज्ञ मनात खेळवत आहेत.*'सृष्टी विज्ञानगाथा' या पुस्तकातून**संकलन :- श्याम बसप्पा ठाणेदार, पुणे*••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• 🌹 *" फ्रेश सुविचार "* 🌹••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••*ज्याच्या गरजा कमी, त्याला सुख आणि स्वास्थ्य अधिक !**संकलन :- प्रमिलाताई सेनकुडे**ता. हदगाव जि. नांदेड*📱9403046894••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• ❓ *आजची प्रश्नमंजुषा* ❓••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••१) २०२३ चा *'टाईम ॲथलिट ऑफ द इयर'* हा पुरस्कार कोणत्या खेळाडूला जाहीर झाला आहे ?२) भारताचे नवे कृषिमंत्री म्हणून कोणाची निवड झाली ?३) 'वाटेवरल्या सावल्या' हे पुस्तक कोणी लिहिले आहे ?४) राष्ट्रीय नदीजोड प्रकल्प कोणत्या नावाने ओळखला जातो ?५) बँकिंग प्रणालीशी संबंधित असणारा IFSC कोडचा विस्तारित रूप काय आहे ? *उत्तरे :-* १) लिओनेल मेस्सी, अर्जेंटिना २) अर्जुन मुंडा ३) ग. दि. माडगूळकर ४) अमृत क्रांती ५) Indian Financial System Code*संकलन :- जैपाल भै. ठाकूर*जि.प.व.प्राथ.शाळा भोसा, ता. आमगाव, जि. गोंदिया 📱9765943144••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎂 *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *◆|वा|ढ|दि|व|स|अ|भि|ष्ठ|चिं|त|न|◆* 👤 इलियास शेख सर्पमित्र तथा शिक्षक, देगलूर👤 प्रा. नितीन दारमोड, वक्ते व लेखक, धर्माबाद👤 आकाश सोनटक्के👤 विशाल स्वामी👤 आदर्श मडावी👤 प्रिया बुडे👤 रमेश मेरलवार, व्यापारी, करखेली*ઉदंड_आયુષ્યાच्या अનંત_શુभेच्छा*[ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा एक दिवस अगोदर 9423625769 येथे पोस्ट करावे. ]••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• ••• 💡 ‼ *मनाचे श्लोक*‼ 💡•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••भजाया जनीं पाहतां राम एकू। करी बाण एकू मुखी शब्द एकू॥ क्रिया पाहतां उद्धरे सर्व लोकू। धरा जानकीनायकाचा विवेकू॥१३१॥।। जय जय रघुवीर समर्थ ।।••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🕊🌎 ‼ *विचारधारा*‼🕊🌎••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••बरेचदा असं होत की, न केलेल्या कर्माचे फळ दुसऱ्यांच्या कर्मामुळे आपल्याला भोगावे लागत असते पण असं का..? हा एक मोठा प्रश्न आहे. कदाचित हा योगायोग असू शकतो.पण नको ते कर्म कराणारा आनंदाने हसत, हसत जगतो. आपण मात्र स्वतःला चिंतेच्या डोहात बुडवून घेतो. माणसाचा जन्म एकदाच मिळते. मनसोक्त जगून घ्यावे कारण सुखात जरी लाखो लोक असतील तरी शेवटच्या क्षणी मात्र सोबतीला कोणीच येत नाही हेच जीवनाचे अंतिम सत्य आहे.🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷सौ.संगीता संतोष ठलाल मु.कुरखेडा जि.गडचिरोली••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎭 *आजची फ्रेश बोधकथा* 🎭••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *जीवन प्रवास*एक महिला एका बसमध्ये बसली होती. पुढच्याच स्टॉपमध्ये एक जाड आणि थोराड वयस्कर बाई आल्याआणि तिच्याजवळ बसल्या.जास्तित जास्त जागा तिने व्यापली आणि तिच्या सोबत तिने मोठमोठ्या पिशव्या पण आणल्या होत्या. त्यांनी पण खूप जागा व्यापली. त्या तरुणीच्या दुसऱ्या बाजूस बसलेला तरुण अस्वस्थ झाला. तो तिला म्हणाला की "तू काहीच का बोलत नाहीस?"तरुणीने स्मित करून प्रतिसाद दिला"अनावश्यक किंवा वायफळ काहीतरी बोलण्यात काहीच अर्थ नाही. आपला एकत्र प्रवास खूपच छोटा आहे. मी पुढच्याच स्टॉपवर उतरणार आहे."ही प्रतिक्रिया सुवर्ण अक्षरांमध्ये लिहिली जाण्यासाठी पात्र आहे."इतक्या नगण्य गोष्टींवर भांडण करणे आवश्यक नाही, *आपला प्रवास खूपच छोटा आहे"*आपल्यापैकी प्रत्येकाने हे जाणले पाहिजे की, आपल्याला इथे वेळ इतका कमी आहे; की त्या वेळात भांडणे, निरर्थक वादविवाद करणे, इतरांना क्षमा न करणे, असमाधानीपणा आणि दोष शोधण्याची वृत्ती म्हणजे वेळ आणि उर्जेचा अपव्यय आहे.कोणी आपले मन दुखावलंय का? शांत रहा,कारण जीवन प्रवास खूप छोटा आहे. कुणी तुमचा विश्वास घात केला आहे का? तुम्हाला फसवलय का?सोडून द्या, शांत रहा, कारण*जीवन प्रवास खूप छोटा आहे.*कुणीही तुम्हाला त्रास दिला असल्यास, लक्षात ठेवा की, हा प्रवास किती मोठा किंवा छोटा आहे हे कुणालाच माहीत नाही. त्यांचा प्रवास कधी संपणार आहे ते कुणालाही माहीत नाही.आपला प्रवास खूप छोटा आहे.आपण मित्रमंडळी आणि नातेवाईक यांची कदर करूया. आपण एकमेकांचा आदर करू, एकमेकांशी प्रेमाने आणि आदराने वागूया. एकमेकांच्या आनंदात आपण पण आनंदी होऊया.कारण एकच की,*आपला प्रवास खूप छोटा आहे ..!*•••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••या पोस्ट विषयी आपल्या सूचना, निवेदन, अभिप्राय, बातम्या, वाढदिवस, माहिती किंवा शंका 9423625769 येथे कळवावे. •••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••~~~~~~~~~~~~~~~~~~~*🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢*📱 9423625769~~~~~~~~~~~~~~~~~~~*🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏*पुन्हा भेटू या फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार ~~~~~~~~~~~~~~~~~~~
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment