✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट~~~~~~~~~~~~~~~~~~~ 9️⃣ 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 9️⃣            ( फ्रेश शालेय परिपाठ )🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00         ( रविवार आणि सुट्टी वगळून )~~~~~~~~~~~~~~~~~~~🎇 दिनांक :- 05 डिसेंबर 2023💠 वार - मंगळवार~~~~~~~~~~~~~~~~~~~Link - https://nasayeotikar.blogspot.com/2019/03/blog-post_12.html••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🌷🌐 .  *दिनविशेष* .  🌐🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••*_जागतिक माती दिन_*••••••••••••••••••••••••••••••••• *_ या वर्षातील ३३९ वा दिवस आहे_* •••••••••••••••••••••••••••••••• *_महत्त्वाच्या घटना:_* •••••••••••••••••••••••••••••••• *१९६३: महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांनी मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली* *१९५७:इंडोनेशियाचे अध्यक्ष सुकार्नो यांनी सर्व डच नागरिकांना हद्दपार केले.**१९३२:जर्मनीत जन्मलेले स्विस भौतिकशास्त्रज अल्बर्ट आईनस्टाईन यांना अमेरिकन व्हिसा देण्यात आला.**१८४८:अमेरिकन संसदेसमोर केलेल्या भाषणात राष्ट्राध्यक्ष जेम्स पोल्क यांनी कॅलिफोर्नियात मोठ्या प्रमाणात सोने सापडल्याचे सांगितले.* *_जन्मदिवस / जयंती / वाढदिवस:_* •••••••••••••••••••••••••••••••••••••*१९८१:प्रा.हनुमंत वि माने -- कवी* *१९७७:रज्जाक सादिक शेख- कवी* *१९६४:अनिल बाबुराव गव्हाणे-- ग्रामीण साहित्यिक**१९६२:डॉ.शकुंतला काळे -- लेखिका तथा निवृत्त शिक्षण संचालक* *१९६०:सारिका ठाकूर(सारिका )-- भारतीय अभिनेत्री आणि कॉस्च्युम डिझायनर* *१९५८:बाबाराव निंबाजी मडावी -- प्रसिद्ध कवी,कथालेखक,कादंबरीकार* *१९५६:प्रा.डॉ.बजरंग सुखदेव कोरडे --इंग्रजी व मराठी मध्ये लेखन करणारे लेखक,संपादक* *१९५५:शरद तळदे - प्रसिद्ध चित्रकार व लेखक* *१९५३:सम्राट नाईक- कवी, व्यंगचित्रकार, गायक,वादक (मृत्यू:१० मे २०२१)**१९४८:शंकर वासुदेव अभ्यंकर-- संत वा्ङ्मयाचे अभ्यासक,लेखक व प्रवचनकार**१९४८:मनीषा हिरालाल शहा-- लेखिका* *१९४४:विलास वसंत खोले-- लेखक,समीक्षक(मृत्यू:१७ आक्टोबर २०२२)**१९४३:लक्ष्मण देशपांडे – ’वर्‍हाड निघालंय लंडनला’साठी प्रसिद्ध असलेले लेखक, दिग्दर्शक व प्राध्यापक (मृत्यू:२२ फेब्रुवारी २००९)**१९४०:उस्ताद गुलाम अली-- पटियाला घराण्याचे पाकिस्तानी गझल गायक**१९३६:प्रा.सुरेश दत्तात्रेय देशपांडे-- लेखक संपादक* *१९३८:मोहन हरी आपटे-- विज्ञानलेखक (मृत्यु:१२ नोव्हेंबर २०१९)**१९३३:डॉ.भास्कर जनार्दन कविमंडन-- लेखक,संपादक* *१९३१:अ‍ॅडमिरल जयंत नाडकर्णी – १४ वे नौसेनाप्रमुख(मृत्यू:२जुलै २०१८)**१९०१:वेर्नर हायसेनबर्ग – ’क्‍वांटम मॅकॅनिक्स’मधील मूलभूत संशोधनासाठी नोबेल पारितोषिक मिळवणारे (१९३२) जर्मन भौतिकशास्त्रज्ञ (मृत्यू:१ फेब्रुवारी १९७६)**१९०१:वॉल्ट इलायन डिस्‍ने – अ‍ॅनिमेशनपटांचे प्रणेते, ’मिकी माऊस’चे जनक (मृत्यू:१५ डिसेंबर १९६६)**१८९४:जोश मलिहाबादी – ऊर्दू कवी (मृत्यू:२२ फेब्रुवारी १९८२)**१८६३:पॉल पेनलीव्ह – फ्रान्सचे पंतप्रधान आणि गणितज्ञ (मृत्यू:२९ आक्टोबर १९३३)* *_मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन:_* ••••••••••••••••••••••••••••••••••••••*२०१६:जयललिता जयरामन-- तमिळनाडू राज्याच्या माजी मुख्यमंत्रीअनेक तमिळ,तेलुगू, कन्नड आणि हिंदी चित्रपटामधून अभिनय (जन्म:२४ फेब्रुवारी १९४८)* *२०१३:नेल्सन मंडेला-- दक्षिण आफ्रिकेचे पहिले कृष्णवर्णीय अध्यक्ष(जन्म:१८ जुलै १९१८)**२००८:जयदेव सुब्बराव हट्टंगडी -- मराठीतले एक नामवंत नाट्यदिग्दर्शक आणि नाट्यपरीक्षक(जन्म:२८ ओगस्ट १९४८)**२००७:म.वा.धोंड – टीकाकार (जन्म:३ आक्टोबर १९१४)**१९९९:वसंत गणेश तथा बापूसाहेब उपाध्ये – स्वातंत्र्यसैनिक,समाजवादी नेते,आमदार आणि शेती व सिंचन या विषयांतील व्यासंगी मार्गदर्शक* *१९९१:डॉ.वासुदेव विश्वनाथ गोखले – संस्कृततज्ञ आणि बौद्ध धर्माचे अभ्यासक* *१९७३:राकेश मोहन – हिन्दी नाटककार (जन्म:८ जानेवारी १९२५)**१९५९:कुमार श्री दुलीपसिंहजी – क्रिकेटपटू, यांच्या स्मरणार्थ भारतात ’दुलीप ट्रॉफी’ खेळली जाते. (जन्म:१३ जून १९०५)**१९५५:असरार-उल-हक (मजाझ लखनवी) -- भारतीय उर्दू कवी(जन्म:१९ ऑक्टोबर१९११)**१९५१:अवनींद्रनाथ टागोर – जलरंगचित्रकार (जन्म:७ ऑगस्ट १८७१)**१९५०:योगी अरविंद घोष – क्रांतिकारक, तत्त्वचिंतक,योगी व कवी (जन्म:१५ ऑगस्ट १८७२)**१७९१:वूल्फगँग मोझार्ट – ऑस्ट्रियन संगीतकार (जन्म:२७ जानेवारी १७५६)*~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~ *_दिनविशेष या सदरातील सर्व मुद्दे हे संग्रहात्मक आहेत तेव्हा त्यात चूका नसतीलच असे सांगता येणार नाही_* *✍ संकलन ✍* *श्रीराम चव्हाण माजी शिक्षणाधिकारी,नागपूर*मोबाईल:9822695372 ईमेल: chavhansk65@gmail.com••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••      *✈  🚀  गुगलयान ✈ 🚀*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••*मृत्यू : एक अटळ सत्य*मृत्यूच्या दारात उभा राहून तो परत आला, मृत्यूच्या जबड्यातून डॉक्टरांनी त्याला वाचविला, काळ आला होता पण वेळ आली नव्हती, एवढ्या मोठ्या अपघातातून एक वर्षाचे लहान बाळ वाचले अश्या मथळ्याची बातमी वाचतो त्यावेळी त्या त्या नशीबवान व्यक्तीविषयी मनात उत्कंठेची भावना निर्माण होते. नशीब चांगला होता म्हणून तो वाचला असे ही सहज बोलून जातो. त्याचवेळी हृदयविकाराच्या झटक्याने एकाचा मृत्यू, रस्ताच्या अपघातात एकाचा मृत्यू, उपचार चालू असताना एकाचा मृत्यू अश्या बातम्या जेंव्हा कानावर येतात त्यावेळी त्याच्या विषयी मनात दुःखाची भावना मनात तयार होते. मृत्यू हे कोणाच्या हातात नाही आणि ते कोणाला सांगून देखील येत नाही .........पूर्ण लेख वाचण्यासाठी वरील लिंकवर क्लीक करावे~~~~~~~~~~~~~~~~~~~   🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••1⃣ *सिंधुदुर्ग हे शिवरायांच्या सामर्थ्याचं प्रतिक, त्यांच्या काळातलं समुद्री सामर्थ्य आपल्याला परत कमवायचं आहे, नरेंद्र मोदींचे आवाहन, पंतप्रधानांच्या हस्ते राजकोट किल्ल्यावर शिवरायांच्या पुतळ्याचं अनावरण*•••••••••••••••••••••••••••••••••••••2⃣ *महाराष्ट्रातील सगळ्या शेतकऱ्यांची कर्जमाफी करा; सुप्रिया सुळेंची थेट लोकसभेत मागणी*•••••••••••••••••••••••••••••••••••••3⃣ *स्वाभिमानीचे नेते राजू शेट्टींसह 150 जणांवर गुन्हा दाखल, राजारामबापू कारखान्यावरील आंदोलनादरम्यान लाखो रुपयांचे नुकसान केल्याचा ठपका*•••••••••••••••••••••••••••••••••••••4⃣ *दक्षिण भारतात 'मिचॉन्ग' चक्रीवादळामुळे हाहाकार, आतापर्यंत 5 जणांचा मृत्यू, चेन्नईला पावसाने झोडपलं*•••••••••••••••••••••••••••••••••••••5⃣ *तेलंगणातील दिंडीगुल येथील एअर फोर्स अकादमी येथे विमान क्रॅशमध्ये 2 भारतीय हवाई दलाच्या वैमानिकांचा मृत्यू झाला*•••••••••••••••••••••••••••••••••••••6⃣ *चिंता वाढवणारी बातमी! 50 हून अधिक कफ सिरप कंपन्या गुणवत्ता चाचणीत अपयशी*•••••••••••••••••••••••••••••••••••••7⃣ *एडन मार्करामकडे भारताविरुद्धच्या टी-ट्वेंटी आणि एकदिवसीय सामन्यांसाठी संघाची कमान*•••••••••••••••••••••••••••••••••••••*📷 वृत्त संकलक -  कुणाल पवारे 📹*📱9960358300•••••••••••••••••••••••••••••••••••••ही पोस्ट नियमित मिळविण्यासाठी आणि या समुहात add होण्यासाठी 9423625769 येथे संपर्क करावे.••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••      🌷🍃  *विशेष माहिती* 🌷🍃••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••📙 *पल्स पोलिओ म्हणजे काय ?* 📙 पोलिओ अर्थात बाल पक्षाघात हा सामान्यत: पाच वर्षांपेक्षा लहान वयाच्या मुलांना होणारा एक सांसर्गिक रोग आहे. तीन प्रकारच्या विषाणूंमुळे हा रोग होतो. हा विषाणू दूषित पाण्यामार्फत पसरतो. पोलिओच्या रुग्णाच्या विष्ठेचा पाण्याशी संपर्क येऊन ते दूषित होते. हेच पाणी निरोगी व्यक्ती प्यायल्यास तिला पोलिओ होऊ शकतो. पोलिओ हा रोग ९९% व्यक्तींमध्ये अत्यंत सौम्य स्वरूपाचा असतो. ९५% लोकांमध्ये तर कोणतीही विशिष्ट लक्षणे दिसत नाही. ३ ते ४% लोकांमध्ये ताप आढळून येतो. १% लोकांमध्ये मान व पाठ आखडणे, दुखणे अशी लक्षणे दिसतात. १% हून कमी रुग्णांमध्ये मात्र मज्जासंस्थेवर विषाणू आक्रमण करतो. याची परिणती एकतर श्वसन बंद पडून मृत्यू होण्यात किंवा हात पाय कायमस्वरूपी लुळे पडण्यामध्ये होते. पोलिओ हा गंभीर रोग असला तरी तो टाळणे सहज शक्य आहे. बाळाला जन्मल्यावर लगेच आणि त्यानंतर ते ६, १०,व १४ आठवडय़ांचे तसेच नंतर दीड वर्षांचे झाल्यावर पोलिओ प्रतिबंधक लसीचे दोन दोन थेंब पाजल्यास या रोगापासुन बाळाचे नक्कीच संरक्षण होऊ शकते. भारतात लसीकरणाचा कार्यक्रम प्रभावीपणे राबवला गेल्याने या रोगाचे प्रमाण अतिशय कमी झाले आहे. जागतिक आरोग्य संघटनेने २००५ पर्यंत पोलियोचे जगातून निर्मूलन करण्यासाठी धडक कार्यक्रम हाती घेतला आहे. याला 'पल्स पोलिओ' असे म्हणतात. या कार्यक्रमाअंतर्गत विविध देशातील पाच वर्षांखालील बालकांना विशिष्ट दिवसांना पोलिओची लस दिली जाते. त्यामुळे सर्व बालकांच्या आतड्यांमध्ये लसीतील (रोग निर्माण करू न शकणारा) विषाणू प्रस्थापित होतो. साहजिकच रोगकारक विषाणूला राहण्यासाठी कोणत्याच बालकांचे आतडे मिळत नाही. परिणामी तो पर्यावरणात येतो व काही आठवड्यांनी नष्ट होतो. पल्स पोलिओ मोहीम यशस्वीपणे राबवली गेल्यास जगातून निर्मूलन होणारा देवी नंतरचा दुसरा रोग पोलिओ ठरेल यात शंका नाही. दुर्दैवाने काही व्यक्ती गैरसमजापोटी आपल्या बाळांना पोलिओची लस देण्यास टाळाटाळ करतात. त्यामुळे त्यांच्या बालकांना पोलिओ होण्याचा धोका निर्माण तर झालाच आहे पण पोलिओ निर्मूलनाच्या अभियानालाही खीळ बसत आहे. म्हणूनच अमिताभ बच्चन तसेच शाहरुख खान सारखे लोकप्रिय अभिनेते तसेच सचिन तेंडुलकरसारखे महान खेळाडू सर्व जनतेला पल्स पोलिओच्या दिवशी सर्व बालकांना 'दो बूंद जिंदगी के' देण्याचे टीव्हीवरून आवाहन करताना दिसत असतात !*डॉ. जगन्नाथ दीक्षित**डाॅ. अंजली दीक्षित*यांच्या 'मेडिकल जनरल नॉलेज' या पुस्तकातूनमनोविकास प्रकाशन०२० ६५२६२९५०*संकलन :- श्याम ठाणेदार, पुणे*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••   🌹 *" फ्रेश सुविचार "* 🌹••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••समाधानी राहण्यातच आयुष्यातील सर्वात मोठं सुख लपलेले आहे.*संकलन :- प्रमिलाताई सेनकुडे**ता. हदगाव जि. नांदेड*📱9403046894••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••       ❓ *आजची प्रश्नमंजुषा* ❓••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••१) बुद्धिबळाच्या इतिहासातील *पहिली ग्रँडमास्टर बहिणभावाची जोडी* कोणती ?२) भारतीय अणुचाचणी केंद्र पोखरण कोणत्या राज्यात आहे ?३) क्यूआर कोडचा सर्वप्रथम वापर कोणी केला ?४) सर्वाधिक आंतरराष्ट्रीय टी - २० सामने जिंकण्याचा विश्वविक्रम कोणत्या संघाने केला ?५) आरोग्य सेवेत ड्रोनचा वापर करणारे पहिले राज्य कोणते ? *उत्तरे :-* १) प्रज्ञानंद व वैशाली रमेशबाबू, भारत २) राजस्थान ३) मसाहेरो हारा, तंत्रज्ञ, 'डेन्सो वेव' ऑटो मोबाईल कंपनी ४) भारत ५) उत्तराखंड*संकलन :- जैपाल भै. ठाकूर*जि.प.व.प्राथ.शाळा भोसा, ता. आमगाव, जि. गोंदिया  📱9765943144••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎂  *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••  *◆|वा|ढ|दि|व|स|अ|भि|ष्ठ|चिं|त|न|◆*     👤 डॉ. शिवाजी कऱ्हाळे, राज्य आदर्श शिक्षक पुरस्कार प्राप्त, मुखेड👤 साईनाथ कल्याणकर👤 अरुण सूर्यवंशी👤 मनोजकुमार गटलावार👤 माधव जंगलेकर👤 सुनील पांचाळ👤 शंकर भंडारे👤 अविनाश सुभेदार👤 कृष्णकांत पाटील सावरगावकर👤 राजू अलमोड👤 योगेश पडोळे👤 राज डाकोरे👤 अशोक चिंचलोड*ઉदंड_आયુષ્યાच्या अનંત_શુभेच्छा*[ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा एक दिवस अगोदर 9423625769 येथे पोस्ट करावे. ]••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••   ••• 💡 ‼ *मनाचे श्लोक*‼ 💡•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••अनाथां दिनांकारणे जन्मताहे। कलंकी पुढे देव होणार आहे॥ तया वर्णिता शीणली वेदवाणी। नुपेक्षी कदा देव भक्ताभिमानी॥१२५॥।। जय जय रघुवीर समर्थ ।।••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🕊🎯 *विचारवेध...........✍🏻*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••प्रत्येकजण आपल्या जीवनाच्या चित्रशाळेत स्वत:चे एक सुंदर जीवनाचे चित्र काढून रंगवण्याचा सातत्याने प्रयत्न करत असतो.जीवनाच्या चित्राचा आकार कसाही असला तरी त्यात रंग मात्र आपल्या कल्पक बुध्दीने भरण्याचा प्रयत्न करतो.त्यात असणारे रंग जरी वेगवेगळे असले तरी भरण्याचे कौशल्य ज्याला आहे तो आपल्या वेगळ्या पद्धतीने,कलेने भरुन जीवनाला आकर्षक बनवण्याचा प्रयत्न करतो.ज्याला ही कला अवगत झाली नाही त्याच्या जीवनचित्रात रंगही भरता येत नसल्यामुळे जीवनचित्र रंगहिन व आकारहिन बनते.म्हणून जीवनाच्या जीवनचित्रशाळेत यशस्वी व्हायचे असेल,जीवनाला रंगरुप आकार द्यायचा असेल तर आपल्यातील कल्पकतेला,कौशल्याला आणि नवनिर्माण शिलतेला जागृत ठेवून जीवन सुंदर आणि आनंददायी निर्माण करायला शिकले पाहिजे.त्यातून स्वत:ला आणि इतरांना जगण्यासाठी एक नाविण्यपूर्ण कला अवगत होईल आणि आनंदाने जीवन जगण्यासाठी प्रेरणा मिळेल यात शंकाच नाही.© व्यंकटेश काटकर,नांदेडसंवाद..९४२१८३९५९०🌱🎨🌱🎨🌱🎨🌱🎨🌱••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎭 *आजची फ्रेश बोधकथा*  🎭••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••*चतुर बिरबलाची चतुर उत्तरे*एकदा एका पाठोपाठ पाच प्रश्न बादशहाने दरबारातील मंडळींना विचारले. बिरबल वगळता सर्व मंडळींनी गुळमुळीत उत्तर दिली, पण बिरबलाने मात्र अगदी चतुर उत्तर दिले.प्रश्न पहिला बादशाह : सर्वात श्रेष्ठ फुल कोणत्या झाडाचे आहे?इतर मंडळी : गुलाबाचे.बिरबल : कपाशीचे, कारण त्या फुलावरील बोंडातून कापूस तयार होतो. त्या कापसापासून आपल्याला कपडे चोपडे मिळून, आपल्या शरीराचे उन व थंडीपासून रक्षण होते.प्रश्न दूसराबादशाह : सर्वश्रेष्ठ दात कोणाचा?इतर मंडळी : हत्तीचाबिरबल : नांगराचा, कारण त्याच्यामुळे शेतीची नांगरणी होते. त्यातूनच धान्य पिकते.प्रश्न तिसरा बादशाह : सर्वश्रेष्ठ पुत्र कोणाचा?इतर मंडळी : राजाचाबिरबल : गाईचा, कारण तो शेत नांगरतो, बैलगाडी ओढतो, जळण आणि खत देतो, एवढेच नव्हे तर त्याच्या मृत्यूनंतर त्याच्या चामड्या पासून अनेक गोष्टी बनवल्या जातात.प्रश्न चौथा बादशहा : सर्वश्रेष्ठ राजा कोणता?इतर मंडळी : सार्वभौम राजा व अकबर बादशाहबिरबल : मेघ राजा, कारण तो आपणास पाणी देतो. शेती फेकून आपणास अन्न मिळते.प्रश्न पाचवाबादशाह : सर्वश्रेष्ठ गुण कोणता?इतर मंडळी : विद्येची आवडबिरबल : धैर्य, कारण धैर्यामुळेच माणसाला त्याच्या अंगातील सर्व गुणांचा पुरेपूर उपयोग करून जीवनाचे सार्थक करता येते.बिरबलाची अशी सर्वश्रेष्ठ उत्तरे ऐकून बादशहा खुश झाला व त्याने दरबारातील सर्व मंडळी समोर चतुर बिरबलची पाठ थोपटली.•••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••या पोस्ट विषयी आपल्या सूचना, निवेदन, अभिप्राय, बातम्या, वाढदिवस, माहिती किंवा शंका 9423625769 येथे कळवावे. •••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••~~~~~~~~~~~~~~~~~~~*🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢*📱 9423625769~~~~~~~~~~~~~~~~~~~*🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏*पुन्हा भेटू या फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार ~~~~~~~~~~~~~~~~~~~

No comments:

Post a Comment