✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट~~~~~~~~~~~~~~~~~~~ 9️⃣ 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 9️⃣ ( फ्रेश शालेय परिपाठ )🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00 ( रविवार आणि सुट्टी वगळून )~~~~~~~~~~~~~~~~~~~🎇 दिनांक :- 15 डिसेंबर 2023💠 वार - शुक्रवार~~~~~~~~~~~~~~~~~~~Link - http://nasayeotikar.blogspot.com/2022/12/world-tea-day.html••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🌷🌐 . *दिनविशेष* . 🌐🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••*_ या वर्षातील ३४९ वा दिवस आहे_* •••••••••••••••••••••••••••••••• *_महत्त्वाच्या घटना:_* •••••••••••••••••••••••••••••••• *१९९८:बँकॉक येथील आशियाई क्रीडा स्पर्धेत भारताला कबड्डीमधे सलग तिसर्यांदा सुवर्णपदक**१९९१:चित्रपट दिग्दर्शक सत्यजित रे यांना ‘ऑस्कर पारितोषिक’ जाहीर**१९७६:सामोआचा संयुक्त राष्ट्रसंघात (United Nations) प्रवेश**१९७०:व्हेनेरा - ७ हे रशियाचे अंतराळयान यशस्वीपणे शुक्र ग्रहावर उतरले. पृथ्वी सोडुन इतर कुठल्याही ग्रहावर उतरणारे हे पहिलेच यान होते.* *_जन्मदिवस / जयंती / वाढदिवस:_* ••••••••••••••••••••••••••••••••••••••*१९७९:प्रमोदकुमार रहांगडाले -- लेखक**१९७८:बाबासाहेब तुकाराम बारजकर -- कवी* *१९७६:हरिदास भीमरावजी वानखडे -- कवी* *१९७२:संतोष पद्माकर पवार -- कवी,संगीतकार,अभिनेता,नाटककार,नाट्य दिग्दर्शक आणि पटकथा लेखक**१९६२:प्रा.डॉ.प्रमोद मुनघाटे -- प्रसिद्ध लेखक, अभ्यासक**१९६०:अजीज हसन मुक्री- कवी* *१९५६:माया धुप्पड-- बालसाहित्याचे लेखन करणाऱ्या भावकवयित्री,गीतकार,लेखिका आणि समीक्षक**१९५४:रमेश नागेश सावंत-- कवी,लेखक अनुवादक* *१९४३:अरुण गणेश कुलकर्णी -- लेखक* *१९४०:रविंदर कपूर उर्फ गोगा कपूर -- भारतीय अभिनेता(मृत्यू:३ मार्च २०११)**१९४०:गजानन द्वारकानाथ रेळेकर-- लेखक* *१९३५:उषा मंगेशकर – पार्श्वगायिका व संगीतकार**१९३२:टी.एन.शेषन – प्रामाणिक व कर्तव्यदक्ष सनदी अधिकारी शेषन यांना सन १९९६मध्ये उत्कृष्ट शासकीय सेवेसाठीचा रमॉन मॅगसेसे पुरस्कार मिळाला आहे.(मृत्यू:१० नोव्हेंबर २०१९)**१९३१:पंडित रनाथ सेठ-- ज्येष्ठ बासरी वादक (मृत्यू:१५ फेब्रुवारी २०१४)**१९३०:वसुधा पद्माकर पाटील--कथाकार, कादंबरीकार**१९२७:डॉ.अनुराधा पोतदार--मराठीतील जेष्ठ कवयित्री (मृत्यू:३ ऑक्टोबर २०१३)**१९२४:कृष्ण मुकुंद उजळंबकर--**कादंबरीकार, ग्रंथालयशास्त्राचे तज्ज्ञ**१९२३:शीलावती चिंतामण बाबकर -- बाल कथा लेखिका* *१९०५:इरावती कर्वे – साहित्य अकादमी व महाराष्ट्र शासन पुरस्कार विजेत्या मानववंशशास्त्रज्ञ, समाजशास्त्रज्ञ व शिक्षणतज्ञ (मृत्यू:११ ऑगस्ट १९७०)**१९०३:रामचंद्र विष्णू गोडबोले तथा स्वामी स्वरुपानंद -- भारतीय आध्यात्मिक गुरू,संत वाड:मयावर लेखन(मृत्यू:१५ ऑगस्ट १९७४)**१८९२:जे.पॉल गेटी – गेटी ऑईल कंपनीचे संस्थापक,अमेरिकन उद्योजक आणि लोकहितबुद्धी (Philanthropist) (मृत्यू:६ जून १९७६)**१८६२:विष्णू गणेश नेने--कवी (मृत्यू:२३ जानेवारी १९२४)**१८५२:हेन्री बेक्वेरेल – नोबेल पारितोषिक विजेते (१९०३) फ्रेन्च पदार्थवैज्ञानिक (मृत्यू:२५ ऑगस्ट १९०८)**१८३२:गुस्ताव्ह आयफेल – फ्रेंच वास्तुरचनाकार आणि अभियंता (मृत्यू:२७ डिसेंबर १९२३)* *_मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन:_* ••••••••••••••••••••••••••••••••••••••*१९८५:शिवसागर रामगुलाम – मॉरिशसचे पहिले प्रधानमंत्री (जन्म:१८ सप्टेंबर १९००)**१९६६:वॉल्ट इलायन डिस्ने – अॅनिमेशनपटांचे प्रणेते, ’मिकी माऊस’चे जनक (जन्म:५ डिसेंबर १९०१)**१९५०:सरदार वल्लभभाई पटेल – स्वातंत्र्य सेनानी,स्वतंत्र भारताचे पहिले उपपंतप्रधान व पहिले गृहमंत्री,भारताचे लोहपुरुष,भारतरत्न (मरणोत्तर - १९९१) (जन्म:३१ आक्टोबर १८७५)**१७४९:छत्रपती शाहू महाराज-- पहिले मराठा साम्राज्याचे ५वे छत्रपती(जन्म:१८ मे१६८२)*~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~ *_दिनविशेष या सदरातील सर्व मुद्दे हे संग्रहात्मक आहेत तेव्हा त्यात चूका नसतीलच असे सांगता येणार नाही_* *✍ संकलन ✍* *श्रीराम चव्हाण माजी शिक्षणाधिकारी,नागपूर*मोबाईल:9822695372 ईमेल: chavhansk65@gmail.com••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *✈ 🚀 गुगलयान ✈ 🚀*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••*एक कप चहा*जगभरातील काही देशात 15 डिसेंबर हा दिवस जागतिक चहा ( World Tea Day ) दिवस म्हणून साजरा केला जातो. मात्र, चहाचा व्यापार आणि चहाच्या मळ्यात काम करणाऱ्या कामगारांच्या समस्यांकडे लक्ष वेधण्यासाठी 21 मे रोजी आंतरराष्ट्रीय चहा दिवस ( International Tea Day ) साजरा केला जातो. जागतिक चहा दिनाच्या निमित्ताने काही आठवणी .......~~~~~~~~~~~~~~~~~~~ 🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••1⃣ *मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी हिवाळी अधिवेशनात जुन्या पेन्शन संदर्भात निवेदन मांडल्यानंतर राज्यातील सरकारी कर्मचारी घेतला संप मागे*•••••••••••••••••••••••••••••••••••••2⃣ *मार्च ते मे अखेर होतील 19 अभ्यासक्रमांच्या सीईटी:सीईटी सेलने घोषित केले अभियांत्रिकीसह सर्व व्यवसायिक अभ्यासक्रमांच्या वेळापत्रक*•••••••••••••••••••••••••••••••••••••3⃣ *सर्वसामान्यांना मोठा झटका! तीन आठवड्यात दुसऱ्यांदा CNG च्या दरात वाढ*•••••••••••••••••••••••••••••••••••••4⃣ *महाराष्ट्रात 10 महिन्यात तब्बल 2478 शेतकऱ्यांनी संपवली जीवनयात्रा, राज्य सरकारची कबुली*•••••••••••••••••••••••••••••••••••••5⃣ *कोटक महिंद्रा बँकेची रोकड नेणारे वाहन दातीफाट्या जवळ उलटले:5 जण जखमी, आखाडा बाळापूर पोलिसांच्या सतर्कतेने 5 कोटींची रक्कम सुरक्षित*•••••••••••••••••••••••••••••••••••••6⃣ *परकीय गुंतवणुकीत महाराष्ट्र अव्वल, तीन महिन्यांत २८ हजार ८६८ कोटींची गुंतवणूक : उद्योगमंत्री सामंत*•••••••••••••••••••••••••••••••••••••7⃣ *भारत वि. दक्षिण आफ्रिका यांच्यातील तिसऱ्या T20 सामन्यात भारताने दक्षिण आफ्रिकेचा 106 धावानी केला पराभव*•••••••••••••••••••••••••••••••••••••*📷 वृत्त संकलक - कुणाल पवारे 📹*📱9960358300•••••••••••••••••••••••••••••••••••••ही पोस्ट नियमित मिळविण्यासाठी आणि या समुहात add होण्यासाठी 9423625769 येथे संपर्क करावे.••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• 🌷🍃 *विशेष माहिती* 🌷🍃••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• 📙 *मरूउद्यान (Oasis)* 📙अफाट पसरलेल्या वाळवंटात अचानक एखादा हिरवागार टापू आढळतो. खजुराची झाडे, खुरटी हिरवी झुडपे, थोडीफार शेती व त्याला धरुन असलेली वस्ती माणसे आणि पाळीव प्राणी यांनी तेथे सुखाने वस्ती केलेली आढळते. या सगळ्याचे मोठे आश्चर्य येथे प्रथमच आलेल्याला वाटत राहते. पण तेथे राहत असलेल्यांना हे सारे नैसर्गिकच वाटत असते. त्यांच्या दृष्टीने या जागी त्यांना पाणीपुरवठ्याची कधीच अडचण वाटत आलेली नसते. या जागांना मरूउद्याने किंवा ओअॅसिस असे म्हणतात. वाळवंटातील हिरवळीचा भाग असेही याचे वर्णन करता येईल.येथील पाणीपुरवठा हा पावसावर अजिबात अवलंबून नसतो. दूरवरून येणारे पाण्याचे खोलवरचे प्रवाह येथे एक तर तळ्याच्या स्वरूपात वर येतात किंवा विहिरीच्या स्वरूपात पारंपरिकरित्या ज्ञात असतात. त्यामुळे या आसमंतात अजिबात पाऊस न पडला, तरीही येथील पाण्याचा साठा कायम राहतो. अर्थात याला मर्यादा आहेच. पण ही मर्यादा आपोआपच पाळली जाते. कारण येथील वस्तीत वाढ फारच क्वचित होते. शेती हे येथील उत्पन्नाचे व जीविताचे साधन सहसा नसल्याने पाण्याचा वापर त्याही कारणाकरता फार केला जात नाही. कापूस, फळभाज्या, बाजारी यांचे थोडेफार उत्पन्न या भागात घेतले जाते.मरूउद्यानांचे महत्त्व आजकालच्या यांत्रिक युगात तितकेसे जाणवणार नाही. कारण संपूर्ण वाळवंट काही तासांमध्ये यांत्रिक पद्धतीने पार करता येते. पण जेमतेम गेल्या शतकापर्यंत हा भाग पार करणे म्हणजे एक जीवावरचीच कसरत असे. महिनोनमहिने प्रवास करत वाळूची वादळे, विषम हवामान याला तोंड देत जाताना बव्हंशी रस्ते मरूउद्यानांना जोडत पार केले जात. भारतातील कच्छच्या रणात वा थरच्या वाळवंटात अशी अनेक छोटी छोटी मरूउद्याने सापडतात. जैसलमेर, जोधपूर, बिकानेर ही शहरेही अशा पाण्याच्या आधारानेच वसत गेली आहेत. सहारा वाळवंटातही अशी मरूउद्याने आहेतच. काही ठिकाणी तर विश्वास बसू नये, अशी विस्तीर्ण तळी पाण्याचा साठा राखून आहेत.मरूउद्याने आटण्याचे प्रकार घडतात, ते यांत्रिक पद्धतीने पाणी उपसा केल्याने. एकाच वेळी ठिकाणी अनेक विंधनविहिरी घेऊन यांत्रिक पाणी उपसा केल्याने हा प्रकार गेल्या पाच पंचवीस वर्षांत घडत आहे. दुसरे कारण म्हणजे झाडांची वाढती संख्या. यावर नियंत्रण न ठेवल्यामुळे खोलवर जाऊन पाणी तेथेच शोषू लागतात. वाळूची वादळे फार मोठ्या प्रमाणावर झाल्यास येथील पाणवठ्याच्या जागेत त्याचे थर जमू शकतात. या थरांची वेळीच देखभाल होऊ शकली नाही, तरीही मरुउद्याने धोक्यात येतात.जीवनातही खडतर प्रवासात ज्यावेळी एखादा आनंदाचा, विसाव्याचा क्षण मिळतो, तेव्हा त्याला आपण ओअॅसीसची उपमा सहजपणे देतो. दूरवरून उन्हातून आलेला, तहानलेला प्रवासी गरम बाजारीची भाकरी, ताजी भाजी, खजूर व दूध यांचा आस्वाद सावलीला बसून घेतो, तेव्हा त्यालाही अगदी अशीच अंतीव आनंदाची भावना होते.*'सृष्टी विज्ञानगाथा' या पुस्तकातून**संकलन :- श्याम बसप्पा ठाणेदार, पुणे*•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🌹 *" फ्रेश सुविचार "* 🌹•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••*" कोणतीही विद्या, ज्ञान कधीच वाया जात नाही. "**संकलन :- प्रमिलाताई सेनकुडे**ता. हदगाव जि. नांदेड*📱9403046894••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• ❓ *आजची प्रश्नमंजुषा* ❓••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• १) राजस्थान राज्याचे नवनियुक्त मुख्यमंत्री म्हणून कोणाची निवड झाली आहे ?२) कोणत्या कलमानुसार जम्मू आणि काश्मीर या राज्याला 'विशेष दर्जा' बहाल करण्यात आले होते ?३) जगातली सर्वाधिक वेगाने वाढणारी हवाई बाजारपेठ म्हणून कोणत्या देशाला मानले जाते ?४) 'सायक्लोन मॅन ऑफ इंडिया' असे कोणाला म्हटले जाते ?५) कर्कवृत्त भारतातील किती राज्यातून जाते ? *उत्तरे :-* १) भजनलाल शर्मा २) कलम ३७० ३) भारत ४) मृत्युंजय महापात्रा ५) ८ राज्य *संकलन :- जैपाल भै. ठाकूर*जि.प.व.प्राथ.शाळा भोसा, ता. आमगाव, जि. गोंदिया 📱9765943144••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎂 *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *◆|वा|ढ|दि|व|स|अ|भि|ष्ठ|चिं|त|न|◆* 👤 बालाजी सुंकेवार, कलाशिक्षक, देगलूर👤 साईनाथ सायबलू, मुख्याध्यापक, धर्माबाद👤 रामकृष्ण लोखंडे👤 शिवाजी रामदिनवार, सहशिक्षक👤 ऋषिकेश गरड, उस्मानाबाद👤 दीपक चावरे, सहशिक्षक👤 श्रीधर काटेगर, आरमुर, तेलंगणा👤 अनिल जाधव शिरपूरकर👤 *ઉदंड_आયુષ્યાच्या अનંત_શુभेच्छा*[ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा एक दिवस अगोदर 9423625769 येथे पोस्ट करावे. ]••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• ••• 💡 ‼ *मनाचे श्लोक*‼ 💡•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••धरीं रे मना संगती सज्जनाची। जेणें वृत्ति हे पालटे दुर्जनाची॥ बळे भाव सद्बुद्धि सन्मार्ग लागे। महाक्रुर तो काळ विक्राळ भंगे॥१३५॥।। जय जय रघुवीर समर्थ ।।••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🕊🌎 ‼ *विचारधारा*‼🕊🌎••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• वेळ कोणासाठी थांबत नाही. म्हणून वेळेला महत्व देणे आवश्यक आहे. वेळेचे महत्व समजून घेणे तेवढेच गरजेचे आहे. जीवन प्रवासात अनेक सोबती मिळत असतात. कोणी स्वार्थ साधून एकटे सोडून निघून जातात,तर कोणी पाठीशी उभे राहतात. पण,वेळ मात्र तशी नसते संधीचे सोने करायला शिकवते व आधार होते म्हणून अनमोल अशा वेळेकडे दुर्लक्ष न करता तिचे महत्व जाणावे.🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷सौ.संगीता संतोष ठलाल मु. कुरखेडा जि. गडचिरोली••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎭 *आजची फ्रेश बोधकथा* 🎭••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••*लालसेपायी प्राण गेले*जय आणि विजय यांच्यात घनिष्ट मैत्री होती. दोघेही पट्टीचे पोहणारे होते. नदीच्या पाण्यात भरपूर मस्ती केली. तितक्यात स्थानिक प्रशासनाकडून बंधा-याकडून पाणी सोडण्यात येत असल्याची सूचना देण्यात आली. त्यामुळे दोघेही नदीच्या बाहेर आले. जेव्हा बंधा-यातील पाणी सोडण्यात आले तेव्हा नदीला पूर आल्यासारखी स्थिती निर्माण झाली. जय आणि विजय सुरक्षित स्थळी थांबले होते. नदीच्या पाण्याचा ओघ पाहत असतानाच नदीच्या प्रवाहात एक घोंगडी तरंगत येत असल्याचे दोघांच्याही दृष्टीस पडतील. विजयला ती घोंगडी ओढून आणावीशी वाटली. जयने त्याला थांबविण्याचा प्रयत्न केला. परंतु विजयने तोपर्यंत पाण्यात उडी मारली होती. तो घोंगडीजवळ गेला आणि तिला ओढत असतानाच त्याचे संतुलन बिघडले. विजय जितका जोम लावून किना-यावर येण्याचा प्रयत्न करत असतानाच पाण्यात उठणा-या लाटा त्याला दूर लोटत असत. मित्र असा संकटात सापडलेला पाहून जय ओरडला,''अरे मित्रा, घोंगडी सोड आणि परत निघून ये'' पण विजय म्हणाला,'' अरे जय मी घोंगडी सोडण्याचा खूप प्रयत्न करतो आहे पण घोंगडीनेच मला धरून ठेवले आहे.'' जयला कळून चुकले की विजयला त्या घोंगडीची लालसा निर्माण झाली आहे. विजयने घोंगडीसह किना-यावर येण्याचा खूप प्रयत्न केला पण तो अयशस्वी ठरला. शेवटी तो पाण्यात मृत्युमुखी पडला.त्याच्या लालसेने त्याचा जीव घेतला.तात्पर्य- कोणत्याही प्रकारची लालसा प्रसंगी आपल्या जीवाशी खेळू शकते.आणि त्यामध्ये आपले प्राणही जाते.•••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••या पोस्ट विषयी आपल्या सूचना, निवेदन, अभिप्राय, बातम्या, वाढदिवस, माहिती किंवा शंका 9423625769 येथे कळवावे. •••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••~~~~~~~~~~~~~~~~~~~*🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢*📱 9423625769~~~~~~~~~~~~~~~~~~~*🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏*पुन्हा भेटू या फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार ~~~~~~~~~~~~~~~~~~~
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment