✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट~~~~~~~~~~~~~~~~~~~ 9️⃣ 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 9️⃣ ( फ्रेश शालेय परिपाठ )🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00 ( रविवार आणि सुट्टी वगळून )~~~~~~~~~~~~~~~~~~~🎇 दिनांक :- 01 जानेवारी 2024💠 वार - सोमवार~~~~~~~~~~~~~~~~~~~Link - https://nasayeotikar.blogspot.com/2017/12/blog-post_31.html••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🌷🌐 . *दिनविशेष* . 🌐🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••*_••••• नूतन वर्षाभिनंदन २०२४ •••••_**_धूम्रपान विरोधी दिन_*•••••••••••••••••••••••••••••••••*_ या वर्षातील पहिला दिवस आहे_* •••••••••••••••••••••••••••••••• *_महत्त्वाच्या घटना:_* •••••••••••••••••••••••••••••••• *२०००:ई कॉमर्स, ई मेल, इंटरनेट अशा इलेक्ट्रॉनिक सेवांमध्ये वापरण्यासाठी ग्रिनीच इलेक्ट्रॉनिक टाइम (GeT) या आंतरराष्ट्रीय प्रमाणवेळेची सुरुवात झाली.**१९३२:डॉ.ना.भि.परूळेकर यांनी 'सकाळ'वृत्तपत्र हे सुरू केले.**१९१९:गव्हर्नमेंट ऑफ इंडिया अॅक्ट अमलात आला व देशात कायदेमंडळे स्थापन झाली.**१९०८:’संगीतसूर्य’ केशवराव भोसले यांनी हुबळी येथे 'ललित कलादर्श’ ही नाटक कंपनी स्वबळावर स्थापन केली.**१९००:स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी मित्रमेळ्याची स्थापना केली.**१८९९:क्यूबामधील स्पेनची राजवट संपुष्टात आली.**१८८३:पुणे येथे नूतन मराठी विद्यालयाची स्थापना**१८८०:विष्णूशास्त्री चिपळूणकर,लोकमान्य टिळक,गो.ग.आगरकर आणि माधवराव नामजोशी यांनी पुणे येथे 'न्यू इंग्लिश स्कूल’ची स्थापना केली.**१८६२:इंडियन पीनल कोड अस्तित्वात आले.**१८४८:महात्मा फुले यांनी पुणे येथे पहिली मुलींची शाळा सुरू केली.**१८४२:बाबा पद्मनजी यांचे ’ज्ञानोदय’ वृत्तपत्र सुरू झाले.नव्वद वर्षांनंतर याच दिवशी डॉ.ना. भि.परूळेकर यांनी 'सकाळ' वृत्तपत्र हे सुरू केले.**१८०८:यू.एस.ए.मध्ये गुलामांच्या आयातीस बंदी घालण्यात आली.**१७५६:निकोबार बेटे डेन्मार्कच्या ताब्यात गेली आणि त्यांना ’न्यू डेन्मार्क’ असे नाव देण्यात आले.* *_जन्मदिवस / जयंती / वाढदिवस:_* ••••••••••••••••••••••••••••••••••••••*१९८९:गणेश प्रल्हादराव आघाव-- कवी, लेखक**१९८२:धीरजकुमार रामदास नंदागवळी-- कवी**१९७६:वि.दा.पिंगळे -- प्रसिद्ध कवी,लेखक* *१९७६:शेख बिस्मिल्ला शेख कासिम-- कवी**१९७४:आश्रुबा राघोजी कांबळे -- कवी,गायक**१९७३:प्रा.युवराज तानाजीराव खरात-- कवी,कथाकार,कादंबरीकार**१९७२:भारत मारोतराव दाढेल -- लेखक**१९७१:सीमा गजानन भसारकर-- कवयित्री**१९७०:हरिश्चंद्र रामचंद्र धीवार-- कवी**१९७०:प्रा.डॉ.सुनील रामटेके--- कवी,लेखक* *१९६९:डॉ.काशीनाथ विनायक ब-हाटे -- प्रसिद्ध लेखक,संपादक* *१९६८:प्रा.डॉ चंद्रकांत वाघमारे-- प्रसिद्ध लेखक* *१९६८:राजेश गोरखशेठ सोनार (अहिरराव)-- कवी* *१९६६:प्राचार्य वसंत माणिकराव बिराजदार-- प्रसिद्ध लेखक**१९६२:संजय आर्वीकर- प्रसिद्ध लेखक,कवी, समीक्षक* *१९६०:डॉ.सुरेश गोविंदराव सावंत-- सुप्रसिद्ध बालसाहित्यिक,विविध पुरस्काराने सन्मानित**१९५९:नंदन नांगरे -- लेखक, तथा निवृत्त शिक्षण संचालक* *१९५५:शाहीर शिवाजीराव धर्मा पाटील-- शाहीर,लेखक**१९५२:यशवंत राजाराम निकम-- प्रसिद्ध लेखक निवृत्ती शिक्षणाधिकारी* *१९५१:नाना पाटेकर – सुप्रसिद्ध अभिनेता**१९५१:शंकर गोविंदराव पांडे-- लेखक**१९५२:शाजी नीलकांतन करुण-- भारतीय चित्रपट दिग्दर्शक आणि सिनेमॅटोग्राफर**१९५०:तुकाराम सीताराम ढिकले--कवी**१९५०:दीपा मेहता – भारतीय वंशाच्या कॅनेडियन दिग्दर्शिका आणि पटकथालेखिका**१९५०:राहत इंदोरी -राहत कुरेशी-- भारतीय बॉलीवूड गीतकार आणि उर्दू कवी(मृत्यू:११ऑगस्ट २०२०)**१९४८:नानासाहेब चिमणराव बोरस्ते-- संवेदनशील कवी,वक्ते,माजी आमदार**१९४८:नामदेव चंद्रभान कांबळे-- मराठी साहित्यिक,पत्रकार,साहित्य अकादमी पद्मश्री पुरस्काराने सन्मानित**१९४६:जगन्नाथ सोनू नहिरे-- कवी* *१९४६:डॉ.निवास पांडुरंग पाटील-- गणितज्ज्ञ, खगोल विषयाचे अभ्यासक,लेखक**१९४५:प्राचार्य डॉ.विठ्ठल भिकाजी वाघ-- सुप्रसिद्ध कवी आणि लेखक* *१९४५:मारुती हरिभाऊ दाढेल -- लेखक, दलित मित्र पुरस्कार**१९४३:रघुनाथ माशेलकर – शास्त्रज्ञ, वैज्ञानिक आणि औद्योगिक संशोधन परिषदेचे महासंचालक,पद्मश्री,पद्मभूषण**१९४३:मधुकर रूपराव वाकोडे-- महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध साहित्यिक. लोकसाहित्याचे अभ्यासक-संशोधक, समीक्षक**१९४२:उत्तम बंडू तुपे--- मराठी साहित्यिक (मृत्यू:२६ एप्रिल २०२०)**१९४१:गोवर्धन असरानी ऊर्फ ’असरानी’ – चित्रपट कलाकार**१९३६:राजा राजवाडे – साहित्यिक (मृत्यू:२१ जुलै १९९७)**१९२८:डॉ.मधुकर आष्टीकर – लेखक,महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाचे पूर्व अध्यक्ष (मृत्यू: २२ मे १९९८)**१९२३:उमा देवी खत्री उर्फ ’टुन टुन’ – अभिनेत्री व गायिका (मृत्यू:२४ नोव्हेंबर २००३)**१९१८:शांताबाई दाणी – ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या,डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या अनुयायी (मृत्यू:९ ऑगस्ट २००२)**१९०२:कमलाकांत वामन केळकर – भारतातील भूविज्ञान अध्ययनाचा पाया घालणारे वैज्ञानिक (मृत्यू:६ डिसेंबर १९७१)**१९००:श्रीकृष्ण नारायण रातंजनकर – आग्रा घराण्याचे गायक,शास्त्रीय संगीताचे गाढे अभ्यासक व संगीत गुरू (मृत्यू:१४ फेब्रुवारी १९७४)**१८९४:सत्येंद्रनाथ बोस – भारतीय भौतिकशास्त्रज्ञ (मृत्यू:४ फेब्रुवारी १९७४)**१८९२:महादेव देसाई – स्वातंत्र्य लढ्यातील नेते आणि महात्मा गांधींचे स्वीय सहाय्यक (मृत्यू:१५ ऑगस्ट १९४२)**१८७९:इ.एम.फोर्स्टर – ब्रिटिश साहित्यिक (मृत्यू:७ जून १९७०)**१८७८:हसरत मोहानी-- थोर स्वातंत्र्य सेनानी,उर्दू शायर(मृत्यू:१३ मे १९५१)* *_मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन:_* ••••••••••••••••••••••••••••••••••••••*२००९:रामाश्रेय झा – संगीतकार,वादक व शास्त्रीय संगीतातील विद्वान (जन्म:११ ऑगस्ट १९२८)**१९८९:दिनकर साक्रीकर – समाजवादी विचारवंत व पत्रकार**१९७५:शंकरराव वासुदेव किर्लोस्कर – उद्योजक,साहित्यिक व चित्रकार.(जन्म:८ आक्टोबर १८९१)**१९५५:डॉ.शांतिस्वरुप भटनागर – वैज्ञानिक (जन्म:२१ फेब्रुवारी १८९४)**१९४४:सर एडविन लुटेन्स – दिल्लीचे नगररचनाकार (जन्म:२९ मार्च १८६९)**१८९४:हेन्रिच हर्ट्झ – जर्मन भौतिकशास्त्रज्ञ (जन्म:२२ फेब्रुवारी १८५७)**१७४८:योहान बर्नोली – स्विस गणितज्ञ (जन्म:२७ जुलै १६६७)**_ २०२४ नवीन वर्ष आपणांस सुख समृद्धी, आशा आकांक्षा पार करणारे जावो करिता मनापासून नूतन वर्षाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा!_* ~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~ *_दिनविशेष या सदरातील सर्व मुद्दे हे संग्रहात्मक आहेत तेव्हा त्यात चूका नसतीलच असे सांगता येणार नाही_* *✍ संकलन ✍* *श्रीराम चव्हाण माजी शिक्षणाधिकारी,नागपूर*मोबाईल:9822695372 ईमेल: chavhansk65@gmail.com••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *✈ 🚀 गुगलयान ✈ 🚀*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••*नवीन वर्ष सुखाचे जावो*मित्रांनो, ग्रेगरियन कॅलेंडरनुसार काल सरत्या वर्षाला निरोप देऊन आज आपण नवीन वर्षाचे स्वागत करण्यासाठी सज्ज झालो आहोत. ख्रिसमस म्हणजे नाताळाचा सण संपला की, संपूर्ण जगाला नवीन वर्षाची चाहूल लागते. संपूर्ण जगात या नवीन वर्षाचे स्वागत वेगवेगळ्या पद्धतीने साजरी केली जाते. ........... पूर्ण लेख वाचण्यासाठी वरील निळ्या अक्षरावर क्लीक करावे.~~~~~~~~~~~~~~~~~~~ 🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••1⃣ *जगभरात नववर्षाचे जल्लोषात स्वागत*•••••••••••••••••••••••••••••••••••••2⃣ *मुख्यमंत्र्यांच्या हस्ते महास्वच्छता अभियानाचा शुभारंभ, राज्यभर राबवणार ‘स्वच्छ माझा महाराष्ट्र’ अभियान*•••••••••••••••••••••••••••••••••••••3⃣ *सुधीर मुनगंटीवार यांच्या प्रयत्नांना यश:गुरुकुंज आश्रमाला विशेष बाब म्हणून ‘अ’ वर्ग तीर्थक्षेत्राचा दर्जा*•••••••••••••••••••••••••••••••••••••4⃣ *'यशोदामाई राष्ट्रीय पुरस्कार':पुण्यातील 'स्व'-रूपवर्धिनीच्या पुष्पा नडे आणि आम्रपाली उत्कर्ष संघ नागपूर यांना जाहीर*•••••••••••••••••••••••••••••••••••••5⃣ *नांदेड महानगरपालिका क्षेत्रातील विकसित भारत संकल्प यात्रेचा पहिल्या टप्याचं समारोप*•••••••••••••••••••••••••••••••••••••6⃣ *तामिळनाडूमधील पूरग्रस्तांना भारतीय हवाई दलाने केली मदत*•••••••••••••••••••••••••••••••••••••7⃣ *उदगीर : क्रीडा विभागाच्या वाढीव तरतुदीने क्रीडा चळवळ प्रगल्भ होणार - क्रीडा व युवक मंत्री संजय बनसोडे*•••••••••••••••••••••••••••••••••••••*📷 वृत्त संकलक - कुणाल पवारे 📹*📱9960358300•••••••••••••••••••••••••••••••••••••ही पोस्ट नियमित मिळविण्यासाठी आणि या समुहात add होण्यासाठी 9423625769 येथे संपर्क करावे.••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• 🌷🍃 *विशेष माहिती* 🌷🍃••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🐜 *मुंग्या* 🐜 ***************एखादा साखरेचा कण पडलेला असो किंवा उघडा अन्नपदार्थ तसाच राहिलेला असो, घर कितीही स्वच्छ असो किंवा कितव्याही मजल्यावर आपण राहात असू दे, पदार्थ स्वयंपाकाच्या ओट्यावर असु देत वा जमिनीच्या कोपर्यात असुदे; पुरेसा वेळ गेला की, त्याला मुंग्या लागणारच ! मग त्या लाल असतील, वा काळ्या, या मुंग्या त्या पदार्थांपर्यंत वाट काढत कशा येतात, त्यांना हा पदार्थ शोधायची शक्ती कशी मिळते, याबद्दल आपण बरेचसे अंधारात आहोत. पण एक गोष्ट नक्की, ती म्हणजे अन्न मिळवण्याचे हे ज्ञान मुंग्यांना उपजतच असावे. मग ते इतक्या विविध पद्धतीचे असू शकते की, आपली विचारशक्ती कुंठीत व्हावी. विविध प्रकारची बुरशी जशी त्यांना चालते, तसेच एखादा मेलेला प्राणीही आवडतो. साखरेप्रमाणेच दुग्धजन्य पदार्थही आवडतात, तर काहीच नसल्यास कुजलेला पालापाचोळाही काम भागवू शकतो. साऱ्या जगभर विविध प्रकारच्या, आकाराच्या रंगछटांच्या, पंखांशिवायच्या व पंखांच्या मुंग्या आढळतात. मुंग्यांच्या जातीतील कीटकांच्या जवळपास १४००० जाती सापडतात. इंचभर लांबीपासून जेमतेम डोळ्यांना दिसेल एवढ्या छोट्या आकाराच्या मुंग्या सापडतात. सहसा मुंग्या हा प्राणी जमिनीखाली वारुळे करूनच राहतो. दिवसभर अन्न गोळा करण्याचे काम कामकरी मुंग्या करत राहतात, तर दिवसभर अंडी घालण्याचे काम राणी मुंगी करते. ही जमिनीखालील वारुळात असते. त्या वारुळातील सर्व म्हणजे किमान लाखभर मुंग्या या तिच्याचपासून झालेल्या असतात. कामकरी मुंग्यांना अंडी घालता येत नाहीत. अन्न गोळा करणे, राणी मुंगीला संरक्षण देणे ही त्यांची कामे भल्या पहाटेच सुरू होतात, ती थेट सूर्यास्तानंतरच थांबतात. मुंग्यांच्या संदर्भात अनेक शास्त्रज्ञांनी संशोधन केले आहे. मुंग्यांची संदेशवहनाची पद्धत, अन्नाच्या साठ्याची दिशा शोधणे व तिकडेच येण्यासाठी निरोप देण्याची व्यवस्था करणे या क्रियांबद्दल आजही फक्त अनुमानेच बांधावी लागतात. वारूळावर हल्ला होण्याची शक्यता निर्माण झाल्यास वा भक्ष्याच्या दिशेने वाटचाल करत असताना अडथळा आल्यास मुंग्या चावतात. या चाव्यामुळे त्या जागी लहानशी गांध वा फुगवटा येऊन आग होते. बराच वेळ नंतर खाजही सुटत राहते. काही मुंग्यांचा चावा हा जास्त विषारी असल्याने त्या भागात भाजल्याप्रमाणे फोड येऊ शकतात व भाग तात्पुरता बधिर होतो. एक प्रकारचे प्रथिनद्रव्य नांगीद्वारे चावा घेतल्या जागी सोडले जाते, त्यामुळे हा प्रकार होतो. सामाजिक राहणीच्या दृष्टीने मुंग्यांचे वारूळ हे कायम एक अभ्यासाचा विषय आहे. इतक्या प्रचंड संख्येने असलेल्या मुंग्या ठराविक पद्धतीने काम करून अन्नसाठा गोळा करण्याचा अविरत उद्योग ज्या पद्धतीने करतात, तिच्यातून मानवाला काही शिकता आले तर उत्तम. जंगलातील मुंग्यांचे वास्तव्य निसर्गाचा समतोल राखण्याकडे जास्त लक्ष देते. लाकूड खाणारी वाळवी, झुरळासारखे प्राणी, जखमी जनावरे, जखमी झालेले सरपटणारे प्राणी यांच्यावर लाल मुंग्या झपाट्याने तुटून पडतात. जखमांनी हैराण झालेला प्राणी बघता बघता या चाव्यांनी हैराण होऊन जातो. प्रसंगी चक्क मुंग्याच त्याला नष्ट करून टाकतात. मोठ्या प्राण्यांच्या कलेवरावर प्रथम गिधाडे तुटून पडतात, तरी नंतर मुंग्याच ते पूर्ण खाऊन टाकतात. काळ्या मुंग्या जास्त जलद हालचाली करतात. लाल काय किंवा काळ्या काय मुंग्यांना गोड आवडते, अशी आपली समजूत ही थोडीशीच बरोबर आहे. रक्तजन्य व प्राणिज पदार्थ त्यांना जास्त आवडतात. घरात मुंग्या येत असतील व विषारी औषध मारायची नसतील, तर चिमटीभर हळद पसरून टाकावी. त्या भागात मुंग्या हळदीच्या वासाने फिरकतच नाहीत.*'सृष्टी विज्ञानगाथा' या पुस्तकातुन**संकलन :- श्याम ठाणेदार, पुणे*••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• 🌹 *" फ्रेश सुविचार "* 🌹••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••अडचणी येतात आणि जातात. फक्त जाताना आपलं वय घेऊन जातात. ~ वपु काळे | पार्टनर*संकलन :- प्रमिलाताई सेनकुडे**ता. हदगाव जि. नांदेड*📱9403046894••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• ❓ *आजची प्रश्नमंजुषा* ❓••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••१) राहूल गांधी यांच्या नेतृत्वात मणिपूर ते महाराष्ट्र दरम्यान कोणती यात्रा होणार आहे ?२) अयोध्या येथील विमानतळ आता कोणत्या नावाने ओळखले जाणार आहे ?३) जगातील पहिला 'एआय' नियमन कायदा कोणता देश करणार आहे ?४) गुजरातचा पहिला केरोसीनमुक्त जिल्हा कोणता ?५) फुकुशिमा अणुऊर्जा प्रकल्प कोणत्या देशात आहे ? *उत्तरे :-* १) भारत न्याय यात्रा, ६२०० किमी. ( १४ जाने. २०२४ ते २० मार्च २०२४ ) २) महर्षी वाल्मिकी विमानतळ ३) युरोपीय महासंघ ४) गांधीनगर ५) जपान*संकलन :- जैपाल भै. ठाकूर*जि.प.व.प्राथ.शाळा भोसा, ता. आमगाव, जि. गोंदिया 📱9765943144••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎂 *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *◆|वा|ढ|दि|व|स|अ|भि|ष्ठ|चिं|त|न|◆* 👤 अनिकेत भारती, ASP, मालेगाव, नाशिक👤 सविता धर्माधिकारी, शिक्षिका👤 अशोक गायकवाड, साहित्यिक👤 अमरसिंग चौहान👤 सौ. छाया बच्चेवार, सेवानिवृत्त शिक्षिका👤 शेख बिस्मिल्ला सोनोशी, साहित्यिक👤 धोंडीबा गायकवाड, शिक्षक व कवी👤 मुकुंद जोशी, शिक्षक👤 मधुकर गिरमे👤 पांडुरंग कोकुलवार, शिक्षक व कवी👤 संजय पाटील शेळगावकर, धर्माबाद👤 सतीश शिंदे, पत्रकार, धर्माबाद👤 राजेंद्र जैस्वाल, कुपटी ता. माहूर👤 दत्तात्रय धूळशेट्टे, सेवानिवृत्त गटशिक्षणाधिकारी👤 सुनेत्रा बेल्लूरकर, सेवानिवृत्त शिक्षिका👤 चंद्रकांत दामेकर, शिक्षक नेते, नांदेड👤 मनमोहन कदम, मुख्याध्यापक, गुरुकुल विद्यालय धर्माबाद👤 सुरेश सावंत, बालसाहित्यिक, नांदेड👤 दिलीप धामणे, शिक्षक व कवी, हिंगोली👤 उमेश कोकुलवार, सामाजिक कार्यकर्ते, नांदेड*ઉदंड_आયુષ્યાच्या अનંત_શુभेच्छा*[ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा एक दिवस अगोदर 9423625769 येथे पोस्ट करावे. ]••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• ••• 💡 ‼ *मनाचे श्लोक*‼ 💡•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••खरें शोधितां शोधितां शोधिताहे। मना बोधिता बोधिता बोधिताहे॥ परी सर्वही सज्जनाचेनि योगे। बरा निश्चयो पाविजे सानुरागे॥१५१॥सरळ अर्थ:सत्याचा शोध हा शोधता शोधता लागतो तसेच त्याचा बोधदेखील त्याला समजून घेता घेताच लागतो. पण यासाठी संतसज्जनांचा संग आवश्यक आहे आणि शिवाय मनात त्या सत्याचा शोध आणि बोध घेण्याविषयीची आस्था आणि दृढ भावना असणे देखील आवश्यक आहे.।। जय जय रघुवीर समर्थ ।।••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🕊🌎 ‼ *विचारधारा*‼🕊🌎••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••प्रत्येकालाच एकटे यावे लागते आणि एकटेच जावे लागते हा निसर्गाचा नियम आहे. पण, या जगात जगत असताना आजुबाजूचाही आपण विचार करावा. कोणी आपुलकीने मदत करतात तर कोणाचे सांगता येत नाही. म्हणून कोणी आपुलकीच्या नात्याने मदत केली असेल त्यांना कधीही विसरू नये. व जे, कोणी तिरस्कार करतात त्यांचा राग धरू नये. कारण चांगले करणारेच अजरामर होऊन जातात व जे काहीच करत नाही त्यांचे जीवन व्यर्थ होऊन जाते भलेही सोबत कोणी काहीच घेऊन जात नसले तरी इतरांना केलेली मदत ही माणुसकीची साथ असते.🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷सौ.संगीता संतोष ठलाल मु. कुरखेडा जि. गडचिरोली••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎭 *आजची फ्रेश बोधकथा* 🎭••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *ब। क्षी। स* एका राजाची गोष्ट आहे. या राजाला आपल्या मंत्र्याच्या बुद्धीचीच नव्हे तर जनतेच्या ज्ञानीपणाची परीक्षा पहाण्याची लहर यायची. एके दिवशी दरबार भरल्यावर त्याने एक प्रश्न विचारला *" ईश्वर काय करू शकतो ? "*मंत्री व इतर दरबारी लोकांनी आपापल्या कुवतीप्रमाणे ईश्वराच्या शक्तीबद्दलची उत्तरे दिली, पण राजाचं समाधान झालं नाही, राजाचा प्रधान अतिशय नाराज झाला व तशाच अवस्थेत घरी आला.बापाची नाराजी मुलीच्या लक्षात येताच तीने त्या बद्दल विचारले. प्रधानाच्या खुलाशानंतर ती त्याला म्हणाली, 'मी उद्या दरबारात येते आणि या प्रश्नाचं उत्तर देते?." दुसऱ्या दिवशी ती दरबारात आली, "मी तुमच्या प्रश्नाच उत्तर द्यायला तयार आहे" असं तिनं राजाला सांगितलं.राजा आश्चर्यचकित झाला आणि तिला उत्तर सांगण्याची आज्ञा केली. "पण त्या साठी माझी एक अट आहे," ती म्हणाली.'कसली अट ?' राजाने विचारले . 'तुम्हाला तुमच्या प्रश्नाचं समाधानकारक उत्तर हवं असेल तर सिंहासना वरून खाली उतरावं लागेल आणि मी जिथे बसलेय तिथे येऊन बसावं लागेल."लागलीच राजा खाली उतरला तशी प्रधानाची मुलगी सिंहासनावर जाऊन बसली. सारा दरबार स्तब्ध झाला. राजा शांतपणे ती काय म्हणते याची प्रतिक्षा करत राहिला.राजाची नजर पाहून ती म्हणाली, "महाराज! मी तुमच्या प्रश्नाचे उत्तर केव्हाच दिले आहे !"'पण मला समजलं नाही, काय उत्तर आहे ते ?''ईश्वर काय करू शकतो, हाच तुमचा प्रश्न आहे ना ?''होय.''मग पहा, काही क्षणापूर्वी तुम्ही या सिंहासनावर विराजमान होतात आणि मी जमिनीवर होते. आता तुम्ही जमिनीवर आहात आणि मी सिंहासनावर आहे..! ईश्वर असंच करीत असतो.सिंहासनावर बसलेल्याला मुदत पूर्ण झाली की, जमिनीवर बसवतो, तसंच जमिनीवरच्याला क्षणांत सिंहासनावर बसवितो.' उत्तर ऐकून दरबार चकीत झाला. राजा अंत:करणापासून खुश झाला व म्हणाला, "मुली, मी खुश झालोय व तूला वीस हजार सुवर्ण मोहरा बक्षीस देतोय!"मुलगी निर्विकार चेहरा करून ती राजाला म्हणाली, 'बक्षीस देत्याइतकं सामर्थ्य तुमच्यात नाही, महाराज!''कां बर, मी राजा आहे ना इथला ?' 'या क्षणी मी सिंहासनावर बसली आहे, ज्याचं सिंहासन त्याचं राज्य ! आज राज्य माझेकडे आहे आणि तुमच्याकडे काहीचं नाही.व बक्षीस देण्याचे सामर्थ्य आज माझेकडे आहे !''तुमची नम्रता पाहून मीच प्रसन्न झाले आहेतुम्ही मला वीस हजार सुवर्ण मुद्रा देण्याची गोष्ट करताय, पण मी तुम्हाला हे राज्य बक्षिसा दाखल देत आहे आणि पुन्हा सिंहासनावर विराजमान होण्याची विनंती करीत आहे,,!'ती लगबग सिंहासनावरून उतरली व राजाला सन्मानाने सिंहासनावर बसविले..!•••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••या पोस्ट विषयी आपल्या सूचना, निवेदन, अभिप्राय, बातम्या, वाढदिवस, माहिती किंवा शंका 9423625769 येथे कळवावे. •••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••~~~~~~~~~~~~~~~~~~~*🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢*📱 9423625769~~~~~~~~~~~~~~~~~~~*🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏*पुन्हा भेटू या फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार ~~~~~~~~~~~~~~~~~~~
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment