✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट~~~~~~~~~~~~~~~~~~~ 9️⃣ 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 9️⃣ ( फ्रेश शालेय परिपाठ )🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00 ( रविवार आणि सुट्टी वगळून )~~~~~~~~~~~~~~~~~~~🎇 दिनांक :- 13 डिसेंबर 2023💠 वार - बुधवार~~~~~~~~~~~~~~~~~~~Link - http://nasayeotikar.blogspot.com/2017/06/blog-post_86.html••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🌷🌐 . *दिनविशेष* . 🌐🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••*_ या वर्षातील ३४७ वा दिवस आहे_* •••••••••••••••••••••••••••••••• *_महत्त्वाच्या घटना:_* •••••••••••••••••••••••••••••••• *२००१:जैश-ए-मोहम्मद व लष्कर-ए-तय्यबा च्या अतिरेक्यांनी संसदभवनावर हल्ला केला.**१९९१:मधुकर हिरालाल कनिया यांनी भारताचे २३ वे सरन्यायाधीश म्हणुन कार्यभार सांभाळला.**१९४१:दुसरे महायुद्ध – हंगेरी व रुमानियाने अमेरिकेविरुद्ध युद्ध पुकारले.**१९३०:’प्रभात’चा ’उदयकाल’ हा चित्रपट मुंबईच्या ’मॅजेस्टिक’ चित्रपटगृहात प्रदर्शित झाला. आधी या चित्रपटाचे नाव ’स्वराज्याचे तोरण’ असे होते. परंतु तो सेन्सॉरमधे अडकल्यामुळे त्यात बरीच काट छाट करावी लागली व त्याचे नावही बदलले.* *_जन्मदिवस / जयंती / वाढदिवस:_* ••••••••••••••••••••••••••••••••••••••*१९७३:मेघना गुलजार-- भारतीय लेखिका, दिग्दर्शक आणि निर्माती**१९६६:डॉ.अनिल तानाजी सपकाळ-- मराठी नाटककार,चित्रपटकथा लेखक व समीक्षक साहित्यिक**१९६५:माधुरी साकुळकर -- लेखिका, सामाजिक कार्यकर्त्या* *१९६०:दग्गुबाती वेंकटेश -- भारतीय चित्रपट अभिनेता**१९५८:हेमंत दत्तात्रेय सावंत-- लेखक* *१९५७:डॉ.विद्यासागर जनार्दन पाटंगणकर-- संतसाहित्याचे गाढे अभ्यासक,लेखक* *१९५६:प्रभाकर दुपारे -- आंबेडकरी चळवळीतील विचारवंत साहित्यिक, नाटककार,जेष्ठ पत्रकार**१९५५:मनोहर पर्रीकर – गोव्याचे माजी मुख्यमंत्री(मृत्यू:१७ मार्च, २०१९)**१९४९:सुप्रिया मधुकर अत्रे-- लेखिका**१९४७:विद्युत रवींद्र भागवत-- स्त्रीवादी लेखिका,साहित्यिका**१९४५:अस्मिता इनामदार -- कवयित्री**१९४२:रमाकांत यशवंत देशपांडे -- खगोल अभ्यासक,लेखक,कवी* *१९४०:शरद केशव साठे-- मराठी ग्रंथसूचिकार म्हणून प्रसिद्ध(मृत्यू:१ आक्टोबर २०१५)**१९३२:डॉ.निला जोशीराव-- लेखिका* *१९३०:मधुसूदन कृष्णाची आगाशे-- लेखक* *१९२८:धनश्री हळबे-- मराठी लेखिका आणि अनुवादक**१९२८:सरिता मंगेश पदकी-- कवयित्री, कथालेखिका,बालसाहित्यकार,नाटककार आणि अनुवादिका(मृत्यु:३ जानेवारी २०१५)**१९२६:प्रमिला मदन भागवत: कवयित्री लेखिका (मृत्यू:२९ नोव्हेंबर २०१३)**१९२४:डॉ.विद्याधर गंगाधर पुंडलिक -- प्रसिद्ध कथाकार,नाटककार,समीक्षक (मृत्यु:९ ऑक्टोबर १९८९)**१९२४:मंगला दि.साठे-- लेखिका* *१९२३:रामभाऊ जोशी -- जेष्ठ पत्रकार, लेखक* *१९२०:प्रा.श्रीनिवास हरि दीक्षित-- तत्त्वज्ञानाचे प्राध्यापक,मराठी लेखक(मृत्यू:३ ऑक्टोबर २०१३)* *१९०२:इलचंद्र जोशी-- प्रसिद्ध हिंदी कादंबरीकार(मृत्यू:१९८२)**१८९९:पांडुरंग सातू नाईक – आल्हाददायकता,कल्पकता व वास्तवता ही वैशिष्ट्ये असलेले चित्रपट छायालेखक (मृत्यू:२१ ऑगस्ट १९७६)**१८०४:मेजर थॉमस कॅन्डी – कोशकार व शिक्षणतज्ञ,मराठीत विरामचिन्हे वापरण्यास त्यांनी प्रथम सुरूवात केली,इंडियन पीनल कोडचे त्यांनी मराठीत भाषांतर केले. (मृत्यू:२६ फेब्रुवारी १८७७)**१७८०:योहान वुल्फगँग डोबेरायनर – जर्मन रसायनशास्त्रज्ञ (मृत्यू:२४ मार्च १८४९)* *_मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन:_* ••••••••••••••••••••••••••••••••••••••*२०१२:मोरेश्वर दिनकर पराडकर-- प्रकांड पंडित,अभ्यासक,संशोधक(जन्म:१७ नोव्हेंबर १९२५)**१९९६:श्रीधर पुरुषोत्तम तथा शिरुभाऊ लिमये – स्वातंत्र्यसैनिक,क्रांतिकारक,कॅपिटॉल बॉम्बस्फोटाचे सूत्रधार**१९९४:विश्वनाथ अण्णा तथा तात्यासाहेब कोरे – सहकार क्षेत्रातील अग्रणी व्यक्तिमत्व, वारणा परिसराच्या विकासाचे शिल्पकार, वारणा सहकारी साखर कारखान्याचे संस्थापक(जन्म:१७ आक्टोबर १९१७)**१९८६:स्मिता पाटील – अभिनेत्री.पद्मश्री (१९८५),दोन राष्ट्रीय पुरस्कार व एक फिल्मफेअर अॅवॉर्ड (जन्म:१७ आक्टोबर १९५५)**१९६१:अॅना मेरी रॉबर्टसन ऊर्फ ’ग्रँडमा मोझेस’ यांचे वयाच्या १०२ व्या वर्षी निधन. वयाच्या ७७ व्या वर्षी त्यांनी पेंटिंगच्या छंदाची सुरूवात केली आणि त्यात प्रसिद्धी मिळवली. अमेरिकन ग्रामीण जीवनावरील त्यांची पेंटिग्ज आजही प्रसिद्ध आहेत.(जन्म: १८६०)**१९३०:फ्रिट्झ प्रेग्ल – सेंद्रीय पदार्थांच्या पृथ्थक्करणासाठी १९२३ मधील रसायनशास्त्राचा नोबेल पुरस्कार मिळवणारे ऑस्ट्रियन शास्त्रज्ञ (जन्म:३ सप्टेंबर १८६९)**१७८४:सॅम्युअल जॉन्सन – ब्रिटिश साहित्यिक,टीकाकार,पत्रकार व विचारवंत (जन्म:१८ सप्टेंबर १७०९)*~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~ *_दिनविशेष या सदरातील सर्व मुद्दे हे संग्रहात्मक आहेत तेव्हा त्यात चूका नसतीलच असे सांगता येणार नाही_* *✍ संकलन ✍* *श्रीराम चव्हाण माजी शिक्षणाधिकारी,नागपूर*मोबाईल:9822695372 ईमेल: chavhansk65@gmail.com••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *✈ 🚀 गुगलयान ✈ 🚀*••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *कमवा आणि शिका हेच उपयोगी*स्वतःच्या विकासावर कुटुंबाचे विकास अवलंबून असते. कुटुंबाच्या विकासावर गावाचा विकास आणि मग राज्य व देशाचा विकास होतो. या विकासासाठी शिक्षण हे अत्यंत महत्त्वाची बाब आहे. शिक्षणाशिवाय कोणाचेही विकास अशक्य आहे. शिक्षणामुळे दोन डोळ्याचे माणसे तिसऱ्या डोळ्याने डोळस होऊ शकतात. अन्यथा डोळे असून ही आंधळ्याची अवस्था होते. महात्मा ज्योतिबा फुले यांनी शिक्षणाचे महत्त्व सांगताना म्हटले आहे की, विद्येविना मति गेली, मतिविना नीती गेली, नितिविना गती गेली, गतिविना वित्त गेले, एवढे अनर्थ सारे एका अविद्येने केले........लेख पूर्ण वाचण्यासाठी वरील निळ्या अक्षरावर टिचकी मारा.~~~~~~~~~~~~~~~~~~~ 🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••1⃣ *राजस्थानच्या मुख्यमंत्रीपदी पहिल्यांदाच आमदार झालेले भजनलाल शर्मा यांची नियुक्ती*•••••••••••••••••••••••••••••••••••••2⃣ *रोहित पवारांच्या युवा संघर्ष यात्रेवर लाठीचार्ज, विधानसभेवर धडकताना पोलिसांनी ताब्यात घेतलं, कार्यकर्तेही आक्रमक*•••••••••••••••••••••••••••••••••••••3⃣ *राज्य मागासवर्ग आयोगाच्या अध्यक्षांचा राजीनामा, राज्य सरकारने आनंद निरगुडे यांचा राजीनामा स्विकारला, सुनील शुक्रे बनले नवे अध्यक्ष*•••••••••••••••••••••••••••••••••••••4⃣ *इथेनॉल निर्मिती बंदीवरून अजित पवारांचं अमित शाहांना पत्र, साखर कारखान्यांची 35 हजार कोटींची गुंतवणूक धोक्यात येण्याची भीती व्यक्त*•••••••••••••••••••••••••••••••••••••5⃣ *केंद्रीय पथकाकडून राज्यातील दुष्काळ परिस्थितीचा आढावा:दुष्काळ घोषित तालुक्यांना केंद्रीय पथक भेट देऊन पाहणी करणार*•••••••••••••••••••••••••••••••••••••6⃣ *CBSE कडून इयत्ता १० वी आणि १२ वीच्या परीक्षांचं वेळापत्रक जाहीर, 15 फेब्रुवारी पासून सुरू होणार परीक्षा*•••••••••••••••••••••••••••••••••••••7⃣ *आयसीसी २०२४ विश्वचषकासाठी टीम इंडियाची घोषणा, उदय सहारणकडं संघाचं नेतृत्व*•••••••••••••••••••••••••••••••••••••*📷 वृत्त संकलक - कुणाल पवारे 📹*📱9960358300•••••••••••••••••••••••••••••••••••••ही पोस्ट नियमित मिळविण्यासाठी आणि या समुहात add होण्यासाठी 9423625769 येथे संपर्क करावे.••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• 🌷🍃 *विशेष माहिती* 🌷🍃••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••📙 *'इ' जीवनसत्त्वाच्या गोळ्या दररोज घ्याव्या का ?* 📙अशक्तपणात वाटतो या कारणासाठी अनेक लोक टॉनिकच्या बाटल्या फस्त करत असतात. बी कॉम्प्लेक्सची इंजेक्शने, तर खेडय़ापाडय़ातील प्रशिक्षण न झालेल्या गावठी डॉक्टरांकडेही असतात. टॉनिक, व्हिटॅमिन्स घेण्याचे हे वेड शहरी भागातील सुशिक्षित लोकांमध्येही आढळते. मागणी तसा पुरवठा हे जरी खरे असले तरी बर्याचदा फायदा उकळणारी मंडळी इतरांची दिशाभूल करून निरुपयोगी असे पदार्थ बाजारात आणतात व त्याची गरजही निर्माण करतात. लोकांचे अज्ञान डॉक्टरांची धंदेवाईक वृत्ती व औषधी कंपन्यांनी अधिक नफा मिळवण्याची वृत्ती या सर्वांमुळे टॉनिकचा खप वाढतोच आहे.या व्हिटॅमिन्स / टॉनिकच्या स्पर्धेत गेल्या काही वर्षांत 'इ' जीवनसत्त्वाचा प्रवेश झाला आहे. अनेक जाहिरातीत जीवनसत्त्व 'इ' दररोज वापरल्याने सुदृढपणा येतो शक्ती येते. असे लिहिलेले असते. हे खरे आहे काय ते आता पाहू.जीवनसत्त्व 'इ' म्हणजेच टोकोफेराॅल, वनस्पतीज तेले, सरकी, सूर्यफुलाच्या बिया, अंड्याचे बलक तसेच लोणी या पदार्थांमध्ये जीवनसत्त्व 'इ' विपुल प्रमाणात आढळते. प्रौढ व्यक्तीला दर दिवशी दहा मिलिग्रॅम इतके जीवनसत्त्व 'इ' लागते. प्रत्येकाला जीवनसत्त्व 'इ' ची नितांत गरज असते हे जरी खरे असले तरी या जीवनसत्त्वाची कमतरता कोणाच्याही शरीरात निर्माण झाल्याचा पुरावा आजतागायत आढळलेला नाही. त्यामुळे जीवनसत्त्वाच्या गोळ्या दररोज घेण्याची काही गरज नाही असे म्हणता येते. शिवाय जीवनसत्त्व 'इ' चे प्रमाण खूप जास्त झाल्यास मानवी लिम्फोसाइट या पांढर्या रक्तपेशींवर विपरीत परिणाम होतो असे प्रयोगशाळेतील चाचण्यांमध्ये सिद्ध झालेले अाहे. या सर्व बाबींचा विचार करता इ जीवनसत्व दररोज घेऊ नये, हे तुम्हाला पटलेच असेल.*डॉ. जगन्नाथ दीक्षित व डाॅ. अंजली दीक्षित*यांच्या 'मेडिकल जनरल नॉलेज' या पुस्तकातूनमनोविकास प्रकाशन०२० ६५२६२९५०*संकलन :- श्याम बसप्पा ठाणेदार, पुणे*••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• 🌹 *" फ्रेश सुविचार "* 🌹••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••*" जो स्वत: दु:खातून गेला नाही त्याला दुसऱ्याचे दु:ख कसे कळणार ?"**संकलन :- प्रमिलाताई सेनकुडे**ता. हदगाव जि. नांदेड*📱9403046894••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• ❓ *आजची प्रश्नमंजुषा* ❓••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••१) छत्तीसगड राज्याचे नवनियुक्त मुख्यमंत्री म्हणून कोणाची निवड झाली आहे ?२) 'अग्नी मॅन ऑफ इंडिया' असे कोणाला म्हटले जाते ?३) नुकतेच कोणत्या राज्याने 'सर्वोत्तम श्वास्वत वन्यजीव पर्यटन राज्य' पुरस्कार जिंकला आहे ?४) बहुजन समाज पक्षाच्या ( BSP ) अध्यक्षा मायावती यांनी आपला उत्तराधिकारी म्हणून कोणाला घोषित केले ?५) नवीन सूर्यमालेचा शोध कोणी लावला ? *उत्तरे :-* १) विष्णू देव साय, आदिवासी नेता २) अविनाश चंदर ३) मध्यप्रदेश ४) आकाश आनंद, मायावतीचा भाचा ५) NASA *संकलन :- जैपाल भै. ठाकूर*जि.प.व.प्राथ.शाळा भोसा, ता. आमगाव, जि. गोंदिया 📱9765943144••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎂 *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *◆|वा|ढ|दि|व|स|अ|भि|ष्ठ|चिं|त|न|◆* 👤 अनिल गायकवाड, सहशिक्षक, बिलोली👤 रोहन कुरमुडे, धर्माबाद👤 उज्वल मस्के, साहित्यिक, बीड👤 राजेश वाघ, बुलढाणा👤 विनोद राऊलवार👤 श्रीनिवास भोसले, नांदेड👤 राजेश जी गडाख, नाशिक*ઉदंड_आયુષ્યાच्या अનંત_શુभेच्छा*[ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा एक दिवस अगोदर 9423625769 येथे पोस्ट करावे. ]••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• ••• 💡 ‼ *मनाचे श्लोक*‼ 💡•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••हरीभक्त वीरक्त विज्ञानराशी। जेणे मानसी स्थापिलें निश्चयासी॥ तया दर्शने स्पर्शने पुण्य जोडे। तया भाषणें नष्ट संदेह मोडे॥१३३॥।। जय जय रघुवीर समर्थ ।।••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🕊🌎 ‼ *विचारधारा*‼🕊🌎••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••एखाद्या व्यक्तीचे भले व्हावे या उद्देशाने त्या व्यक्तीला आपण कितीही सांगून सुद्धा ती व्यक्ती जर ऐकत नसेल तर ते त्याचे दुर्दैव आहे. कारण, या समाजात चांगल्यासाठी सांगणारे फार कमी संज्जन लोक असतात व वाईट मार्गाने नेणारे असंख्य लोक असतात. शेवटी चांगले ऐकणाऱ्याचे भले होत असते आणि वाईट सांगणाऱ्यांमुळे वाईटच परिणाम झालेले बघायला मिळत असते. सोबत इतरांना त्यामुळे अपमानित व्हावे लागते म्हणतात ना की, शेवटी कुठेतरी कर्माचा हिशोब होत असतो. म्हणून चांगले काय व वाईट काय असते या विषयी विचार करणे गरजेचे आहे. 🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷सौ.संगीता संतोष ठलाल मु. कुरखेडा जि. गडचिरोली••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎭 *आजची फ्रेश बोधकथा* 🎭••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *प्रयत्नांती यश*एकदा दोन राज्यांच्यात युद्ध झाले. त्यात एक राजा पराभव झाला. पराभूत राजा शौर्याने लढला होता. पण त्याचे सैन्य थोडे होते. विजय राजाचे सैनिक पराभूत राजाला शोधत होते. त्यांना त्या राजाला ठार मारायचे होते. म्हणून राजा जीव वाचवण्यासाठी जंगलात पळाला आणि एका गुहेत जाऊन लपला. तो खूप दुःखी झाला होता. त्याचा धीर खचला होता. एके दिवशी राजा गुहेत स्वस्थपणे पहुडला होता. भिंतीवरील एका लहानशा कोळ्याने त्याचे लक्ष वेधले. कोळी गुहेच्या भिंतीवर फार मेहनतीने जाळे विणत होता. तो सरपटत भिंतीवर चढायचा. मधेच एखादा धागा तुटायचा आणि कोळी जमिनीवर पडायचा. असे बरेचदा घडले. पण कोळ्याने आपला प्रयत्न सोडला नाही. तू चिकाटीने झाडे विनतच राहिला. अखेर जाळी विनत विनत तो छतापर्यंत पोहोचला.राजाने विचार केला, " हा सरपटणारा छोटासा प्राणी सुद्धा आपले प्रयत्न सोडत नाही. मी तर राजा आहे. मग मी माझे प्रयत्न का बर सोडले? मला पुन्हा प्रयत्न केलाच पाहिजे." त्याने शत्रु बरोबर पुन्हा युद्ध करण्याचा निश्चय केला. राजा जंगलातून बाहेर पडला आणि आपल्या विश्वासू सहकाऱ्यांना भेटला. त्याने आपल्या राज्यातील शूर माणसे एकत्र केली आणि बलवान सैन्य उभारले. सर्व शक्तीनिशी त्यांनी आपल्या शत्रू बरोबर युद्ध केले. अखेरीस त्याने लढाई जिंकली. त्याला त्याचे राज्य परत मिळाले. एका कोळ्याने आपल्याला धडा शिकवला, हे त्याच्या कायम लक्षात राहिले.*तात्पर्यः जो अपयशाने खचून न जाता सतत प्रयत्न करतो ,त्यालाच यश मिळते.*•••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••या पोस्ट विषयी आपल्या सूचना, निवेदन, अभिप्राय, बातम्या, वाढदिवस, माहिती किंवा शंका 9423625769 येथे कळवावे. •••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••~~~~~~~~~~~~~~~~~~~*🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢*📱 9423625769~~~~~~~~~~~~~~~~~~~*🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏*पुन्हा भेटू या फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार ~~~~~~~~~~~~~~~~~~~
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment