✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट~~~~~~~~~~~~~~~~~~~ 9️⃣ 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 9️⃣ ( फ्रेश शालेय परिपाठ )🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00 ( रविवार आणि सुट्टी वगळून )~~~~~~~~~~~~~~~~~~~🎇 दिनांक :- 21 डिसेंबर 2023💠 वार - गुरुवार~~~~~~~~~~~~~~~~~~~Link - https://nasayeotikar.blogspot.com/2018/12/blog-post_10.html••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🌷🌐 . *दिनविशेष* . 🌐🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••*_उत्तर गोलार्धातील सर्वात लहान दिवस_*•••••••••••••••••••••••••••••••••*_ या वर्षातील ३५५ वा दिवस आहे_* •••••••••••••••••••••••••••••••• *_महत्त्वाच्या घटना:_* •••••••••••••••••••••••••••••••• *१९८६:रघुनंदन स्वरुप पाठक यांनी भारताचे १८ वे सरन्यायाधीश म्हणुन कार्यभार सांभाळला.**१९६५:दादा कोंडके निर्मित व दिग्दर्शित आणि वसंत सबनीस लिखित ’विच्छा माझी पुरी करा’ या नाटकाचा पहिला प्रयोग धोबीतलाव येथील रंगभवन येथे झाला.**१९१३:ऑर्थर वेन यांनी लिहिलेले जगातील पहिले शब्दकोडे (Crossword Puzzle) न्यूयॉर्क वर्ल्ड या दैनिकात प्रकाशित झाले.* *_जन्मदिवस / जयंती / वाढदिवस:_* ••••••••••••••••••••••••••••••••••••••*१९८३:डॉ.वैजंतीमाला जाधव-भोसले-- लेखिका,संपादिका* *१९८०:रमेश सुरेश पडवळ-- ज्येष्ठ पत्रकार,लेखक**१९७६:डॉ.हेमलता विजय काटे-- कवयित्री, लेखिका**१९७३:विवेक रंजन अग्निहोत्री-- भारतीय चित्रपट दिग्दर्शक आणि पटकथा लेखक**१९६८:माणिक क.नागावे-- कवयित्री, लेखिका**१९६८:वीरधवल परब-- प्रसिद्ध कवी**१९६३:सुरेंद्र रावसाहेब पाटील-- प्रसिद्ध कादंबरीकार,कथाकार* *१९६३:गोविंदा – हिन्दी चित्रपट सुप्रसिद्ध कलाकार**१९५९:कृष्णम्माचारी श्रीकांत – धडाडीचे आघाडीचे फलंदाज,क्रिकेट कप्तान व निवड समितीचे माजी अध्यक्ष**१९५९:फ्लॉरेन्स ग्रिफिथ जॉयनर – अमेरिकेची धावपटू(मृत्य़ू:२१ सप्टेंबर १९९८)**१९५४:ख्रिस एव्हर्ट लॉइड – अमेरिकन लॉन टेनिस खेळाडू**१९५१:सुभाषचंद्र जाधव-- ज्येष्ठ पत्रकार, लेखक**१९४२:शुभांगी भरभडे-- प्रसिद्ध राष्ट्रीय चरित्र कादंबरीकार,कथाकार,नाटककार संस्थापक अध्यक्ष पद्मगंधा साहित्य प्रतिष्ठान**१९३५:दत्ता टोळ-- मराठी लेखक,त्यांचे काही लिखाण 'अमरेंद्र दत्त' या नावाने केलेले आहे.**१९२१:पी.एन.भगवती – भारताचे १७ वे सरन्यायाधीश(मृत्यू:१५ जून २०१७)**१९१८:कुर्त वाल्ढहाईम – संयुक्त राष्ट्रांचे चौथे सरचिटणीस (मृत्य़ू:१४ जून २००७)**१९१४: गोविंद मल्हार कुलकर्णी-- जेष्ठ समीक्षक(मृत्यु:१ एप्रिल २००१)**१९०३:भालचंद्र दिगंबर तथा आबासाहेब गरवारे – प्लॅस्टिक व नायलॉन उद्योगाचे जनक, महाराष्ट्राच्या औद्योगिक विकासातील एक प्रमुख शिल्पकार,पद्मभूषण,डि.लिट.(पुणे विद्यापीठ),उद्योजक (मृत्य़ू:२ नोव्हेंबर १९९०)**१८४९:हरि माधव पंडित-- चरित्रलेखक (मृत्यू:१५ मार्च १८९९)**१८०४:बेंजामिन डिझरेली – इंग्लंडचे पंतप्रधान (मृत्य़ू:१९ एप्रिल १८८१)* *_मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन:_* ••••••••••••••••••••••••••••••••••••••*२०१९:उषादेवी विजय कोल्हटकर-- लेखिका (जन्म:२४ मार्च १९४६)**१९९७:निवृत्तीनाथ रावजी पाटील ऊर्फ’पी. सावळाराम’ – भावगीतलेखक कुसुमाग्रज यांनी त्यांना ’जनकवी’ ही उपाधी दिली.१९८५ मधे जयसिंगपूर येथे झालेल्या दक्षिण महाराष्ट्र साहित्य संमेलनाचे ते अध्यक्ष होते.(जन्म:४ जुलै १९१४)**१९९७:पं.प्रभाशंकर गायकवाड – सनईवादक**१९९३:मल्हार रंगनाथ तथा राजाभाऊ कुलकर्णी – स्वातंत्र्यसैनिक आणि पत्रकार* *१९७९:नरहर रघुनाथ तथा न. र. फाटक – चरित्रकार,टीकाकार,इतिहास संशोधक,संत साहित्याचे अभ्यासक व लेखक (जन्म:१५ एप्रिल १८९३)**१९६३:जॅक हॉब्ज – इंग्लिश क्रिकेट खेळाडू (जन्म:१६ डिसेंबर १८८२)**१८२४:जेम्स पार्किन्सन – कंपवाताचा मानवी मेंदूशी संबंध आहे, हे सिद्ध करणारा शास्त्रज्ञ (जन्म:११ एप्रिल १७५५)*~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~ *_दिनविशेष या सदरातील सर्व मुद्दे हे संग्रहात्मक आहेत तेव्हा त्यात चूका नसतीलच असे सांगता येणार नाही_* *✍ संकलन ✍* *श्रीराम चव्हाण माजी शिक्षणाधिकारी,नागपूर*मोबाईल:9822695372 ईमेल: chavhansk65@gmail.com••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *✈ 🚀 गुगलयान ✈ 🚀*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••*प्रदूषण : एक समस्या*मनुष्याचे सरासरी आयुष्य जे की पूर्वी शतकाची होती. ती आता हळूहळू कमी होत आहे. आत्ता माणसाचे आयुष्य सरासरी सत्तरच्या आसपास झाले आहे. विविध कारणामुळे मनुष्य आजारी पडत आहे आणि मृत्युमुखी देखील पडत आहे. डॉक्टराना देखील निदान होणार नाहीत असे रोग जडत आहेत. एशोआरामच्या जिंदगीमुळे देखील माणसाचे आयुष्य घटत चालले आहे. यातच प्रदूषण ही एक महत्वपूर्ण समस्या जाणवत आहे. नुकतेच एक बातमी वाचण्यात आली की सध्या आठ मृत्यूपैकी एक मृत्यू या प्रदूषणामुळे होत आहे. ..... पूर्ण लेख वाचण्यासाठी निळ्या अक्षरावर क्लीक करावे. ~~~~~~~~~~~~~~~~~~~ 🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••1⃣ *महाराष्ट्रात कोरोनाच्या 11 नव्या रूग्णांची नोंद; सर्वाधिक रूग्ण मुंबईत*•••••••••••••••••••••••••••••••••••••2⃣ *साहित्य अकादमीकडून यंदाचे पुरस्कार जाहीर, मराठी कादंबरीसाठी कृष्णात खोत यांच्या रिंगाण या पुस्तकाला पुरस्कार जाहीर*•••••••••••••••••••••••••••••••••••••3⃣ *सरकारने जारी केलेल्या आकडेवारीनुसार, नोव्हेंबर 2021 ते नोव्हेंबर 2023 दरम्यान, भारतात पेट्रोलच्या किंमतीत 11.82 टक्के आणि डिझेलच्या किंमतीत 8.94 टक्के घट*•••••••••••••••••••••••••••••••••••••4⃣ *दूध उत्पादक शेतकऱ्यांना मिळणार प्रति लिटर 5 रुपयांचं अनुदान, विखे पाटलांची मोठी घोषणा*•••••••••••••••••••••••••••••••••••••5⃣ *विदर्भाचा जलद गतीने विकास करणार असल्याची माहिती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विधानसभेत दिली.*•••••••••••••••••••••••••••••••••••••6⃣ *हिवाळी अधिवेशनाचं सूप वाजलं, अर्थसंकल्पीय अधिवेशन ‘26 फेब्रुवारी’ रोजी होणार सुरू!*•••••••••••••••••••••••••••••••••••••7⃣ *वर्ल्डकप गाजवणाऱ्या मोहम्मद शमीचा मोठा सन्मान! अर्जुन पुरस्कार जाहीर*•••••••••••••••••••••••••••••••••••••*📷 वृत्त संकलक - कुणाल पवारे 📹*📱9960358300•••••••••••••••••••••••••••••••••••••ही पोस्ट नियमित मिळविण्यासाठी आणि या समुहात add होण्यासाठी 9423625769 येथे संपर्क करावे.••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• 🌷🍃 *विशेष माहिती* 🌷🍃••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••*📙 सस्तन प्राणी 📙*आईच्या पोटातुन जन्म घेणारे आईच्या दुधावर लहानपणी पोषण होणारे सर्व प्राणी म्हणजे सस्तन प्राणी होत. यांनाच 'मॅमल' असेही इंग्रजीत म्हणतात. मानव, मांजरे, कुत्री, शेळ्या, मेंढ्या, घोडे, माकडे, जिराफ, हत्ती, डॉल्फिन व देवमासे हे सगळे सस्तन प्राणिगटात मोडतात. पृथ्वीवर एकूण चार हजार प्रकारचे सस्तन प्राणी सापडतात.इतर सर्व प्राणी अंडी घालतात. पण सस्तन प्राण्यांमध्ये मादीच्या पोटातच अंड्याची वाढ गर्भाशयात होते. पूर्ण वाढीचा काळ संपल्यावरच मग नवजात प्राणी आईच्या शरीरातुन वेगळा होतो. पण या पद्धतीतही तीन प्रकारचे बदल निसर्गात आढळले आहेत.गर्भाशयातील पोषण हे बाळाला जोडलेल्या नाळेद्वारे होते. हा एक प्रकार. त्याला इंग्रजीत (Placental) असे म्हणतात. हा बहुतेक सर्व जातींत दिसतो. दुसरा म्हणजे कांगारूचा. या प्रकारात (Marsupial) अगदी छोटा जीव आईच्या पोटाला असलेल्या एका पोतडीत जन्माला येतो. तेथेच राहतो, वाढतो. आईच्या दुधावर त्याचे पोषण होते. मोठा झाल्यावर मग आईपासुन तो सुटा होतो. तिसरा (Monoreme) प्रकार म्हणजे सशाचा आकार, पण बदकाचे पाय असा लांबुडका, शेपटी असलेला 'डक बिल्ड प्लॅटिपस' या जातीचा प्राणी. तो फक्त ऑस्ट्रेलियातच सापडतो. खरे म्हणजे हा प्राणी अंडी घालतो. पण त्याची पिल्ले मात्र आईच्या दुधावरच वाढतात. म्हणुन त्याला सस्तन गटात घेतले आहे. सर्वात मोठा सस्तन प्राणी म्हणजे देवमासा किंवा निळा व्हेल. सर्वात उंच जिराफ, सर्वात दांडगा हत्ती. स्वत:ला सर्वात हुशार समजणारा माणूस.'सृष्टीविज्ञान गाथा' या पुस्तकातुन*संकलन :- श्याम बसप्पा ठाणेदार, पुणे*••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• 🌹 *" फ्रेश सुविचार "* 🌹••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••*" खरा आनंद हा दुसऱ्यांना देण्यात असतो; घेण्यात किंवा मागण्यात नसतो. "**संकलन :- प्रमिलाताई सेनकुडे**ता. हदगाव जि. नांदेड*📱9403046894••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• ❓ *आजची प्रश्नमंजुषा* ❓••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••१) सूर्य जास्तीत जास्त दक्षिणेकडे राहतो या बिंदूला काय म्हणतात ?२) 'डोंगरी किल्ल्यांचा जिल्हा' असे कोणत्या जिल्ह्याला ओळखले जाते ?३) सूर्याची व ग्रहगोलांची उंची मोजणारे उपकरण कोणते ?४) जालियनवाला बाग हत्याकांडाच्या निषेधार्थ 'कैसर - ए - हिंद' पदवी कोणी परत केली ?५) मुंगी चावल्यानंतर कोणता Acid सोडते ? *उत्तरे :-* १) विंटर सोल्सटाईल ( हिवाळा आयन दिवस ) २) रायगड ३) Sextent ४) महात्मा गांधी ५) Formic Acid *संकलन :- जैपाल भै. ठाकूर*जि.प.व.प्राथ.शाळा भोसा, ता. आमगाव, जि. गोंदिया 📱9765943144••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎂 *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *◆|वा|ढ|दि|व|स|अ|भि|ष्ठ|चिं|त|न|◆* 👤 लक्ष्मी जैपाल ठाकूर, गोंदिया👤 मन्मथ खंकरे👤 श्रीमती माणिक नागावे, साहित्यिक, कोल्हापूर👤 गजानन गायकवाड👤 संभाजी तोटेवाड👤 जयश्री फुले👤 माधव मुंडकर👤 *ઉदंड_आયુષ્યાच्या अનંત_શુभेच्छा*[ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा एक दिवस अगोदर 9423625769 येथे पोस्ट करावे. ]••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• ••• 💡 ‼ *मनाचे श्लोक*‼ 💡•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••म्हणे दास सायास त्याचे करावे। जनीं जाणता पाय त्याचे धरावे॥ गुरू अंजनेवीण तें आकळेना। जुने ठेवणे मीपणे ते कळेना॥१४१॥।। जय जय रघुवीर समर्थ ।।••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🕊🌎 ‼ *विचारधारा*‼🕊🌎••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••धनसंपत्ती असो किंवा इतर काही कोणी कशाप्रकारे कमावले व किती कमावले त्यांच्यापाशी कितीही असेल तरी ते आपले कधीच होत नाही. म्हणून त्याकडे लक्ष देऊ नये. आपल्यापाशी जे, काही आहे त्यातच समाधान मानावे कारण कष्टाने व संघर्ष करून कमावलेले जे काही असते ते, कधीच संपत नाही. मग ते आपल्या विचारसरणीतून कमावलेले असोत किंवा माणुसकी धर्म निभावून कमावलेले असोत ते कायम पर्यंत अजरामर राहतात.🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷सौ.संगीता संतोष ठलाल मु. कुरखेडा जि. गडचिरोली••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎭 *आजची फ्रेश बोधकथा* 🎭••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *राजा आणि संत*एका वनात दोन संत राहत होते. एकांतात आपल्या तपश्चर्येत लीन राहत होते. कधीतरी यात्रेकरूंचा जत्था जायचा तेव्हा ते संत त्यांच्याशी बोलत असत. त्याच यात्रेकरूकडून त्यांना तेथील राजास त्या संतांबाबत माहिती मिळाली. तो या दोघांना भेटण्यास निघाला. जेव्हा संतांना ही गोष्ट कळाली.तेव्हा त्या दोघांना वाटले की आता राजा येणार व त्याने आपला चांगूलपणा पाहिला तर तो आपणास सतत भेटण्यास येईल, त्याच्याबरोबर अनेक माणसे येतील, त्यां माणसांच्या संगतीने अजून काही माणसे येतील व अशाने या वनातील शांती भंग पावेल व एकांत मिळणार नाही व एकांत नसल्याने आपणास ध्यानसाधना करता येणार नाही. राजा आम्हाला दोघांना सामान्य माणूस समजेल असे काहीतरी केले पाहिजे. राजाचा लवाजमा तेथे पोहोचला तेव्हा राजाने पाहिले की ते दोघेही संत हातात लाठ्याकाठ्या घेऊन एकमेकांशी भांडत होते. पहिल्या संताने दुस-याला म्हटले,'' तू स्वत:ला कोण समजतोस, मी इतके ज्ञान मिळविले आहे की ते तू सात जन्मातही मिळवू शकणार नाही.'' दुसरा संत त्यावर म्हणाला,'' अरे तू तर पक्का खोटारडा आहेस, तुझ्या ज्ञानाच्या गप्पा मारून तू लहान मुलाला फसवू शकशील पण मला नाहीस. तुझ्यापेक्षा जास्त ज्ञान मी माझ्या शिष्यांना दिले आहे.'' राजाने व त्याच्याबरोबरच्या लोकांनी हे भांडण पाहिले व विचार करू लागले हे साधू संत तर सामान्य माणसाप्रमाणेच भांडत आहेत व त्यांनी सर्वांनी असल्या साधूसंतांचा संग नको म्हणून वनातून जाणेच पसंत केले. राजा व लोक जाताच दोन्ही संतांनी एकमेकांकडे पाहून मंदस्मित केले व गळाभेट घेतली. दोन्हीही साधू आपल्या साधनेत रममाण झाले.*तात्पर्य : चांगली गोष्ट घडवून आणण्यासाठी कधीकधी असा देखावा करावा लागतो.*•••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••या पोस्ट विषयी आपल्या सूचना, निवेदन, अभिप्राय, बातम्या, वाढदिवस, माहिती किंवा शंका 9423625769 येथे कळवावे. •••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••~~~~~~~~~~~~~~~~~~~*🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢*📱 9423625769~~~~~~~~~~~~~~~~~~~*🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏*पुन्हा भेटू या फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार ~~~~~~~~~~~~~~~~~~~
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment