✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट~~~~~~~~~~~~~~~~~~~ 9️⃣ 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 9️⃣ ( फ्रेश शालेय परिपाठ )🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00 ( रविवार आणि सुट्टी वगळून )~~~~~~~~~~~~~~~~~~~🎇 दिनांक :- 07 सप्टेंबर 2023💠 वार - गुरुवार🌷🌐 . *दिनविशेष . 🌐* 🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *_ या वर्षातील २५० वा दिवस आहे_* •••••••••••••••••••••••••••••••• *_महत्त्वाच्या घटना:_* •••••••••••••••••••••••••••••• *२००५:इजिप्तमधे पहिल्यांदाच बहुपक्षीय सार्वत्रिक निवडणुका घेण्यात आल्या.**१९७९:दिवाळखोरी टाळण्यासाठी ’ख्रायसलर कॉर्पोरेशन’ने अमेरिकन सरकारकडे १ बिलियन डॉलर्सची मागणी केली.**१९७८:मधुमेह नियंत्रित करण्यासाठी उपयोगी पडणारे इन्सुलिन प्रथमच जनुक अभियांत्रिकी पद्धतीने तयार करण्यात यश.**१९३१:दुसर्या गोलमेज परिषदेची सुरूवात झाली.**१९०६:’बँक ऑफ इंडिया’ची स्थापना झाली. ही भारतात स्थापन झालेली पहिली स्वदेशी व्यापारी बँक आहे.**१८२२:ब्राझिलला (पोर्तुगालपासुन) स्वातंत्र्य मिळाले.**१८१४:दुसर्या बाजीरावाने पांडुरंग कोल्हटकराच्या साहाय्याने ’उंदेरी-खांदेरी’ किल्ल्यांचा ताबा परत मिळवला.**१६७९:सिद्दी जौहर आणि इंग्रजांचा मारा रोखत मराठ्यांनी खांदेरी किल्ल्याभोवती एक मीटर उंचीचा तट उभारून पूर्ण केला.* *_जन्मदिवस / जयंती / वाढदिवस:_* •••••••••••••••••••••••••••••••••••••• *१९७३:डॉ.अभय सुभाष जोशी-- लेखक, कथाकार,समीक्षक* *१९५८:जयकृष्ण बावनकुळे-- लेखक, संपादक* *१९५५:विमलसूर्य चिमणकर-- साहित्यिक, वकील,अभ्यासक व आंबेडकरी चळवळीतील कार्यकर्ते(मृत्यू:३० सप्टेंबर २०२०)**१९५२:नामदेव गणपत कानेकर-- कवी* *१९४८:नंदकुमार रोपळेकर-- लेखक,जेष्ठ समीक्षक* *१९४३:अॅड.भास्करराव आव्हाड-- ज्येष्ठ विधीज्ञ,कायदेतज्ज्ञ,बार कौन्सिल ऑफ महाराष्ट्र आणि गोवाचे माजी अध्यक्ष, साहित्यिक (मृत्यू:२४ जुलै २०२०)**१९४०:चंद्रकांत खोत – लेखक,कवी आणि संपादक**१९३५:प्रा.लक्ष्मीकांत प्रामाणिक -- कवी, लेखक चिंतनशील व्याख्याता* *१९३५:डॉ.भालचंद्र रामचंद्रराव अंधारे-- लेखक,संस्थापक संचालक इतिहास संशोधन केंद्र,नागपूर.संशोधन महर्षि, जीवन साधना,विदर्भ गौरव पुरस्काराने सन्मानित(मृत्यू:२ जानेवारी २०२१)**१९३४:सुनील गंगोपाध्याय – बंगाली कवी व कादंबरीकार (मृत्यू: २३ आक्टोबर २०१२)**१९३४:बी.आर.इशारा – चित्रपट दिग्दर्शक आणि पटकथालेखक (मृत्यू:२५ जुलै २०१२)**१९३३:इला भट्ट – मॅगसेसे पारितोषिक विजेत्या समाजसेविका,वकील व ’सेवा’ [Self Employed Women's Association] या संस्थेच्या संस्थापिका**१९३२:प्रभाकर पेंढारकर-- मराठी लेखक व चित्रपट दिग्दर्शक(मृत्यू:७ ऑक्टोबर २०१०)**१९२५:भानुमती रामकृष्ण – तामिळ व तेलगू चित्रपटांतील अभिनेत्री,दिग्दर्शक,निर्माती, गीतकार,संगीतकार,गायिका व लेखिका (मृत्यू:२४ डिसेंबर २००५)**१९१६:माधव पंढरीनाथ शिखरे-- संपादक, पत्रकार,टीकाकार (मृत्यू:३१ जुलै १९८१)**१९१५:डॉ.महेश्वर नियोग – प्रख्यात आसामी साहित्यिक आणि इतिहासकार, पद्मश्री (१९७४),(मृत्यू:१३ सप्टेंबर १९९५)**१९१४:माधव गजानन बुद्धीसागर-- अनुवादक (मृत्यू:१६ ऑगस्ट १९६१)**१९०५:रघुनाथ गोविंद सरदेसाई-- लेखक, पत्रकार,संपादक,कथाकार,नाट्यचित्र समीक्षक आणि क्रीडाविषयक पुस्तकांचे कर्ते(मृत्यू:११ डिसेंबर १९९१)* *१८४९:बाळकृष्णबुवा इचलकरंजीकर – हिन्दुस्तानी शास्त्रीय गायक,ग्वाल्हेर गायकीचा महाराष्ट्रात प्रचार केला(मृत्यू:८ फेब्रुवारी १९२७)**१८२२:रामकृष्ण विठ्ठल तथा भाऊ दाजी लाड – प्राच्यविद्या पंडित,पुरातत्त्वज्ञ,समाजसेवक (मृत्यू:३१ मे १८७४)**१७९१उमाजी नाईक – पहिले क्रांतिकारक स्वातंत्र्यसैनिक (मृत्यू:३ फेब्रुवारी १८३२)* *_मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन:_* ••••••••••••••••••••••••••••••••••••••*२००७:अनंत रामचंद्र तोरो-- लेखक, अनुवादक,अध्यापक( जन्म:५ मे १९३०)**१९९७:मुकूल आनंद – तांत्रिक करामतीचे जादूगार म्हणून नाव कमावलेले हिन्दी चित्रपट निर्माते व दिग्दर्शक (जन्म:११ आक्टोबर १९५१)**१९९४:टेरेन्स यंग, चिनी – इंग्लिश दिग्दर्शक आणि पटकथाकार (जन्म:२० जून १९१५)**१९९१:रवि नारायण रेड्डी – ’कम्युनिस्ट पार्टी ऑफ इंडिया’ चे सहसंस्थापक (जन्म:५ जून १९०८)**१९७९:जनार्दन ग्यानोबा तथा ‘जे.जी. नवले – भारतीय कसोटी क्रिकेट संघाचे पहिले यष्टिरक्षक(जन्म: ७ डिसेंबर १९०२)**१९७८:पी.एल.संतोषी -- गीतकार दिग्दर्शक (जन्म:७ ऑगस्ट १९१६)**१९५३:भगवान रघुनाथ कुळकर्णी ऊर्फ ’फुलारी’ ऊर्फ ’बी. रघुनाथ’ – लेखक व कवी (जन्म:१५ ऑगस्ट १८१३)*~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~ *_दिनविशेष या सदरातील सर्व मुद्दे हे संग्रहात्मक आहेत तेव्हा त्यात चूका नसतीलच असे सांगता येणार नाही_* *✍ संकलन ✍* *श्रीराम चव्हाण माजी शिक्षणाधिकारी नागपूर*मोबाईल:9822695372 ईमेल: chavhansk65@gmail.com••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *✈ 🚀 गुगलयान ✈ 🚀*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••श्रावणातल्या कवितागोपाळकालाबोल बजरंग बली की जयबोलो हनुमान की जयगोविंदा रे गोपाळा, यशोदेचा कान्हा बाळागोविंदा रे गोपाळा, यशोदेचा कान्हा बाळाखिडकीतल्या ताई अक्का वाकू नकापुढं वाकू नकादोन पैसे देतो मला भिजवून टाकागोविंदा रे गोपाळा, यशोदेचा कान्हा बाळालाल लाल पागोटे गुलाबी शेलाचिंट्या दादा गेलाजीव झालाय वेडा गोविंदा रे गोपाळा, यशोदेचा कान्हा बाळातुझ्या घरात नाही पाणी घागर, उताणी रे गोपाळातुझ्या घरात नाही पाणी घागर, उताणी रे गोपाळागोविंदा रे गोपाळा, यशोदेचा कान्हा बाळाएक दोन तीन चार हमालपुऱ्यातली पोरं हुशारएक दोन तीन चार हमालपुऱ्यातली पोरं हुशारगोविंदा रे गोपाळा, यशोदेचा कान्हा बाळासंकलन~~~~~~~~~~~~~~~~~~~ 🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••1⃣ *निजामकालीन नोंदी असतील त्यांना कुणबी दाखले देणार, मुख्यमंत्री शिंदे यांची मोठी घोषणा*•••••••••••••••••••••••••••••••••••••2⃣ *दहीहंडी आणि अनंत चतुर्दशीला मुंबई आणि उपनगरात शासकीय सुट्टी जाहीर*•••••••••••••••••••••••••••••••••••••3⃣ *नव्या संसदेच्या प्रवेशाला गणेश चतुर्थीचा मुहूर्त, विशेष अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवसापासून नव्या संसदेतून कामकाज*•••••••••••••••••••••••••••••••••••••4⃣ *दहीहंडी पथकात किती गोविंदा असावेत, याचा नियम का नाही? मुंबई उच्च न्यायालयाचा राज्य सरकारला सवाल*•••••••••••••••••••••••••••••••••••••5⃣ *८ सप्टेंबर ते १४ सप्टेंबरच्या कालावधीत मराठवाड्यातील बहुतांश जिल्ह्यात हलका, मध्यम ते मुसळधार पावसाची शक्यता हवामान विभागाचा अंदाज*•••••••••••••••••••••••••••••••••••••6⃣ *साखर कारखान्यांना शिखर बँकेकडून शासकीय हमीवर कर्ज, पुढील बैठक मराठवाड्यात, मंत्रिमंडळ बैठकीतील महत्त्वाचे निर्णय*•••••••••••••••••••••••••••••••••••••7⃣ *आशिया चषक : सुपर 4 स्टेजमधील पहिल्या सामन्यात पाकिस्तानने बांगलादेशला 7 विकेटने हरविले*•••••••••••••••••••••••••••••••••••••*📷 वृत्त संकलक - कुणाल पवारे 📹*📱9960358300•••••••••••••••••••••••••••••••••••••ही पोस्ट नियमित मिळविण्यासाठी आणि या समुहात add होण्यासाठी 9423625769 येथे संपर्क करावे.••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• 🌷🍃 *विशेष माहिती* 🌷🍃••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••*तुमच्या जिल्ह्याचं नाव कसं पडलं ?* महाराष्ट्रातील ३६ जिल्ह्याची वेग वेगळी अशी वैशिष्ट्ये आहे. *वाशिम* महाराष्ट्रातील वाशिम जिल्ह्यास प्राचीन इतिहास लाभलेला आहे. वाशीम शहराचे प्राचीन नाव वात्सुगाम होते. प्राचीन काळी होऊन गेलेल्या वत्स ऋषीच्या नावावरुन हे नाव पडले असे म्हटले जाते.*संकलन*••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• 🌹 *" फ्रेश सुविचार "* 🌹••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••नम्रतेने जे लाभेल ते बळाने कधीच मिळणार नाही.*संकलन :- प्रमिलाताई सेनकुडे**ता. हदगाव जि. नांदेड*📱9403046894••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• ❓ *आजची प्रश्नमंजुषा* ❓••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••१) श्रीकृष्णाच्या आई-वडिलांचे नाव काय होते ? २) श्रीकृष्णाच्या मामाचे नाव काय होते ?३) श्रीकृष्णाचा सांभाळ कोणी केला ?४) श्रीकृष्णाच्या परम मित्राचे नाव काय होते ?५) श्रीकृष्ण हा विष्णूचा कितवा अवतार समजला जातो ?*उत्तरे :- १)देवकी-वसुदेव २) कंस मामा ३) माता यशोदा ४) सुदामा ५) आठवा*संकलन :- जैपाल भै. ठाकूर*जि.प.व.प्राथ.शाळा भोसा, ता. आमगाव, जि. गोंदिया 📱9765943144••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎂 *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *◆|वा|ढ|दि|व|स|अ|भि|ष्ठ|चिं|त|न|◆* 👤 गजानन जाधव, शिक्षक, रायगड👤 सुमित बालाजी पेटेकर, धर्माबाद👤 भास्कर चटलोड, सगरोळी👤 दशरथ याटलवार, धर्माबाद👤 प्रवीण कुमार👤 गोविंद पटेल👤 भारत विठ्ठल पाटील, शिक्षक, पाचोरा👤 हणमंत धोंडीराम गायकवाड, कीर्तनकार, संगमनेर👤 प्र. श्री. जाधव, साहित्यिक, नांदेड👤 त्र्यंबक स्वामी, नांदेड*ઉदंड_आયુષ્યાच्या अનંત_શુभेच्छा*[ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा एक दिवस अगोदर 9423625769 येथे पोस्ट करावे. ]••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• ••• 💡 ‼ *मनाचे श्लोक*‼ 💡•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••घनश्याम हा राम लावण्यरुपी। महाधीर गंभीर पूर्णप्रतापी॥ करी संकटीं सेवकांचा कुडावा। प्रभाते मनी राम चिंतीत जावा॥६७॥।। जय जय रघुवीर समर्थ ।।••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🕊🌎 ‼ *विचारधारा*‼🕊🌎••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••आपल्यापाशी सर्व काही असेल. .पण, चांगल्या व्यक्तीची साथ, संगत नसेल तर..आपल्या मनातील विचार, सुख, दु:ख,व्यथा सांगायला व मन मोकळे करायला विचार करावा लागतो. कधी, कधी हे सर्व होतही नाही. त्यामुळे आपण मनातल्या मनात तुटून सुध्दा जातो. यासाठीच आपल्या जीवनात एक तरी चांगली व्यक्ती असणे गरजेचे आहे. 🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷सौ.संगीता संतोष ठलाल मु. कुरखेडा जि. गडचिरोली••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎭 *आजची फ्रेश बोधकथा* 🎭••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••*खोडकरमाऊसगोलूच्या घरात एक खोडकर उंदीर शिरला . तो खूप लहान होता पण घरभर धावपळ करत असे. त्याने गोलूचे पुस्तकही चावले होते. काही कपड्यांनाही चावा घेतला. गोलूची आई जे अन्न शिजवायची आणि झाकण न ठेवता ठेवायची, तो उंदीरही चाटायचा . उंदीर खाऊन-पिऊन मोठा झाला होता. एके दिवशी गोलूच्या आईने एका बाटलीत सरबत बनवले. खोडकर उंदराची नजर बाटलीवर पडली. उंदीर अनेक युक्त्या करून थकला होता, त्याला सरबत प्यायचे होते.बाटलीवर बसवलेला उंदीर कसा तरी कॅप उघडण्यात यशस्वी होतो. आता उंदीर त्यात घुसण्याचा प्रयत्न करतो. बाटलीचे तोंड लहान होते, आत जाऊ शकत नव्हते. मग उंदराला कल्पना सुचली, त्याने आपली शेपटी बाटलीत टाकली. शेपूट सरबत ओले होते, ते चाटणे – उंदराचे पोट भरले आहे. आता तो गोलूच्या उशीखाली केलेल्या त्याच्या पलंगावर गेला आणि आरामात करू लागला.नैतिक शिक्षण – कष्ट करून कोणतेही काम अशक्य नसते.•••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••या पोस्ट विषयी आपल्या सूचना, निवेदन, अभिप्राय, बातम्या, वाढदिवस, माहिती किंवा शंका 9423625769 येथे कळवावे. •••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••~~~~~~~~~~~~~~~~~~~*🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢*📱 9423625769~~~~~~~~~~~~~~~~~~~*🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏*पुन्हा भेटू या फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार ~~~~~~~~~~~~~~~~~~~
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment