✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट~~~~~~~~~~~~~~~~~~~ 9️⃣ 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 9️⃣ ( फ्रेश शालेय परिपाठ )🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00 ( रविवार आणि सुट्टी वगळून )~~~~~~~~~~~~~~~~~~~🎇 दिनांक :- 12 सप्टेंबर 2023💠 वार - मंगळवारhttps://youtu.be/YwKDuGYr2Z0?si=7oMeq-1B2ApeRnOT🌷🌐 . *दिनविशेष . 🌐* 🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *_ या वर्षातील २५५ वा दिवस आहे_* •••••••••••••••••••••••••••••••• *२००५:हाँगकाँगमधील डिस्नेलँड (Disney Land, Hong Kong) सुरू झाले.**१९९८:डॉ. जयंत नारळीकर यांना ’पुण्यभूषण’ पुरस्कार प्रदान**१९८०:तुर्कस्तानमधे लष्करी उठाव**१९५९:’ल्यूना-२’ हे मानवविरहित रशियन अंतराळयान चंद्रावर उतरले.**१९४८:भारतीय सैन्य हैदराबाद संस्थानच्या हद्दीत शिरले. जुलुमी रझाकारांच्या मदतीने स्वतंत्र राहण्याचा निजामाचा हट्ट मोडून या फौजांनी हैदराबाद ताब्यात घेतले. हैदराबाद मुक्तीच्या या कारवाईचे वर्णन ’पोलिस अॅक्शन’ असे केले जाते.**१६६६:आग्र्याहून सुटका झाल्यानंतर शिवाजीमहाराज राजगड येथे सुखरुप पोहोचले.* *_जन्मदिवस / जयंती / वाढदिवस:_* ••••••••••••••••••••••••••••••••••••••*१९८८:प्राची देसाई -- भारतीय अभिनेत्री**१९८८:प्रशांत दत्तात्रय केंदळे -- कवी**१९७९:प्रा.डॉ.श्रीकृष्ण काकडे -- लेखक, आदिवासी लोक साहित्याचे अभ्यासक* *१९७२:रसिका जोशी-- मराठी चित्रपट व नाट्य क्षेत्रांतील अभिनेत्री* *१९६४:महेंद्र लक्ष्मण तुपे-- कवी**१९६३:डॉ.नंदकिशोर दामोधरे -- कवी* *१९६२:प्रा.लक्ष्मण मोहनराव महाडिक-- प्रसिद्ध कवी व लेखक* *१९५७:डॉ.हेमंत मोरेश्वर वाघ -- कवी, भाषांतरकार* *१९५६:डॉ.राजीव नाईक -- नाटककार आणि कथाकार**१९५५:सुधीर रामकृष्ण सेवेकर --लेखक, तसेच विविध वृत्तपत्रांतून विपुल लेखन* *१९५४:मारुती सिद्राम कटकधोंड-- प्रसिद्ध कवी**१९५३:चांगदेव काळे-- कादंबरीकार व कथाकार* *१९४८:मॅक्स वॉकर – ऑस्ट्रेलियन क्रिकेट आणि फूटबॉलपटू* *१९४५:प्रा.डॉ.संजीवनी अरविंद देशमुख-- कादंबरीकार,तथा कथा लेखिका**१९३२:विजया श्रीनिवास जहागीरदार-- बालसाहित्यिक,लेखिका व कवयित्री (मृत्यू:१ एप्रिल २०२०)**१९१२:फिरोझ गांधी – इंदिरा गांधी यांचे पती, पत्रकार व राजकारणी (मृत्यू:८ सप्टेंबर १९६०)**१८९७:आयरिन क्यूरी – नोबेल पारितोषिक विजेत्या फ्रेन्च भौतिकशास्त्रज्ञ (मृत्यू:१७ मार्च १९५६)**१८९४:विभूतीभूषण बंदोपाध्याय – जागतिक ख्यातीचे बंगाली साहित्यिक.(मृत्यू:१ नोव्हेंबर १९५०)**१८८२:बाळाचार्य माधवाचार्य खुपेरकर शास्त्री-- राष्ट्रीय पंडित, तत्त्वचिंतक, संस्कृत तज्ज्ञ(मृत्यू:१० फेब्रुवारी १९७८)* *_मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन:_* ••••••••••••••••••••••••••••••••••••••*१९९६:पं. कृष्णराव रामकृष्ण चोणकर –मराठी व गुजराती संगीत नाट्य सृष्टीतील गायक अभिनेते, एक तपाहून अधिक काळ ’गंधर्व नाटक मंडळी’मध्ये नटसम्राट बालगंधर्वांचे नायक म्हणून त्यांनी काम केले.* *१९९६:पद्मा चव्हाण – चित्रपट व रंगभूमीवरील अभिनेत्री(जन्म: ७ जुलै १९४८)**१९९२:पं.मल्लिकार्जुन मन्सूर – हिन्दुस्तानी शास्त्रीय गायक, पद्मविभूषण व कालिदास सन्मान आदी मानसन्मान त्यांना मिळाले. (जन्म:३१ डिसेंबर १९१०)**१९८०: सतीश दुभाषी --चित्रपट व रंगभूमीवरील अभिनेते सतीश दुभाषी यांचे मुंबई-गोवा महामार्गावर ’मंतरलेली चैत्रवेल’ हे नाटक घेऊन चाललेल्या नाटक कंपनीच्या बसला लागलेल्या आगीत जळाल्याने निधन झाले.(जन्म:१४ डिसेंबर १९३९)**१९८०:शांता जोग-चित्रपट व रंगभूमीवरील अभिनेत्री शांता जोग यांचे मुंबई-गोवा महामार्गावर ’मंतरलेली चैत्रवेल’ हे नाटक घेऊन चाललेल्या नाटक कंपनीच्या बसला लागलेल्या आगीत जळाल्याने निधन झाले.(जन्म:२ मार्च १९२५)**१९७१:जयकिशन डाह्याभाई पांचाळ – ’शंकर-जयकिशन’ या संगीतकार जोडीतील संगीतकार (जन्म:४ नोव्हेंबर १९२९)**१९५२:रामचंद्र गणेश कुंदगोळकर तथा ’सवाई गंधर्व’ – हिन्दुस्तानी शास्त्रीय गायक, दादासाहेब खापर्डे यांनी त्यांना 'सवाई गंधर्व' ही पदवी दिली. (जन्म:१९ जानेवारी १८८६)**१९२६:विनायक लक्ष्मण भावे – मराठी साहित्य संशोधक, ग्रंथकार (जन्म: १८७१)*~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~ *_दिनविशेष या सदरातील सर्व मुद्दे हे संग्रहात्मक आहेत तेव्हा त्यात चूका नसतीलच असे सांगता येणार नाही_* *✍ संकलन ✍* *श्रीराम चव्हाण माजी शिक्षणाधिकारी,नागपूर*मोबाईल:9822695372 ईमेल: chavhansk65@gmail.com••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *✈ 🚀 गुगलयान ✈ 🚀*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••श्रावणातल्या कविता *वादलवारं सुटलं गो !*वादलवारं सुटलं गो, वाऱ्यानं तुफान उठलं गो ।भिरभिर वाऱ्यात, पावसाच्या माऱ्यात,सजनानं होडीला पान्यात लोटलंय् ।।वादलवारं सुटलं गो !गडगड ढगांत बिजली करी ।फडफड शिडात धडधड उरी ।एकली मी आज घरी बाय ।संगतीला माझ्या कुनी नाय ।सळसळ माडांत, खोपीच्या कुडात,जागनाऱ्या डोल्यांत सपान मिटलं ।।वादलवारं सुटलं गो !सरसर चालली होडीची नाळ ।दूरवर उठली फेसाची माळ ।कमरेत जरा वाकूनिया ।पान्यामंदी जालं फेकूनिया ।नाखवा माजा, दर्याचा राजा,लाखाचं धन त्यानं जाल्यात लुटलं ।।वादलवारं सुटलं गो ! – शांता शेळके हे गीत ऐकण्यासाठी लिंकवर क्लीक करावे. *संकलन*~~~~~~~~~~~~~~~~~~~ 🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••1⃣ *टिकणारं आरक्षण देण्याची सरकारची भूमिका, शासन कोणालाही फसवणार नाही : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे*•••••••••••••••••••••••••••••••••••••2⃣ *शिवसेना आमदार अपात्रता प्रकरणी विधिमंडळात 14 सप्टेंबर रोजी प्रत्यक्ष सुनावणी, दोन्ही गटांच्या आमदारांची सुनावणी एकाच दिवशी*•••••••••••••••••••••••••••••••••••••3⃣ *ओबीसी समाजावर अन्याय होऊ देणार नाही, गैरसमज मनात ठेवू नका : देवेंद्र फडणवीस*•••••••••••••••••••••••••••••••••••••4⃣ *सौदी अरेबियाचे क्राऊन प्रिन्स आणि पंतप्रधान मोदी यांच्यामध्ये द्विपक्षीय बैठक, महत्त्वाच्या करारांवर केल्या स्वाक्षऱ्या*•••••••••••••••••••••••••••••••••••••5⃣ *निफ्टीची ऐतिहासिक उसळण, 20 हजारांचा टप्पा गाठला; गुंतवणूकदारांना 3.3 लाख कोटींचा फायदा*•••••••••••••••••••••••••••••••••••••6⃣ *नोवाक जोकोविच US ओपनचा बादशाह; पटकावलं कारकिर्दीतील 24वं ग्रँडस्लॅम*•••••••••••••••••••••••••••••••••••••7⃣ *आशिया चषक 2023 - विराट-राहुलची शतके, कुलदीप पवारने घेतलं पाच विकेट, भारताने पाकिस्तानवर 288 धावानी मिळविला विजय*•••••••••••••••••••••••••••••••••••••*📷 वृत्त संकलक - कुणाल पवारे 📹*📱9960358300•••••••••••••••••••••••••••••••••••••ही पोस्ट नियमित मिळविण्यासाठी आणि या समुहात add होण्यासाठी 9423625769 येथे संपर्क करावे.••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• 🌷🍃 *विशेष माहिती* 🌷🍃••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••*📕 गोंगाटामुळे काय दुष्परिणाम होतात ? 📕*गोंगाटामुळे परीक्षेच्या काळात अभ्यासात लक्ष लागत नाही, मन एकाग्र होत नाही हे तुम्ही नक्कीच अनुभवले असेल. कारण वैयक्तिक वा सार्वजनिक आनंदाच्या कोणत्याही प्रसंगी मोठ्या आवाजात लाउडस्पीकरवर गाणी लावून गोंधळ घालायचा प्रकार आपल्याकडे आहे. भले मग कोणाचे कान बहिरे का होईनात!चुकीच्या वेळी, चुकीच्या जागी, चुकीचा आवाज म्हणजेच गोंगाट होय. आवाजाची तीव्रता डेसीबल या एककात मोजतात. माणूस ८५ डेसीबल इतक्या तीव्रतेपर्यंतचा आवाज सहन करू शकतो. तसेच २० ते २०,००० हर्दश एवढ्या वारंवारतेचा (Frequency चा) आवाजच तो ऐकू शकतो.गोंगाटाचे अनेक दुष्परिणाम होतात. यात कानात आवाज होणे, दडे बसणे, थकवा येणे तसेच बहिरेपणा यांचा समावेश होतो. गोंगाटामुळे संवाद साधण्यात अडथळा येतो. चिडचिडेपणा येतो. काम करण्याची व्यक्तीची क्षमता कमी होते, याखेरीज गोंगाटात रक्तदाब वाढतो, नाडीचे ठोके वाढतात, श्वसनाचा दर वाढतो तसेच घाम येण्याच्या प्रमाणातही वाढ होते. अशा प्रकारे गोंगाटामुळे अनेक दुष्परिणाम होतात. हे दुष्परिणाम टाळण्यासाठी आवाज जेथे निर्माण होतो तेथेच त्यावर नियंत्रण ठेवणे, ध्वनिरोधक साधनांचा वापर, व्यक्तीचे कानातील सारख्या साधनांनी आवाजापासून रक्षण करणे इत्यादी उपाय करता येतात.डॉ. अंजली दिक्षित व डॉ. जगन्नाथ दिक्षित यांच्या पुस्तकातुन*संकलन :- श्याम ठाणेदार, पुणे*••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• 🌹 *" फ्रेश सुविचार "* 🌹••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••अपयशाने खचून जाऊ नका, आणखी जिद्दी व्हा.*संकलन :- प्रमिलाताई सेनकुडे**ता. हदगाव जि. नांदेड*📱9403046894••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• ❓ *आजची प्रश्नमंजुषा* ❓••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••१) महाराष्ट्रातील *'फळांचे गाव'* कोणते ?२) महाराष्ट्रातील *'पुस्तकाचे गाव'* कोणते ?३) महाराष्ट्रातील *'मधाचे गाव'* कोणते ?४) महाराष्ट्रातील *'कवितांचं गाव'* कोणते ?५) महाराष्ट्रातील *'नाचणीचे गाव'* कोणते ?*उत्तरे :-* १) धुमाळवाडी, ता. फलटण, जि.सातारा २) भिलार, ता. महाबळेश्वर, जि.सातारा ३) मांघर, ता. महाबळेश्वर, जि.सातारा ४) जकातवाडी, जि.सातारा ५) कुसुंबी, ता. जावळी, जि. सातारा *संकलन :- जैपाल भै. ठाकूर*जि.प.व.प्राथ.शाळा भोसा, ता. आमगाव, जि. गोंदिया 📱9765943144••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎂 *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *◆|वा|ढ|दि|व|स|अ|भि|ष्ठ|चिं|त|न|◆* 👤 पुंडलिक बिरगले, भोकर👤 श्याम कांबळे, संपादक, नांदेड👤 स्वप्नील पुलकंठवार, देगलूर👤 शिवा शिवशेट्टे, नांदेड👤 श्रीपाद चंद्रकांत कुलकर्णी, पुणे👤 व्यंकटेश व्ही पाटील, येवती👤 साहिल सुगुरवाड👤 ज्ञानेश्वर वाढवणकर👤 पोषट्टी सायन्ना*ઉदंड_आયુષ્યાच्या अનંત_શુभेच्छा*[ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा एक दिवस अगोदर 9423625769 येथे पोस्ट करावे. ]••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• ••• 💡 ‼ *मनाचे श्लोक*‼ 💡•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••न वेचे कदा ग्रंथचि अर्थ काही। मुखे नाम उच्चारितां कष्ट नाहीं॥ महाघोर संसारशत्रु जिणावा। प्रभाते मनी राम चिंतीत जावा॥७२॥।। जय जय रघुवीर समर्थ ।।••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🕊🌎 ‼ *विचारधारा*‼🕊🌎••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••वाटा तर अनेक असतात. पण, दिसणाऱ्या प्रत्येक वाटा एकसारख्या असतीलच असे, नाही. म्हणून आपल्याला कोणत्या वाटेने जायचे आहे ते, आपणच ठरवावे. कारण,कधी, कधी वाट निवडण्यात थोडीशी चूक झाली तरी त्याचा त्रास मात्र आपल्यालाच होत असतो.व अनेक संकटाचा सुद्धा सामना करावा लागतो. म्हणून योग्य तीच वाट निवडावी जेणेकरून आपल्याला त्रास होणार नाही. 🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷सौ.संगीता संतोष ठलाल मु. कुरखेडा जि. गडचिरोली••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎭 *आजची फ्रेश बोधकथा* 🎭••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *राणी पॉवर*राणी हे एका मुंगीचे नाव आहे जी आपल्या दलापासून भरकटली आहे. घरचा रस्ता न सापडल्याने ती बराच वेळ अस्वस्थ होत होती. राणीच्या घरचे लोक सरळ रेषेत जात होते. मग जोरदार वारा सुटला, सर्वजण बिथरले. राणीही तिच्या कुटुंबापासून दूर गेली. तिला घरचा रस्ता शोधताना त्रास झाला.बराच वेळ भटकल्यावर त्याला खूप भूक आणि तहान लागली.राणी जोरजोरात रडत होती.वाटेत गोलूच्या खिशातून पडलेली टॉफी सापडली. राणीचे नशीब उघडले. त्याला भूक लागली होती आणि त्याला खायला टॉफी मिळाली होती. राणीने मनसोक्त खाल्ले, आता तिचे पोट भरले आहे.राणीने विचार केला की घरी का नेऊ नये, घरातील लोकही खातील.टॉफी मोठी होती, राणी उचलायचा प्रयत्न करायची आणि पडायची. राणीने धीर सोडला नाही. ती टॉफी दोन्ही हातांनी आणि तोंडाने घट्ट पकडते.ओढत ओढत ती तिच्या घरी पोहोचली. त्याचे आई-वडील, भाऊ-बहीण त्याला पाहताच तेही धावत आले. टॉफी उचलली आणि घरात घेतली.मग काय ?सर्वांची पार्टी सुरू झाली आहे.नैतिक – ध्येय कितीही मोठे असले तरी सतत संघर्षाने ते निश्चितच साध्य होते.•••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••या पोस्ट विषयी आपल्या सूचना, निवेदन, अभिप्राय, बातम्या, वाढदिवस, माहिती किंवा शंका 9423625769 येथे कळवावे. •••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••~~~~~~~~~~~~~~~~~~~*🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢*📱 9423625769~~~~~~~~~~~~~~~~~~~*🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏*पुन्हा भेटू या फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार ~~~~~~~~~~~~~~~~~~~
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment