✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट~~~~~~~~~~~~~~~~~~~ 9️⃣ 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 9️⃣ ( फ्रेश शालेय परिपाठ )🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00 ( रविवार आणि सुट्टी वगळून )~~~~~~~~~~~~~~~~~~~🎇 दिनांक :- 21 सप्टेंबर 2023💠 वार - गुरुवार🌷🌐 . *दिनविशेष . 🌐* 🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••*_आंतरराष्ट्रीय शांतता दिन_**_जागतिक अल्झायमर जागृता दिन_*••••••••••••••••••••••••••••••••• *_ या वर्षातील २६४ वा दिवस आहे_* •••••••••••••••••••••••••••••••• *_महत्त्वाच्या घटना:_* •••••••••••••••••••••••••••••••• *१९९१:आर्मेनिया हा देश (सोविएत संघापासुन) स्वतंत्र झाला.**१९८४:ब्रुनेईचा संयुक्त राष्ट्रात प्रवेश**१९८१:’बेलिझे’ या देशाला (युनायटेड किंग्डमपासुन) स्वातंत्र्य मिळाले.**१९७६:सेशेल्सचा संयुक्त राष्ट्रात प्रवेश**१९७१:बहारिन, भूतान आणि कतार या देशांचा संयुक्त राष्ट्रात प्रवेश**१९६८:रिसर्च अँड अॅनॅलेसिस विंग (RAW) या भारतीय गुप्तचर संघटनेची स्थापना झाली.**१९६५:गाम्बिया, मालदीव आणि सिंगापूर यांचा संयुक्त राष्ट्रात प्रवेश**१९६४:माल्टा हा देश (युनायटेड किंग्डमपासुन) स्वतंत्र झाला.**१९३४:’प्रभात’च्या दामलेमामांनी इंदूरच्या सरदार किबे यांचे लक्ष्मी थिएटर भाड्याने घेऊन व थोडे सजवून 'प्रभात चित्रमंदिर’ या नावाने सुरू केले. ’प्रभात’चाच ’अमृतमंथन’ हा तिथे प्रदर्शित होणारा पहिला चित्रपट होता.**१७९२:अठराव्या लुईचं साम्राज्य लोकांनी बरखास्त केलं आणि फ्रेन्च प्रजासत्ताकाचा जन्म झाला.* *_जन्मदिवस / जयंती / वाढदिव:_* •••••••••••••••••••••••••••••••••••••• *१९८०:करीना कपूर – अभिनेत्री**१९७९:ख्रिस गेल – जमैकाचा क्रिकेटपटू**१९६८:डॉ.सुनिता सुनील चव्हाण -- कवयित्री,लेखिका* *१९५४:डॉ.मंगला रमेश वरखेडे -- लेखिका, संपादिका* *१९५१:अन्थनी लुईस परेरा -- बालकथाकार लेखक* *१९४४:स्नेहल वासुदेव जोशी-- लेखिका**१९४३:डॉ.शरद पांडुरंग हेबाळकर -- इतिहास संशोधक,लेखक* *१९३९:लक्ष्मीकांत सखाराम तांबोळी-- मराठी साहित्यातील प्रसिद्ध कवी,कथाकार, कादंबरीकार**१९३९:सुलभा श्रीराम सरदेसाई-- लेखिका**१९३४:अनंत मिराशी-- मराठी नाट्यअभिनेते (मृत्यू:१३ जून २०२०)**१९३१:सिंगीतम श्रीनिवास राव-- भारतीय चित्रपट दिग्दर्शक,पटकथा लेखक,निर्माता,संगीतकार आणि अभिनेता**१९२९:पं.जितेंद्र अभिषेकी – प्रसिद्ध शास्त्रीय गायक,संगीतकार व शास्त्रीय संगीताचे अभ्यासक (मृत्यू: ७ नोव्हेंबर १९९८)**१९२६:डॉ.सुरेश डोळके--धर्मशास्त्र व तत्त्वज्ञानाचे गाढे अभ्यासक, महानुभाव साहित्याचे संशोधक( मृत्यू:२७ जानेवारी २००८)* *१९२६:’मलिका-ए-तरन्नुम’ नूरजहाँ ऊर्फ अल्लाह वसई – पाकिस्तानी गायिका आणि अभिनेत्री (मृत्यू:२३ डिसेंबर २०००)**१९२५:गोविंदराव पटवर्धन -- सुप्रसिद्ध हार्मोनियम आणि ऑर्गन वादक(मृत्यू:३१ जानेवारी १९९६)**१९२१:बाळकृष्ण मोरेश्वर लोणकर-- लेखक**१९१२:केशव हरी बोरगावकर-- लेखक संपादक**१९०८:दादासाहेब पोहनेरकर-- महाराष्ट्रातील विख्यात इतिहास संशोधक आणि साहित्यिक(मृत्यू:२ सप्टेंबर १९९०)**१८६६:एच.जी.वेल्स – विज्ञानकथांसाठी प्रसिद्ध असलेले इंग्लिश लेखक (मृत्यू:१३ ऑगस्ट १९४६)* *_मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन:_* •••••••••••••••••••••••••••••••••••••• *२०१२:गोपालन कस्तुरी – पत्रकार, ’द हिन्दू’ चे संपादक (जन्म:१७ डिसेंबर १९२४)**१९९९:पुरुषोत्तम दारव्हेकर-- सुप्रसिद्ध मराठी नाटककार,लेखक,दिग्दर्शक,कवी (जन्म:१ जून १९२६)**१९९८:फ्लॉरेन्स ग्रिफिथ जॉयनर – अमेरिकेची धावपटू (जन्म:२१ डिसेंबर १९५९)**१९९२:ताराचंद बडजात्या – चित्रपट निर्माते [राजश्री प्रॉडक्शन्स] (जन्म:१० मे १९१४)**१९८२:सदानंद रेगे – मराठी कवी, कथाकार आणि अनुवादक (जन्म:२१ जून १९२३)**१७४३:सवाई जयसिंग – जयपूर संस्थानचा राजा (जन्म: ३ नोव्हेंबर १६८८)*~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~ *_दिनविशेष या सदरातील सर्व मुद्दे हे संग्रहात्मक आहेत तेव्हा त्यात चूका नसतीलच असे सांगता येणार नाही_* *✍ संकलन ✍* *श्रीराम चव्हाण माजी शिक्षणाधिकारी,नागपूर*मोबाईल:9822695372 ईमेल: chavhansk65@gmail.com••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *✈ 🚀 गुगलयान ✈ 🚀*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••*आगमन बाप्पाची - माहिती गणरायाची*.... रांजणगावचा महागणपती .....अष्टविनायकांपैकी रांजणगावचा महागणपती हा चौथा गणपती. हे महागणपतीचे स्वयंभू स्थान आहे. पुणे-अहमदनगर मार्गावर शिरूर तालुक्यात हे ठिकाण आहे.या स्थानासंदर्भात एक दंतकथा आहे ती अशी की :- त्रिपुरासुर या दैत्यास शिवशंकरांनी काही शक्ती प्रदान केल्या होत्या. या शक्तीचा दुरूपयोग करून त्रिपुरासुर स्वर्गलोक व पृथ्वीलोक येथील लोकांना त्रास देऊ लागला. शेवटी एक वेळ अशी आली की, शिवशंकराला श्री गणेशाचे नमन करून त्रिपुरासुराचा वध करावा लागला. म्हणून या गणेशाला ‘त्रिपुरारिवदे महागणपती’ असेही म्हटले जाते.अष्टविनायकांपैकी सर्वाधिक शक्तिमान असे महागणपतीचे रूप आहे. श्री महागणपती उजव्या सोंडेचा असून गणेशाला कमळाचे आसन आहे. माधवराव पेशव्यांच्या काळात या मंदिराचा जीर्णोद्धार केल्याचे इतिहासात आढळते. इंदूरचे सरदार किबे यांनीदेखील या मंदिराचे नूतनीकरण केल्याचा उल्लेख आढळतो. त्यांनी या देवळातला लाकडी सभामंडप बांधून दिला आहे.हे श्री महागणपतीचे स्थान इ.स. १० व्या शतकातील आहे. श्री गणेशाला दहा हात आहेत आणि प्रसन्न व मनमोहक अशी श्रींची मूर्ती आहे.उद्याच्या भागात - ओझरचा विघ्नेश्वरसंकलन~~~~~~~~~~~~~~~~~~~ 🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••1⃣ *महिला आरक्षण विधेयकाला काँग्रेसचा पाठिंबा, सोनिया गांधी देखील चर्चेत सहभागी, विधेयक मंजूर करून घेण्याचा सरकारचा प्रयत्न*•••••••••••••••••••••••••••••••••••••2⃣ *कांदा व्यापाऱ्यांनी बेमुदत बंदची हाक दिली आहे. दरम्यान, लिलाव बंद ठेवणाऱ्या व्यापाऱ्यांवर कारवाई करणार असल्याचे आदेश पणन मंत्री अब्दुल सत्तार यांनी दिले आहेत.*•••••••••••••••••••••••••••••••••••••3⃣ *दुष्काळाची टांगती तलवार; राज्यातील 13 जिल्हे रेड झोनमध्ये, मराठवाड्यातील आठपैकी 6 जिल्ह्यांचा समावेश*•••••••••••••••••••••••••••••••••••••4⃣ *कंत्राटी नोकरभरतीला विरोध करण्यासाठी पुण्यातील महात्मा फुले वाड्यात राष्ट्रवादीचं आंदोलन, परीक्षा फीच्या माध्यमातून सरकार आपली तिजोरी भरत आहे, रोहित पवारांचा हल्लाबोल*•••••••••••••••••••••••••••••••••••••5⃣ *मध्य प्रदेशात काँग्रेसचे कमलनाथ यांच्या हस्ते शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे होणार अनावरण, आदित्य ठाकरे राहणार उपस्थित*•••••••••••••••••••••••••••••••••••••6⃣ *पुढच्या वर्षी लवकर या! दीड दिवसाच्या बाप्पांना दिला निरोप*•••••••••••••••••••••••••••••••••••••7⃣ *एशियन गेम्स 2023 स्पर्धेला दिमाखात सुरुवात, भारताच्या एकूण 655 खेळाडूंना घेतला सहभाग. यात 328 महिला आणि 325 खेळाडूंचा समावेश*•••••••••••••••••••••••••••••••••••••*📷 वृत्त संकलक - कुणाल पवारे 📹*📱9960358300•••••••••••••••••••••••••••••••••••••ही पोस्ट नियमित मिळविण्यासाठी आणि या समुहात add होण्यासाठी 9423625769 येथे संपर्क करावे.••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• 🌷🍃 *विशेष माहिती* 🌷🍃••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••📕 *खोकल्याच्या औषधांचा काय उपयोग असतो ?* 📕खोकून दाखवा म्हटले तर तुम्ही खोकून दाखवू शकाल. म्हणजेच कोणताही आजार नसतानाही आपण खोकू शकतो. खोकणे म्हणजे काय हे आता समजून घेऊ. खोकताना प्रथम आपण दीर्घ श्वास घेतो. त्यानंतर श्वासनलिकेवर एपिग्लॉटीस हा पडदा टाकला जातो. मग दाबाखाली हवा बाहेर टाकली जाते. त्याबरोबर बेडका बाहेर पडतो.खोकला ही शरीराची एक संरक्षक प्रतिक्रिया आहे. श्वसनमार्गात जीवजंतू गेले, घाण गेली की ती घाण व अनावश्यक स्राव शरीराबाहेर टाकण्यासाठी खोकला येतो. खोकला हे श्वसनसंस्थेच्या विविध रोगांमध्ये आढळून येणारे मुख्य लक्षण आहे. याखेरीज जंतांची लागण, काही मानसिक रोग, काही हृदयविकार यातही खोकला येतो.खोकल्यावर समूळ उपचार करायचा, तर आजारासाठी प्रभावी उपचार करावे लागतील.खोकल्याच्या औषधांचे एक्स्पेक्टोरंट अर्थात बेडके बाहेर टाकण्यास साह्य करणारे व अँटीटसीव्ह अर्थात खोकला थांबवणारे असे दोन प्रकार असतात. कोरड्या खोकल्यासाठी नोस्कॅपीन सारखे अँटीटमीव्ह औषध उपयोगी पडू शकते; पण जेव्हा बेडके पडायला हवेत, तेव्हा ते दिल्यास उलटाच परिणाम हाईल. गंमत म्हणजे ८५% खोकल्याच्या औषधात ही दोन्ही प्रकारची औषधे एकत्र असल्याने ती निरुपयोगी असतात असे शास्त्रीय पाहण्यांमध्ये सिद्ध झालेले आहे. म्हणून खोकल्याचे औषध घेताना ते डॉक्टरी सल्ल्यानेच घ्यावे. खोकला बरा करण्यापेक्षा आजार बरा करणे महत्त्वाचे आहे हे आपण कधीही विसरता कामा नये.डॉ. अंजली दिक्षित व डॉ. जगन्नाथ दिक्षित यांच्या पुस्तकातुन*संकलन :- श्याम ठाणेदार, पुणे*••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• 🌹 *" फ्रेश सुविचार "* 🌹••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••“जीवनाचा प्रवास हा अगदीच सोपा नसतो, तो सोपा आपणच करावा लागतो.”*संकलन :- प्रमिलाताई सेनकुडे**ता. हदगाव जि. नांदेड*📱9403046894••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• ❓ *आजची प्रश्नमंजुषा* ❓••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••१) *जागतिक अंधश्रद्धा निर्मूलन दिवस* केव्हा साजरा केला जातो ?२) राष्ट्रपती होण्यासाठी वयाची किती वर्षे पूर्ण करावी लागतात ?३) वनस्पतींचा अन्न म्हणून उपयोग करणाऱ्या प्राण्यांना काय म्हणतात ?४) स्वतंत्र भारताच्या परराष्ट्र नीतीचे शिल्पकार कोणाला संबोधले जाते ?५) गणिताचे जनक कोणाला मानले जाते ? *उत्तरे :-* १) २१ सप्टेंबर २) ३५ वर्षे ३) शाकाहारी प्राणी ( Herbivores ) ४) पं. जवाहरलाल नेहरू ५) आर्किमिडीज, युनानी इंजिनियर*संकलन :- जैपाल भै. ठाकूर*जि.प.व.प्राथ.शाळा भोसा, ता. आमगाव, जि. गोंदिया 📱9765943144••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎂 *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *◆|वा|ढ|दि|व|स|अ|भि|ष्ठ|चिं|त|न|◆* 👤 निशांत जिंदमवार, माध्यमिक शिक्षक, धर्माबाद👤 विष्णू गंभीरे, गणित शिक्षक, आय जी पी धर्माबाद👤 सचिन तोटावाड, धर्माबाद👤 गोविंद पाटील👤 सौ. स्मिता मिरजकर-वडजे, शिक्षिका, नांदेड👤 आकाश कोलापकर👤 प्रकाश जाधव👤 चिं. जिग्नेश क्रांती बुद्धेवार, धर्माबाद*ઉदंड_आયુષ્યાच्या अનંત_શુभेच्छा*[ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा एक दिवस अगोदर 9423625769 येथे पोस्ट करावे. ]••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• ••• 💡 ‼ *मनाचे श्लोक*‼ 💡•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••मना मत्सरे नाम सांडूं नको हो। अती आदरे हा निजध्यास राहो॥ समस्तांमधे नाम हे सार आहे। दुजी तूळणा तूळितांही न साहे॥८१॥।। जय जय रघुवीर समर्थ ।।••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🕊🌎 ‼ *विचारधारा*‼🕊🌎••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••बोलल्या प्रमाणे दिलेला शब्द पाळला पाहिजे हे प्रत्येक व्यक्तीचे कर्तव्य आहे.दिलेला शब्द जर पाळला गेला नाही तर त्या व्यक्तीने विश्वास गमाविला असा अर्थ गृहीत धरून दुसऱ्यांदा त्या व्यक्तीवर ती व्यक्ती विश्वास करणे होत नाही.म्हणून आपण दिलेला शब्द पाळला पाहिजे. नाही तर विश्वास आपोआप उडून जातो. कारण विश्वास अशी एक गोष्ट आहे की, तो फक्त एकदाच करता येते म्हणून कोणालाही शब्द देताना पाळण्याची आठवण ठेवणे ही सुद्धा एक प्रकारची महत्वाची जबाबदारी आहे. 🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷सौ.संगीता संतोष ठलाल मु. कुरखेडा जि. गडचिरोली••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎭 *आजची फ्रेश बोधकथा* 🎭••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••*चिंटू पिंटूचा खोडसाळपणा*चिंटू-पिंटू दोघे भाऊ होते, दोघांचे वय अंदाजे २० वर्षे असेल. दोघेही खूप खोडसाळपणा करायचे. चिंटू जास्तच खोडकर होता. तो पिंटूची सोंड त्याच्या खोडात गुंडाळून ओढायचा आणि कधी ढकलून टाकायचा. एके काळी दोघेही खेळात मारामारी करत होते. चिंटूचा पाय घसरला, तो खड्ड्यात पडला. पिंटू त्याच्या सोंडेने ते वर काढायचा प्रयत्न करायचा. पण त्याचा प्रयत्न फसला. पिंटू धावतच आईला बोलावतो. त्याची आई चिंटूला तिच्या लांब सोंडेत गुंडाळून जमिनीवर आणते. चिंटूच्या खोडसाळपणाने आज त्याच्या अंगावर काटा आणला होता. तो रडत म्हणाला – मी आतापासून खोडसाळपणा करणार नाही. दोन्ही भाऊ खेळू लागले, हे देऊन आईला खूप आनंद झाला.नैतिक – जास्त खोडकरपणा आणि इतरांना त्रास देण्याची सवय नेहमीच आपत्ती बनते.चिंटू खूप प्रयत्न करतो पण तरीही तो बाहेर पडू शकत नाही. •••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••या पोस्ट विषयी आपल्या सूचना, निवेदन, अभिप्राय, बातम्या, वाढदिवस, माहिती किंवा शंका 9423625769 येथे कळवावे. •••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••~~~~~~~~~~~~~~~~~~~*🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢*📱 9423625769~~~~~~~~~~~~~~~~~~~*🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏*पुन्हा भेटू या फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार ~~~~~~~~~~~~~~~~~~~
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment