✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट~~~~~~~~~~~~~~~~~~~ 9️⃣ 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 9️⃣ ( फ्रेश शालेय परिपाठ )🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00 ( रविवार आणि सुट्टी वगळून )~~~~~~~~~~~~~~~~~~~🎇 दिनांक :- 13 सप्टेंबर 2023💠 वार - बुधवार🌷🌐 . *दिनविशेष . 🌐* 🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *_ या वर्षातील २५६ वा दिवस आहे_* •••••••••••••••••••••••••••••••• *२००८:दिल्ली येथे झालेल्या बॉम्बस्फोटांच्या मालिकेत ३० जण ठार तर सुमारे १३० जण जखमी झाले.**१९९६:महिला आणि बालकल्याणासाठी लक्षणीय कामगिरी बजावणार्या महिलेला देण्यात येणारा ’श्रीमती जानकीदेवी बजाज पुरस्कार’ ज्येष्ठ समाजसेविका आणि स्वातंत्र्य चळवळीतील कार्यकर्त्या श्रीमती इंदुमती पारिख यांना देण्यात आला.**१९८९:आर्चबिशप डेसमंड टुटू यांनी वर्णद्वेषी धोरणाला विरोध करण्यासाठी दक्षिण अफ्रिकेत विशाल मोर्चा काढला.**१९४८:ऑपरेशन पोलो – विलीनीकरणासाठी भारतीय सैन्याने हैदराबादवर चढाई केली.**१९२२:लीबीयातील अझिजीया येथे ५७.२° सेल्सिअस ही जगातील आजवरच्या सर्वाधिक तापमानाची नोंद झाली.* *_जन्मदिवस / जयंती / वाढदिवस:_* ••••••••••••••••••••••••••••••••••••••*१९८८:माधव श्रीकांत किल्लेदार-- नट, लेखक,दिग्दर्शक* *१९७८:डॉ.भारती पवार- केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री**१९७३:महिमा चौधरी-- भारतीय मॉडेल व सिने-अभिनेत्री**१९६९:शेन वॉर्न–ऑस्ट्रेलियन लेगस्पिनर (मृत्यू:४ मार्च २०२२)**१९६९:प्रा.डॉ.स्वानंद गजानन पुंड -- सुप्रसिद्ध लेखक,प्रवचनकार,विविध पुरस्कारांनी सन्मानित* *१९६७:मायकेल जॉन्सन –अमेरिकन धावपटू**१९६२:सुजाता महाजन --कवयित्री लेखिका* *१९५९:श्रीकृष्ण अडसूळ-- साहित्यिक, समीक्षक,संशोधक,आणि सामाजिक कार्यकर्ते**१९५६:डॉ.रमेश आवलगांवकर-- सुप्रसिद्ध लेखक,महानुभाव संप्रदायाचे अभ्यासक* *१९५५:प्रा.चंद्रशेखर डाऊ-- विज्ञान विषयावर लेखन करणारे लेखक**१९५४:महेश सखाराम भावे -- लेखक* *१९५२:सुतेजा सुभाष दांडेकर -- कवयित्री* *१९४६:उषा नाडकर्णी-- मराठी नाटके व चित्रपटांमधील अभिनेत्री**१९४५:शरदचंद्र लक्ष्मण जोशी-- लेखक**१९४३:डाॅ.वासुदेव मुलाटे-- मराठवाड्यातील ग्रामीण कथाकार, समीक्षक आणि प्रकाशक**१९३९:प्रभा अत्रे-- किराणा घराण्याच्या गायिका व लेखिका*@*१९३०:प्रा.श्रीनिवास रघुनाथ कावळे -- मराठी लेखक स.प. महाविद्यालय, पुणे येथे तत्त्वज्ञान विभाग प्रमुख(मृत्यू:३१ जानेवारी १९९०)* *१९२६:वसंत श्रीपाद निगवेकर --लेखक**१९०७:लक्ष्मण नीळकंठ छापेकर (आण्णासाहेब) -- कवी लेखक संपादक (मृत्यू: ६ फेब्रुवारी १९८६)**१८९२:वालचंद रामचंद कोठारी-- संयुक्त महाराष्ट्र चळवळीतील सक्रिय नेते, प्रतिभाशाली विचारवंत,प्रसिद्ध साहित्यिक आणि समाजहितैषी पत्रकार.(मृत्यू:१० फेब्रुवारी १९७४)**१८८६:सर रॉबर्ट रॉबिनसन – वनस्पतिज रंग व अल्कलॉईड्सवर संशोधन करणारे ब्रिटिश रसायनशास्त्रज्ञ व नोबेल पारितोषिक विजेते (मृत्यू:८ फेब्रुवारी १९७५)**१८५७:मिल्टन हर्शे – ’द हर्शे चॉकलेट कंपनी’चे संस्थापक (मृत्यू: १३ आक्टोबर १९४५)* *_मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन:_* ••••••••••••••••••••••••••••••••••••••*२०१२:रंगनाथ मिश्रा – भारताचे २१ वे सरन्यायाधीश (जन्म:२५ नोव्हेंबर १९२६)**२०११:गौतम राजाध्यक्ष--मराठी फॅशन प्रकाशचित्रकार . व्यक्तिचित्रण प्रकारातल्या प्रकाशचित्रांसाठी ते विशेष नावाजले जात असत(जन्म:१६ सप्टेंबर १९५०)**१९९७:लालजी पाण्डेय तथा ’अंजान’ – हिन्दी चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध गीतकार (जन्म:२८ आक्टोबर १९३०)**१९९५:डॉ. महेश्वर नियोग – प्रख्यात आसामी साहित्यिक आणि इतिहासकार, पद्मश्री (१९७४), आसाम साहित्य परिषदेचे अध्यक्ष (जन्म:७ सप्टेंबर १९१५)**१९७१:केशवराव त्र्यंबक दाते – चित्रपट व रंगभूमीवरील अभिनेते, नाट्यशिक्षक. महाराष्ट्र नाटक मंडळी या संस्थेच्या नाटकांमधून त्यांनी काही स्त्री नायिकांच्या भूमिका केल्या. (जन्म:२४ सप्टेंबर १८८९ )**१९२९: जतिन दास --लाहोर कटातील क्रांतिकारक जतिन दास यांनी तुरुंगातील जुलुमाचा निषेध म्हणून केलेल्या उपोषणात त्यांचा ६३ व्या दिवशी मृत्यू झाला.(जन्म:२७ आक्टोबर १९०४)**१९२६:श्रीधर पाठक – हिन्दी कवी,लखनौ येथे भरलेल्या पाचव्या हिन्दी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष (जन्म:११ जानेवारी १८५८)**१८९३:मामा परमानंद – पत्रकार व विचारवंत, प्रार्थना समाजाचे एक संस्थापक (जन्म:३ जुलै १८३८)* ~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~ *_दिनविशेष या सदरातील सर्व मुद्दे हे संग्रहात्मक आहेत तेव्हा त्यात चूका नसतीलच असे सांगता येणार नाही_* *✍ संकलन ✍* *श्रीराम चव्हाण माजी शिक्षणाधिकारी,नागपूर*मोबाईल:9822695372 ईमेल: chavhansk65@gmail.com••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *✈ 🚀 गुगलयान ✈ 🚀*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••श्रावणातल्या कविताबैल पोळा निमित्ताने कविताशिंगे रंगविली, बाशिंगे बांधली,चढविल्या झूली ऐनेदार.राजा, परधान्या, रतन, दिवाण,‘बजीर, पठाण, तुस्त मस्त.वाजंत्री वाजती, लेजीम खेळती,मिरवीत नेती, बैलांलागी.दुलदुलतात कुणाची बशिंडे,काही बांड खोंडे अवखळ.कुणाच्या शिंगांना बांधियले गोंडे,हिरवे, तांबडे शोभिबंत.वााजती गळ्यांत घुंगरांच्या माळा,सण बैलपोळा ऐसा चाले.झुलींच्या खालती काय नसतीलआसूडांचेव ळ उठलेले ?आणि फुटतील उद्याही कडाडूऐसेच आसूड पाठीवर!जरी मिरविती परि धन्याहातीवेसणी असती घट्ट पाहा.जरी झटकली जराशीही मान,तरी हे वेसण खेचतील.सण एक दिन! बाकी वर्षभरओझे मरमर ओढायाचे |– कवी यशवंतसंकलन~~~~~~~~~~~~~~~~~~~ 🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••1⃣ *विविध खात्यांमधील हजारो सरकारी पदे भरण्यासाठी 9 खासगी कंपन्यांची निवड, खासगीकरणाच्या दिशेने राज्य सरकारचं पाऊल*•••••••••••••••••••••••••••••••••••••2⃣ *मराठा आरक्षणाचा मुद्दा तापला असतानाच ओबीसी उतरणार रस्त्यावर; उद्या, 13 सप्टेंबरपासून औरंगाबादमध्ये अन्नत्याग आंदोलनाचा इशारा*•••••••••••••••••••••••••••••••••••••3⃣ *सन 2014 पूर्वीच्या अधिकाऱ्यांच्या भ्रष्टाचाराच्या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी CBI ला केंद्र सरकारच्या पूर्वपरवानगीची गरज नाही, न्यायालयाचा निकाल*•••••••••••••••••••••••••••••••••••••4⃣ *"डिझेल गाड्यांवर 10 % अतिरिक्त GST लावण्याचा कुठलाही प्रस्ताव तूर्तास सरकारच्या विचाराधीन नाही"; डिझेल इंजिनसंदर्भातील वक्तव्यावरुन परिवहनमंत्री नितीन गडकरींचं स्पष्टीकरण*•••••••••••••••••••••••••••••••••••••5⃣ *लातुरातील सोयाबीन खरेदी केंद्रावरील काट्यातच घोळ, क्विंटल मागे 12 ते 14 किलोचा फरक आल्याने शेतकरी संतप्त*•••••••••••••••••••••••••••••••••••••6⃣ *यंदा बैलपोळ्यावर महागाई, दुष्काळ आणि 'लम्पी'चे सावट; बाजारात दुकाने सजली मात्र साहित्य खरेदीकडे ग्राहकांनी फिरविली पाठ*•••••••••••••••••••••••••••••••••••••7⃣ *आशिया चषक 2023- भारताने श्रीलंकेचा 41 धावानी पराभव करत फायनलमध्ये केली एन्ट्री*•••••••••••••••••••••••••••••••••••••*📷 वृत्त संकलक - कुणाल पवारे 📹*📱9960358300•••••••••••••••••••••••••••••••••••••ही पोस्ट नियमित मिळविण्यासाठी आणि या समुहात add होण्यासाठी 9423625769 येथे संपर्क करावे.••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• 🌷🍃 *विशेष माहिती* 🌷🍃••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••📙 *चक्रीवादळे का येतात ?* 📙***************************उन्हाळ्याचे दिवस चालू असतात. भर दुपारी उन्हाचा कडाका अंगाची लाहीलाही करत असतो. जमीन अगदी चटके बसतील, अशी तापलेली व हवा अजिबात पडलेली. झाडाचे तर पानही हलत नाही आणि बघता बघता लांबवर कुठेतरी जमिनीवरची पडलेली पाने वाऱ्याने गोलगोल भिरभिरताना दिसू लागतात. बघता बघता तीच पाने उंचावर उचलली जातात. त्यांच्याबरोबरच धुळीचा लोटही उफाळताना, गरगरताना दिसतो. काही सेकंदातच वाऱ्याची वावटळ आपल्यालाही घेरून टाकते. हेलकावणारी झाडे, वाऱ्याचा सोसाट्याचा आवाज, नाकातोंडात जाणारी धूळमाती यांमुळे सारेच कसे भीषण वाटत असते. ही असते चक्रीवादळाची सुरुवात.चक्रीवादळ म्हणजे वातावरणातील एखाद्या विवक्षित ठिकाणी हवेचा दाब आसपासच्या काही मैलांच्या परिसरापेक्षा कमी अथवा जास्त झाल्याने दिसून येणारे वातावरणातील बदल. हे बदल फार मोठ्या वेगाने घडतात, त्यात वाऱ्याची फार मोठी ताकद सामावलेली असते. त्या विवक्षित ठिकाणी हवेचा दाब कमी होतो वाह वाढतो. तो चक्रीवादळाचा केंद्रबिंदूच असतो. दाब कमी झाल्यास तेथील हवेची पोकळी भरून काढण्याचा प्रयत्न म्हणून वातावरणातील हवेत एक प्रकारचे भोवरे तयार होतात. याउलट दाब वाढला असल्यास त्या पट्टय़ातील हवा दाबामुळे केंद्राकडे खाली दाबली जात असते. याही क्रियेमध्ये वारे वाहणे वेगाने सुरू होते, पण त्यांची तीव्रता खूपच कमी असते. बहुतेक चक्रीवादळांचा केंद्रबिंदू समुद्रावरच सुरू होतो. कसलाही अडथळा वाटेत नसल्याने हे वादळ स्वतःभोवती फिरत वेगाने घोंगावत इकडे तिकडे हेलकावत राहते. पण समुद्री वार्यांमुळे हलके हलके जमिनीकडे येऊ लागते. सुरुवातीला जमिनीवरचा मोठा पट्टा त्यामुळे त्याच्या तडाख्यात सापडतो, पण त्याचबरोबर त्याचा वेग हळूहळू कमी होत पसरत जातो व काही काळाने ते संपूनही जाते. समुद्रपातळीपेक्षा जमिनीची वाढलेली उंची, वाटेत येणारे अडथळे व जमिनीवरील बरेचसे स्थिर तापमान यांमुळे या चक्रीवादळांचा वेग मंदावतो. चक्रीवादळ बहुधा स्वतःबरोबर सोसाटयाचा पाऊसही आणते. खूप मोठ्या आकारमानात हे पसरलेले असल्याने (चारशे ते सहाशे किलोमीटर) या सर्व भागातील निरनिराळे ढग यात ओढले गेलेले असतात. या ढगांचे एकत्रीकरण होताच त्यातील बाष्पही एकत्र येऊन त्यापासून पाऊस पडेल, असे मोठे बाष्पकण तयार होतात. सुरुवातीला प्रचंड वेगाने वाहणारे वारे, धुळीचे वातावरण व नंतरच्या पावसाचे तडाखे ही चक्रीवादळाची खासियतच म्हणायला हवी. चक्रीवादळांचा वेग जमिनीवर पोहोचल्यावर अनेकदा ताशी साठ ते ऐंशी किलोमीटर इतका असतो. समुद्रावरील वेग मोजण्याची पद्धत नाही, पण तो कदाचित यापेक्षाही जास्त असू शकतो. समुद्रावरील बोटी या वादळात सापडल्यास अनेकदा त्यांचे गंभीर नुकसान होण्याइतका त्यांना तडाखा बसलेला असतो. वादळाचा पट्टा ओलांडण्यास त्यांना एक ते चार दिवस लागत असल्याने तोवर राक्षसी लाटांचे तांडव असहाय्यपणे बघणे एवढेच त्यांच्या हातात असते. अनेकदा या लाटांची उंची तीस ते पस्तीस फुटांपर्यंतही असू शकते. ही वादळे सागरी अपघात व दुर्घटना यांचे एक मुख्य कारण असल्याने या वादळी टापूंची सतत माहिती घेऊन त्याप्रमाणे मार्ग आखणे, बदलणे बोटीच्या कप्तानाने कामच राहते. किनाऱ्यावर जेव्हा ही वादळे येतात, तेव्हा उंच झाडे उन्मळून पडणे, सागरी लाटा खोलवर घुसून त्यामुळे नुकसान होणे, घरांचे पत्रे उडणे या गोष्टी होतात. चक्रीवादळांची सूचना हल्ली उपग्रहांमुळे खूपच लवकर मिळू शकते. उपग्रहांमधून या सर्व वादळांचा नेमका प्रवास, हवेतील घडत जाणारे बदल यांचे फोटो मिळतात. या खेरीच एक मोठी विलक्षण पद्धत चक्रीवादळांच्या अभ्यासासाठी गेली २० वर्षे वापरली जात आहे. अत्यंत धोकादायक अशा पद्धतीत लष्करी जेट विमानातून संशोधक या चक्रीवादळाच्या केंद्रबिंदूकडेच प्रवास सुरू करतात. थेट केंद्रबिंदूचा वेध घेऊन विमान वर न्यावयाचे व त्या दरम्यान विविध शास्त्रीय निरीक्षणे करायची, अशी ही पद्धत आहे. निष्णात वैमानिक व जिवावर उदार झालेले संशोधक यांचा चमू हे काम करतो. या प्रकारात विमान पार वेडेवाकडे होऊन दोन तीन हजार फूट लांबवर एखाद्या खेळण्याप्रमाणे भिरकावलेही गेले आहे. तरीही सुखरूप उतरल्यावर नवीन चक्रीवादळाची सूचना कधी मिळते, इकडेच या चमूचे लक्ष असते. धाडस व जिज्ञासा यांचा संगम काय करू शकतो, याचे हे एक थरारक उदाहरण आहे.*'सृष्टी विज्ञानगाथा' या पुस्तकातून**संकलन :- श्याम ठाणेदार, पुणे*••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• 🌹 *" फ्रेश सुविचार "* 🌹••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••आनंदी राहण्यासाठी एकच मंत्र आहे, अपेक्षा स्वतः कडून ठेवा, इतरांकडून नाही.*संकलन :- प्रमिलाताई सेनकुडे**ता. हदगाव जि. नांदेड*📱9403046894••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• ❓ *आजची प्रश्नमंजुषा* ❓••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••१) २०३० पर्यंत देश शंभर टक्के साक्षर करण्यासाठी *नवभारत साक्षरता अभियाना* ची सुरुवात केव्हा झाली ?२) आजच्या घडीला भारतात प्रौढ निरक्षरांची संख्या किती आहे ?३) सन १९४७ साली भारतात प्रौढ निरक्षरांची संख्या किती होती ?४) भारताचा साक्षरतेचा दर किती आहे ?५) प्रथम आंतरराष्ट्रीय साक्षरता दिवस केव्हा साजरा केला गेला ? *उत्तरे :-* १) ८ सप्टेंबर २०२३ २) १८ कोटी १२ लाख ३) ३१ कोटी ४) ७४.०४ टक्के ५) ८ सप्टेंबर १९६६*संकलन :- जैपाल भै. ठाकूर*जि.प.व.प्राथ.शाळा भोसा, ता. आमगाव, जि. गोंदिया 📱9765943144••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎂 *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *◆|वा|ढ|दि|व|स|अ|भि|ष्ठ|चिं|त|न|◆* 👤 अनु देशमुख सरदार, साहित्यिक, ठाणे👤 कबीरदास गंगासागरे, माध्यमिक शिक्षक, धर्माबाद👤 दीपश्री वाणी, शिक्षिका, पुणे👤 योगेश रघुनाथ वाघ, नांदगाव👤 नवीन रेड्डी अरकलवार, धर्माबाद👤 जी. राजशेखर, नवीपेट, तेलंगणा*ઉदंड_आયુષ્યાच्या अનંત_શુभेच्छा*[ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा एक दिवस अगोदर 9423625769 येथे पोस्ट करावे. ]••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• ••• 💡 ‼ *मनाचे श्लोक*‼ 💡•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••देहेदंडणेचे महादु:ख आहे। महादु:ख तें नाम घेता न राहे॥ सदाशीव चिंतीतसे देवदेवा। प्रभाते मनीं राम चिंतीत जावा॥७३॥।। जय जय रघुवीर समर्थ ।।••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🕊🌎 ‼ *विचारधारा*‼🕊🌎••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••खरे योगदान हे एकाचे असते पण,नाव मात्र नेहमी दुसऱ्याचेच होते. जसे, तेल आणि वात दोघेही जळत असतात पण,आपण दिवा जळत आहे असेच म्हणतो. समाजात सुद्धा असे काही लोक असतात की, इतरांसाठी नि:स्वार्थ भावनेने, प्रामाणिकपणे ,कोणतीही अपेक्षा मनात न ठेवता, सत्याच्या वाटेवर चालत जगत असतात पण, त्यांचा मात्र आपणाला विसर पडत असते. म्हणून जीवन जगत असताना खरे सत्य काय आहे याकडे एकदा तरी काळजीपूर्वक लक्ष द्यावे.🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷सौ.संगीता संतोष ठलाल मु. कुरखेडा जि. गडचिरोली••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎭 *आजची फ्रेश बोधकथा* 🎭••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••*पर्लचा मित्र*मोती तिसरीच्या वर्गात शिकतो. शाळेत जाताना तो दोन रोट्या सोबत घेऊन जायचा. वाटेत मंदिराबाहेर एक छोटी गाय राहायची. दोन्ही भाकरी तो त्या गाईला खायला द्यायचा.मोती गायीला भाकरी खायला विसरत नाही. कधी-कधी त्याला शाळेला जायला उशीर व्हायचा, तरीही भाकरी खाऊ घातल्याशिवाय सोडत नसे.शाळेत उशीर झाल्यामुळे मॅडम मला शिव्या द्यायची.ती गाय खूप गोड होती, मोतीला पाहून खूप आनंद झाला असता.मोतीही त्याला स्वतःच्या हाताने भाकरी खायला घालत असे.दोघे खूप चांगले मित्र बनले.एकदा मोती बाजारातून सामान घेऊन परतत होता.काही मुलांनी त्याला मंदिराबाहेर पकडले.मोतीकडून वस्तू हिसकावून घेण्यास सुरुवात केली. मोतीला अडचणीत पाहून गाय तिला वाचवण्यासाठी धावली. गाय त्यांच्याकडे येताना पाहून सर्व मुलं नऊ-दोन-अकरा झाली.मोतीने गायीला मिठी मारली, तिला वाचवल्याबद्दल धन्यवाद.नैतिक – सखोल मैत्री नेहमीच आनंददायी असते.माणसाने नि:स्वार्थीपणे मैत्री केली पाहिजे. संकटात मित्र कामी येतो.•••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••या पोस्ट विषयी आपल्या सूचना, निवेदन, अभिप्राय, बातम्या, वाढदिवस, माहिती किंवा शंका 9423625769 येथे कळवावे. •••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••~~~~~~~~~~~~~~~~~~~*🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢*📱 9423625769~~~~~~~~~~~~~~~~~~~*🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏*पुन्हा भेटू या फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार ~~~~~~~~~~~~~~~~~~~
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment