✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट~~~~~~~~~~~~~~~~~~~ 9️⃣ 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 9️⃣ ( फ्रेश शालेय परिपाठ )🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00 ( रविवार आणि सुट्टी वगळून )~~~~~~~~~~~~~~~~~~~🎇 दिनांक :- 15 सप्टेंबर 2023💠 वार - शुक्रवार🌷🌐 . *दिनविशेष . 🌐* 🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••*_भारतीय अभियंता दिन_**_आंतरराष्ट्रीय लोकशाही दिन_*••••••••••••••••••••••••••••••••• *_ या वर्षातील २५८ वा दिवस आहे_* •••••••••••••••••••••••••••••••• *_महत्त्वाच्या घटना:_* •••••••••••••••••••••••••••••••• *२००८:लेहमन ब्रदर्स या वित्तीय संस्थेने दिवाळे काढले. अमेरिकेच्या इतिहासातील ही सर्वात मोठी दिवाळखोरी आहे.**२०००:ऑस्ट्रेलियातील सिडनी येथे २७ व्या ऑलिम्पिक स्पर्धांना सुरुवात झाली.**१९५९:प्रायोगिक तत्त्वावर दिल्ली दूरदर्शनचे प्रसारण सुरू झाले. ही भारतातील पहिली दूरदर्शन सेवा होती.**१९५९:निकिता क्रुस्चेव्ह हे अमेरिकेला भेट देणारे पहिले रशियन नेते बनले.**१९५३:श्रीमती विजयालक्ष्मी पंडित यांची संयुक्त राष्ट्रसंघाच्या पहिल्या महिला अध्यक्ष म्हणून निवड**१९४८:भारतीय सैन्याने निजामाच्या वर्चस्वातून औरंगाबाद शहर मुक्त केले. नागरिकांकडून भारतीय सैन्याचे उत्साहात स्वागत**१९३५:जर्मनीने देशातील ज्यू लोकांचे नागरिकत्व रद्द केले.**१९३५:भारताचे पहिले पब्लिक स्कूल ’द डून स्कूल’ (The Doon School) सुरू झाले.**१९१६:पहिले महायुद्ध - लढाईत पहिल्यांदाच रणगाड्यांचा वापर सॉमच्या युद्धात केला गेला**१८३५:चार्ल्स डार्विन एच.एम.एस. बीगल या जहाजातून गॅलापागोस द्वीपांत पोचला.**१८२१:कोस्टारिका, ग्वाटेमाला, होंडूरास, निकाराग्वा आणि अल सॅल्व्हाडोर या देशांचा स्वातंत्र्यदिन**१८१२:नेपोलियन बोनापार्टच्या नेतृत्त्वाखाली फ्रेंच सैन्य मॉस्कोमधील क्रेमलिनला येऊन थडकले.* *_जन्मदिवस / जयंती / वाढदिवस_* ••••••••••••••••••••••••••••••••••••••*१९८०: संजीवनी सुनील पाटील- लेखिका* *१९७९: छाया तानबाजी बोरकर-- कवयित्री**१९७८:गायत्री प्रकाश शेंडे -- कवयित्री* *१९७८:प्रांजली प्रवीण काळबेंडे -- कवयित्री**१९७३:दीपा मंडलिक -- लेखिका* *१९६१:नितीन केळकर --संशोधक,लेखक, निवेदक,कवी*१९४७:डॉ.हंसराज दादारावजी वैद्य-- लेखक, सामाजिक चळवळीत महत्वपूर्ण योगदान* *१९४६:भाऊसाहेब गावंडे-- लेखक, शिक्षणतज्ज्ञ,निवृत्त शिक्षण सहसंचालक* *१९४६:माईक प्रॉक्टर – दक्षिण अफ्रिकेचे क्रिकेटपटू, प्रशिक्षक आणि पंच**१९४३:उषा सावंत - कवयित्री* *१९३९:सुब्रम्हण्यम स्वामी – अर्थतज्ञ, शिक्षणतज्ञ, माजी योजना आयोगाचे सदस्य**१९३५:मोरेश्वर सदाशिव गोसावी-- शिक्षणतज्ज्ञ, लेखक**१९३५:दगडू मारुती तथा ’दया’ पवार – ’बलुतं’कार सुप्रसिद्ध साहित्यिक (मृत्यू: २० डिसेंबर १९९६)**१९३४:पद्माकर सोनुसेठ शिरवाडकर-- प्रसिद्ध मराठी साहित्यिक* *१९३०:मधुकर जोशी --ज्ञानोबा-तुकाराम पुरस्कार प्राप्त ज्येष्ठ कवी,मराठी चित्रपटांसाठी गीतलेखन(मृत्यू:२१ एप्रिल २०२०)**१९२१:कृष्णचंद्र मोरेश्वर तथा दाजी भाटवडेकर – अभिनेते (मृत्यू: २६ डिसेंबर २००६)**१९२०:तारा वसंत पंडित- लेखिका* *१९१७:प्रा.भगवंत प्रल्हाद मोहरील-- लेखक* *१९१७: सरोजिनी मधुसूदन शारंगपाणी- लेखिका (मृत्यू:१३ नोव्हेंबर २००१)**१९०९:रत्नाप्पा कुंभार – स्वातंत्र्यसैनिक, सहकारी चळवळीतील अग्रणी नेते,पद्मश्री (१९८५),भारतीय राज्यघटना समितीचे सदस्य (मृत्यू:२३ डिसेंबर १९९८)**१९०९:सी.एन.अण्णादुराई – तामिळनाडूचे माजी मुख्यमंत्री(मृत्यू:३ फेब्रुवारी १९६९)**१९०५:राजकुमार वर्मा – नाटककार, समीक्षक व छायावाद परंपरेतील हिन्दी कवी, पद्मभूषण (१९६३) (मृत्यू: ५ आक्टोबर १९९०)**१८९०:अॅगाथा ख्रिस्ती – इंग्लिश रहस्यकथालेखिका, पहिल्या महायुद्धाच्या काळात त्या रेडक्रॉस इस्पितळात काम करत होत्या. त्यावेळेस त्यांनी ’मिस्टिरियस अफेअर्स अँड स्टाइल्स’ ही पहिली रहस्यकथा लिहिली. (मृत्यू: १२ जानेवारी १९७६)**१८७६:शरदचंद्र चट्टोपाध्याय – बंगाली साहित्यिक, त्यांच्या ‘पथेर दाबी' या कादंबरीतील क्रांतिकारक विचारांनी ब्रिटिश राज्यकर्त्यांतही खळबळ उडवून दिली होती. पु.बा. कुलकर्णी यांनी त्या कादंबरीचे 'भारती’ या नावाने मराठीत भाषांतर केले आहे. (मृत्यू: १६ जानेवारी १९३८)**१८७२:विनायक जनार्दन करंदीकर ऊर्फ कवी विनायक--आधुनिक ऐतिहासिक व राष्ट्रीय कवितेचे जनक मानले गेलेले मराठी कवी (मृत्यू:३० मार्च १९०९)* *१८६०:भारतरत्न सर मोक्षगुंडम विश्वेश्वरय्या – अभियंते, विद्वान,मुत्सद्दी आणि मैसूर संस्थानचे दिवाण, त्यांच्या सन्मानार्थ त्यांचा जन्मदिन हा 'भारतीय अभियंता दिन' म्हणून पाळण्यात येतो.(मृत्यू: १४ एप्रिल १९६२)* *_मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन_* •••••••••••••••••••••••••••••••••••••• *२००८:गंगाधर गाडगीळ – साहित्यिक, समीक्षक व अर्थतज्ञ, ५६ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष (जन्म:२५ ऑगस्ट १९२३)**२०१२:के.एस.सुदर्शन – प्रखर राष्ट्रवादी व राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे ५ वे सरसंघचालक (जन्म:१८ जून १९३१)**१९९८:–विश्वनाथ लवंदे-- गोवा मुक्तीसंग्रामातील स्वातंत्र्यसैनिक आणि अखिल भारतीय स्वातंत्र्यसैनिक संघटनेचे कार्यकारी अध्यक्ष यांचे मलेरियाच्या आजाराने निधन झाले.(जन्म:२० एप्रिल १९२३)*~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~*_दिनविशेष या सदरातील सर्व मुद्दे हे संग्रहात्मक आहेत तेव्हा त्यात चूका नसतीलच असे सांगता येणार नाही_* ✍ *_संकलन_* ✍ *श्रीराम चव्हाण माजी शिक्षणाधिकारी नागपूर*••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *✈ 🚀 गुगलयान ✈ 🚀*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••*आगमन बाप्पाची - माहिती गणरायाची*अष्टविनायक म्हणजे महाराष्ट्रातील आठ मानाची व प्रतिष्ठेची गणपतीची देवळे आहेत. पश्चिम महाराष्ट्र व कोकणात असलेल्या ह्या देवळांना स्वतंत्र इतिहास आहे. या सर्व देवळांना पेशव्यांचा आश्रय असल्यामुळे त्यांना पेशवाईच्या काळात महत्त्व प्राप्त झाले. मुद्गल पुराणातही अष्टविनायकांचे वर्णन आढळते. महाराष्ट्रातील या विशिष्ट ‘आठ’ ठिकाणच्या गणेश मंदिरांना, मूर्तींना खास महत्त्व आहे. या आठ मंदिरांस मिळून ‘अष्टविनायक’ म्हटले जाते. अष्टविनायकांची मंदिरे (स्थळे) महाराष्ट्रातच नव्हे, तर संपूर्ण भारतात प्रसिद्ध आहेत. गणपती ही विद्येची देवता असून तो, सुखकर्ता, दुःखहर्ता आणि रक्षणकर्ता आहे अशी गणेश भक्तांची भावना आहे.श्री गणेशाच्या अनेक प्रतिमा (मूर्ती) तयार केल्या गेल्या परंतु दगडावर कोरीवकाम करून निर्माण केलेल्या प्राचीन मूर्तींचा शोध ज्या ठिकाणी लागला, तसेच जेथे ‘स्वयंभू’ प्राचीनतम मूर्ती सापडल्या अशा स्थळांना विशेष महत्त्व प्राप्त झाले. याच मंदिरांना अष्टविनायकांची मंदिरे समजले जाते. महाराष्ट्रातील असंख्य भाविक अष्टविनायकाची यात्रा करतात. अष्टविनायकाची सर्व मंदिरे ही अंतराच्या दृष्टीने परस्परांच्या जवळ आहेत. साधारणपणे दीड ते दोन दिवसांत ही अष्टविनायक यात्रा पूर्ण होऊ शकते. पुणे जिल्ह्यात पाच (मोरगाव, थेऊर, रांजणगाव, ओझर, लेण्याद्री), रायगड जिल्ह्यात दोन (महाड, पाली) व अहमदनगर जिल्ह्यात एक (सिद्धटेक) या ठिकाणी ‘अष्टविनायक स्थाने’ आहेत. या गणपतींपैकी महाड, सिद्धटेक व रांजणगावचा गणपती हे उजव्या सोंडेचे आहेत. बाकीचे डाव्या सोंडेचे. या सर्व गणपतींची सविस्तर माहिती क्रमशः वाचू या *उद्या - मोरगावचा मयुरेश्वर*संकलन~~~~~~~~~~~~~~~~~~~ 🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••1⃣ *अखेर 17व्या दिवशी मनोज जरांगेंचं उपोषण मागे; मुख्यमंत्र्यांच्या हस्ते ज्यूस घेऊन सोडलं उपोषण*•••••••••••••••••••••••••••••••••••••2⃣ *मराठा समाजाला आरक्षण मिळेपर्यंत स्वस्थ बसणार नाही : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे*•••••••••••••••••••••••••••••••••••••3⃣ *मुंबईत खासगी विमान कोसळलं, लॅंडिंग करताना दोन तुकडे; तीन प्रवासी जखमी झाल्याची माहिती*•••••••••••••••••••••••••••••••••••••4⃣ *कागदपत्रांची झंझट संपली, आधार ते अडमिशनपर्यंतच्या सर्व सरकारी कामांसाठी आता जन्माचा दाखला पुरेसा*•••••••••••••••••••••••••••••••••••••5⃣ *केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचा औरंगाबाद दौरा रद्द, वेळेचं नियोजन होत नसल्याने घेतला निर्णय*•••••••••••••••••••••••••••••••••••••6⃣ *आशियाई क्रीडा स्पर्धेसाठी भारतीय पुरुष फुटबॉल संघाची घोषणा, सुनील छेत्री 23 वर्षांखालील संघासोबत जाणार, झिंगान आणि गोलकीपर गुरप्रितला स्थान नाही*•••••••••••••••••••••••••••••••••••••7⃣ *कोलंबो : शेवटच्या बॉलपर्यंत रंगलेल्या सामन्यात श्रीलंकेने पाकिस्तानवर 2 विकेट्सने मिळवला विजय*•••••••••••••••••••••••••••••••••••••*📷 वृत्त संकलक - कुणाल पवारे 📹*📱9960358300•••••••••••••••••••••••••••••••••••••ही पोस्ट नियमित मिळविण्यासाठी आणि या समुहात add होण्यासाठी 9423625769 येथे संपर्क करावे.••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• 🌷🍃 *विशेष माहिती* 🌷🍃••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••📕 *"कार्बन मोनॉक्साइडचे" काय दुष्परिणाम होतात ?* 📕कार्बन मोनॉक्साइड हा रंगहीन, गंधहीन वायू आहे. या वायूचे अस्तित्व आपल्या पंचज्ञानेंद्रियांच्या सहाय्याने आपल्याला जाणवू शकत नाही. कार्बन आणि सेंद्रिय पदार्थाच्या अर्धवट ज्वलनानंतर हा वायू तयार होतो. जुनाट, वापरात नसलेल्या विहिरी, घर जळताना, डायनॅमाईटचा स्फोट झाल्यानंतर अशा विविध ठिकाणी हा वायू तयार होतो. पाश्चिमात्य देशांत घरोघरी वापरल्या जाणाऱ्या 'कोलगेंस'मध्ये कार्बन मोनॉक्साइडचे प्रमाण ७ ते १५ टक्के इतके असते. अशा वायूमुळे २ ते ५ मिनिटांत मृत्यू ओढवू शकतो.कार्बन मोनॉक्साइड रक्तातील हिमोग्लोबीनशी संयोग पावतो व कार्बोक्सीहिमोग्लोबीन तयार होते. साहजिकच त्यामुळे शरीराला प्राणवायूचा पुरेसा पुरवठा होत नाही. प्राणवायूच्या अभावामुळे रक्तवाहिन्यांची आवरणे दुबळी होतात, हृदयाला प्राणवायू न मिळाल्यामुळे त्याच्या कार्यक्षमतेतही घट होते. हिमोग्लोबीनला या वायूचे खूप आकर्षण असते. किती हिमोग्लोबीन प्राणवायू वाहण्यासाठी निकामी झाले आहे, यावर कोणती लक्षणे दिसून येतील हे अवलंबून असते. या लक्षणांमध्ये दम लागणे, डोकेदुखी, थकवा, घाम येणे, कानात आवाज येणे, चक्कर, मळमळ, उलटी, भ्रम, दृष्टी क्षीण होणे, छातीत धडधड होणे, झटके येणे, कोमा इत्यादींचा समावेश होतो. श्वसन बंद पडल्याने मृत्यू ओढवतो.आपल्याकडे या वायूची विषबाधा अपघातानेच पाहायला मिळते. परंतु पाश्चिमात्य देशात मात्र या वायूमुळे खूप आत्महत्या होतात.उपचारात प्रथमतः रुग्णाला वायूचा प्रादूर्भाव असलेल्या ठिकाणापासून दूर न्यावे. या वायूचे प्रमाण कमी झाल्यावर रुग्ण परत पूर्वपदावर येतो. ५ ते ६ तासात रक्तातील सर्व कार्बन मोनॉक्साइड बाहेर पडतो. गंभीर रुग्णांमध्ये रक्त द्यावे लागते. मेंदूवर वायूचा झालेला परिणाम जर कायमस्वरूपी नसेल, तर रुग्ण पुन: पूर्ववत होऊ शकतो.डॉ. अंजली दिक्षित व डॉ. जगन्नाथ दिक्षित यांच्या पुस्तकातुन*संकलन:- श्याम ठाणेदार, पुणे*••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• 🌹 *" फ्रेश सुविचार "* 🌹••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••खोटे बोलणे हि भित्रेपणाची खूण आहे.*संकलन :- प्रमिलाताई सेनकुडे**ता. हदगाव जि. नांदेड*📱9403046894••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• ❓ *आजची प्रश्नमंजुषा* ❓••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••१) बुद्धिबळ वर्ल्डकपच्या अंतिम सामन्यात भारताचा आर. प्रज्ञानंद कोणाविरुद्ध खेळला ?२) एकदिवसीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक वेळा ३५० हून अधिक धावसंख्या उभारण्याचा पराक्रम कोणत्या संघाने केला आहे ?३) व्हॉलीबॉल खेळात विशेष खेळाडूस काय म्हणतात ?४) धावणे शर्यतीच्या मैदानास काय म्हणतात ?५) डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी कशाला पाठिंबा देण्यासाठी शेतकऱ्यांचा मुंबई विधिमंडळावर मोर्चा काढला ? *उत्तरे :-* १) मॅग्नस कार्लसन २) भारत ( ३४ वेळा ) ३) लिबरो ४) ट्रॅक ५) खोती विधेयक*संकलन :- जैपाल भै. ठाकूर*जि.प.व.प्राथ.शाळा भोसा, ता. आमगाव, जि. गोंदिया 📱9765943144••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎂 *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *◆|वा|ढ|दि|व|स|अ|भि|ष्ठ|चिं|त|न|◆* 👤 डॉ. हंसराज वैद्य, नांदेड👤 श्रीनाथ संतोष येवतीकर, येवती👤 शीतल वाघमारे👤 विजय भाऊ धडेकर👤 मनोज साळवे👤 माधव पांगरीकर👤 अभिमन्यू चव्हाण, चिरली, बिलोली👤 राजेंद्र होले👤 एकनाथ जिंकले*ઉदंड_आયુષ્યાच्या अનંત_શુभेच्छा*[ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा एक दिवस अगोदर 9423625769 येथे पोस्ट करावे. ]••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• ••• 💡 ‼ *मनाचे श्लोक*‼ 💡•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••समस्तामधे सार साचार आहे। कळेना तरी सर्व शोधुन पाहे॥ जिवा संशयो वाउगा तो त्यजावा। प्रभाते मनी राम चिंतीत जावा॥७५॥।। जय जय रघुवीर समर्थ ।।••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🕊🌎 ‼ *विचारधारा*‼🕊🌎••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••आपले खरे हिरो कोण आहेत ? त्यांना ओळखता आले पाहिजे. कारण खरे हिरो स्वतःचा कधीच विचार करत नाही, आपल्या जीवनाची पर्वा न करता सर्वासाठी लढत असतात त्याचप्रमाणे जगाला पोसत असतात त्यांना क्षणभरासाठी सुद्धा विसरू नये. कारण आज ते लढत आहेत, पोसत आहेत म्हणून आपण सुखाने दोन घास खात आहोत एवढे तरी ध्यानात असू द्यावे. 🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷सौ.संगीता संतोष ठलाल मु. कुरखेडा जि. गडचिरोली••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎭 *आजची फ्रेश बोधकथा* 🎭••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••*राजूची बुद्धी*जतनपूरमध्ये लोक आजारी पडत होते . डॉक्टरांनी माशीला आजाराचे कारण सांगितले. जतनपूरजवळ एक डस्टबिन आहे. त्यावर अनेक माश्या आहेत. ती सर्व घरांमध्ये उडून जायची, तिथे ठेवलेले अन्न घाण करायची. ते अन्न खाऊन लोक आजारी पडत होते. राजू इयत्ता दुसरीत शिकतो. त्याच्या मॅडमने माश्यांद्वारे पसरणाऱ्या आजाराविषयी सांगितले. राजूने माश्या पळवायचे ठरवले. घरी आल्यानंतर त्याने आईला माशींबाबत सांगितले. ती आमचे अन्न घाण करते. घरात आल्यानंतर घाण पसरते. घरातून हाकलले पाहिजे. राजूने बाजारातून फिनाईल आणले. त्याच्या पाण्याने घर स्वच्छ केले. स्वयंपाकघरातील अन्न झाकून ठेवले. त्यामुळे माशांना अन्न मिळू शकले नाही. दोन दिवसात माश्या घराबाहेर पडल्या. पुन्हा घरात आले नाही.नैतिक – सतर्क राहून मोठे आजार टाळता येतात.•••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••या पोस्ट विषयी आपल्या सूचना, निवेदन, अभिप्राय, बातम्या, वाढदिवस, माहिती किंवा शंका 9423625769 येथे कळवावे. •••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••~~~~~~~~~~~~~~~~~~~*🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢*📱 9423625769~~~~~~~~~~~~~~~~~~~*🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏*पुन्हा भेटू या फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार ~~~~~~~~~~~~~~~~~~~
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment