✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट~~~~~~~~~~~~~~~~~~~ 9️⃣ 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 9️⃣ ( फ्रेश शालेय परिपाठ )🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00 ( रविवार आणि सुट्टी वगळून )~~~~~~~~~~~~~~~~~~~🎇 दिनांक :- 25 सप्टेंबर 2023💠 वार - सोमवार🌷🌐 . *दिनविशेष . 🌐* 🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *_ या वर्षातील २६८ वा दिवस आहे_* •••••••••••••••••••••••••••••••• *_महत्त्वाच्या घटना:_* •••••••••••••••••••••••••••••••• *१९४१:’प्रभात’चा ’संत सखू’ हा चित्रपट पुणे व मुंबई या दोन्ही ठिकाणी प्रदर्शित झाला.**१९२९:डॉ. जेम्स डूलिटिल यांनी संपूर्णपणे उपकरणांच्या साहाय्याने (blind) विमानाचे उड्डाण,प्रवास व लँडींग केले.**१९१९:रयत शिक्षण संस्थेची स्थापना झाली.**१९१५:पहिले महायुद्ध – शॅम्पेनची दुसरी लढाई सुरू* *_जन्मदिवस / जयंती / वाढदिवस:_* •••••••••••••••••••••••••••••••••••••• *१९७२:राहुल शर्मा-- भारतीय संगीत दिग्दर्शक आणि भारतीय शास्त्रीय संतूर वादक**१९६९:हॅन्सी क्रोनिए – दक्षिण अफ्रिकेचा क्रिकेट कप्तान (मृत्यू:१ जून २००२)**१९६९:प्रा डॉ.संजय पांडुरंग नगरकर-- मराठी साहित्यिक**१९६८:मंगला शिरीष रामपुरे-- कवयित्री* *१९६६:केदार कृष्णाजी गाडगीळ-- लेखक* *१९६१:सरोज संजय अंदनकर-- प्रसिद्ध कवयित्री,लेखिका* *१९६०:अमिता खोपकर-- मराठी भाषेतील रंगमंच,चित्रपट आणि टेलिव्हिजनशी संबंधित असलेली एक भारतीय अभिनेत्री**१९५७:उज्ज्वला सदानंद अंधारे -- प्रसिद्ध कवयित्री, लेखिका* *१९५३:सुरेंद्रपाल सिंग -- भारतीय चित्रपट आणि टेलिव्हिजन पात्र अभिनेता**१९४६:सुभाष सुठणकर -- प्रसिद्ध विनोदी कथालेखक**१९४६:बिशन सिंग बेदी – भारतीय फिरकी गोलंदाज**१९३९:फिरोज खान-- भारतीय अभिनेता, चित्रपट संपादक,निर्माता आणि दिग्दर्शक(मृत्यू:२७ एप्रिल २००९)* *१९३१:बिंदुमाधव जोशी-- अखिल भारतीय ग्राहक पंचायत संघटनेचे संस्थापक (मृत्यू:१० मे २०१५)**१९२८:माधव गडकरी –पत्रकार (मृत्यू:१ जून २००६)**१९२६:बाळकृष्ण हरी तथा ’बाळ’ कोल्हटकर – नाटककार,कवी,अभिनेते,निर्माते,लेखक व दिग्दर्शक (मृत्यू:३० जून १९९४)**१९२५:रघुनाथ विनायक हेरवाडकर – बखर वाङमयकार(मृत्यू:२० जुलै १९९४)* *१९२२:बॅ.नाथ पै – स्वातंत्र्य सैनिक व घटनातज्ञ (मृत्यू:१७ जानेवारी १९७१)**१९२०:सतीश धवन – इस्रोचे अध्यक्ष (मृत्यू:३ जानेवारी २००२)**१९१६:पण्डित दीनदयाळ उपाध्याय – तत्त्वज्ञ,अर्थतज्ञ,समाजशास्त्री,इतिहासकार, पत्रकार,राजकीय नेते आणि जनसंघाचे एक संस्थापक (मृत्यू:११ फेब्रुवारी १९६८)**१९१५:रघुनाथ विनायक हेरवाडकर--बखर वाङ्मयाचे अभ्यासक**१९०८:नरहर शेषराव पोहनेरकर--कवी, कथाकार,कादंबरीकार,संशोधक(मृत्यू:२ सप्टेंबर १९९०)* *१८९९:नरहर गंगाधर आपटे --ग्रामकोशकार, ग्रामोदार चळवळीचे पुरस्कर्ते,लेखक**१८८१:गोपाळ गंगाधर लिमये-- मराठी कथाकार आणि विनोदकार. ‘ कॅ.गो.गं.लिमये’ ह्या नावाने लेखन.(मृत्यू:१८ नोव्हेंबर १९७१)**१८६४:गोपाळ नारायण अक्षीकर--सामाजिक कार्यकर्ते,संस्थापक(मृत्यू:१६ मार्च १९१७)* *_मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन:_* •••••••••••••••••••••••••••••••••••••• *२०२०:एस.पी. बालसुब्रमण्यम तमिळ, तेलुगु, कानडी,मल्याळम आणि हिंदी चित्रपटसृष्टीतील पार्श्वगायक कोविड मुळे निधन(जन्म:४ जून १९४६)**२०१७:अरुण साधू-- लेखक, पत्रकार तसेच आंतरराष्ट्रीय सामाजिक निरीक्षक व समीक्षक,ऐंशीव्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष (जन्म:१७ जून १९४१)**२०१३:शं.ना.नवरे – लेखक (जन्म:२१ नोव्हेंबर १९२७)**२००४:अरुण बाळकृष्ण कोलटकर – मराठी व इंग्रजी कवी (जन्म:१ नोव्हेंबर १९३२)**१९९८:कमलाकर सारंग – रंगकर्मी,निर्माते, दिग्दर्शक व लेखक (जन्म:२९ जून १९३४)**१९२७:कृष्णाजी केशव गोखले--कथाकार, कादंबरीकार(जन्म:१८८६)*~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~ *_दिनविशेष या सदरातील सर्व मुद्दे हे संग्रहात्मक आहेत तेव्हा त्यात चूका नसतीलच असे सांगता येणार नाही_* *✍ संकलन ✍* *श्रीराम चव्हाण माजी शिक्षणाधिकारी,नागपूर*मोबाईल:9822695372 ईमेल: chavhansk65@gmail.com••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *✈ 🚀 गुगलयान ✈ 🚀*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••*आगमन बाप्पाची ; माहिती गणरायाची*...महाडचा वरद विनायक ...महाडचा वरदविनायक हा अष्टविनायकांपैकी सातवा गणपती आहे. हे स्वयंभू स्थान असून त्याला मठ असेही म्हणतात. श्री वरदविनायकाचे मंदिर साधे, कौलारू असून मंदिराला घुमट आहे व त्याला सोनेरी कळस आहे. कळसावर नागाची नक्षी आहे. या देवळाच्या चारही बाजूस चार हत्तींच्या मूर्ती आहेत. ८ फूट बाय ८ फूट असलेल्या या देवळाला २५ फूट उंचीचा कळस आहे. कळसाचा सर्वात वरचा भाग हा सोन्याचा आहे. पूर्वाभिमुख असलेल्या या मूर्तीच्या शेजारी सतत दिवा पेटवलेला असतो, असे म्हणतात की हा दिवा १८९२ पासून पेटता आहे.फार प्राचीन काळी भीम नावाचा एक शूर व दानी राजा होऊन गेला. त्याला मूलबाळ नसल्याने तो दुःखी होता. तेव्हा तो आपल्या राणीसह अरण्यात गेला. त्याचे दुःख जाणून विश्वामित्र ऋषींनी त्याला एकाक्षर मंत्राचा जप दिला. मग राजाने उग्र तपश्चर्या सुरू केली. त्यामुळे विनायक त्याच्यावर प्रसन्न झाला. ''तुला लवकरच पुत्रप्राप्ती होईल'' असा त्याने राजाला वर दिला.काही दिवसांनी राजाला एक पुत्र झाला. त्याचे नाव रुक्मांगद. रुक्मांगद मोठा झाल्यावर राजाने सारा राज्यकारभार त्याच्यावर सोपविला व त्यालाही एकाक्षर मंत्राचा जप करण्यास सांगितले.एकदा रुक्मांगद शिकारीसाठी वनात भटकत असता तो वाचक्नवी ऋषींच्या आश्रमात गेला. त्या ऋषीच्या पत्नीचे नाव होते मुकुंदा. रुक्मांगदाला पाणी देताना मुकुंदा त्याच्यावर अनुरुक्त झाली, पण रुक्मांगदाने तिची इच्छा पूर्ण केली नाही. त्यामुळे कामविव्हल झालेल्या मुकुंदेने 'तू कुष्ठरोगी होशील' असा रुक्मांगदाला शाप दिला.शाप मिळता क्षणीच सुवर्णाप्रमाणे कांती असलेले रुक्मांगदाचे शरीर कुष्ठरोगाने विद्रूप झाले. त्यामुळे दुःखी झालेला रुक्मांगद अरण्यात भटकत असता त्याला नारदमुनी भेटले. त्यांच्या आदेशानुसार रुक्मांगदाने कदंब नगरातील कदंब तीर्थात स्नान केले व तेथील चिंतामणी गणेशाची आराधना केली. त्यामुळे रुक्मांगद रोगमुक्त झाला.इकडे त्या मुकुंदेची अवस्था लक्षात घेऊन इंद्राने रुक्मांगदाचे रूप घेतले व मुकुंदेची इच्छा पूर्ण केली. त्याच्यापासून मुकुंदेला पुत्र झाला. त्याचे नाव गृत्समद. हाच तो ऋग्वेदातील प्रसिद्ध मंत्रदृष्टा व द्वितीय मंडळाचा करता. गृत्समदाच्या जन्माची कथा सर्वांना माहित झाली होती. त्यामुळे त्याचा पदोपदी पाणउतारा होऊ लागला. मातेच्या पापाचरणामुळे सर्वजण गृत्समदाला हीन लेखू लागले. तेव्हा गृत्समदाने आईकडून सत्य जाणून घेतले व तिला शाप दिला. मग तो पापक्षालनार्थ पुष्पक (भद्रक) वनात तप करू लागला. त्याने विनायकाची आराधना केली. त्यामुळे विनायक प्रसन्न झाला. विनायकाने त्याला वर मागण्यास सांगितले. तेव्हा तो म्हणाला, ''तू याच वनात वास्तव्य करून भक्तांच्या इच्छा पूर्ण कर.'' विनायकाने ते मान्य केले व त्या वनात राहू लागला. ते पुष्पक किंवा भद्रक वन म्हणजेच आजचे महाड क्षेत्र. या ठिकाणी गृत्समदाला वर मिळाला म्हणून येथील विनायकाला 'वरद विनायक' म्हणतात. गृत्समद हा गाणपत्य संप्रदायाचा आद्य प्रवर्तक समजला जातो. पुरातन काळात महडचे नांव मणिपूर वा मणिभद्र होते.या मंदिरासंदर्भात एक कथा प्रसिद्ध आहे. एका भक्ताला स्वप्नात देवळाच्या मागील तळ्यात पाण्यात पडलेली मूर्ती दिसली. त्याप्रमाणे त्या व्यक्तीने शोध घेतला व मूर्ती मिळाली. तीच या मंदिरातील प्रतिष्ठापना केलेली मूर्ती होय. मंदिरात दगडी महिरप असून गणेशाची मूर्ती सिंहासनारूढ आहे व डाव्या सोंडेची आहे. इ. स. १७२५ मध्ये पेशवे काळात हे मंदिर बांधले गेले. रायगड जिल्ह्यातील महड हे पुणे – मुंबई राष्ट्रीय महामार्गावर खोपोली – खालापूरच्या दरम्यान आहे.पुढील भागात - पालीचा बल्लाळेश्वरसंकलन~~~~~~~~~~~~~~~~~~~ 🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••1⃣ *2047 पर्यंत भारताचा चेहरा-मोहरा बदलणार, मध्यमवर्गीय लोकसंख्येत होणार मोठी वाढ, बिझनेस टुडे मासिकाच्या अहवाल*•••••••••••••••••••••••••••••••••••••2⃣ *पंतप्रधान मोदींनी लाँच केल्या 9 वंदे भारत ट्रेन, त्यात राजस्थान, तामिळनाडू, तेलंगणा, आंध्र प्रदेश, कर्नाटक, बिहार, पश्चिम बंगाल, केरळ, ओडिशा, झारखंड आणि गुजरातचा समावेश आहे.*•••••••••••••••••••••••••••••••••••••3⃣ *पद गेलं तरी बेहत्तर आदिवासी आरक्षणाला धक्का लागू देणार नाही; आमदार नरहरी झिरवाळांचा इशारा*•••••••••••••••••••••••••••••••••••••4⃣ *बनावट शिधापत्रिका बनावणाऱ्या तिघांना अटक, ठाणे जिल्ह्यात एटीएसची कारवाई*•••••••••••••••••••••••••••••••••••••5⃣ *गंगापूर धरणातून 3408 क्युसेकने विसर्ग; गोदावरीच्या पाणीपातळीत वाढ, नाशिकसह जिल्ह्यात पावसाची पुन्हा विश्रांती*•••••••••••••••••••••••••••••••••••••6⃣ *नागपुरात पुरामुळे अनेक घरं आणि दुकानांचं नुकसान, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडून नुकसानाची पाहणी*•••••••••••••••••••••••••••••••••••••7⃣ *श्रेयस-गिलची शतके, भारताने ऑस्ट्रेलियाचा 99 धावांनी केला पराभव*•••••••••••••••••••••••••••••••••••••*📷 वृत्त संकलक - कुणाल पवारे 📹*📱9960358300•••••••••••••••••••••••••••••••••••••ही पोस्ट नियमित मिळविण्यासाठी आणि या समुहात add होण्यासाठी 9423625769 येथे संपर्क करावे.••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• 🌷🍃 *विशेष माहिती* 🌷🍃••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••*काही पालेभाज्यांचे औषधी उपयोग*१.] *कोथिंबीर* :- उष्णता कमी करणारी, पित्तनाशक असते. हृदरोगावर अतिशय उपयुक्त आहे.२.] *कढीलिंब* ;- पित्तनाशक व कृमीनाशक म्हणून याचा उपयोग होतो. ३.] *पालक* :- मूत्रसंस्था, पचनसंस्था यांच्या आतील सूजेला मऊपणा आणण्यास उपयुक्त असून दमा व खोकला कमी करणारी आहे. ४.] *माठ* :- हृदयाच्या कार्याला उपयोगी असून ही भाजी खाल्यावर शौचाला साफ होते. ५.] *चाकवत* :- ही पचण्याला सुलभ असून ज्वरनाशक आहे. त्वचेला कांती देणारी अशी ही भाजी आहे. ही भाजी कृमीनाशक असून यकृताच्या सर्व विकारांवर उपयुक्त आहे. ६.] *हादगा* :- खोकला, पित्त, हिवताप कमी करणारी ही भाजी आहे. या भाजीच्या फुलाच्या रसाचे दोन थेंब काही दिवस डोळ्यात घातल्यास रातआंधळेपणा नाहीसा होतो असे म्हणतात. हा फुलांचा रस मधातून घेतल्याने छातीतील कफ लवकर सुटतो. ७.] *अळू* :- याच्या पानांचा व दांड्यांचा रस जंतुनाशक आहे. त्यामुळे शरिराच्या कापलेल्या भागावर याचा रस लावून पट्टी बांधल्यास जखमा लवकर भरून येतात. याचा रस साखरेबरोबर दिवसातून दोन-तीन वेळा घेतल्यास मूळव्याध कमी होते. ८.] *अंबाडी* :- मीरपूड व साखर यांच्याबरोबर अंबाडीचा रस प्राशन केल्यास तो पित्तनाशक ठरतो. ९.] *घोळ* :- मूळव्याध कमी करण्यास ही भाजी उपयुक्त आहे. शिवाय ती खाल्ल्यामुळे लघवीला साफ आणि भरपूर होते. १०.] *टाकळा* :- सर्वांगाला येणारी खाज ही भाजी खाल्याने कमी होते. या भाजीच्या बियांच्या पीठ अशक्तपाणा कमी करण्यास उपयुक्त आहे. संकलन••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• 🌹 *" फ्रेश सुविचार "* 🌹••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••मोठी स्वप्ने पाहणारेच,मोठी स्वप्ने सत्यात उतरवतात.*संकलन :- प्रमिलाताई सेनकुडे**ता. हदगाव जि. नांदेड*📱9403046894••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• ❓ *आजची प्रश्नमंजुषा* ❓••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••१) भारताचा 'मॅक्झिम गार्की' असा गौरव कोणत्या महान साहित्यिकाचा केला जातो ?२) जगात सोशल मीडियावर सर्वात जास्त वेळ कोणत्या देशातील लोक घालवतात ?३) संसदेत महिलांसाठी ३३ टक्के आरक्षण देण्यासाठी लोकसभेने कोणते विधेयक प्रचंड बहुमताने पारित केले ?४) राज्यसभेचा सदस्य होण्यासाठी वयाची किती वर्षे पूर्ण करावी लागतात ?५) नैसर्गिक पदार्थांच्या कुजण्याच्या प्रक्रियेमधून अन्न मिळवणाऱ्या सूक्ष्मजीवांना काय म्हणतात ? *उत्तरे :-* १) अण्णाभाऊ साठे २) फिलिपाईन्स ( ४ तास ६ मिनिटे ) ३) नारीशक्ती वंदन विधेयक ४) ३० वर्षे ५) विघटक ( Decomposers )*संकलन :- जैपाल भै. ठाकूर*जि.प.व.प्राथ.शाळा भोसा, ता. आमगाव, जि. गोंदिया 📱9765943144••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎂 *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *◆|वा|ढ|दि|व|स|अ|भि|ष्ठ|चिं|त|न|◆* 👤 नरसिंग बासरवाड👤 रामकिशन अंगरोड👤 संघरत्न लोखंडे👤 महेंद्रकुमार कुदाळे👤 सय्यद जाफर👤 कमलकिशोर कांबळे👤 शिवशंकर नर्तावार👤 तसनीम पटेल, साहित्यिक, नांदेड👤 योगेश धनेवार👤 सुयश पेटेकर*ઉदंड_आયુષ્યાच्या अનંત_શુभेच्छा*[ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा एक दिवस अगोदर 9423625769 येथे पोस्ट करावे. ]••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• ••• 💡 ‼ *मनाचे श्लोक*‼ 💡•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••विठोने शिरी वाहिला देवराणा। तया अंतरी ध्यास रे त्यासि नेणा॥ निवाला स्वये तापसी चंद्रमौळी।जिवा सोडवी राम हा अंतकाळीं॥८४॥।। जय जय रघुवीर समर्थ ।।••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🕊🌎 ‼ *विचारधारा*‼🕊🌎••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••वारंवार कोणाच्या विषयी नको त्या शब्दात बोलून आपला अनमोल वेळ वाया घालविण्यापेक्षा जरा स्वतःकडे बघण्यासाठी थोडा वेळ काढावा. कारण आपण जेव्हा दुसरी कडे बघत असतो किंवा बोलत असतो त्यावेळी आपल्याकडेही बघणाऱ्यांच्या अनेक नजरा असतात. म्हणून दुसऱ्या विषयी बोलताना ताळतंत्र ठेवूनच बोलावे.जर अशीच वेळ निघून गेली तर आपल्या जवळ पाहिजे तेवढा वेळ उरणार नाही म्हणून आपल्याकडे असलेल्या वेळेचा पूर्णपणे फायदा घेऊन चांगले कार्य करून दाखवावे जेणेकरून इतरही त्यातून शिकू शकतील.🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷कु.पिंगला के.मुंगणकरउर्फ सौ.संगीता संतोष ठलालमु. कुरखेडा जि. गडचिरोली••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎭 *आजची फ्रेश बोधकथा* 🎭••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••*दयेचा स्ट्राईक*अब्दुलकडे एक बकरी होती, त्या शेळीला एक लहान पिल्लू होते. अब्दुलने त्या दोघांवर प्रेम केले आणि त्यांच्यासाठी शेतातून मऊ मऊ गवत आणले. दोन्ही शेळ्या गवत खाऊन आनंदी झाल्या. अब्दुलला दुरून पाहून ती लगेच त्याच्याकडे धावत असे. अब्दुल चौथीत शिकत असे. एके दिवशी तो शाळेत गेला होता. त्याच्या आई आणि वडिलांनी बकरीचे पिल्लू सलीमला विकले. सलीम जेव्हा त्या मुलाला घेऊन जाऊ लागला तेव्हा त्याला ती बकरी समजली. हे लोक तिच्या मुलाला घेऊन जात आहेत. शेळी जोरात रडू लागली. त्याच्या डोळ्यातून अश्रूंच्या धारा वाहत होत्या. ती खूप प्रयत्न करत होती, पण तिला दोरीने बांधले होते. सलीम मुलाला घेऊन खूप दूर गेला. मूलही जोरात रडत होतं. तो आईला हाक मारत होता. आईची ममता अश्रूंनी वाहत होती, पण ती असहाय होती. शेळीने शेवटचा विचार केला, जर तिने आता प्रयत्न केले नाहीत तर ती आपल्या मुलाला कधीही भेटू शकणार नाही. असा विचार करून एकदा प्रयत्न केला. शेळीच्या गळ्यातून दोरीचा फास तुटला. ती बकरी जीव घेऊन सलीमकडे धावली. तिचे पिल्लू पाहून शेळीने सलीमवर जोरदार हल्ला केला. सलीमने बराच वेळ धडपड केली, पण शेळीचा हल्ला थांबवता आला नाही. अचानक शेळी अनेक आघात करत राहिली. शेवटी सलीमने हार मानली आणि बकरीचे पिल्लू तिथेच सोडले. अम्मी-अब्बूकडून पैसे घेऊन अब्दुल परतला. अब्दुल परत आल्यावर शेजाऱ्यांनी त्याला सर्व प्रकार सांगितला. यानंतर तो आई-वडिलांवर रागावला. आई-वडिलांनी खूप समजावले पण त्याने कोणाचेच ऐकले नाही. कारण त्याला ज्या बकऱ्या विकायच्या होत्या त्याच्यासाठी त्या शेळ्या अनमोल होत्या.नैतिक - आईच्या करुणेच्या हल्ल्याने मोठ्या शक्तींचा पराभव होतो. आई आपल्या मुलासाठी आपला जीव पणाला लावते.•••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••या पोस्ट विषयी आपल्या सूचना, निवेदन, अभिप्राय, बातम्या, वाढदिवस, माहिती किंवा शंका 9423625769 येथे कळवावे. •••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••~~~~~~~~~~~~~~~~~~~*🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢*📱 9423625769~~~~~~~~~~~~~~~~~~~*🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏*पुन्हा भेटू या फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार ~~~~~~~~~~~~~~~~~~~
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment