✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट~~~~~~~~~~~~~~~~~~~ 9️⃣ 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 9️⃣ ( फ्रेश शालेय परिपाठ )🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00 ( रविवार आणि सुट्टी वगळून )~~~~~~~~~~~~~~~~~~~🎇 दिनांक :- 26 सप्टेंबर 2023💠 वार - मंगळवार🌷🌐 . *दिनविशेष . 🌐* 🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *_ या वर्षातील २६९ वा दिवस आहे_* •••••••••••••••••••••••••••••••• *_महत्त्वाच्या घटना:_* •••••••••••••••••••••••••••••••• *१९९०:रंगनाथ मिश्रा यांनी भारताचे २१ वे सरन्यायाधीश म्हणुन कार्यभार सांभाळला.**१९८४:युनायटेड किंगडमने हाँगकाँगच्या हस्तांतरणास मान्यता दिली.**१९७३:ध्वनीपेक्षा अधिक वेगाने जाणार्या ’काँकॉर्ड’ या विमानाने अटलांटिक महासागर न थांबता विक्रमी वेळात पार केला.**१९६०:फिडेल कॅस्ट्रोने यु.एस.एस.आर.ला पाठिंबा जाहीर केला.**१९५०:इंडोनेशियाचा संयुक्त राष्ट्रात प्रवेश* *_जन्मदिवस / जयंती / वाढदिवस_*•••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••*१९८१:सेरेना विल्यम्स –अमेरिकन लॉन टेनिस खेळाडू**१९७८:समीर धर्माधिकारी-- मराठी चित्रपट अभिनेते**१९७१:प्रा.डॉ.केशव तुपे -- प्रसिद्ध मराठी साहित्यिक तथा सहसंचालक उच्च शिक्षण, अमरावती* *१९६२:एकनाथ बडवाईक--कवी**१९६२:चंकी पांडे -- भारतीय चित्रपट अभिनेता* *१९६१:चंद्रकांत महादेव चितळे--कथाकार, कवी**१९६०:विद्यालंकार विनायक घारपुरे-- लेखक* *१९४८:डॉ.माधवी वैद्य -- प्रसिद्ध मराठी साहित्यिक* *१९४३:इयान चॅपेल –ऑस्ट्रेलियाचा माजी क्रिकेट कप्तान**१९४०:योहाना शाहू गायकवाड-- लेखक* *१९३९:दिवाकर दत्तात्रय गंधे-- मराठी नाट्यसमीक्षक व चित्रपटविषयक लिखाण करणारे लेखक(मृत्यू:१मार्च २०१९)**१९३६: वैजयंती वामन काळे -- प्रसिद्ध कादंबरीकार,कथाकार**१९३२:डॉ.मनमोहन सिंग – भारताचे १३ वे माजी पंतप्रधान,अर्थतज्ञ**१९३१:श्याम त्रिंबक फडके --प्रसिद्ध नाटककार**१९३१:विजय मांजरेकर – क्रिकेटपटू (मृत्यू: १८ आक्टोबर १९८३)**१९२३:देव आनंद – प्रसिद्ध चित्रपट अभिनेता व निर्माता (मृत्यू:३ डिसेंबर २०११)**१९२०:अनंत दामोदर आठवले(स्वामी वरदानंद भारती)--आयुर्वेदतज्ज्ञ, लेखक, ग्रंथकार,कीर्तनकार(मृत्यू:५ सप्टेंबर २००२)**१८९४:आचार्य शंकर दत्तात्रेय जावडेकर – लेखक व गांधीवादी तत्त्वचिंतक (मृत्यू:१० डिसेंबर १९५५)**१८८८:टी.एस. इलियट – अमेरिकेत जन्मलेले ब्रिटिश कवी,नाटककार,टीकाकार आणि नोबेल पारितोषिक विजेते (मृत्यू:४ जानेवारी १९६५)**१८५८:मणिलाल नथुभाई त्रिवेदी – गुजराथी साहित्याच्या पंडितयुगातील एक अष्टपैलू लेखक, आर्यसंस्कृतीचे व शंकराचार्यप्रणित अद्वैत वेदांताचे कडवे पुरस्कर्ते (मृत्यू:१० आक्टोबर १८९८)**१८४९:इव्हान पेट्रोव्हिच पाव्हलॉव्ह – चयापचय प्रक्रियेविषयी महत्त्वाचे संशोधन करणारे नोबेल पारितोषिक विजेते (१९०४) रशियन शास्त्रज्ञ (मृत्यू:२७ फेब्रुवारी १९३६)**१८२०:इश्वरचन्द्र विद्यासागर – बंगाली समाजसुधारक, तत्त्वज्ञ, लेखक, शिक्षणतज्ञ व उद्योजक. यांच्या प्रयत्नांमुळेच १८५६ मधे विधवा विवाहाचा कायदा आला. (मृत्यू:२९ जुलै १८९१)* *_मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन_* •••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••*२०२२:डॉ.रामचंद्र देखणे--लोककला,संत साहित्याचे अभ्यासक आणि ज्येष्ठ भारुडकार(जन्म:१२ एप्रिल १९५६)**२००८:पॉल न्यूमन –अभिनेता,दिग्दर्शक व रेस कार ड्रायव्हर (जन्म:२६ जानेवारी १९२५)**२००२:राम फाटक – गायक व संगीतकार (जन्म:२१ आक्टोबर १९१७)**१९९६:विद्याधर गोखले – नाटककार व संपादक (जन्म:४ जानेवारी १९२४)**१९८९:हेमंतकुमार – गायक,संगीतकार आणि निर्माता (जन्म:१६ जून १९२०)**१९७७:उदय शंकर – जागतिक कीर्तीचे नर्तक व नृत्यदिग्दर्शक, पद्मविभूषण (१९७१), संगीत नाटक अकादमी पुरस्कार (१९६२)(जन्म:८ डिसेंबर १९००)**१९५६:लक्ष्मणराव किर्लोस्कर – किर्लोस्कर उद्योगसमुहाचे संस्थापक(जन्म:२० जून १८६९)**१९०२:लेव्ही स्ट्रॉस – अमेरिकन उद्योजक (जन्म:२६ फेब्रुवारी १८२९)*~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~ *_दिनविशेष या सदरातील सर्व मुद्दे हे संग्रहात्मक आहेत तेव्हा त्यात चूका नसतीलच असे सांगता येणार नाही_* *✍ संकलन ✍* *श्रीराम चव्हाण माजी शिक्षणाधिकारी,नागपूर*मोबाईल:9822695372 ईमेल: chavhansk65@gmail.com••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *✈ 🚀 गुगलयान ✈ 🚀*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••*आगमन बाप्पाची ; माहिती गणरायाची*... पालीचा बल्लाळेश्वर ....पालीचा गणपती हा अष्टविनायकांपैकी आठवा गणपती आहे. या गणपतीला श्री बल्लाळेश्वर म्हणतात. बल्लाळेश्वर गणपतीचे हे स्वयंभू स्थान आहे. मंदिर पूर्वाभिमुख आहे. गणेशाचे कपाळ विशाल असून डोळ्यात हिरे आहेत. मंदिर चिरेबंदी आहे. मंदिरात प्रचंड घंटा असून ती चिमाजी अप्पांनी अर्पण केली आहे.हे स्थान रायगड जिल्ह्यातील सुधागड तालुक्यात असून, सुधागड या भव्य किल्ल्याची पार्श्वभूमी व अंबा नदीच्या निसर्गरम्य सान्निध्यात बल्लाळेश्वराचे मंदिर वसले आहे. पालीपासून जवळच उन्हेरचे गरम पाण्याचे झरे व सरसगड हा प्राचीन किल्ला आहे.शिवाजी महाराज यांनी १६५७ साली कोकणात उतरून सरसगड, सागरगड, सुधागड किल्ले जिंकले असा इतिहास आहे. जवळच्या पाच्छापूर गावी संभाजी राजे आणि औरंगझेबाचा मुलगा अकबर यांची ऐतिहासिक भेट झाली होती.पाली खोपोलीपासून ३८ कि. मी. अंतरावर आहे तर पुण्यापासून १११ कि. मी. अंतरावर आहे. खोपोली - पेण रस्त्यावर पालीस जाण्यास रस्ता फुटतो, तर पनवेल - गोवा या राष्ट्रीय महामार्गावर वाकणपासून पालीस रस्ता जातो.भाद्रपद महिन्यातील चतुर्थीला या आठही ठिकाणी यात्रा भरते. सर्व जाती-धर्माचे लोक या ठिकाणी येऊन श्रद्धापूर्वक दर्शन घेतात. भाद्रपद शुद्ध चतुर्थी ते अनंत चतुर्दशी या काळात श्री गणेशाचा उत्सव सर्वत्र साजरा केला जातो.पुढील भागात - दगडूशेठ हलवाई गणपती, पुणेसंकलन~~~~~~~~~~~~~~~~~~~ 🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••1⃣ *पाकिस्तान आणि चीनला भरणार धडकी, भारतीय वायूदलाचा 'नवा योद्धा'; सी-295 विमान वायू दलात दाखल*•••••••••••••••••••••••••••••••••••••2⃣ *पंकजा मुंडे यांना जीएसटी विभागाचा पुन्हा झटका, वैद्यनाथ सहकारी साखर कारखान्याची 19 कोटींची मालमत्ता जप्त*•••••••••••••••••••••••••••••••••••••3⃣ *कोल्हापूर जिल्ह्यात पर्यावरणपूरक गणेश विसर्जनास उत्स्फूर्त प्रतिसाद; ग्रामीण भागातील जनतेनं सुद्धा करून दाखवलं*•••••••••••••••••••••••••••••••••••••4⃣ *शिवसेनेच्या आमदार अपात्रतेप्रकरणी पुढची सुनावणी 13 ऑक्टोबरला*•••••••••••••••••••••••••••••••••••••5⃣ *राष्ट्रवादीतील संघर्षाबाबत निवडणूक आयोगाचा निर्णय मी तरी मान्य करणार, अजित पवार यांचं महत्त्वाचं वक्तव्य*•••••••••••••••••••••••••••••••••••••6⃣ *क्रिकेटमध्ये भारताच्या लेकींची सुवर्ण कामगिरी, आशियाई क्रीडा स्पर्धेत श्रीलंकेला नमवत गोल्ड मेडल जिंकले*•••••••••••••••••••••••••••••••••••••7⃣ *पैलवानांनो तयारीला लागा, महाराष्ट्र केसरीची तारीख ठरली, 1 ते 7 नोव्हेंबरला पुण्यात शड्डूचा आवाज घुमणार, केंद्रीय गृहमंत्री अमित शाहा यांच्या हस्ते होणार उद्घाटन*•••••••••••••••••••••••••••••••••••••*📷 वृत्त संकलक - कुणाल पवारे 📹*📱9960358300•••••••••••••••••••••••••••••••••••••ही पोस्ट नियमित मिळविण्यासाठी आणि या समुहात add होण्यासाठी 9423625769 येथे संपर्क करावे.••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• 🌷🍃 *विशेष माहिती* 🌷🍃••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••*काही पालेभाज्यांचे औषधी उपयोग पुढीलप्रमाणे आहेत.*११.] *मायाळू* :- अंगावर पित्त उठले असताना याच्या पानांचा रस आंगाला चोळल्यास पित्त कमी ह्प्ते. लहानमुलांना थंडी खोकला झाला असताना मायाळूच्या पानाचा रस चमचाभर देतात. १२.] *तांदुळजा* :- बाळंतीणीला दूध वाढवण्यास ही भाजी उपयोगी ठरते. १३.] *मेथी* :- सारक व पथ्यकर असलेल्या या भाजीमध्ये लोहाचे प्रमाण बरेच आहे. याचे बी वातहारक व शक्तिकारक असते म्हणून बाळंतपणात याचा उपयोग केला जातो. दूधवाढीसाठीही त्याचा उपयोग होतो. मेथ्यांचे पीठ तोंडाला लावल्यास चेहर्यावरील सुरकुत्या नष्ट होतात व चेहरा तजेलदार दिसतो. १४.] *शेपू* ;- वातनाशक व पोटदुखी कमी करणारी अशी ही भाजी आहे. १५.] *शेवगा* ;- ही भाजी वातनाशक व पित्तनाशक आहे. हृदय व रुधिराभिसरण क्रिया यामुळे सुधारतात. १६.] *सॅलड* :- या भाजीमध्ये लेसीथीन नावाचे द्रव्य असते. मजासंस्थेचे कार्य सुधारण्यास त्यामुळे मदत होते. मेंदूवर जास्त ताण पडणार्यांनी नियमित सॅलड खावे*संकलन*••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• 🌹 *" फ्रेश सुविचार "* 🌹••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••आदर ही एक अशी गोष्ट आहे की जो दुसऱ्याला दिला तरच आपल्याला मिळतो.*संकलन :- प्रमिलाताई सेनकुडे**ता. हदगाव जि. नांदेड*📱9403046894••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• ❓ *आजची प्रश्नमंजुषा* ❓••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••१) 'वृक्षवल्ली आम्हा सोयरे वनचरे' हा अभंग कोणी म्हटले आहे ?२) भारताने नुकतेच कोणत्या देशातील नागरिकांना व्हिसा देण्याची सेवा तात्पुरती स्थगित केली आहे ?३) जगात सर्वाधिक तूरडाळ सेवन करणारा देश कोणता ?४) लोकसभेचा सदस्य होण्यासाठी वयाची किती वर्षे पूर्ण करावी लागतात ?५) रक्तदाबाच्या विकारावर अत्यंत उपयुक्त वनस्पती कोणती ? *उत्तरे :-* १) संत तुकाराम महाराज २) कॅनडा ३) भारत ४) २५ वर्षे ५) तुळस*संकलन :- जैपाल भै. ठाकूर*जि.प.व.प्राथ.शाळा भोसा, ता. आमगाव, जि. गोंदिया 📱9765943144••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎂 *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *◆|वा|ढ|दि|व|स|अ|भि|ष्ठ|चिं|त|न|◆* 👤 सुनील आलूरकर, तंत्रस्नेही शिक्षक, नांदेड👤 अजय मिसाळे👤 श्री दासरवार👤 सोनाजी बनकर👤 विश्वनाथ होले👤 विक्की खटके*ઉदंड_आયુષ્યાच्या अનંત_શુभेच्छा*[ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा एक दिवस अगोदर 9423625769 येथे पोस्ट करावे. ]••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• ••• 💡 ‼ *मनाचे श्लोक*‼ 💡•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••भजा राम विश्राम योगेश्वरांचा। जपू नेमिला नेम गौरीहराचा॥ स्वये नीववी तापसी चंद्रमौळी। तुम्हां सोडवी राम हा अंतकाळीं॥८५॥।। जय जय रघुवीर समर्थ ।।••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🕊🌎 ‼ *विचारधारा*‼🕊🌎••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••काजळ आणि काळीज जरी वेगवेगळे असले तरी दोघांमध्ये खूप फरक आहे. काजळ जरी काळा रंगाचा दिसत असेल तरी आपले सौदर्य खुलून दिसण्यासाठी मदत करत असते. कारण त्याची आपण मोठ्या काळजाने निवड करत असतो. तसंच एखाद्या व्यक्तीला सुद्धा मदत करण्यासाठी आपले काळीज मोठे असावे लागते. म्हणून त्यांच्या रूपाकडे बघून त्यांना तुच्छ न लेखता त्यांच्यात असलेल्या खऱ्या गुणाची कदर करता आली पाहिजे. त्यासाठीही आपले काळीज मोठे असणे आवश्यक आहे. 🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷सौ.संगीता संतोष ठलाल मु. कुरखेडा जि. गडचिरोली••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎭 *आजची फ्रेश बोधकथा* 🎭••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••*..... आणि क्रिकेट संघ तयार होतो*राजू उद्यानात उदास बसला होता, आज त्याचे मित्र खेळायला आले नाहीत. राजूकडे बॉल होता, पण ना बॅट ना मित्र. तो एकटाच बॉलशी निराश होऊन खेळत होता. इतर मुलंही उद्यानात क्रिकेट खेळत होती, पण राजू त्यांना ओळखत नव्हता. म्हणूनच तो कधी एकटाच चेंडूशी खेळायचा तर कधी बसून पोरांना खेळताना पाहायचा. काही वेळाने समोर खेळणाऱ्या मुलांचा चेंडू शेजारच्या एका बंद घरात पडला. तेथून चेंडू परत येणे अशक्य होते आणि एकही मूल तो गोळा करायला आत जाऊ शकत नव्हते. आता त्या मुलांनीही खेळणे बंद केले आहे. आता त्यांनाही क्रिकेट खेळता येत नसल्याने ते सर्व दुःखी झाले. त्या मुलांची नजर बॉल असलेल्या राजूवर गेली. मग काय, त्या लोकांनी राजूला खेळायला बोलावलं. राजू खेळण्यात चांगला होता. म्हणूनच तो खूप चांगला शॉर्ट टाकू शकला असता. चेंडू पकडण्यासाठी आणखी मुलांची गरज होती. त्यावर उद्यानात खेळणारी मुलंही त्यांच्यात सामील झाली. आणि काही वेळातच दोन पक्ष तयार झाले.अशा प्रकारे राजूची नवी क्रिकेट टीम तयार झाली.•••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••या पोस्ट विषयी आपल्या सूचना, निवेदन, अभिप्राय, बातम्या, वाढदिवस, माहिती किंवा शंका 9423625769 येथे कळवावे. •••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••~~~~~~~~~~~~~~~~~~~*🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢*📱 9423625769~~~~~~~~~~~~~~~~~~~*🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏*पुन्हा भेटू या फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार ~~~~~~~~~~~~~~~~~~~
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment