✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट~~~~~~~~~~~~~~~~~~~ 9️⃣ 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 9️⃣ ( फ्रेश शालेय परिपाठ )🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00 ( रविवार आणि सुट्टी वगळून )~~~~~~~~~~~~~~~~~~~🎇 दिनांक :- 06 सप्टेंबर 2023💠 वार - मंगळवार🌷🌐 . *दिनविशेष . 🌐* 🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *_ या वर्षातील २४९ वा दिवस आहे_* •••••••••••••••••••••••••••••••• *_महत्त्वाच्या घटना:_* •••••••••••••••••••••••••••••• *१९९७:अमेरिकेतील ’नॅशनल एन्डाऊमेंट फॉर द आर्टस’ या संस्थेतर्फे विख्यात सरोदवादक अमजद अली खाँ यांची ’नॅशनल हेरिटेजफेलोशिप’साठी निवड**१९९३:ज्येष्ठ कवी गोविंद विनायक तथा विंदा करंदीकर यांची कुसुमाग्रज प्रतिष्ठानच्या जनस्थान पुरस्कारासाठी निवड**१९६८:स्वाझीलँड हा देश स्वतंत्र झाला.**१९६६:दक्षिण अफ्रिकेचे पंतप्रधान हेन्ड्रिक व्हरवोअर्ड यांची संसदीय बैठक चालू असतानाच हत्या.**१९६५:पाकिस्तानचे अध्यक्ष जनरल अयुब खान यांनी भारताविरुद्ध युद्ध पुकारले. ’ऑपरेशन ग्रँड स्लॅम’ ही त्यांची दिल्लीपर्यंत धडक मारण्याची योजना होती. पॅटन रणगाडे आणि सेबरजेट विमाने असलेल्या पाकिस्तानच्या घुसखोरीला प्रत्युत्तर देत भारताने पाकिस्तानवर हल्ला चढवला व पहिल्या भारत पाकिस्तान युद्धाची सुरूवात झाली.या युद्धात भारताने पाकिस्तानला सपाटून मार दिला.**१९५२:कॅनडातील पहिले दूरचित्रवाणी केन्द्र माँट्रिअल येथे सुरू झाले.**१९३९:दुसरे महायुद्ध – दक्षिण अफ्रिकेने जर्मनीविरुद्ध युद्ध पुकारले.* *_जन्मदिवस / जयंती / वाढदिवस:_* •••••••••••••••••••••••••••••••••••••• *१९६८:प्रा.डॉ.सुनंदा शेळके-- प्रसिद्ध कवयित्री,गझलकार* *१९६८:पद्माकर दत्तात्रय वाघरुळकर -- लेखक* *१९६८:सईद अन्वर – पाकिस्तानी फलंदाज**१९६५:प्रदीप त्र्यंबकराव चौधरी-- कवी, लेखक* *१९५९:सय्यद जबाब स.रहेमान पटेल- कवी* *१९५८:श्रीकृष्ण उर्फ आबासाहेब कडू-- प्रसिद्ध कथाकार**१९४९:राकेश रोशन-- चित्रपट निर्माता,निर्देशक व अभिनेता**१९४६:डॉ.स्नेहसुधा कुलकर्णी--ज्येष्ठ लेखिका**१९३७:डॉ.पी.व्ही.काटे-- इतिहास संशोधक**१९३७:वसंत गोविंद पोतदार-- लेखक, कथाकथनकार आणि स्वातंत्र्य चळवळीचे इतिहासकार(मृत्यू:३० एप्रिल २००३)**१९३६:डॉ.सुहास बाळ देव-- कवयित्री, लेखिका* *१९३६:प्रा.रामकृष्ण रघुनाथ डिघोळकर-- कवी**१९३२:शकुंतला बाळकृष्ण फाटक-- लेखिका* *१९३१:शांताराम काशिनाथ राऊत--बोधचिन्ह संकल्पनकार(मृत्यू:१८ ऑक्टोबर २०१५)**१९२९:यश जोहर – हिन्दी चित्रपट निर्माता (मृत्यू:२६ जून २००४)**१९०१:कमलाबाई कामत तथा कमलाबाई रघुनाथ गोखले – भारतीय चित्रपटसृष्टीतील पहिल्या स्त्री कलाकार. ’राजा हरिश्चंद्र’ या पहिल्या मूकपटात त्यांनी भूमिका केली होती. (मृत्यू:१८ मे १९९७)**१८८९:बॅ. शरदचंद्र बोस – स्वांत्र्यसेनानी, झुंजार पत्रकार, नेताजी सुभाषचंद्र बोस यांचे वडील बंधू (मृत्यू:२० फेब्रुवारी १९५०)**१७६६:जॉन डाल्टन – इंग्लिश भौतिक व रसायनशास्त्रज्ञ (मृत्यू: २७ जुलै १८४४)* *_मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन:_* •••••••••••••••••••••••••••••••••••••• *२०२०:बक्षी मोहिंदर सिंग सरना- व्यावसायिकरित्या एस.मोहिंदर म्हणून ओळखले जाणारे ,भारतीय संगीतकार(जन्म :२४ फेब्रुवारी १९२५)**१९९०:सर लिओनार्ड तथा ’लेन’ हटन – इंग्लिश क्रिकेटपटू (जन्म:२३ जून १९१६)**१९७२:अल्लाउद्दीन खाँ – हिन्दुस्थानी शास्त्रीय संगीतातील महर्षितुल्य कलाकार व संगीतकार,सरोदवादक(जन्म:१८६२)**१९६३:मंजेश्वर गोविंद पै तथा राष्ट्रकवी गोविंद पै – कन्नड कवी व श्रेष्ठ भाषा संशोधक,त्यांना कन्नड,कोंकणी,इंग्लिश,संस्कृत,तेलुगू, तामिळ,मराठी,कन्नड,बंगाली,पर्शियन,पाली, ऊर्दू,ग्रीक,जपानी इ. २५ भाषा अस्खलित येत असत. त्यांनी अनेक जपानी ग्रंथांचे कन्नडमध्ये भाषांतर केले. (जन्म: २३ मार्च १८८३)* ~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~ *_दिनविशेष या सदरातील सर्व मुद्दे हे संग्रहात्मक आहेत तेव्हा त्यात चूका नसतीलच असे सांगता येणार नाही_* *✍ संकलन ✍* *श्रीराम चव्हाण नागपूर*मोबाईल:9822695372 ईमेल: chavhansk65@gmail.com••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *✈ 🚀 गुगलयान ✈ 🚀*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••श्रावणातल्या कविता *राधा ही बावरी*- गीतकार अशोक पत्कीरंगात रंग तो श्यामरंग पाहण्या नजर भिरभिरतेऐकुन तान विसरून भान ही वाट कुणाची बघतेत्या सप्तसुरांच्या लाटेवरूनी साद ऐकुनी होईराधा ही बावरी हरीची राधा ही बावरीहिरव्या हिरव्या झाडांची पिवळी पाने झुलतानाचिंब चिंब देहावरुनी श्रावणधारा झरतानाहा दरवळणारा गंध मातीचा मनात बिलगून जाईहा उनाड वारा गूज प्रीतीचे कानी सांगून जाईत्या सप्तसुरांच्या लाटेवरूनी साद ऐकुनी होईराधा ही बावरी हरीची राधा ही बावरीआज इथे या तरूतळी सूर वेणूचे खुणावतीतुज सामोरी जाताना उगा पाऊले घुटमळतीहे स्वप्न असे की सत्य म्हणावे राधा हरखून जाईहा चंद्र चांदणे ढगा आडुनी प्रेम तयांचे पाहीत्या सप्तसुरांच्या लाटेवरूनी साद ऐकुनी होईराधा ही बावरी हरीची राधा ही बावरीसंकलन~~~~~~~~~~~~~~~~~~~ 🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••1⃣ *मराठा आरक्षणावर अध्यादेश काढण्यासाठी सरकारला चार दिवसांची मुदत; मनोज जरांगे उपोषणावर ठाम*•••••••••••••••••••••••••••••••••••••2⃣ *अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडन यांच्या जी-20 परिषदेसाठी भारत दौऱ्याबाबत अनिश्चितता*•••••••••••••••••••••••••••••••••••••3⃣ *मातृभाषेतून शिक्षण उपलब्ध करुन देण्यास शिक्षण विभाग आग्रही; सप्टेंबरअखेरपर्यंत पाठ्यपुस्तकं मराठीत करण्याच्या विद्यापीठांना सूचना*•••••••••••••••••••••••••••••••••••••4⃣ *विदर्भात पुढील दोन दिवस पावसाचा ऑरेंज अलर्ट; भारतीय हवामान विभागाचा अंदाज, राज्यातील धरणे पावसाविना कोरडीठाक, सप्टेंबर उजाडला उजनी धरणात 16 टक्के तर जायकवाडी धरणात 34 टक्के पाणीसाठा*•••••••••••••••••••••••••••••••••••••5⃣ *औरंगाबाद जिल्ह्यात जनावरांचा बाजार भरवण्यास बंदी, लम्पीचा प्रादुर्भाव वाढत असल्याने जिल्हा प्रशासनाचे आदेश*•••••••••••••••••••••••••••••••••••••6⃣ *उस्मानाबाद : जून 2024 पर्यंत उजनी धरणातून सीना-कोळेगाव धरणात पाणी येणार; मंत्री सावंत यांचा दावा*•••••••••••••••••••••••••••••••••••••7⃣ * 5 फलंदाज, 4 अष्टपैलू, 3 वेगवान गोलंदाज विश्वचषकासाठी टीम इंडियाचे कॉम्बिनेशन*•••••••••••••••••••••••••••••••••••••*📷 वृत्त संकलक - कुणाल पवारे 📹*📱9960358300•••••••••••••••••••••••••••••••••••••ही पोस्ट नियमित मिळविण्यासाठी आणि या समुहात add होण्यासाठी 9423625769 येथे संपर्क करावे.••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• 🌷🍃 *विशेष माहिती* 🌷🍃••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••*तुमच्या जिल्ह्याचं नाव कसं पडलं ?* महाराष्ट्रातील ३६ जिल्ह्याची वेग वेगळी अशी वैशिष्ट्ये आहे. *वर्धा* महाराष्ट्रातील वर्धा जिल्ह्याचे नाव हे जवळूनच वाहणाऱ्या वर्धा नदीवरुन देण्यात आले आहे. त्यामुळे वर्धा शहराची ओळख निर्माण झाली आहे.*संकलन*••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• 🌹 *" फ्रेश सुविचार "* 🌹••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••नम्रतेने जे लाभेल ते बळाने कधीच मिळणार नाही.*संकलन :- प्रमिलाताई सेनकुडे**ता. हदगाव, जि. नांदेड*📱9403046894••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• ❓ *आजची प्रश्नमंजुषा* ❓••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••१) सूर्याच्या अभ्यासासाठी आदित्य - एल१ कोणत्या ठिकाणाहून प्रक्षेपित करण्यात आले होते ?२) सूर्याचा अभ्यासासाठी पाठविण्यात आलेला आदित्य - एल१ लॅग्रेज पॉईंटवर केव्हा पोहोचणार ?३) आदित्य - एल१ कोणत्या बाबींचा अभ्यास करणार आहे ?४) लॅग्रेज पॉईंट कशाला म्हणतात ?५) सूर्याच्या पृष्ठभागावरील थंड भागाला काय म्हणतात ?*उत्तरे :-* १) श्रीहरिकोटा, आंध्रप्रदेश २) ६ जानेवारी २०२४ ३) सूर्याचा किरणोत्सर्ग, सूर्याचा कोरोना, सौरवायू तसेच सौर वादळे ४) अवकाशातील दोन वस्तूंमधील गुरुत्वाकर्षण शक्ती प्रभावशून्य असलेल्या ठिकाणाला ५) सनस्पॉट*संकलन :- जैपाल भै. ठाकूर*जि.प.व.प्राथ.शाळा भोसा, ता. आमगाव, जि. गोंदिया 📱9765943144••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎂 *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *◆|वा|ढ|दि|व|स|अ|भि|ष्ठ|चिं|त|न|◆* 👤 सुनील ठाणेकर, शिक्षक, देगलूर👤 जयेश वाणी👤 सचिन पाटील👤 आनंद गायकवाड👤 विठ्ठल तुकडेकर👤 अनिल सोनकांबळे👤 विकास डुमणे👤 रितेश पोकलवार*ઉदंड_आયુષ્યાच्या अનંત_શુभेच्छा,* [ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा एक दिवस अगोदर 9423625769 येथे पोस्ट करावे. ]••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• ••• 💡 ‼ *मनाचे श्लोक*‼ 💡•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••नव्हे सार संसार हा घोर आहे। मना सज्जना सत्य शोधुनि पाहे॥ जनीं वीष खातां पुढे सूख कैचे। करीं रे मना ध्यान या राघवाचें॥६६॥।। जय जय रघुवीर समर्थ ।।••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🕊🌎 ‼ *विचारधारा*‼🕊🌎••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••समाजात अशा अनेक प्रकारच्या गोष्टी, आचार, विचार आजही रूढ झाल्या दिसतात.जसे की, एखाद्याची निंदा करणे, वारंवार अपमान करणे, कुणाची निंदा करू नये,असे असतानाही अनेक जण सतत निंदा करत असतात.मात्र ह्याच निंदेमुळे स्वतःचा विकास होत नाही मात्र,अनेकांना त्यातून नवी वाट सापडत असते.असा त्यांचा समज होऊन जातो. जर...दुसऱ्यांचा विचार करणे योग्यच आहे. मात्र तो, सकारात्मक असावा. आपण आपल्यात त्याच प्रकारचे बदल घडवून आणायला पाहिजेत. पण, व्यर्थ गोष्टींच्या आधाराने नाही तर. ..माणुसकीच्या नात्याने केलेले नि:स्वार्थ भावनेचे कार्य असावेत ते,कधीही मिटत नाही.🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷सौ.संगीता संतोष ठलाल मु. कुरखेडा जि. गडचिरोली••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎭 *आजची फ्रेश बोधकथा* 🎭••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••ट्रेन पिंकी खूप गोड मुलगी आहे. पिंकी इयत्ता दुसरीत शिकते. एके दिवशी त्याला त्याच्या पुस्तकात ट्रेन दिसली. त्याला त्याचा रेल्वे प्रवास आठवला, जो त्याने काही दिवसांपूर्वी त्याच्या पालकांसोबत केला होता. पिंकीने चौक वाढवला आणि मग काय, भिंतीवर ट्रेनचं इंजिन लावलं . त्यात पहिला बॉक्स जोडला गेला, दुसरा बॉक्स जोडला गेला, जोडलेले असताना अनेक बॉक्स जोडले गेले. चौक संपल्यावर पिंकी उठली आणि पाहिली की वर्गाच्या अर्ध्या भिंतीवर ट्रेन उभी होती. मग काय झालं – ट्रेन दिल्लीला गेली, मुंबईला गेली, अमेरिकेला गेली, आजीच्या घरी गेली आणि आजोबांच्या घरीही गेली.नैतिक शिक्षण – मुलांचे मनोबल वाढवा उद्याचे भविष्य आजपासून घडवूया.•••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••या पोस्ट विषयी आपल्या सूचना, निवेदन, अभिप्राय, बातम्या, वाढदिवस, माहिती किंवा शंका 9423625769 येथे कळवावे. •••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••~~~~~~~~~~~~~~~~~~~*🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢*📱 9423625769~~~~~~~~~~~~~~~~~~~*🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏*पुन्हा भेटू या फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार ~~~~~~~~~~~~~~~~~~~
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment