✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट~~~~~~~~~~~~~~~~~~~ 9️⃣ 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 9️⃣ ( फ्रेश शालेय परिपाठ )🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00 ( रविवार आणि सुट्टी वगळून )~~~~~~~~~~~~~~~~~~~🎇 दिनांक :- 16 सप्टेंबर 2023💠 वार - शनिवार🌷🌐 . *दिनविशेष . 🌐* 🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *_ या वर्षातील २५९ वा दिवस आहे_* •••••••••••••••••••••••••••••••• *१९९७:संस्कृत भाषेसंदर्भात प्रशंसनीय कार्य केल्याबद्दल मुंबई येथील मराठा मंदिर संस्थेच्या वरळी हायस्कूलमधील संस्कृतचे निवृत्त शिक्षक पं. गुलाम दस्तगीर अब्बासअली बिराजदार यांना ’राष्ट्रीय संस्कृत पंडित’ हा राष्ट्रपतींकडून दिला जाणारा पुरस्कार जाहीर**१९९७:आय. टी. सी. आंतरराष्ट्रीय मैदानी स्पर्धेत राजीव बालकृष्णन याने शंभर मीटर धावण्याच्या शर्यतीत १०.५० सेकंद वेळ नोंदवून राष्ट्रीय विक्रम केला.**१९७५:पापुआ न्यू गिनी या देशाला (ऑस्ट्रेलियापासुन) स्वातंत्र्य मिळाले.**१९४५:दुसरे महायुद्ध – हाँगकाँगमधील जपानी सैन्याने रॉयल नेव्हीसमोर शरणागती पत्करली**१९३५:इंडियन कंपनीज अॅक्ट अन्वये ’बँक ऑफ महाराष्ट्र’ची नोंदणी करण्यात आली.**१९०८:’जनरल मोटर्स कॉर्पोरेशन’ या कंपनीची स्थापना झाली.**१६२०:’मेफ्लॉवर’ जहाजाने साउदॅम्पटन बंदरातुन उत्तर अमेरिकेकडे प्रयाण केले.* *_जन्मदिवस / जयंती / वाढदिवस:_* ••••••••••••••••••••••••••••••••••••••*१९८५: स्वप्ना आकाश बेलदार-- कवयित्री* *१९७५:संजय गोळघाटे -- कवी* *१९७३:परविन कौशर--लेखिका**१९७१:प्रसून जोशी ---भारतीय कवी,लेखक, गीतकार**१९६८:अर्चना रमेश कुलकर्णी - लेखिका* *१९६५:रामभाऊ होलाराम कटरे-कवी,लेखक* *१९५६:अरुणचंद्र शंकरराव पाठक--इतिहास अभ्यासक**१९५६:डेव्हिड कॉपरफिल्ड – अमेरिकन जादूगार**१९५४:संजय बंदोपाध्याय – सतारवादक**१९४८:सुबोध प्रभाकर जावडेकर-- मराठी भाषेत लिहिणारे एक विज्ञान कथा लेखक**१९४६:ज्योती राम आसटकर -- कवयित्री**१९४३: श्यामराव (श्याम) बजाप्पा कुरळे-- जेष्ठ साहित्यिक* *१९४३: मनराज दुलीचंद पटले -- कवी,लेखक* *१९४२:नामदेव धोंडो तथा ’ना. धों’ महानोर – सुप्रसिद्ध निसर्ग कवी व प्रयोगशील शेतकरी, साहित्य अकादमी व पद्मश्री पुरस्काराने सन्मानित.(मृत्यू:३ऑगस्ट२०२३)**१९४२:विजय पाटील-- रामलक्ष्मण या नावाने ओळखले जाणारे,भारतीय संगीतकार (मृत्यू:२२ मे२०२१)**१९३३:रामभाऊ पांडुरंग गोतमारे --- कवी**१९१६:एम. एस. सुब्बुलक्ष्मी – विख्यात शास्त्रीय गायिका (मृत्यू: ११ डिसेंबर २००४)**१९१५:नागेश रामचंद्र जोशी--- मराठी नाटककार,गीतकार(मृत्यू १८ मे १९५८)**१९१३:कमलाबाई कृष्णाजी ओगले – ’रुचिरा’ या पाकशास्त्रावरील प्रचंड खपाच्या पुस्तकाच्या लेखिका (मृत्यू:२० एप्रिल १९९९)**१९०७:वामनराव सडोलीकर – जयपूर-अत्रौली घराण्याचे गायक (मृत्यू:२५ मार्च १९९१)**१९०३:श्रीधरशास्त्री वारे-- महाराष्ट्रातील थोर संस्कृत अभ्यासक आणि लेखक (मृत्यू:२४ऑगस्ट १९६४)**१८८७:दुर्गाप्रसाद आसाराम तिवारी--मराठी कवी (मृत्यू :२१ऑक्टोबर,१९३९)* *_मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन:_* ••••••••••••••••••••••••••••••••••••••*१९९४:जयवंत दळवी – साहित्यिक, नाटककार व पत्रकार. कथा, कादंबरी, नाटक, प्रवासवर्णन, विनोदी लेख असे विविध प्रकार त्यांनी हाताळले. ते 'ठणठणपाळ’ या टोपणनावाने विनोदी व मार्मिक लेखन करीत. (जन्म: १४ ऑगस्ट १९२५)**१९७७:केसरबाई केरकर – जयपूर - अत्रौली घराण्याच्या शास्त्रीय गायिका (जन्म: १३ जुलै १८९२)**१९७३:गंगाधरराव नारायणराव तथा आबासाहेब मुजुमदार-- पुण्यातील जुन्या पिढीतील सरदार, पर्वती संस्थानचे विश्वस्त, संगीतज्ञ, इतिहासाचे अभ्यासक ,भारत इतिहास संशोधक मंडळाचे ते चोवीस वर्षे चिटणीस होते.(जन्म:१ फेब्रुवारी १८६८)**१९६५:फ्रेड क्विम्बी – अमेरिकन अॅनिमेशनपट निर्माते (जन्म:३१ जुलै १८८६)**१९३२:सर रोनाल्ड रॉस – हिवतापाच्या जंतुंचा शोध लावल्याबद्दल नोबेल पारितोषिक मिळवणारे (१९०२) ब्रिटिश डॉक्टर (जन्म:१३ मे १८५७ )**१८२४:लुई (अठरावा) – फ्रान्सचा राजा (जन्म: १७ नोव्हेंबर १७५५)**१७३६:डॅनियल फॅरनहाइट – जर्मन शास्त्रज्ञ (जन्म: २४ मे १६८६)*~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~ *_दिनविशेष या सदरातील सर्व मुद्दे हे संग्रहात्मक आहेत तेव्हा त्यात चूका नसतीलच असे सांगता येणार नाही_* *✍ संकलन ✍* *श्रीराम चव्हाणमाजी शिक्षणाधिकारी,नागपूर*मोबाईल:9822695372 ईमेल: chavhansk65@gmail.com••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *✈ 🚀 गुगलयान ✈ 🚀*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••*आगमन बाप्पाची ; माहिती गणपतीची*पहिला भाग - मोरगावचा मयुरेश्वरमहाराष्ट्रातील पुणे जिल्ह्यातील मोरगाव येथे मयुरेश्वराचे मंदिर आहे. अष्टविनायक गणपती मधील हा पहिला गणपती समजला जातो. मोरगाव हे गाव कऱ्हा नदी किनारी वसलेले आहे. अष्टविनायकाची यात्रा मोरेश्वराच्या दर्शनाने सुरू होते. मोरावर बसून दैत्यांच्या पराभव केला म्हणून गणेश "मोरेश्वर" किंवा "मयुरेश्वर" या नावाने ओळखले जाऊ लागले. म्हणून गावास मोरगाव म्हणून ओळखले जाते.पुणे रेल्वे स्टेशन पासून मोरगाव हे हडपसर-सासवड आणि जेजुरीमार्गे ६४ कि.मी. वर आहे. पुणे-सोलापूर मार्गावर पुण्यापासून ५५ कि.मी. वर चौफुला गाव आहे. तेथून मोरगावला जाता येते. चौफुला ते मोरगाव अंतर २३ कि.मी. आहे. येथे जाण्यासाठी महामंडळाची बस किंवा खाजगी वाहनाने देखील जाता येते. मयुरेश्वर मंदिर हे सुभेदार गोळे यांनी बांधले आहे, आदिलशाही कालखंडात याचे बांधकाम केले आहे, पायदळ प्रमुख सरनौबत नरवीर पिलाजी गोळे यांचे आजोबा सुभेदार गोळे होते.मोरेश्वराचे मंदिर म्हणजे एक प्रशस्त गढीच आहे. मंदिर काळ्या दगडापासून तयार करण्यात आले असन ते बहामनी काळात बांधले गेले. गावाच्या मध्यभागी असलेल्या या देवळाला चारही बाजूंनी मनोरे आहेत. मोगल काळात देवळावर आक्रमण होऊ नये म्हणून या देवळाला मशिदीसारखा आकार दिला आहे. देवळाच्या बाजूने ५० फूट उंचीची संरक्षण भिंत आहे. गाभाऱ्यातील मयूरेश्वराची मूर्ती बैठी, डाव्या सोंडेची, पूर्वाभिमुख आणि अत्यंत आकर्षक आहे. मूर्तीच्या डोळ्यात व बेंबीत हिरे बसवले आहेत. मस्तकावर नागराजाचा फणा आहे. मूर्तीच्या डाव्या- उजव्या बाजूस ऋद्धिसिद्धीच्या पितळी मूर्ती असून पुढे मूषक व मयूर आहेत.असे मानले जाते की, पूर्वी सिंधू नावाच्या असुराने पृथ्वीतलावर उत्पात माजवला होता, त्याचा नाश करण्यासाठी देवांनी अखेर गणपतीची आराधना केली, तेव्हा गणपतीने मयूरावर आरूढ होऊन येथे सिंधू असुराचा वध केला. त्यामुळे गणपतीला येथे मयूरेश्वर असे नाव पडले. या गावात मोरांची संख्या जास्त असल्यामुळे त्याला मोरगाव असे म्हणतात.या मंदिरात मयूरेश्वराबरोबर ऋद्धी व सिद्धी यांच्याही मूर्ती आहेत. असे म्हणतात की ब्रम्हदेवाने दोन वेळा या मयूरेश्वराची मूर्ती बनवली आहे. पहिली मूर्ती बनवल्यावर ती सिंधुसुराने तोडली. म्हणून ब्रम्हदेवाने पुन्हा एक मूर्ती घडवली.सध्याची मयूरेश्वराची मूर्ती खरी नसून त्यामागे खरी मूर्ती असल्याचे मानले जाते. ती मूर्ती लहान वाळू व लोखंडाचे अंश व हिऱ्यांपासून बनलेली आहे. या मंदिराचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे या मंदिराच्या समोर एक नंदीची मूर्ती आहे. असे सांगितले जाते की शंकराच्या मंदिरासाठी नंदीची मूर्ती एका रथातून नेली जात होती, मात्र येथे आल्यावर त्या रथाचे चाक तुटले. त्यामुळे या नंदीला येथेच ठेवण्यात आले.पुढील भागात - थेऊरचा चिंतामणीसंकलन~~~~~~~~~~~~~~~~~~~ 🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••1⃣ *नागपूर जिल्ह्यात ई-पंचनाम्याचे प्रयोग यशस्वी, शेतकऱ्यांना वेगाने मदत मिळणं शक्य*•••••••••••••••••••••••••••••••••••••2⃣ *नाशिक जिल्ह्यातील 213 गावांना सर्वाधिक 81 टँकरद्वारे पाणीपुरवठा, भर पावसाळ्यात टँकरवर तहान भागवण्याची वेळ*•••••••••••••••••••••••••••••••••••••3⃣ *'निपाह व्हायरसचा मृत्यू दर कोरोनाहून जास्त', ICMR कडून चिंता व्यक्त; केरळमध्ये आणखी एका रुग्णाची नोंद*•••••••••••••••••••••••••••••••••••••4⃣ *फ्रान्समध्ये आयफोन 12 विक्रीवर बंदी, रेडिएशन पसरवत असल्याचा आरोप*•••••••••••••••••••••••••••••••••••••5⃣ *धीर सोडू नका! आदित्य ठाकरे शेतकऱ्यांच्या बांधावर, नुकसानीची केली पाहणी*•••••••••••••••••••••••••••••••••••••6⃣ *मुंबई : लोकलमधून प्रवास करताना पासधारकांना ओळखपत्र बंधनकारक, रेल्वे प्रशासनाचा निर्णय*•••••••••••••••••••••••••••••••••••••7⃣ *आशिया चषक 2023 - बांगलादेशचा भारतावर 6 धावांनी विजय, शुभमन गिलचं शतक व्यर्थ*•••••••••••••••••••••••••••••••••••••*📷 वृत्त संकलक - कुणाल पवारे 📹*📱9960358300•••••••••••••••••••••••••••••••••••••ही पोस्ट नियमित मिळविण्यासाठी आणि या समुहात add होण्यासाठी 9423625769 येथे संपर्क करावे.••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• 🌷🍃 *विशेष माहिती* 🌷🍃••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••📕 *धुरामुळे गुदमरल्यासारखे का होते ?* 📕धुरात माणूस गुदमरतो. याचे कारण काय ते आता पाहू. आपण हवा श्वासावाटे आत घेतो. त्यात ऑक्सिजन (२०.९३ टक्के), कार्बन डायऑक्साइड (०.०३ टक्के), नायट्रोजन (७८.१ टक्के) तसेच अत्यल्प प्रमाणात निऑन, ॲगन, क्रिप्टॉन, झेनॉन व हेलीयम हे वायू असतात. या खेरीज पाण्याची वाफ, अमोनिया तसेच धूळ. जिवाणू, वनस्पतीजन्य कचरा असे तरंगणारे पदार्थही असतात.धुरामध्ये कार्बन डाय ऑक्साइड असतो. हवेतील त्याचे प्रमाण वाढल्याने व ऑक्सिजनचे प्रमाण कमी झाल्याने गुदमरल्यासारखे वाटत असेल असा पूर्वी समज होता. प्रत्यक्षात मात्र ऑक्सिजनचे प्रमाण १८ टक्क्यांपर्यंत कमी झाले.वा कार्बन डायऑक्साइडचे प्रमाण ५ टक्क्यांपर्यंत वाढले, तरी आपल्याला फारसा त्रास होत नाही, असे शास्त्रीयनिरीक्षणाद्वारे सिद्ध झाले आहे.धुरामध्ये माणसाला गुदमरल्यासारखे वाटते, अस्वस्थ वाटते. याचे कारण म्हणजे तापमानात होणारी वाढ.तापमानातील वाढीमुळेच माणसाचा मृत्यूही ओढवू शकतो. कलकत्त्यामध्ये एका तुरुंगात १८ × १४ X १० फुटाच्याखोलीत १४६ कैदी होते. खोलीला वायूवीजनासाठी पुरेशा अशा दोन लहान खिडक्या होत्या. ऑक्सिजन, कार्बनडायऑक्साइड यांचे प्रमाण सामान्य राहूनही त्यातील फक्त २३ जण जिवंत राहिले. कारण त्या खोलीतील तापमानव आर्द्रतेत खूपच वाढ झाली होती. अर्थात धुरामुळे हवेतील कार्बन डायऑक्साइडचे प्रमाण ५ टक्क्यांच्या वर गेले, तर त्यामुळेही गुदमरल्यासारखे होते.डॉ. अंजली दिक्षित व डॉ. जगन्नाथ दिक्षित यांच्या पुस्तकातुन*संकलन :- श्याम ठाणेदार, पुणे*••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• 🌹 *" फ्रेश सुविचार "* 🌹••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••आयुष्यात यश मिळवण्यासाठी चिकाटीला जिवलग मित्र बनवा.*संकलन :- प्रमिलाताई सेनकुडे**ता. हदगाव जि. नांदेड*📱9403046894••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• ❓ *आजची प्रश्नमंजुषा* ❓••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••१) गुरुत्वाकर्षणचा शोध कोणी लावला ?२) राष्ट्रपती होण्यासाठी वयाची किती वर्षे पूर्ण करावी लागतात ?३) 'ययाती' या कादंबरीचे लेखक कोण आहेत ?४) जागतिक महिला दिवस केव्हा साजरा केला जातो ?५) सप्टेंबर महिन्यात किती दिवस असतात ? *उत्तरे :-* १) न्यूटन २) ३५ वर्षे ३) वि. स. खांडेकर ४) ०८ मार्च ५) ३० दिवस *संकलन :- जैपाल भै. ठाकूर*जि.प.व.प्राथ.शाळा भोसा, ता. आमगाव, जि. गोंदिया 📱9765943144••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎂 *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *◆|वा|ढ|दि|व|स|अ|भि|ष्ठ|चिं|त|न|◆* 👤 गणेश सोळुंके, जालना👤 प्रसाद मुतनवाड👤 लक्ष्मणराव भवरे👤 मंगेश यादव👤 संतोष ओझा*ઉदंड_आયુષ્યાच्या अનંત_શુभेच्छा*[ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा एक दिवस अगोदर 9423625769 येथे पोस्ट करावे. ]••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• ••• 💡 ‼ *मनाचे श्लोक*‼ 💡•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••नव्हे कर्म ना धर्म ना योग कांही। नव्हे भोग ना त्याग ना सांग पाहीं॥ म्हणे दास विश्वास नामी धरावा। प्रभाते मनी राम चिंतीत जावा॥७६।।।। जय जय रघुवीर समर्थ ।।••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🕊🌎 ‼ *विचारधारा*‼🕊🌎••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••काही अडचणी मुळे आपल्याला समोर बसण्यासाठी जागा मिळाली नाही म्हणून दु:खी होऊ नये. मागे जागा मिळाली असेल तर त्यातच समाधान मानून शांतपणे बसावे. कधी काळी सांगता येत नाही आपल्याला समोरही बसण्याची संधी मिळू शकते. म्हणून धीर सोडू नये आणि आपला स्वाभिमान कायम ठेवून आलेल्या परिस्थितीचा सामना करावे दिवसं प्रत्येकांचे निघत असतात व वेळही बदलत असते.🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷सौ.संगीता संतोष ठलाल मु. कुरखेडा जि. गडचिरोली••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎭 *आजची फ्रेश बोधकथा* 🎭••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••*कालियाला शिक्षा झाली*संपूर्ण गल्ली कालियावर नाराज होती. कधी कधी तो भुंकून रस्त्यावरून येणाऱ्या लोकांना घाबरवायचा . कधी चावायला धावत असे. भीतीपोटी मुलांनी त्या गल्लीत एकटे जाणे बंद केले होते. त्या रस्त्यावर चुकून एखादं मुल गेलं तर त्याच्या हातातील खाद्यपदार्थ हिसकावून पळून जायचे. कालियाने तिच्या मित्रांनाही त्रास दिला होता. सगळ्यांना घाबरवून तो स्वत:ला गल्लीचा सेट समजू लागला. त्याच्या कळपात शेरू नावाचा एक छोटा कुत्राही होता. तो कोणालाही त्रास देत नाही, अगदी लहान मुले देखील त्याच्यावर खूप प्रेम करतात. एके दिवशी राहुलने शेरूसाठी रोटी आणली. शेरू खूप खुश झाला आणि तो भाकरी घेऊन गाडीखाली धावला. तिथे बसून जेवायला सुरुवात केली. शेरूला भाकरी खाताना पाहून कालियाने जोरात धक्का दिला आणि भाकरी घेऊन पळून गेला. शेरू जोरजोरात रडू लागला. राहुलने वडिलांना सांगितले. कालियाची कृती त्याच्या वडिलांना माहीत होती. त्याने यापूर्वीही पाहिले होते. त्याला खूप राग आला. एक काठी काढून कालिया दुरुस्त केला. कालियाला आता आजीची आठवण झाली. तो इतका सुधारला होता की रस्त्यावरून जाणाऱ्या लोकांनाही तो त्रास देत नाही. लहान मुलाला पाहून तो लपून बसायचा.नैतिक – वाईट कर्मांचे वाईट परिणाम होतात, वाईट कर्म टाळावे.•••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••या पोस्ट विषयी आपल्या सूचना, निवेदन, अभिप्राय, बातम्या, वाढदिवस, माहिती किंवा शंका 9423625769 येथे कळवावे. •••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••~~~~~~~~~~~~~~~~~~~*🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢*📱 9423625769~~~~~~~~~~~~~~~~~~~*🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏*पुन्हा भेटू या फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार ~~~~~~~~~~~~~~~~~~~
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment